तुम्ही पण बालक आहात??

बालक दिन

आज बालकदिन. सकाळी उठून आमच्या पिढीतल्या सगळ्या बालकांना ( माझी चुलत बहिणाबाई म्हणजे सगळ्यात लहान बालक आमच्या पिढीतला..वय २५ वगैरे   असेल, तर अशा  सगळ्यात लहान बालकांना) त्यांना शुभेच्छा द्यायला फोन केला होता.

Freshमला बरेचदा प्रश्न पडतो की   बालक म्हणजे कोण?? किती वर्षाच्या मुलांना बालक म्हणावं?? १० ते १५?? की ५० ते ७५??? तुम्हाला कदाचित असं वाटेल की हा काय प्रश्न झाला ??उगीच टाइमपास करायला लिहितोय हा माणुस.. पण तसं नाही!!

माझ्या मते बालक हा कितीही वर्षाचा असू शकतो. जो पर्यंत तुमच्या्तला लहान लहान गोष्टींचा आनंद घेण्याची इच्छा जिवंत आहे, तो पर्यंत तुमच्यातला लहान मुलगा/मुलगी जिवंत आहे असं समजा.

tamrindकधी तरी चिंच खावीशी वाटते?? आवळा खावासा वाटतो?डाव्या तळहातावर मिठ + तिखट घेउन त्याला लाउन चिंच खाण्याची इच्छा होते??

कधी तर खूप मोठा बोर्नव्हिटा घालुन, आणि खूप जास्त साखर घालुन दुध प्यावसं वाटतं? आवळा सुपारी चे तुकडे, पेपर मिंटच्या गोळ्या, चॉकलेट्स,  अ्जूनही तुमच्या पॅंटच्या खिशात बायकोला कपडे धुवायला देतांना सापडतात का?

शाळेसमोर उभा असलेल्या पेरुवाल्या ्कडून गाडी थांबवून पेरू खायची इच्छा होते? शाळे समोरच्याच बोरंवाल्या आज्जी कडून उकडलेली बोरं मिठ घालुन दिलेली खायची इच्छा होते की नाही??  आणी इच्छा झाल्यावर जर त्या आजी पुढे तुम्ही बसून जर विकत घेत असाल तर तुमच्यात ला तो लहान मुलगा /मुलगी अजूनही जिवंत आहे ..

अशा अनेक गोष्टी आहेत तुमच्यातला लहान मुल जिवंत ठेवणाऱ्या , इथे फक्त कांही नमून्या दाखल दिलेल्या आहेत.

jujubeआता ही गोष्ट तुमच्या हातात आहे, की तुम्ही त्या लहान मुलाला/मुलीला जिवंत ठेवता की तिचा गळा घोटून टाकता. ..  लोकं काय म्हणतील??? मी असं रस्त्यावरचे बोरं घेउन खाल्ले तर?? मी स्वतः तर अगदी सरळ , गाडी थांबवून घेतो विकत  .. उकडलेली बोरं तर माझा अगदी विक पॉइंट.

आमच्या शाळेसमोर बोर कुट मिळायचं. बोर कुट एका काचेच्या बरणीत ठेवलेलं असायचं, आणि एका चमच्याने तो हातावर द्यायचा. आणि मग ते जिभेने चाटुन खायला काय मजा यायची सांगू.. अजूनही केळकरचं बोरकुटाचं पाकिट घरी आणलं की मी हातावर घेऊनच खातो… अगदी सौ.च्या अहो .. वाटीत घेउन खा ना… या कडे दुर्लक्ष करून..

120793-004-20CA3FADतुमचं वय   ६०- ७० वर्षांचा पण बालक असु शकतो. हे वर दिलेले सगळे लहान मुलांचे लक्षणं मनात जिवंत ठेऊन लहानपण एंजॉय करणारा तुम्ही असाल , तर तुम्ही पण अजूनही बालकंच आहात…

मला अजूनही कार्टुन पहायला आवडतं.कॉमिक्स वाचायला पण आवडतं. दिसलं कधी, तर मी अजुनही चांदोबा विकत घेउन वाचतो. कधी तरी पतंग पण उडवतो. गल्लीत मुलं गिल्ली दांडू खेळत असतील तर बघु रे दांडु तुझा, असं म्हणुन एखादा टोला मारायचा पण प्रयत्न करतो, नागपुरला गेलो की.
cricketकधी रस्त्याने जातांना फुटबॉल समोर आला तर त्याला लाथ मारायची इच्छा होते की त्याला वळसा घालुन मुलांना शिव्या घा्लत , ही काय खेळायची जागा आहे ्का.. असं नाही  म्हणावसं वाटत मला कधी.
रस्त्याने पायी चालत जातांना जर मुलं क्रिकेट खेळंत असतिल आणि जर माझ्या कडे बॉल आला, तर तो उचलून बॉलर कडे थ्रो करतांना अजूनही मला मजा वाटते.. म्हणून माझं स्पष्ट मत आहे, की ज्या कोणाचा जगण्यातला आनंद शिल्लक आहे, लहान लहान गोष्टींमधला आनंद जिवंत आहे, ते सगळे अजूनही लहानच म्हणावे ला्गतील.

जो पर्यंत खाण्यातला आनंद शिल्लक आहे, तो पर्यंत तुम्ही लहानच आहात.. एकदा त्यातला इंटरेस्ट संपला की झालं.. !!

माझे वडील म्हणजे सगळ्यात मोठा मुलगा.   घरात त्यांची आई ( माझी आज्जी ) असे पर्यंत ते स्वतःला लहानच समजायचे. आणि आज्जी पण अगदी लहान मुलगा असल्या प्रमाणेच त्यांना रागवायची. अरे जेऊन घे रे… अरे आंघोळीला जा रे लवकर… तुझी पुजा लवकर आटोप .. असं काहीतरी सारखं टोकत असायची. आणि वडीलांना पण त्याची सवय झालेली होतॊ.

आज्जी जेंव्हा वारली, तेंव्हा वडीलांच्या डोळ्यात आलेलं पाणी, आणि नंतर आता तूच मोठा आहेस घरातला..सांभाळ .. असं त्यांच्या मावशीचे वाक्य मनात अगदी घर करून बसलंय. म्हणजे आता पर्यंत आज्जी असे पर्यंत ते लहानच होते ना. आता आज्जी गेल्यावर ते मोठे झालेत.. चर्रकन झालं ते वाक्य ऐकल्यावर माझ्या काळजात… खरंच.. मोठं होणं  जर असं   असेल तर मला कधीच मोठं व्हावंसं वाटणार नाही.

बालक दिनाच्या सगळ्या लहान मोठ्या बालकांना माझ्यातर्फे शुभेच्छा..

About महेंद्र

माझा ब्लॉग :- http://kayvatelte.com
This entry was posted in Uncategorized. Bookmark the permalink.

32 Responses to तुम्ही पण बालक आहात??

 1. अगदी बरोबर, काल एक लग्न होतं आम्ही सगळी चुलत, आते भावंड त्या निमित्ताने एकत्र आलो होतो. पुर्ण दिवसभर नुसते हसत होतो. मग हॉलवरचा वेळ संपला तेव्हा आमच्या घरी पुन्हा मैफल जमली. खरच तिकडे कोण मोठा असता तर आम्हाला रागवला असता. किती बडबड चालवलीय म्हणून.

  • २४ तारखेला माझ्या मामेबाहिणीच्या मुलीचं लग्नं आहे.. तिकडे जायचंय अकोल्याला. आतुरतेने वाट पहातोय त्या लग्नाची , सगळे नाते वाईक भेटतिल म्हणुन..

 2. anukshre says:

  इथे कैरी मीठ लावून, चकत्या केलेली सगळीकडे मिळते. अजूनही मस्त वाटते. माझ्या पुतणीच्या लग्नात जेवण नंतर
  बर्फाचे गोळे वाला बोलावला होता. दणादण हाणले नंतर खाणाखुणा करून बोलत होतो. मोठ्यातले मुल छान वाटले.

  • मोठयातलं मुलं, ज्यांचं हरवलं आहे, त्या पैकी काही लोकांना जरी पुन्हा सापडलं, तर या पोस्टचा फायदा झाला असं समजता येइल.

 3. sagar says:

  Kaka
  Post mast zaliye…..Maja aali vachtana…..

  • सागर
   लहान पण फार कमी वेळ रहातं .लहान असतांना कधी एकदा मोठा होतो, नौकरी करतो, याची घाई असते. नंतर मग गेलेले दिवस आठवत रहातात..आणि उगिच मोठं झालॊ असं वाटतं..

 4. sahajach says:

  महेंद्रजी मस्त झालय पोस्ट…..राधिकाला रसिकाला अनेक शुभेच्छा….
  खरय आपल्या प्रत्येकात लहान मुल दडलेलं आहेच….मी कालच गौरीच एक पुर्ण चॉकलेट खाल्लं, अमित ओरडत होता तुला हवय असं आधिच का नाही बोललीस???? लहान आहेस का आता तिचे चॉकलेट खायला!!!! त्यांच्या नावाने घरात येणारे चिप्स वगैरेवर पण मी असाच अधून मधून हात मारते!!!!
  तेव्हा तुम्हाला देखील शुभेच्छा!!!!

  • म्हणुनच तर सगळ्यांनाच दिल्या आहेत शुभेच्छा… आपल्यातलं लहान मुल सापडलं नाही की मग आपण मोठं झालो असं समजायचं..

 5. Maithili says:

  Totaly agree with you. Aaj jevha mi cllg madhe eka frnd la wish kele hppy chindren’s day mhanun tar ti khoop vaait pane react zali. I jst cnt understand tht cllg la gele mhanaje baalpan sampale kaa??? she said tht ” sheee Shalet asataana thik hote ase wish karane aata kay lahaan aahes kaa? jara cllg gng girl saarakhe vaag naa……. vaigare vaigare” I felt too bad. Pan mazya purate tari mi tharavalay ki mi aayushyabhar Mazyatali chhotisi mulgi japanaare………
  N e ways hppy children’s day to you.

  • मैथीली
   प्रत्येकाचा आयुष्याच्या कडे पाहण्याचा दृष्टीकोन वेगळा असतो. कांही मुलांना फार लवकर मोठं व्हायचं असतं.पण या नादात ते आपल्या जिवनातल्या एका मोठ्या आनंदास मुकतात .. ही गोष्टं लक्षात येते.. पण तेंव्हा वेळ गेलेली असते..

 6. महेंद्रजी
  नमस्कार
  एकदम छान. खरे आहे. नेमक्या शब्दात मोठ्यांच्या मनातील भावना व्यक्त झाल्या आहेत.
  शेखऱ

 7. gouri says:

  sagalyaanaa baaldinaachyaa shubhecchaa 🙂

 8. bhaanasa says:

  महेंद्र, आम्ही बहिण भावंडे जमलो ( आता बरं का..सगळ्यांची लग्ने होऊन पोरेबाळे झालेली ) की इतके खिदळतो की आमची आजीच काय आमची पोरेही ओरडतात आम्हाला..:D आपसात चर्चा करतात, किती वेडेपणा करतात रे आई-बाबा….आणि मग कधीकधी आम्हाला कशाला ओरडतात….हाहा..त्यांचा आक्षेप रास्तच आहे. मस्त मज्जा येते.
  पोरींबरोबर उनाडलास का? 🙂

  • भाग्यश्री
   कालचा दिवस पण मुलींचे क्लासेस होतेच. राधिका सकाळी गेली ते रात्री परत आली ८ वाजता. अभ्यासाचा ताण खुप पडतोय. त्यामुळे घरीच होतो .. काहिही केलं नाही दिवसभर… बस्स दोन पोस्ट्स टाकले झालं.
   माझ्या मामेबहिणीच्या मुलीचं लग्नं आहे अकोल्याला, वाट पहातोय त्या लग्नाची. उद्या जायचंय नागपुरला. आईबाबा भेटतील. 🙂

 9. Pravin says:

  अगदी बरोबर बोललात. काही लोक आजूबाजूचे लोक काय बोलतील याचा विचार करून आपल्यातलं लहान मूल मारून टाकतात. तुमच्या आमच्यातल्या लहान मुलांना बालदिनाच्या हार्दिक शुभेच्छा.

 10. Aparna says:

  आरुषची हॅलोवीनची ढापलेली चॉकोलेट्स खाता खाता हे लिहितेय यात सर्व आलंय नाही का??? आणि तसंही माझ्यासारखी जी घरात शेंडेफ़ळ असतात ना त्यांना ठरवलं तरी कधी मोठं होता येत नाही….:)

 11. ravindra says:

  अगदी बरोबर आहे तुमच.जो पर्यंत आई वडील असतात तो पर्यंत आपण लहानच असतो. माझ वय ५१ मी घरात सर्वात लहान तरीही आई मला अजून हि बेटा बेटा जेवण कर!किंवा इतर सूचना करत असते. त्यावेळी माझी मुलगी व बायको माझ्या कडे पाहून हसतात. 🙂 मला सुद्धा आज हि खाऊ खायला आवडतो. बाल दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा

  • रविंद्र
   उद्या जातोय आईकडे .. दोन दिवस नागपुरला काम आहे. तेवढंच आपलं माहेरपण आटोपुन येतो.. 🙂

 12. shyam says:

  Mazya mate sagalyamadhe lahanpan astach. Pharak fakt itkach ki konacha disun yeta Ani koni disu det nahi. Mareparayant manasachya bal lilya chaluch astat. Sarvana mana pasun bal dinachya shubechya.

  • मरेपर्यंत बाळलिला सुरु असतात हे अगदी खरं.. म्हणतात ना, “साठी बुद्धी नाठी” . ह्याचा अर्थ असा घ्यायचा की साठी आली की मग दुसरं लहानपण सुरु होतं..

 13. मला बरयाच लोकांनी काल शुभेच्छा (चिडावण्यासाठी)दिल्या.काहीही असो मी शक्य तोवर लहानच राहीन.लेख आणी लेखाचा मुद्दा छान आहे .

 14. Raghu says:

  नमस्कार काका, ६ तारखेला माझ लग्न झाल आणि घरचे सगळे म्हणायला लागले की तू आता मोठा झाला आहेस जबाबदार पणे वाग एट्सेटरा एट्सेटरा. पण तुमचा हा लेख वाचला आणि वाटल मी सुद्धा अजुन लहान आहे फक्त माझे जगण्याच्या प्राइयारिटीस बदलल्या आहेत. प्रत्येक माणसात एक लहान मुल असत आणि ते तसाच राहावे तरच जीवनातला खरा आनंद लुटता येतो. खूप सुंदर लेख लिहिला आहे, काही क्षणात सगळ बालपण डोळ्यासमोरून गेल. thank you for this nice post.

 15. आनंद पत्रे says:

  अतिशय सुंदर!
  अगदी १००% सहमत!

 16. शिनु says:

  मी पण लहानच आहे अजुनी….बाय ऒल मिन्स. म्हणजे महेरी शेंडेफ़ळ, इकडे (अर्थात) नवर्यापेक्शा लहान. माझ्या पोरीला कधी एकदा मोठी होईन असं झालंय आणि माझं बहुदा इकडे खालच्या बाजुच्या दिशेने वजावटीत (हा नवर्याचा खास शब्द )वय वाढतंय अशी शंका इतके दिवस नवर्याला होती, ती आता मलाही यायला लागलीय. एकदा टिटवाळ्याला दर्शनाला गेलेलो असताना मस्त तिखट मसाला लावलेल्या चिंचा आणि कैरी मिळाली होती. आता चिंचेच्या निमित्तानं देवदर्शन होईपर्यंत प्रगती झालीय(हे आपलं खाजगीत, एरवी नवर्याला मी अलिकडे फ़ारच देवभोळी झाल्यासारखी खरोखरच वाटतेय) असो. तर आपल्यासारख्या बालकांमुळे या देशाचं जर काही होणारच असेल तर ते चांगलच होईल, कारण आपण चांगलेच आहोत की! बाल दिन की जय!

  • अभिनंदन… यात खरं तर वाईट वाटुन घेण्यासार्खं काहीच नाही. पण जेंव्हा इंजिनिअरिंगला असलेली मुलगी .. बाबा, हे काय होत लहानमुलासारखं करता म्हणते.. तेंव्हा मात्र मला भरुन पावतं…..लहानपण जपायलाच हवं आपल्यातलं. अहो माझं वय आता ४९ पण अजुनही मी तसाच वागतो… 🙂

Leave a Reply to महेंद्र Cancel reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s