डी डे मायनस वन…

आज २५ तारीख. उद्या  जायचंय मुंबईला . गेले कित्येक दिवस वाट पहात होतो.. याच क्षणीच… मुंबईला जायचं… स्वप्न नगरी.. माया नगरी.. शाहरुख खानचं गांव. अगदी लहानपणापासून या मायानगरीचं अट्रॅक्शन होतं, आणि आयुष्यात एकदा तरी इथे येउन अमिताभ बच्चन चं घर पहायचं होतं.. सलमान खान तर म्हणे गॅलॅक्सी अपार्टमेंट च्या बाल्कनीत येउन हात पण दाखवतो म्हणे. किती दिवसांपासूनची इच्छा आज पुर्ण होणार होती.  किती नशिबवान आहेत ना इथे रहाणारे?

आता आमची वेळ आहे. समुद्राचा खारा वारा झोंबत होता. बोटीमधे ते इतर ९ जण बसले होते. प्रत्येकच जण अगदी रिलॅक्स्ड दिसत होता. कुठलीही भिती नव्हती दिसत एकाच्याही चेहेऱ्यावर.पायाशी सॅक्स पडल्या होत्या. बंदुका , ग्रेनेड लॉंचर्स सगळं इतस्ततः पडलं होतं.. सुर्यास्त होत होता- अरबी समुद्रात सुर्य़ बुडत होता…. डुबता सुरज — लाल रंग पसरला होता सगळ्या पाण्यावर .. त्या लाल रंगाकडे बघून  या  बोटी मधे  बोटीच्या ओरिजिनल मासेमार खलाशांच्या रक्ताच्या डागांकडे लक्षं जात होतं, आणि सारखे ते  चाकुने हलाल करतांना विव्हळणारे मासेमार खलाशी सारखे डोळ्यासमोर येत होते.त्यांना कापल्यावर त्यांचं रक्त समुद्रातल्या पाण्यात मिसळलं तेंव्हा पण ते असंच लाल दिसत होतं.. त्या काफिर लोकांच्या  डोळ्यातले ते भाव अजिबात विसरल्या जाउ शकत नव्हते.

या बोटीवर आता १३ लोकं होते. १२ लोकं तर आधीच उतरले होते गुजरातमधे. सगळी उजळणी झालेली होती. गेले कित्तेक दिवस प्रत्येक जागेचा व्हिडीओ हजारो वेळा दाखवला होता. काय आणि कसं करायचं ह्याची शेकडो वेळा उजळणी झालेली होती. ते ट्रेनिंगचे दिवस आठवले . अगदी नुकत्याच जन्मलेल्या कोकराचे मुंडके तलवारीने उडवायची दिलेली ऑर्डर आणि तेंव्हा कापणारे हात… अरे काय केलाय त्या नुकत्याच जन्मलेल्या कोकराने??  काय घोडं मारलंय म्हणून त्याला मारायचं?? तेंव्हा तो मौलवी म्हणाला होता.. की त्यांनी आज , इथे, जन्म घेतला, हेच त्यांचं दुर्भाग्य…. तुमचं मन दगडाचं करा.. आणि मारा त्या कोकराला…. दहा पैकी ९ जणांनी तर सरळ उडवलं मुंडकं.. पण माझे हात मात्र थर थर कापत होते..मुल्ला म्हणाला.. तुम्हारा दिल कच्चा है, पण म्हंटलं, मै कसाब हुं.. खानदानी कसाब… आणि उडवलं मुंडकं त्या नवजात कोकराचं.. थोडं वाईट जरुर वाटलं, पण धरम के लिये कुछ भी कर सकता हू मै………..!!!

असंही वाटलं होतं, की कदाचित या ऑपरेशन मधून आपलं नाव काढलं जाईल म्हणून. पण नंतर इतर टेस्ट मधे अगदी अव्वल नंबर मिळाले म्हणून नांव राहिलं या यादी मधे. मजहब साठी कुर्बान झालेल्यांना जन्नत नसिब होते.. आणि ७४ कुमारी कन्या सेवेसाठी मिळतात.

त्या मौलवीनं सांगितलं ते काही खोटं नसेल.. कशाला खोटं बोलेल तो? इथे पण नाही का, हजारो तालिबानी शहीद होताहेत आपल्या कौ़म साठी. आपल्याला तर एक चांगला चान्स मिळालाय.. देशासाठी कुर्बान व्हायचा.. नाहितर काय, आपल्या काहिच तर येत नाही.. बकरे कापण्याशिवाय.तेवढं काम बाकी व्यवस्थित येतं.मुल्ला म्हणे, बस्स, उतनाही आना चाहिये.. तुम्हे कराटे सिखायेंगे.. बंदुक मिलेंगी.. और बम भी फोडनेकू मिलेंगे.. करना वही है.. बकरे  मारना है.. लेकीन यहां बकरे मतलब.. हिंदुस्थानी …. !!!! जेहाद!!!!!!!

त्या ट्रेनिंग कॅम्प मधे आयएस़आय चे पण काही कमांडर्स होते. त्यांनीच तर शिकवलं, की एके कशी वापरायची, डिटोनेटर्स कसे वापरायचे, आणि इतर बऱ्याच गोष्टी.. त्यांच्यामुळेच तर हे सॅटलाइट फोन्स वगैरे पहायला मिळाले. ट्रेनिंग पण खुप सख्त होतं. दरओज १०-१५ मैल हातात बंदुक घेउन आणि पाठिवर ८० किलोची सॅक लाउन धावायचं, मग स्विमिंग… नंतर कराटे, नंतर जिम, आणि अजुन किती सांगु???  वर्षभर ट्रेनिंग सुरु होतं . या ट्रेनिंग नंतर हात इतके सख्त झाले होते की जर पत्थर वर हाथ पडला तर त्याचे पण तुकडे  होतील..

इतकं सख्त ट्रेनिंग जर पाक  आर्मिला दिलं गेलं असतं तर काय बिशाद आहे हिंदुस्थानने युध्द  जिंकायची?या उलट पाकिस्तान मधेच काश्मिर ऍड झाला असता.. कदाचित आपल्या देशाचे दोन तुकडे झाले नसते. पण आपल्या सैन्याच्या जनरललाच जर सत्ता पाहिजे, आणि सगळ्यांवर अंकुश ठेवायचा असेल, तर इतकी ट्रेंड मिल्ट्री कधिही ऊठाव करु शकते.. म्हणुन तर मिल्ट्रीला पण पुरेसं ट्रेनिंग दिलं नसेल- त्यांना दुर ठेवलं या अशा एक्स्टेन्सिव्ह ट्रेनिंग पासुन? म्हणुनच तर बांगला देश हारले..  कारगिलला हरले .. अजुन किती वेळा हरणार आहेत ते कोणास ठाऊक…

आठवत होतं.. घरुन निघतांना पाहिलं की  एक हिरवी चादर घेउन काही लोकं मार्केट मधे फिरत  होते.. त्या पसरलेल्या चादरित काही रुपये पडले होते. मागे काही लोकं आझाद काश्मिर चा बोर्ड घेउन जात होते. जेहाद के लिये पैसा दो. .. अपने काश्मिरी भाईयोंके लिये पैसा दो.अशा घोषणा सुरु होत्या.लोकं आपले पाकिटं उघडुन जे काही हाताला येइल ते टाकत होते त्या चादरीवर.हा पैसा कुठे जातो हे विचारायची कोणाचीच हिम्मत नाही या देशात.. हे तर अगदी लहानपणापासुनच दिसतंय.. करोडॊ रुपये गोळाकेले असतिल काश्मिरचया नावाखाली .दर जुम्मे रातला काझी पण मस्झिद मधे अनाउन्स करतो. पैसा दो म्हणुन….देश के लिये .. इस्लाम के लिए.. इस्लाम  खतरेमे है…..जेहाद के लिये….

जेंव्हा या मिशनला निघायचं, तर  त्या उस्तादजी ( ट्रेनिंग देणारा) कडुन एकदा परमिशन घेतली होती की गावाकडे जाउन अम्मी अब्बुजान ला भेटून येतो म्हणुन.. कारण एकदा गेलं की परत यायची खात्री नव्हती. तसं आम्हाला अजुनही काय मिशन आहे ते सांगितलं नव्हतं उस्तादजींनी..

त्यांना भेटलॊ, सांगितलं जेहाद मे जा रहा हूं..पण त्यांना खोटं वाटलं.. आपल्या या अनपढ जाहिल  मुलाला  कोण नेइल जेहादला? गावात सगळ्यां लहान मुलांना पण सांगितलं की मै कौ़म के लिये काम करने जा रहा हूं,इस्लाम खतरेमे है.. मै जेहाद के लिए जा रहा हूं….. त्यांना कराटे चे खेळ पण करुन दाखवले.. म्हंट्लं.. तुम भी ऐसाही कर सकते हो, कराटे खेल सकते हो.. और.. इस्लाम के लिये काम कुर्बान कर सकते हो.. आणि आयुष्यात पहिल्यांदा त्यांच्या नजरेतले भाव पाहुन धन्य धन्य झालो होतो.

शेवटी कोण आपण? एक अनपढ गंवार कसाब, पण अल्लाहने हा चान्स दिलाय म्हणुन तर ..  नाहितर काय होतं आपल्या कडे? अब्बु सारखं बोकड कापत जगलो असतो..

उद्या मुंबईला जायचं.. आणि त्यांनी सांगितलं तसं कराचं.. काहीही झालं तरी जिवंत पकडलं जायचं नाही.आपली जान देउन टाकायची.. बस्स.. फक्त एक दिन और…… फिर मै मेरी बंदुक और वो नापाक हिंदुस्थानी……!!!

______________________________________________________________________________________

आज एक साल पुर्ण झालंय.. इथे जेल मधे सडतोय.  जेंव्हा त्या बहादुर पोलिसने आपल्या हातातल्या बंदुकची पर्वा न करता पकडायचा प्रयत्न केला होता तेंव्हा मात्र सगळ्या गोळ्या त्याच्या छाताडात उतरवल्या … तरी पण त्याने सोडली नाही बंदुकीची नाळ..

कसले जेहाद अन कसलं काय.. इकडे तो हवालदार सांगत होता.. की पाकिस्तानी सरकारने तर सरळ कानावर हात ठेवले आहेत.. म्हणतात, कसाब नाही आमचा.. याच देशासाठी प्राण हातावर ठेउन आलो.. आणि त्याच देशाने नकारावे मला??

सिएसटीची ती व्हिडीओ फिल्म  पाहिली.. तेंव्हा  ते त्या निरपराध  लोकांचं मरण पाहिलं कोर्ट रुम मधे तेंव्हा मात्र वाटलं की  त्या निरपराध लोकांची काय चुक? त्या मधे काही मुस्लिम पण होते. पर्दानशिन खवायते.. आणि बहुत कुछ..  ते बच्चे दिसले विव्हळतांना.. काय चुकलं त्यांचं?  खरं तर अजिबात काही कल्पना नव्हती की त्या बंदुकीमुळे इतका नाश होऊ शकतो म्हणून.

जर हे आधिच माहिती असतं तर काय केलं असतं आपण? ह्या जेहाद मधे भाग घेतला असता?? कदाचित नाही.. कदाचित हो.. आखिर  त्या मुल्लाने सांगितलं होतं नां इस्लम खतरेमे है.. म्हणून? पण कुठे आहे  खतरा?? कोणापासुन आहे  खतरा? आणि इथे हिंदुस्थानात काही हिंदुस्थानी लोकांना मारुन इस्लाम कसा काय वाचणार?  इथे पण तर मुस्लिम आहेत.. आणि त्यांची संख्या आहे पाकिस्तानी लो्कसंखे पेक्षा जास्त…

आता समजतंय, इथले मुस्लिम पाकिस्तानातल्या मुस्लिम पेक्षा पण खुष आहेत. कसला इस्लाम खतरेमे? जर इस्लाम खतरेमे असेल तर तो असेल  पाक मधे.. इथे नाही..!! एवढं मात्र नक्कीच समजलंय  इथल्या एक वर्षाच्या जेलमधल्या वास्तव्यानंतर..

तो  मौलवी खोटं बोलला.. कां?? असं खोटं नाटं सांगुन त्याने काय मिळवलं असेल बरं?  हे पुर्ण वर्ष जेल मधे एकट्याने काढलं.. रोज ते मारल्या गेलेले चेहेरे नजरेसमोर नाचायचे. शांत  ्झोप म्हणजे काय ते माहिती नव्हतं. जो पर्यंत तो व्हिडीओ पाहिला नव्हता कोर्टात.. तो पर्यंत  काही वाटत नव्हतं, लोकांचे चेहेरे पाहिलेले नसल्यामुळे अजिबात गिल्ट नव्हता.. पण तो व्हिडीओ पाहिल्यावर मात्र…..  पश्चाताप होतोय इतक्या लोकांना मारल्याचा…. सांगितलं जज साहब ला..आणि कोर्टामधे तर रडु पण आलं होतं ते पाहुन…. कोणालाच खरं वाटलं नसेल ते ..

रोज त्या कोर्टात जातोय.. कोणी वकील तयार नव्हता म्हणे केस घ्यायला. पण शेवटी … .. जाने दो.. अजुन किती वर्ष काढायचे आहेत या जेल मधे कोणास ठाऊक. तसा एक चान्स आहे.. जसा पुर्वी एकदा विमान पळवुन नेलं तेंव्हा काही लोकांना सोडलं होतं.. तसा आपलाही चान्स आहेच.. इथे म्हणे केस खुप वर्ष चालते. त्यांच्या लोकसभेवर हमला करणारा अजूनही अफझल गुरु जिवंत आहे म्हणे त्या जेलमधे.. ..फांशीची सजा दिलेली आहे, पण अजूनही त्याला टांगला नाही या सरकारने…

________________________________________________________________________

त्या बदतमीज कसाबला सांगितलं होतं की काहीही झालं तरीही जिंदा हाती लागायचं नाही त्या काफिर लोकांच्या म्हणून.. पण बददिमाग कसाब शेवटी जिंदा हाती लागला त्यांच्या..  जर हा मारल्या गेला असता तर कधीच कोणाला पता चालला नसता, की ह्या  हल्ल्या मागे कोण आहे ते..

इतक व्यवस्थित ट्रेंड करुन पाठवलं होतं.. पण शेवटी काहीच करु शकला नाही.. बांगला देश चा नासुर जख्म आहेच.. तसेच कारगिलच्या जख्म मधुन खून  वहातो आहे अजुन.. बदले की आग मधे हा पाक देश जळतो आहे.

बरं तो बेवकुफ पण इतका, की त्याने आधी तर सरळ गिल्टी म्हणुन प्लिड केलं होतं.. त्या दस सालच्या लडकीने त्याला ओळखलं तर हा इतका ट्रेंड कमांडो चक्क रडायला लागला.. बददिमाग.. काफिर..जेंव्हा अटॅक झाला, ताज वरचा, तेंव्हा तर बऱ्याच मोठ्या राजकिय नेत्यांनी पण शाबासकी दिली होती.. आज तेच सगळे पिठ फिरवून पळताहेत. जैसे की उनका कोई संबंधही नहीं है.. इस बात से…. तेंव्हा म्हणत होते ऐसेही ५०० कसाब तैयार करो.. और.. बस्स .. वो भारत देश     हमारा है.. हो सकता है अमेरिका भी ………………..???

ह्या कसाबच्या मुर्ख पणामुळे आका समोर हात टेकवावे लागले.साला जिंदा नहीं बचता तो……कुछ और बात होती……..   या खुदा. पता नही.. और क्या देखना

(असेच काही तरी विचार असावेत त्यांच्या मनात…)

२६/११/२००८ मधे शहिद झालेल्या सगळ्या लोकांना श्रध्दांजली.. आज एक वर्ष पुर्ण होतंय.. या सगळ्या शहिदांना कुठलाच भारतिय विसरु शकणार नाही..

About महेंद्र

माझा ब्लॉग :- http://kayvatelte.com
This entry was posted in टेररिस्ट अटॅक and tagged , , , , . Bookmark the permalink.

52 Responses to डी डे मायनस वन…

 1. anandpatre says:

  यावर काय बोलणार ? माझ्यातर्फे श्रद्धांजली!
  मुंबईला सलाम.

  • बस .. पहिल्याच कॉमेंटची वाट पहात होतो.
   आज एक वर्ष झालंय.. त्या शहिद पोलिसांना जाउन.सुरुवातीला त्यांच्याकडे मिडीया, पोलिटीशिअन्सचं लक्षं होतं.पण थोड्याच दिवसात सगळं काही विसरले गेले. इलेक्शन झालं.. कुठल्या राजकिय पक्षाला आठवण झाली श्रध्दांजली द्यायची?? त्यांच्या घरच्या लोकांचं कसं सुरु आहे? काय करताहेत ते?? डिक्लिअर केलेला सपोर्ट मिळाला की नाही? मदत पोहोचली की नाही त्याच्या कुटुंबियांपर्यंत..?
   शहिदांच्या किती कुटूम्बियांना नौकरी मिळाली?? खरंच असे हज्जारो प्रश्न आहेत माझ्या मनात ज्यांची उत्तरं शोधत असतो, पण ती कधिच मिळाली नाहीत.. फक्त घोषणा वाचल्या जातात पेपरमधे- पण त्यांचं कितपत पालन झालं हे समजत नाही पुढे कधी..
   हे पोस्ट लिहितांना आधी शहिदांच्या घरच्या लोकांचं मनोगत लिहावं असं वाटलं होतं. पण नंतर लक्षात आलं.. की काहीच माहिती नाही आपल्याला त्यांच्या कुटुंबियांबद्दल..
   मुर्दाड मनोवृत्तीची जनता ( मी पण त्यातच आलो) आणि तसंच थर्डरेट शासन…. लाज वाटते मला.. या सगळ्यांचीच., या घाणेऱड्या मनोवत्तीची …..स्वतःची पण!!!

 2. sahajach says:

  सगळ्या शहिदांना श्रद्धांजली…..महेंद्रजी खरच लाज वाटते स्वत:ची….नाकर्तेपणाची आणि मुर्दाड मनाची!!!!!

  • तन्वी
   आपण स्वकेंद्रित झालोय फार.. असं वाटतंय हल्ली…
   आजच सकाळी फिरायला जातांना एक भाजपाच पोस्टर पाहिलं. त्यामधे हया सगळ्या शहिदांचे फोटॊ अगदी लहान आकारात आणि कुठल्या तरी फालतु नेत्यांचे मोठे फोटो एकत्र करुन एक बॅनर लावलं होतं श्रध्दांजलीचं.. फोटो ब्लॉग वर पोस्ट करतोय…
   या वरुन मी वर जे काही लिहिलंय त्याची खात्री पटते की नाही??

 3. rohan says:

  खरं तरं ‘लिहू तितके कमी’ आहे आणि म्हटले तरं ‘काय लिहू’ असे सुद्धा आहे… आपण काय फ़क्त श्रद्दांजलीचे कार्यक्रम करण्यासाठी पोलिस आणि जवान भरती करून घेतो की काय…?

  नकळत ‘वेन्सडे’ चित्रपट आठवतो. त्यात आपल्या भावना अगदी पुरेपुर उतरवल्या आहेत नसरुद्दीन शाहने…

  • रोहन
   सध्या फक्त ४-५ नांवं आठवताहेत. पुढल्या वर्षी एखाद दोन नांवं अजुन विस्मृतीच्या आड जातिल्, नंतर शिल्लक राहिल तो फक्त सोपस्कार.. एक श्रध्दांजलीचा. खरंच काल पासुन खुपच डिस्टर्ब्ड आहे मी .. त्या इतर ११ पोलिसांची नांवं पण माहिती नाहित कोणाला, तर त्यांना मदत कशी काय पोहोचली असेल??

   • rohan says:

    पंकजने त्याच्या पोस्ट मध्ये आज सर्व नावे लिहिली आहेत बघ …

    • हो.. ते पोस्ट बघितलं रे मी.. पण याचं वाईट वाटलं की आपलं मन इतकं बोथट झालंय की त्या सगळ्यांना विसरुन जावं आपण?? नावं तर नेट वर पण मिळाली असती, आणि श्रध्दांजलीचं पोस्ट बनवता आलं असतं.. पण माझं मन खात होतं की आपण त्यांची नावं कां विसरलो म्हणुन..

     • rohan says:

      अरे नाव विसरलो म्हणुन काय झाले? कारगिल युद्धामधल्या कित्ती…तरी जवानांची नावे आपण अजून सुद्धा ऐकलेली नाही आहेत … 🙂

      मुळ भावना महत्वाची … नाही का…

      • हं.. तेही खरंय म्हणा.. भावना महत्वाची. कारगिल हे युध्द होतं, त्यामुळे जवान हे नेहेमीच अनामिक रहातात.. पण इथे फक्त ११ लोकं होते.. !! असो.. उद्देश हा की नांवं विसरलो, ठिक आहे, पण त्यांच्या कुटूंबियांना दिलेल्या कमिटमेंट्स तरी पुर्ण झाल्या की नाहीत?? काही दिवसांपुर्वी श्रीमती हेमंत करकरे ह्या सोनिया गांधींना भेटल्या ,तेंव्हा त्यांनी सांगितलं की त्यांना प्रॉमिस केलेला पेट्रोल पंप अजुन तरी मिळालेला नाही. इतरांच्या बद्दल काहिच माहिती नाही.. 😦

 4. सकाळपासून comment टाकायचा प्रयत्न करतोय. काहीतरी problem होता बहुतेक.. खरच छान झालाय लेख. नेहमीसारखाच.. काही नाही.. या कसाबला पण आपल सरकार अफझल गुरु सारखच पोसत राहणार. आणि आपण षंढासारख बघत राहणार… खरच लाज वाटतेय !!!

  • कालपासुन मी शहिद झालेल्यांची नावं आठवायचा प्रयत्न करतोय. पण केवळ ४ ते ५ नांवं आठवतात.. खरंच स्वतःचीच कीव आली… इतकं मन मेलेलं आहे आपलं??

 5. खरच कुठलाच भारतीय त्या घटनेला विसरु शकणार नाही ..
  लेख नेहमीप्रमाणे छान झाला आहे.

  • देवेंद्र
   हा लेख म्हणजे मनातल्या भावनांना करुन दिलेली वाट आहे.. गिल्टी कॉन्शस दुर करण्याचा एक केविलवाणा प्रयत्न!!
   हा फोटो बघा . आज सकाळी फिरायला गेलो तेंव्हा दिसला..
   http://twitpic.com/qy0fp

 6. bhaanasa says:

  गेली कित्येक वर्षे हेच घडते आहे.महेंद्र,खरच का सगळ्यात स्वस्त झालाय जीव? गेलेल्यांची किंमत शून्य व असलेल्यांची त्याहूनही कमी.आपली मने मुर्दाड झाली आहेत की आपण काही करू शकत नाही म्हणून भयंकर केविलवाणी झालीत. नाकर्तेपणा का षंढ आकांत……मला तर आताशा काहीच समजत नाही. आघात सोसून मन बथ्थड झाले आहे. या सगळ्या शहिदांच्या घरच्यांना या श्रध्दांजल्या म्हणजे निव्वळ फार्स वाटत असतील ना? लाज वाटते.

  • अगदी खरंय.. जनतेची आठवण फार कमी असते..सगळे लोकं येत्या २०११ पर्यंत सगळं विसरतिल. हा श्रध्दांजली चा फार्स पण फार तर दोन तिन वर्षं चालेल… त्या शहिदांपर्यंत डिक्लिएअर झालेली मदत जरी पोहोचली तरिही पुरेसं आहे.. पण मला तरी वाटत नाही अजुन पर्यंत काही झालं असेल म्हणुन.
   सगळी जनता पण फक्त हेमंत करकरे, साळस्कर, ओळंबे इत्यादी चार पाच नावं लक्षात ठेउन आहेत. बाकी लोकांचं काय?? ते खालच्या पदावर काम करित होते म्हणुन त्यांचं बलिदान काही कमी दर्जाचं ठरत नाही… !!्त्यांची तर लोकांना नावं पण ठाउक नाहीत.. 😦

 7. sachin says:

  श्रद्धांजली.

 8. माझाही कडक सॅल्युट!!!
  बाकी मी आज पूर्ण निःशब्द आहे.

 9. mugdha says:

  खुप छान झालाय लेख..छान याकरता की जोवर तुमच्या सारखे विचारी लोकं भारतात आहेत तोवर भारताला काही धोका नाही..असं मला वाटतं..
  आपण काही करु शकत नाही ही गिल्ट तर असतेच नेहमी…बाबरी मस्जिद प्रकरण असो, मुंबईचा पूर असो किंवा हे दहशतवादी हल्ले असो. हे दहशतवादी हल्ले तर कुणी दुसर्याने घडवुन आणले आहेत ज्याला कुणी तिसर्या व्यक्तीने तसे इंस्ट्रक्शन्स दिले. पण बाबरी मस्जिद प्रकरणाचं काय? हजार दुश्मन परवडले पण घरातले बंडखोर नाही….
  अजुनही कुठला हल्ला हॊणार नाही याची काय हमी??
  आयुष्य स्वस्त झालंय इतकंच…

  • आयुष्य स्वस्त झालंय… आणि घरातले बंडखोर कसे हाताळायचे? हा तर सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे..अंतर्गत बंडखोरी!!!

 10. जीवाची पर्वा न करता दहशतवादाशी समोरासमोर दोन हात करणारे अधिकारी आणि कर्मचारी यांना त्रिवार वंदन अन् भावपूर्ण श्रद्धांजली…!

  निशब्द!

 11. laxmi says:

  सर्व शूर विरांना श्रद्धांजली.

  रात्री ९.३० वाजता सुरू झालेला हल्ला अक्षरक्ष:६० तास चालू होता. सकाळी सहा सात वाजता भावाने टीवी लावल्यावर सर्व चॅनेल वर एकच बातमी फ्लॅश होत होती. पोलीस दलातील तीन IPS अधिकारी शहीद. धक्काच बसला. ATS chief हेमंत करकरेंची प्रेस कान्फरेन्स काही दिवसांपूर्वीच पहिली होती. मालेगाव बॉम्ब स्फोटातील तपास चालू होता. आणि त्या दिवशी ती बातमी. अस वाटल ही बातमी पूर्णपणे खोटी निघावी. पण ते शक्य नव्हत. वेळ जसजशी जात होती तसतसे अजुन पोलीस ह्या हल्ल्यात शहीद जात होते. पोलीस दलाला ह्या हल्ल्यात खूप मोठी किंमत मोजावी लागली. पुन्हा असा दिवस येऊ नये हीच प्रार्थना करूया.

  आजच एका लेखात वाक्य वाचल. मुंबई वर झालेल्या हल्ल्याच दु:ख सेलेब्रेट केले जाईल 😦 तुम्ही पोस्ट केलेल्या फोटोवरुन हेच दिसतय.तीन-चार दिवस खूप इवेंट होतिल. मेणबत्या लावल्या जातील. स्मारके उभारली जातील आणि त्या स्मारकां समोर नेते फोटो देण्यासाठी पोज़ देतील. पुढच्या वर्षी पुन्हा तेच!

  • आज सकाळी फिरायला जातांना तो जाहिरातीचा बोर्ड पाहिला आणि एकदम चिड, संताप आला. मेलेल्याच्या टाळूवरचं लोणी खाणाऱ्या ह्या लोकांचा जाहिर निषेध करायला हवा. बरं हे फक्त भाजप, शिवसेना, मनसे , कॉंग्रेस पुरतंच मर्यादित नाही.सगळेच पक्ष या जळत्या चीतेवर आपली पोळी भाजुन घ्यायला समोर समोर करताहेत..

   हे चालेल, अजुन दोन वर्षं..नंतर लोकं विसरतील सगळं.. लोकांची स्मरणशक्ती फार कमी असते. .. मुंबई बॉंब ब्लास्ट ची तारिख आठवते?? लोकल ब्लास्ट तारिख?? मला तर नाही आठवत… तसंच ह्याच होणार.. आणि हीच सगळ्यात मोठी दुर्देवाची गोष्टं…

 12. varsha says:

  चांगलं लिहिलं आहे. त्याला साहित्यिक व संवेदनेचा स्पर्श जाणवतो.

  • वर्षा
   अशी वेळ पुन्हा येउ नये एवढीच इच्छा. वर लक्ष्मी ने लिहिल्या प्रमाणे ” हल्ल्याचं दुःख” सिलेब्रेट केलं जाइल. सभा होतील. स्वघोषीत पंडित लोकं ज्ञान पाजळतील..दुःख पण उगाळुन उगाळुन करण जोहरच्या सिनेमा प्रमाणे पेक्षणीय़ करण्याचा प्रयत्न झाला तर त्यात काही आश्चर्य वाटुन घ्यायला नको आपण..
   केरळच्या सी एम प्रमाणे काही नेते उध्दटसारखं बोलुन त्या शहिदांच्या कुटूंबियांचा अपमान करतिल. आणि चार दोन दिवसांत सगळं काही विसरुन लोकं कामाला लागतिल..

 13. मी देखील अशीच उद्विग्न अवस्थेत आजची पोस्ट लिहाली. नेहमीप्रमाणे सरकारला दोष दिला आणि मोकळा झालो. मी स्वत:देखील आयुष्यभर गोर्‍या लोकांसाठी कोडिंग करत, देशासाठी काही न करता, असाच शरमेने मान खाली घालून निषेध नोंदवत राहणार.

 14. vijay says:

  हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या शहिदांसह बहुतांश नागरिक, तसेच जखमींच्या नातेवाइकांना एक वर्ष उलटले, तरी सरकारने जाहीर केलेली रक्कम पूर्णांशाने मिळालेली नाही. या तक्रारीची गंभीर दखल घेऊन राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने महाराष्ट्र सरकारला “कारणे दाखवा’ नोटीस बजावली आहे. या नोटिशीवर चार आठवड्यांत उत्तर देण्याचे निर्देश सरकारला देण्यात आले आहेत. पंतप्रधान कार्यालय व रेल्वे बोर्डालाही ही नोटीस बजावण्यात आली आहे.
  पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांनी 403 अर्जांपैकी केवळ 118 जणांनाच मदतीचे धनादेश पाठविले आहेत. मुंबई हल्ल्यात होरपळलेल्यांच्या नातेवाइकांना सरकारने जाहीर केलेली मदत एक वर्षानंतरही मिळालेली नाही. बाधितांपैकी तीन जणांनाही सरकारची मदत पूर्णांशाने मिळालेली नाही.

  • बापरे… हे तर भयंकर आहे!! इतकी संपुर्ण माहिती दिल्याबद्दल मनःपुर्वक आभार..
   ४०३ पैकी फक्त ११८ !!!
   बरं, या पैकी जे पोलिस मारले गेले, त्यांचं काय ? त्यांना तरी पैसे , मदत मिळाली की नाही?? जर श्रीमती करकरेंनाच प्रॉमिस केलेली मदत दिली जात नाही, तर इतरांचं काय होणार??
   वाईट वाटतं हे सगळं पाहिलं की..

  • आणि हो .. त्याहून भयानक म्हणजे ज्यांना मदतीचे चेक्स मिळाले आहेत ते bounce झालेत. २ दिवसांपूर्वीच म टा मध्ये बातमी होती..

   • अरे बाप रे.. अरे हे चाललंय तरी काय? आत्ताच शशी थरुरने ट्विट केलं मला इथे पोस्ट करतोय..
    “ShashiTharoor
    @memahendra gas/petrol distributorships are being offered by Govt to give them a secure source of lifelong income. about 3 hours ago from web in reply to memahendra ”

    एक वर्ष झालं, पण अजुनही काही ऍक्शन घेतलेली नाही.. कां???

 15. vijay says:

  vijay :हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या शहिदांसह बहुतांश नागरिक, तसेच जखमींच्या नातेवाइकांना एक वर्ष उलटले, तरी सरकारने जाहीर केलेली रक्कम पूर्णांशाने मिळालेली नाही. या तक्रारीची गंभीर दखल घेऊन राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने महाराष्ट्र सरकारला “कारणे दाखवा’ नोटीस बजावली आहे. या नोटिशीवर चार आठवड्यांत उत्तर देण्याचे निर्देश सरकारला देण्यात आले आहेत. पंतप्रधान कार्यालय व रेल्वे बोर्डालाही ही नोटीस बजावण्यात आली आहे.पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांनी 403 अर्जांपैकी केवळ 118 जणांनाच मदतीचे धनादेश पाठविले आहेत. मुंबई हल्ल्यात होरपळलेल्यांच्या नातेवाइकांना सरकारने जाहीर केलेली मदत एक वर्षानंतरही मिळालेली नाही. बाधितांपैकी तीन जणांनाही सरकारची मदत पूर्णांशाने मिळालेली नाही.
  कसाबची काळजी घेण्यासाठी सरकारी तिजोरीतून वर्षभरात तब्बल ३१ कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. कसाबला जिवंत ठेवण्यासाठी सरकार दररोज तब्बल ८.५ लाख रुपये खर्च करत आहे.

  • कसाबला जिवंत ठेवणं हे आवश्यक आहे असं मला वाट्तं. पाकवर इंटरनॅशनल प्रेशर ठेवण्यासाठी.
   कसाबवर ८.५ लाख कसले खर्च करताहेत? सिक्युरीटीचे?? मला वाटत नाही , इतका खर्च असेल म्हणुन..
   थर्डक्लास नेत्यांना झेड सिक्युरिटी दिली जाते तिकडे किती खर्च होतो? सिनेमा हिरोंना झेड सिक्युरिटी… कित्येक हजार कोटी खर्च होत असेल … कसाबला जिवंत ठेवायला ८-५ लाख असतिल तर ठिक आहे. त्याचं केस पुर्ण होई पर्यंत जिवंत रहाणं आवश्यक आहेच नां..कसाब जिवंत सापडला म्हणुन तर पाक वर प्रेशर आहे. आजच बातमी वाचली की पाकमधे दोघांवर खटला दाखल केला म्हणुन..
   कसाबला जरुर मारावं.. फाशी द्यावी.. पण खटला पुर्ण चालवुन… असे माझे मत आहे.

 16. archana says:

  माझ्या माहीतीप्रमाणे शहिद पोलिसाना पुर्ण आर्थिक मदत पोहचली आहे. त्यातले काही जण त्याच्या नवीन घरात shiftपण झाले आहेत्.काहीनी नवीन घर मिळुन देखील जुन्या घरी रहाने पसन्त केले आहे.घरातल्या एका व्यक्तीला पोलिसातील नोकरीतही सामावुन घेतले आहे.police deprt. ने सगळी मदत sensitively केली आहे. ह्याव्यतिरिक्त sahara group,petrolium ministry gas agency,saraswat bank employement ह्या आणि इतर अनेक मदतींचा हात शहिदाना मिळालाय. ह्या हल्ल्यामुळे जनतेत इतका रोष होता की सरकारला मदतीत हलगर्जीपणा करुन चालनारच नव्हते.

  जखमीना मदत मिळायला कुठल्याही घटनेतल्या नेहमीच त्रास होतो. कारण identify करणे अवघड असते.
  सरकारी यंत्रणेला नेहमीच दोष देउन चालत नाही.कित्येक वेळा चुकीचे लोक लाभार्थी म्हणुन फायदा घेतात्.कित्येक वेळा म्रुताच्या वारसातच पैशावरुन भांडणे लागतात.

  • जनतेमधे रोष होता.. आहे पण, त्याची तिव्रता कमी झालेली आहे. इतर जखमी वगैरे तर ठिक आहे, पण जर पोलिसांना जर खरंच मदत पोहोचली असेल तर ती खरंच आनंदाची गोष्ट आहे..
   पण खरंच तसं आहे कां?? आत्ताच ही बातमी पाहिली.. इथे लिंक दिलेली आहे बघा…http://www.newkerala.com/nkfullnews-1-158062.html

 17. archana says:

  सौ करकरेना स्वतः राष्ट्रपतीनी घरी जाउन २५ लाखाचा चेक दीला होता. त्या आता सरकारी police quarter ,दादर मधेच रहात आहेत. त्याना सरकारने तिथे ३ वर्ष रहान्याचे परवानगी दिली आहे.

  • आनंदाची गोष्ट आहे .. पण इतर पोलिसांचं काय झालं ते कुठेच काही कळंत नाही . मी बराच शोध घेतला नेट वर.. पण इतर पोलिसांना काय मदत दिली गेली हे समजले नाही. आता माहितीच्या अधिकारामधे ही माहिती मागतो डिपार्टमेंटला.. !!

 18. archana says:

  तुम्ही माहितीचा अधिकार वापरताय हे वाचुन फार बरे वाटले.please go ahead and use this right. and encourage others also to do it.
  इतर शहिद पोलिसाना पण help मिळाली आहे. काही case मधे असे झाले आहे की. शहिद पोलिसाच्या पत्नीला मदत मिळते, पण आई वडील मात्र मदतीविना कारण नियमानुसार पत्नी वारस असते.तेव्हा काही राजकारणी लोक खोटे आश्वासन देतात आणि पुर्ण करत नाहीत.तेव्हा माध्यमे चुक्केची माहीती छापतात की मदत मिळाली नाही.
  ह,मी वर म्हटल्याप्रमाणे जिवंत लोकाना मग ते पोलिsa असो की सामान्य मदत मिळायला त्रास होतोच.

  • अहो काल पासुन मेंदुला तो किडा पोखरतो आहे की या पोलिसांचं काय झालं असेल ? त्यांचे कुटुंबिय कुठल्या परिस्थितीत असतिल ते?? म्हणुनच हे पोस्ट लिहिलं.. सरळ सरळ जे शहिद झाले त्यांची नावं घेउन श्रध्दांजली देता आली असती.. पण.. टाळलं ते.. आणि जे काही मनात आलं तेच लिहिलंय..

 19. akhiljoshi says:

  अप्रतिम विचारकल्पना आहे…
  भावनांना वात मोकळी करून दिली असली तरी
  त्यातली वेदना जाणवत…राहते…
  थोडक्यात आपल्या भारतात राजकारण हे गजकर्ण झाल्यासारखे आहे
  प्रत्येकाची फक्त एकमेकांवर चिखलफेक……

  कुठे गहाळ होते चिलखत
  तर कुठे गहाळ होते फाईल…
  किती वाईट अवस्था झाली देशाची तरी
  यांची बदलत नाही स्टाईल

 20. akhiljoshi says:

  ekach prob ahe…….. stat tracker jo visually side baaar var alay tyacha html code kuthun milavayacha?
  mala milala nahi.kiva jo milala to work nahi karat ahe

  • तो कोड कुठुन मिळवायचा ते मलाही माहिती नाही.. पण “इमेज” विजेट आहे ते का वापरत नाही??

 21. Sagar says:

  Sir khup lavakar vachli aajchi tumchi post….Pan khar sangu mazyakade comments madhe lihnyasarkhe kahihi nahi…an sry kaka ek sangu wah kai chan lihlay asahi mhnavat nahi….var mhatlya pramane NISHABD..:(

 22. Mi says:

  1. Mala lahanpani ‘Mahabharat’ pahataan ek prashna padayachaa .. Dropadilaa jugarachya dawaat lavataanaa , tichi saadi kadhataana – parakrami pandav kaa shant basale hote ?

  2. Aajhi hach prashna padato – rastyavar shaur gajavanaare, Chhatrapatinchi parampara sanganaare, Atakepaar zende laavnaare , silicon valley gajavanaare … ashe Gandu houn kaa basaloy ?

  paravaa shant basalo asataa donhi prashnaahe ek uttar sapadale :

  Kaaran – PakshaShhreshthi ani tyanchyavishayichaa [chukicha] aadar ..

 23. Aparna says:

  magchya warshi mumbaiitach hote…aapan tithe nastana ashya gosthi hotat tevha aapan kahich karu shakat nahi hyach waiit watata..pan tithe aapan asunahi kahich karu shakat nahi hyacha khup shalya aahe….
  kadhi kadhi watata kharach aaplya kutumbiyacha wichar na karta jeev kurban karnarya ashya sarva hutatmyache pang fedanysathi kai karu shakato aapan?? Tyanchya kutumbiyasathi kahi tari thos kela pahije.
  Aaj khup gaapa aahe….sarkha magcha warsha aathwun galbalayala hotaa

 24. pushpashil says:

  Shahidana Shradhanjali…
  Tukaram Ombale amhalaa tumchaa abhimaan ahe…

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s