अबु आझमी..

अबु आझमी.. हे   नांव पण असं आहे , की जवळपास  प्रत्येक मराठी माणसाला  अगदी एखाद्या ट्रेररिस्ट किंवा बॉंब ब्लास्ट  मधला एखादा आरोपीच नांव असाव असं वाटते. अर्थात , असं वाटणं हा पुर्ण पणे मुर्खपणा आहे असंही वाटेल.. पण…. असो… माणसाच्या मनाला काय वाटावं यावर कांहीच ताबा राहू शकत नाही. माणसाचं मन कसं असतं?? अ ड्रंकन मंकी, स्टंग विथ द स्कॉर्पिओ.. त्याच्यावर ताबा रहाणं कठीण आहे.

अबु आझमी नावाला निवडुन देणारे, किंवा मतं देणाऱ्यांमधे मराठी माणसं पण आहेत. हे जरी खरं असलं तरीही ,अबु आझमी या नांवा बद्दल प्रत्येक सामान्य मराठी माणसाच्या मनात एक चीड आहे. या मधे मराठी माणसं अशीही आहेत की  ती कुठल्या एका पक्षाची नाहीत तर ती एकत्र बांधल्या गेलेली आहेत केवळ एकाच धाग्याने.. तो म्हणजे ’मराठीपणाच्या’ धाग्याने … + मराठी बद्दलचं प्रेम. .

अगदी पहिल्या  वेळी म्हणजे १९६३ साली विदर्भवीर (?) जांबुवन्तराव धोटे यांनी स्पिकरवर पेपर वेट फे्कून मारला होता.नंतर एप्रिल २००८ मधे सहा भाजप+शिवसेना आमदारांना याच कारणासाठी निलंबित करण्यात आलं होतं. जयललिता असेम्ब्ली मधे जातांना नेहेमी पोंचू घालते.. कारण माहिती आहे ??? पूर्वी एकदा जयललिताची साडी उतरवण्याचा प्रयत्न तामिळनाडू असेम्ब्ली मधे झाला होता.असे प्रकार तर बिहार आणि युपी असेम्ब्ली मधे नेहेमीच होत असतात.

अबु आझमी मराठी समाजात ,स्वतःच्या वागणूकीने    घृणेचा पात्र झालेला आहे – कधी म्हणतो की आम्ही त्यांना काठ्या देऊ.. तर कधी छटपुजे चं राजकारण करतो. या वर्षी तर हे सिद्ध झालंय की जर छटपुजे चं राजकारण केलं नाही तर मराठी माणसांना छट पुजेचं कांहीच वावडं नाही. म्हणजे  मागल्या वर्षी छटपुजेच्या नावे लालुवा आणि अबु ह्या दोघांनी आपल्या जिभेवर ताबा ठेवला असता तर मराठी माणसांनी पण काहीच केलं नसतं.

या मारण्यामुळे काय फायदा झालाय??? मला तर कांही फारसा दिसत नाही.. केवळ सगळ्या मराठी लोकांना (मनसे + आणि इतर )  त्या अबु ला झापड मारल्याचं एक मानसिक समाधान-जी बऱ्याच लोकांची अगदी मनापासुन इच्छा होती गेल्या कित्तेक दिवसापासुन ती पुर्ण झाली. . हे पण अगदी शंभर टक्के खरं की कोणी कुठल्याही पक्षाचा असो, या मुळे  प्रत्येक मराठी माणसाला एक मानसिक समाधान  मिळालंय.

आणि नुकसान म्हणाल तर अजुन असेम्ब्ली सुरु पण व्हायची आहे तरीही मनसेचे चार आमदार निलंबित करण्यात आलेले आहेत.  आता १३ पैकी जर ४ आमदार निलंबित झाले तर उरले केवळ ९. त्यांच्या कडुन कुठली अपेक्षा करायची?? हे चार आमदार निलंबीत होणार हे दुपारीच लक्षात आलं होतं, फक्त हा निर्णय कधी बाहेर येतो हेच पहायचं होतं.

असो.. आता मूळ मुद्दा.. अबु आझमी ला आज विधानसभेमध्ये मारलं हे योग्य की अयोग्य ह्याचा कीस पाडणं सुरु होणार आहे आता. मला एक प्रश्न विचारावासा वाटतो, की आम्ही हे जे  आमदार निवडुन दिलेले आहेत ते कुस्त्यांचा आखाड्या प्रमाणे असेम्ब्ली मधे मारा माऱ्या करायला की  आमचे प्रश्न सोडवायला?

कितीही झालं..तरी अबु एक निर्वाचित आमदार ( होतकरु मंत्री) आहे, तेंव्हा त्याची अशी बेअब्रु असेम्ब्ली मधे करणे संयुक्तिक ठरत नाही. अबु ला मारलं, याचं दुःख नाही, फक्त जागा चुकली. असेम्ब्ली हॉल मधे मारण्या ऐवजी बाहेर कुठे मारलं असतं तर कदाचित सस्पेंड व्हायची वेळ आली नसती. असाही प्रश्न उभा केला जातोय की इतर आमदार, ज्यांनी इंग्रजीत शपथ घेतली त्यांना मारहाण का करण्यात आली नाही?

म्हणजे काय- सत्तारुढ पक्ष वगळता इतर पक्षाचे आमदार काय केवळ मारहाण करण्यासाठी जनतेने निवडुन दिलेले आहेत असं आहे का? अर्थातच  नाही.. तेंव्हा अशी अपेक्षा ठेवणं योग्य नाही.  कितीही झालं तरीही आमदारांनी असेम्ब्लीमधे केलेली अशी मारहाण समर्थनीय ठरु शकत नाही.

About महेंद्र

माझा ब्लॉग :- http://kayvatelte.com
This entry was posted in राजकिय.. and tagged , , . Bookmark the permalink.

62 Responses to अबु आझमी..

 1. Sagar says:

  Sir khar mhantayt tumhi….Abula marnyamule sarv marathi manala ek prakarch samadhan labhalay….Mazya college madhe dekhil yahya pratikriya aalya…Je maze mitr politics ya vishapaun char hat dur aahet tyani pan aaj tya baddal comments dilya arthat marathi chya bajune…..Mala prashn asa padto ki Ya Abu aazmila sarv jan changlya prakare olakhatat mag tarihi hindi media tyachi evdhi baju ghte….Tya UP madhun rajakarni Bolatat….Mag aaple ase dalbhadri ka?Ha shap itihaspaun aahe mhana ki marathi manas ek nahit. pan as mhanun tyala kurvalat basnyat arth nahi….Kharch jar sarv marathi aamdarani ya muddyavar Abu var dabav aanla asta tar $ olichi shpath marathitun ghyala yachya bapach kai jat hot…….An rahili gosht 4 aamdarachi tar te navin v tarun aahet……Mala vatat hi chuk punha te karnar nahit ashi apeksha…..Hope MNS parat 9 shiledarasobat yavar aavaj uthvel…..Jay Maharashtra

  • बरेचदा आवाज उठवुन फायदा नसतो. तसं माझं म्हणणं मी आधिच लिहिलंय.. तसं हिंदी मिडिया त्याची साईड का घेतोय हे सगळ्यांनाच माहिती आहे.

   • san says:

    जीत हा शब्द हिन्दी वापरला आहे. मराठी मधे हिंदी शब्दाचा वापर करू नये असा फतवा राज साहेबानी जर काढला तर विचार करा आपणाला मराठी बोलता येणार नाही, कारण मराठी मधे ७०% शब्द हिंदी आहेत. (हिंदी सिरीअल बघताना शब्दावर नीट लक्षा द्या)

    • San
     फतवा आहे??मी तरी नाही ऐकलं या बद्दल..
     हिंदी मधले बरेच शब्द मराठीतही आहेतच..

    • मौनं सर्वार्थ साधन‍म

    • मराठी अस्मिता याचा अर्थ भाषाशुद्धी असा नव्हे. आणि मराठीतर भाषांचा (विशेष करून हिंदीचा ) तिरस्कार असा नव्हे. इंग्रजी भाषेचे उदाहरण घेतले तर त्यामध्ये जगातील सर्व जिवंत भाषांमधील कमीत कमी एकतरी शब्द सामावून घेतलेला असेल. भाषा अशीच समृद्ध होत असते त्यामुळे १००% शुद्धतेचा दावा मूर्खपणाचा व आत्मघातकी ठरेल. त्यामुळे तो राज ठाकरे केलेला नाही. ब्रिटीशांचा राज्यात “dogs and Indian are not allowed” असे काही सार्वजनिक ठिकाणी लिहिलेले असायचे. तशीच वागणूक आज “डॉग्स and मराठी are not allowed ” असा अलिखित नियम करून मुंबई, या महाराष्ट्राच्या राजधानीत मराठी माणसाला दिली जात आहे. रेल्वे स्टेशन, बँक्स, सिनेमागृहे, मौल्स … अशाठिकाणी जाऊन फक्त मराठीच बोलून बघा. तुम्हाला त्यांचा अनुभव येईल.
     तर मराठी बोलायला लाजू नका, अभिमानाने बोला,इंग्रजी बोलायला घाबरू नका आणि हिंदी प्रेमाने बोला व त्यांना मराठी प्रेमाने बोलायला लावा. असे वागले तरच त्याला मराठी अस्मिता म्हणता येईल.

     • राजीव
      अतिशय बॅलन्स्ड व्ह्यु आहे तुमचा. मी दोन दिवस नेट वर नव्हतो म्हणुन उत्तर द्यायला वेळ झाला. 🙂
      मॅक डॊनाल्ड मधे मराठी मुलगा पण ( काउंटरवरचा) इंग्रजीच बोलतो, जरी तुम्ही मराठित बोललात तरिही… !!
      देशाची अखंडता जर ठेवायची असेल तर असे राजकारण करुन चालणार नाही..

 2. Pravin says:

  तुमच्याशी पूर्णपणे सहमत. अशी आंदोलने करण्यापूर्वी कायदा काय म्हणतो ते पाहिलं पाहिजे. कायद्यानुसार अबु टेररिस्ट हिंदी मधून शपथ घेऊ शकतो. बरं इन्ग्रजीतून शपथ घेणाऱ्यांना काही केलं नाही. हिंदीपेक्षा इंग्रजी जवळची आहे का मनसेला? वर त्या राम नाईक यांनी मिडियासमोर हिंदीमधून चमकोगिरी (मटा चा शब्द) केली. जर का मनसे वाल्यांना वाटतं कि या बाबतीत कायदा चुकीचा आहे तर कायदा बदलण्यासाठी आंदोलने करावीत. जे काही कायद्याच्या चौकटीत बसत नाही त्यासाठीच आंदोलने करावीत. अशा आंदोलनासाठी १३ पैकी ४ मोहरे कामी आले, अजून पाच वर्षे कशी निघायची मनसेची? यापुढे मनसेने लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी आंदोलने केली तर बरे होईल.

  • प्रविण
   थोडं बरं वाटलं.. अबु ला ठोकलं हे ऐकुन. पण ही जी काही जीत आहे, तिच्यासाठी मोजलेली किम्मत वर्थ नाही.. असे मला वाटते.

 3. Ashish says:

  यातुन विजय हा मनसे चा नक्किच नाहि, विधानसभेच्या आत लढाई कशी लढायची असते हे यांना शिकावे लागेल. गुंडगीरी इथे नाहि चालायची. समजुन घेतले पाहिजे मनसेने हे.

  • आशिश
   आपला प्रेझेन्स दाखवण्याची घाई तर नाही ही? हे चारही आमदार एकाच दिवसात बर्खास्त पण केले जाउ शकले असते. फक्त निलंबनावर निभावलं म्हणुन मनसे ने आनंदच मानायला हवा…

 4. anandpatre says:

  हे सर्व प्रकरण मला वाटते मनसेनी politically करेक्ट हाताळायला पाहिजे, विरोधकांना इतक्यात संधी देवू नयेत.
  अबू आझमी ला फुकटच अमराठी लोकांची सहानभूती मिळाली असेल..

  • पोलिटिकली करेक्ट ..!!!! Exactly तेच म्हणायचंय मला. खडकावर बसलेला विंचु मारायला, पायातली वहाण पुरे.. त्या साठी तलवार वापरली तर ती खडकावर आपटुन बोथट होऊ शकते..

 5. manohar says:

  Abu Azami not worth the price paid by MNS.

 6. अबु आझमीला कुटायलाच हवा. फक्त जागा चुकली हे पूर्ण मान्य. पुण्यात बसेसची तोडफ़ोड जाळपोळ झाली याचे सगळ्यात जास्त वाईट वाटलं. आपणचं बसेस बकवास म्हणून बोंबलतो आणि आपल्यातलेच ४ खूळचोट बसेस जाळायला पुढे असतात. झाल्या प्रकारातून कोणाचा फायदा झाला हे माहीत नाही मात्र ह्यात सामान्य माणसाचे नुकसानच झाले. ही तोडफ़ोड पुण्यात करण्याऐवजी अबु आझमीच्या घरी केली असती तर चार चांद लागले असते.

  • बसेस जाळणं ..पब्लिक प्रॉपर्टी जाळणं हे तस सगळ्यात सॉफ्ट टार्गेट आहे.. मनसेचा फायदा मला तरी दिसत नाही. तसं फॅन फेअर वाढेल थोडं.. कदाचित कुंपणावरचे आता उडी मारतिल मनसेच्या बाजुला.

 7. Abhijit says:

  हा युपी चा व्हिडीओ पहा.

  काही चूक केले नाही त्यांनी. त्यांची आक्रमकता दाखवते की हा विषय किती संवेदनशील आहे. माझा भाउ हैदराबाद मध्ये २ वर्षांपासून राहतो. तो आता सराईतपणे तेलुगु बोलतो. मग या आझमीला ४० वर्षे इथे राहून मराठी का येत नाही? भाषा आत्मसात करायची म्हटल्यावर करता येते.४ ओळींची शपथ का घेता येउ नये. तो गुर्मीत होता. त्याला फोडलाच पाहिजे होता.
  आमदारांच निलंबिन हे बहुमताचे राजकारण कॉंग्रेस ने केलं. कमी तीव्रतेची कारवाई होवू शकली असती. मराठीचा उपमर्द करणा-यांच्या रक्षणासाठी कॉंग्रेस स्वत:च पुढे सरसावली आहे. I hate congress.

  • अभिजीत
   मराठी माणुस जात्याच कुठेही जाइल तिथे मिक्स अप होण्याचा प्रयत्न करतो. त्या अबुला पण मराठी येत असेलच.. पण केवळ राजकिय कारणांसाठी तो बोलत नसावा!
   कमी तीव्रतेची कारवाई होवू शकली असती. हे मात्र मान्य..

 8. sundeepdange says:

  अभिमान याच गोष्टीचा की, कमीतकमी महाराष्ट्र नवनिर्माण सेना निवडणूक प्रचारात हाती घेतलेल्या मुद्यांना सभागृहात मांडते आणि त्या साठी कोणच्याही कारवाईची भीती ना बाळगता लढते. तरीही ज्यांना वाटते की महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने सभागृहाचा अपमान केला आहे, त्यांना मी सल्ला देतो की, विरोधी पक्ष म्हणून गप्प बसणारा आमचा पक्ष नाही. आमचा इमान हा मराठी जनतेशी आणि त्याच्या विकासाशी. बाकी सर्व गोष्टी या शुल्लक. मी कधीही हिंसेचा समर्थक नसणार, पण जर कोणी महाराष्ट्राच्या मुळावर घाव घालेल, तर त्याला आम्ही सोडणार नाही. त्याला समजणाऱ्या भाषेत आम्ही त्याला उत्तर देऊ. माननीय शिशिर शिंदे, रमेश वांजळे, राम कदम आणि वसंत गीते यांचा आम्हाला अभिमान आहे.

  मनसेचे १३ आमदार होते, चार निलंबित झाले, उरले ९. पण आता आम्हाला खात्री आहे की, हे नऊ नक्कीच सरकारला पुरून उरतील आणि महाराष्ट्राच्या नेत्यान समोर एक नवा आदर्श मांडतील.

  – जय महाराष्ट्र.

  • संदिप
   वर पण लिहिलंय.. अहो विंचु मारायला वहाण पण पुरते… हे काम करायला आमदार कशाला हवेत?

 9. sundeepdange says:

  ज्याला निवेदनाची भाषा कळत नसेल तर करावे तरी काय? हा माझा प्रश्न आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या आमदारांनी लढलेल्या एकतर्फी युद्धाचे निषेध करणाऱ्या प्रत्येक मराठी माणसाला. हात जोडून विनंती कळत नसेल तर तोच हात त्याच्या श्रीमुखात देण्याची हिम्मत मराठी माणसात आहे, हे आज प्रत्येक महाराष्ट्र द्रोही माणसाला चांगलेच कळले असेल.

  – जय महाराष्ट्र.

 10. हेमंत आठल्ये says:

  तुमचे लेख खरच उत्तम असतात. आता मला यातील काही मुद्दे पटले नाहीत. पण हा लेख आवडला. एकच सांगावस वाटत की, सगळ्याच गोष्टी आपण फायदा आणि तोट्याच्या तराजूत तोलून पहाणे, म्हणजे मला तरी योग्य वाटत नाही. यावर अनेकांनी यावर आपली मत मंडळी आहेतच.

 11. Salil says:

  “बेहरो को सुनने के लिये धमको कि जरुरत होति है” भगतसिंग मोव्ही मधले एक वाक्य.

  झाले ते बरोबर कि चुक हे नाहि माहित, पण भगतसिंगने देखिल असेम्ब्लीमध्येच बॉम्ब टाकुन आपला आवाज भारताच्या कानाकोपर्‍यात पोहोचवलेला हे उगीचच आठवले मला.

  http://www.netbhet.com
  marathi-videos.blogspot.com

  • सलिल
   त्याला थोबाडला, या मधे काहीच आक्षेप नाही.. ते तर प्रत्येकच मराठी माणसाचं स्वप्न होतं. ते खरं करुन दाखवलंय.. पण पहिल्याच दिवशी जर बाजी प्रभु गारद झाले तर खिंड कोण लढवणार?

  • salil says:

   ही अ‍ॅक्टीव्हीटी प्रीप्लान्डच होती. (एका मुलाखतीत राज ठाकरेंनी याची हिंट दीली होती ) मनसेच्या या चार उमेदवारांना ईंन्स्टंटेनीयसली काहीही करण्याची परवानगीच नाही. फक्त निलंबन चार वर्षांसाठी होइल याची कल्पना कोणालाच नव्हती. फार फार तर २-३ महीन्यासाठी निलंबनाची कारवाई होइल असा त्यांचा अंदाज असावा. तो चुकला.

   मला विचाराल तर जागा चुकली नाही. शपथ घेतानाच अबु आझमींना थोबाडल्यामुळे जो परीणाम साधता आला तो इतर कुठीही आणि कधीही साधता आला नसता. आणि जे पडले ते बाजीप्रभु नव्हतेच मुळी ते फक्त प्यादे आहेत. त्यामुळे नुकसान फारसं नाही.

   आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे निलंबनाचा. ईतर सर्व पक्ष एकमताने MNS च्या विरोधात उभे राहीले कारण त्यांना आपापल्या अमराठी उमेदवारांची काळजी. आणि याच वाढत्या ताकदीवीरुद्ध आपलं युद्ध आहे.

   मी MNS ,Shivsena किंवा इतर कोणत्याही पक्षांशी संबंधीत नाही. MNS चे हे पब्लिसीटी स्टंट असेल कदाचित पण तरीही या चार उमेदवारांना परत आणण्यासाठी आता मराठी जनतेने सरकारवर दबाव आणला पाहीजे कारण कालच्या कृतीने जो वचक बसलाय तो अधिक घट्ट करणे आपल्याच हातात आहे.

   Salil
   http://www.netbhet.com

   http://marathi-videos.blogspot.com

   • बाहेरची तटबंदी जिंकायला सगळे सैनिक खर्च घातल्या नंतर मग बालेकिल्ला काबिज कसा करणार?? चार वर्षांसाठी निलंबन.. असो.. काळंच ठरवेल ही स्टेप बरोबर की चुक ते..

 12. साधारणतः उत्तर हे जागीच प्रकट होत असते… त्यामुळे ही मारामारी जरी विधानसभेत झाली असेल तर योग्यच वाटते…

  • शिरिष
   जर हे इन्स्टंटेनिअस असेल तर ठिक आहे.. पण जर प्रिप्लान्ड असेल तर …. थोडं चुकलंच असं वाटतं.. अर्थात या मधे मत भिन्नता असु शकते आपली.

 13. Heramb Oak says:

  Kaka, kay sollid zalay ha lekh.. agadi manatal bolalat.. Abu azmi he nav ch as aahe. lathya vatin kay, chhat puja kay.. kiti gurmi aahe tya manasala. Pan MNS la ajun chikkar strategical planning karayach aahe aani political maturity yayachi aahe he tyanni azmi la rastyavar na thokata vidhan sabhet thokal tya varun disun yet… 113 tun 4 gele tar vishesh farak padat nahi pan 13 tun gele tar barach padato he raj visarala… pan mast lekh..

  • हेरंब
   हा लेख लिहितांना अगदी निःपक्ष पणे लिहिण्याचा प्रयत्न केलाय. एका मराठी माणसाचे या वरचे विचार म्हणुन.. स्वतःला जे पटलं तेच लिहिलंय.. पण अबु ला जरा झटका हवाच होता..

 14. आपला देश महान आहे एक आतंकी निवडणूक जिंकून येतो अन ज्या प्रदेशाच्या लोकांनी निवडून दिलं त्यांच्या भाषेत शपथ घेणं त्याला नामुष्कीचं वाटतं ही एक विडंबनाच आहे । पण निवडून आलेल्या आमदारांनी जास्त जबाबदारी नी वागायला हवं. निषेध नोंदवावा पेपर मधे लिहावं पण मारामारी………..

 15. bhaanasa says:

  आजचा तुझा लेख अबु आझमीवर असणार हे माहीत होतेच.:) कानाखाली आवाज काढला हे चांगले झाले पण तू म्हणतोस तसेच जागा चुकली. विधानसभा हा मारामारीचा आखाडा नाहीये हे कधी कळणार यांना? लहान लहान मुलांनाही कळते कुठे काय केले तर कशी शिक्षा मिळेल. बरं अगदी सिंहासन स्टाईल,” नव्या मुख्यमंत्र्याला मी सचिवालयासमोर जोड्याने मारेन” अशी भीष्म प्रतिद्न्या कराण्याइतकी अबुची लायकी नाही. त्यातून एकाने कानाखाली आवाज काढला असता तर बरे झाले असते. आता चार बंदे तर गेले. उरले नऊ.एकदम निलंबनाची कारवाई….:(. आता ह्या नऊ जणांना फार सावध वागावे लागेल. हे लोक मुद्दामहून पुन्हा पुन्हा कुरापती काढणार आणि असेच घडत राहीले तर….. दुसरे म्हणजे हा आवाज अबुच्याच एखाद्या जाहीर सभेत काढला असता तरीही तितकेच समाधान मराठी माणसाला मिळाले असते. जेव्हां तुम्ही जनतेचे प्रतिनिधी म्हणून विधानसभेत बसता तेव्हां भावनांवर ताबा ठेवून योजनाबद्द शत्रूचा काटा काढायला जमायला हवे.शिवाजी राजांचा गनिमी कावा अंगी बाणवायला हवा. हे सारे असले तरी अबुच्या कानाखाली जाळ काढला याचा मला आनंदच झाला.

  • भाग्यश्री
   अबु आझमी वर लिहायचं म्हणजे थोडा सेन्सिटिव्ह इशु आहे हा. जरा जपुनच लिहावं लागल , पण थोडं बॅलन्स्ड आणि इम्पार्शिअल लिहिणं जरा अवघड गेलं.तसं , त्याच्याच एखाद्या सभेत , किंवा त्याच्याच पत्रकार परिषदेत जर कानाखाली जाळ काढला असता तर जास्त बरं वाटलं असतं..हे अगदी मान्य!!!!

 16. sahajach says:

  महेंद्रजी अतिशय संयत लेख लिहीलात तुम्ही!!! मी सलील शी सहमत आहे….जे झालं ते योग्यच वाटतय….जागा बरोबर चूक, काय करणार!!!पहिल्यांदा चपलेला हात त्याने घातला….अबुने हे मुद्दाम केले पण मला जास्त संताप येतोय तो कॉग्रेसवाल्यांचा. त्यांनीही वाहत्या गंगेत हात धुत लगेच निलंबन केले….
  माझी बहिण केरळमधे आहे, तिला तिथे जाउन ९ महिने झालेत तरी बऱ्यापैकी मल्याळम बोलतेय, मग या दिडशहाण्याला काय होते आमच्या भाषेचा मान राखायला!!!माज आहे या लोकांना, आम्ही कसेही वागणार तुम्ही आमचे काही बिघडवू शकत नाही!!!!
  जनतेचे प्रश्न म्हणाल तर तसेही कोण पर्वा करतय!!!आपल्या तुंबड्या भरतात सगळे….पण आज निदान कोणितरी आवाज तर काढला!!! बालिश वाटतील माझे विचार पण त्याची जिरवली याचा आनंद वाटतोय!!!

  • थोडा शांतपणे विचार करा..
   राज ठाकरे आणि अबु आझमी हे दोघंही एकमेकांना पुरक आहेत. अबु हा मोठा झाला केवळ राज ठाकरेंच्या मुळे. स्वतः मोठं होण्यासाठी याने राज ठाकरेंच्या वर बेछुट आरोप केले, ज्या मुळे याला खुप प्रसिध्दी मिळाली.या स्टेटमेंट च्या पुर्वी किती वेळा याचा चेहेरा टिव्ही वर झळकला होता?? किती लोकांना हा माणुस माहिती होता?? फार तर ५ टक्के…
   हिंदी मिडीयाने तर याचा चेहेरा हिंदी भाषीकांचा तारणहार म्हणुन प्रोजेक्ट केला होता. प्रत्येक हिंदी बोलणाऱ्याला हा आपला माणुस वाटंत होता.निगेटिव्ह जरी असली , तरीही पब्लिसिटी ही मिळालीच.. तुम्हाला काय वाटतं?? ते आम्ही त्यांना लाठ्या देउ.. असे स्टेटमेंट कशासाठी होते?? खरंच बिहार्यांच्या बद्दल कळवळा आहे म्हणुन?? नाही.. ते होतं केवळ पब्लिसिटी स्टंट म्हणुन.. राज ला प्रोव्होक करण्यासाठी!! राज नी कांही तरी बोलावं, मग आपणंही कांही बोलू.. असाच त्याचा प्लॅन होता. आणि त्याने काम पण केलं आपल्याच प्लॅन प्रमाणे..

   आता जे कांही व्हायचं ते होऊन गेलं, आता फक्त वाट बघायची… काय होतं याची..

 17. सचिन says:

  काल अबु आझमी ने पण बूट दाखवला विधानसभेत,त्यासाठी का नाहि झाली कारवाई त्याच्यावर ?
  आणि ही गोष्ट मिडीया ने पण नाहि दाखवली ?

  • सचिन
   कॉंग्रेसी राजकारण्यांकडुन लांगुलचालना शिवाय काय अपेक्षा करणार?? आणि तरिही आपण त्यांनाच निवडुन दिलंय… 😦

 18. anukshre says:

  आपल्या चौथ्या स्तंभा( घडामोडींवर भाष्य…पत्रकारिता) कडून ह्या पोस्ट ची खात्री होती. लिखाण हि नेहमी सारखे झंझावाती आहे. घटने बद्धल बरेच काही जण बोलले आहेत. त्यामुळे अजून वेगळे मत नाही.

 19. काय झालं.. किंवा कशासाठी झालं यांत मी वैयक्तिक नाक खुपसत नाही… हां एक मात्र १००% खरं की – या माणसाबद्दल एक चीड नक्की होती… कालची बातमी वाचुन – बघुन मनातला “मी” नक्कीच सुखावलो होतो… कदाचित वेळ आणि जागा चुकीची असेल.. पण जे झालं ते चुकीचं आहे – हे माझ्यातला “मी” मानायला तयार नाही!

 20. milindarolkar says:

  मनसेला संस्कृतमधली शपथ रूचली नाही. पण इंग्लिश मधली चालली. मराठी माणसाचा आणि भाषेचा कैवार घेणे म्हणजे मारहाण नव्हे, किंवा विधानभवना राडा करणे नव्हे. निलंबित झालेले शूरवीर आमदार आता सर्वसामान्यांचे प्रश्न कुठे मांडणार? हेच मनसेचे वीर मराठी माण्साला दहशत बसवतात की नाही ते पाहात राहा…

  पण या सगळ्या प्रकारातून अबू आझमी अमराठी माणसाचा व अमराठी राज्यात “हिरो” झाला किंवा “मनसेने केला” हे मात्र वास्तव आहे.

 21. Sagar says:

  Vedat marathi vir doudle Char……….

 22. Deep says:

  *mahendra kaaka lekh vaachla! awdla nahi aawdla chuk barobar he mi kon saangnaar? 🙂 kaal je ghdle tyapekhsaa kittitaree vait hyaaadhee vidhansabhaat, loksabhet ghdun gely! phkt haanaamaaree karun ? sodvnyaane gaath aata nirgaath hoil ashi bhiti aahe. abu ne marathit shapth ghetlee astee tar tyala marathi cha kalvala aala athva to ghabrla ase project zaale aste je tyala nako asnaar sahajikch! aani marathi var kahi bollo naahi as vhaayla nako asa manse cha vichaar! shevtee kaay zaal?? tar mediala aata pudhche 8 diwas hi baatmii purel! (electronic!!)

  *mingrjii baddl maapheee

  • दीप
   तुमच्या लक्षात आलं असेलंच , हे इथे पॉवर गेम सुरु होती. अबुने इन्स्टीगेट केलं, मनसेच्या लोकांना.. चप्प्पल हाती घेउन, कारण त्याची इच्छा होती की मनसे च्या लोकांनी असं काही तरी करावं म्हणुन.आणि नेमकं तेच झालंय… हे निव्वळ अबुचं न्युज मधे रहाण्यासाठी , केलेला स्टंट आहे.

 23. laxmi says:

  अबु आझमी यांनी मराठीतून शपथ घेतली असती तर हा वाद झालाच नसता ,पण त्यांनीही ही सुप्रसिद्ध (की कुप्रसिद्ध?) होण्याची वेळ सोडली नाही. अबु आझमी तर चुकलेच पण त्याहून मनसेचे आमदार चुकले. खूप जणांनी ह्या गोष्टीचे समर्थन केले आहे पण यूपी आणि बिहार मध्ये विधानसभेत चालणारा राडा आपल्या ईथे ही चालावा का?
  विषयांतर :मनसे च्या आमदारांना खरच मराठीविषयी मनापासून ईतका अभिमान वाटतो तर त्यांनी त्यांच्या मुलांना मराठी शाळेत का नाही टाकले.?(इंक्लूडिंग राज ठाकरे).
  मला हे सांगून अबु आझमी ह्यानी जे केले ते योग्य केले असे म्हणायचे नाहीये.त्यांचा निषेध झालच पाहिजे.

 24. Ajay says:

  @महेंद्र : मी काल तुमच्या कमेन्ट मुद्दामहुन उत्तर दिलं नाही कारण मला कालचा आणि आजच्या दिवसात काय काय घडतय हे पहायचं होतं. तुमचा ही या विषयावरचा लेख वाचला आणि तुम्ही जे काल बोललात ते मला आज पटलं. मारल ते चांगल केलं पण जागा चुकली. नुकसान कुणाच झाल आणि फायदा कुणाचा तो येणारा काळच सांगेन पण एवढं मात्र आता मला जाणवु लागलंय की मनसेची दुसरी फळी याबाबत थोडीफार ढोंगी वाटते मला राज ठाकरेंबद्द्ल अजुन तसं काही वाटत नाही मी त्यांचा निस्सीम चाहता आहे पण मनात आजकाल काही शंकाही येऊ लागल्यात डोंबिबली बंद पुकारण्याचं काय कारण होत ही त्यातलीच एक शंका

  • जे व्हायचं आहे ते आता होऊन गेलंय.. आता फक्त शक्ती प्रदर्शन सुरु आहे. पुण्याला चार बसेस जाळता कां? आम्ही बंद करुन दाखवतो. असं कांहीसं असावं..

 25. Ajay says:

  पुण्याला २१ बसेस *फोडल्या* गेल्या, पुण्याला मराठीच माणसे राहतात हे मनसे ला कोणी सांगावे ?

 26. Rajeev says:

  सामान्यत: पाहीले तर अबू हा “जनतेचा” प्रतीनीधी नसून जातीचा प्रतीनीधी आहे.
  त्याच्या पार्टी ने त्याला एका जातीचे बहूमत असलेल्या ठीकाणी उमेदवारी दीली.
  तो जे काय बोलतो ते “त्यां”च्या जीवावर बोलतो, आणी मराठी जनतेचा आणी ,
  त्यांच्या जातीयते चा अपमान करतो. ह्यात त्याला दाखवायचे असते की आमचे तुम्ही
  काहीही वाकडे करु शकत नाही… ह्याचाच राग येतो.
  छःत्रपती ह्याच प्रव्रूत्तीशी लढले आणी त्यांचे वंशज म्ह्णणवणारे गादी साठी ह्याची मन धरणी करतात..

  छी..थू….

  • छःत्रपती ह्याच प्रव्रूत्तीशी लढले आणी त्यांचे वंशज म्ह्णणवणारे गादी साठी ह्याची मन धरणी करतात..

   छी..थू….
   !!!!जय महाराष्ट्र!!!!!

 27. SANDEEP says:

  Abu sarakhya haramkhoranna rastya warti nagda karun phodun kadhale phhije. Abuchya bapacha Maharashtra aahe kay ??
  Jay Maharashtra !!!

 28. SANDEEP says:

  Mazi pratikriya tikhat watel pan mi manapasun boltoy.

 29. सहमत आहे.. पण हे लवकर करणं आवश्यक आहे. आजचा शिवसेनेचा घेराव बघुन लाज वाटली.. मराठी लोकांचा पक्ष असल्याची. अगदी अगतिकपणे घेराव घातला होता.. आणि ते बॉडी लॅंग्वेज वरुन स्पष्ट कळंत होतं.

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s