’भैय्या’च्या लग्नाची गोष्ट…..

कधी अटेंड केलंय़  का एखादं भैय्याचं लग्नं ??- नाही पुण्या मुंबईला नाही.. तर थेट बिहार युपी मधे ? नाही?? अरे यार.. तुम्ही जीवनातल्या एका अत्युच्च आनंदाला मुकला आहात. वन्स इन अ लाइफटाइम , त्यांचं लग्नं एकदा तरी अटेंड केलंच पाहिजे.ह्या भैय्या लोकांच्या लग्नामध्ये खुप मजा येते. इतकी मजा तर अगदी मारवाड्याच्या लग्नात पण येत नाही.

हे भैय्ये लोकं  कितीही शिकलेसवरले असले तरीही वागणुकीत फारसा फरक नसतो.  शेवटी वळणाचं पाणी वळणालाच मिळणार ना?

नुसती धमाल असते.. या लोकांच्या लग्नाची वेळ साधारण रात्री १ ते ४ च्या दरम्यान असते.    लग्न म्हणजे एक मोठा कार्यक्रम असतो. लग्न रात्री , म्हणजे दिवसभर फुल टू टाइम पास सुरु असतो. खाणं पिणं..इत्यादी इत्यादी.. इत्यादी  गोष्टींची रेलचेल असते. ज्याला जे वाटेल ते तो करित असतो.

तर अगदी पहिल्या पासून सुरु करु या आपण.. नवऱ्या मुलाला   कुठल्यातरी चांगल्याशा  हॉटेलमधे त्याच्या मित्रांसोबत उतरवलेले असते. आदल्या दि्वसापासूनच इथे त्यांची सरबराई सुरु असते. इतर बाराती पण तिथेच असतात, पण नवऱ्या मुलाच्या मित्रांना थोडा जास्तच मान दिला जातो.

लग्नाचा मंडप कुठे तरी दुसऱ्या एका ठिकाणी असतो. मंडपामध्ये सगळीकडे बसण्याची बैठक वगैरे व्यवस्था करुन ठेवलेली असते. जर जास्त झालीच तर झोपण्याची ही सोय असते. स्टेज बनवलेलं असतं, शक्यतो दोन भागात विभाजित असतं ते.  कशाला?? सांगतो!!पण पुढे , आत्ता नाही….!

लग्नाची वेळ व्हायची होती. नवरा मुलगा आय टी कंपनी  मधला- आणि मुलगी पण तिथलीच. मुलाचे सगळे मित्र आले होते कानपुरला लग्नासाठी . गप्पा, खाणं पिणं सुरु होतं सकाळपासून. शेवटी संध्याकाळी बारात निघायची तयारी झाली. अंदाजे सात- साडेसात झाले होते. हॉटेलच्या समोर बॅंडवाले  जोर जोरात बँड वाजवत होते. नवरा मुलगा खाली आला…. आणि एकदम स्मशान शांतता!!!! बॅंड वाजणे बंद झाले एकदम.. कोणालाच काही कळॆना.. काय झालं? तर बॅंडमास्टर पुढे आला, म्हणाल पैसा दो.. तो बॅंड बजेगा. ( पैसा दो.. हे म्हणताना डोक्यावरून ओवाळून टाकण्याची ऍक्शन करित होता तो).शेवटी हजार रुपये नवऱ्यामुलाकडून वसूल केल्यावर बॅंड परत सुरु झाला.

समोर एक सजवलेली कार होती. कारला बदकाचा आकार दिलेला होता. चकचकीत अल्युमिनियमच काम केलेलं होतं..वरचं टप उघडं होतं. त्यात नवरदेव बसणार तर पुन्हा तेच.. ड्रायव्हर खाली उतरला. पैसा दो… !तो ही गाडी चलेगी… इथे पण त्या नवऱ्यामुलाच्या भावाने हजार रुपये दिले, तरी पण तो कारवाला तयार होत नव्हता. १५०० रुपयांवर मांडवली झाली, आणि एकदाची समोर निघाली वरात.. थोडं पुढे गेल्यावर डोक्यावर लाइटींग घेउन चलणारे थांबले….

अगदी बरोबर ओळखलं.इथे पैसे उडवायची ऍक्शन केली त्या बत्ती वाल्यांनी.. म्हणजे  नवऱ्या मुलाच्या डोक्यावरून ओवाळून पैसे उडवा…. इथे दहाच्या आणि शंभराच्या नोटांचं बंडल होतंच त्या मुलाच्या भावाच्या हातात, म्हणजे त्याला पुर्ण खात्री होती की असं काहीतरी होणार म्हणून. डान्स बारमधे नोटा ऊडवतात तशा नवऱ्यावरून ओवाळून नोटा उडवणे सुरु झाले. ह्या बत्ती वाल्यांच्या बरोबर लहान मुलं पण होती. ती नोटा गोळा करुन आपापल्या आई बापाकडे देत होते. सोबतंच डोक्यावरच्या बत्त्या खाली ठेवून ते लोकं स्वतः पण नोटा गोळा करित होते.  नवरा मुलगा केविलवाण्या प्रमाणे हे सगळं पहात होता.

असं होता होता वरात एकदाची कण्हत कुथत लग्न मंडपा जवळ ( म्हणजे अर्धा कि.मी वर ) पोहोचली. तिथे एक सुंदर सजवलेला पांढरा घोडा, छानसं खोगीर घालुन तिथे उभा होता. त्या घोड्यावर मुलाला बसवलं.. अरे भाई…. बारात तो घोडीपेही आएंगी नां…. तर तो घोडा घेउन त्याचा मालक चालायला लागला. समोर फटाके उडवणं सुरु होतं..

घोडी चालत होती, तेवढ्यात एक गाणं सुरु झालं, आणि त्या घोडीच्या मालकाने घोडीच्या लगामाला विशिष्ट झटका दिला आणि ती घोडी नाचायला लागली. मोठं मजेशीर दृष्य होतं ते. घॊडीच्या पाठीवर नवरा मुलगा जीव मुठीत धरुन बसलाय , आणि ती घॊडी नाचते आहे. मला तर वाटलं की तो नवरा मुलगा पडणार आता. अहो घोडीवर बसायचं, आणि लगाम हातात नाही, नुसती आयाळ धरुन किती वेळ तोल सांभाळणार?????. नवरा बिचारा केविलवाणा चेहेरा करुन विनंती करतोय की  बस्स.. करो भाई.. मत नचाओ घोडी को….मला उतरव रे बाबा.. पण … नो वे.. तो घोडी वाला अजुन चेव आल्यासारखा त्या  घोडीला नाचवत होता…  शेवटी त्या मुलाचा भाउ पुढे आला, आणि त्या घोडीवाल्याला १००० रुपये दिले, तेंव्हा हा तमाशा थांबला…आणि  ती घॊडी दुडक्या चालिने मंडपाकडे निघाली.

नवऱ्या मुलाची सगळी हाडं खिळखीळी झालेली असावी त्या नाचण्यामुळे.चेहेरा अगदी पहाण्यासारखा झालेला.. त्याला पण वाटलं असावं, की कशाला आपल्या मित्रांना बोलावलं लग्नाला, उगीच शोभा करुन घ्यायला!!!परत गेल्यावर ते आपल्याला कसे चिडवतील हा पण एक प्रश्न होताच..

लग्न मंडपाच्या दाराशी, टिका लावणे हा प्रकार झाला. आणि नवरा मुलगा आत जाउन बसला. समोर जेवणाची व्यवस्था करुन ठेवलेली होती. स्नॅक्स वगैरे होतेच.. आणि कोणीतरी हळूच येउन सांगितलं की उपर व्यवस्था की गई है.. वरच्या मजल्यावर अपेय पानाची व्यवस्था होती. लोकं वर जाउन पिऊन येत होते, तर काही लोकं खालीच बाटल्या घेउन आलेले होते. समोर स्टेजवर मुलगा आणि मुलगी बसले होते. स्टेजच्या अर्द्याहुन जास्त भागात………!!!!!!!!!!!

तर स्टेजच्या दुसऱ्या अर्ध्या भागात डान्सकरिता स्टेज सजवलं होतं.समोर चार मोठे मिशीवाले गुंडासारखे दिसणारे लठैत होते. स्टेजवर बिडी जलाइले …. जिगरसे पिया…. गाण्यावर दोन अर्ध नग्न स्त्रिया नाच करित होत्या- तुम्ही सिनेमात पहाता ना, अगदी तस्संच…. स्टेजवरच एक मेक शिफ्ट पडदा लावलेला होता. नाच सुरु असतांनाच एखादा टुल्ली झालेला स्टेजवर चढायचा प्रयत्न करित होता….. आणि मग लगेच ते लठैत का आहेत याचा शोध लागला..

कोणी त्या स्टेज वर चढलं आणि त्या मुलींच्या अंगचटीला जाउ लागलं, तर ते लठैत त्या माणसाला खाली उतरवायचे… आणि तेवढ्यातच त्या स्त्रिया पडद्यामागे धावत जायच्या, आणि ते लोकं खाली उतरले की मग पुन्हा स्टेजवर  यायच्या… अशा चार मुली होत्या..आलटून पालटुन नाचायला.. 🙂

थोड्या वेळाने अनाउन्समेंट झाली, की आता १० मिनिटांचा ब्रेक आहे, आणि तेवढयात पाहुण्यांनी खान -पान करुन यावे. लोकं धावतंच माडिवर गेलेत पेय पान करायला…!आणि खायला..पुन्हा थोड्यावेळाने सिडी लाउन नाच सुरु झाला.आणि पुन्हा तेच सगळं.. लोकांचं ओरडणं .. वगैरे वगैरे….

जयमालेची वेळ रात्रीची एक वाजताची होती. जयमाला झाली आणि पुन्हा हा नाच सुरु झाला. रात्री मग इतर कार्यक्रम सुरु होतेच. बरेचसे लोकं तिथेच  टाकुन ठेवलेल्या बिछायतीवर आडवे होऊन घोरु लागले होते.. लग्नाचे इतर विधी पण झालेत रात्रभर चालणारा हा सोहोळा कधी संपला ते कळलंच नाही….. 🙂 विदाईची वेळ सकाळी  आली, तो पर्यंत अर्धे लोकं आडवे झालेले होते… 🙂

प्रत्येकाने आयुष्यात एकदा तरी अटेंड करावा असा हा सोहोळा… मस्ट फॉर एव्हरी वन .. वन्स इन लाइफ टाइम…! 😀 बाय द वे.. मी नाही अटॆंड केलं हे, तर माझी बहीण आणि तिचा नवरा दोघे पण गेले होते या लग्नाला. ती दिल्लीला असते , आयटी मधेच 🙂 तिने केलेले वर्णन इथे लिहुन काढलंय. आज आली होती  ती मुंबईला..

About महेंद्र

माझा ब्लॉग :- http://kayvatelte.com
This entry was posted in अनुभव and tagged , , , . Bookmark the permalink.

60 Responses to ’भैय्या’च्या लग्नाची गोष्ट…..

 1. Sagar says:

  Evadh varnan kel aahet Pan kaka tumhi kay kelat he nahi sangital……An bhar Lagnat Ardhnagn bayka nachavan matr patat nahi manala……
  Baki Maja aahe..:)

  • सागर
   त्यांच्याकडली ती पध्दत आहे, एखादा युपी वाला मित्र असेल तर त्याला विचारुन पहा.. हे असंच असतं त्यांचं.. लोकसंगितातली गाणी असतात. किंवा सिनेमातली द्वै अर्थी.. बिडी जलाइले सारखी..

 2. gouri says:

  maaravaadee lagn attend kele hote … khaas baaraati mhanoon. pan bhaiyache lagn ha tyahoonahi khaas prakaar disatoy!

  • माझी बहिण सांगत होती, खुप मजेशिर प्रकार आहे हा. ती पण आय टी मधलीच, कलिग असल्यामुळे त्या नवऱ्यामुलाने बोलावले म्हणे लग्नाला. 🙂 मारवाडी लोकं त्रास देतात मुलीकडच्यांना.. विनाकारण, इथे तसं दिसलं नाही म्हणे फारसं..

 3. Nilima says:

  hmmm lagne mhantle ki danse etc aalech mhana agdi aaplya marathi lokan madhe dekhil varatit nachycha dhangad dhinga disto 🙂
  pan kahi loka n madhe agdi sadhe panane lagn hotat . khas karun kerali (malayali) madhe, koni attend kele aahe ka?? mi kelay.
  lagne agdi sadhya padhtine lavnyat yete kuthe hi dhangddhinga nasto agdi agni fere dekhil 3 ch 🙂
  ho pan hyachi lagnache main attration mhange purn pane gold ne natleli vadhu agdi paya pasun ter dokya praynt gold chya daginyani natleli aste.
  aani ho stage pan khup sunder flowers ni sajvlela asto.
  satge chi sajvet khupchaan aste, aani jevn dekhil mastech khas karun paysam(khir) tar pyalach have.
  tar ekda tari kerali lagn attend karun paha 🙂

  • धांगडधिंगा असतोच. हल्ली तर मुली पण नाचतात वरातिमधे, फक्त या बिहारी किंवा युपी लोकांच्याइतका आक्रस्ताळेपणा नसतो आपल्याकडे…
   केरळी लग्न केलंय अटेंड, पण ते फक्त मराठी केरळी लोकांचं. माझा एक मामे भाउ डॉक्टर आहे, त्याचं लग्नं केरळी मुलिशीच झालं. ती फक्त नावालाच केरळी, जन्मापासुन महाराष्ट्रात, म्हणुन पुर्ण मराठी होती ती.. फक्त नांव होतं केरळी.. खरं केरळी लग्नं अटेंड करायचंय एकदा. आता ९ तारखेला हैद्राबादला जातोय, एका लग्ना साठी. इथे मराठी मुलगी, आणि हैद्राबादी मुलगा असं कॉम्बिनेशन आहे .. बघु या.. कस काय होतं ते.. 🙂

 4. Kedar says:

  Mahendra ji, pharach masta varnan aahe he. Mi majhya eka Agra chya mitrachya lagnachi gammat jammat tyachya tondun aaikli aahe. Tumhi je lihila aahe agdi tasach. Ani tumhi mhanalat tasach, shikshan vagaire he lok chulit ghaltat ani ashi ashi mati khatat.
  Ajun ek prakar tyane sangitla hota tyachya lagnatla. Mhane varati madhe kharya kharya bandukitun golibar kartat te lok. Aikava te navalch. Nashib ha daru pinyacha karyakram he sagla varat birat jhalyavar asta. Nahitar ekhadya talli chya hatat banduk padaychi ani makdachya hatat kolit sarkha prakar vhaycha. Yanchya lagna payi koni tari aju bajuchya building madhla goli lagun jaaycha. Ani bara tar bara tithe yamadoot pan adun basaycha, mhanaycha paise de tar var neto!!!

  • बंदुकिच्या गोळ्यांचं मी पण ऐकलं होतं. नेहेमीच पेपरला पण येत असतं, बरात मधे गोळिबारामुळे कोणीतरी गोळी लागुन मेलं म्हणुन.. प्रतिक्रियेकरता आभार..

 5. आनंद पत्रे says:

  आम्ही एक बिहारी लग्न मिस केलं, पण आम्ही मुलीकडून जाणार होतो… आता अजून एक चान्स आहे, मुलाकडून जाण्याचा त्यावेळी बघता येणार आहे….
  वर्णन मात्र एकदम झकास, बिहारी मित्राकडून ऐकल्या सारखे ….

  • अवश्य जा लग्नाला. पण ते लग्न मात्र बिहार /यु पी मधे व्हायला हवं.. इकडे मुंबईला आपल्याच पध्दती प्रमाणे होतं यांचं लग्नं.. इकडचे भैय्ये बरेच सुधारलेले आहेत..

 6. mipunekar says:

  Vachatana mitrakadun aikala hota te athavala.
  Masta watala vachun.

  Next post madhe houn jaude Eka Hyderabadi Lagnachi Goshta!!

  • बहिण नुकतीच शिकागो हुन परत आलेली, म्हणुन जास्त मजेशिर वाटलं असावं.. पण तीने ज्या पध्दतीने सांगितलं, ते ऐकुनच मजा आली आणि , तेंव्हाच ठरवलं, यावर लिहायचं म्हणुन… 🙂

   हैद्राबादच्या लग्नाची गोष्ट… सगळे नातेवाईक फाडुन खातिल , काही लिहिलं तर.. 😀

 7. Rohini says:

  🙂 मजा आली वाचताना.

 8. Abhijit says:

  अशक्य वर्णन आहे ! मला कोणी अशा लग्नाला बोलावताय का याची मी वाट बघतोय आता. वाचताना खूप हसू आले. माझी खात्री आहे की हि कहाणी ऐकताना तुम्हाला जास्तच हसू आले असेल.

  • बराच वेळ माझा विश्वासच बसत नव्हता.. असं शक्यच नाही असं सारखं वाटत होतं.. पण ती इतक्या सिरियसली सांगत होती की विश्वास ठेवावाच लागला.. एखादा युपी वाला मित्र असेल तरच चान्स आहे… बेस्ट लक..

 9. Akshay says:

  नमस्कार ,
  फ़ारच छान वर्णन केलं.पहिल्यांदाच याबाबत वाचतोय. मजा आली.
  माझे काही वर्गमित्र आहेत. तिकड्ले ,त्यांना आता मी लग्नाच विचरिल व त्यांच्या लग्नाची वाट पाहिल.

  • अक्षय
   अजिबात चान्स सोडू नका. आणि इतर कुठल्याही लग्नाला जायचं म्हंट्लं तरिही कधीच चान्स सोडू नये या मताचा मी आहे.

 10. ravindra says:

  सुंदर वर्णन झाल आहे एका लग्नाच. माझ्या माहितीप्रमाणे त्यांचे लग्न जवळ जवळ एक आठवडा चालते. रोज रात्री नाच गाण्यांचा कार्यक्रम असतो. 🙂 🙂 धमाल असते.

  • रविंद्र
   ते एक आठवड्याचं म्हणजे नवऱ्या मुलाच्या घरी, आणि त्या मुलीच्या घरी वेगवेगळे प्रोग्राम्स असतात असं ऐकलंय.. माझी इच्छा आहे .. बघु या कसं जमतं ते.. एक भैय्या लग्नं पुण्याला अटेंड केलं तर ते अगदी साधं आपल्या सारखंच झालं.. !!

 11. हेरंब ओक says:

  आयला… तुम्ही नुसत्या ऐकलेल्या वर्णनावरून एवढ मस्त लिहील आहेत. प्रत्यक्षात अटेंड केल असतात तर किती details दिले असतेत 🙂 .. पण जायला हव एकदा या लग्नाला. बघूया कोणी बोलावतय का 🙂

  • ते तर आहेच. जर स्वतः पाहिलं असतं तर अजुन जास्त व्यवस्थित लिहिता आलं असतं. 🙂 बघु पुढे मागे चान्स मिळेलच …

 12. sanket says:

  माझ्या बिहारी मित्राने अगदी असेच वर्णन केले होते. नाचणार्‍या बायांना ’बाईजी’ म्हणतात.गोळीबार वगैरे ज्यांचे मोठे प्रस्थ आहे त्यांच्याकडे. पण एक मात्र खरे, रात्रीच्या लग्नातच मजा असते.मराठी लोकांमधे जे दिवसा लग्न लागतात ते मला अगदीच मिळमिळीत वाटतात आणि उन्हाळ्यातील दुपारचे लग्न जीव खातात.

  • संकेत
   उन्हाळ्यातली दुपारची लग्नं.. आणि ती पण नागपुरसाईडला/औरंगाबादकडे असली तर हाल विचारायलाच नको.. आपल्या कडे सकाळचाच मुहुर्त असतो नेहेमी..

   • sanket says:

    मी मे महिन्यातलं सकाळी ९ चं लग्न attend केलं होतं नागपुरला, खापरी railway crossing traffic jam मुळे १२ ला लागलं(नवरदेव वर्ध्याचा !!!) सगळयांचेच जे हाल झाले त्याचे वर्णन शक्य नाही.

    • नागपुरचा उन्हाळा.. बापरे कल्पनाच करवत नाही. नागपुरला असतांना बाइकवर ह्याच उन्हातफिरायचो..आता सहन होत नाही..

 13. anukshre says:

  मस्तच वर्णन आहे. मी वाचेपर्यंत २९ वाचक लग्न पाहून आले सुद्धा! तुमच्या बहिणीला खास धन्यवाद सांगा. त्यांच्या मुळे हा लग्न योग जुळून आला. मी ओमानी लग्नाचे आमंत्रण येते का?ह्याची वाट पाहत आहे.

  • ओमानचं लग्न.. मला वाटतं तेआपल्या कडल्या मुस्लिम लग्नासाखंच असावं.. ती जेंव्हा सांगत होती तेंव्हा नुसती हसुन ह्सुन पुरेवाट झाली होतीआ्मची..

 14. mau says:

  सही एकदम !!मी पण अटेंड केलेय हे असे एक लग्न..खुप मजा आली होती..माझ्या एका मावज बहिणीने च केलेय बिहारी मुलाशी लग्न..सोलिड धमाल आली होती.पैशाची उधळण तर काही विचारु नका.आणि विशेष गोष्ट म्हणजे त्यांच्या कडे ह्या प्रकारच्या नाचगाण्यांना बायका काही आक्षेप घेत नाहित.त्यांच्या मते..”अरे!!मर्द नही ये सब करेगा तो कोहुन करेगा..असे म्हणुन पुरुषांना प्रोत्साहित केले जाते.फ़रक एव्ह्ढाच कि आपण स्वातंत्रदिन सेलिब्रेट करतो.पण हे लोक पारतंत्र्याचा तो पहिल वहिला दिवस अगदी जोशात सेलिब्रेट करतात.लग्ने अटेंड करावी तर त्यांची.बाकी रागरुसवे जसे त्यांच्याकडे तसे आपल्याकडे पण होतातच नाही का???
  बाकी लेख एकदम सही..

  • माझी पण इच्छा आहे .. एकदा अटेंड करण्याची . माझी बहिण नॉन स्टॉप बोलत होती त्या लग्ना बद्दल जवळपास एक तास. एक मोठी कादंबरी होऊ शकते यावर.. 🙂
   पहिल्यांदा ब्लॉग वर आलात.. धन्यवाद.. 🙂

 15. sachin says:

  काका अगदी खर आहे. माज्या एका बिहारी मित्राच्या लग्नाला गेलो होतो. आपल्या गावाकडच्या तमाशा सारखाच असत त्याचं लग्न.

  • नशिबवान आहात तुम्ही सचिन.. 🙂 तसंच बंगाल्यांचं लग्न पण मजशिर असतं म्हणतात.. आजपर्यंत फक्त रिसेप्शन अटेंड केलंय. एकदा ते पण लग्न अटेंड करायची इच्छाआहेच..

 16. sahajach says:

  महेंद्रजी वाचतांनाच ’बिडी जलाईले’ आठवत होते की पुढे उल्लेख आलाच….मजा आली वाचताना :)……
  आजकाल आपल्याकडेही बरेच बदल झालेत लग्नात…..पण तरिही शांत असतात आपल्याकडची लग्न!!!!!

  • बिडी जलाइले..आणि चोली के पिछे तर ह्यांचंफेवरेट असतं.. सारखं तेच ते गाणं सुरु होतं म्हणे..

 17. Nikhil Joshi says:

  Laeee bhari post aahe.
  FYI I am never going to get married in Behar.

  • LOLz… 😀 इतकं घाबरायला नको..

   तुमच्या मित्रांना मजा येइल..तुमच्या लग्नात. 😀 जर बिहारी मुलशी लग्न केलंच तर!!

 18. Aparna says:

  मी शाळेत-बिळेत असताना एका चणेवाल्या भय्याच्या मुलीच्या लग्नाच्या दुसर्या दिवशी तृतीयपंथी लोकांना बोलावून नाच आणि असाच धांगडधिंगा पाहिलेला पुसटसा आठवतोय..अर्थात काही कळण्याचं वयही नव्हतं…या पोस्टवरून आठवलं…
  बाकी सगळ्यांनी कॉमेन्टू ठेवलंय…तुम्ही मात्र सॉलिड उत्सुक आहात बिहारी लग्नाला जायला असं दिसतंय….:) आणि जर गेलात तर मात्र लगेच एक ओरिजिनलवारी पोस्ट टाका. 🙂

 19. Renuka says:

  Hahahahaha!! Khup maja ali.. Vijay ani me khup haslo vachtana.. 🙂
  ekdum mast lihilas.. Jya friend cha lagna jhala tyala marathi kalat nahi nahi tar to pan khup hasla asta swatachya lagnacha varnan vachun.. 🙂

  • विजय ला म्हणा, की हे पोस्ट ट्रान्सलेट करुन सांग त्या मित्राला.. 🙂 तु काल सांगितलंस तेंव्हाच खुप हसु येत होतं,केवळ २५ मिनिटात टाइप करुन पोस्ट केलंय.. फारसा विचार न करता…
   कांही लोका्नी तुला पण थॅंक्स म्हंट्लंय…मला हे सांगितलं म्हणुन.. 🙂

 20. Rohan says:

  अरे कामामूळे आता सर्व ठिकाणाचे मित्र ओळखीचे झाले आहेत. येत्या काही वर्षात नक्की अशी भन्नाट लग्न नक्की अटेंड करणार .. हाहा … बाकी तुझे वर्णन मस्तच… 😉

 21. बायका असतात त्यांच्या लग्नात? आमच्या शेजारची मिश्रा मावशी सांगायची की दुल्हा बारात घेऊन जेव्हा घरी येतो, तेव्हा बायका त्याला ओवाळण्यासाठी घरीच थांबतात म्हणे. कदाचित मुलीकडच्या बायका लग्नाला येत असतील.

  त्यांचा गौना (की गवना?) पण भारी असतो. मुलीला सुई पासून गाडी पर्यंत सर्व काही देतात. मुलाने फक्त मांडवात उभं रहायचं.

  आमच्या शेजारच्या मिश्रा मावशीला दोन मुलं तीन मुली. मुलांच्या लग्नात मिळवलं, ते मुलींच्या लग्नात दिलं. “सौदा तो घाटे का ही रहा”, असं म्हणाली. मुली तीन ना!

  • माझी बहिण तर गेली होती मुलाकडुन.. ..तो मित्र म्हणुन त्याच्या लग्नाला.. स्त्रिया येतात की नाही ते विचारलं नाही मी .. कदाचित नसतिल पण….
   असो..
   तुमचं हे बाकी अगदी खरं की ..प्रत्येक गोष्टीत सौदा पहातात ते लोकं.

 22. घोडीचा सीन सॉलीड आहे 🙂

 23. अरे वा! सॉलिडच!!
  अजुन तरी असा “शाही लग्नसोहळा” आपल्या नशिबी पाहणे – हजर राहणे – आले नाही… मात्र आता नजर ठेऊन बसतो, कदाचित मित्र – मित्राचा मित्र – असा कोणी सापडेलच 😉

 24. bhaanasa says:

  महेंद्र कसला धमाल प्रकार आहे. अर्थात फक्त लांबून पाहण्याकरीताच बरं का. आपल्याकडे असे काही होत नाही ….तेच चांगल आहे. बाकी कसले सही आहे हे लग्न. हा हा…. घोडीचा सीन तर मस्तच. माझ्या चुलतबहिणीच्या लग्नात माझा मेहुणा असाच घोडा उडवत आला होता. पण त्याला घोड्यावर नीट बसताही येते आणि रपेटही जमते. आणि खान पान व नाचकाम तर कठीणच ………:) मस्तच.

 25. RAJEEV says:

  वाह .. !!!!! महेंद्र भय्या !!!! वाह….

 26. sayali says:

  Hi,
  Maja aali vachun 🙂
  Majhya eka aatya ne bihari, ekine bangali, ekine kannad tar ekine haryanvi mulanshi lagn kelet..Majha navara telugu 🙂 Salglya lagnanchi aathvan jhali..Thanks!!

  • सायली
   प्रतिक्रियेकरता आभार.गेले काही दिवस नेट वर जवळपास नाहीच .. म्हणुन वेळ झाला उत्तर द्यायला.

 27. sureshpethe says:

  महेंद्रजी,
  खूप छान वर्णन केलयंत ! जणू लग्नात सामील झाल्या सारखेच वाटत होते !!

  आपला भारत इथुन तिथे पसरला आहे ! त्यामूळे व ठिक ठिकाणच्या परंपरांमुळे हे बदल घडून आलेले दिसतात, आणि ह्या परंपरांनाही अनेक पिसे जोडली गेलेली असतात !!
  कशाला, परवा एका गृहमुखाला जाण्याचा प्रसंग आला…फार लांब नाही औरंगाबादला तिथे गृहमुखालाही गावजेवण होते!! लग्नाला तर तालुकाच यायचा !!…
  खूप आवडला.

  • सुरेशजी
   प्रतिक्रियेकरिता आभार. लहान गावात तर कुठलाही प्रसंग असो.. अख्खं गांव येणारंच , तुम्ही बोलवा किंवा नका बोलवु.. 🙂

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s