सत्य साई बाबा.. महाराष्ट्राचे राजगुरु

पुर्वीच्या काळी राजा कडे एक राज गुरु असायचा, तो राजाला वेळोवेळी सल्ला द्यायचा. जेंव्हा ऐकलं की अशोकरावांनी सत्य साईबाबा मुंबईला आले तेंव्हा पासुन त्यांना आपल्या घरात आणणार असे ऐकलं तेंव्हा पासुनच  लक्षात आलंय की ह्या साईबाबाची जादु अशोकरावांच्यावर पण चालली आहे, म्हणजे आता हे महाराष्ट्राचे राज गुरु झाले तर!!!

पुर्वी नरसिंम्हा राव जेंव्हा पण यांच्या नादी लागले होते. सत्य साईबाबांचे रम्य जादुचे प्रयोग .. म्हणजे हातातुन राख (अंगारा) , चेन, अंगठी , खडे काढणे  हे प्रयोग नेहेमीच चर्चेचा विषय राहिलेले आहेत.इतकं सगळं असुनही ह्या अंतर्राष्ट्रीय गुरु चे १२० देशांमधे भक्त गण आहेत. यांची हात चलाखी बरेचदा कॅमेऱ्यावर पकडल्या गेलेली आहे, तरी पण यांच्या भक्तांना विश्वास बसत नाही..

ब्रेकिंग न्युज मधे तर यांना मी बरेचदा पाहिलेलं आहे..यांना पकडलं असतांना. बरं , समजा समजा आपण असं समजलं की ह्यांच्यामधे अशी काहीतरी पॉवर आहे की हे हवेतुन कांहीही काढू शकत- तर यांच्या या अतींद्रिय शक्तीचा काय वापर करुन घेता येईल??

– यांना पाकिस्तानच्या सिमेवर उभे करा, आणि आपला हात वर करायला सांगुन त्यामधुन   मिसाइल्स ,एपिसी, तोफा, रनगाडे हवेतुन निर्माण करुन मिल्ट्रीला द्यायला लावावे.
– यांना भामरागढ ला नेउन सोडावे आणि तिथे जाउन त्यांनी मालन्युट्रिशन मुळे मरणाऱ्या मुलांना दुध, प्रोटीन्स इतयादी गोष्टी  हवेतुन काढुन द्यायला लावाव्या. अंगारे धुपारे खुप झाले आता.. काही तरी कन्स्ट्रक्टिव्ह करा म्हणावं.
– यवतामाळ, उमरखेड इतयादी भागात, जिथे शेतकरी आत्महत्या करताहेत तिथे नेउन सोडावे. यांनी शेतामधे जाउन तिथे  दुष्काळामुळे शेतकरी आत्महत्या करताहेत, तेंव्हा तिथे जाउन शेतामधे जादुने पाउस पाडावा म्हणजे किमान कांही शेतकऱ्यांचे जिव तरी वाचतिल.
– यांना काश्मिरला पाठवावे, तिथे जाउन त्यांनी तालिबानी टेररिस्ट लोकांना आपला अंगारा द्यावा जेणेकरुन ते सगळे आतंकवादी मार्ग सोडुन सरळ मार्गाने चालतिल.
– आंध्रा मधे तर हे रहातातच , तेंव्हा तिथे रोज होणाऱ्या नक्षलवादी कारवाया थांबवण्यासाठी अशी जादु करावी , की नक्षलवाद्यांचे बॉंब कधी ब्लास्ट होऊ देऊ नये, तसेच त्यांच्या बंदुकांमधुन बुलेट च्या ऐवजी लिमलेट्च्या गोळ्या  बाहेर निघाव्या.
– तिबेट मधे जाउन, आपल्या अतिंद्रिय शक्ती वापरुन तिथुन चायनीज मिल्ट्रीला  हाकलुन  लावावे.
अशी बरिच कामं आहेत.. लिस्ट तर इतकी मोठी होऊ शकते की बस्स.. पण इथे तुमच्या माहिती साठी कांही व्हिडीओज आहेत नेटवर , यांची हातचलाखी पकडल्याचे ते पोस्ट करतोय..

हा बाबा मोठा हुशार आहे. गरीब जनतेला राख देतो, आणि पैसे वाल्या भक्तांना सोन्याच्या अंगठ्या, चेन्स, घड्याळं वगैरे. इतका फेक माणुस पण अजुनही याचे बरेच मोठे मोठे भक्त गण आहेत.. असो .. बिचारे..

About महेंद्र

माझा ब्लॉग :- http://kayvatelte.com
This entry was posted in सामाजिक and tagged , . Bookmark the permalink.

29 Responses to सत्य साई बाबा.. महाराष्ट्राचे राजगुरु

 1. bhaanasa says:

  त्या ट्रॊफीच्या देण्यात तर अगदी उघड दिसतेय….किती ढोंगीपणा ग बाई. आणि एक ढोंगी दुस~या ढोंग्याला घरी आणणारच ना रे.:) पध्दतशीर -आखिव चाल आहे ही- दोघांच्याही फायद्याची. आणि जनता काय नादी लागलेली आहेच.यांच्याकडे खरेच काही शक्ती असती ना तर आत्तापर्यंत पाकिस्तान/तालिबानी कोणीतरी नक्कीच पळवून नेले असते…..हाहा….बरे झाले असते, निदान आपण सुटलो असतो.:D

  • कालचा तंबी दुराईचा लेख खुपच मस्त आहे. म्हणे आता अशोकराव पण हातातुन अंगारा काढुन देतिल… हर मर्ज की एक दवा- अंगारा! शेतामधे पाणी नाही? टाक चिमुटभर अंगारा.. रस्ते खराब आहेत ?? टाक अंगारा तुम्ही ज्या वाहनाने प्रवास करता त्यावर… वाचलं नसेल तर जरुर वाच… अप्रतीम आहे लेख.
   मला तर वाटतं, की यांना सरकारने नॅशनल प्रॉपर्टी म्हणुन घोषित करुन टाकावे आता. आणि चोरिला जाउ नये म्हणुन चांगलं कडी कुलुपात बंद करुन ठेवावे.. 🙂

 2. आनंद पत्रे says:

  बाबांचा तरी काय दोष, जनता मूर्ख आहे दुसंर काय ?
  तंबी दुराई एकदम फर्मास!

  • बीबीसी वर पण एक फेक इंडीयन गॉड्मेन म्हणुन डॉक्युमेंट्री दाखवली गेली होती. कदाचित ट्युब वर असेल. ती पण खुप छान होती.
   जनता तर मुर्ख आहेच.

 3. Pravin says:

  खरच हसावं की रडावं तेच कळत नाही. अडाणी लोकांना मूर्ख बनवले तर एक वेळ समजू शकतो पण खेदाची गोष्ट म्हणजे त्यांच्या भक्तगणात सुशिक्षित लोक सुद्धा आहेत. तसेच ते एक अनिरूद्ध बापू म्हणून कोणी महागुरू आहेत. लोकमत मध्ये (बहुतेक लोकमतच असावा) तर फ़क्त त्या बापूंच्या नामस्मरणाने जीवनातल्या मोठमोठ्या चिंता दूर झाल्याचे बरेचसे त्यांचे सो कॉल्ड भक्तगण छापून आणतात (आणि आमच्या मातोश्री केवळ तेवढेच वाचण्याकरता तो पेपर घेतात). या बाबालोकांबद्दल माझी अवस्था अगदी सहन होत नाही आणि सांगताही येत नाही सारखी झालीय. बघू या बाबा लोकांचे अवतार कधी समाप्त होतात ते.

 4. सिनिअर पी.सी. सरकार या जादुगाराकडे हा माणूस जादुचे प्रयोग शिकला तेव्हा त्याना माहीत नव्हतं की हा त्या भांडवलावर एवढं कमवेल.

 5. archana says:

  this satysaibabaa is BIG fraud. he is involed in many criminal cases including child abuse.it is very shameful that he was invited to official residence of cheifminister.every sensible maharashtrian should regsiter protest against it.

 6. Rajeev says:

  आता असे बघा..
  सत्य साईबाबा हातातून राख काढतात… अशोकराव ( आणी मंडळी) हात लावतील तीथे राख बनवतील,
  सत्य साईबाबा हातातून साखळी काढतात… अशोकराव ( आणी मंडळी) जनतेच्या पायात साखळी घालतील…

 7. रंगेहात पकडले जून सुद्धा लोक त्या बाबावर विश्वास ठेवतात याचाच जास्त आश्चर्य वाटते.
  हिम्मत असेल तर दुष्काळग्रस्त भागात पाणी पाडायला सांगा या बाबाला ..
  लेख अगदी रोखठोक आहे.

 8. मिलिंद आरोलकर says:

  एका शिबिरात आपल्या ब्लॉग्चा उल्लेख केला त्या शिबिरावरचा पोस्ट
  http://milindarolkar.wordpress.com/2009/11/07/internet-activism/

 9. सचिन says:

  काका,मनसे ने आझमी च थोबाड रंगवल विधानसभेत. चुक कि बरोबर ?

 10. SV AGASHE says:

  Satyasai ya bhamtyabaddal agdi barobbar lihile aahe.Chid yete ti bindokpane yachya nadi lagnarya bhalya bhalya mahasushikshitanchi, science graduateschi,so called scientistschi.Abdul kalamhi rashtrapatipad swikarnyapurvi babala bhetayla gele hote.Lajjaspadach!

 11. हा सत्यसाईबाबा काय नि कुठलाच बाबा काय…. लोक ह्या बुवा, स्वामी, बाबांच्या मागे का लागतात हेच मला कळत नाही. अरे एक दहा सेकंद श्वास नाही घेतला तर आपला जीव घुसमटतो तेव्हा काय हे बाबा लोक आपल्यासाठी श्वास घेतात का? तो स्वत:च घ्यायचा असतो ना?

  मला या बाबा लोकांपेक्षाही जास्त कीव येते ती त्यांच्यावर विश्वास ठेवणा-यांची. मुख्यमंत्री जर खरोखरच ’वर्षा’ वर सत्यसाईबाबांना आणून ठेवणार असतील, तर त्यांच्या ’दर्शनाला’ आणि ’चर्चेला’ जाण्याची माझी तयारी आहे. ते किती चमत्कार करतात आणि त्यांच्याकडे किती बोलबच्चन आहे तेच पहायचं आहे मला.

  तुमच्या या लेखातील सर्वात जास्त आवडलेली ओळ – “हा बाबा मोठा हुशार आहे. गरीब जनतेला राख देतो, आणि पैसे वाल्या भक्तांना सोन्याच्या अंगठ्या, चेन्स, घड्याळं वगैरे.” याचं कारण व उत्तर मला सत्यसाईबाबांच्या निरूपणातून समजलं तर जन्म सफल होईल बघा!

 12. sahajach says:

  मुर्खपणा आहे एक एक….हे लोक राज्य करणार, आपले राज्याचे भवितव्य ठरवणार. कालची ’तंबी’ वाचली तेव्हाच हसू आले होते.
  स्पष्ट मुद्दे मांडलेत तुम्ही!!!!

 13. Heramb Oak says:

  Atishay apratim lekh aahe. Mi hyderabad la hoto 4 varsh. Hyd chya pratyek hotel madhe gallyachya var satya sai baba cha photo. maze asankhya mitra tyache bhaktagan aahet pan tyachya hatchalakhi baddal tyanchyakade uttar nahi. kuthalahi baba mathatun shasakiy nivas stahanat upgrade vhayala lagala ki janatechi rakh honar hi kalya dagada var chi regh..

  • हेरंब
   या माणसाचा, तसेच अजुनही काही आहेत जसे रत्नागिरीचा नरेंद्र बाबा, आणि असे बरेच.. यांचा मला खुप संताप येतो. पण शेवटी मध्यमवर्गीय माणुस जास्त काय करु शकतो- संतापण्याशिवाय??
   लोकं का मागे लागतात अशांच्या हेच कळंत नाही.

 14. shital says:

  khup chan ho aadhi ya netyana dhobadale pahije karan yanich na he sadhu palale aahet

 15. आनंद कोकरे says:

  भोंदुगीरी थांबवा

 16. आनंद कोकरे says:

  मुर्ख मंत्री संत्री यांनीही विश्वास ठेवला
  हसावे की रडावे

Leave a Reply to shital Cancel reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s