नादस्वरम…

नाद्स्वरम

नाद्स्वरम, ढोल, आणि श्रुती बॉक्स वादक ...

अगदी लहान असतांना ३-४   वर्षं शिकलेलं   हार्मोनियम – ते पण केवळ वडिलांनी आग्रह केला म्हणून….एवढाच काय तो माझा संगीताशी संबंध.. खरं तर संगीतातलं फारसं काही कळत नाही, पण तरीही कुठलंही  क्लासीकल संगीत ऐकायला आवडतं.

मी जे काही हार्मोनियम शिकलो, त्यामधे पहिले दोन वर्ष फक्त आरोह, अवरोह, इतकंच शिकवलं गेलं ..शिकवणाऱ्या शकाताई होत्या, म्हणायच्या, अरे मोर पीस अंगावर कसं फिरतं, तशी तुझी बोटं फिरली पाहिजेत पेटीवरुन.. … हलकेच.. असं बोटं दाबून पेटी वाजवायची नसते….!!!आणि जो पर्यंत त्यांच्या अपेक्षेप्रमाणे पेटीवरून बोटं फिरणं सुरु झालं नाही , तो पर्यंत   पहिला अलंकारच मी ४-६ महिने गिरवला.नंतरचे बरेच दिवस नुसते आरोह अवरोहच सुरु होते. अगदी काफी सारखा राग पण चांगला ्तीन महिने गिरवला   होता.. नंतर यमन काही महिने..

असो..गाणं फारसं काही शिकलो नाही, पण या सगळ्या शिकल्यामुळे एक झालं की स्वरांची ओळख पक्की झाली. एक दिवस मित्राचा माउथ ऑर्गन सहज म्हणुन हातात घेतला, आणि लक्षात आलं, की कुठलंही  शिक्षण न घेता आपल्याला   माउथ ऑर्गन वर   गाणं वाजवता येतय. नंतर कधी तरी पेटी पण वाजवून बघीतली,  आणि जमतंय की गाणं वाजवणं आपल्याला.. हे लक्षात आलं. क्लासीकल काही शिकू शकलो नाही.. मी एकही गाण्याची   परीक्षा पास झालेलो नाही . एकच आहे मी जरी तानसेन होऊ शकलॊ नाही, तरी पण कानसेन मात्र नक्कीच झालोय .

तर   मी हैद्राबादला  माझ्या भाचीच्या लग्नासाठी गेलो होतो.. तशी भाची मराठी- पण अगदी जन्मापासुन हैद्राबादला, त्यामुळे आंध्राईटच म्हणायला हवं, मुलगा राजस्थानी – तो पण जन्माने आंध्रातलाच..त्या मुळे लग्नामध्ये एकाही ठरावीक समाजाच्या चाली रिती पाळल्या गेल्या नाहीत.काही विधी राजस्थानी पद्धतीने, तर काही मराठी पद्धतीने झाले…आणि उरलेले हैद्राबादी पद्धतीने..

मला लहानपणापासून सनई आणि चौघडा खुप आवडतो ऐकायला. चौघडा , तबला, मृदुंग ऐकणं म्हणजे पर्वणी.  लग्नात लहानपणापासुन त्या सनई वाल्यासमोर जाउन उभं राहुन सनई ऐकायची, किंवा एखाद्या दिवशी मुद्दाम स्वयंपाकघरातून आणुन चिंच  त्या सनईवाल्यासमोर चाखत उभं रहायचं.. .. असा वात्रट पणा पण केलेला आहे.समोर कोणी चिंच खातोय, तेंव्हा  तोंडाला खुप पाणी सुटून  सनईवाल्याला सनई वाजवणं कठीण होतं.

सकाळी लवकर कार्यालयात आलो, तर तिथे एक शहनाईसारखं वाद्य घेउन ( फक्त लांबीला थोडं जास्तं असेल) साथीला ढोल घेउन एक माणुस ,तिसरा एक लहानसं पेटी सारखं वाद्य घेउन बसला होता. सगळ्यांचे पांढरे शुभ्र शर्ट्स आणि कंबरेला ( पांढरी काठ असलेली लुंगी)  वेष्टी, कपाळावर टीळा , तेल लाउन भांग पाडलेले केस..सगळीकडे जाईची फुलं वापरुन केलेले डेकोरेशन- या सगळ्याच्या मुळे एक   एक वेगळीच वातावरण निर्मिती झाली  होती.

त्या माणसाकडे गेलो, आणि हळूच ह्सलो, तर त्याच्या चेहेऱ्यावर पण एक कम्फर्ट लेव्हल दिसु लागली.. म्हंटलं .. इतनी बडी शहनाई क्यु है ये?? बस्स.. एवढं विचारायचा अवकाश, की त्याने सुरु केलं माहिती सांगणं. ये नाद्स्वरम है.. कर्नाटकी संगिताचं एक मुख्य वाद्य..म्हणाला की सगळ्यात जास्त लाउड वाद्य आहे हे.शेजारीच बसलेल्या त्या  ढोलवाल्याच्या बोटांवर एक वेगळंच काहीतरी सिरॅमिकचं चढवलेलं दिसत होतं. शिंपी काज बटन करतांना बोटामधे सुई जाउ नये म्हणुन एक स्टिलची कॅप घालतो तसंच काही तरी समजा.. तो ढोल वाजवण्यासाठी हे सिरॅमिकने मढवलेली बोटं वापरतात. या सिरॅमिक मुळे एक वेगळाच नाद निर्माण होतो.

लग्नाच्या वेळेस तर लोकं अक्षता टाकण्यात बिझी होते, पण मी मात्र आपली त्या नादस्वरम वाजवणाऱ्याच्या जवळची जागा धरुन बसलो होतो.जसं लग्नं लागलं, तसं आपल्या कडे ज्याप्रमाणे सनई चौघडा सुरु होतो, तसा नासस्वरम सुरु झालं. यावरचे जे काही गाणी वाजवत होते, ती किंचीत रागदारी कडे झुकणारी अशी वाटत होती.थोडं लाउड, पण गोड संगीत.. खाली दिलेला व्हिडीओ यु ट्य़ुबवरचा आहे. मी शुट केलेला खूप मोठा असल्याने अपलोड होत नाही..

संगीताला भाषा नसते. असतो तो फक्त ताल…. जॊ तुम्हाला ऐकतांना डोलायला लावतो! या मधे जो सिरॅमिकच्या बोटांनी निर्माण होणारा नाद.. आणि सोबत नादस्वरम चा नाद यांचं जरा लाउड कॉंबीनेशन ऐकायला मजा आली. काही व्हिडीओज पण बनवले आहेत, पण अपलोड केलेले नाहीत अजुन.. पण यु ट्युबवर बरेच अव्हेलेबल आहेत.

जेंव्हा तो थांबला, तेंव्हा त्याला विचारलं की तू हे काय वाजवतो आहेस? तर म्हणाला की  त्यागराजा म्हणून एक संत होऊन गेले आंध्रा मधे. त्यांची किर्तनं ( आपण ज्याला भजनं म्हणतो, तसं आंध्रामधे किर्तनं हा शब्द वापरला जातो) खुप प्रसिध्द आहेत, आणि लग्नामधे ट्रॅडीशनली तिच वाजवली जातात . आपल्या कडे जसे संत तुकाराम महाराज तसे तिकडचे त्यागराज महाराज. लग्नामधे बहुतेक वेळा त्यागराजांचीच किर्तनं (भजनं) वाजवली जातात.

अगदी जवळुन ऐकलं तर कर्कश्य वाटणारं हे संगीत, थोडं दुरुन ऐकलं की मग मात्र खूप छान वाटतं. त्या नादस्वरमचा आवाज, आणि सिरॅमिकच्या बोटाने वाजवलेला ढोल, आणि साथीला ते केवळ ’सा’आणि ’प’ वाजवणारी श्रुती बॉक्स ( लहानशी पेटी) यांचं कॉम्बीनेशन अप्रतीम आहे हे…. गादीवर बसून तर वाजवतातंच ही वाद्यं, पण हीच वाद्य उभं राहुन जेंव्हा ते लोकं वाजवतात , ती  वाजवतांना पहायला खूप मजा येते. लाइव्हली नेस असतो त्यांच्या वाजवण्यात..

तुमच्या पैकी बऱ्याच लोकांनी दक्षिण भारतीयांची लग्नं अटेंड केली असतील, तेंव्हा हे वाद्य पहाण्यात आलं असेल.. जर तेंव्हा दुर्लक्षं केलं असेल, तर आता पुन्हा चान्स मिळेल तेंव्हा नक्कीच पहा….. आणि  ऐका……

About महेंद्र

माझा ब्लॉग :- http://kayvatelte.com
This entry was posted in कला and tagged , , , . Bookmark the permalink.

18 Responses to नादस्वरम…

 1. अजून दक्षिण भारतीय पद्धतीचा लग्नसोहळा पहाता आलेला नाही. 😦 पण आमच्या इथे अयप्पा मंदिर आहे. जेव्हा त्यांची रात्री मिरवणूक निघायची तेव्हाचं संगीत लक्षात आहे. प्रचंड थंडीतही ते लोक त्यांचे मोठ्ठाले ढोल (त्याला काय म्हणतात माहित नाही :-() वाजवायचे. ते ऐकताना खूप छान वाटायचं. सगळं शिस्तबद्ध वाजवत असायचे.

  मलाही संगीत शिकण्याची हौस होती. त्यासाठी गिटार विकत घेतलं होतं. मग लक्षात आलं की तंतूवाद्य हा आपला प्रांत नाही. त्यापेक्षा हार्मोनियम किंवा पियानो असं किबोर्ड वालं काही तरी शिकायला हवं होतं. :-~

  व्हिडीओ लवकर अपलोड करा.

  • अवश्य शिकायला पाहिजे. मला जमलं नाही कधिच. खरं सांगायचं तर मी कंटाळुन गेलो होतो. परिक्षेला बसायचं नाही, तेच ते पुन्हा पुन्हा वाजवत रहायचं.. अगदी पक्कं होई पर्यंत.. सोडलं तेंव्हा लक्षात आलेलं नाही, की आपल्याला तेच ते सुर पुन्हा पुन्हा वाजवुन सुरांचं ज्ञान पक्कं झालंय ते…!!व्हिडीओ घरी गेलो की अपलोड करतो…

 2. anukshre says:

  मला मिळाला आहे हा अनुभव. ह्या नादस्वरम कडे दुर्लक्ष करत येत नाही. ह्या स्वरांच्या कदाचित सी डी उपलब्ध असतील. आपल्याला नाव कळले तर मला ही कळवा. आवडेल संग्रह करायला.
  बाकी हॉबी क्लास मात्र एकदम पटला.

 3. अरे वा…. हे पोस्ट चक्क संगितावर – म्युजिक म्हणायचेय मला… 😉

  साऊथच्या संगिताची एक वेगळीच जादु आहे.. बॅचलर असताना आमच्यातलाच एकजण रोज सकाळी – सुब्बलक्ष्मी ची भजनं – शास्त्रीय संगित – लावायचा… सुरुवातीला जरा वेगळीच वाटायची .. पण हळु – हळुत्यात एक सुखद आनंद जाणवु लागला… मग आम्हीच बर्‍याचदा ते संगित ऐकत असु!

  आपण हैदराबादला असल्याची बातमी ट्विटरवरुन समजलीच होती… वाटलं – आता पोस्ट येणार – चवीने खाणार – हैदराबाद!
  असो – अपेक्षा करायला काय हरकत आहे – पोस्ट येईलच!

  • मुद्दाम लिहिलं नाही.. खाण्यावर खुप पोस्ट झालेत एवढ्यात. आणि मुख्य म्हणजे मी लग्नातंच बिझी होतो, त्यामुळे काहीच स्कोप नव्हता बाहेर खादाडी करण्याचा.. आणि माझा ब्लॉगच आहे काय वाट्टेल ते..त्यामुळे अगदी कधीच अपेक्षा न केलेल्या विषयावर पण इथे पोस्ट वाचायला मिळेल… 🙂 संगीता क्या चीझ है!!!

 4. sahajach says:

  पुन्हा एक वेगळा विषय…मला वाटतं मुळात स्वभाव रसिक असला तर विषयांमधे विविधता आपोआप येणार…..जे तुमच्या ब्लॉगवर होतय!!!! गुणग्राहकता असली की हे असे पोस्ट येतात!!!
  आता संगीताविषयी मीदेखील तुमच्याचसारखी कानसेन……हल्ली घरात ईशान सुंदर गातोय….
  लवकर व्हिडिओ टाका म्हणजे आम्हालाही पहाता आणि ऐकता येतील!!!!

  • अहो माझ्या वडिलांची खुप इच्छा होती, की मी गाणं शिकावं म्हणुन. पण मुळात आडातच नाही तर पोहोऱ्यात येणार कुठुन?? आणि आमच्या काळी तर जो पर्यंत एक अलंकार पक्का होत नाही, तो पर्यंत तर दुसरा सुरु पण करित नव्हते… त्यामुळे लवकर कंटाळा यायचा. आणि मी सोडून दिलं. फक्त गाणं ऐकायची आवड मात्र निर्माण झालीय त्यामुळे. आणि माउथ ऑर्गन वगैरेवर सिनेमाची गाणी वाजवता यायला लागली.. 🙂

 5. Sagar says:

  Tumhi je vadya mahnatay yacha ek atyant Sundar piece Rahman Live in LA ya programme madhe aahe….You tube var nakki asel ……Baki te vadya khup sundar aahet….Nanded la astna roj sakali 2 jan te survadya vajvat firayche rastyavar…..Khupch chan vatat ikayla…Tumhi mhatlya prakre te javalun ikal tar khup loud vatat…..Jar possibal al tar A R Rahman cha Ah Ahh ha Tamil cinemachi gani milali tar paha Tyat ek ganyat he vadya khupch sundar ritya vaprele aahe…..Jar tumhla ya vadyche kahi songs have astil tar sanga mi A R Rahman chi sarv gani devu sakhato….Roja Che original Marathi tun suddha…..Suresh Vadkar yani mahtaly title song…

  • सागर
   हे वाद्य तर नक्कीच वापरलं गेलं असावं साउथ च्या सिनेमात. तो ढोल पण असा कडकडीत वाजतो नां.. की बस अंगावर शहारे येतात तो जेंव्हा टीपेला पोह्चतो तेंव्हा. अप्रतिम… 🙂

 6. आनंद पत्रे says:

  खुपच छान निरीक्षण…. आम्ही देखील फ़क्त कानसेन आहोत.
  मी काही दक्षीण भारतीय लग्न अटेंड केली आहेत पण संगीत इतकं लक्ष देवुन ऐकले नव्हते, मात्र या पुढे लक्ष राहील.

  • आनंद
   संगिताचा आनंदंच निराळा असतो, पुढच्या वेळेस जरुर लक्ष देउन ऐका…मी तर सनई प्रमाणे याच्या प्रेमात पडलोय.

 7. bhaanasa says:

  महेंद्र इथे बरीचशी देवळे साउथचीच. त्यामुळे काहीवेळा लांबून हे ऐकायला मिळाले होते. छान वाटलेले. थोडेसे लाऊड आहे पण तुम्ही म्हणालात तसे लांबून ऐकले तर जास्त चांगले. अर्थात याचे नाव मात्र ही पोस्ट वाचूनच कळले. 🙂 शोमू सहा वर्षे गाणे व हार्मोनियम शिकल्याने घरात सतत संगीतमय गडबड असायचीच. लहान मुलांचे अजूनच प्रकार वेगळे असतात. गोड वाटते. बाकी आपणही कानसेनात मोडणारे. 🙂 पाच वर्षाचा शोमू भूप राग सहा महिने आळवत होता. पण पाहता पाहता बरीच मजल मारली त्याने. पोस्ट मस्त झालीये. व्हिडीओंची वाट पाहते.

  • भाग्यश्री
   लहान मुलांना एकच एक राग खुप दिवस आळवत बसायला कंटाळा येतो. मी पण पेटी सोडली याचं कारण हेच . मला ज्या गाणं शिकवायच्या त्या फारच पर्टीक्युलर होत्या. त्यांना बहुतेक मला पट्टीचा वाजवणारा बनवायचं होतं. पण मी पुढे सोडून दिलं.. व्हिडीऒ ्खुप मो्ठा आहे म्हणुन यु ट्य़ुबवर अपलोड केला नाही.

 8. mau says:

  खरच आहे संगीताला भाषा नसते.असतो तो फ़क्त ताल.ज्याला संगीताची आवड त्याचे मन नक्कीच कुठे ही रमत..सायन ला अय्यपा मंदिरात नादस्वरमचे नाद घुमतात…माझे बाबा आम्हाला घेउन जायचे .फ़ार गोड वाटते..थोडं लाउड असते पण दुरुन ऐकले तर तुम्ही म्हणता तसे गोड ही…प्रसन्न वाटते हे नक्की…..खुप मस्त वाटले वाचुन..आज घरि नादस्वरम ची सीडी नक्की लागणार.[:)][:d]

  • कुठलंही संगित ऐकतांना आपोआपंच ठेका धरला जातो.. मग ते दक्षिण भारतिय असो, की उत्तरेतलं संतुर असो. संतुरची कॉल ऑफ द व्हॅली ऐकली घरी आल्यावर .. बरेच दिवसांपासुन लावलेली नव्हती. आता ही नादस्वरमची सिडी आणायची आहे विकत.. बघतो कुठे मिळेल तर..

 9. सुरेश पेठे says:

  महेंद्रजी,
  आत्ता सकाळी सकाळी नादस्वरम हा तुमचा पोस्ट वाचला व ऐकला सुध्दा.
  काही वर्षांपुर्वी आमच्या कॉलनीत असेच तिघे भटके सकाळी हे वाजवीत फिरायचे. त्यांनी कधी भीक अशी मागितली नाही पण जाणारे येणारे काही ना काही त्यांना द्यायचेच. ते काही फार उत्तम वाजवणाऱ्यांपैकी नव्हते. तरीही जेव्हा लांबून ऐकायला यायचे तेव्हा हे वादन तुम्ही म्हणता तसे खूप गोड वाटायचे. अर्थात कॉलनीत झोपमोड व्हायला लागली व त्यांना यायला बंदी केली गेली व पुढेही ते दिसेनासे झाले .

  तसे एक दोन वेळा सवाईगंधर्व महोत्सवातही मी ते ऐकलेले आहे. तेव्हा ते साथीला घटम पण वापरायचे. त्याचा कडकड आवाज आपल्याकडील काड्यांनी वाजवतात तश्या ताश्या सारखा वाटायचा. बाकी भीमसेनजींनी आम्हाला कर्नाटकी संगीत बरेच ऐकवले होते. आता ह्या कार्यक्रमाला जाणे होत नाही.

  आज तुमच्यामुळे त्यांचे दर्शन व श्रवण झाल्यामुळे प्रसन्न वाटले !!

  • सुरेशजी
   लहान लहान आनंद असतात आयुष्यातले.. तेच एकत्र करुन आयुष्य आनंदी बनवायचं. संगित हा तर अत्युच्य आनंद देणारी गोष्टं. संगित महोत्सव मी तरी अजुन कधीच ऐकलेला नाही आजपर्यंत.. पण एकदा ऐकायची इच्छा आहे . भिमण्णांच्या सगळ्या सिडीज संग्रही आहेत, आणि ऐकायला खुप आवडतात.
   भारतिय संगित वाद्यामधले हे वाद्य तबल्या नंतरचे सगळ्यात लाउड वाद्य आहे. नाद्स्वरम ची सिडी आणायची आहे आता विकत. 🙂

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s