वर्कोहोलिक …

लहान मुलांच्या जवळ खूप वेळ असतो, एनर्जी असते  पण पैसा नसतो..
तरुणांच्या जवळ पैसा असतो, एनर्जी असते पण वेळ नसते…
म्हाताऱ्यां जवळ खूप वेळ आणि पैसा असतो, नसते ती फक्त एनर्जी….

आता असलेले सगळे रिसोअर्सेस व्यवस्थित वापरुन आपलं आयुष्य जगलं तर सगळे प्रॉब्लेम्स  सुटतात. नाहीतर ……………??

दोन तिन दिवसांच्या पुर्वी एक बातमी वाचली होती. त्यात हों की एसएपी चे भारतातले मॅनेजिंग डायरेक्टर श्री रंजन दास यांचा अनपेक्षित पणे वयाच्या ४२ व्या वर्षी झालेला मृत्यु काय दर्शवतो?? काळ हा नेहेमीच पाठलाग करित असतो.. तुम्हाला सगळी कामं ठरावीक वेळात संपवायची आहेत, काळ पाठलाग करतोय , तरुण वय आहे, वेळ कमी पडतोय….. काय करणार??

रंजन दास ह्यांच्याबद्दल हे पण वाचण्यात आलं, की ह्यांचा स्वतःच्या खाण्यापिण्यावर पण खूपच कंट्रोल होता. कधीच वाजवी पेक्षा जास्त खाणं, किंवा हाय कॅलरी इनटेक न घेणं. दररोजचा व्यायाम, फिरायला जाणे , जिम या मधे कधिच खंड पडु दिला नाही त्यांनी. आणि इतकं असतांना सुध्दा त्यांचा असा आकस्मित मृत्यु व्हावा??

दिवसातले २० तास हा माणुस जागा असायचा. म्हणजे झोप फक्त ४ तास.. आणि प्रत्येक पार्टीमधे, किंवा मित्रांच्या मधे आपल्या कमी झोपेबद्दल गर्वाने सांगायचा. तुम्ही कितीही काम करा , पण शरीराची झिज भरुन येण्यासाठी कमित कमी ६ तास झोप आवश्यक आहे. तेवढी पण झोप तुम्ही घेतली नाही, तर  मग इतर गोष्टीत तुम्ही कितीही रेग्युलराइझ राहिलात तरीही शरीर साथ देणं थांबवु शकतं.

मला वाटतं की  कमा मधे अती जास्त गुंतलेल्यांच्या साठी, आणि प्रकृतीची हेळसांड करणाऱ्या  ( वर्कोहोलिक ) लोकांसाठी श्री रंजन दास यांचा मृत्यु हे उदाहरण आय ओपनर ठरावं..

इश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो..

About महेंद्र

माझा ब्लॉग :- http://kayvatelte.com
This entry was posted in सामाजिक. Bookmark the permalink.

32 Responses to वर्कोहोलिक …

 1. gouri says:

  khare aahe.

  aamachyaa kampanee madhye ya varshi asaach ek sahakari 35 vyaa varshi heart attack ne gela. tathakathit flexi hours, mobility, working from home ya sagalyatoon kaamaacha taan gharaparyant, tumachya mokalyaa velaparyant kadhi pohochato hech samajat nahi.

  • ऑफिस मधलं काम कमी होतं कां.. तर प्रत्येकाच्या पाठिवर लॅपटॉप्स लादले आहेत. ब्लॅक बेरी नावाचं एक लोढणं गळ्यात अडकवुन दिलेलं आहे. बरेच लोकं पहातो, सारखं ब्लॅक बेरीशी खेळत असतात. खरं तर इतकी काही घाई नसते मेल रिप्लाय करायची, प्रत्येक मेल तुम्ही पुन्हा लॉग इन करे पर्यंत थांबू शकतो. पण ब्लॅक बेरीवरुन रिप्लाय केल्याशिवाय रहावत नाही.
   मग असंही बरेचदा होतं की .. एखाद्या वेळेस ब्लॅक बेरीची बीप वाजली नाही तर काहीतरी मिसिंग आहे.. आपला सेल तर बंद नाही नां?? जर सगळं ठिक असेल, तर मग दोन तास झाले एकही मेल कसा काय आला नाही? सगळं ठिक तर असेल नां??
   असे हज्जारो प्रश्न पडतात..
   सेल फोन मुळे तर अगदी रात्री झोपतांना सुध्दा डोक्याशी घेउन सवय असते लोकांना. अगदी झोपतांना पण बंद करित नाहीत लोकं..
   घरी आल्यावर नुकतीच बॅग ठेवावी , तर बॉस चा फोन येतो.. “आत्ताचा आत्ता” अबकड ला मेल पाठव .. असा.. खरंच.. किती अडकलोय आपण या रामरगाड्यात?
   कठिण आहे..

   • SnehaL says:

    सेल फोन मुळे तर अगदी रात्री झोपतांना सुध्दा डोक्याशी घेउन सवय असते लोकांना. अगदी झोपतांना पण बंद करित नाहीत लोकं.. 😦

    खरय .. 😦

 2. तुम्ही खरं सांगितलंत. मनावर ताण असण्याची इतकी सवय झालेली असते की सर्व तुंबलेली काम पूर्ण झाल्यावर काहीतरी चुकल्याचुकल्यासारखं वाटत रहातं. खाजगी आयुष्य, सामाजिक आयुष्य असे कप्पे पाडायचे म्हटलं तरी जिथे या कप्प्यांच्या रेषा पुसट होतात तिथे कामाचा ताण जाणवत रहातो.

  • खरं तर असं वाटायची गरज नाही.. अजिबात गरज नाही.
   तुम्ही तुमचं काम ऑफिसमधे करुन आल्यावर घरी आल्यावर पण पुन्हा ऑफिसच्याच कामाचा विचार करित असता.. कां?? कारण आहे इन्सिक्युरिटी.. अमेरिकन्स ची जीवनशैली आपण निवडली, त्यांचं वर्क कल्चर निवडलं. त्याच्या सोबतंच त्यांचं असुरक्षित रहाणि मान पण आपल्याला आंदण म्हणुन फुकट मिळालं….तुम्ही म्हणता, तसे कप्पे पाडता यायला हवेत… खुप सोपं होईल आयुष्य…

 3. sahajach says:

  खरयं तुमचं, आयुष्य घाईघाईने जगण्यात आपण विसावायला विसरतोय…आपल्याला खुप जगावेसे वाततेय, जगण्याची नवीन पद्धत आकर्षकही आहे पण त्यात आपण थांबायला रमायलाही तयार नाही. एक शिखर गाठले की दुसरे साद घालतेय….अश्यावेळी माझ्याबाबतीत वाटतं आपण थांबून काही चुक केलेली नाही. कोणितरी थांबायलाही हवयं. खरं सांगते कधी कधी या धावणाऱ्यांची स्पर्धा अलिप्तपणे पहाताना आत मनात काहितरी खुप सुखावते. शांत निवांत वाटते.अर्थात हे माझे मतं!!! घराकडे परतणे हा नाईलाज नसून ती ओढ वाटावी….बाबा घरी आल्यावर त्याच्यासाठीचा गरम चहा तयार असणे, मुलांनी धावत त्याच्याकडे झेपावणे, त्याचवेळी खिडकीत उभी राहून वाट पहाणाऱ्या बायकोकडे त्याने सुखावून पहाणे या मागासलेल्या कल्पना खरं तर जगण्याचे टॉनिक असतात….
  पुन्हा एक मोठा आवाका असणारा विषय निवडलात…..

  • मान्य करावच लागेल की जग बदलतंय.. 🙂 घराची ओढ वाटावी.. हे अगदी मान्य…
   घरी आलं की टिव्ही समोर बसुन हातात ब्लॅक बेरी घेउन आपण कुठला संवाद साधतो आपल्या फॅमिली मेंबर्सशी?? मुलांना टीव्ही बघायचा असतो, बायको स्वयंपाकात असते, मग तुम्ही पण आपला लॅप टॉप उघडुन बसता काहीतरी करित……
   सगळ्यात आयडियल दृष्य़ आहे तुम्ही लिहिलेलं.. “बाबा घरी आल्यावर त्याच्यासाठीचा गरम चहा तयार असणे, मुलांनी धावत त्याच्याकडे झेपावणे, त्याचवेळी खिडकीत उभी राहून वाट पहाणाऱ्या बायकोकडे त्याने सुखावून पहाणे या मागासलेल्या कल्पना खरं तर जगण्याचे टॉनिक असतात…”असंच असावं हे प्रत्येकालाच वाट्तं..

 4. sonalw says:

  punha punha toch wishay, aswasth karnaaraa. kharach ha wisay rahun rahun chhalato. aani ekhadi goli ghewun instant dokedukhi thambawi tase warwarche upaay kele jaatat lokankadun ‘stress’ manage karnyasaathi. aatun aatun fulaayla ithe wel konakade aahe. ‘sukh’ aani ‘aanand’ yat kiti gallat kartaat manas!
  yach lifestyle war mage ek post takal hot. http://sonalwaikul.wordpress.com/2009/05/06/%e0%a4%a7%e0%a4%be%e0%a4%a6%e0%a4%98%e0%a4%be%e0%a4%97-%e0%a4%ae%e0%a5%81%e0%a4%82%e0%a4%ac%e0%a4%88/

  mahendrajinni pratikriya pan dili hoti. te aathawal punha.
  punha ekda wichar karaayla laawnaar post!

  • ४२ म्हणजे फार लवकर झालं.. ते वाचलं आणि थोडा अडखळलो त्या बातमीवर.. पहिले काम म्हणजे ब्लॅकबेरी सोडुन द्या.. थोडं तरी लाइफ सुसह्य होईल.. नंतर लॅप्टॉप रात्री लाउ नका.. आणि भरपुर झोपा… बस्स..

 5. Rajeev says:

  अमेरीकन सीस्टीम मधे दरेक कामाला
  “war basis”
  “war footing”
  “whatever it may ”
  अश्या गोड कोटींग च्या शब्दात घोळवले जाते..
  नैसर्गीक वेळापत्रक मोडून लढायच…( दूसर्या साठी)
  कर्पोरेट ओफ़ीसर म्हणवून मीरवायच
  गळ्यातला पटट्टा मीरवायचा( नोकर/ गुलाम आहोत हेही वीसरायच)
  आणी मग अस काही झाल की रडायचं..

  तूम्हाला मेळघाट, ओरीसा ईथल्या अकाली मरणारी बालके माहीती आहेत ?
  ते का मरतात , ते मोठ्या शहरातरा हून सोईसकर रीत्या वीसरायच…..
  वीदर्भ मराठवाड्याच्या नावाने नाके मुरडायची……
  नीसर्ग नासवायचा…..
  फ़क्त मुम्बई ,पुणे, न्युयोर्क , पारी, ईथले कार्पोरेट बद्द्ल दू:ख का ?
  कारण ते जात्यातले आणी आपण सुपातले…..सम दू:खी भित्रे…xxफ़ाटू..
  जाउद्या…

  • राजीव
   “नैसर्गिक वेळापत्रक मोडुन” हे वाक्य इथे काम करणाऱ्या कॉल सेंटर, बिपीऒ साठी वापरले आहेस कां?? ते बाकी खरं आहे.. इथे आपण त्यांच्या दिवसाला काम करतो, आणि आपल्या कामाच्य वेळेस झोपतो. निसर्गाच्या विरुध्दच वागणं आहे हे..याचे परिणाम, दुष्परिणाम हे कधी ना कधी तरी या पिढीला भोगावेच लागतिल.
   आजच्या लेखाचा रेफरन्स आहे आजच्या दिवसातला एक मॉडेल एक्झिक्युटिव्ह..आणि केवळ तोच मुद्दा कव्हर केलाय..

 6. Rajeev says:

  कसला आलाय मनावरचा ताण ?
  पैसा कमावयचा असलाकी मग अशीच घाण..
  हातात लेपटॉप, कानापाशी ब्लेक बेरी,
  भला मोठा पगार तेवढीच मोठी ढेरी,
  बोलतांना हल्लो हाय…
  जातांना बाय
  अरे स्व:ता साठी वेळ नसलेल्यांच
  देव तरी करील काय ?

  • लै खास बापु.. तुमाले बरं हाय, सोताचा मोट्टा धंदा हाय,चार चार कार हायेत, पन आमच्यावानी लोकाइनी काय करावं बापु?? ब्लॅक बेरिले डोक्यासी घेउन झोपायचं.. बस..अन असच कधी तरी संपायचं.

  • Salil says:

   Very Nice
   And true

   Salil

 7. Salil says:

  Kaka mi fakt 5 tas zopto ani mitrana mazya kami zopebaddal badhaaya saangat raahto. Lekh vachun bhiti vatu laagli.

  Salil

  • सलिल डॉक्टर्सच्या एका पॅनल चं मत आहे हे. त्याच्या मृत्यु नंतर त्याची लाइफस्टाइल पहाता फक्त अपुरी झोप हे एकच कारण शेवटी सापडलं . मला वाटतं कमित कमी ७-८तास तरी झोप असावी. माझी पण झोप फार कमी आहे. रोज सकाळी ४-३० ला जाग येतेच.. मग रात्री कधिही झोपलं तरीही.
   आय आय एम मधे दोन महिने कंडेन्स्ड कोर्स च्या वेळी आधी हेच सांगितलं जातं की एक्झिक्युटीव्ह्ज ला ४ तास झोप पुरे… आणि ते ट्रेंनिंग शेडूल पण तसंच डिझाइन केलं असतं. असो.. काळजी घ्या आतापासुनच…

 8. ravindra says:

  वर्कोहोलिक!!! खरच आज मनुष्य किती व्यस्त झाला आहे. तुम्ही आम्ही सर्व घरच्या, दारच्या, मित्रांच्या, कामाच्या, पैसे कमविण्याच्या व जमविण्याच्या अश्या किती तरी जवाबदाऱ्या सतत पार पाडत असतो.व आपले आयुष्य झिजवत असतो. नंतर कळते आपण जगलोच कोठे. तेव्हा वेळ निघून गेलेली असते. मला वाटते माणसाने अति महत्वाकांक्षी राहू नये. पैस्याचा मोह आवरावा. देवाने जीवन दिले आहे ते मजेत जगुन घ्यावे. मला काही लोकांचे आश्चर्य होते. संपत्ती गलेलठ्ठ, राहणार मात्र फाटके. असो, ईश्वर बिचाऱ्या त्या मृतात्म्यास शांती देवो.

 9. bhaanasa says:

  महेंद्र डॊ.मांडकेंच्या भाषेत ’विडो मेकर” अटॆक हा. झोप ही फार महत्वाची आहेच. पण आजकाल रोजच तिच्याशी तडजोड चालते. वाईट वाटले रे वाचून….आता इतकी मेहनत केली पण उपभोगले नाही अन जीवही गेला. 😦 आणि जेव्हां हे लॆपटॊप, ब्लॆकबेरी नव्हते तेव्हां काय काम होत नव्हती का? पण जीवघेणी स्पर्धा अन २४ तासांची बांधिलकी याने कब्जा घेतला अन जीवन जगणे संपले. आता नुसती फरफट-दमछाक. झेपले नाही तर धावत राहायचे अन मग असे अकाली संपून जायचे.

  • विडो मेकर अटॅक….
   हं.. बरोबर आहे. ही स्पर्धाच माणसातला माणुस पण संपवणार आणि माणसाला पण संपवणार.. ब्लॅक बेरी कोणी घेत नाही म्हणुन कंपनी स्वतः विकत घेउन गळ्यात अडकवते. तो गुलामगिरीचा बिल्ला मग कायम खिशात घेउन अभिमानाने फिरायचे… आणि मग रात्री १० वाजता पण फोन येणार.. हे सांगायला की आत्ताच इ मेल केला म्हणुन .. !!! काय लाइफ आहे हे? आणि अशा आयुष्याचा आपण अभिमान बाळगतो..

 10. Heramb Oak says:

  खरच भयानक. कधी नव्हे ते पहिल्यांदा मला (पूर्वी लजिरवान्या वाटणार्या ) माझ्या ८ तास झोपूनही झोप न पुरण्याच्या सवयीचा अभिमान वाटतोय.

 11. Rajeev says:

  HERAMB…… you are my real brother of preveous birth !!!!!!!!!!

  sleep…
  or
  weep….

 12. मी ही शिफ्ट्स मध्येच काम करतो,जास्त लोड नसतो पण निसर्गाच्या विरोधात जाउनच काम कराव लागत पण काय करणार कोणाला ना कोणाला तरी करावाच लागणार ना हे….अवेळी का होईना झोप पूर्ण करतो …चालायचच

  • काही गोष्टी अपरिहार्य असतात.. त्यांना सांभाळुनच काम कराव लागतं. मी पण प्रॉडक्शनला असतांना शिफ्ट करायचो.. पण तेंव्हा तरुण होतो.. मॅनेज व्हायचं..

 13. Aparna says:

  हा विषय खरंच आमच्या पिढीने खूप गांभिर्याने घेतला पाहिजे…मला पण खूप वाईट अनुभव आलाही आहे….प्रत्येक प्रोजेक्ट संपताना टीममधले दोन-तीन तरी हॉस्पिटलाईज्ड..ही काही दिमाखाने मिरवण्याची गोष्ट नाहीये…
  लग्न झाल्यावर बोटात अंगठी घालावी तसे आय.टी.त जॉब मिळाला की ऍसिडीटी आणि त्याची अल्सर इ. भावंड आपसूक मागे लागणं हे काय सांगतंय…यावर काही उपाय ???आय.टी. मधले वेठबिगार असंच मला माझ्या मुंबईतल्या कामाबद्द्ल वाटायचं…इथे त्यामानाने इतकं काम एके काम लोकं करत नाहीत..काही काही डेडलाईनपुरता ठिक आहे…पण हे नेहमीचं आहे….
  तरी सध्या पाहातेय आजकाल इथेही सिसेशनमुळे दोन-तीन माणसांचं काम एकावर टाकणं प्रकार चालु झालेत आणि अगदी कालच मी नवर्याला याबद्दल सांगत होते कारण त्याचं रुटिन सध्या असंच दिसतंय आणि नेमकी ही पोस्ट ..त्यामुळे जरा जास्तच जाणवलं…
  आणि एसएपी मधलं म्हटलं की जरा जास्त जवळचं…पण बेचाळीस म्हणजे खरंच सर्वांसाठी धोक्याची घंटा आहे…

  • हे आजचं पोस्ट पण केवळ या प्रकरणाचं गांभिर्य लक्षात यावं म्हणुन.. फक्त काळजी घेणं आपल्या हातात आहे.

 14. anukshre says:

  हे घरी आले की, प्रथम रामरक्षा नेमाने म्हणतो, आपल्या पोस्ट, पेपर, बातम्या बघतात. तोपर्यंत मुलगा अभ्यास करतो.माझा स्वयपाक होतो.७.30 वाजता आम्ही जेवतो. नंतर थोड्यावेळ एकमेकांशी दिवसभरच्या गप्पा, साधारणपणे ८.३० ला हेल्थ क्लबला जातो.ह्यांचे फोन चालूच असतात पण
  आम्ही एकत्र असल्यामुळे ताण जाणवत नाही. परत एक तासात येतो. हातात स्टोरी बुक किंवा छानशी गाणी लावतो. १०.३० ला घर गुडूप झोपते. मी घरचा ताण एकत्र राहिल्यामुळे,व प्लान केल्यामुळे कमी करू शकले. आपल्या घरच्या सदस्यांचे रुटीन कदाचित वेगळे असू शकते तेंव्हा आपण स्वतः करता काही मध्यम मार्ग निवडलात तर घरी काम असूनही बराचसा ताण कमी करू शकता.
  माझा समुपदेशन अनुभव आहे म्हणून आपल्याबरोबर शेअर केले. कोणीही मला विचारले तर मी प्लान करण्याचे काही सोपे उपाय सांगेन.ज्ञान व अनुभव जितके एकमेकांना देवू तेव्हढे ते समृद्ध होते.

  • माझं स्पष्ट मत आहे की घरी आल्यावर तो ब्लॅक बेरी अन लॅप टॉप बंदच ठेवावा. घरी तुम्ही जो दिनक्रम सांगताय तो आय टी त नसलेल्यांसाठी चांगला आहे. पण हे आयटी मधे काम करणारे घरी पण कामंच करतात.. मी पाहिलंय….. दुसरी गोष्ट म्हणजे झोप पुर्ण होण महत्वाचे असते..

 15. swapna says:

  bar zala ha lekh lihila… me kevach tharvlay ki me ek lecturer honar.. ugach dusaryachya companichi bharbharat vhavi mhanun me dead lines palat ek divas dead honar nahi.. tya peksha khup suttya gheun travelling karen… pora- balana motha hotana baghen.. (maza vay tasa fakt 22 aahe atta..!!) …shaletun ghari aalyvar aai gharat asli tar kai vatat he mala vichara, me aajhi aai chya shalela sutti asli tar khup khush aste.. paisa kai..milanarch aahe.. thoda kami milala tari baki 1000 goshti aahet jya amulya aahet.. tya karnar..

Leave a Reply to महेंद्र Cancel reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s