गुगल वेव्ह

इंटरनेट सुरु झालं, आणि पहिल्यांदा जेंव्हा चॅटींग सुरु केलं, तेंव्हा खुप आश्चर्य वाटलं होतं.  याहु मेसेंजर वरुन  माझ्या एका भावाशी यु एस मधे चॅट केलं होतं. त्याने टाइप केलेलं इतक्या लवकर इथे कसं दिसतं? म्हणून आश्चर्यचकित पण झालो होतो. नेहेमी टेलेक्स वर काम करणारे आम्ही, पण अगदी पहिल्यांदा फॅक्स पाहिला होता, तेंव्हाच जे चकित  झाल्याचं फिलिंग होतं , तसं पुन्हा काही अनुभवायला मिळालं नाही. खरं तर त्या नंतर खूप शोध लागले. नेट फास्ट झाली, कॉम्प्युटर टु फोन डायलिंग सुरु झालं.. व्हाइस चॅट, आणि आता तर गुगल मधे व्हिडीओ चॅट सुरु झालेली आहे..

जर ब्रॉड बॅंड असेल तर गुगल कॅम वर व्हिडीओ चॅट चांगली करता येते. आवाज वगैरे अजिबात क्रॅक होत नाही.

Google Wave

आता गेल्या कांही दिवसांपासून चर्चा ऐकू येते आहे ती गुगल वेव्ह ची. ट्विटरवर सारख कोणीतरी अनाउन्स करित् असतं की आज गुगल वेव्ह चं इन्व्हाईट मिळालं. मला कधी वाटलं नव्हतं की आपल्याला पण वेव्ह हवंय म्हणून…

पण!!! हा पण खूप महत्वाचा, एखादी लहानशी गोष्ट कसं आपलं मनःस्वास्थ बिघडवू शकते- त्याचं हे उदाहरण… आज सकाळी एक सुंदर कार्टून पाहिलं.. ते पाहिलं, आणि माझं या वेव्ह बद्दलची उत्सुकता चाळवली गेली.

त्या कार्टून वरुन असं वाटतंय की ही सर्व्हिस खुप छान आहे, पण अजूनही पुरेसे वापरणारे नसल्याने त्या वेव्ह वर राईड होता येत नाहीये लोकांना. आणि या कार्टूननेच मला इन्स्टीगेट केलय वेव्ह वापरण्यासाठी.

आता एक साधी गोष्ट आहे, तुमच्या कडे सेल फोन आहे, तुम्ही लोकांना कॉल करण्यासाठी त्यांच्याकडे पण फोन असायला हवा ना?? आणि नेमका तोच नसल्याने तुमचा सेल फोन फक्त एक प्राइड पझेशन होऊन राहिलाय.. ज्या लोकांना इनव्हाईट  मिळालं, त्यांनी पण लॉग इन करुन अकाउंट क्रिएट केला , पण वापरणं सुरु केलेलं नाही अजुन तरी. कारण हे वापरायला, तुमच्या मित्रांकडे पण वेव्ह असायला पाहिजे..

या सॉफ्टवेअरवर कांही कॉमेंट करतांना , गुगल चं हे सॉफ्टवेअर अर्जुनही बिटा फेज मधे आहे , हे विसरुन चालणार नाही.  गुगल मेल पण सुरुवातीला बरेच दिवस बिटा व्हर्शन मधे होतं. आणि अकाउंट पण फक्त इन्व्हाटिजनाच उघडता यायचा.

ट्विटरवर एक ट्विट दिलं, की मला इन्व्हाइट हवंय – वेव्ह चं.. आणि ताबडतोब प्रभास गुप्ते ने  इन्व्हाईट दिलं. अगदी पाचच मिनिटात गुगल बाबाने मला पण अक्षता दिल्या… ये रे बाबा , आणि आमचं हे प्रॉडक्ट ट्राय कर. गुगलने हे सॉफ्ट वेअर ओपन एंड ठेवलेले आहे असे समजते…. ( म्हणजे नेमकं काय? कोणीही यात सुधारणा करू शकेल, चेंज करू शकेल असे??)

ही वेव्ह म्हणजे नेमकं काय ? हे पण मला माहिती नाही. पण एकदा लॉग इन केल्यावर तिथे एक व्हिडीओ आहे , अगदी बेसिक माहिती देणारा. त्यावरुन एवढं तरी लक्षात आलंय की ही रिअल टाइम मेसेजिंग सर्व्हिस आहे. म्हणजे मी इथे जर एक वेव्ह ( थोडक्यात चॅट विंडॊ) तयार केली, आणि त्यात एखाद्या मित्राला बोलावले, तर मी इथे जे काही टाइप करेल ते ताबडतोब त्याच्या पण स्क्रिन वर टाइप होईल.

पूर्वीच्या मेसेंजर मधे आणि ह्या गुगल वेव्ह मधे काय फरक आहे??  पुर्वी तुम्ही जर एखादं वाक्य टाइप करित असाल, आणि तुम्हाला वाटलं, की हे वाक्य योग्य नाही, तर तुम्ही ते सरळ डिलिट करु शकत होता. आणि ते तुम्ही ज्याच्याबरोबर चॅट करताय , त्याच्या विंडो वर तुम्ही  सेंड केल्याशिवाय दिसायची नाही…… पण……..आता काय होईल????? गुगल वेव्ह मधे तुम्ही टाइप करणं सुरु केलं की ते सगळ्या तुमच्या वेव्ह  कॉंटॅक्ट विंडोज मधे टाइप होईल, सेंड वगैरे करायची गरज नाही. म्हणजे जे काही टाइप करायचं ते अगदी सांभाळून टाइप करायचं.

बरं तुमच्या  ट्विटर प्रमाणेच इथे पण तुम्ही आपला  गृप बनवून त्त्या सगळ्या ग्रृप ला ट्विट्स प्रमाणेच मेसेज करु शकता. ट् हे फक्त प्रायव्हेट स्वरुपाचे असेल.  ट्विटर मधले ट्विट्स कोणीही पाहु शकतो, पण इथले मेसेजेस पर्सनल रहातील.. ज्यांना ते असान्ड केले आहेत त्यांनाच दिसतील, आणि त्यांनाच या मधे पार्टी्सिपेट  करता येइल.

व्हिडीओ, फोटो शेअरिंग अगदी सोप्पं झालंय या गुगल वेव्ह मुळे. इथे तुम्ही सरळ ड्रॅग ऍंड ड्रॉप करुन फोटो व्हिडिओ शेअर करु शकता. तुमचं ट्विटरचं अपडेट इथून करता येइल असं म्हणतात. अजुन बरंच काही आहे की जे मला माहिती नाही.

जेवढं काही पाहिलं आहे त्यावरून तरी लक्षात येतंय की उद्याच्या इंटरनेटची मुहुर्तमेढ आहे ही. उद्याचं नेट कसं असेल.. ते इथे आल्यावर समजतं. अजुन बरंच काही आहे  गुगलच्या या वेव्ह नावाच्या खजिन्यामधे, शोधतोय.. !! 🙂

ह्या पोस्टचा उद्देश ,  जर तुम्ही गुगल वेव्ह वापरलं असेल  किंवा वापरत असाल तर तुमचं या प्रॉडक्ट बद्दल चं मत  काय आहे??  आणि  मला या बद्दल अजुन माहिती हवी आहे. जर तुम्हाला काही माहिती असेल तर कृपया इथे कॉमेंट्स  मधे ……………………………..???

About महेंद्र

माझा ब्लॉग :- http://kayvatelte.com
This entry was posted in कम्प्युटर रिलेटेड and tagged , . Bookmark the permalink.

30 Responses to गुगल वेव्ह

 1. आनंद पत्रे says:

  मी वेव्ह अजून वापरला नाही पण इच्छा जरूर आहे. वेव्हसाठी रिक्वेस्ट तर टाकलीये, बघू कधी रिस्पोन्स येतो तो…

  • मला तर ताबडतोब आलं इन्व्हाईट. रिक्वेस्ट टाकल्यानंतर पाच मिनिटात.. पुन्हा एकदा टाकुन पहा..

 2. Aparna says:

  मी इतके दिवस वाचत होते याबद्द्ल पण माहिती काढणं झालं नाही. या लेखामुळे निदान मला ती तरी कळली..आता पाहुया कधी मुहुर्त सुटतो ते..मागच्या वेळी gmail लवकर वापरायला सुरुवात केली होती कारण प्रोजेक्टमध्ये एक सहकारी होता त्याची बायकोच गुगल मध्ये काम करायची…त्याला पिंगुन पाहिलं पाहिजे….

  • मी पण अजुनही चाचपडतो आहे .. उगिच इकडे तिकडे पिंगुन पाहिलं, पण कुठल्या मित्राकडे आहे तेच माहिती नाही. 😦 समजेल हळु हळू..

 3. Sagar says:

  Sir Post mule navin mahiti milalai..Mi hostel var rahto jithe 500 jan ip thru connect aahet….he nemak kai prakarn aahe pahu….an gtalk peksha jar changle asel tar mag barch zal….

 4. अरे वा.. माझ पण google wave च account आहे. पण ते कस आणि कशासाठी वापरायचं तेच माहित नव्हत 🙂 ..

 5. सचिन says:

  नमस्कार,
  मी सुद्धा बराच प्रयत्न करतो आहे, वेव्हचे खाते मिळवायचा.
  मला इन्व्हाईट कराल का?

 6. Bhujang Patil says:

  गुगल वेव्ह चा एक मोठा फायदा :
  कॉर्पोरेट सेक्टर मधील बहुतेक इन-हाऊस कम्युनिकेशन ( आता पर्यंत ) ई-मेल द्वारे होते.
  म्हणजे प्रत्येक संबंधिताच्या इन-बॉक्स मध्ये एकेका ट्रेलच्या डझनावारी इ-मेल असतात.
  माझी कंपनी तर वर्षा अखेर प्रत्येक इ-मेल आणि Attachments “आर्काइव्ह” मध्ये टाकायला लावते.
  गुगल वेव्ह मुळे हा सगळा त्रास संपणार आहे.

  There will be only *one* instance of a given communication trail, not on your desktop, but on the server.

  Being open-ended, you can host it in your company server to keep it secure and private, and do any modifications to it according to your needs.

  http://mashable.com/2009/11/02/google-wave-federation/

  Other features:
  1. You can translate any message to any major language.
  2. Within any wave, you can post messages to selective members only.
  3. You can play/rewind/pause the wave history just like VCR controls.

  • धन्यवाद.. खुप माहिती दिली.आमच्या कडे तर सर्व्हरवरुन सगळे मेल्स आउटलुक मधे डाउनलोड करुन घ्यायला लावतात. त्यामुळे प्रत्येकाच्या हार्डडिस्क वर कमित कमी ३-४ जीबी तरी इ मेल चा डाटा असतोच. गुगल मॅप्स, आणि ट्विटर प्रमाणे सिलेक्टिव्ह मित्रांच्या बरोबर इव्हेंट फॉर्म करता येतात.. मग समजा एखाद गेटटुगेदर अरेंज करायचं असेल, तर येस -नो गॅजेट्स पण आहेत … खुप काही आहे, अजुन तरी शिकतोय…

 7. महेंद्रजी, तुम्ही आणि भुजंग पाटील यांनी खुपच उपयुक्त माहिती दिली. मी सुद्धा गुगल वेव्हच्या सदस्यत्वासाठी विनंती केली आहे पण अजून काही कळलेले नाही.

  • एक्झिस्टींग युझरला तो ऑप्शन देतात, इन्व्हाईट्स द्यायचा. मला अजुन मिळालेला नाही.. असं सांगितलं जातं की १०-१५ दिवसानंतर देतात तो ऑप्शन. ट्विटरला ट्विट करा.. कोणाकडे असेल तर तुम्हाला देतिल इन्व्हाईट..

 8. ठीक आहे ट्विट करते. धन्यवाद!

 9. akhiljoshi says:

  mahendraji tumhi tar bujurga ahat internet var.
  state Tracker ani tastam bakiche widgets side bar var kase takayache/ mala krupaya mahit nahi…….
  kalavalet tar abhari rahin…please………. vaat pahatoy…

  http://www.akhiljoshi.wordpress.com

 10. akhiljoshi says:

  mhanje wordpress chya baheril site che widgets kase side bar var distil ase add karayache/ mi apala abhari rahin

 11. Abhijit says:

  Welcome to google wave.

  Have a look at this to understand google wave features

  http://mashable.com/2009/05/28/google-wave-guide/

 12. Looks exiting. Looking for invitation to join…

 13. सचिन उथळे says:

  Add me too.Today i also got googlewave invitation.It have lots of feature’s.
  Lets try….

 14. akhiljoshi says:

  hi mahendrachi
  tuhi mazya query che uttar dilet tar bare hoiiiiiiil.

 15. akhiljoshi says:

  pan maps vagaire kiva polls apan karu shakato na……. side bar var?

 16. गुगल वेव्ह चं अजून एक वैशिष्ठ म्हणजे …
  “Drag & Drop” म्हणजे कोणतीही इमेज (विडीवो सुद्धा)उपलोड न करता फक्त उचलून तुम्ही मेसेज मध्ये टाकू शकता.
  पण त्या साठी तुम्हाला google gears (gears.google.com) install कराव लागेल .

  हे फिचर नक्की युज करा…

  • स्वप्निल
   गुगल गिअर्स इन्स्टॉल करावे नाही लागले यासाठी. ड्रॅग ऍंड ड्रॉप खरंच चांगलं ऑप्शन आहे. फाइल्स पण शेअर करता येतात. म्हणजे फोरशेअर्ड डॉट कॉम सारख्या साईट्स वापरायची गरज नाही राहिलेली आता..

Leave a Reply to महेंद्र Cancel reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s