वाइज ऑर अदरवाईज..

सुधा कृष्णमुर्ती.. वाइज ऑर अदरवाइज

सुधा  मुर्तींच वाइझ ऑर अदरवाईझ चा अनुवाद वाचला. कांही दिवसांपूर्वी नागपुरला गेलो असतांना, माझ्या वडिलांनी  आवर्जुन वाचायला दिलं हे पुस्तकं – म्हणाले जरुर वाच फार सुंदर पुस्तक आहे.. त्यांचं मन मोडू नये म्ह्णून पुस्तक घेतलं, आणि  मुंबईला घरी आल्यावर सौ.ने  पुस्तक ढा्पले.. नंतर बरेच दिवस ते सौ.च्या पर्स मधे जाउन बसलं.. ( लोकल मधे वाचायला)

आता तिचं वाचून झाल्यावर माझ्या हातात लागलं हे पुस्तक.. सुरु केलं.. आणि एकाच बैठकीत वा्चून काढलं संपुर्ण पुस्तक. सुधा ताईंच्या बद्दल हे पुस्तक वाचल्या नंतर एक व्यक्ती म्हणून आदर होताच.. तो द्विगुणित झाला.

प्रत्येक लेखामधे त्यांची उच्च विचारसरणी दिसून येते. लहान सहान प्रसंगांमधून जिवनाचे तत्वज्ञान ज्या सहजतेने त्यांनी सांगितलंय, ते कधी तुमच्या मनाला जाउन भिडत,  कधी गुदगुल्या करतं, कधी तुमचं काळीज पिळवटून टाकतं, किंवा कधी स्वतःबद्दल विचार करायला लावतं, तेच समजत नाही. त्यांच्या  जिवनातल्या लहान लहान घटनांचा एक सुंदरसा बुके म्हणजे हे पुस्तक..

या पुस्तकावर कॉमेंट्स करण्याची अजिबात इच्छा नाही, किंवा यात वाचलेले प्रसंग तुम्हाला सांगून तुमची मजा कमी करण्याची पण माझी इच्छा नाही, फक्त एक लहानसा प्रसंग लिहितो.. एक झलक म्हंणून….

एकदा सुधाताई एका शॉपिंग मॉल जवळ उभ्या होत्या, रमेश कृष्णमुर्तींची वाट पहात , ते काही तरी घेण्यासाठी शॉपिंग मॉल मधे गेले होते. सुधा ताईंची रहाणी अतिशय साधी. सांगितल्याशिवाय कोणाला लक्षात पण येणार नाही त्या कोण ते.

तर तिथे जवळच एक गुलाबाच्या फुलांच्या बुकेचं दुकान होतं. त्यांनी विचारलं दुकानदाराल, की हा बुके कितीला दिला?? तर तो म्हणाला की ३ रुपयाला एक फुल, २४ फुलांचा बुके ७५रुपयांना पडेल. आणि जोरातच पुटपुटला.. की घ्यायची ऐपत नाही, कशाला भाव विचारतात कोण जाणे.. आणि युजवल चिडचीड केली त्याने.

तेवढ्यात मॉल ्मधून खरेदी करुन रमेश   आले . त्यांच्या अंगावर कपनीचा युनिफॉर्म, आय कार्ड लागलेलं होतं, त्यांनी पण भाव विचारला, तर दुकानदार म्हणाला, साहेब खुप स्वस्त आहे ५ रुपयांना एक फुल, आणि पुर्ण बुके घ्याल तर १५० रुपये.. सुधाताईंनी लगेच त्याला हटकलं.. की आत्ताच तर ्तू मला कमी भाव सांगितला होता, तर त्यावर दुकानदार म्हणतो, साहब को हमारा रेट चलता है, पाहिलं नाही का ते आयटी कंपनीत काम करतात.. त्यांचा युनिफॉर्म, बॅच बघा. ते काही तुमच्या सारखे घासाघीस करणार नाहीत…

.आयटी कंप्नीत काम करणाऱ्यांना खूप पगार मिळतो- यावर त्या म्हणतात,  म्हणून अशा तर्हेने विचार न करता पैसा पण खर्च केला जातो. भाव वगैरे करण कमी पणाचं समजलं जातं.. .आणि त्या नंतरचं सुधाताईंच भाष्य वाचण्यासारखं आहे..

( आय ऍम नॉट अ स्पॉइल स्पोर्ट 🙂 ) इथे हे लहानसं पोस्ट फक्त तुम्हाला सांगायला, की हे पुस्तक जरुर जरुर वाचा… अप्रतिम पुस्तक आहे हे…..!!!

About महेंद्र

माझा ब्लॉग :- http://kayvatelte.com
This entry was posted in साहित्य... and tagged , , . Bookmark the permalink.

38 Responses to वाइज ऑर अदरवाईज..

 1. सुरेश पेठे says:

  महेन्द्र जी,
  अगदि थोडक्यात दाखवलेली झलक वाचून पुस्तक कधी घेऊन येतोय व वाचतोय असे होऊन गेले आहे !

  • सुरेशजी
   अबश्य वाचा..असामान्यांचं सामान्य जिवन… !! एका वाक्यात त्या पुस्तकचे वर्णन..!

 2. अरे वा! खूपच छान पुस्तक सुचवलंत. त्यांचा अनुभवही छान वाटला वाचून. धन्यवाद.

 3. आनंद पत्रे says:

  वाचलंच पाहिजे..धन्यवाद…

  • अवश्य वाचा… जिवनाबद्दलचा त्यांचा दृष्टीकोन , आणि डाउन टु अर्थ विचार करणे हे दोन गुण वाखाणण्यासारखे आहेत …

 4. Abhijit says:

  खूपच सुंदर पुस्तक आहे हे. त्यांचे “गोष्टी माणसांच्या” सुद्धा एक वाचनीय पुस्तक आहे.

 5. bhaanasa says:

  महेंद्र चांगले वाचनीय पुस्तक सुचविलेत….लवकर कसे मिळेल ते पाहते. धन्यवाद.

 6. Aparna says:

  सुधा मुर्तींची पुस्तकं खरंच छान असतात. मागे एक पुण्यातले ओळखीचे मॅनेजर इथे येताना इंग्रजीतलं वाइज अदरवाइज घेऊन आले आणि मग जी त्यांची पुस्तकं वाचायला सुरूवात केली ती अजुन संपवतेय…फ़क्त मला वाटतं त्यांची मूळ पुस्तकं जास्त छान वाटतात (भाषांतरित पेक्षा).
  एखादी एवढ्या मोठ्या लेव्हलवर गेलेली व्यकी किती साधी असू शकते त्याचं उत्तम उदा..आहे…
  आजकाल कुणाला बक्षिस देण्यासाठी मी सुधा मुर्तींची पुस्तक पसंत करते…..

  • ्सुधा मुर्तींच्या बद्दलच्या सुरस कथा मी पण बऱ्याच ऐकल्या होत्या. त्यांचं पुर्वी एक पुस्तक वाचलं होतं, नांव आठवत नाही, पण त्यामधे टाटा मधे नौकरी मिळवण्याचा प्रसंग.. रमेश त्यांना घ्यायला येणार, म्हणुन त्या बाहेर उभ्या असतांना रतनजींनी त्यांच्या साठी रमेश येई पर्यंत थांबणं असे काही प्रसंग कायमचे स्मरणात राहिलेले आहेत. टाटा कन्सलट्नसी मधे पुर्वी मुलींना घेत नसत ,तेंव्हा त्यांनी लिहिलेलं पत्रं.. नांव विसरलो, पण खुप सुंदर पुस्तक होतं ते…
   मी हमखास तंबी दुराइ भेट देतो लग्नामधे!!! आपला फेवरेट आहे तो.

   • raghupati says:

    पूर्वी टाटा मोटर्स महिलाना नोकरी देत नसे.
    सदर प्रसंग टाटा मोटर्स च्या संदर्भातील असून टाटा कंसल्टंसीच उल्लेख अयोग्य आहे.

    • रघुपती
     दुरुस्ती करता आभार.

     • Aparna says:

      मला स्वतःलाच टाटा कन्सलस्टिंगनेही मुलगी असल्याने नोकरी नाकारण्याचा अनुभव आहे. त्या पोस्टला नाईट शिफ़्ट होती आणि त्यामुळे त्यांनी शेवटच्या मुलाखतीला नाही सांगितले. ही घटना १९९६ मधली आहे. अर्थात त्यामुळे माझं शैक्षणिक आयुष्य फ़ुकट तीन वर्षांनी वाढलं. नाहीतर डिप्लोमा करुन नोकरी असं साधं गणित बर वाटत होतं..असो..आठवलं म्हणून सांगितलं.

      • काही गोष्टी ज्या होतात त्या भल्याकरताच होतात. शिक्षण कधिच वाया जात नाही. पुढे कदाचित काही उपयोग होईल… 🙂

 7. Akshay says:

  छान पुस्तक सुचवलत.धन्यवाद.
  मी त्यांच How I taught my grandmother to read and other stories हे पुस्तक वाचल आहे. ते ही फ़ार छान वाट्लं. त्या अगदी सोप्या भाषेत लिहतात.

 8. अच्छा.. तर ‘वाचायलाच’ पाहिले अशातलं पुस्तक आहे तर! लागलीच आणतो…
  आपल्या शिफारशीबद्दल धन्यवाद !

  • दिपक
   एखादं पुस्तंक मनाला खुप जवळुन स्पर्श करुन जाते त्यातलं हे एक. आणि या पुस्तकाचं भाषांतर पण अतिशय सुंदर केलंय, कुठेही वाचतांना अडखळल्यासारखं होत नाही.

 9. Pravin says:

  I m planning to buy a lots of books when I am coming to India this month. I ll add this to the list 🙂

  Tell me more that I must read .

  • प्रविण,
   माझं मराठी वाचन हल्ली फक्त नियतकालिकं आणि वृत्तपत्रं इतकंच आहे. तसं दासावा मधुन सौ ने आणलेली पुस्तकं पण चाळतो. तरी पण मिलिंद बोकिलांचं शाळा.. हे मस्ट रिड आहे.

 10. Nilesh says:

  Namaskar Kaka,

  hey pustak mi khup aadhi vachale hote ….. actually Sudha Murthy ani Narayan Murthy hyachi bhet kashi jhali ani tyanche prem kase julale hyachi ek mail aali hoti…. tyane prerit hovun mi Sudha Murthy hyanche “wise and other wise” vachale hote ani tyachi ek prat majha kade aahe collection madhe.
  tumcha lekh vachun parat ekda ujalani jhali sagalya gostin chi…. thnx for making my memories refresh again 🙂

 11. mau says:

  सुधा मुर्ती माझ्या अतिशय आवडत्या लेखिका.त्यांची सगळीच पुस्तके मस्त!!
  त्यांचे महश्वेता ,डोल्लरबहु आणि the old man & his god,the magic drum & other stories फ़ारच मस्त पुस्तके आहेत.जमल्यास वाचाल.U ll really love it.पोस्ट मस्तच..धन्यवाद..

 12. Manmaujee says:

  सुधा मूर्ती, एकदम मस्त लिहतात. . .हे पुस्तक तर ते आवर्जुन वाचण्यासारख आहे. त्यांच आता “बकुळा” म्हणून पुस्तक आलय…ते पण मस्त आहे!!!

 13. anukshre says:

  आता जून मध्ये भारतात जावू तेंव्हा अजून एक छान पुस्तकांची यादी मी तयार केली आहे. पण थोडे सविस्तर पण लिहा कि जणू पुस्तकच वाचले असे वाटते. मी त्यातील महाश्वेता वाचले आहे. बरेच दिवसापासून मी पुस्तक परीक्षण शोधते आहे, ब्लॉग वर हे पण छान आहे विचार करायला. आम्ही लांब राहतो म्हणून जरा सविस्तर लिहा असे सांगितले कारण प्रत्यक्ष हातात पुस्तक येई पर्यंत धीर धरवत नाही. मला इमेल वर तुम्ही वाचलेल्या पुस्तकांची लिस्ट दिलीत तर बरे होईल. इथे भारतीय वाचनालय नाही. नेट वर पण काही पुस्तके उपलब्ध आहेत असे कळले तर आवर्जून सांगा. मी शोधतेच आहे….पण माझा शोध कमी पडतोय असे वाटते.

  • सविस्तर मुद्दाम लिहिलं नाही, कारण त्यातल्या लहान लहान घटना माहिती झाल्या की मग वाचनातली मजा निघुन जाते. जसं एखाद्या चित्रपटाचा शेवट समजला की मजा येत नाही, तसंच काही तरी…
   नेट वर मराठी पुस्तकं?? फारशी नाहीत , मी पण आधी शोधलं होतं एकदा. 🙂

 14. ashuraj says:

  पद्मश्री सुधा मूर्ती म्हणजे आधीची सुधा कुलकर्णी. (मराठी माणसा जागा हो…!!) त्यांनी केलेल्या समाजकार्या पैकी एक म्हणजे अनेक वाचनालयाना दिलेली आर्थिक मदत. वाचनालय़ सुरू करायचे आहे… सुधा मूर्ती कडे जा… आणि on the spot १ लाखांचा चेक मिळावा. अशा प्रकारे अनेक गावात वाचनालय़ उभी राहिली. ग्रेट व्यक्ती.. सही टॉपिक आहे महेंद्र दादा…

 15. salilchaudhary says:

  काका,

  वाईज अँड अदरवाइजची इंग्रजी आवृत्ती मी वाचली आहे. मुर्ती कुटुंब आणि त्यांचं समाजकारण अतुलनिय आहे.

 16. वर अभिजीतने नमूद केलेलं “गोष्टी माणसांच्या” वाचलं आहे. खरच छान आहे. अगदी सध्या सोप्या भाषेत लिहालेलं. आणि टाटा कन्सलट्नसीमधे पुर्वी मुलींना घेत नसत ,तेंव्हा त्यांनी लिहिलेलं पत्रं, त्यानंतर त्यांचा तिथे झालेला इंटरव्यू हे सारं आहे त्या पुस्तकामध्ये. ३ वर्षापूर्वी बंगलोर ला मराठी मंडळाच्या गणेशोस्तवामध्ये सुधा मूर्ती प्रमुख पाहुणे म्हणून आल्या होत्या त्यावेळी त्यांना भेटण्याचा योग आला होता. अतिशय साधे परंतु तेजस्वी व्यक्तिमत्व आहे त्यांचे.

  • सुधा मुर्तींचं पुस्तक वाचलं होतं त्यात हा उल्लेख आला होता, आणि आता हे पोस्ट लिहितांना सहज आठवलं म्हणुन उल्लेख केला गेला.

 17. Madhuri says:

  sudha murtinche hyach prakaratale aani ek pustak ahe: Punyabhoomi bharat. jaroor wacha.

  • अवश्य वाचिने.. त्यांची सगळीच पुस्तकं वाचायची आहे. वाचनालयातुन पुस्तकं बदलुन आणणं सौ.च्ं काम आहे . तिच्या कार्यालयाच्या वाटेवर दासावा असल्याने . 🙂

 18. KISHOR NEJE. says:

  this is a very best book itself has power of mind concentretion towards the book.mrs.sudha muurthy,now i found that how you are great. thanks.

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s