पेपर दिला..

पेपर दिला.. किती साधा शब्द आहे? हल्ली नेहेमी प्रचारात असलेला हा शब्द. पेपर टाकला, पेपर दिला वगैरे अगदी सहजपणे आपण वापरतो रोजच्या जीवनात. अर्थात, सरकारी नोकरीतल्यांना याचा अर्थ कळणार नाही… पण…इतर लोकांना, म्हणजे ’ द रुथलेस कार्पोरेट वर्ल्ड’ मधल्या लोकांना नक्कीच समजेल.

एखाद्याने पेपर टाकला आणि तो ताबडतोब रिलिव्ह झाला ..अशी बातमी आली, की मग सगळीकडे  कुजबुज सुरु होते.. पेपर टाकला ?? की…………………..?? इतर रिजनल ऑफिसेस ्मधून पण  फोन येणं सुरु होतं.. हे कसं काय झालं रे?? पेपर टाकला की घेतला त्याच्याकडून??  दोन तीन दिवस अशी चर्चा चालते, मग नंतर सगळं थंडावते आणि लोकं रोजच्या कामाला लागतात.

या मधे पहिला प्रकार म्हणजे एखाद्याने चांगल्या पॅकेज साठी पेपर टाकणे. मग त्याला नोटीस पिरियड मधे काम करावं लागतं..मित्र विचा्रतात..   ऐकलं ते खरंय का?? आणि मग कुठे जाणार?? आणि सगळ्यात शेवटलं, म्हणजे, माझ्यासाठी पण बघ ना तिकडे शक्य होत असेल तर…  च्यायला वैताग आलाय इथे..  . अशा कॉमेंट्स असतात कलिग्ज च्या.

पण जेंव्हा कंपनी काढून टाकते तेंव्हा मात्र…. !

पूर्वीच्या काळी बरं होतं, एक नोकरी पकडली की मग आयुष्यभर चालायची,पण हल्ली तसं नसतं.नोकरी बदलण, हाय्यर पॅकेज वर दुसरी कडे हातातला प्रोजेक्ट अर्धवट टाकुन जाणं  हे अगदी कॉमन झालं आहे. माझी ग्रोथ होते आहे तर मी का जाउ नये? अशी एम्प्लॉइज ची मानसिकता झालेली असते..  सारखं आपली मार्केट व्हॅल्य़ु काय आहे ते बघायला म्हणून नेट सर्फिंग करित रहावं लागतं.

आपल्या कडे पण आता अमेरिकन ट्रेंड हायर ऍंड फायर आलेला आहे. पण मानसिक दृष्ट्या आपण तयार नाही या गोष्टी साठी. म्हणजे , थोडी बरी नोकरी  मिळत असेल, तर मग आपण सरळ असलेली नोकरी सोडून दुसरीकडे जॉइन करतो..पण ..तेच जर कंपनीने काही कारणाने रिट्रेन्च केले तर आपण ते सहज पणे घेउ शकत नाही. जर तुम्हाला कंपनीने नोकरी वरुन काढले तर मग तुमच्या कडे पहाण्याचा नाते वाइक आणि समाजाचा दृष्टीकोन पण एकदम बदलतो. तुमच्यात काही तरी कमी आहे म्हणूनच तुम्हाला नोकरी वरुन काढले असावे असाही अर्थ काढला जातो.सामाजिक प्रतिष्ठा पण कमी होते.. आणि हेच सगळ्यात वाईट आहे.

याला कारण पुन्हा आपल्या कडची एम्प्लॉयर्स ची मानसिकता. अशा नोकरी वरुन कमी केलेल्या किंवा हातामधे नोकरी नसलेल्या लोकांना नवीन कंपन्या थोड्या वेगळ्या नजरेने पहातात..जर तुम्ही एखादा जॉब सोडला/ किंवा कंपनीने रिट्रेंच केले,  आणि   पुन्हा जॉब शोधणे सुरु केले ,  तर सहजा सहजी चांगला जॉब मिळणे कठिण होते.

पुन्हा नवीन एम्प्लॉयर्सचा तुमच्या कडे  पहाण्याचा दृष्टीकोन एकदम बदलून जातो. हेड हंटर्स ला पण तुमच्या बद्दल फारसं अट्रॅक्श्न रहात नाही. आणि आयुष्य फार कठीण होतं.. म्हणून बरेचदा वाटतं, जुने दिवस खूप चांगले होते…थोडा पैसा कमी होता, पण मानसिक स्वास्थ्य  नक्कीच जास्त होतं..

About महेंद्र

माझा ब्लॉग :- http://kayvatelte.com
This entry was posted in सामाजिक and tagged , , . Bookmark the permalink.

26 Responses to पेपर दिला..

 1. Sagar says:

  Ajun 8 Mahine ahet job hunting la…..To paryant safe in college…:)

 2. rohan says:

  हा ब्लॉगपोस्ट पटकन ‘टाकलास’ का रे ??? बाकी विषय मस्त आहे. मी एकाच कंपनी मध्ये ३ वर्ष झाली नोकरी करतोय आणि अजून तरी दुसरीकडे जायचा अजिबात विचार नाही आहे… बाकी तू लिहिलेलं एकदम परफेक्ट … नेहमीप्रमाणेच रे … 😉

  • अरे माझ्या एका कलिगला जावं लागलं, आणि म्हणुन हे पोस्ट.. जास्त काही लिहित नाही, पण प्रत्येक पोस्ट जेंव्हा लिहितो, तेंव्हा काही तरी स्वानुभव असतोच मागे..

 3. sachin says:

  काका अगदी खर आहे. कधी कधी इतक tension येत ना, झोप पण येत नाही. आज आहे तर उदया नाही अशी गत आहे. आणि जर काही काम नसेल तर अगदी स्वतःचा स्वतःला राग येतो.
  आपल्या बरोबर घरातल्या लोकांना घोर. अगदी सुखानंतरच दुःख खुप तीव्र असत.

  “थोडा पैसा कमी होता, पण मानसिक स्वास्थ्य नक्कीच जास्त होतं..” खर आहे. पैसा नसुदे पण काम हव.

  • सचीन.. हे सगळ्यांच्याच बाबतित होतं, फक्त लोकं बोलुन दाखवत नाहीत. मीच पहाना, एकाच कंपनित २५ वर्ष काम करुनही मला अन्सिक्युअर्ड वाटत असतं. बाहेर नौकरी मिळाली नाही असं नाही, पण इथे कम्फर्ट लेव्हल जास्त होती, म्हणुन राहिलो.

   • दिपक
    लवकर लिहा पोस्ट,. मी तर कामात जरा बिझी आहे म्हणुन घाई घाईत खरडलं. पण या विषयावर एक चांगलं पोस्ट यायलाच हवं.

 4. खरंय – पॅनिकनेस – क्युरॅसिटी काही वेळ राहते, नंतर मात्र रोजचं काम भलं असं मत होऊन जातं! काही दिवसांपुर्वी मी यावर थोडं लिहायचं ठरवुन एक – दोन पॅरा लिहिले होते. नंतर कामाच्या गडबडीत राहुन गेलं. आता विचार करतोय की यावरचा दुसरा भाग लिहिवा – तुमच्याच भागाचं कंटीन्युएशन…!

 5. anukshre says:

  जिथे नोकरीला लागतो तिथूनच रिटायर झालो. ही परंपरा आहे. खाजगी नोकरी च्या बाबतीत हल्ली पुढची पिढी बरीच जागरूक पणे बदल करीत असते.

  • जागरुकपणे नोकरी बदलण.. ह्या पेक्ष रिट्रेंचमेंट हा विषय जास्त महत्वाचा वाटतो. एक मित्र गेला, म्हणुन हे पोस्ट!

 6. abhijeet says:

  bhitee ghalu nakka…
  4-5 diwasapurvich paper taklay

 7. “पेपर टाकणे” हा ऑफीसमध्ये चर्चेचा विषय असतो हे नक्की. मी तर माझ्या पहिल्या कंपनीमध्ये मास रेसिग्नेशन पाहिले आहे. अर्थात कंपनी बंद होणार अशी न्यूज़ आली होती. मग काय सिनियर लोक धडाधड पेपर टाकु लागले होते. तेंव्हा आम्ही रोज सकाळी आज कोण पेपर टाकणार आणि संध्याकाळी कोणी पेपर टाकला अशी चर्चा करत असु. आम्ही त्यावेळी नवखे होतो त्यामुळे नवीन जॉब मिळणे आणि पेपर टाकणे आमच्यासाठी तितकं सहज नव्हतं. एच आर मधला एक जण जूनियर आमचा खास होता त्यामुळे आम्हाला अश्या न्यूज़ म्हणजे २ मिनिटात मिळायाच्या. मग कुजबुज सुरू. वेळी अवेळी उगाच पॅंट्री मध्ये जमून कोण कुठे जाणार ह्या चर्चा सुरू असायच्या. काही Consultant देखील ओळखीचे होते त्यामुळे कोणी कुठे अप्लाइ केलय आणि कुणाचा कधी कुठे इंटरव्यू आहे हे देखील जनतेला माहीत असायचे.
  दुसरी गोष्ट म्हणजे जर चांगल पॅकेज मिळत असेल तर जॉब बदलण्यात काहीच गैर नाही. फक्त नवीन कंपनीमध्ये काम आणि वातावरण कसे असेल त्याबद्दल काहीच सांगता येत नाही. बरेचदा “नाम बडे और दर्शन खोटे” असाच सीन असतो. त्यामुळे आपण काम केलेल्या, चांगलं Work Environment असलेल्या एम्प्लॉयारशी चांगले संबंध असणे कधीही चांगले. आणि हे चांगले संबंध तिथे किती काळ काम केले याचबरोबर Notice Period मध्ये कसे काम केले ह्यावर अवलंबुन असतात.

  राहता राहीले रिट्रेन्च – गेल्या वर्ष भरात मंदीमध्ये अनेक लोकांचे जॉब गेले. काहींचे कंपनी बंद झाल्याने तर काहींचे प्रॉजेक्ट बंद झाल्याने. त्यामुळे हल्ली एंप्लायर्स (सगळेच नाही) देखील जॉबलेस माणसाकडे पुर्वीसारख्या दृष्टीने पहात नाहीत तर त्याचे जॉबलेसअसण्यामागचे कारण, त्याचा अनुभव आणि Domain Knowledge देखील विचारात घेतात. कारण अर्थातच त्यांनादेखील गरज असतेच. आमच्याच प्रॉजेक्टमध्ये UK मधल्या २ जणांना Cost cuttingच्या नावाखाली fire केलं. दोघेही प्रचंड अनुभवी (आमच्या भाषेत सांगायाच तर fundoo होते). त्यांना तासाभरात आमच्या competitor ने hire केलं. त्यामुळे सध्याच्या काळात नुसतं domain knowledge आणि experience असून उपयोग नाही तर तुमचं network किती मजबूत आहे हे देखील महत्वाचे आहे.

 8. ravindra says:

  जॉब हंटिंग जगातील सर्वात कठीण काम आहे असे मला इन्जिनिअरिन्ग झाल्यावर वाटल होत. खरच ते एक महाभयंकर कठीण काम होत त्या काळी. मागील काही वर्षापासून मुलांना केम्पस मधेच नौकाऱ्या मिळू लागल्या होत्या त्या या मंदिच्याकाळात पुनः कठीण झाल आहे. माझ्या मते शक्य तितक्या उशिरा अत्यावश्यक झाल तरच जॉब सोडावा. नाही तर….

  • रविंद्र
   आजकाल फार सोपं झालंय. आपल्या वेळॆस एक ऑप्शन होता सरकारी की प्रायव्हेट नोकरी.. प्रायव्हेटला जास्त पैसा. म्हणुन मी तिकडे गेलो..

 9. gouri says:

  आय टी मध्ये असल्यामुळे २००१ आणि परत गेली दोन वर्षं जवळच्याच काहींबाबत ’पिंक स्लीप’ बघायला मिळाली. नोकरी गेल्यावर बाजारात तुमची पत एवढी घसरते … तुम्ही केलेलं काम, तुमच्या क्षमता सगळं गौण ठरतं. त्या क्षणी महत्त्वाचं काय तर तुमच्याजवळ नोकरी नाही … बाजाराचा असा पडता काळ असताना उत्तम लोकांना वाटेल त्या पगारावर नोकरीवर घेऊन त्यांची किती पिळवणूक होऊ शकते ते छोट्या कंपनीमध्ये जवळून बघितलं आहे. आणि नंतर मार्केट सुधारल्यावर एका वर्षात ४ – ५ नोकऱ्या सुद्धा बदलणारे महाभाग बघायला मिळालेत!!! केवळ मागणी आणि पुरवठा तत्त्वावर चालतो हा खेळ.

  एका कंपनीमध्ये इतकी वर्षे राहून, आपल्या कामातून प्रगती साधण्याचा प्रयत्न वेडेपणाचा वाटतो अश्या वेळी.

  • गौरी
   एक तर मोठ्या कंपनीत लहान होऊन रहायचं, किंवा लहान कंपनीत मोठं होऊन.. आणि लहान कंपन्या कशी पिळवणुक करतात ते मी पाहिलंय. माझे एक कलिग सोडुन गेले एका लहान कंपनित मोठ्या हुद्द्यावर.. पुढे काय झालं, आणि ट्रिटमेंट कशी बदलली.. ते लिहिन् नंतर एखाद्या पोस्ट मधे..

 10. bhaanasa says:

  या पिंक स्लीप ने तर इथे धुमाकूळ घातला आहे. तू म्हणतोस तसेच… कधी कधी पूर्वीची मानसिक धारणाच चांगली होती असे वाटते. पण बरेचदा मालक लोक त्याचा अतिशय गैरफायदा घेतांनाच दिसतात. मग खूप निराशा येते. मी अगदी जवळून आधीच्या पिढीतील लोकांचा त्रास, मानसिक कुचंबणा व आर्थिकही ओढाताण पाहीली आहे. शेवटी नाण्याला दोन बाजू असणारच. काही ना काही तरी खूपणारच आणि……. मात्र काही लोक जरा अतिरेकच करतात हे ही खरेच.

  • आर्थिक ओढाताण जरी असली, तरिही मानसिक शांती होती. आजकाल तर आपण मानेवर टांगती तलवार घेउन जगतो..

 11. पूर्वी एक नोकरी धरली की तीच आयुष्यभर करायची; खरं आहे! मी म्हणेन पूर्वीच्या जमान्यात पगार तुटपुंजा असूनही आर्थिकदृष्ट्या सुरक्षित वाटायचं. आता सहा आकडी पगार मिळाला तरी तसं वाटत नाही. स्पर्धा वाढली आहे, नवीन क्षेत्रात वाव मिळतो आहे. त्यामुळे पहिली नोकरी चांगली असली तर दुसरी खुणावत असतेच. स्पर्धात्मक युगामुळे असेल कदाचित, पूर्वी चूक झाली तर सांभाळून घेण्याकडे वरिष्ठांचा कल असायचा. आता छोटीशी चूक म्हणजे वॉर्निंग लेटर असतं.

  काळ बदलला आहे पण जुन्या पिढीतील लोक त्यांच्या काळाप्रमाणेच नोकरीकडे बघतात. त्यांची चूक नाही. आपण उशीरा जन्माला आलो असं मी म्हणते. मला नवीन नोकरी लागली तेव्हा आई, आजीने पहिला प्रश्न काय विचारला तर, “नोकरी पर्मनन्ट आहे का?” मी म्ह्टलं, “मी कायम तीच नोकरी केली तर पर्मनन्ट, दुसरी शोधली तर टेंपररी.” त्यांच्या दृष्टीने असं उत्तर प्रमाद होता पण हल्लीची परिस्थितीच अशी आहे. कधी कधी तर पगारापेक्षाही पदाची महत्त्वकांक्षा नोकरी सोडण्यास कारणीभूत ठरते.

  अवांतर: तुमच्या ब्लॉगचं तुम्ही हे काय केलंय? 😕 अक्षरं इतकी बारीक का दिसतायंत? आधी छान दिसायचं.

  • मी पण आजपर्यंत नौकरी बदललेली नाही. जवळपास २५ वर्षांच्या वर एकाच कंपनित काढलीत. कदाचित ही माझी चुक पण असेल, पण इच्छाच झाली नाही. आता कधी कधी असं वाटतं.. की आपलं बरोबर होतं की चुकलं?
   ब्लॉगचं मी काहिच बदललं नाही. कंट्रोल आणि प्लस साइन दाबुन मोठी करा. कदाचित तुमच्या कडुन कंट्रोल आणि मायनस दाबल्या गेलं असावं.. चुकुन!

 12. Girish says:

  mbk, koni paper dila?

 13. बहुतेक तसं असावं! मी नेहमीच कंट्रोल आणि माऊसला असलेली चकती फिरवून दृश्य मोठं करून पहाते.

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s