लोकमत मधे लेख..

काही दिवसांपूर्वी लोकमत मधे माझ्या ब्लॉग वरचा एक लेख छापून आला होता. त्या लेखाखाली क्रेडीट्स मात्र देण्यात आले नव्हते, म्हणून लोकमत च्या संपादकीय विभागाशी पत्रव्यवहार केल्यानंतर २६/११/२००९ च्या सखी या पुरवणीमधे हा लेख माझा आहे असा खुलासा छापून आलेला आहे.

सखी मधे आलेला काय वाटेल ते वरचा लेख

सखी मधे आलेला काय वाटेल ते वरचा लेख

त्या लेखाची लिंक इथे दिलेली आहे.. ( लोकमत फक्त इंटरनेट एक्ल्पोरर वरंच उघडतं-

काय झालं?? खोटं वाटतंय?? अहो खरंच सांगतोय.. फायरफॉक्स वर उघडत नाही हा पेपर, फॉंट्स सपोर्ट करित नाही. पुर्वी लोकसत्ता पण उघडत नव्हता, पण हल्ली त्यांनी फॉंट्स बदलल्यामुळे कुठल्याही ब्राउझर वर पेपर उघडतो. आता जर लोकांना काय हवंय हे न समजून घेता, आम्हाला हे हवं ते आम्ही करु , आम्हाला हवा तो फॉंट वापरु असं म्हणणं असतं पेपरवाल्यांचं.. असो..

एखादा टेक्निकल ऍडव्हायझर ठेवायला हरकत नाही प्रत्येक पेपर मधे…खरं सांगायचं तर आपलं लिखाण हे वृत्तपत्रांमध्ये छापून येणाऱ्या लेखांप्रमाणे बॅल्स्न्ड कधिच नसतं.  बहुतेक वेळेस लिहितांना मी इथे माझे व्ह्युज लिहितो- जे बहुतेक वेळेस  एकांगी   असतात. पण प्रत्यक्षात वृत्तपत्रांमध्ये इतके स्पष्ट पणे लिहिलेले व्ह्युज कधीच छापून येत नाहीत. प्रत्येक बातमी ही “कळते”, ’समजते”, ’असु शकते” अशा स्वरुपाची असते. असो…

काय वाटेल ते.... मधे हा लेख मार्च ७,२००९ ला लिहिला होता.

आजकालच्या पत्रकारितेमधे निर्भिडपणे विचार मांडणारे वृत्तपत्र म्हणून मी फक्त  मुंबईच्या नवा काळचे नांव घेइन. मला इथे बसून तुमच्या कपाळावरच्या आठ्या दिसताहेत.. 🙂 नवा काळ हा गिरणी कामगारांनी वाचायचा पेपर.. आणि त्याला मी निर्भीड का म्हणतो असा प्रश्न पडला असेल .. पण त्या पेपरमधे छापून येणाऱ्या प्रत्येक विषयाशी संपादक प्रामाणिक राहुन स्वतःला पटेल तेच लिहितात. नवाकाळचा अग्रलेख पण मला वाचायला आवडतो..

असो विषय भरकटतोय.. आजचं पोस्ट हे फक्त लोकमत ने खुलासा छापलाय ही गोष्ट तुमच्याशी शेअर करायला म्हणून लिहिलंय.. नवा काळ वर नंतर कधी तरी लिहीन..

बाय द वे, तो खुलासा असलेला अंक मी अजुन पाहिलेला नाही, आणि नेट वर पण तो अ्पलोड झालेला नाही, म्हणून इथे लिंक देता येत नाही. मुंबईला ती पुरवणी मिळाली नाही, अन्यथा स्कॅन करुन टाकता आलं असतं..

या सगळ्या प्रकरणात, “कळते समजते” ने माझी बाजू मांडली, आणि साथ दिल्या बद्दल त्यांचा सदैव ऋणी राहीन. तसेच सगळ्या वाचकांच्या शु्भेच्छां साठी पण मनःपुर्वक आभार..

About महेंद्र

माझा ब्लॉग :- http://kayvatelte.com
This entry was posted in Uncategorized. Bookmark the permalink.

32 Responses to लोकमत मधे लेख..

 1. bhaanasa says:

  महेंद्र आला का खुलासा छापून….:) तरी बराच वेळ घेतलाच त्यांनी. पण निदान छापला हे ही नसे थोडके. मलाही इथून लोकमत दिसत नाहीच. त्यामुळे पाहता येणार नाही. तुला मिळाला की तूच पाठव. आता हे तू त्यांचा पाठपुरावा केलास म्हणून झाले रे…पण असे आधी किती जणांचे छापून मोकळे झाले असतील कोण जाणे….:(
  अभिनंदन!

  • २६ तारखेलाच आलाय, पण मुंबईला पुरवणी न मिळाल्यामुळे पहाता आलं नाही काय आलंय ते..
   मेल पाठवतोय तुला..

 2. Abhijit says:

  abhinandan. Sadhya bhartat aloy. Tari pan blog vachla. Changle zale. Lekh Dhapnarya patrakara chi vat lagel ata appraisal madhe 😀

 3. अरे वा.. very good. चांगली अद्दल घडवलीत त्या लोकमत फेकमत ला… “आता जर लोकांना काय हवंय हे न समजुन घेता, आम्हाला हे हवं ते आम्ही करु , आम्हाला हवा तो फॉंट वापरु असं म्हणणं असतं पेपरवाल्यांचं.. असो.. एखादा टेक्निकल ऍडव्हायझर ठेवायला हरकत नाही प्रत्येक पेपर मधे…” हा हा हा चांगला चिमटा काढालयात हा 🙂 … खुलाशाची लिंक नक्की अपडेट करा…

  • हेरंब,
   खरंच खुप वैताग येतो असे कुठले तरी विचित्र फॉंटस वापरले की. लोकमत, तरुण भारत ह्यांचे पण असेच आहे. मी अगदी मनापासुन म्हंटलं, की या लोकांनी टेक्निकल ऍडव्हाइसर ठेवायलाच हवा, म्हणेज पेपर सगळ्या लोकांपर्यंत पोहोचेल.

 4. बरं झालं खुलासा छापला ते. अंत भला तो सब भला.

 5. आनंद पत्रे says:

  एकदाचं मेहनतीला फळ आलं म्हणायचं!!
  नाशिक आवृतीत आहे का तो खुलासा ?

  • हो , नाशिक आवृत्ती मधे आहे तो खुलासा. सखी सगळ्या महाराष्ट्रात एकच असते. फक्त मुंबईला मिळाली नाही ..नाशिकला २६ ला आलेल्या सखी मधे आहे तो खुलासा..

 6. सचिन उथळे says:

  खुप वेळ घेतला लोकमत वाल्यानी खुलासा करायला.

  ब्लाग चा नवीन अवतार छान आहे.
  वरच कार्टुन तर मस्तच आहे.

  • सचिन
   वरचं कार्टुन सारखं बदलत रहाण्याचा विचार आहे. म्हणजे ऍटलिस्ट आठवड्यातुन दोन तिन दा तरी..

 7. अभिनंदन काका.
  राडा, भांडण, किरकोळ बाचाबाची किंवा अगदी ५ रुपयासाठी रिक्षावल्याबरोबर झगडून जेंव्हा आपण जिंकतो किंवा बरोबर ठरतो तेंव्हा बाब कितीही क्षुल्लक असली तरी आनंद होतोच. “लोकमत”च्या बाबतीत तर तुम्ही न पाहिलेल्या, न भेटलेल्या लोकांना गेम दिलात. केवळ लेखणीच्या आणि इंटरनेटच्या जोरावर. “कलम मे ताकत होती है” वैगरे संवाद चित्रपटात ऐकले होते आणि ते संवाद आजच्या जगात देखील अगदीच फुसके नाहीत ह्याची खात्री पटली.

  • सिध्दार्थ
   इंटरनेट च्या जोरावर बरंच काही केलं जाउ शकतं. या आधी एकदा जेंव्हा इंटर्नेट नव्हतं तेंव्हा पीडब्लुडी च्या लोकांच्या नाकी ऩउ आणले होते. एक टेंडर होतं ज्यामधे मी जे प्रॉडक्ट विकत होतो ते अप्रुव्हड लिस्ट मधे नव्हतं.त्या साठी चिफ सेक्रेटरीला नागपुरला माणुस पाठवावा लागला होता मला भेटायला. अजुनही नौकरी करतोच आहे, आणि त्या लोकांशी अजुनही संबंध आहे म्हणुन पोस्ट लिहित नाही यावर..पण तो एक मस्त अनुभव होता. सुप्रीटेंडींग इंजिनिअर वैतागला होता…

   एकच प्रिन्सिपल होतं, म्हंट्लं, आयदर फाइट विथ मी…. ऑर जॉइंन हॅंड्स विथ मी.. सिंपल फंडा आहे आयुष्याचा…. 🙂

 8. खुलासा छापण्यास उशीरच झाला. माझ्याकडे IE असूनही खुलासा छापलेला सखीचा दुवा उघडत नाहीये. त्यांनी खुलासा छापला हेच खूप झालं म्हणायचं. असा प्रकार आपल्या बाबतीत दुस-यांदा घडला. जे आपल्याबाबतीत घडू शकतं ते माझ्याही बाबतीत घडू शकेल, असा विचार मनात आला म्हणून मीही माझ्याकडून एकईमेल रविंद्र राऊळ यांना लिहिलं होतं. हा त्याचा दुवा. ईमेलला उत्तर आलं नाही मात्र, समस्येचं निराकरण झालं हे पाहून आनंद झाला.

  • रविंद्र रा़ऊळ यांच्याशी पण बोलणं झालं होतं. ते अगदी त्यांना काहिच ठाउक नाही अशा आविर्भावात बोलत होते माझ्याशी.. मला हेच समज्त नाही, की मुख्य संपादका सारखा माणुस असे अन्प्रोफेशनली कसं काय वागु शकतो?? एकाही मेल चे उत्तर देण्याचे सौजन्य त्यांची उपसंपादक सुटीवरुन परत येईपर्यंत कोणिच दाखवले नाही. इव्हन राजेंद्र दर्डा जरी राज्य सभेचा मेंबर झाला तरिही बेसिक माणुसकीच्या गोष्टी त्याला शिकणे आवश्यक आहे असे वाटते.. त्याने पण इ मेल चे उत्तर दिलेले नाही.. !!

 9. चला खुलासा केला त्यानी या गोष्टीचा..देर आए दुरुस्त आए…अभिनंदन…

  ब्रेकिंग न्यूज:
  आय.बी.एन. च्या कार्यालयावर झालेल्या हल्ल्याचा सूत्रधार सुनील राउत नसून या हल्ल्यामागे एका मराठी ब्लॉगरचा हात असल्याचे आमच्या विश्वसनिय सुत्रांकडून आम्हाला कळले आहे. 🙂

 10. हास्यास्पदच आहे हे सर्व! मी जेव्हा त्यांच्या मुंबई कार्यालयात फोन केला तेव्हा सुरूवातीला सर्व ऐकून घेतल्यावर त्यांनी सरळ फोन ठेवून दिला. दुस-या वेळेस मला १० मिनिटे होल्डवर ठेवून मग फोन बंद केला. तिस-या वेळेस त्यांना बहुधा कळलं असावं की ही फोनाफोनी बंद होणार नाही म्हणून चार-पाच जणांकडून फोन इकडे तिकडे फिरवून शेवटी उत्तर मिळालं. बोलणा-याने आपण रविंद्र राऊळ आहोत असं सांगितलं. खरं खोटं त्यालाच माहित. कॉपिराईटचा भंग म्हणजे जणू नित्याचीच बाब असल्यासारखं, “हो का? असं? अच्छा!” अशी उत्तर देऊन त्यांनी मला राऊळांचं ईमेल दिलं. त्यांच्या साईटवर एक फिडबॅक फॉर्म मिळाला, तिथेही मी प्रतिक्रिया दिली होती.

  महेंद्रजी, हा प्रकार माझ्याबाबतीतही एकदा घडला आहे. फक्त तो कुणा वृत्तपत्रवाल्याने केला नव्हता. मात्र, मायबोली, मनोगत, मिसळपाव आणखीही कितीतरी संकेतस्थळावर त्या महाभागाने माझ्या कविता स्वत:च्या नावावर खपवल्या होत्या. त्याला मिळालेल्या प्रतिक्रियांना त्याने, “आई सरस्वतीचा अशिर्वाद, गणपतीची कृपा’, वगैरे वगैरे अशी उत्तरं दिली होती. हसावं की रडावं कळेना. म्हणून जेव्हा तुमच्याबद्दल वाचलं तेव्हा खूप चीड आली. आपण लिहितो ते आपल्या आनंदासाठी आणि दुस-यांशी हितगूज करता यावं म्हणून. ते कुणी छापू नये असं नाही पण ऋणनिर्देश करणं इतकं काही कठीण नसतं.

  आपापल्या ब्लॉग्सवरील लेखांतून जे विचार मांडले जातात, त्यात मतांतरे असू शकतात. मात्र ह्या सार्वत्रिक समस्येविरुद्ध सर्व ब्लॉगर्सनी एकी दाखवावी असं मला वाटतं. तुमचा लेख चोरला गेला म्हणून तुम्ही पत्र लिहिलंत. त्याचबरोबर इतर ब्लॉगर्सनीही पाठींबादर्शक पत्र लिहिलं असतं, तर या चौर्यकर्माचा खुलासा त्या वृत्तपत्राने लवकर छापला असता. ब्लॉगेटिकेट्स नावाचा तुमचा लेख सर्व ब्लॉगर्सनी आणि असे लेख चोरू पाहणा-या प्रत्येकानेच वाचावा अशी माझी तीव्र इच्छा आहे.

  तुम्ही ब्लॉगवर टाकलेले कार्टुन्स खूप छान आहेत. त्यांना पाहून व्होडाफोन झुझूंची आठवण झाली.

  • “आई सरस्वतीचा अशिर्वाद, गणपतीची कृपा”, अस काही लिहाणारा म्हणजे रिक्षावाला असु शकतो. त्यांना सवय असते असलं लिहायची. खूप हसायला आलं हे वाचून. आयटम असतात एक एक…

  • अशा बाबतित एकी आवश्यक आहे. आपण काही प्रो ब्लॉगर्स नाही. पण असं कधी झालं तर कुठे जायचं? कोणाकडे तक्रार करायची , कॉपी राईट कायदा काय आहे? हे सगळं थोड्या फार प्रमाणात माहिती असणं आवश्यक आहे. मला बऱ्याच पत्रकार मित्रांनी पण मदत केली. त्यांची नावं मुद्दामच इथे लिहित नाही. ब्लॉगेटिकेट्स जरा खाली गेलाय, एक नविन पेज उघडुन वर काढतो. म्हणजे कधी तरी..वाचला जाईल.

   बरं जे झालं ते झालं, कमीत कमी प्रोफेशनल कर्टसी म्हणुन मेल तरी ऍक्नॉलेज करायला हवा होता. माझा काका गेली ४० वर्ष पत्रकारीते मधे आहे, त्याने सांगितले म्हणुन प्रेस काउन्सिल बद्दल समजले नाहितर ह्या लोकांनी कधीच दाद दिली नसती.तुम्ही कितीही पत्र पाठवा, गेंड्याची कातडी असलेले आहेत हे लोकं.

   एक सांगतो, त्यांची ती उपसंपादिका खुपच सेन्सिबल वाटली. ( असंही म्हणावसं वाटलं, ” अहो मॅडम, तुम्ही तर इतक्या चांगल्या आहात, मग या फालतु कंपनीत कशाला काम करता? दुसरीकडे पहा जॉब कुठे तरी”….) म्हणे , त्या सुटीवर होत्या म्हणुन रिप्लाय ला वेळ झाला.
   —–मी तर मेल संपादकांना पाठवला होता. तेंव्हा संपादकाची काही जबाबदारी नसते कां उत्तर वगैरे द्यायची?? आणि राजेंद्र दर्डा?? असो…
   कोणाला सुसंस्कृत समाजात कसं वागायचं असतं हे शिकवणं आपलं काम नाही…. द पर्सन बिहेव्ज द वे द कंपनी ही किप्स…. यावरुन समजुन घ्या… 😀

 11. vijay says:

  महेंद्रजी, हा ब्लाॅगसर्चा विजय आहे.
  मराठी ब्लाॅग आता खूप समृद्ध होत आहेत. ही चळवळ आणखी वाढली पाहिजे. आपल्याकडील प्रतिभा आणि ज्ञान इतरांसाठी उपलब्ध करून देणारे हे चांगले माध्यम आहे. इंटरनेटवर इकडेतिकडे भटकणारे, फालतू गोष्टीच वेळ घालणारी डोकी आणि हात याकडे वळविली पाहिजेत. आपल्यासारख्यांनी यात पुढाकार घेतल्यास काम सोपे होईल.

 12. Rajeev says:

  लोकमत रद्दीत गूंडाळून ठेवलेली ( शीत कपाटात) पालेभाजी ही ईतर पेपरच्या तूलनेत लवकर “सडते”..

  ई त र पेपरच्या भाज्या फ़क्त “खराब” होतात

 13. laxmi says:

  congrats!!!
  You won d battle finally 🙂

 14. Aparna says:

  अभिनंदन!!! एकदाचे नमले म्हणायचे सध्या वर्क आउट चालु आहे का? profile cartoon वरुन असं वाटतंय

  • हो ना. सध्या पोटाच्या माठाची सुरई करण्याचा प्रयत्न करणे सुरु आहे. रोज सकाळी एक तास मॉर्निंग वॉक करतो.. बस्स.. आणि गोड बंद केलंय.. बघु फायदा होइल तर.. 🙂

 15. Jitendra K. Pustakar says:

  Mala Maza Lekh LokmatCha Purwanimadhe Pathawacha aahe.
  Maze Vishay MARAN

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s