ऑन द टिकिंग बॉंब..०

जगातिल न्युलिअर पॉवर प्लॅंट्स चे लोकेशन

हा नकाशा बघा. या नकाशावर बरेच लाल ठिपके दिसताहेत. ते आहेत जगभरात पसरलेल्या न्युक्लिअर पॉवर प्लॅंट्स चे लोकेशन्स. या पैकी आज पर्यंत १९५० पासून जवळपास २० च्या वर अपघात झालेले आहेत..जितके लाल ठिपके तितके टि्कींग न्युक्लिअर बॉम्ब म्हणायला हरकत नाही. जितका जास्त डेव्हलप्ड देश, तितका जास्त किरणोत्सर्गी कचरा.

ऍटोमिक पॉवर.. किती छान वाटतं ना वाचतांना… अगदी कमी खर्चात विद्युत उत्पादन केलं जाउ शकतं.थोडंसं युरेनियम, प्लुटिनियन, हेवी वॉटर -आणि बस्स… तुम्हाला मिळते भरपूर विद्युत अगदी कमी खर्चात.

नाही.. हे जे काही आपल्याला सांगितलं जातं ते काही खरं नाही. या मधे बऱ्याच गोष्टी अशा पण आहेत की ज्या अजूनही मुद्दाम लपवून ठेवल्या जातात. १९५० साली इलेक्ट्रिसिटी तयार करण्यात आली ऍटॊमिक पॉवर प्लॅंट वापरुन, आणि तेंव्हा पासून कित्येक प्लॅंट्स तयार करण्यात आलेले आहेत. सगळ्यात जास्त प्लॅंट्स अमेरिकेत आणि यु्रोप मधे आहेत. पण हल्ली पुन्हा जुन्या प्रकारचे थर्मल पॉवर जनरेटेड प्लॅंट्स वापरावे या साठी अमेरिकेत आंदोलनं केली जात आहेत.

प्रत्येक ऍटोमिक पॉवर प्लान्ट हा एक टिकिंग  टाइम बॉंम्ब आहे. जर व्यवस्थित हाताळल्या गेला नाही तर काहिही होऊ शकतं. आत्ताच एक वर्षा पुर्वी कसाब आणि कंपनी जर तारापुरला घुसली असती तर काय झालं असतं – याचा विचार जरी केला तरीही अंगावर काटा येतो.

हे पॉवर प्लांट अगदी इन बिल्ट ऍटोमिक बॉंब प्रमाणे आहेत. एक विमान जे ट्विन टॉवर वर आदळलं तेच जर एखाद्या पॉवर प्लांटवर आदळलं असतं तर काय झालं असतं? पुर्वी कॉंक्रिटमधे जाउन मारा करणारे बॉंब नव्हते, पण आता त्याचा पण शोध लागला आहे. बॉम्ब टाकल्यावर जमिनीच्या आता शिरून तो २० फुटावर स्फोट घडवून आणु शकतो. स्पेशली बंकर्स वर हल्ला करायला असे बॉम्ब तयार केले जातात. जरे हे्च बॉम्ब्स थोडीफार  डेव्हलप्मेंट करुन वापरले तर काय होईल?? कारण पॉवर प्लॅंट्स हे केवळ कॉंक्रिटचा आणि लेड चा वापर करुनच प्रोटेक्ट केलेले असतात. जर कॉंक्रिट… जाउ द्या…

हे पॉवर प्लॅंट कसे चालतात? अगदी साधी टेक्नॉलॉजी आहे, न्युक्लिअर फ्युजन रिऍक्टर्स मधे उष्णता निर्माण होते, त्यामुळे पाणि गरम करुन निर्माण झालेल्या वाफेला वापरुन वीज निर्मिती केली जाते. जगातली जवळपास २० टक्के विद्युत निर्मिती ही न्युक्लिअर प्लॅंट्स वापरुन केली जाते.फ्रान्स मधे सगळ्यात जास्त म्हणजे ७८ टक्के न्युक्लिअर पॉवर तयार केली जाते. ्कोळसा वापरून आणि गॅस फायर्ड बॉयलर्स वापरुन पण विद्युत निर्मिती केली जायची पूर्वीच्या काळी.

एका विद्युत निर्मिती केंद्रासाठी खर्च येतो १० बिलियन डॉलर्स.. त्यामुळे ब्रेक इव्हन पॉइंटला पोहोचण्यासाठी बराच वेळ लागतो. म्हणजे प्रत्येक पॉवर प्लांट जास्तीत जास्त चालवणे हाच एक उपाय उरतो. मरिन सबमरिन्स च्या साठी न्युक्लिअर पॉवर वापरणं हे आजकाल कॉमन झालेलं आहे.

विद्युत निर्मिती नंतर निर्माण होणारं जे किरणोत्सर्जीत करणारं द्रव्य शिल्लक रहातं, त्याची विल्हेवाट लावणं हा एक मोठा प्रॉब्लेम आहे.एकदा लोड केलेलं ऍटोमिक फ्युअल जवळपास पाच ते सहा वर्षा पर्यंत चालतं. पण नंतर या किरणोत्सर्जीत वेस्ट ची विल्हेवाट कशी लावायची हा एक सगळ्याच देशांना भेडसावणारा प्रश्न आहे. त्या संदर्भात सापडलेला एक फोटो इथे लावतोय . इथे जो काचेचा गोळा दिसतोय, तो एक माणुस आपल्या संपुर्ण आयुष्यात वापरलेल्या विजेसाठी लागणारा युरेनियम वापरुन , नंतर रिसायकल केल्या नंतर उरलेल्या  वेस्टचा गोळा आहे.

इतर डेव्हलप्ड देशांमधे ज्या गोष्टींची विल्हेवाट लावण्यासाठी खुप कठीण कायदे आहेत  त्याच गोष्टींना इथे सहज पणे केलं जाउ शकतं. जसे ऍसबेस्टॉस वापरणं हे जहाजामधे अगदी कॉमन असतं. अशी जहाजं इतर कुठल्याही देशात तोडफोड करणं फार खर्चाचं काम आहे, म्हणुन अशी जहाजं भारतामधे भावनगरला , आणि दारुखान्याला तोडली जातात. असो.. पण इतक्या सहज पणे ऍटोमिक वेस्टची विल्हेवाट अनडेव्हलप्ड देशात लावणं सोपं नाही.

बरं एक इंटरेस्टींग गोष्ट म्हणजे या प्लांट्स मधे तयार होणारी वेस्ट ही रिसायकल करुन जवळपास ९७ टक्के युरेनियम, प्लुटोनियम पुन्हा रिकव्हर केलं जातं, आणि ३ टक्के हायली रेडिओऍक्टिव्ह वेस्ट ही शिल्लक रहाते. १००० मेगावॅटच्या प्लॅंटमधे दर वर्षी ४५ टन वेस्ट तयार होते.

नुकताच झालेला ऍक्सिडेंट .. कैगा प्रोजेक्ट मधे. त्याबद्दल जर विचार केला तर लक्षात येइल की जे कारण सांगितलं जातंय ते सहजासहजी विश्वास ठेवता येण्यासारखं नाही.कोणीतरी म्हणे पाण्याच्या कुलर मधे कॉंटॅमिनेटॆड वेस्ट टाकली म्हणून हा ऍक्सिडेंट झाला.

हे प्रगत देश, ह्यांनी आफ्रिका, वगैरे सारख्या अप्रगत देशांच्या किनाऱ्यावर हे किरणोत्सर्गी द्रव्य नेउन टाकले नाही म्हणजे झाले. कारण यांना विचारणार तरी कोण आहे आज?   जाता जाता एक सगळ्यात महत्वाची गोष्ट.. न्युक्लिअर पॉवरचा उपयोग आधी सबमरिन्स मधे करण्यात आला होता, आणि नंतर मग ते विद्युत निर्मिती साठी वापरले गेले. थोडक्यात एकच सांगायचंय, की सगळं जगच आज टिकिंग टाइम बॉ्ब वर आहे आज… !!

About महेंद्र

माझा ब्लॉग :- http://kayvatelte.com
This entry was posted in आंतरराष्ट्रिय पॉलिटिक्स and tagged , , . Bookmark the permalink.

26 Responses to ऑन द टिकिंग बॉंब..०

 1. bhaanasa says:

  ह्म्म्म्म…….. 😦 प्रगति म्हणता हा इतका भयंकर धोका निर्माण केला जातोय. आणि यातून निघणा~या वेस्टची व्हिलेवाट लावणे हा त्याहीपेक्षा वाईट्ट प्रकार. इतके खोलात जाऊन आपण विचारही करत नाही. मी या अपघाताबद्दल वाचले होते….तेव्हांच पाल चुकचुकली होती. शिर्षक एकदम पर्फेक्ट. जगात कधी कुठे काय घडेल…. 😦

  • युरोप…. इतके लहानसे देश पण इतकी जास्त विद्युत उर्जा वापर.. जर हे टाळणं होत नसेल तर कमित कमी विज वापर करणं हा उपाय होऊ शकतो. ्प्रगत देशांनी आपली रिक्वायरमेंट वाढवुन ठेवली आहे – अजिबात कारण नसतांना. अगदी ब्लॅंकेट्स पासुन तर हाउस वार्मिंग साठी विज वापरली जाते. थोडी लहान आकाराची घरं, आणि विजेचा कमीत कमी वापर हा एक चांगला उपाय होऊ शकतो.

 2. mandar joshi says:

  I thinks the same as you say…
  “if it is not handled well in manner it will be a atomic timer Bomb”
  there a is big critical process for recycling of nuclear atomic reactors..
  just seen today in news our scientist Dr. Anil kakodkar says ” we are planning to implement one new plant in Jaitapur near Alibag which is not harm to our Environment”

  • ४५ टन.. जरी ह्या पैकी पाच टक्के म्हंट्लं तरीही २ टन कचरा.. पुर्ण वेस्ट..आणि सध्या तरी फक्त खुप वेळ त्याला तसंच साठवुन ठेउन नंतर विल्हेवाट लावतात. कशी ते समजलं नाही..

 3. Rohan says:

  लेख नेहमीप्रमाणे खुपच वेगळ्या आणि अतिशय महत्वाच्या विषयावर. बरीच नवीन माहिती कळली रे ह्यातून. त्या पाहिल्या फोटोमधले यूरोप पाहून धस्स झाले एकदम. तारापुर तसे माझ्या गावाजळवच. माझा एक नातलग कामाला सुद्धा होता तिकडे. असा एखादा प्लांट बघायची इच्छा आहे आता. 🙂

  • आपल्या मुंबईला फोर्टला ऍटोमिक डिव्हिजन होतं एका ठिकाणी. त्यांच्या साईटला भेट दिली होती. अडिच फुट विड्थ असलेल्या भिंती होत्या..लेड सेपरेटर्स… आणि बरंच काही . समजलं नाही पण आवडलं पहायला. मी बी ए आर सी बद्दल बोलतोय हे समजलं असेलच तुला.

 4. नमस्कार ,
  आपल्या लेखातील भीती खरी असली तरी , अणु उर्जाशक्ती ला सध्यातरी पर्याय नाही. कारण
  १. जगातील जवळ-जवळ सर्व मोठ्या नद्यांवर धरणे झाली आहे.
  २. कोळसा कमी होतोय .
  ३.Solar , wind , wave energy पासुन स्वस्तात वीज मिळवायला अजून वेळ आहे.
  पण आपण नमूद केलेली radioactive waste ची विल्हेवाट हा खरंच गंभीर प्रश्न आहे.
  लेख माहीतीपूर्ण होता.

  • अक्षय
   अजुनही बऱ्याच ठिकाणी हायडल प्रोजेक्ट सुरु केला जाउ शकतो. तसेच नॅचरल गॅस बेस्ड पण सुरु केला जाउ शकतो. आजही आफ्रिकेमधे फक्त एकच न्युक्लिअर प्लॅंट आहे. तसेच चायना मधे किंवा रशिया मधे पण प्लॅंट्स दिसत नाहीत.. तरी पण त्यांचं चाललंय.समुद्रातिल लाटांपासुन विद्युत निर्मितीचा पण विचार केला जाउ शकतो.

 5. anukshre says:

  नेहमीप्रमाणे नवीन विषय माहिती मिळाली. मला मूळ लिंक इमेल वर पाठवू शकाल का? अजिंक्य करिता ह्या सुट्टीचा एक छान प्रोजेक्ट म्हणून देता येईल.
  ह्या वर्षी पासून पर्यावरण विषय सुरु झाला आहे. ओरिजिनल लिंक रेफरन्स द्यावा लागतो.अधिक तुमच्या लेखाची लिंक पण देईन.

 6. Sagar says:

  KAka
  Barich navin mahiti milali….Chan lekh…

 7. sahajach says:

  महेंद्रजी पुन्हा एक महत्वाचा विषय घेतलात…..कॉलेजला असताना दोन वेळा तारापूर ऍटॉमिक पॉवर प्लांट पाहिलाय……अगदी समजावून घेतला होता…एक विलक्षण अनुभव होता.
  खरं सांगायचं तर माणसाच्या एकूणच गरजा कमी असाव्या अश्या मताची मी आहे आणि त्यामुळेच बरेचदा वेड्यात काढली जाते. किंवा जगाच्या मते ही आळशी आहे हिला नौकरी करायची नाही मग हे असे बडबडते. माझ्या एका मैत्रीणीने मला मागे सुनावले होते की earn more and spend more……ही अशीच वॄत्ती आहे सगळीकडे…
  या चंगळवादाच्या वाढत्या भस्मासुराला खाऊ घालायला सगळेच हवेय माणसाला……तडजोड वगैरे मुर्खांचे शब्द आहेत पण एखाद दिवस आयूष्याची तडजोड करावी लागेल याचा विचार करायला धावत्या जगात थांबावे लागेल आणि त्याच्यासाठी वेळ नाहीये कोणाकडे. मग कधी ना कधी मरायचेच आहे मग enjoy करायला काय होते म्हणणारे कधी एंजॉय करतात राम जाणे….
  मला कल्पना आहे मुळ विषयाला सोडून होतीये प्रतिक्रीया पण तरिही…..
  शहरात आहे ना वीज गावाची काळजी कोणाला?आम्हाला आहे ना पाणी मग ईतर कोणीतरी चालेना का मैलोंमैल……
  सगळा असमतोल आहे…..
  लेख मात्र माहितीपुर्ण आणि विचार करायला लावणारा……

  • अगदी खरं आहे.. मरायचं आहे म्हणुन एंजॉय करायचं हा कन्सेप्टच मला पटत नाही. मुलं लहान असे पर्यंत सौ. ला पण नौकरी करु दिली नव्हती. असो.. विषयांतर होतंय.. पण तुमचा रिप्लाय खुप आवडला.. एकदम दिल से..

 8. ही कसली प्रगती? ’तुझ्या तलवारीपेक्षा माझीच तलवार धारदार’ करण्याच्या प्रयत्नात आपण काय गमावतोय, हे तरी कुणाला लक्षात आलंय का? माझा देश, तुझा देश ही भावना नंतरची झाली. जर माणसाला माणूस म्हणूनच जगताना अडचण येणार असेल, तर अशा प्रगतीचा काय उपयोग?

  • आपल्या कडे तरी बरं आहे, पण यु्रोप मधल्या त्या लाल ठिपक्यांना बघुन मला तर एकदम गरगरल्या सारखं झालं होतं. सर्फिंग करतांना हा नकाशाअ दिसला एके ठिकाणी.. आणि मग हे पोस्ट लिहावंसं वाटलं..

   माणसाला माणुस म्हणुन जगता येत नसेल तर प्रगतीचा काय फायदा?? हे एकदम पटलं.

 9. थोडक्यात एकच सांगायचंय, की सगळं जगंच आज टिकिंग टाइम बाँब वर आहे आज… !!
  हेच खरं! परवा कोकणातल्या पॉवर प्लांट – विरोधाबद्दल वाचलं होतं… भोपाळच्या वायुगळतीच्या ज्वलंत उदाहरणानंतर – हे न्युक्लिअर प्लांट्स म्हणजे – टिकिंग बाँबच आहेत!

  • कोकणातल्या आणि अलिबागच्या प्लांटला असलेला विरोध तसा योग्य आहेच ,पण काही होईल असं वाटंत नाही या आंदोलनामुळे..

 10. nisha says:

  The cartoon is brilliant! Says a lot about the state of minds as well as our times!

 11. Sanjiv Siddul says:

  kaka, chan lekh jhalay.

  Life Style baddaal tumhi je kahi lihilat, tumachi ji mata ahet, tyanchyashi me sahamat ahe. pan…

  nuclear power(/nuclear power plant) baddal itaka ghabarayacha kahihi karan nahi.
  he me tham pane sangu shakato.(I was Third Prize winner at ‘17th All India Essay Contest on Nuclear Science and Technology’ on the topic “Nuclear Power: A Viable Alternate in Context of India’s Future Energy Needs and Environmental Safety” conducted by Department of Atomic Energy, Govt.of India.)

  dhoka aaplya power plant pasun kinvha tethe vaparalya janarya technolgy pasun ajibat nahiy. Nuclear Tech chya babatit apan svatahala ‘developing’ samaju naye. hya Tech chya babatiti apan ‘pragat’ deshanchya panktit basato. Nuclear fuel recycle karana, nuclear waste chi vilhevat lavana hya sopya goshti nahit. pan apalyakade hya sagalyansathi atyant pragat technology vaparali jate.(ani he sagala me pratyaksha pahilay!)

  he matra khara ki, dhoka asel tar te baherchyankadun ahe! pan hyamule apan nuclear power vaparu naye asa nahi.

  aapalyala apali suraksha yantrana sudharavi lagel. apali samarik shakti ashi banavavi lagel ki 26/11 sarakhi paristhiti ch yeu naye.
  dhoka dahashat vadyanpasun asel tar tyancha bandobast karava. tyana ghabarun apali pragati apan ka thambavavi?

  hya vishayavar ani tumachya agodarchya kahi vishayanvar barach lihayacha hota pan sadhya pariksha chalu ahet. tyamule ata thambato. (tyamulech aaj marathit type na karata english madhe kele)

  jata jata…
  Nuclear Plants, tyat hi Nuclear Power Plant pahanyachi sandhi mala milalai! te hi baherun navhe tar agadi aat core madhe jaun!(core-jithe actual nuclear fission hote.)
  🙂

 12. आज पर्यंत २० च्या वर ऍक्सिडॆंट्स झालेले आहेत. पण नशिबाने जिवित हानी झालेली नाही . अगदीच वापरु नये असे नाही, पण युरोप प्रमाणे जर प्लॅंट्स उभे केलेत तर खरंच खुप धोक्याचं आहे ते. इंटर्नल प्रॉब्लेम्स , मधे रशियाची ती केस आठवते. ज्यामधे युरिया नायट्रैट मिक्स करतांना प्रमाण चुकल्याने फिजन अनकंट्रोल्ड झालं होतं… ! एक लिंक दिलेली आहे खाली..

  http://www.atomicarchive.com/Reports/Japan/Accidents.shtml

  रशिया, चायना जर ऍटोमिक पॉवर प्लांट शिवाय मॅनेज करु शकतात , तर इतर जग कां नाही?? थोडी ग्रीड ( हावरट पणा) कमी झाली तरंच हे शक्य आहे.

 13. ravindra says:

  माझ्या मते न्युक्लीअर पावर सुद्धा खूप महाग आहे. तुम्ही म्हटल्या प्रमाणे तो एक बॉमच असतो. मनष्य प्राणी किती ही काळजी घेतली तरी चूक होऊ शकते. न्युक्लीअर प्लांट मध्ये चूक होणे म्हणजे कित्तेक पिढ्यांना त्याचे परिणाम भोगावे लागतात. मला वाटते चार्नोबिलची सर्वात मोठी दुर्घटना होती. पण तरी ही मनुष्य त्या उर्जेच्या मागे का जातो माहित नाही. कदाचित कमी मटेरीअल मध्ये जास्त उत्पादन होत असते म्हणून असावे. पण ते किती घटक आहे ह्याचा विचार करायला हवा. माझ्या मते सर्वात चांगले विजेचे स्त्रोत म्हणजे पाणी. पण त्याकडे जगाने दुर्लक्ष्य केले आहे. जर सुरुवाती पासून हायड्रो विजेवर भर दिला असता तर एव्हढे प्रदूषण वाढले नसते. त्याने ग्लोबल वार्मिंगचा त्रास झाला नसता. विचार करा थर्मल पावर स्टेशन मधून किती प्रदूषण होते. जागो जागी पाणी साठ केला असता तर निसर्ग चक्र व्यवस्थित कार्यरत राहिले असते. पाऊस व्यवस्थित झाला असता. शेत जमीन व्यवस्थित राहिली असती. आज ग्लोबल वार्मिंग मुळे जगाला धोका आहे पृथ्वीला धोका निर्माण झाला आहे. तरी ही मनुष्य प्राणी सुधारत नाही. आता तरी हे न्युक्लीअर प्लांट तयार न करणे बरे. मी ह्या विजेच्या अगदी विरोधात आहे. आज माणसाने पूर्ण इमानदारीने वीज वाचविली तर आहे त्याच्यात विजेची गरज भागविणे सहज शक्य आहे. कशाला नवीन प्लांटची गरज भासेल हो. असो पण मी फक्त हायड्रोचा पुरस्कर्ता आहे. थोड्या प्रमाणात सौर उर्जेचा ही. एक लक्षात घेण्यासारखी गोष्ठ आहे कि जितकी वर्ष जग जिवंत आहे तितकी वर्ष पाऊस पडणार आहे. सूर्य राहणार आहे. पण कोळसा व युरेनियम आज न उद्या संपणार आहेच. तो पर्यंत फार उशीर झालेला असेल. प्रदूषण मोठ्या प्रमाणात वाढलेले असेल व पाऊस मोठ्या प्रमाणात कमी झालेला असेल इतकेच नाही तर सूर्य ही झाकोळलेला असेल. मग काहीच करता येणारनाही.

  • हायडल पॉवर प्रोजेक्ट्स माझे पण फेवरेट.. आपण हायड्रोइलेक्ट्रिक प्रोजेक्ट्स हे आहेत ते फक्त ५०० मेगॅवॅट्स किंवा तत्सम समजतो. लहान लहान बांध घालुन पण विद्युत निर्मिती केली जाउ शकते .. हिमालयात १२ महिने वाहणाऱ्या नद्या आहेत.. त्यावर विज निर्मिती प्रकल्प उभेकेल जाउ शकतात.
   जर कॅचमेंट एरिया अव्हेलेबल असेल तर, एका खाली एक असे दोन .. किंवा जास्त बांध बांधुन त्यावर विज निर्मिती केली जाउ शकते. म्हण्जे एका ठिकाणी पाणी वापरुन झालं की ते दुसऱ्या रिझर्व्हायर मधे जमा करायचं.. यावर एक लेख वाचला होताफार पुर्वी..
   विज बचत.. हाच एक सर्व मान्य उपाय दिसतोय..

   • ravindra says:

    मी स्वतः ह्याच फिल्ड मध्ये आहे. आज पर्यंत सर्वात मोठे हायड्रो जनारेतोर २५० मेगा वाट चे आहे. आपल्याकडे कोयना येथे ते आहे. आणि आता पिको ५ किलोवाट पर्यंतचे लहान मशीन सुद्धा आले आहे. तुमच्या माहिती साठी सांगतो कि हिमालयात असे लहान प्रकल्प खूप प्रमाणात उभारले गेले आहे. त्यांनी बहुतेक नद्या / झरे कव्हर केले आहेत. आणि हो तुम्ही जागो जागी पाणी अडवून वीज निर्मिती करायची कल्पना मांडली आहे ते होऊ शकते. त्याला कोल्हापुरी बंधारे म्हणतात. तसे केले तर जमिनीतील पाणी स्तर वाढेल व चांगल्या प्रमाणात शेती होऊ शकेल. एक सांगतो कि जितके लहान प्रकल्प उभे केले तितकी त्यांची वीज महाग पडते. त्यासाठी मेनलेस म्हणजे ऑटो व्यवस्था आवश्यक असते नाही तर इन्कम कमी व खर्च जास्तहोईल.

 14. Pingback: ऑन द टिकिंग टाइम बॉंब .. २ | काय वाटेल ते……..

 15. Pingback: ऑन द टिकिंग टाइम बॉंब .. २ | काय वाटेल ते……..

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s