हाय कम्बख्त तुने पी ही नहीं….

पुर्वी जेंव्हा देवांनी आणि दानवांनी समुद्र मंथन केले तेंव्हा निघालेल्या १४ रत्नांमधलं एक रत्न म्हणजे दारु. जेंव्हा ही दारु निघाली, तेंव्हा दानवांना वाटले की हाच तो अमृत कुंभ, म्हणून ते तो कुंभ घेउन पळून गेले आणि त्यातली सुरा पिऊन मदहोश झाले. जेंव्हा मंथनातून अमृत निघाले, तेंव्हा हे दानव नशेत पडलेले होते, म्हणूनच देव अमृत घेउन पळून जाउ शकले.. अशी एक कथा आहे.म्हणजे जर दारू नसती तर देवांना अमृत मिळालं असतं का? अर्थात नाही…

दा्रू ही अतिशय वाईट गोष्ट आहे, दा्रू पिणे वाईट आहे असं म्हणतात. हे वाक्य अगदी लहानपणापासून ऐकत आलोय.  पण मला एक सांगा जर देवदास दा्रू प्यायला नसता तर  आपल्याला  दिलिप कुमारचा     इतका नितांत सुंदर अभिनय पहायला मिळाला असता का? दिलिप कुमारला पण आपल्याला राम और शाम सारख्या टुकार चित्रपटातच पहावं लागलं असतं.

खरं सांगायचं तर शाहरुख खान हा अभिनेता आहे पण सिद्ध करण्यासाठी त्याला दारुचे ग्लास हातात धरावा लागला. जर संजय लिला भन्साली याने जर तो चित्रपट काढलाच नसता तर शाहरुख मधला अभिनेता बाहेर पडलाच नसता..गुरुदत्तचा  प्यासा  मधला अभिनय विसरला जाऊ शकतो??

कदाचित इथे मी जर देवडीचं उदाहरण दिलं , तर कांही भुवया नक्कीच उंचावतील 🙂 राम गणेश गडकरींच्या एकच प्याला मधे सुधाकरने जर तो प्याला घेतला नसता, तर सींधू चा नितांत सुंदर अभिनय करण्याचे काम त्या अभिनेत्रीला पहाता आलं असतं का?? ( नांव विसरलोय फार वर्षापूर्वी पाहिलंय हे नाटक)वरच्या सगळ्याच प्रश्नांचं उत्तर आहे नाही.. म्हणजे जर दारू हा विषय नसता तर या सगळ्या सुंदर कलाकृतींना आपल्याला कधीच अनुभवता आलं नसतं.

म्हणजे थोडक्यात काय तर दारु ही काही इतकी पण वाईट नाही , थोडी फार वाईट असेल-पण ठीक आहे…आजकालच्या दिवसात माझ्या एका मित्राला तिसरी मुलगी झाली आणि त्याने तिचे नांव “वारुणी” ठेवले.  🙂 जास्त लिहित नाही.. समजून घ्या हो…

आज हा काय विषय घेतलाय लिहायला? काल एक टेक्स्ट मेसेज आला होता. मी सध्या नागपुरला आलोय कामासाठी. एका जुन्या मित्राला बहुतेक समजलं असावं की मी इथे आहे म्हणून, त्याने एक टेक्स्ट मेसेज पाठवला होता. त्यात लिहिलं होतं.. दारू ही जगातली सगळ्यात वाईट गोष्ट आहे. म्हणून तु आज संध्याकाळी भेट म्हणजे आपण दोघं मिळून जगातली ही वाईट गोष्ट संपवून टाकू. कसली भन्नाट कल्पना आहे न?

असं म्हणतात की लोकं प्रेमभंग झाला की तो विसरायला दारु पितात. एका बारमधे बोर्ड पण लावला होता, की जर तुम्ही इथे कांही विसरायला म्हणून प्यायला आलेले असाल ,तर कृपया आमचे पैसे आधी देऊन टाका, आणि मग प्या….आता इंग्रजी सिनेमा मधे हिरोईन प्रेम भंग झाला की भरपूर खाताना दाखवलेली आठवते एका सिनेमात. मस्त पैकी ती आइस्क्रीम , डॊनट्स, आणि इतरही बरंच कांही खाते.. असो विषयांतर होतंय..

विसरायला म्हणून  दारु पिल्याने  .. म्हणजे दोन तिन पेग झाले तरीही किंवा  अगदी दहा पेग झाले आणि तो पिउन टून्न झाला  आणि त्याला कोणी विचारलं.. का रे बाबा?? का प्यायलास एवढी?? तर म्हणतो.. प्रेमभंग झाला म्हणून दारु प्यायलोय. आता हे सांगा जर दहा पेग पिून पण जर तुम्हाला प्रेमभंग झाला ही गोष्ट विसरता येत नसेल तर    तर मग दारु प्यायची कशाला??

मग दारु कधी प्यावी??काही वाईट गोष्ट विसरायला .. अजिबात नाही, पण एखादी गोष्ट जसे प्रमोशन वगैरे सिलेब्रेट करायला जर सोशलायझिंग साठी  घेतली तर चार पाच पेग नंतरपण तो मोठ्या आनंदाने सांगेल.. प्रमोशन झालं ना  म्ह्णून पितोय म्हणुन  🙂

नाही .. मला सोशल ड्रिकींग चांगलं की वाईट हा मुद्दा घेउन लेख लिहायचा नाही आज. ही गोष्ट व्यक्तीनुरुप आणि तुम्ही कुठल्या सोशल एन्व्हायर्मेंट मधे रहातात त्यावर अवलंबून आहे. प्रत्येकानेच आपापला निर्णय घ्यायचा असतो या बाबतीत.

आजकाल सोशल ड्रिंकींगचं प्रमाण थोडं वाढलंय. पुर्वी दोन मित्र भेटले की कॉफी हाउस मधे बसून टाइम पास करायचे. आजकाल कुठला तरी बार प्रिफर केला जातो गप्पा मारायला. काल पण आमच्या मित्रांना कळलं की मी नागपुरला आहे, तर लगेच बॉस कहां बैठक लगानेकी?? असे एस एम एस सुरु झाले. पूर्वी आमच्या गृप मधे एक मित्र होता त्याचं लग्न व्हायचं होतं, तेंव्हा त्याचं घर बरं होतं .. त्याचं नाव विरु, म्हणून त्याच्या घराला विरु का धाबा म्हणायचो आम्ही..

आमचा एक खास मित्र काल रात्री दोन पेग झाल्यावर  🙂 कम्प्लेंट करित होता   एक गोष्ट लक्षात आली की या   दारुड्या लोकांना सगळेच फसवतात.तुम्ही बार मधे बसले आहात,  तुमचे दोन पेग झाले की साठ एम एल मागवली तर तुमच्या समोर तो ५० एम एल आणुन ठेवतो आणि ते तुम्हाला कळत पण नाही, एक फुल बॉटल मागवली तर चक्क ७५० एम एल ची बाटली देतात १००० मिली च्या ऐवजी आणि हाफ मागितली तर ३६० एम एल दिली जाते ५०० एम एल च्या ऐवजी, तसेच क्वॉर्टर मागितली तर १८० एम एल देता २५० एम एल ऐवजी. किती ही फसवणूक??

एक गम्मत पहा.. परवाच एक सर्व्हे चा निकाल वाचला.म्हणे मुंबई शहरात काही हजार लोकं दारु  पीऊन कार चालवतांना सापडले, आणि त्याच सोबत ही पण पुस्ती जोडली होती की दारु पिउन कार चालल्यामुळे १० टक्के अपघात होतात. याचा अर्थ ९० टक्के अपघात हे दारु न पिणारे करतात.. आमचं मत असं आहे की  जर खरंच असं असेल तर सगळ्यांनाच ड्रायव्हिंग करण्या पुर्वी दारु पिणं कम्पल्सरी करावं 🙂  बरं मला एक गोष्ट समजत नाही जर फक्त ‘१० टक्के लोकं दारु पिणारे ऍक्सिडॆंट करतात, तर न पिणारे त्यांच्या मार्गातून बाजुला का होत नाहीत??

विनोदाचा भाग सोडुन द्या, पण एक गोष्ट आहे जर तुम्ही दोन किंवा तिन लार्ज घेतले असतील तर ड्रायव्हिंग करतांना थोडं जास्तच कॉनशस असता, पण थोडी जास्त झाली तर ओव्हर कॉन्फिडन्सनी कुठे तरी ठोकता कार.

पटटीच्या पिणाऱ्या ला काही तरी बहाणा लागतो. मग मित्राचं लग्नं, प्रमोशन, प्रेम जुळणं, प्रेम भंग, बदली होणं, गर्ल फ्रेंड बद्लून जाणं, काहीही कारण पुरतं प्यायला. हे लोकं जीवनातली प्रत्येक गोष्ट ही दारुशी मोठ्या बेमालूम पणे जोडतात.  एक एसएमएस खूप पॉप्युलर होता, तुम्हाला पण कदाचित आलेला असेल,

दारु प्यायल्याने नशा येते,

नशे मुळे उत्साह वाढतो ( जुनुन),

उत्साहाने मेहेनत जास्त केली जाते,

मेहेनतीने पैसा वाढतो,

पैशाने इज्जत वाढते,

म्हणून चल मित्रा आपण आज रात्री दारु पिऊ आणि इज्जत कमाऊ…..

काय भन्नाट कल्पना आहे नां?  तर मंडळी, सगळ्या एका तळीरामाची ही कविता ..पट़्टीचा पीणारा असावा, ती इथे देउन पोस्ट संपवतो.. चिअर्स….

मी मेल्यावर गंध गुलाल लाउन  तिरडी माझी सजवा
मात्र त्यावर टाकायची फुलं दारुत आधी बुडवा.
माझ्या अंत्य यात्रेत सर्व जण शुध्दीत असावेत
मात्र चार खांदेकरी थोडंसं प्यायलेले असावेत
मी मेल्यावर तुम्ही म्हणाल, “बरं झालं बेवडा गेला”
मात्र दारु पिणारे म्हणतील “आमचा जॊडीदार गेला”
असं  जीवन जगण्यापेक्षा मेलेलंच बरं
मरायची भिती वाटते म्हणून थोडं प्यायलेलंच बरं
(कवी.. अनामिक)

About महेंद्र

माझा ब्लॉग :- http://kayvatelte.com
This entry was posted in विनोदी. Bookmark the permalink.

69 Responses to हाय कम्बख्त तुने पी ही नहीं….

 1. anukshre says:

  ”दारू म्हणजे काय रे भाऊ?” आठवले. अजून काहीच लिहू शकत नाही. सुतराम पणे दुरान्वये सुद्धा कधी रंग सुद्धा पाहीला नाही.म्हणून आवर्जून अभिप्राय देते.असे ह्यामधले अनेक तज्ञ पतिक्रिया देतील. पण आपण समस्या म्हणून, निर्माण होणारी ही आवड सन्मानपात्र कशी आहे. हे अतिशय सुलभ रीतीने गळी एकच प्याला सारखे आमच्या उतरवले.
  नटसम्राट अजूनही पुन्हा पुन्हा पाहावेसे वाटते.हेच यश आहे लेखाचे हे फक्त माझ्यापुरते…..

  • कालचा आलेला टेक्स्ट मेसेज हे कारण ठरलं या लेखाचं. म्हंट्लं की आज चांगली बाजु लिहु या या वारुणीची …..कांही तरी विनोदी लिहायचं होतं, कालच राजिव ने फोन केला होता, म्हणाला, मधुशाला ऐकली … आणि अगदी भरभरुन बोलत होता त्या कार्यक्रमाबद्दल. मधुशाला लिहीणारे हरिवंशराय बच्चन पण कधीच आयुष्यात दारु प्यायले नव्हते, तरी पण त्यांनी इतकं सुंदर काव्य लिहिलं.. .. 🙂

   • Sagar says:

    Kaka
    जितनी दिल की गहराई हो उतना गहरा है प्याला,
    जितनी मन की मादकता हो उतनी मादक है हाला,
    जितनी उर की भावुकता हो उतना सुन्दर साकी है,
    जितना ही जो रिसक, उसे है उतनी रसमय मधुशाला

    ata orkut var sapadal he vakya Madhushala madhal

 2. Girish says:

  MBK, madira/daru/somras nehmi changlich aste, lokanich tila badnam kele ahay. daru pitat loke ani control sut to lokanacha ani badnam hote daru.. chavat pana ahay sagla

 3. मी says:

  काका, काय तुम्ही पण नको त्या गोष्टींची आठवण करून देता.
  आज सकाळी झोपेतून उठतानाच मी ठरव्लं होतं की आता सगळं बंद ..
  कारण खुपच उशीर झाला ऑफिसला जायला. आणी मी सोडली होती ..
  तुमच्या पोश्टमुळं .. गोड मस्कार्टो निघालीच .. चांगभल !

 4. दारू मुळात वाईट नाहीच. पिणा-याच्या मुडवर सगळं अवलंबून असतं. बार मधे मद्य पुरवताना ’कट’ मारतात असं मीही ऐकलं आहे. खरखोटं माहित नाही. मात्र दारू ’मिळतेय’ म्हणून पिणारे पाहिलेत, त्यांच्याकडे पाहूनच किळस येते. काहीजण दारुचा आनंद लुटतात. डीमलाईट्स लावून, ’ला पिलादे साकिया’ किंवा ’मजा लेना है पिने का’ सारखी रुबाई ऐकताना, गप्पागोष्टी करत मद्याची जी धुंदी चढते, ती दारू ढोसण्यात नाही. यशाची धुंदी ही दारूच्या धुंदीपेक्षा कैक पटीने जास्त असते असं म्हणतात. यश डोक्यात गेल्यावर काही न पिणारेही कसे गर्वोन्मत्त होतात याची उदाहरणं तर पावलापावलावर मिळतात. तरीदेखील दारू पिऊन धुंद झालेल्यांनाच ’बेवडा’ का म्हणतात?

  • या कॉमेंटला उत्तर जरा विचार करुन द्यावं लागेल. रात्री पर्यंत बघतो काही सुचतं का ते.. नाहितर इतर वाचक आहेतच उत्तर द्यायला.

  • Salil says:

   Daaru ekatyane pile tar sagalyat vaait Goshta, Daru mitranbarobar pili tar thik ani Daru sagalyaat chaanglya mitranbarobar pili tar sarvottam.
   asa aamacha sopa niyam ani anubhav hi 🙂
   (ani ho Drinks ghene mhananyapeksha Daaru pine mhananyatla anand veglach)
   Baki MK jivhalyachya vishayavar lihilat 🙂

   • सलिल

    मी हे ज्या पध्दतिने लिहिले आहे, ते वाचुन एखाद्याचा गैरसमज व्हायचा की हा महेंद्र म्हणजे एक बेवडा आहे..
    अरे त्या राजिवने इतकी तारिफ केली मधुशाला ची की हा ठरवलं, विषय घ्यायचा लिहायला…

 5. आनंद पत्रे says:

  चीअर्स! लेख खुसखुशीत झालाय !

 6. Madhuri says:

  Thank god my husband doesnt drink and he doesnt know about ur blog! Oh god save our husbands from such bloggers!

 7. varsha says:

  one Gazal i heard, long ago by Abida Parveen. ji chahe to sheesha ban ja, ji chahe paimana ban ja….

  very nice, if posible, listen. Album is Raks e bismil.

 8. तुम्ही दिलेल्या कवितेवर लिहायचं राहिलं होतं. कधी कधी लोक आयुष्यात काही उरलं नाही म्हणून स्वत:ला विसरण्यासाठीही पितात. इतकं नैराश्य येतही असेल एखाद्याला. कदाचित सगळे सोडून गेले, फक्त दारूने तेवढी प्रतारणा केली नाही, म्हणून अंतिम प्रवासातही फुलांपेक्षा दारूचा गंध अशांना अधिक प्रिय असावा. अशांना बेवडा म्हणू शकत नाही. अकारण जगाने नाकारलेले दारूला जवळ करतात. अशांसाठी ’दारू सत्यं जगत मिथ्या’.

  • कांचन
   मी त्या कवितेकडे एक विनोदी कविता म्हणुनच पहात होतो. पण तुमच्या मुळे एक वेगळा अर्थ गवसला..

 9. अशा आशयाचीच एक कविता आधी वाचली होती. काही वर्षांपूर्वी एक तरूणी पाहिली. प्रचंड नैराश्याने ग्रासलेली. तिच्या मद्यसेवनाच्या प्रवासाची सुरूवात वाईनने झाली होती. शेवट कसा झाला असेल, ते सांगायला नकोच. आयुष्यात सर्व ’आपली माणसं’ असूनही जवळचं असं कुणीच उरलं नव्हतं. नवीन नाती बनवायची इच्छा मरून गेलेली. स्वत:ला विसरून जायचं होतं तिला. आत्महत्येचं धैर्य नाही म्हणून दारू पित होती. एकटी रहाते, वर दारूही पिते म्हणून लोकांमधे तिच्या नावाची खूप चर्चा असायची. शेजारीही तिच्याशी संबंध फारसे ठेवायचे नाहीत. पण तिला कशाचंच काही वाटायचं नाही. एकदा तीच स्वत: म्हणाली, “माझं कॉफीन मात्र आतून छान नक्षीदार, खूप खूप रंग वापरून केलेलं असावं असं वाटतं.” त्यादिवशी मात्र मला अश्रू आवरले नाहीत. माझी समजावण्याची शक्ती कमी पडली. तिने दारूला आणि दारूने तिला शेवटपर्यंत सोडलं नाही. ही खूप निराशाजनक प्रतिक्रिया झाली पण तुमची कविता वाचल्यावर मला तिचीच आठवण झाली.

  • हं…सहाजिक आहे इतकं फिल होणं.
   थोडं विषयांतर .. पण लंच टाइम मधे आमच्या ऑफिस समोरच्या पानवाल्याकडे कित्तेक मुली दिसतात सिगरेट्स ओढत.. जग बदलतंय.. नाही?

 10. Sagar says:

  Kaka
  Mi tar Aayushyat ya goshti pasun dur rahaych tharval aahe……Frienz pitana suddha mi fakt coldrinks pito…..
  Ek Kavita post kartoy Orkut varun copy kelili…

  दारु चा पाढा
  दारू ऐक दारू ,बैठक झाली सुरू
  दारू दुने ग्लास ,मज्जा एये खास

  दारू त्रीक वाइन , वाटे कसे फाइन
  दारू चोक्क बीअर , टाका पुद्चा गेअर

  दारू पंच रम , विसरून जाऊ गम
  दारू सक ब्रांडी , आना चिकन अंडी

  दारू सात वीसकी , कॉकटेल करता रीसकी
  दारू अट्ठा बेवडा , आणि शेव चीवडा

  दारू नआवे कंट्री , मारा परत एनेट्री
  दारू दाहे प्याला , स्वर्ग सुखी नहला ………………………

 11. माझी जॅक डॅनियल, जॉनी वॉकर अश्या लोकांशी “तोंड” ओळख आहे. पण त्यांना भेटल्याशिवाय करमत नाही असे नाही. २-४ महिन्यातुन भेटतात अधून मधून.

  >>> “दारू मुळात वाईट नाहीच. पिणा-याच्या मुडवर सगळं अवलंबून असतं… काहीजण दारुचा आनंद लुटतात. डीमलाईट्स लावून, ’ला पिलादे साकिया’ किंवा ’मजा लेना है पिने का’ सारखी रुबाई ऐकताना, गप्पागोष्टी करत मद्याची जी धुंदी चढते, ती दारू ढोसण्यात नाही.”

  कांचनच्या म्हणण्याशी एकदम सहमत. माहौल असला की मज्जा येते. जुन्या आठवणी निघतात. मग पेय हे नुसतं निमित्त होऊन जातं. ह्या विषयावरचं(?) संदीप खरेचं “अल्कोहोल” गाणे पण छान आहे.

  बाकी काका आत्ता विषय निघालाच आहे तर सांगतो
  “हंगामा है क्यूं बरपा, थोडी सी जो पी ली है… डाका तो नहीं डाला, चोरी तो नहीं की है…”

  • सिध्दार्थ
   मी स्वतः मार्केटींग मधे गेली २५ वर्षं काम करतोय. पुर्वी तर खुपच टुर असायचे. सारखं एक्सपेन्स अकाउंट्वर असायचो. त्यामुळे खुप चान्सेस होते सवय लागायचे. माझे बरेचसे मित्र अगदी पट़्टीचे पिणारे आहेत. सारखे चान्स शोधत असतात . मी स्वतः मात्र या गोष्टीत कधिच गुंतलो नाही. अजुनही दोन पेग्ज चं वावडं नाही मला, पण अजुनही माझ्या घरी मला ’चालते’ हे माहिती नाही. कधीच दोन च्या वर जात नाही. अगदी ऑफिशिअल पार्टीमधे पण..

   • ह्या वारुणी पुराणात काल एक गोष्ट राहून गेली लिहायची. मध्यंतरी एक मजेदार(?) SMS आलेला “संसार उध्वस्त करी दारू, संसार नका करू”…

    • संसार उध्वस्त करी दारू, संसार नका करू”…याच अर्थ निट लागत नाही. काहितरी सुटलंय कां? की तुम्ही फक्त दारुच प्या आणि संसार करु नका असा अर्थ घ्यायचा की काय?

     • अहो पुर्वी दूरदर्शनवर एक जाहिरात लागायची. “संसार उध्वस्त करी, दारूस स्पर्श नका करू”. आत्ता पेताड् लोकांनी त्याचं “संसार उध्वस्त करी दारू, संसार नका करू” असं विडंबन केलं.

 12. शोशा म्हणून खुलेआम असं करणं निराळं, चार भिंतीत स्वत:ला बंद करून असं करणं निराळं. माझ्याच बाजूच्या डेस्कवर बसायची ती. काम करून सरळ घरी. सिगारेट पिताना नाही पाहिलं कधी. तिच्या घरी गेले होते तीन-चार वेळा तेव्हा तुकड्या-तुकड्यामधून ती समजत गेली.असो. विषयांतर होईल. तुम्ही चित्र फार चांगलं निवडलं आहे. दारू पिऊन तो खाली पडलाय, गाणंही गातोय पण ग्लास काही पडूदिला नाही पठ्ठ्यानं! ह्याला म्हणतात दारूचे दर्दी!!

  • कांचन
   हो.. ते चित्र निवडायला पण बराच वेळ लागला. इतर कार्टुन्स खुप होते. पण मला हे चित्र पाहिल्यावर कंटाळा ब्लॉग चं हेडर आठवलं होतं. ते माणुस खुर्चीत बसलेलं.
   अशा लोकांना मदतीची गरज आहे. माझा एक कलिग पुर्वी गोव्याचा ब्रांच मॅनेजर होता. एकदा त्याच्या घरी केलेला फोन त्याच्या बायकोने उचलला, मी म्हंट्लं की मी कुलकर्णी बोलतोय, तर रागाने च बोलली माझ्याशी. नंतर त्या मॅनेजरला म्हंट्लं, तर तो बेशरम सारखा म्हणतो, अरे तु मुंबईहुन आला आहेस असं सांगुन नेहेमी ढोसतो म्हणे… म्हंट्लं अरे पण प्रत्येक वेळेस मी च कां?? तो अल्कोहलीक होता. अशा लोकांना गरज असते ती मदतीची… आहे त्या परिस्थितीत समाजाने ऍक्सेप्ट करण्याची. जर समाजाने दुर ढकललं तर ते लोकं अशाच गोष्टीत गुंतत आणि वहावत जातात. फक्त मद्त करतांना आपण त्यात गुंतत नाही ना ह्या कडे पण थोडं लक्षं द्यावं लागतं.

 13. Abhishek Mule says:

  छान “भट्टी जमली ” आहे सुंदर लेख !!

  • अभिषेक
   भट़्टी कालच लावली/ पहिल्या धारेची आहे अजुन शिल्लक… 🙂
   चांगभलं ( चिअर्स साठी हा प्रतिशब्द आवडला मला _)

 14. ajayshripad says:

  फिर हाथ मे शराब है, सच बोलता हू मै….!
  दारु वाईट नाही दादा.. तिला वाईट म्हणनारे लोकच वाईट….! 😀

 15. bhaanasa says:

  महेंद्र विनोदाच्या अंगाने लेख लिहीलास आणि मीही त्याच ढंगाने वाचला. मजा आली. मग विचारचक्र सुरू झाले. ते अपरिहार्यच आहे रे… तर कांचनने लिहीले तसेच अनेक विचार एकावर एक घुसत राहीले.कुठल्याही निमित्ताने दारू पिणारे लोक आजकाल फार सापडतात. आनंद झाला पी दारू, दु:ख झाले पी दारू, राग आला पी दारू, कंटाळा आला करायला इतर काहीच नाही पी दारू, बायको माहेरी गेली पी दारू, अरे यार आली रे बया परत पी दारू:D, आता या प्रकारच्या दारू पिणा~यांना नेमके काय म्हणावे? नाही म्हणजे सुरवातीला हे दारूला पितात मग हळूहळू ती यांना संपवू लागते. आजकाल स्टेटस म्हणून दारू पिणारे म्हणजे तर…..जाऊ दे. बाकी हे हॊटेलमध्ये एकदा का दोन पेग झाले की उल्लू बनवणारे, मोठ्या पार्टीतच नव्हे तर अगदी चौघांमध्येही पेग्ज जास्ती लावणारे, खाण्याच्या डीशेसच्या रेट्स मध्ये व संख्येत मारणारे अनेक मोठे नावाजलेले हॊटेल वाले पाहीलेत. म्हणून बहुतेक एक तर न पिणारा आजकाल हाताशी धरलेला असतोच….हाहा…मस्त झालेय तुझे वारूणी पुराण:)
  बाय द वे नागपुरला जाऊन दारू काय ढोसतो आहेस? अरे आईकडे जाईन म्हणाला होतास ना? वेरी बॆड:( थांब आईला सांगते याला बिलकुल लोणची-पापड देऊ नकोस……:D

  • भाग्यश्री
   अगदी खरं , आधी माणुस दारु पितॊ नंतर दारु माणसाला पिते. माझा एक कलिग तो वर दिलेला गोव्याचा मॅनेजर दिवस भर प्यायचा. ऑफिस मधे बसला असतांना पण समोर जिन चा ग्लास समोर ठेवलेला असायचा. जिन पाण्यासारखी दिसते, त्यामुळे कोणाला कळायचं नाही. पण शेवटी लिव्हर सिरॉयसिस झाला आणि मरायला टेकला, तेंव्हा सोडली.. पण तो पर्यंत नौकरी पण गेली होती. असो.. भलतंच काही तरी लिहिलं जातंय.
   इथे कुठे काय करणार. परवा थोडा वेळ मित्रांसोबत होतो . पण बरं नाही सध्या.. सर्दी, ताप असल्याने लवकर घरी गेलो. आईने मस्त पैकी ज्वारीची भाकरी आणि पांढरं लोणी ( कारण बटर म्हंटलं की अमुल डोळ्यापुढे येते पांढरं) झुणका मेथीचा+ कांद्याचा.. बनवला होता. मस्त खाणं झालं काल.
   आणि हो.. आई तर सारखी स्वयंपाक घरातंच आहे. नातींसाठी चिवडा, चकली, मेतकुट वगैरे बनवते आहे..नको म्हंट्लं तरीही ऐकत नाही. अगं तिचं वय आता ७६ झालंय नां… तरिही ऐकतंच नाही..
   पण घरी (एकटा) आलं की मस्त वाटतं..आज रात्री ८च्या जेट लाइटने मुंबईला परत जाईन..

 16. Bhujang Patil says:

  मी मेल्यावर गंध गुलाल लाउन तिरडी माझी सजवा
  मात्र त्यावर टाकायची फुलं दारुत आधी बुडवा.
  माझ्या अंत्य यात्रेत सर्व जण शुध्दीत असावेत
  मात्र चार खांदेकरी थोडंसं प्यायलेले असावेत
  ………………
  ………………
  – Its translation of Dr. Harivansha Ray Bachhan’s “Madhushalaa”

 17. Rajeev says:

  ( shmaa maagoon )
  कधी तूला कळावे,
  बेवडा कोणा म्हणावे,
  तु कधी नाही झोकलीस ?
  मग नीर्मळ आनंदाला मुकलीस ….
  कांचनताई कराई..
  एक गोष्ट करा ही…
  मधूशाला वाचा ..
  कळतील आयुश्याच्या खोचा..
  जगायला हातात बाटली पाहीजे..
  नसली तर अश्या जगायची लाज वाटली पाहीजे..
  दारू आणी देवाचं सेम असत…..
  तादात्म्य पावल्या वरच त्यातलं मर्म कळत असत..

  हाय ( ५० वेळेस) .. कंब्क्क्त तूने पी ही नही ?

 18. मद्याने जो धुंद झाला, त्यास उगा म्हणती बेवडा
  यशाने जो उन्मत्त झाला, त्याचा विसर कसा पडला?
  मद्याच्या स्वागता, दु:खाचे बहाणे,
  मद्यधुंद होणे ते, नसे तादात्म्य पावणे
  ईश्वर असता मिळाला, जर मद्यप्राशनात
  संतांनीही केला असता, मदिरेचा प्रचार
  साध्या प्रश्नाचा कसा, विपर्यास झाला
  स्वामी, का मज वाटे, तुम्हा प्रश्नच नाही कळला?
  मधुशाला काव्य असे, स्वानुभवाची बोली
  प्रत्येकाचे दु:ख निराळे, साहण्याची रितही आगळी
  दारूत जरी गमावले, शरिराचे भान
  मनाच्या ढळण्यास, दारू नसे कारण
  का लज्जा वाटावी मज, मद्यपि नसण्याची
  सुखाची धुंदी अशी की, मद्याची गरज न व्हावी
  भान तरीही आहे, मला वर्तमानाचे
  भविष्य आहे माझ्या हाती, माझ्या संसाराचे
  दारू आणि देवाचं सेम असेलही, मी ते कधीच नाकरलंही नव्हतं
  मधुशाला वाचली म्हणजेच, आयुष्य समजत नसतं
  जगण्यातली धुंदी ज्यांना कळत नाही,
  ते दारू पित असतील, माझी तक्रार नाही
  मात्र दारू पिणंचा अर्थ जगणं म्हणजे हाय! कम्बख्त तुने पीही नही

 19. अनावधानाने या पोस्ट वर आले नसते तर स्वामिजींची प्रतिक्रिया दिसली नसती. जीवनाबद्दलचा आपला दृष्टीकोन वाचून फार आनंद झाला स्वामीजी.

 20. Rajeev says:

  maza aaya..

 21. Dilip says:

  ‘हंगामा है क्यो बरपा
  थोडीसी जो पी है !
  डाका तो नही डाला
  चोरी तो नही की है !!’

 22. Dilip says:

  कुठल्या ही गोष्टीवर कुणीही स्वतः अनुभव घेतल्या शिवाय अभिप्राय देवू नयेत. आधी स्वतः अनुभव घ्यावा आणि नंतरच त्या विषयी चांगले किंवा वाईट मत नोंदवावे. मी अजून दारूची टेस्ट घेतलेली नाही. म्हणून आजच संध्याकाळी दोघा मित्रांबरोबर बसून घ्यायचे ठरवले आहे. तो प्रोग्राम पार पडला की मगच लिहितो दारू कशी असते ते. Ok ? ( मयू, कंपनी दह्याला येतोस का ?)

  • यायला जरुर आवड्लं असतं.. पण आज मी पुण्याला आहे नां.. म्हणुन जरा प्रॉब्लेम आहेच. तरीही मुंबईला येतांना पुना गेटला मुक्काम असेलंच… 🙂

 23. Dilip says:

  १७ नोव्हेंबर ०९ ला वर्षाजीनी अबिदा परवीनच्या घाझल च्या दोन ओळी लिहिल्या होत्या. पूर्ण गझल अशी आहे

  जी चाहे तो शीशा बन जा, जी चाहे पैमाना बन जा
  शीशा पैमाना क्या बनना, मै बन जा मैखाना बन जा ..

  मै बन कर, मैखाना बन कर मस्ती का अफसाना बन जा
  मस्ती का अफसाना बनकर हस्ती से बेगाना बन जा

  हस्ती से बेगाना होना मस्ती का अफसाना बनना
  इस होने से इस बनने से अच्छा है दिवाना बन जा

  दिवाना बन जाने से दिवाना होना अच्छा है
  दिवाना होने से अच्छा खाक-ए-डर- ए जनाना बन जा

  खाक-ए-डर- ए जनाना क्या है अहले दिल कि अन्न्ख का सुरमा
  शमा के दिल कि ठंडक बन जा नूर ए दिल ए परवाना बन जा

  सिख झहिन के दिल से जालना काहे को हर शम्मा पार जालना
  अपनी आग में खुद जल जाये तू ऐसा परवाना बन जा

  • क्या बात है.. अतिशय सुंदर..ऐकली आहे ती गझल.. अप्रतिम आहे. पुर्ण गझल लिहिल्याबद्दल आभार..

   • Dilip says:

    महेंद्र,
    एक विचारू का ? रोज इन्टरनेट साथी दिवसातला किती वेळ राखून ठेवतोस ? आणि रोज ठराविक वेळी ‘ऑनलाइन’ असतोस की जेव्हा वेळ मिळेल तेवा किंवा जेव्हा नविन काही सुचेल तेव्हा ‘ऑनलाइन’ असतोस.
    मी अशी प्रार्थना करतो की तुला अशाच नव्या नव्या कल्पना सुचत राहोत आणि आम्हाला असाच खुराक मिळत राहो.

    • जर टुरला असेल तर दिवस भर ऑफ लाइन असतो. आणि जर ऑफिसला असलो तर दिवस भर ऑन लाइन. आणि लिखाण.. युजवली घरी रात्री सौ. आणि मुली टिव्ही पहातात , तेंव्हा मी लॅप टॉप उघडुन काही तरी लिहित बसतो..
     असा, मुद्दाम वेळ राखुन ठेवत नाही वेगळा. दिवस भर गुगल मेल सुरु ठेवतो, म्हणजे मग कोणी कॉमेंट टाकली, की लगेच समजते. आता उद्या दिवसभर ऑन लाइन नसणार, कारण वलसाडला जायचंय कामासाठी.. 🙂

 24. Atul Deshmukh says:

  संसार उध्वस्त करी दारु
  म्हणून म्हणतो संसार नका करू…
  पट्टीचा दारुबाज

 25. Mrunal says:

  Garatil bayakna jababdarichi janiv ahe manun purushana sagale shuk karta yetath. samaja samantecha
  ajacha yugat var pratikriya tilelya saglancha bayakahi behosh vohu laglya tar. kalpana kara kai hoiel?
  behos hone saglyanach avadhe pan kadhi? jenva garcha konitari ek purnapane sudhith asel theva.

  • बेहोश होणं सगळ्यांनाच आवडते, असंच नाही, काही लोकं उगाच आपलं घ्यायची म्हणून एखादा पेग घेऊन पण बसतात पार्टी मधे..
   पण घरचं कोणी सोबत असेल तर सेफ वाटतं हे पण खरंय..

   • tejali says:

    waa kaka….mast….lok daru ka pitat mahit nahi mala..pan atleast mala mazyapurat tari uttar milala…;)he..he..he…pan 1 maatr ahe..baki konabarobar pinyapekasha baba barobar asatana daru pyayachi maja hi wegalich..it really gives a sence of trust dat my dad showed on me…:) (ekach jata jata share karawas watatay…i never dirnk wid my friends..specially “sunday ” movie baghitalyapasun)

 26. मनोज says:

  daru peet nahi ya mule no coment

 27. Avinash pandharkar says:

  Tumcha blog jam bhaari aahe!!!!!

 28. Gurunath says:

  मला ऑफ़िसर्स ड्रींक आवडते…. कॉलेज मधे बीयर खुप प्यालोय….

  आता फ़क्त रॉयल ड्रींकींग आवडते…..

  त्यातही, स्कॉच कींवा मॅच्युअर्ड रम असेल तर सहीच….

  टिपीकल नाइट कॅप्स…

  मोठा व्हिस्की ग्लास पुर्ण आईस ने भरून त्यात फ़क्त ४५ मि.ली ओतायची अन पुर्ण बर्फ़ वितळेपर्यंत तो पेग चालवायचा
  जबर रिफ़्रेशिंग आहे….

  पिणे हया मॅटर वर आपल्याला “भैय्या नागपुरकर” पटतो पु.लं चा….. “सितमगर मैने तेरे लिये लाखॊं बोल सहे!!”

  तसे तरूण बॅचलर वयात एखाद वाईल्ड पार्टी पण ओ.के…

  आम्ही मित्राच्या बॅचलर्स ला केले होते एकदा…

  बादलीत ३ खंबे ओतले, त्यात ६ सोडे…. कोल्ड ड्रींक वेगळे….
  ज्याला हवा त्याने आपापला ग्लास भरुन घ्या बादलीतुन अन प्या
  पेग भरण्या भरवण्याच्या फ़ॉरमॅलीटी नाही स्ट्रीक्टली………… 😀 😀

  • हम्म.. मी तसा बिअरडा.. पण कधी तरी इतरही सगळं चालतं. लिमिट्स फिक्स आहेत. दोन फक्त!

 29. Jagrut says:

  Post sundarach aahe…aani vishay nighala aahe mhanun hi ek kavita…mail keli hoti mitrane..bagha, aavdate ka…

  ऐक क्वार्टर कमी पडते 😛

  दारु काय गोष्ट आहे
  मला अजुन कळली नाही
  कारण प्रत्येक पीणारा म्हणतो
  मला काहीच चढली नाही
  सर्व सुरळीत सुरु असताना
  लास्ट पॅकपाशी गाडी अडते
  दर पार्टीच्या शेवटी
  ऐक क्वार्टर कमी पडते ::)

  पीण्याचा प्रोग्राम म्हणजे जणु
  वीचारवंतची गोलमेज परीषदच भरते
  रात्री दीलेला शब्द प्रत्येकजण
  सकाळच्या आत विसरते
  मी इतकीच घेणार असा
  प्रत्येकाचा ठरलेला कोटा असतो
  पॅक बनवनारा त्यदिवशी
  जग बनवनार्या पेक्षा मोठा असतो
  स्वताच्या स्वार्थासाठी
  प्यायच्या आग्रहाचा कार्यक्रम घडते
  दर पार्टीच्या शेवटी
  ऐक क्वार्टर कमी पडते 😮

  पीण्याचा कार्यक्रम पीणार्याऐला
  दरवेळेस नवीन पर्व असते
  लोकांना अकँडेमीक्सपेक्षा पीण्याचा
  क्षमतेवर गर्व असते
  आपण हीच घेतो म्हणत
  ऐकमेकाचे ब्रँडप्रेम जागवतात
  वेळ आली आणि पैसा नसला की
  देशीवरही तहान् भागवतात
  शेवटी काय दारु दा‍रु असते
  कोणतीही चढते
  दर पार्टीच्या शेवटी
  ऐक क्वार्टर कमी पडते 😡

  पीणार्या मध्ये प्रेम हा
  चर्चेचा पहीला वीषय आहे
  देवदासचे खरे प्रेम पारो की दारु
  मला अजुन संशय आहे
  प्रत्येक पॅकमागे तीची
  आठवण दडली असते
  हा बाटलीत बुडला असतो
  ती चांगल्या घरी पडली असते
  तीच्या आठवणीत थर्टीची लेवल
  लगेच सिक्स्टीला भीडते
  दर पार्टीच्या शेवटी
  ऐक क्वार्टर कमी पडते ;D

  चुकुन कधीतरी गंभीर
  वीषयावरही चर्चा चालतात
  सर्वेजण मग त्यावर
  P.HD. केल्यासारखे बोलतात
  प्रत्येकाला वाटतेकी
  त्यालाच यामधले जास्त कळते
  ग्लोबल वार्मिंगची चर्चा
  गावच्या पोटनीवडणुकीकडे वळते
  जसा मुद्दा बदलतो
  तसा आवाज वाढते
  दर पार्टीच्या शेवटी
  ऐक क्वार्टर कमी पडते :-[

  फेकणे, मोठोपणा दाखवणे याबाबतीत्
  यांच्यासारखा हात नाही
  ऐरवी सींगल समोसा खाणारा
  गोष्टीत पीझ्झाशीवाय् खात नाही
  पैशे काय आहे ते फक्त
  खर्च करासाठीच असतात
  पॅकजवळ झालेली अशी गणिते
  सकाळी चहाच्या कटींगपाशी फसतात
  रात्री थोडी जास्त झाली
  मग त्याला कळते
  दर पार्टीच्या शेवटी
  ऐक क्वार्टर कमी पडते… 8)

  यांच्यामते मद्यपाण हा
  आयुष्याचा महत्वाचा पार्ट आहे
  बीयर पीण्यामागे सायन्स
  तर देशी पीण्यामागे आर्ट आहे
  यामुळे धीर येते ताकत येते
  यात वेगळीच मजा असते
  आयुष्याभराचा मावळा माणुस
  त्या क्षणी राजा असते
  याच्यामुळे आपल्याला घराच्या
  चिवड्याचे महत्व कळते
  दर पार्टीच्या शेवटी
  ऐक क्वार्टर कमी पडते… 😥

 30. Manish D. Deogaonkar says:

  Namskar, hya babtit mala mazhya kakani sangitlele gosht –
  Daru hi aag aahe, ata tumhi tichyane poli shekta ka ghar jalta te tumhi tharva.
  OK Boss. Best post

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s