पेपरलेस?…

काही दिवसांपूर्वी व्होडाफोन चं बिल आलं.. आता नेहेमीच तर येतं ते.. त्यात विशेष काय? तर विशेष म्हणजे माझं लक्षं गेलं ते त्या बिलावर लिहिलेल्या एका लहानशा ’नोट’ कडे. त्या नोट वर लिहिलं होतं, की “पेपरच्या ३००० शिट्स बनवण्यासाठी एका मोठ्या झाडाचा बळी जातो” .आणि खाली इ मेल मधे बिल हा ऑप्शन द्या म्हणून विनंती केलेली होती.

आता एक्झॅक्टली असंच काही तरी आयसीआयसीआय च्या क्रेडीट कार्ड च्या बिलावर पण वाचण्यात आलं. त्यात पण त्यांनी इ मेल वर बिल मागवा अशी विनंती केली होती.   त्यात बॅंकेने अशी काही नोट टाकलेली नव्हती, की  पेपर वापरल्यामुळे पर्यावरणाचे किती नुकसान  होतं ते  , त्यामुळे बॅंकेच्या त्या विनंती चा परिणाम  फक्त “बॅंक आता पैसे वाचवायचा प्रयत्न करते आहे” एवढाच झाला होता.

जसे  अंबानी कडून काहीही ऑफर आली तरीही त्यात त्याचाच काही स्वार्थ असेल असे वाटते की नाही.. अगदी तशीच स्थिती ( म्हणण्यापेक्षा रेप्युटेशन)  आयसीआसीआय बॅंकेची पण आहे. 🙂

पण जेंव्हा व्होडाफोनच्या बिलावर वाचलं की  फक्त ३००० शिट्स तयार होतात एका झाडापासून, तेंव्हा एक  जबाबदार नागरिक म्हणून मी इ मेल चा ऑप्शन दिला त्यांना. म्हट्लं आपलाही तेवढाच हात भार !

बरं आता मी तो बिल इन इमेल चा ऑप्शन जरी दिलाय तरीही मला बिलाची प्रिंटॆड कॉपी अजूनही पाठवली जाते. बॅंकांना पण स्टेटमेंट्स बाय इ मेल हा ऑप्शन एनेबल केला आहे. बॅंकेनी मात्र अगदी ताबडतोब पेपर बिल पाठवणं बंद केलंय.

आजचा रविवार. रविवारी आमच्या घरी सगळे पेपर येतात, म्हणजे मटा,लोकसत्ता, सकाळ, डिएनए, टाइम्स, मिरर वगैरे. तर प्रत्येक पेपर मधे चार हॅंडबिलं होती. जवळपास ३० हॅंडबिल्स जमा झाली .  हे असे इतके हॅंडबिल्स हजारोंच्या संख्येत छापून  आपण पर्यावरणाला किती नुकसान पोहोचवतो आहे ह्याची जाणिव ते  छापणाऱ्याला व्हायला हवी. जर छापलेच, तर प्रत्येक पेपर मधे हॅंड बिल्स टाकण्यापेक्षा, प्रत्येक घरात एक टाकले तरीही काम होऊ शकते..

पेपर चा वापर कमी करण्यासाठी बरंच काही केलं जाऊ शकतं. जसे प्रिंट काढणे शक्यतो बंद करावे. आजही असे बरेच लोकं पहाण्यात आहेत की इ मेल आला की त्याचा प्रिंट काढून फाइल करुन ठेवतात, किंवा त्यावर पेनने कॉमेंट टाकुन सबॉर्डीनेट्स ला देतात. प्रिंट न काढता, सरळ इ मेल ने फॉर्वर्ड केले तरीही काम होऊ शकते.. म्हणून हे टाळा..एखादा दहा पानांचे स्टेटमेंट असेल, आणि त्यातलं केवळ दहावं पान कामाचं असेल, तर केवळ दहाव्या पानाचा प्रिंटाउट काढावा-सगळ्या दहा पानांचा नाही.. फायलिंगचे पेपर दोन्ही साईडला प्रिंट करा, असे केल्यास पेपरचा वापर निम्मा होऊ शकतो.

स्वतःचे ऑफिस असल्यास सगळ्या फाइल्स एका कॉमन सर्व्हर वर बॅक अप घेउन ठेवा. या साठी तुमचा कॉम्प्युटर लॅन वर घेतला की ऍटोमॅटीक बॅक अप घेण्याची पण सोय केली जाऊ शकते. म्हणजे तुमच्या पिसी वर तुम्ही जे काही सेव्ह कराल, त्याची एक कॉपी बाय डॉफॉल्ट सर्व्हर वर सेव्ह होईल.

आधी आमच्या ऑफिस मधे पिपल सॉफ्ट (जेडीएडवर्ड्स) चं ई आर पी सॉफ्टवेअर होतं, सध्या एस ए पी सुरु झालंय. त्यामुळे पेपरचा वापर कमी झालेला आहे, पण पुर्णपणे संपलेला नाही.

जंगलतोड  जर या कामासाठी – म्हणजे पेपर बनवण्यासाठी होत असेल तर ती थांबवण्यासाठी शक्यतो सगळे प्रयत्न करायला हवेत.आपला पण काही हात भार लागत असेल, तर तसे जरुर प्रयत्न  केले पाहिजे.

आपण आता इ ट्रेडींगच्या युगात आहोत, पण अजूनही  सगळे शेअर डिमॅट झालेले आहेत. पण अजूनही १००-१५० पानांचा वार्षिक अहवाल हा प्रत्येक कंपनी पाठवते. करोडो कागद  या साठी वापरली जातात. पिडीएफ फॉर्मेट् मधे असे रिपोर्ट  ई मेल ने पाठवले तर हा खर्च वाचु शकेल. आमच्या सारखे शेअर होल्डर्स तर सरळ हे रिपोर्ट रद्दी मधे टाकतो.  एवढंच नाही ,तर वेळोवेळी  बोर्ड मिटींगच्या माहितीची पत्र पण येत असतात, ज्या इ मेल द्वारा पाठवल्या ्जाऊ शकतात……  या बाबतीत लोकजागृती आवश्यक आहे..

पेपर वाचवण्याच्या अर्जुनही बऱ्याच कल्पना असतील, जर तुम्हाला काही नॉव्हेल आयडीया माहिती असतील तर इथे लिहू शकता.. कॉमेंट्स मधे..

About महेंद्र

माझा ब्लॉग :- http://kayvatelte.com
This entry was posted in सामाजिक and tagged , , , . Bookmark the permalink.

44 Responses to पेपरलेस?…

 1. apashchim says:

  namaskar ,
  sankalpana khup chhan aahe .
  we try to print the proof of dtp on one side used paper .

  • प्रत्येकानेच थोडा विचार केला तर खुप फायदा होऊ शकतो..फायनानशिअल बेनिफिट्स तर आहेतच, सोबत पर्यावरणाला पण हात भार लागतो आपला- कळत नकळंत..

 2. Rajeev says:

  १) सर्व ऐअर पोर्टवर पीण्याच्या पाण्याचे पेपर कप बंद करून फ़ाउंट्न ठेवावे.
  २) हात पूसायचे पेपर टोवेल बंद करावे.
  3) टीशू पेक्शा पाणी
  4) शाळा कोलेज मधे वह्या बंद करून फ़ाईल वापराव्या.
  5) लग्न पत्रीका पो स्ट कार्ड साईज मधेच ठेवाव्या.
  6) ई पेपर / बूक्स चा जास्त वापर करावा.
  7) शालेय पुस्तके ह्स्तांतरीत करत ४-५ वेळा वापरावी.
  7) ह्स्त पत्रके बंद करावी.
  9) बाल वर्गात कागदा पेक्शा पाट्या द्याव्या..

  स्वामींचा सल्ला..
  १)सर्व लोकांना नीरक्शर ( कागदशत्रू ) राहू द्यावे…
  २)किंवा धूळ पाट्यावर शीकवावे
  ३) लोकमत सारखे पेपर बंद करून “दर्डा- दवंडी” चालू करावी

 3. आनंद पत्रे says:

  पेपर प्लेट्स आणि पेपर ग्लासेसचा वापर बंद करु शकतो.
  टॉयलेट पेपर जरी टाळु शकलो नाहित तरी पेपर नॅपकिनचा वापर नक्किच कमी करु शकतो.

  • जर पेपर प्लेट्सचा वापर टाळला, तर ते थर्मोकोल प्लेट्स वापरतिल. आणि तसंच ग्लासेस बद्द्ल. सरळ चेन बांधुन स्टिलचा ग्लास ठेवावा ? 😀

   • आनंद पत्रे says:

    कागदावरची सबसिडी काढुन टाकल्यावर लोकांना आपोआप इतर उपाय सुचतिल…. 🙂

 4. Aparna says:

  या विषयाशी संबंधीत एकदा लिहिलं होतं….

  http://majhiyamana.blogspot.com/2009/04/blog-post_19.html

 5. ….. ई-बिलिंग सबस्क्राईब करुनही मला मात्र आयडियाची पेपरबिलं अजुनही येतात!

  आपण आता इ ट्रेडींगच्या युगात आहोत, पण अजुनही सगळे शेअर डिमॅट झालेले आहेत. पण अजुनही १००-१५० पानांचा वार्षिक अहवाल हा प्रत्येक कंपनी पाठवते.

  – अगदी खरंय, कोण वाचणार हो हे सारे अहवाल. अंबानींचं तर मस्त मॅग्झिन स्टाईल अहवाल येतो.

  • मी तर दोन वेळा मेल पाठवलाय, तरीही पेपर बिलं अजुनही येतात. पुन्हा एकदा खडसावलं पाहिजे त्यांना..

 6. rohan says:

  आत्ता पर्यन्त काम केलेल्या तीनही ठिकाणी असताना ‘save paper’ ह्या विषयावर मी एक प्रेझेंटेशन केल होत. ‘Nature Gives u a lot … What Do we return’ असे नाव ठेवले होते मी. सर्व स्टेटमेंट्स मी इ-मेलनेच घेतो. HSBC च्या मेल्स मध्ये खाली मजकुर असतो. ‘Think Before U Print … Save Trees Save Mother Earth … ‘

  आमच्याकडे प्रिन्ट हवीच असेल तर डबलसाइडेड (पानाच्या दोन्ही बाजुला) घेतली जाते. महत्वाच्या कागदांची एका बाजूने प्रिन्ट घेतलीच तर नंतर एका बाजूने वापरलेला कागद न फेकता रफ पेपर म्हणुन वापरला जातो. trash म्हणुन टाकलेला कागद री-सायकल केला जातो. शिवाय कंपनी दरवर्षी अनेक देशांमध्ये वृक्षारोपणाचे काम करते.

  थोडक्यात आमच्याकडे ‘Waste Management पोलिस्य’ आहे…

  • अतिशय चांगली पध्दत आहे. आणि असंच व्हायला हवं….
   फक्त शासकिय कामाचे कागदच प्रिंट काढावेत. पुर्वी रफ कामाला कागद लागायचे, हल्ली रफ काम हे नसतेच, त्यामुळे जुने कागद तर उगिच वाया जातात.

 7. rohan says:

  पेपर प्लेट्स, पेपर ग्लासेस, टॉयलेट पेपर, पेपर नॅपकिन, टिशु हे सर्व वापरलेल्या कागदापासून बनवले जाते तेंव्हा ते बंद करण्यापेक्षा पाणी वाचवण्यासाठी तो अधिक उत्तम पर्याय आहे.

  या उलट लाकडी फर्नीचर न वापरता बाम्बूचे वापरावे. (बाम्बू फटाफट उगवतो.)

  • बांबुचे फर्निचर.. हा पण एक चांगला उपाय होऊ शकतो. आजकाल तर इथे सगळं भुशापासुन बनवलेलं फर्निचर मिळतं. मलेशियन वुड च्या नावाखाली. ते स्वस्त पण आहे आणि चांगलं पण दिसतं.

  • मी says:

   बांबुच्या फर्निचर्मधे ढेकून होतात 🙂

 8. ravindra says:

  पेपरलेस म्हणणे सोपे आहे पण तसे होत नाही. सर्वात जास्त वापर नुजपेपर साठी होतो. तुम्ही राग मानू नका पण तुमच्या घरी रविवारी खूप पेपर येतात असे तुमच्या पोस्ट मध्येच लिहिले आहे. म्हणजे अर्धा किलो रद्दी तरी जमा होत असेल. कारण टाईम्स, डी एन ए, मिरर यांचे वजन खूप असते. मला वाटते जर सर्व सुशिक्षितांनी ऑन लाईन पेपर वाचला तर किती तरी झाड वाचतील. पण त्या पेपर इंडस्ट्रीच काय होईल? किती कामगार बेरोजगारहोतील?
  असो इतर काही उपाय सुचवीत आहे.पण ते न पेलवण्यासारखे आहेत.
  १) पेपरच्या पिशव्या सामानासाठी न वापरणे.
  २) कच्च्या लिखाणासाठी कागद न वापरता काम्पुटरवर च लिखाण करणे.
  ३) औषधाच्या बाटल्यांसाठी कागदाचे खोके न बनविणे.
  ४) बिस्कीट व इतर खाद्य पदार्थांसाठी कागदी रेपर न वापराने
  ५) लग्न पत्रिका पोस्टकार्ड सारखी एकपानी असणे. त्याची साईज निश्चित करणे. व त्याच आकाराची पत्रिका सर्व दूर प्रत्येकासाठी उपलब्द करून देणे.
  ६) मोठ्या उपकरणांसाठी कार्ड बोर्डचे मोठ मोठे खोके तयार केले जातात. ते अनावश्यक वाटतात.
  ७) ग्रीटिंग कार्ड न वापरणे. एस एम एस पाठवितोच कि आपण.
  असे किती तरी उपाय असतील पण ते उपाय योजने तितकेसे सोपे नाहीत. कारण त्याकामात फार मोठ्या प्रमाणात गुंतवणूक झाली आहे. व त्यावर खूप लोकं पोट भरत आहेत. ते बंद केले तर बेरोजगारी वाढेल.
  त्याला पर्याय आहे व तो मी माझ्या आजच्या पोस्ट वर देत आहे. कृपया ते वाचावे.

  • एक्झॅक्टली.. पेपरचं वजन हे सरळ सरळ एकॉनॉमीवर अवलंबुन असतं. जितकी फ्लरिशिंग एकॉनऑमी तितक्या जास्त जाहिराती.. आणि तितका मोठा पेपर. इतका मोठा पेपर फक्त ३-४ रुपयात म्हणुनच मिळु शकतो याचं कारण त्या जाहिराती जर जाहिराती काढुन टाकल्या तर मात्र पेपर लहान होऊ शकतो… पेपर चा कागद पण बहुतेक रिसायकल्ड असतो..पण पेपर कमी घेणं हा पण एक उपाय होऊ शकतो.
   तसेच पेपर वापरला नाही, तर इतर गोष्टी जसे, थर्मोकोल, प्लास्टीक यांचा वापर वाढणे अजुन वाईट. असं व्हायला नकॊ, की पेपर वापरणे कमी करुन …. !!

  • मी says:

   मी #2 सहमत नाही, कारण कच्च्या कामासाठी कॉम्प्युटर वापरताना खर्च होणारी वीज आणि डोळ्यावर येणारं रेडिएशन, हे त्यामानाने परवडत नाही. त्याशिवाय काही गोष्टींना लिमिटीटेशन येतात जसे – रेखांकन.

   • सहमत आहे. हा मुद्दा पण विचारात घ्यायलाच हवा. कारण जर डॊळॆ खराब करुन घेण्यात काहीच फायदा नाही..्रेखांकनासाठी पेन पण मिळतो ना हल्ली?? ऐकलंय कुठेतरी!

    • ravindra says:

     मी “मी”शी सहमत आहेच. पण माझा मुद्दा जी लोक मसुदा तयार करण्यासाठी कागदावर कागद फाडून फेकतात त्यांच्या साठी आहे. एखादा लेख लिहितांना किंवा कविता लिहितांना कागद फाडतो ना तसा. शेवटी अर्थ एकाच होतो की पेपर वाचणे ही सोडता येत नाही आणि झाड ही वाचविता येत नाही. गोळा बेरीज शेवटी एकचहोते.

 9. shilpa says:

  हे ग्लोबल वॊर्मिंग वगैरे चर्चे बिर्चेत नव्हतं तेंव्हा म्हणजे आम्ही शाळेत असताना माझ्या आईनं (ती खरोखरीची आदर्श शिक्शिका होती) एक नियम कडकपणानं घालून दिलेला होता-
  १- जुन्या इंग्र्जी कॆलेंडर्सच्या (पूर्वी बॆकांची वगैरे एकाच बाजुला तारखा असणारी कॆलेंडर्स भेट मिळायची ती जपून ठेवून) मागच्या कोर्या बाजुचा वापर घरचा अभ्यास करण्यासाठी करायचा
  २- शाळेचं वर्ष संपलं की लगेचच दुसर्या दिवशी वह्यांमधली रिकामी पानं फ़ाडून त्याची कच्ची वही बनवायची.
  माझ्या घरापुरतं मी हे अजुनही करते.

  • आमच्या कडे पण मुली अजुनही जुन्या वह्यांचे कागदं एकत्र करुन बाइंडींग करुन घरचा अभ्यास करायला वापरतात.

 10. मी says:

  १. कागद बनविण्यासाठी नवीन मार्ग शोधणे :कचर्‍यापासुन, शेणापासून कागद बनविता आला तर ?
  २. वेगाने वाढ्नारी झाडेच कागद तयार करण्यासाठी वापरणे, कागदासाठी झाडांची जात तयार करणे.
  ३. कागदाचा वापर ज्यात होतो, त्यामधील उपयुक्‍तेतेच्या परिपूर्णेतेसाठी नविन पर्याय शोधणे. [ वरील चर्चा या दिशेन आहे ..]

  ४. योगा-मेडिटेशन – टेलिपॅथी वर संशोधन करून काग्दाचा वापर कमी करणे 🙂

  • कल्पना चांगली आहे. जशी पाणवनस्पती.. तिचा पण चांगला वापर होऊ शकतो.. खुप जोमाने वाढते ती वनस्पती. दाल लेक मधे तर अक्षरशः हिरवळ झालेली आहे तयार..तिचा वापर केला तर ते लेक पण स्वच्छ होईल.. तसेच आपल्या पुण्याला मुळा मुठा मधे तयार होणाऱ्या हिरव्या वनस्पती- त्यांचा पण वापर केला जाउ शकतो. कमी पडल्यास, मुद्दाम लागवड करायला पण हरकत नाही.

 11. Rajeev says:

  सीगारेट सोडून बिड्या प्या..
  कागद वाचेल……………….

  • चिरुट ओढला तरिही हरकत नाही… 🙂 लै खास.. सुरुवात तुझ्या पासुन केली असती, पण तु सोडलीस ना.. 🙂

 12. sonalw says:

  मला वाटत कि कुठलीही उपाय योजना करताना तोल जाता कामा नये. जसे पपेर चा अतिरेक उपयोग टाळायलाच हवा. पण डोळस पाने उपाय जाहले नाहीत तर प्लास्टिक किंवा थर्माकोल चा वापर वाढेल.
  मला वाटत, आपण किमान पक्षी आपल्या पूर्वजांच्या जीवन शैलीशी शक्य तोवर फारकत घेवू नये. त्यातूनच बरेच प्रश्न सुटू शकतील.
  उ.द. paper napkins चा वापर, सहज टाळता येतो. खिशात एक रुमाल ठेवला कि ऑफिस मध्ये किंवा सार्वजनिक ठिकाणी गरजच पडत नाही paper napkins ची.
  सहलीला जाताना किंवा कुठेही लांब काही तासांसाठी जाताना पूर्वी आपल्या आया पिण्याच्या पाण्याबरोबर स्टील चा ग्लास सुद्धा घ्यायच्या.
  रद्दी पपेर च्या पिशव्या बनवल्या जायच्या. प्लास्टिक चा वापर हि त्यामुळे टाळायचा आणि पपेर रेच्य्च्ले होतो ते वेगळाच. किंवा सरळ कापडाची झोळी नेणे खरेदीला जाताना.
  जुन्या वह्यांचे कोरे कागद bind करून नवीन वह्या बनवणे इत्यादी बरेच जुने उपाय आज खूप महत्वाची भूमिका बजावू शकतात. माज्या सासूबाई तर जुनी बिल, बसची तिकीट टाकून न देता त्यावर वाण्याच्या याद्या बनवतात. वरवर पाहता जो कंजूष पणा वाटू शकतो तोच आपल्या पृथ्वीला अधिक वर्ष तगवू शकेल.

  • पुर्वी प्रवासाला जातांना वॉटर बॅग घेउन जायचो, सोबत कधी तरी एक सुरई पण असायची. आजकाल प्लास्टीकच्या बिसलेरी मुळे हे ’ओझं’ घेउन प्रवास करणं बंद झालंय. प्रत्येक माणुस सहजपणे एक बाटली घेतो विकत पाण्याची ट्रेन मधे बसला की.

   तुप , तेल आणायला घरुन डबा घेउन जावं लागायचं, दुध पण आणायचं तर भांडं बरोबर न्यावं लागायचं. प्लास्टीकने तर सगळी दुनियाच बदलुन टाकली..

   मला वाटतं , इथल्या सगळ्या कॉमेंट्स एकत्र करुन चांगला लेख तयार होऊ शकतो..

 13. Nishikant says:

  Kuthetari ek chhan website pahili ek.

  http://www.12simplethings.com/index.html

  Jamel tashi sarvana fwd karat raha.

  Cheers 🙂

 14. jivanika says:

  जुन्या वह्यांचे कागद काढून त्यांच्या वह्या करून वापरणे हे माझं शाळेपासून सुरु असलेल काम अजूनही कॉलेजला जाते तरी चालूच आहे. अगदी मागच्या वर्षी graduation पर्यंत मी जुन्याच वह्या वापरल्या. खूप छान मुद्दा आणि त्याहून उत्तमपोस्ट. keep it up

 15. anukshre says:

  नमस्कार महेंद्रजी,

  आपला लेख वाचला त्याकरिता केलेली लढाई पण स्फूर्ती देती झाली. पेपर, प्लास्टिक ह्यांच्या करिता पर्यायी उपायांचा वापर करणे हीच काळाची गरज आहे.

  • एखादी गोष्ट मनाला खटकली की मग असा लेख तयार होतो.त्यांना मेल चा ऑप्शन देउन पण त्यांनी अजुन तरी पेपर बिल पाठवणं थांबवलेलं नाही…

 16. काका माझ्यामते, कॉलेजेसनी कागदी आय-कार्ड्स देणं बंद करावं (किंवा देऊच नये), एक तर डिग्री मिळेपर्यंत ते जपावं लागतं, फाटलं तर २००रू चा दणका (आमच्यासारख्यांचा तोटा होणं टळेल) अन दुसरी गोष्ट कॉलेजेसचा गल्ला वाढेल, कारण आय-कार्डसाठी घेतलेले पैसे त्यांना फुकट वापरता येतील (त्यांचा फायदा!) … 😉

 17. Sagar says:

  Chyayla dar mahinyla ek zad lava an te changle vadhva na…….

 18. हा तर माझ्या जिव्हाळ्याचा विषय! प्लास्टिकचा आणि कागदाचा गैरवापर होऊ नये व पुनर्वापर व्हावा म्हणुन जितके जमतील तितके प्रयत्न करते.

  १. माझ्या घरातील रद्दीतून मी कागदी पिशव्या बनवते ज्या मला सुका कचरा जमा करण्यासाठी उपयोगी पडतात.
  २. वर्तमानपत्राचा उपयोग काचेच्या वस्तू पुसण्यासाठी होतो. काचा अगदी स्वच्छ होतात.
  ३. कागदाची कोरी बाजू छोट्या मोठ्या नोंदी लिहिण्यासाठी वापरते.
  ४. शक्य असतील, तेवढ्या सर्व नोंदी संगणकात जतन करते. (वाणसामानाचा जमाखर्च, इतर जमाखर्च इ.इ.)
  ३. बाजारातून भाजीपाला आणण्यासाठी कापडाची पिशवी वापरते.
  ४. सुपरमार्केट मधून प्लास्टीक पिशव्यांची भरमार असते, आपल्याकडे भक्कम कापडी पिशव्या असतील, तर प्लास्टिकच्या पिशव्या नाकारता येतात.

  तुमच्या पोस्टचा विषय कागदासंबंधी आहे, त्यामुळे थोडं विषयांतर होईल पण माझ्या डोक्यात एक कल्पना आहे. बघा, चांगली वाटते का?

  बिग बझार सारख्या ठिकाणी मी पाहिलं आहे की, आपलं सामान भरून देण्यासाठी ज्या पिशव्या वापरल्या जातात, त्याच पिशव्या ते लोक त्यांचा जादा माल ठेवण्यासाठी सुद्धा वापरतात. आपल्याकडे दर महिन्याला किती तरी प्लास्टिकच्या पिशव्या जमा होतात. त्या बहुतांशी कचरा जमा करण्यासाठी वापरल्या जातात. मुळात हे चूक आहे कारण त्या पिशवया कच-यासाठी बनलेल्या नाहीत. मग ह्याच जमा करून ठेवलेल्या पिशव्या बिग बझार किंवा तस्तम ठिकाणी पुन्हा नेऊन दिल्या तर? यामुळे प्लास्टिकच्या अनाठायी उत्पादनात घट होईल. शिवाय घरातील अडचणही कमी होईल. बिग बझार सारख्या लोकांचा प्लास्टिकच्या पिशव्यांवरील खर्चही आटोक्यात येईल.

  याच विषयला धरून मी ’ग्लोबल वॉर्मिंग’ नावाचा एक लिहिला होता. वेळ मिळ्याल्यास अवश्य वाचा. हा त्या लेखाचा दुवा आहे – http://padsaad.blogspot.com/2009/09/blog-post_22.html

  • बिग बझारच्या पिशव्या ह्या जाड प्लास्टीकच्या असतात, त्या मुळे त्या रिसायकलिंग साठी वापरल्या जातात. म्हणजे अगदी तुम्ही कचऱ्यात जरी टाकली तरिही ती पिशवी पुन्हा कचरा गोळाकरणारे घेउन जातात. पण ज्या पिशव्या अगदी पातळ प्लास्टीकच्या असतात त्यांचे वजन कमी असल्यामुळे कचरा जमा करणाऱ्यांचं अजिबात लक्षं नसतं तिकडे. पिशव्या परत दुकानात नेउन देणे.. हे तितकंसं संयुक्तिक वाट्त नाही.
   कापडी पिशवी आम्ही पण वापरतो, आणि त्या घाणेऱड्य़ा रिसायकल्ड प्लास्टीकच्या पातळ पिशव्या घेण्याचे टाळतो.

 19. ग्लोबल वॉर्मिंग रोखण्यासाठी गुगल ऐवजी ब्लॅकल – http://www.blackle.com/ वापरता येऊ शकतं.

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s