रंगात रंगलेलं…..

दिनांक ११ नोव्हेंबर. सकाळपासुनच टिव्ही वर बातम्या सुरु होत्या. की आज म्हणे वादळ   येणार . गोव्याला –  जायचं होतं. सकाळपासुन टिव्ही ला चिकटुन बसलो होतो.सारख्या बातम्या पहात होतो.गोव्याला जायचं होतं. विमानतळावर फोन करुन पाहिला  तर कळलं की सगळ्या फ्लाईट्स लेट आहेत.सकाळची पहिली फ्लाइट गोव्याला लॅंड न करु शकल्यामुळे परत मुंबईला आली आहे. त्या नंतर एकही विमान गोव्याला गेलेले नाही.जाम वैतागलो. … काय करावं? मिटींग महत्वाची होती, म्हणुन कांहीही होवो , जाणं भाग होतं.

एक मित्र पण यायचा होता बरोबर, म्हणुन त्याला फोन केला आणि सरळ एअरपोर्ट ला पोहोचलो.आम्हाला चेक इन करुन विमानात नेउन बसवुन ठेवलं होतं.  चेक इन केल्यावर पण दिड तास टेक ऑफ घेतला नव्हता.

Cloudsनंतर कॅप्टनने अनाउन्स केलं की वादळ पार झालंय, आणि गुजराथ कडे गेलंय आणि एकदाचं गोव्याला निघालो आम्ही. ही आयुष्यातली  पहिली वेळ होती विमानात बसल्यावर भिती वाटण्याची. सारखं वाटंत होतं की कॅन्सल केलं असतं तर बरं झालं असतं 😦  . वातावरण इतकं ढगाळ होतं की त्यामुळे एअर पॉकेट्स निर्माण होऊन आकाश पाळण्यातल्या सारखं वाटत होतं..वाईट वातावरण असलं की थोडे गचके बसतात.. पण त्या दिवशी मात्र अक्षरशः बैलगाडीत बसुन प्रवास करतोय असं वाटंत होतं.

Pictures5गोवा म्हंट्लं की लोकांना ( स्पेशिअली ऑफिसमधल्या समिष खाणाऱ्या आणि पिणाऱ्या ) काजु -बाटलितला- आणि पाकिटातला आठवतो. ऑफिस मधे पण गोव्याला टुर ला जातोय म्हंट्लं की लोकांच्या चेहेऱ्यावर एक वेगळाच भाव असतो , ऑफिस मधे. आता मस्त पैकी काजु खाउन पिउन या.. मासे खाउन या.. !अशा शुभेच्छा ( थोड्या जळक्या पण ) ऐकायला मिळतात.

 

जे मासे खाणारे आहेत ते तर नेहेमीच अरे गोव्याला अशोका मधे जा रे मडगांवला, किंवा शारदाश्रम चुकवु नकोस वास्को चं.. असे बहुमोल सल्ले पण देतात.काजु अर्थात मला खुप आवडतो, पण कोलेस्ट्रॉल वाढु नये म्हणुन जरा कमीच खातो.

बाटलीतली काजू .. म्हणजे फेणी मला अजीबात आवडत नाही. एक तर त्याला तुम्ही कांहीही म्हंटलं तरी ती देशी दारु. घेतांना पण पायनॅपल जुस, ऑरेंज जुस, किंवा कोल्ड ड्रिंक बरोबर घ्यायची, म्हणजे वास वगैरे कमी होतो. पण जर कधी चुकुन घेतलीच, तर दुसऱ्या दिवशी घामाला पण तो एक दारुचा वेगळाच दर्प येतो. आय ऍम नॉट द फेणी पर्सन..

पण खरी परिस्थिती अशी असते की कामा व्यतिरिक्त दिवस भरात अजिबात वेळ मिळत नाही. अगदी सकाळी एक तास स्वतः साठी मिळतो.. तो प्रभात फेरी करिता वपरतो. रात्रीच्या वेळेस मात्र थोडा वेळ मिळतो. गोव्याला गेलो की कोलवा बीच वरचं हॉटेल ग्रॅसिऍनो कॉटेजेस आहे तिथेच उतरतो. त्यामुळे रात्री कोलव्याच्या शेर ए पंजाब  मधे जाउन एखादा दिड आर सी + तंदुरी चिकन ( मस्तं असतं इथलं. आणि सध्या डायटवर असल्याने फक्त तंदुरी चिकन आणि फिश चालते. सध्या तंदुरी किंग फिश आहे ८०० रुपयांना ) हादडलं, की दिवस संपतो..

Flags out side goa airportप्रवास वर्णन हे ज्याने प्रवास केलाय त्याच्या व्यतिरिक्त इतरांना खुप कंटाळवाणं होतं. पुलंची एक गोष्ट ऐकली होती.. त्यात दिलं होतं की लोकं प्रवास करुन येतात, आणि मग कोणी भेटला तर त्याला अगदी जवळ बसवुन ते फोटो दाखवुन कंटाळा येई पर्यंत माहिती सांगुन बोअर करतात. हे वाक्य इतकं पक्कं बसलंय मनात की मी प्रवास वर्णन कधिच लिहायचं नाही हे ठरवुन टाकलं. आणि आज पर्यंत तरी आपल्या निश्चया प्रमाणे लिहिलेलं नाही-पण पुढे लिहिणार नाही असंही नाही. ( पुलं नी तो लेख लिहिला होता, पण प्रवास वर्णनं पण लिहिली आहेत ..  🙂 )

आजचं पोस्ट हे पण प्रवास वर्णन नाही. मी वर जे लिहिलंय कि गोवा म्हंटलं की लोकांना काय आठवते ते.. माझं पोस्ट आहे गोवा म्हणजे माझ्या दृष्टीने काय आहे ते.. गेल्या कित्तेक वर्षात शेकडो वेळा गोव्याला आलो असेल. एक कलरफुल व्हायब्रंट शहर म्हणुन गोवा माझ्या मनात पक्कं बसलंय. इथले लोकं , इथले टुरिस्ट …सगळे कसे निरनिराळ्या रंगात रंगलेले दिसतात.

आता परदेशी टुरिस्ट चा विषय निघाला म्हणुन सांगतो. परवा कारवारहुन परत निघायला रात्रंच झाली. जवळपास ८ वाजले होते. रस्त्यावर दोन परदेशी तरुणी उभ्या होत्या- लिफ्ट मागंत. ड्रायव्हरला म्हंटलं, अरे थांबव .. इथे त्यांना रात्री काय साधन मिळणार? तर ड्रायव्हर म्हणाला, की या मुली रशियन टुरिस्ट व्हिसा खाली इथे येतात आणि देहविक्रयाचा धंदा करतात. मी क्षणभर आवाक झालॊ ऐकुन… कुठल्याही ऍंगलने त्या मुली तशा वाटंत नव्हत्या. ड्रायव्हर म्हणाला.. साब रातको फ्लाईट आता है रशियासे आनेवाला.. आनेके बाद इनको छोडने जाओ , तो बोलती है .. जो चाहिये कर लो. पैसा नहीं है…. !! काही गोष्टींवर विश्वास ठेवणं किती कठीण आहे नाही?? कलंगुट बीच पासुन २० किमी वर असलेल्या एका बीच जवळच्या हॉटेल्स वर या मुली रहातात. बऱ्याच लोकांनी तर तिथे घरं घेउन ठेवली आहेत भाड्याने.. असो… विषयांतर झालंय.. तो एक वेगळा विषय आहे…मुद्दाम त्य बीच चं नांव दिलेलं नाही इथे.. !

Statueगोव्याला गेल्यावर एक गोष्ट लक्षात येते, ती म्हणजे इथल्या लोकांना रंगाचं असलेलं वेड. काय खरं वाटत नाही?  विमानातुन बाहेर आल्यावर एअर्पोर्टलाच काही गोवनीज लोकांचे पुतळे लावलेले आहेत ते बघा.. सगळ्यात मस्त म्हणजे स्मोकिंग रुम ( हो गोवा एअरपोर्टला स्मोकिंग रुम आहे, आणि बाहेर स्मोकिंग केल्यास शिक्षा पण होऊ शकते. ) जवळचा तो एक हुक्का पीणारा… मस्त आहे एकदम.. इथे पोस्ट करतोय बघा….

Colourful houseगोव्याला आलो की सगळी कडे हिरवळ .. तांदुळाची शेतं, आणि नारळाची झाडं. अधुन मधुन बॅक वॉटर.. प्रत्येक गोष्टीचा आपला स्वतःचा एक निराळाच रंग आहे. बरं हे रंग कमी आहेत म्हणुन गोव्याचे लोकं गोव्या मधे आणखिन जास्त रंग भरतात, आणि ते पण असे की “रंगात रंगुनी रंग माझा वेगळा” असे..  अख्ख्या भारतात पहायला मिळणार नाहीत अशा रंगात घरं रंगवलेली दिसतिल गोव्याला.
Pictures4
बरं हे रंग इथल्या गोव्याच्या स्वतःच्या रंगाशी इतके बेमालुम पणे मिसळून जातात, की ते गोव्याचा अविभाज्य अंग आहे असे वाटते. असं कुठेही वाटत नाही की हे घर ऑड मॅन आउट आहे म्हणुन.इथे कारवार च्या रस्त्यावर जातांना एक घर चक्क काळ्यारंगात रंगवलेलं दिसलं. त्याचा पण फोटो काढला होता, पण तेंव्हा कार चालत होती म्हणुन तो बिघडला.
Pictures3
नजरेला बोचणारा भडक गुलाबी रंग पण इथे घराला दिलेला दिसतो, पण याचं आश्चर्य वाटत की गोव्याला तोच रंग अजिबात बोचत नाही नजरेला.. उलट एक वेगळंच सुख देउन जातो.  पिवळा जर्द रंग असलेली घरं, इथेच दिसतिल , इथे घर कुठल्याही रंगाचं असो, त्याला एक दुसरा रंग कॉंबिनेशनमधे वापरलेला दिसेल. पिवळ्या बरोबर पांढरा तर अगदी कॉमन आहे. एखादा शॉकिंग पर्पल किंवा फ्लुरोसंट हिरवा पण घराला लावलेला दिसेल.

कांही जुनी पोर्तुगिझ घरं असे रंग ल्यायल्यावर नजरेला पर्वणी असते… या संपुर्ण पोस्ट मधे तुम्हाला माझ्या नजरेतुन गोवा दाखवतोय.. बरेच फोटो आहेत, पण जरा वेगळं पोस्ट म्हणुन जरा जास्त फोटॊ पोस्ट करतोय..आता पुढल्या वेळेस गोव्याला गेलात की ही रंगांची उधळण जरुर अनुभवा…

About महेंद्र

माझा ब्लॉग :- http://kayvatelte.com
This entry was posted in प्रवासात... and tagged , , , . Bookmark the permalink.

18 Responses to रंगात रंगलेलं…..

 1. गोव्यात खरोखरंच रंगाची उधळण झालेली दिसतेय! जायला हवं 😉

 2. sagar says:

  Mi ajun ekdahi Govyat nahi gelo…..:(

 3. काका तेवढा तंदुरी किंग फिशचा पण फोटो टाकला असतात तर मी इथे ढेकर दिला असता… 🙂

  • दोन आरसी गेले होते आत, त्यामुळे धिर धरवला गेला नाही… सरळ सुरु झालॊ मी आणि माझा मित्र. सध्या जरा जास्त महाग आहे, नॉर्मली ४०० ते ५०० असते किंमत.

   • हो ८०० रु. म्हणजे फार महाग झाला. मी गोव्याला एकदाच गेलोय ते पण कणकवलीवरुन. गोव्याची हॉटेलं नाही फिरलो. पण Tourist Place असल्याने गोवा एकंदरीत महागच असणार. इथे बंगलोरला दर रविवार मी फिश्लँड म्हणून हॉटेल आहे तिथे जातो मासे हाणायला, न चुकता. मस्त १२५ रु. मध्ये फिश् थाळी (फिश् करी + फिश् फ्राय) मिळते. पूर्ण आठवड्याची तृप्तता एकदाच करून घेतो. 🙂

    • ते हॉटेल आहे बीच वर. आणि टुरिस्ट प्लेस म्हंटल्यावर जास्त भाव आलेच. तसं शारदाश्रम मधे ६० रुपयात आणि अशोका मधे साधारण तेवढ्यातंच फिश थाळी मिळते. मी जिथे उतरतो ते हॉटेल बीच वर असल्याने जवळपास सगळंच थोडं महाग आहे तिकडे..आणि फिरंगी लोकांना ८-१० पाउंड इतक्या मोठ्या फिशला वगैरे म्हणजे खुप स्वस्त वाटतं..

 4. bhaanasa says:

  महेंद्र, मी गोव्यात दोन वर्षे राहीलेली आहे. आणि लग्न झाल्यावर आजवर १९ वेळा गोवा वारी झाली. आजही तितकीच मजा येते. शिवाय आता अनेक गोष्टी बदलल्याने जुन्या खुणा शोधण्याचा छंदही जडलाय. आता तुझ्या लेखाने पुन्हा मनाने एकदा गोव्याची फेरी मारून आले बघ.

 5. ravindra says:

  प्रवास वर्णन केल्याने आमच्या सारख्या रसिक वाचकांना वाचतांना त्या ठिकाणी प्रवास करून आल्या सारखे वाटते. तुम्ही तर सारखे प्रवासात असता त्यामुळे प्रवासाच्या ठिकाणाची नवनवीन माहिती टाकायला हरकत नाही. असो हि गोव्याची पोस्ट मला तरी आवडली.

  • रविंद्र
   अहो प्रवास वर्णनांच्या बद्दल पुलंची तो कथा वाचल्यामुळे काही ठराविक प्रसंगंच लिहितो.. पुर्ण वर्णन लिहित नाहि.. 🙂 तरिही पुढे असेच कांही नाविण्यपुर्ण आढळल्यास लिहीन..

 6. आनंद पत्रे says:

  ‘काय वाटेल ते’ मध्ये तुम्ही कुठली एखादी गोष्ट नाही (प्रवास वर्णन) लिहायची याचा नियम ???
  ‘काय वाटेल ते’ लिहा त्यातच खरी मजा आहे….
  गोवा, मी तरी अजून गेलो नाहीये….आमची मित्र मंडळी कधी एकत्र आलीच नाही या साठी…
  जानेवारी मध्ये प्लान आहे….बघूया काय होते ते….
  बाकी तुम्ही जे-जे स्थळ सांगितले आहेत, त्या (तीर्थ) क्षेत्रांना जाऊन नक्की येतो 🙂

  • आनंद
   तसा नियम वगैरे नाही. कांही विशेष घटना असेल तर ती कुठे ना कुठे वापरली जातेच… अगदी प्रवास वर्णन, ते पण येतं ना.. पण कुठल्यातरी संदर्भात. जशी काश्मिरची खिर भवानीचं वर्णन.. कुठल्यातरी संदर्भात बरोबर वापरलं गेलंय.

 7. दादा, नेहमीप्रमाणेच कलरफ़ुल्ल पोस्ट 🙂
  आवडलीच !!

  • विशाल
   बरंच जूनं पोस्ट आहे हे. माझ्या ब्लॉग वरचं सगळ्यात कमी वाचल्या गेलेले पोस्ट!! 🙂

 8. Ashwini says:

  Goa mhantla ki Dhundi, thriller ani samudra evdhach…….vegachi dundi water sports madhe, St Xaviers sakshat devchya charnantali baslyachi dhundi, kolhapur madhe kiwa shirdit jas anubhavto tass, dho dho vanarya dudh sagarcha thriller ani mayaech aapal manush sagla thakwa ani tenshions visrayla lavnara maza mitra samudra…..

 9. Prof.Nomesh Meshram says:

  I visited Goa in 2009 with my family.A heaven on earth.

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s