बादशहा ……

जरी हा लेख सचिन बद्दल असला तरीही या लेखात  त्याच्या क्रिकेट कारकिर्द बाबत काहीच लिहायचं नाही हे ठरवलंय.. कारण खूप झालंय लिहुन..

एखाद्या मोठ्या झाडाच्या खाली एखादं रोपटं उगवलं तर ते निट वाढू शकत नाही. कारण प्रत्येक येणारा जाणारा त्या रोपाची तुलना त्या मोठ्या वृक्षाशी करित असतो. अर्थात, जर प्रत्येकच रोप वृक्ष होत नसतो, काही बांडगूळं पण असतात, तर कांही वेली पण असतात.काही लहान झुडपं पण असतात. अगदी सारखाच प्रकाश, सारखंच खत पाणी दिलं तरीही दोन रोपांच्या मधे फरक हा पडतोच. एक रोप अस्तित्वात असलेल्या सुविधांचा उपयोग करुन पुर्ण वाढ करुन घेतो, तर दुसरं रोप तसंच खुरटल्या सारखं होतं . याला अर्थात काहीच कारण नाही.

सचिन ची २० वर्षं .. सचिन एक   चांगला खेळाडू आहे. एक जबाबदार नागरिक म्हणून पण  तो प्रसिद्ध आहे आणि कुठल्याही परिस्थितीत त्याच्यावर   शिंतोडे कधीच उडलेले नाहीत. इतक्या मॅच फिक्सिंग  च्या केसेस झाल्या, बऱ्याच खेळाडूंना सक्तीची निवृत्ती पत्करावी लागली , तरी पण त्या मधे कोणीच सचिनचं नांव घेतलं नाही- कारण तो तसा नाही हे सगळे जण जाणतात..मी गेल्या आठवड्यातले सगळे पेपर्स वाचले. रविवारचा टाइम्स ऑफ ईंडीया तर सचिन टाइम्संच होता.सचिन बद्दल इतकी माहिती वाचतांना बरं वाटलं.

सगळं काही वाचलं. पण मला एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली ,ती म्हणजे सचिन , अंजली, सारा आणि अर्जुन ह्या चौघांच्या अवती भोवती ती माहिती फिरत होत. कुठेतरी त्याच्या वडिलांबद्दल पण थोंड फार लिहिलेलं होतं… पण त्याचे भाउ बहिण , यांच्या विषयी अजिबात काहीच लिहिलेलं आढळत नाही.

त्याच्या अजित या भावा बद्दल फक्त … अजित ने सचिन मधली क्षमता लहानपणीच ओळखली ,आणि त्याने सचिनला क्रिकेट खेळण्यासाठी प्रोत्साहित केलं -इतकंच वाचायला मिळालं. इतर दुसरा भाउ नितीन आणि बहीण साविता यांच्याबद्दल तर नामोल्लेख पण नाही.

सचिनचे जे लहानपणीचे फोटो प्रसिद्धी माध्यमांना दिलेले आहेत ते फक्त त्याचे एकट्याचेच आहेत. त्याला दोन भाउ आणि एक बहीण पण आहे. लहानपणच्या एकाही फोटो मधे त्याची भावंड दिसत नाहीत असं का असावं??  असा एकही फोटो नसावा की ज्या मधे सचिन सविता नितिन अजीत हे सगळे एकत्र आहेत? नक्कीच असेल.. पण प्रसारमाध्यमांपासून दूर ठेवला असावा.

कुटूंबातला एक जण मोठा झाली तरी पण इतर लोकं जर आहे त्याच परिस्थिती मधे असतील तर त्यांना थोडा फार कॉम्प्लेक्स येणं साहजिकच आहे. सचिन चा एक भाऊ अजित हा क्रिकेट ऍकेडमी चालवतो असं म्हणतात, ही क्रिकेट ऍकेडमी तितकीशी प्रसिद्ध नाही. त्यामुळे त्या बद्दलची फारशी माहिती किंवा बातमी पण कुठे झळकत नाही.अजीत स्वतः एक उत्कृष्ट प्लेअर आहे. विस्डनच्या लिस्ट मधे तो दुसऱ्या क्रमांकावर होता. पण केवळ चांगला खेळाडू असणेच सक्सेस साठी उपयोगाचे नाही, त्याला थोडी नशिबाची पण साथ लागतेच, आणि कदाचित म्हणूनच असेल की तो  तितकासा सक्सेसफुल झाला नाही……..!!!सचिनने क्रिकेटचा बादशहा म्हणून नांव जरी कमावलं असलं, तरीही त्याच्या लोकप्रियतेचा अजितने कधीच उपयोग करुन घेतलेला दिसत नाही.

..  नितीन सध्या कुठल्यातरी बॅंकेत काम करतो. आपल्या मोठेपणा मुळे त्यांचं करिअर पण झाकाळलं जाउ नये , आणि त्यांना त्यांचं आयुष्य़ जगता यावं म्हणून, त्यांना प्रसिध्दी माध्यमांपासून अगदी सुरुवाती पासून  दूरच ठेवण्याचा तेंडुलकर कुटुंबियांना  निर्णय योग्यंच वाटतो. त्याच्या बहिणी बाबत तर कुठेच काहीच माहिती दिलेली नाही. मी नेट वर शोधलं, तर कुठेतरी बस सचिनची बहीण असा उल्लेख आढळला, पण ती सध्या काय करते, कुठे असते हे कांहीच दिलेलं नाही.

या गोष्टीचे दोन पैलु आहेत. एक तर ते सगळे सचिन पासून कदाचित दूर झाले असावेत.. किंवा इतक्या जवळ असावेत की त्यांच्या वैय्यक्तीक स्पेस ची जाणिव असल्यामुळे प्रसिद्धीला नकार देत असावा सचिन. या  बाबतीत मास्टर ब्लास्टर  क्रिकेटचा बादशहा बरोबर त्याच्या  बहीण भावंडांच पण कौतुक करावंसं वाटतं. सचिन मोठा झाला, म्हणून त्याच्या मोठेपणाचा फायदा घेण्याचा कोणीही प्रयत्न करतांना दिसत नाही-म्हणून हे पोस्ट….. असो..

About महेंद्र

माझा ब्लॉग :- http://kayvatelte.com
This entry was posted in खेळ and tagged , , , . Bookmark the permalink.

22 Responses to बादशहा ……

 1. आनंद पत्रे says:

  सचिन आणि भावंडांच्या स्वभावातलं मोठेपण आणि चांगुलपणा त्याच्या कुटुंबाचे संस्कार दाखवतात.
  त्याच्या विरुद्ध असे काही उदाहरण आहेत जिथे प्रसिद्ध व्यक्तीचे कुटुंबीय सुद्धा मिडिया मध्ये पुढे पुढे करतात.

 2. Abhijit says:

  कधी कधी celebrity च्या लोकप्रियतेचा कुटुंबियांना तोटा पण होतो. Don Bradman च्या मुलाने याच लोकप्रियतेला वैतागून स्वत:चे नाव बदलले.

  • सिलिब्रेटीज च्या छायेखाली घरातल्या लोकांना खुप त्रास होतो. सचिनने आपली सावली पडुन त्यांचं आयुष्य झाकाळुन जाउ नये म्हणुन घेतलेली काळजी खरंच वाखाणण्यासारखी आहे.

 3. sonalw says:

  sachin che kaka, jyanchyakade sachin lahanacha motha jhala, te majhya mawshichya society madhech raahtat, shiwaji park la. Sachin itka motha jhala tarihi, pratyek douryachya aadhi tyancha aashirwad ghayyla yeto, gardi taalnyasathi ratri apratri yeto pan nakki yeto. Aani tyache kaka-kaku aajhi tyach sadhepanane raahtat aaplya 1bhk apartmentmadhe. prasiddhi chya walayacha tyanchya natyawar kuthalahi katu parinam jhala nahiye he tyanchya paay jaminiwar asnyachech lakshan aahe.

  • मागच्या आठवड्यात मला रमेश तेंडुलकरांचा फोटो हवा होता म्हणुन नेट वर शोधला, मला तो कुठेच सापडला नाही. मग रजनी तेंडूलकरांचा सर्च केला तर तो पण सापडला नाही. मला मोठं आश्चर्य वाटलं, कारण सचिनचे वडिल नाहीत तर एक साहित्यिक म्हणुन पण ते प्रसिध्द आहेत, तरी पण त्यांचा एकही फोटॊ नसावा??
   मग सहज सचिनच्या सिब्लिंग्ज बद्दल सर्च केला.. पण त्यातही काहीच सापडले नाही. म्हणुन हे पोस्ट ..

 4. laxmi says:

  sachin baddal ek tari post tumhi lihavi hi apeksha hoti aani as usual post khoopach chaan aahe.sachinla bahin aahe he mahit hote pan naav aaj kalale,aani ho sachin che sibilings kon aahet? sachin baddal kitihi lihile tari shabd apure padtil.cricketar mhanun to motha aahech but he is great human being.

  • सचिन बद्दल इतकं लिहिलं गेलंय की नविन काहीच लिहिण्यासारखं नाही. त्याचे दोन भाउ.. एक मोठा आणि एक लहान. मोठा तो अजीत.. आणि नितिन बहुतेक आधी कुठल्यातरी एअरलाइन्स मधे होता, नंतर त्याने कुठली तरी बॅंक जॉइन केली असं वाचलंय कुठेतरी. बहिणीचं नांव सविता… कुठे लग्न झालं, कुठे रहाते.. कांही माहिती नाही. सचिनच्या व्यक्तिमत्वाने त्यांचं आयुष्य झाकाळून जाउ नये म्हणुन केलेला हा त्याग असावा…
   वटवृक्षाच्या छायेत रोपट्यांची निकोप वाढ होऊ शकत नाही, म्हणुन वटवृक्षाने स्वतः दुर रहाणं, किंवा स्वतःच्या फांद्या सावरुन घेणं…. ही गोष्ट इथे पहायला मिळाते.

 5. यालाच मनाचा मोठेपणा असं म्हणतात. वास्तविक पहाता सचिनच्या कौतुक पुरवणीत अजित तेंडूलकरच्या क्रिएकेट अकादमीचा जरासा जरी उल्लेख आला असता तर कित्येकांनी कुतूहल म्हणून का होईना, तिकडे भेट दिली असती. मात्र सचिनचं यश हे त्याने त्याच्या कष्टांच्या बळावर मिळवलेलं यश आहे हे ओळखूनच त्याच्या कुटुंबियांनी त्याच्या यशात आपला वाटा सांगितलेला नाही. काही वर्षांपूर्वी मी सचिनचा त्यांच्या भावांसोबतचा फोटो पाहिला होता. बहुधा लोकसत्ता किंवा सकाळचा दिवाळी अंक. नक्की लक्षात नाही. सचिनपासून त्याची भावंड लांब गेली असावीत असं वाटत नाही. क्रिकेटचा सराव करण्यासाठी वेळेवर पोहोचता यावं म्हणून सचिन काही वर्ष त्याच्या काकूंकडे रहायला होता. त्यांचाही कुठल्याच लेखात उल्लेख नाही.

  • अगदी खरं.. अजितने पण कधिच याचा फायदा करुन घेण्याचा प्रयत्न केला नाही. जेंव्हा कांबळी म्हणाला, की सचिनला अजुन काहीतरी करता आलं असतं, तेंव्हा ते खटकलंच होतं.. अशा लहान लहान गोष्टींच्या मुळेच तो मोठा होत गेलाय.

 6. anukshre says:

  नात्यांचे वेगळे परिमाण वाचायला मिळाले. मस्त लेख.

  • त्याच्या बद्दल इतकं लिहिलं गेलंय की काय लिहावं हा प्रश्नच असतो नेहेमी.प्रतिक्रिये करता आभार..

 7. Girish says:

  MBK, Sachinchi bahin punyat aundhla rahat hoti, atta mahit nahi!!

  • गिरिश
   मला वाटतं ते क्लोझ्डली गार्डेड सिक्रेट असावं.. 🙂 असो.. वुई शुड लर्न टू रिस्पेक्ट द प्रायव्हसी ऑफ द पिपल.. नाही कां??

 8. ajayshripad says:

  Dada, Sachin Tendulkar Royal Aadami hai….! he has no comparison, and his family is great too…!

 9. ravindra says:

  खरच तो बादशहाच आहे , आता तर हा बादशहा डॉक्टर होतोय. त्याचे जितके कौतुक करावे तितके थोडेच आहे.

 10. bhaanasa says:

  वलयांकित परंतु तितकेच जमिनीवर असलेले व्यक्तित्व आहे सचिन. महेंद्र तुला मेल टाकते:)

 11. नमस्कार महेन्द्रजी.. मराठीत क्रिकेटवर लिखाण असलेले ब्लॉग्स शोधत असतानाच आपला ब्लॉग दिसला.. आपण क्रिकेटवर वरचेवर लिहिता का? हे विचारायचे कारण म्हणजे लवकरच झी नेटवर्कतर्फे भारतातील पहिलीवहिली क्रिकेटला वाहिलेली संपूर्णपणे मराठीतील वेबसाइट लॉन्च होणार आहे. त्यात आम्ही द्वारकानाथ संझगिरी, चंन्द्रशेखर संत यांसारख्या तज्ज्ञांनबरोबरच मराठी ब्लॉगर्सचेही लेख प्रसिद्ध करणार आहोत. तर आपणास या उपक्रमात सहभागी व्हायला आवडेल का ? सध्या तुम्ही काही दिवसांपूर्वीच लॉन्च झालेली आमची cricketcountry.com ही इंग्रजीतील साइट पाहू शकता. याच धर्तीवर आपली मराठीतील साइट येत आहे. तरी याबद्दल आपला प्रतिसाद कळवावा.. धन्यवाद..

  अमेय गिरोल्ला
  ९८७००९४६२२
  sanmitra4@gmail.com

  • अभयजी
   प्रतिक्रियेसाठी मनःपुर्वक आभार. खरं सांगायचं तर क्रिकेट वर माझा अभ्यास फारसा नाही, आणि एखाद्या विषयाबद्दल फारशी माहिती नसतांना त्यावर नियमीत चांगले लिहिणं शक्य होणार नाही.सचिन वर मात्र प्रत्येकच भारतीयाप्रमाणे मनापासून प्रेम करतो मी आणि त्याचा एक व्यक्ती म्हणून पण खूप आदर वाटतो, म्हणून हा लेख लिहिला गेला..
   मी स्वतः पण क्रिकेट मॅचेस वगैरे पण फारशा पहात नाही( आवडत नाही असे नाही फक्त वेळेचा प्रॉब्लेम असतो) . त्यामुळे या विषयावरचे माझे ज्ञान पण अपटूडेट नाही, त्यामुळे नियमीत लिहिणे शक्य होणार नाही.

 12. Vishal Dhadge. says:

  khup khup chhan lihale ahe, sachin baddal barech kahi mahit ahe pan ya tyacya etakya javalachya goshta mahit navhatya,
  & tya tumchya mule mahit zalya tyamule khup khup Dhanyawad…………..
  “sachin fakt sachinach ahe”

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s