XXV.. काळा दिवस..

हेच ते कंटेनर ज्या मधे असलेल्या केमिकल मुळे इतका उत्पात घडला

वॉरन ऍंडरसन अजूनही मोकळाच फिरतोय. ३०००० लोकांच्या मृत्युला कारणीभूत ठरलेला हा माणुस अर्जुनही कायद्या मधल्या पळवाटा शोधून बाहेर आहे. भारतीय कायदा हा असाच.. हा माणुस मरे पर्यंत याला अटक करु शकणार नाही आपले कायदे.

याला कारण एकच आपल्याकडे एक कायदा आणि दहा पळवाटा असा सरळ हिशोब आहे.१९९२ पासून या माणसाच्या विरुध्द नॉन बेलेबल वॉरंट इशू करण्यात आलंय.१९८७ पासून केस सुरु आहे, आणि २०० च्या वर साक्षीदार येउन गेले पण अर्जुनही याला अटक करणे शक्य झालेले नाही.

डिसेंबर ३, १९८४…  युनियन कार्बाईड भोपाळ ची फॅक्टरी. इथे बॅटरी /सेल बनवले जायचे..   सकाळची वेळ होती. एका मोठ्या कंटेनर मधे मेथिलायसोसायनाईड ठेवलेलं होतं. तसा हा पदार्थ जो पर्यंत पाण्याच्या संपर्कात येत नाही तो पर्यंत निरुपद्रवी असतो. पण एकदा हा पाण्याचा संपर्कात आला की मग काहीही होऊ शकतं.

ब्लास्ट नंतर....नेमकं ३ डिसेंबरला काय झालं ते कळलं नाही पण या कंटेनर मधे पाणी शिरलं. आणि पाण्याची या ४२ टन मेथिलायसोसायनाईड वर रिऍक्शन होऊन प्रेशर फॉर्म झालं त्या कंटेनर मधे.  आणि गॅस लिक होणं सुरु झालं.

काही वेळाने  हायड्रोजन सायनाईड गॅस आणि इतर   तयार झालेल्या गॅसचं   प्रेशर असह्य होऊन ब्लास्ट झाला,आणि ते कंटेनर फुटलं.  अगदी सुरुवातीलाच म्हणजे पहिल्या दोन तासातच युनियन कार्बाईडच्या अगदी जवळ रहाणारे ४ हजारच्या वर लोकं मारले गेले.  थोड्याच वेळात हा आकडा १४ हजाराच्या वर गेला.

अगदी लहान बाळं , ज्यांची प्रतिकार शक्ती अतिशय कमी असते,ते तर या गॅसच्या प्रभावामुळे आधी मृत्यु पावले. जे वाचले, त्यांच्या मधे पण नजर कमजोर होणं,किडनी विक असणं असे डिफेक्ट्स राहिलेच. गर्भाशयात असलेल्या मुलांच्या वर पण या गॅसचा परिणाम झाला.

डोळे गेलेले लोकं... त्याच विदशीचा फोटो या गॅसच्या प्रभावातून जे  प्रौढ वाचले, त्यांची पुढची पिढी काहीतरी वैगुण्य घेउन जन्माला येण्याचे चान्सेस खूप जास्त आहेत. गेल्या २५ वर्षात  नुकत्याच  जन्मलेल्या मुलांच्या मधे डिफेक्ट्स्चं प्रमाण या भागात खूप वाढलेलं आहे.

आपल्या कडे पोल्युशन कंट्रोल बोर्ड तर आहे. पण ते लोकं खरंच काम करतात कां ? हा एक मोठा प्रश्न आहे. हे बोर्ड जेंव्हा एखाद्या कंपनीला परमिशन देते, तेंव्हा बऱ्याच गोष्टींवर विचार करुन मग द्यावी अशी अपेक्षा आहे. म्हणजे , सांडपाण्याची व्यवस्था.. सांडपाणी डिटॉक्स करुन मगच नाल्यात सोडणे.. आवाज प्रदुषण आणि असे बरेच फॅक्टर्स आहेत.मग या कारखान्याला परवानगी देतांना ह्या गोष्टींकडे सोईस्कर दुर्लक्ष का करण्यात आलं? नंतर लक्षात आलं, की बरयाच पर्यावरण विषयक नियमांना धाब्यावर बसवले आहे या कंपनीने..

मेलेल्या मुलाला कडेवर घेउन जाणारी आई.. असा पुतळा त्या दिवसाची आठवण म्हणुन उभा केला गेलाय भोपाळलाइतके  लोकं मृत्युमुखी पडले, मग त्या पोल्युशन कंट्रोल बोर्डाच्या एकाही अधिकाऱ्यावर का म्हणून ऍक्शन घेतली गेली नाही?? दुसरी गोष्ट, या स्फोटामुळे बरेच केमिकल्स जमिनीखालच्या पाण्यात जाउन ग्राउंड वॉटर  विषारी  झालेलं आहे. जो पर्यंत सगळी स्वच्छता होत नाही, तो पर्यंत तिथे जवळपास रहाणारे लोकं… हेच दुषीत पाणी पिउन रोग राईला आमंत्रण देत रहातील. डाउ केम ने नकार दिलाय सफाइ करायला…

डाउ केमिकल्स!! युनियन कार्बाईडच्या साईटला स्वच्छ करणे.. डीटॉक्सिंग करणं आवश्यक आहे. अंडर ग्राउंड वॉटर दूषित झालेलं आहे.  तिथे अजूनही बरिच केमिकल्स पडलेली आहेत. या ब्लास्ट नंतर तिथली सफाई करण्याचे काम आपले नाही असे सांगून या डाउ केमिकल्स् ने जबाबदारी टाळलेली आहे.

डाउ कंपनी समोरची निदर्शनं

हे बघा, कसे नालायक लोकं आहेत ते.. फॅक्टरी डाऊ केमिकल्सची, जागा त्यांची,  केमिकल त्यांचं, साठवण करण्याची पद्धत त्यांची, निष्काळजीपणा पण त्याच कंपनीचा. इतकं सगळं आहे, आणि आता ब्लास्ट झाला तर म्हणताहेत की स्वच्छता करणे त्यांचे काम नाही..   मग हे काम कोणी करायचं? यांची घाण दुसऱ्या कोणी  का काढायची?

बरं इतकं होऊन पण क्रिमिनल केस का केली जात नाही भारतातील अधिकाऱ्यांच्या वर? तसेच पोल्युशन कंट्रोल बोर्डाचे अधिकार यांवर पण केस करायला हवी, म्हणजे पुन्हा असा हलगर्जी पणा करणार नाहीत ते..

या मल्टीनॅशनल्स कंपन्या  ना भारत हवाय असे प्रोजेक्ट्स लावायला,केमिकल्स, डेंजरस प्रोजेक्ट्स… कारण कायदा हा इथे खुप फ्लेक्झिबल आहे.इतके कुचकामी कायदे असतील तर मग हे असे कायदे हवेतच कशाला? असंही वाटतं मला.

बरं त्या भागात गरिबी इतकी जास्त आहे की लोकं अजूनही जागा सोडून गेलेले नाहीत कुठे. पिण्याचं पाणी अजूनही तिथलेच वापरतात, आणि म्हणूनच जर डाउ केमिकल्स जर तिथले रेसिड्युअल्स काढून टाकायला तयार नसेल, तर ती जागा विकून त्याच्या पैशातून का डीटॉक्सिंग केलं जात नाही? इथे पण कायदा आडवा येत असावा!!!

आज पुन्हा नेमेची येतो पावसाळा प्रमाणे आपले राजकीय नेते काहीतरी रॅलिज काढतील, भाषणं देतील.. आणि नंतर घरी  सगळं विसरतील..

आज २५ वर्ष झालीत या प्रकाराला, आणि म्हणून त्या ३०००० अज्ञात नागरिकांना श्रध्दांजली देण्यासाठी हे पोस्ट..

(वर घेतलेले सगळे फोटॊ , आणि थोडी माहिती पण बिग पिक मधुन घेतली आहे)

About महेंद्र

माझा ब्लॉग :- http://kayvatelte.com
This entry was posted in Uncategorized. Bookmark the permalink.

32 Responses to XXV.. काळा दिवस..

 1. Abhijit says:

  फारच दुर्दैवी घटना होती ती. पण अद्यापही आपण या घटनेपासून फारसे शिकलो नाहीये. भोपाळ वायु-गळतीवरील, राणी दुर्वे यांचा “ब्युटी अँड दी बीस्ट” लेख मन सुन्न करणारा आहे.

  http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=7244:2009-09-11-07-31-12&catid=234:2009-09-11-07-24-26&Itemid=234

  • अभिजित
   लेख वाचला आणि त्या लेखिकेला मेल पण पाठवलाय , लेख आवडला म्हणुन. शेअरिंग करता आभार.

 2. त्या ३०००० अज्ञात नागरिकांना श्रध्दांजली!
  वाचुन मन सुन्न होतं! माणुसकीला एक काळीमाच म्हणावी अशी ही घटना आणि तरीही दोषी – उघडमाथ्याने फिरताहेत!!
  कदाचित “त्याच केमिकल्सच एखादं इंजेक्शन देऊन मरण” अशी शिक्षा त्यांना व्हायला पाहिजे.

  • हिटलर नंतर हाच माणुस इतके माणसं मारणारा आणि उजळ माथ्याने वावरतोय तो.. त्याला फक्त तिथल पाणी पाजलं तरिही तो मरेल, इतकं वाईट आहे पाणी त्या भागातलं.

 3. anukshre says:

  मन विषण्ण करणारी २५ वर्षा पूर्वीची घटना आहे. अजूनही काहीच निर्णय झाले नाहीत. चीड येते कायद्याची. कधी अमलात आणून तिथे राहणारी
  लोक आहेत त्यांना सुरक्षित जीवन मिळणार कोणास ठावूक?

  मद्याचे परवाने, तेही धान्यांपासून? मंत्र्यांना वाटलेत. लिहा एकदा त्या विषयी. ह्या सगळ्याचा पाठपुरावा करणारे श्री. कांबळे त्यांच्या विषयी काही माहिती देता येईल का? विषय फार पूर्वीचा आहे. पण इथे परदेशात नाही सविस्तर माहिती कळत.आपला लेख वाचावयास मिळावा ह्या विषयावर ही इच्छा आहे.
  आग्रह नाही पण विनंती आहे.

  • ते पण वाचलंय मी.. पण पुरेशी माहिती नाही कोण कल्प्रिट आहे ते.
   चांगला विषय आहे. लिहायलाच हवं त्यावर..

 4. me says:

  I heard in a Rajiv Dixit’s lecture that, that was ‘planned’ to take test of some chemical weapon developed that time .. GOD knows ( because In God we trust)

  and coming to your question,
  Hunger’ is the answer for every question you raised in post.

  1. Why ‘they’ did it : – hunger of profit, experiment, to conquer the world
  2. Why our politicians are not doing anything : hunger
  3. why victims are still their .. hunger

  ~Cheers

  • आनंद पत्रे says:

   agreed with “me” fully

  • मला एक शंका आहे, ही त्या केमिकल वेपन्स ची टेस्ट तर नाही?
   हंगर…. अगदी सहमत आहे.. पैशाची भुक, लोकांवर राज्य करायची भुक.. सगळ्या प्रमादाची जड आहे भुक..

 5. अनिकेत वैद्य says:

  आजच्या लोकसत्ता मधे ह्या विषयावरचे ३ लेख ( अग्रलेख व २ इतर लेख) खूपच सुंदर व माहीतीपुर्ण आहेत.

  अनिकेत वैद्य.

 6. Rohan says:

  मी तुझ्या पोस्टची वाट बघतच होतो. मला खात्री होती की आज तू ह्या विषयावर पोस्ट टाकणार… ह्या बाबतीतली माझी वाचलेली माहिती तशी कमीच. ऐकीव थोड़ी फार. तुझ्या पोस्ट मधून बरेच कळले आणि फोटो एकदम सुन्न करणारे ठरले…

  त्या ३००००+ अज्ञात नागरिकांना श्रध्दांजली!

  • या विषयावर मी परवाच लिहिणार होतो.. पण राहुन गेलं. भोपाळला गेलास की जरुर भेट दे या फॅक्टरीला. तो पुतळा आहे ना शेवटल्या फोटॊ मधे तो आहे एका बाइचा. आपलं मेलेलं मुल कडॆवर घेउन .. त्या दिवसाची आठवण म्हणुन लावलाय तो..

   • Rohan says:

    लोकसत्ता मधले सर्व लेख वाचून काढले … खुप माहिती कळली. आता बघुया भोपाळला कधी जाणे होते ते…

 7. आपला कायदा असे नरबळी घेण्या-यांसाठी नेहमीच तुटपुंजा पडत आलाय. कारण काही लोकांनी तो तुटपुंजा आहे असं दाखवलंय. सुधारणा करता येत नाही की करायच्या नसतात कोण जाणे? कायदा आला म्हणजे पळवाटाही येतातच पण भोपाळ वायू गळतीसारख्या दुर्घटनेचं मोजमाप कायद्याच्या तराजूत करता येऊ शकतं का? जर येऊ शकतं तर हाच कायदा फॅक्टरी सुरू करतेवेळी अंमलात का आणला नाही? खरंतर कायदा आहे तसाच आहे. आपल्या तिजो-या भरण्यासाठी अशा प्रोजेक्टसना परवानगी देणा-यांनी तो पांगळा करून ठेवला आहे.

 8. sahajach says:

  महेंद्रजी…..काय बोलावे कळत नाही…कारण बोलण्याव्यतिरिक्त आपण काही करत नाही……
  आम्ही रोह्याला होतो २ वर्षे….रोज संध्याकाळ होता होता केमिकल्सचे अनेक मिश्र वास यायचे…विशेषत: रविवार तर नको व्हायचा कधीकधी…..जिथे ईतक्याश्या वासाने आमचे डोके दुखायचे….तिथे त्या बिचाऱ्या लोकांना तर मरणही समजले नसणार….पुन्हा पुढच्या पिढ्यांचे व्यंग आहेच…..
  खुप त्रास होतो या सगळ्याचा…..
  त्या ३००००+ अज्ञात नागरिकांना श्रध्दांजली! आणखी काय करतोय आपण…..

  • रोहा बघितलेले नाही मी, पण मुंबईमधे पुर्वी चेंबुरला गॅस चेंबर ऑफ मुंबई म्हणायचे..जे मेले ते सुटले असं म्हणायचं. आजपर्यंत प्रत्येकी २५ हजार रुपये देण्यात आलेले आहेत , तिथला लोकांना.. ह्या सगळ्या गोष्टी पाहिल्या की आपले कायदे, सरकार यांची चीड येते..

 9. ravindra says:

  मी आज सकाळी बातमी पत्रात हि बातमी वाचली आणि मन अनायासे त्याकाळात गेले आणि अंगावर काटे आले. फार वाईट घटना होती ती. मी सकाळीच ह्या विषयावरपोस्ट टाकायचा विचार केला होता. परंतु संध्याकाळी विसरून गेलो. आता तुमची पोस्ट वाचली आणि लक्षात आले. असो त्या अज्ञात नागरिकांना श्रध्दांजली.

  • हे जेंव्हा घडलं, त्या दिवशी मी सागरला होतो. काम संपवुन संध्याकाळी परत निघणार, तर ही बातमी समजली.. आपण वाचलो, याचं समाधान मानायचं, की इतके लोकं गेले त्याचं दुःख करायचं हेच कळंत नव्हतं बराच वेळ.

 10. हेरंब ओक says:

  Erin Brockovich चित्रपटात हाच विषय मांडलाय आणि अमेरिकेतील सत्य घटनेवर आधारितच चित्रपट आहे तो. दोषींना शिक्षा होते आणि नुकसानग्रस्तांना भरपाई देखील मिळते त्यात शेवटी. मुद्दा हाच की दुर्घटना ग्रस्तांना कायद्याचा आधार घेऊन न्याय मिळू शकतो आणि दोषींना शिक्षाहि होऊ शकते. पण तास करायची आपल्या सरकारची खरच इच्छा आहे का? सरकारच्या प्रबळ इच्छाशक्तीच्या अभावाच आणि लाचारीच याहून भयावह उदाहरण विरळाच. ३०००० (!!!!!) अज्ञात नागरिकांना श्रध्दांजली. :((

  • या चित्रपटाची कथा वाचल्यासारखी वाटते. आता शोधतो नेटवर कुठे सापडेल तर..तीस हजार….. आणिआज २५ वर्षानंतर पण काहीच ऍक्शन नाही! आपले लोकं मुद्दाम टेकनिकल चुका करतात कां असा संशय येतोय आजपर्यंत. हिटलरच्या साथिदारांविरुध्द रेड कॉरनर जाहिर केलं जातं, पण इथे ३० हजारांचा मारेकरी उघडपणे मोकळा फिरतोय. ती कुठली एक्स… ट्रिटी.. ती काही वापरता आली?

 11. bhaanasa says:

  अतिशय दुर्दैवी अन काळीमा फासणारी घटना. आज इतकी वर्षे होऊनही साधी अटकही होत नाही…..:( त्या सगळ्या ३०,००० बळींना श्रध्दांजली. हिटलरने जाणूनबुजून मारले यांनीही खरे तर तेच केलेय. होणारे गंभीर परिणाम माहीत असतानाही त्याकडे दुर्लक्ष करणे…… खरे आहे, नेमेची येतो पावसाळा तशी नेमेची येणारी सहानुभूतीची उबळ….येते आणि त्याहीपेक्षा जोराने बसते….. सगळ्यात स्वस्त आहे तो जीव हेच खरे.

 12. ्टि वी वर त्यावेळचे फ़ोटो पाहुन आणी आजही तिथे डिफ़ेक्टेड बाळ जन्माला येतात हे कळल्यावर खुप वाइट वाटते.आणी हया सगळ्याला कारणीभुत असलेले बाहेर मोकळे फ़िरत आहेत हे ्वाचुन तर डोकेच फ़िरले.आज पंचवीस वर्षांनंतर सुदधा त्यांना न्याय मिळु शकला नाही. तो कधी मिळेल काय…?

  त्या ३०००० अज्ञात नागरिकांना श्रध्दांजली…

  • न्याय मिळण्याची आशाच नाही..! तिथले ते गरीब लोकं शारिरीक व्याधी घेउन जगताहेत अजुनही. कित्येक लोकांची दृष्टी गेली आहे.. न्याय कधीच मिळणार नाही हे बघुन तर अजुन त्रास होत असेल.

 13. Aparna says:

  राणी दुर्वेंचा लेख मीही वाचला होता त्याची आठवण झाली. आपल्या कायद्यांपुढे कसाबसारखाही सरकारी पाहुणचार भोगतो आणि दुसरा कुणी खूनी पॅरोलवर सुटून वर मिडिया त्यांच्या बातम्या चवीने देते…काय बोलणार.
  जाता जाता आर.बी.आय. क्लायंट असताना एक-दोनदा राणी दुर्वेंबरोबर थोडा फ़ार कामानिमित्त संबंध आला होता आणि नंतर त्यांचं लोकसत्तामधलं लिखाण वाचलं तेव्हा कामाच्या जागेत त्यांच्या साधं असण्याचं फ़ार कौतुक वाटलं.

  • मिडिया बद्दल न बोललेलंच बरं.. अमिताभ बच्चनको सर्दी हुई.. कमिश्नर की बिल्ली छत पर चढी अशा बातम्यांना जास्त टिआरपी मिळते म्हणतात..
   राणि दुर्वेंचा लेख वाचुन त्यांना इ मेल पण केला. खुप छान लिहिलाय लेख..

 14. Raj says:

  Sir,
  What I understood that safety was the issue. Operator left plant & Bhopal with HIS FAMILY even though he was aware that valve is not properly operating & without giving any info or alarm etc.
  I am here in Saudi almost same plant but SAFETY FIRST.

 15. gouri says:

  त्या वेळी भोपाळला रेल्वेने मदत शिबिर चालवलं होतं, आणि डॉक्टर म्हणून बाबा गेले होते … त्यांनी तिथलं जे वर्णन सांगितलं होतं ते, आणि तेंव्हा नुकताच बघितलेला हिरोशिमामधल्या बॉंबस्फोटानंतरच्या परिस्थितीचा स्लाईड शो हे इतकं मिळतं जुळतं होतं, की अजूनही हिरोशिमा म्हटलं की मला भोपाळ आठवतं. हिरोशिमा युद्धकाळात झालं, संहार करण्याच्या उद्देशाने. त्याची दखल संपूर्ण जगाने घेतली, पुन्हा कधी हिरोशिमा होऊ नये म्हणून एवढे प्रयत्न झाले. भोपाळच्या गुन्हेगारांना अजून शिक्षा झालेली नाही! आपल्या देशात माणसाचं आयुष्य फार स्वस्त आहे अजुनही.

  • सद्दाम हुसेनने मारलेली माणसं पण कमीच असतिल या पेक्षा..त्याला संपवायला अमेरिकेने लश्कर पाठवले.. आणि ह्या केसमधल्या अरोपिला अमेरिकन कायदा संरक्षण देतोय.. किती दुर्दैव आहे हे..?

 16. ravindra says:

  खरोखर काळा दिवस होता तो. 😦

Leave a Reply to महेंद्र Cancel reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s