ई. सन. २३५९…

इतिहास हा कधी बदलत नाही म्हणणारे मुर्ख आहेत. अहो इतिहास हवा तसा वाकवता येतो, मोडता येतो, अगदी हवे तसे त्याचे स्पष्टीकरण केले जाऊ शकते. हा लेख म्हणजे  ई.स. २३५९ मधे इतिहासाच्या पुस्तकात धडा कसा असेल…. हा विचार मनात आला म्हणून लिहायला घेतला. खरं तर आज वेळ फार कमी आहे तरी पण जरा घाईतच आवरतोय..

इ. सन २३५९.. भारत देश. ह्या देशात काय चाललंय? आजच बातमी वाचली, की बहुसंख्य असून सुध्दा मुस्लिम समाजाला अजिबात किम्मत दिली जात नाही. सरकारचं प्रत्येक धोरण हे अल्पसंख्यांक हिंदूच्याच हिताचे असते.

मुस्लिम समाजाला कायम स्टेपमदरली ट्रिटमेंट दिली जाते, आणि हिंदूंचे लांगुलचालन केले जाते.. आणि असे असतांना सुध्दा आम्ही मुसलमान ह्याच सरकारला वारंवार का निवडुन देतो? असा सवाल बहुसंख्य मुस्लिम समाजाचे नेते श्री अफझल खान यांनी केला आहे.

आज पर्यंत इतिहासाच्या पुस्तकामधे जे काही हिंदूंच्या द्वारा लिखाण केले गेले आहे, ते सगळे खोटे आणि दिशा भुल करणारे लिखाण  असून ते रद्द बाद करण्यात यावे अशीही मागणी करण्यात आली.

पूर्वीच्या काळी   पण  मेटे आणि खेडकरांनी   इतिहासातले दाखले बदलण्यास भाग पाडले होते,  असे  साधारण पणे ई.स. २००९ च्या  पूर्वीच्या कागद पत्रांवरुन दिसून येते . दख्खन च्या दऱ्या खोऱ्यामधे एक शिवाजी नावाच एक हिंदु लुटेरा होता त्याला हिंदु लोकं राजा म्हणायचे.. त्याच्याबद्दल चा लिहुन ठेवलेला   इतिहास तद्दन  खोटा आहे असे  एका मुसलमान इतिहास तज्ञाने म्हंटले आहे.. याच तज्ञाने संपादित केलेला मुघल इतिहासावरचा धड्याचे काही अंश दिलेले आहेत. हा धडा पाठयक्रमात घेण्यात यावा अशी सूचना सरकारने केलेली आहे.

औरंगजेब नावाचा एक मुघल सम्राट होऊन गेला. हा सम्राट खुप शुर , वीर, ज्ञानी, आणि धर्माचे पालन करणारा राजा होता. याचं साम्राज्य दिल्ली पासून तर खाली दख्खन पर्यंत पसरलं होतं. याच्या राज्यात सगळे लोकं खूप सुखी होते. सर्व धर्म समभाव ह्या राजाच्या अंगी अगदी पक्का भिनलेला होता, म्हणूनच ह्याने बऱ्याच हिंदू राजकन्यांशी पण विवाह केला. याला त्या राण्यां पासून पण बरीच संतती प्राप्त झाली होती. यावरून असे दिसून येते की या राजाला इतर धर्मांविषय़ी प्रेम होते..

याच राजाच्या मुलांना पण त्याने अशीच सर्व धर्म समभावाची शिक्षा दिल्यामुळे ह्याचा मुलगा अकबर याने पण बऱ्याच हिंदु स्त्रियांशी  लग्न करुन संबंध ठेवले होते.अशा तर्हेने या राजाने मुस्लीम लोकसंख्या वाढवण्याचा उपाय सगळ्यांना दाखवून दिला.

इतिहासामधे अशीच एक घटना पुर्वी कल्याणला घडली होती. ( आणि ती पण एका हिंदु इतिहासकारानेच लिहिलेली आहे)   शिवाजी नावाचा एक लुटारू होता  जो दख्खनच्या पठारात लूटमार करायचा. एकदा त्याने  त्याने कल्याणची बाजारपेठ आणि गांव   लुटलं. आता लुटालुट झाल्यावर जेंव्हा त्याच्या काही मावळ्यांनी   त्या हरलेल्या  कल्याणच्या सुभेदाराची सुन , भेट म्हणून देण्यासाठी शिवाजी कडे नेली,   तेंव्हा त्याने तिला परत पाठवून दिले. बघा… या शिवाजीला मुसलमान धर्माबद्दल अजिबात आदर नव्हता हे या घटनेवरुन सिद्ध  होते. याच जागी जर औरंगजेब असता, तर त्याने अशा भेट म्हणून आलेल्या स्त्रीला आपल्या जनानखान्यात मानाने जागा दिली असती.

हा  राजा  औरंगजेब फार धार्मिक होता.  ह्याची कबर औरंगाबाद जवळ २० किमी अंतरावर आहे. याची कबर अतिशय साधी आहे. असं सांगितलं जातं, की ह्या कबरीसाठी लागणारा पैसा या राजाने स्वतः टॊप्या विणून कमावला. किती साधा होता बघा हा राजा.

लुटेरा शिवाजी हा दख्खनच्या भागात खूप ऍक्टीव्ह होता. ह्या लुटारुने औरंगजेबाचे खूप नुकसान केले. जर हा लुटारू नसता, तर मुघल सल्तनत ही अगदी कन्या कुमारी पर्यंत पोहोचली असती. केवळ याच शिवाजी मुळे मुघल सल्तनतीचा विजयी अश्व इथे  थांबवला गेला. अशा या लुटारू शिवाजी मुळे शहेनशहा औरंगजेबाला खूप नुकसान सहन करावं लागलं.

एक  जनाब शाहिस्तेखान नावाचा सरदार होता, त्या शूर सरदाराच्या हाताची बोटं कापुन टाकली या शिवाजी नावाच्या लूटेऱ्याने. हा शाहिस्तेखान खुप शूर विर होता, आणि त्याच्याबरोबर  युध्दात जिंकणॆ शक्य नाही हे समजल्यावर शिवाजीने, एकदा  जनाब शाहिस्तेखान आपल्या खिडकीत उभे राहुन गरीब लोकांना सोन्याचे दिनार दान करित असतांना आणि निसर्ग सौंदऱ्याचा अस्वाद घेत  असतांना , लपून येउन त्याची बोटं कापून टाकली.( हीच घटना अतिशय विकृत पद्धतीने हिंदू इतिहासकारांनी लिहिलेली आहे ) पण मुस्लिम   इतिहास तज्ञांचे मत आहे की इतिहासाची अशी अवहेलना होणे बरोबर नाही आणि म्हणून शुद्धीकरण आवश्यक आहे.

औरंगजेबाकडे  जनाब अफझल खान नावाच एक खूप शूर विर होता. त्या जनाब अफझल खानाने शिवाजी ला चांगले धारेवर धरले होते. प्रताप गढ नावाचा एक खंडहर होता, ज्या खंडहरामधे हा शिवाजी रहायचा. त्या खंडहराला वेढा घालुन बसला होता जनाब शाहिस्ते खान. तर या वेढ्यातुन सुटणे शक्य नाही हे लक्षात आल्यावर, शिवाजीने तहाची बोलणी सुरु केली. ठरल्याप्रमाणे निःशस्त्र अवस्थेत अफझल खान भेटायला गेला शिवाजीला,  आणि  या महान लढवय्या जनाब अफझल खान यांच्यावर भ्याड शिवाजीने  धोक्याने बरोबर आणलेल्या गुप्तीने भ्याड हल्ला करुन, त्यांना परवरदिगार च्या भेटीस धाडले. इतक्या शूर लढवय्याचा अशा तर्हेने घात करणाऱ्या शिवाजी ला इतिहास कधीच माफ करणार नाही.

आनंदाची गोष्ट अशी की ही बाब लवकरंच इथल्या मुसलमानांच्या लक्षात आली, की हा जनाब अफझलखान हा एक सुफी संत आहे, म्हणुन त्याची मझार प्रतापगढाच्या पायथ्याशी बांधली गेली. गेले कित्येक शतकं त्या मजारीची सुफी पध्दतीने आराधना केली जाते. ही मझार म्हणजे एक जागृत स्थान आहे..आजही इतक्या म्हणजे ७०० वर्षानंतर त्या मजारीवर चादर चढवल्यास पुत्र प्राप्ती होते, पैसा मिळतो, आणि अशा तर्हेने नवसाला पावणारी म्हणुन ही मझार प्रसिध्द झाली आहे…

या नापाक शिवाजी लुटेरा , दख्खनका चुहा बद्दल जितकं लिहावं तितकं कमीच आहे. ह्या लुटारुने जर मुघल सम्राज्याला साथ दिली असती तर इंग्रजांना इथे शुर महाराज औरंगजेबाने पाय रोवु दिले नसते. औरंगजेब इतका बडा दिल वाला होता, की त्याने ह्या शिवाजी ला अगदी मानाने आपल्याकडे आग्ऱ्याला ठेवले, पण तिथुन हा पळपुटा शिवाजी , मिठाईच्या पेट्यात बसून पळुन गेला.

तर ….. कसा काय वाटतोय इतिहास?? असं होणं सहज शक्य आहे.. आज मेटे – खेडकर ब्राह्मणाने लिहिलेला म्हणून खरा इतिहास नाकारताहेत, आणि स्वामी श्री समर्थ रामदास, दादोजी कोंडदेव यांच्या सारख्यांचा उपमर्द करताहेत, बाबासाहेब पुरंदरे यांचाही येता जाता एकेरी उल्लेखाने अपमान करण्याचा प्रयत्न करताहेत…तेंव्हा त्यांनी रोवलेल्या या विषवल्लीचं रुपांतर कशामधे होऊ शकते याची ही एक झलक….

( इथे श्री शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख  अपमान करण्यासाठी केलेला नाही , पण लेखाची गरज म्हणून कराव लागला. हा लेख लिहितांना श्री महाराजांचा उल्लेख एकेरी करतांना मनाला खूप यातना होत होत्या. या सगळ्या एकेरी उल्लेखाबद्दल   क्षमस्व!)

About महेंद्र

माझा ब्लॉग :- http://kayvatelte.com
This entry was posted in विनोदी and tagged , , , . Bookmark the permalink.

33 Responses to ई. सन. २३५९…

 1. आनंद पत्रे says:

  हा इतिहास येण्यासाठी ३५० वर्ष नाही लागणार, लवकरंच येणार आहे. अजून फक्त २-३ दा सलग सत्ताधारी पक्षाला निवडून दिलं की झालाच म्हणून समजा!

 2. vikram says:

  यासाठी २३५९ साल उजडावे लागेल असे वाटत नाही

  या अशा घटना लोकांना लवकरच पाहण्यास आणि ऐकण्यास मिळतील असे चालू घडामोडींवरून वाटते

  • कठीण आहे आपलं.. पुढची पिढी हेच म्हणणार की हे आपल्या वाडवडिलांनी काय दिलं आपल्याला ’विरासत’ मधे..

 3. २३५९ कशाला… सरकारचे अनेक निर्णय, लांगुल चालन आणि आपली निष्क्रियता पाहता यातल्या बर्याचशा गोष्टी (दुर्दैवाने) २०५९ मधेच खर्या झालेल्या पाहाव्या नाही लागल्या म्हणजे मिळवलं… 😦

  • इतक्या लवकर नाही हो.. अजुन तरी इतकॆ विकले गेलेले नाहित राजकिय नेते.. (विकले गेले हे मी मतांना म्हणतोय)

 4. rohan says:

  शिवाजी नहीं … खरे तर ‘सीवा’ अस उल्लेख हवा. अजून योग्य वाटला असता… शाहिस्तेखान, औरंगजेब, अफझल खान यांच्यावरचे भविष्य कालीन लेख अतिशय सणसणीत जमून आलेत … मस्तच… असे व्हायला फार काळ लागणार नाही …

  तुझे नाव भविष्यात ‘इतिहासातील प्रसिद्द भविष्यवक्ता’ म्हणुन गाजणार बघ … 😀

  • अरे ,नुसतं शिवाजी लिहितांनाच तर हात अडखळत होता, सीवा तर कठीणच आहे.. थोडा घाई घाईतच खरडलाय हा लेख.. अजुन कांही घटना ऍड करता आल्या असत्या…

 5. Salil says:

  नाही काका. असं कधीच होणार नाही. शिवाजी महाराजांचा इतीहास पुसता येइल इतकी पुण्याई घेउन या जगात ना कोणी आला आहे ना कोणी येणार.

  • सलिल,
   मेटे आणी खेडकरानी ते केलं.. इतिहासाची पानं बदलली.. बाळासाहेबांनी पण नुसती डरकाळी फोडली, की हे आम्ही सहन करुन घेणार नाही .. पण बदलला पाठ्यक्रम.. काय झालं पुढे?? काहिच नाही..म्हणुन म्हणतोय, काहीही होऊ शकतं..

 6. पवन says:

  अगदी बरोबर !! हा इतिहास घडायला वेळ लागणार नाही. शेवटी जो राज्य करतो तोच इतिहास लिहितो .. इतिहास फक्त जिंकानारेच लिहितात !!

 7. Sagar says:

  Khar aahe..Siva ha ullekh hava hota…Karan muslim rajykaerte kadhi hi Maharajana kinva konachyahi nava pudhe ‘ji’ lavat nasat…An mala khatri aahe asa itihas kadhi hi lihila janar nahiKaran itihas premi aaj hi Babasahebana olkhatat Metela nahi

 8. वरील चारही प्रतिक्रियांशी सहमत. 🙂

  • कांचन,
   इतिहासाची पृष्ठं अशीच बदलणं सुरु राहिलं तर पुढे काय होऊ शकेल याची ही एक फक्त झलक आहे. असं होण्यास आपलीच माणसं जबाबदार आहेत. पुर्वी जयचंद आणि जावळीकर होते… आता ’हे’…..!

 9. sahajach says:

  महेंद्रजी पुन्हा एक प्रचंड व्याप्ती असलेला विषय….परखड जमलाय…..जेव्हा दादोजी कोंडदेवांचा अनुल्लेख कोणालाही खटकेनासा होतो तेव्हा भविष्यात हे असेच होणार….
  आणि महाराजांचा उल्लेख एकेरी केलात याचे वाईट वाटून घेउ नका कारण तो जाणता राजा आपला होता…..आणि देवाचाही उल्लेख आपण एकेरीच तर करतो!!!
  बोच वाटते ती स्वत:बाबत, याची की आपला हा चिडचिडाट, त्रागा म्हणजे नक्राश्रू ढाळणे तर नाही ना…कारण हे भविष्य बदलण्यासाठी आपण काहीही करत नाही!!!!!

  • करु शकतो ना आपण, ह्या पुढे असा काही ठराव आला की त्याच्या विरोधात गदारोळ माजवायचा. वृत्तपत्रे हाताशी धरायची वेळ पडल्यास.. सामना वगैरे साथ देईल असं वाटतंय तर खरं… मराठी माणसाचा आक्रोश इतका दुर्लक्षीला जाणार नाही असे वाटते..

 10. REMESH says:

  Very good But why 2359, it will happen in coming 20 years.

  See attached wed site. Muslims in UK R saying Queen should wear burkha & Sariya should be implemented in UK in front of UK police in English. http://islamizationwatch.blogspot.com/

 11. Vinayak says:

  JabaRya
  He ghadanar lavakarach
  yach vishayvaracha ek lekh gelya aathavadyachya lokprabhat aahe jarur vacha

  • गेल्या आठवड्यातला वाचला ना लोकप्रभा, पण त्यात कुठला लेख म्हणताय? लिंक देता येइल??

 12. नक्की कधी हे सांगू नाही शकत, पण शक्य आहे हे सगळं एवढं नक्की.

 13. akhiljoshi says:

  वरील सर्व प्रतिक्रियेशी सहमत आहे
  जगदंब जगदंब…

  प्रतापगड इथून फार लांब नाहीये….
  त्यामुळे पहिले आम्हीच…………..

  जे म्हटलंय त्या काळातील कवीने ते किती खरे आहे…………
  महाराज खरच नसते तर?

  मत पेट्यांच्या calculation मध्ये जोपर्यंत
  आपले राजकारणी गुंतले आहेत तोपर्यंत काही आपले खरे नाही…
  त्यांना मतांशिवाय काही दिसत नाही………… आणि ती हि समाज किवा धर्मावर आधारित….
  स्वताच्या कर्तुत्वावर कुणी निवडून येईल अशी तसूभरही अशा दिसत नाही…..

 14. Milind Mohan Arolkar says:

  भन्नाट लिहिलंय….
  हे सत्य तुम्हा आम्हाला जाणवतं पण ज्यांना आपण निवडून देतो, त्यांना का जाणवत नाही? की निवडून आलं की जाणीव संपते?
  मतांसाठी भारताच्याच नाही तर स्वतःच्याही इतिहासाला ही बदलणारे राज्यकर्ते आपल्याला लाभलेत…किंवा we deserve them….मिलिंद

  • मिलिंद
   ह्या विषयावर तर अजुन चांगला लेख होऊ शकला असता. पण आपलया, ’काय वाटेल ते’ प्रणालीमधे फार विचार करुन लिहिलेलं चालत नाही. जे काही उत्स्फुर्त लिहिलं जातं ते तसंच ठेवतो..चुकिचं असलं तरिही… विनोदाचा भाग जरी सोडुन दिलात तरिही अशा प्रकारच्या घटना भविष्यात सहज शक्य आहेत..

 15. milind kurbetkar says:

  as kadhich honar nahi
  maharajanchya rajyala hat lavu shakel asa madrach tayar hou shakat nahi

  • हा केवळ एक कल्पना विलास आहे. जर आपलं शासन असं मेटे खेडकरांच्या नादी लागुन इतिहास बदलायला लागलं, तर काय होऊ शकेल ह्याची काहीच खात्री देता येत नाही.

 16. siddhesh says:

  2359 kashala
  hach etihas aaj kadachit pakistanat shool madhe mulana shikvla jat asel…..
  yach pramane ‘1857 swatantracha ayashaswi ladha’ he aapan shiklo tasa aaj pak madhe ‘1999 cha ayashaswi kargil ladha’ asa shikwat astil.
  what u say?

 17. geetapawar says:

  hye muslim aali majun mokle. pan nakki kay aahe ka marle afjal kahnala chyache kai kartut he nahi sagnar. ti 1 mhan aahena makad kai mahnte majhi lala tasa ha prakar aahe…aajche mulsim lekhak kadhi hi dusryan var aauv aananar……………………….purna khulasa na karta…gajav pana gajvnar.pan tya kalat shivaji maharaj hi saglyancha aadar karaiche….kahi nahi kaka kontya tari rajy karane paise dile aastil aasa lekh lihaila shivajinyac ulat baki kahi nahi..

 18. Manish D. Deogaonkar says:

  hello,
  hya lekhabaddal me abhipray det nahi. Pun Boss tumchya ya kayvatelte.com la agadi manapasun salute. Me netcha kida zalo aahe.
  but asa must blog pahnyat ala nahi.
  Manish

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s