दिग्ली पोर्ट

पोर्ट ब्लेअर ! नाव ऐकलं की काय आठवतं?? काळं पाणी?? स्वा. वीर सावरकरांची जन्मठेप??

या शिवाय पण बरंच काही आहे पोर्ट ब्लेअरला.पण जे कोणी जातात ते फक्त या काही ठराविक गोष्टी पाहून परत येतात. स्नेक आयलंड वगैरे किंवा कोरल आयलंड.. पण  ह्या पोस्ट मधे दिग्लीपुर पोर्ट जे फारच कमी लोकांनी पाहिलेलं आहे त्याबद्दल थोडं लिहितोय.. खरं तर लिहावं की नाही हा विचार करित होतो बरेच दिवस- , पण शेवटी बऱ्याच गोष्टी  फिल्टर करुन लिहायचं ठरवलंय.

पोर्ट ब्लेअर पासून साधारण ३०० किमी अंतरावर हे दिग्ली पोर्ट आहे. हिच ती जागा  आहे जिथे आम्हाला काम असतं. पोर्ट ब्लेअर हुन  दिग्लीपोर्ट ला जायला जहाजाने किंवा बसने पण प्रवास करावा लागतो.. जर जहाजाने गेलात तर केवळ ८ तास लागतात, आणि बस ने गेलात तर १२ तास.. जहाजाने जरी लवकर पोहोचलो, तरी पण एक मस्त पैकी अनुभव तुम्ही मिस करता, म्हणून बसने प्रवास करणे कधीही चांगलं, परतीचा प्रवास जहाजाने केलात तरी हरकत नाही..

 

 

आदिवासी लोकांना बस मधुन खायला देतांना.

 

आज आपल्याला स्वातंत्र्य मिळून ६०च्या वर वर्षं झाले आहेत. पण आजही पोर्ट ब्लेअर पासुन केवळ ४० किमी वर एक असा एरिया आहे की जिथे रहाणारे आदिवासी आजही अंगावर एकही कपडा न घालता रहातात. खोटं वाटेल कदाचित , पण दुर्दैवाने हीच खरी परिस्थिती आहे. अंदाजे ४० किमी अंतरावर   जरावा रिझर्व फॉरेस्ट ची हद्द सुरु होते. इथुन जर तुम्हाला क्रॉस करायचे असेल तर खाजगी वाहनाने प्रवास करण्याची परवानगी नाही… सकाळी ४ वाजता पोर्ट ब्लेअरहुन बस निघते ती संध्याकाळी ४ वाजता दिग्लीपोर्ट ला पोहोचते.

इथून, म्हणजे या पोलीस चेक पोस्ट वर सगळी वाहनं येउन थांबतात.  सकाली ६-३०  वाजता चेक पोस्टवर  जमा झालेली सगळी वाहनं ही   एक्सॉर्ट्स वाहनांच्या मधे ड्राइव्ह करत  हे रिझर्व फॉरेस्ट पार करतात.जंगलातून जातांना ते आदिवासी पण तुम्हाला दिसू शकतात.सरकारी वाहनाने पण प्रवास केला जाऊ शकतो.

हे आदिवासी लोकं आजही धनुष्य बाण घेउन शिकार करतात. अंगावर एकही कपडा नसतो यांच्या.या काळातही केवळ धनुष्य बाण वापरुन शिकार करुन पोट भरतात हे लोकं.  माझ्या कडे काही व्हिडीऒ पण आहेत, पण ते इथे पोस्ट करणे योग्य होणार नाही, आणि यु ट्युब वर टाकले तर कोणीतरी अती उत्साही त्यांना फ्लॅग करेल म्हणुन पोस्ट करित नाही. या लोकांचे फोटो आणि व्हिडीओ काढणे लिगली अलाउड नाही. तशा सूचना स्पष्ट स्वरुपात दिलेल्या आहेत. इथे रहाणाऱ्या आदिवासी लोकांना  जवरा ट्राइब  म्हणतात. इथे बऱ्याच सूचना जागोजागी लावलेल्या आहेत. जसे.. या आदिवासी लोकांना काहीच देउ नका, त्यांना खुणा करुन त्रास देउ नका, त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करु नका वगैरे वगैरे… जर तुम्ही त्यांना त्रास दिला तर ते तुम्हाला धन्युष्य बाणाने मारु पण शकतात.

पोर्ट ब्लेअर हुन निघाल्यावर  या चेक पोस्ट ला येउन थांबावं लागतं. वर सांगितल्या प्रमाणे ६-३०ला इथुन तुम्ही निघालात की मग बाराटांग ला पोहोचता. इथुन पुढे समुद्र आहे. त्या समुद्रातुन क्रॉस करण्यासाठी राज्य परिवहन ची बस लहानशा ट्रॉलर मधे लोड करुन क्रॉस केली जाते. नंतर पुढे असलेले  इथुन पुढे मग  बाराटांग रंगत वगैरे गावं आहेत. अजुन पुढे गेल्यावर मग ह्या आयलंडच्या शेवटी पोहोचल्यावर  कदमतला आयलंड पर्यंत पुन्हा बसला बोटीवर चढवलं जातं आणि बस दिग्लीपुरच्या रस्त्याला लागते. जर उन्हाळा असेल तर सुंदर निसर्ग, आणि दमट हवामान, अंगातुन घामाच्या धारा.. हे सगळं  अगदी गृहित धरुन चला- पण अगदी व्हर्जिन निसर्ग आहे इथे. तसं पोर्ट ब्लेअरला कुठेही गेलात तरीही सुंदर निळं पाणी असलेला समुद्र, तर तुमच्या सोबत असतोच..

्ट्रॉलर मधुन बस एका अयलंड वरुन दुसऱया आयलंड वर नेली जाते.

शेवटी एकदाचं दिग्ली पुरला पोहोचलात की हा अविस्मरणिय प्रवास संपतो. पण इथे पोहोचे पर्यंत तुम्हाला जो निसर्गाचा आनंद घेता येतो तो अवर्णनिय आहे. इथे पोहोचल्यावर मग पुढे काहीच नाही करमणूकी करता. फक्त ताजे मासे, जाड तांदुळाचा भात आणि सुंदर निसर्ग. इथे  आम्हा लोकांना जायचं काम पडतं ते काही कामासाठीच, नाहीतर इतका द्रविडी प्राणायाम प्रवास करुन जाणं शक्यच नाही. पण कामासाठी जावं लागलं की मग असा थोडा निसर्ग सौंदर्याचा आनंद पण घेता येतो. इथे दोन दिवस अगदी मस्त जातात, पण नंतर मात्र कधी जातो परत असं होतं.

 

सेल्युलर जेल स्वा. वीर सावरकरांना ठेवले ती कोठडी.

 

पोर्ट ब्लेअरच्या सेल्युलर जेल बद्दल तर बरंच काही लिहुन झालंय ( म्हणजे इतर लोकांनी बरंच काही लिहिलंय)त्यामुळे फार काही लिहित नाही . ज्या कोठडीत स्वा. वीर सावरकरांना ठेवलं होतं ती कोठडी पाहिली की नतमस्तक होतं.इथे जी फाशीची जागा आहे त्या जागेवर एखाद्याला फाशी दिल्यावर खालची पोकळ जागा सरळ समुद्राशी कनेक्टेड आहे. मृत देह हा सरळ समुद्रात पोहोचतो ..

ब्रिटीशांनी हे जेल फारच सुंदर कन्स्ट्रक्ट केलंय. कमित कमी माणसं ह्या इतक्या मोठ्या जेल वर नजर ठेउ शकतात. अगदी एकच माणुस पण पुरेसा आहे वॉच ठेवण्यासाठी.  पुर्वीच्या काळी या जेलच्या सात विंग्ज होत्या ( ऑक्टॊपस प्रमाणे पसरलेल्या) . प्रत्येक कोठ्डीच्या समोर दुसऱ्या विंगचा व्हेंटीलेटर यायचा. त्यामुळे एका कैदी दिसत नसे. आणि संपुर्ण एकांत वासात दिवस कंठावे लागायचे. सातही विंग्ज या मध्यभागी जुळलेल्या होत्या. तिथे एक वॉच टॉवर होतं. आणि त्या वॉच टॉवर वरून केवळ एक माणुस संपुर्ण जेल वर लक्षं ठेउ शकत असे. सध्या एक विंग ही म्युझियम मधे आणि एक विंग हॉस्पिटल मधे कन्व्हर्ट केलेली आहे.

 

 

दिग्ली पोर्ट जेटी आणि आजुबाजुचे फोटो

 

About महेंद्र

माझा ब्लॉग :- http://kayvatelte.com
This entry was posted in प्रवासात... and tagged , , . Bookmark the permalink.

22 Responses to दिग्ली पोर्ट

 1. Sagar says:

  Kaka
  Mala hi post khup aavadli…..Aaplya deshabaddal hi navin mahiti milali…Videos naka post karu…Discovery var pahil aahech…Baki khup navin mahiti milali ya postmadhun…..Bharatat ashi hi jaga aahe he pahilyandach kalal…

  • सागर,
   अजुन खुप माहिती आहे, पण लिहिलेली नाही. कारण लिहिण्याच्या ओघात बरंच काही लिहिलं जाउ शकतं म्हणुन !!

 2. अरे वा! हे फक्त डिस्कवरी सारख्या वाहिन्यांवरच पाहिलंय. तुम्ही तर ऑंखो देखा हाल सांगितलात. भारत खरोखरच अगम्य देश आहे. भारताच्या एका भागात जिथे सुधारणा होतायंत, तिथे एक भाग अजूनही प्राचीन संस्कृतीशी नातं सांगत जपला गेलाय. तुम्ही भाग्यवान आहात, तुम्हाला ते ठिकाण पहाता आलं जिथे स्वातंत्र्यविर सावरकरांना आपल्या आयुष्याचा काही काळ व्यतित करावा लागला. जेलची रचना छानच वाटतेय. डोकं वापरून केलीय.

  • कांचन
   जेल ची रचना खुपच छान आहे. बरेच लोकं फक्त तिथे जाउन त्या ठराविक जागाच बघुन येतात. जवळच एक रोझ आयलंड आहे, ते ब्रिटिशकालिन राजधानी चं शहर होतं. सकाळी ९ वाजता तुम्हाला जहाज त्या तिथे नेउन सोडते, संध्याकाळी परत घ्यायला पण येते. जर एकांत, नेचर आवडत असेल तर मस्त आहे जागा… 🙂

 3. बाप रे !! आदिवासींचं वर्णन भयानक आहे. !!

 4. bhaanasa says:

  महेंद्र खूपच सविस्तर आणि छानच माहिती दिलीस. या जागेबद्दल बरेच ऐकून आहे. अर्थात जाण्याचा योग अजून आलाच नाही. खास करून सावरकरांना कुठे ठेवले होते हे मला पाहायचे आहेच. तिथे जाऊन माथा टेकायचा आहे. बराच द्राविडीप्राणायम करावा लागतो तर इथे पोचताना. पण तुम्ही म्हणालात तसे निसर्गाचे सौंदर्य पाहायचे असेल तर इतके तरी करायलाच हवे. बाकी आदिवासींचे जग आजही तसेच आहे आणि तेही शहरीकरणाच्या इतक्या जवळ असून याचे थोडे नवल व वाईटही वाटले. फोटो छानच आलेत. व्यवस्थित कल्पना येते त्यावरून. फास पाहून मात्र खूप कसेतरी झाले. 😦 जेलचे बांधकाम जबरीच आहे. खरेच कमीतकमी माणसे पुरतील. अजूनही बांधकाम चांगल्या स्थितीत आहे ना? समुद्रकिनारा नयनरम्य आहे अगदी. तुम्ही टाकलेला पहिलाच फोटो अप्रतिम आहे. पाहूनच जावेसे वाटले. 🙂

  • ही जमात नामशेष होणार होती २००० मधे . एपिडीमिक तापाने बरेच आदिवासी मारले गेले. तेंव्हा मात्र सरकार जागं झालं , आणि काही वैद्यकिय मदत पाठवली होती इथे. आता फक्त २०० ते ३०० लोकं शिल्लक आहेत या जमातीचे. बसमधुन जाणारे लोकं त्यांना अनहेल्दी फुड देतात, तंबाखु, सिगारेट या सगळ्या गोष्टी देतात. त्यामुळे त्यांना ह्या सगळ्य़ा सवई लागल्या आहेत. आता ्शिल्लक असलेले जरी टिकले तरी पुरे.. आजकाल, निकोबारला जाण्यासाठी पण परमिट लागतं.

 5. sureshpethe says:

  महेन्द्रजी.
  खूप्च छान व वेगळी माहीती दिलीत. तुमची वर्णन शैली मला आवडली.
  माझे ब्लॉग्स आपण वाचलेत का?
  सुरेश पेठे

  मी ही ई-मेलने पाठवली होती पण मेल परत आली ! का ते कळत नाही ! जरा समजावाल ?

  • सुरेशजी
   गेले काही दिवस अतिशय व्यस्त होतो. ट्रेनिंग मधे .. म्हणुन खरं तर नेट वर फार कमी वेळ दिलाय. तुमचे ब्लॉगज अजुन वाचलेले नाहित. आज सावकाश वाचिन रात्री. ई मेल कॉमेंट्स बद्दल मला तरी माहिती नाही फारशी..

 6. anukshre says:

  मस्त माहिती दिलीत.

 7. छान माहिती आहे..आजच्या काळाताही ते आदिवासीं ज्या प्रकारे राहत आहेत,त्या आदिवास्यांच्या विकासासाठी सरकार काही करत नाही का ..? बाकी तुमच अहोभाग्य सावरकरांच्या सहवासाने जी जागा पावन झाली आहे तिचे दर्शन तुम्हाला झाले.याच ठिकाणाहुन सावरकारानी ‘ने मजसी ने’ लिहल आहे ना…बाकी आज खुप दिवसानी ब्लॉग च्या जगात परत आलो आणी आल्या आल्या हा सुंदर लेख वाचायला मिळाला.

 8. मलाही निटस आठ्वत न्वहत,पण गुगलींग केल्यावर कळल कि १० डिसेंबर १९०९ ला इंग्लंडमधील ब्रायटनच्या समुद्र किनारी बसून सावरकरांनी ’सागरा प्राण तळमळला’ कविता लिहली.म्हणजे या १० डिसेंबरला हया कवितेची शताब्दी होती.

  • मला पण युरोपमधे कुठेतरी लिहिल्याचं आठवत होतं.. पण नक्की जागा आठवत नव्हती.. !! माहितीसाठी आभार..

 9. अंदमान निकोबारबद्दल केवळ ऐकून आहे ते देखील शाळेत अभ्यासक्रमात होते म्हणून. बाकी कोणी तिथे फिरायला म्हणून गेल्याचे ऐकिवात नाही. किंबहुना सरकार किंवा टूरिस्टवाले देखील अंदमान निकोबारची पॅकेज टूर वैगर आयोजीत करते हे निदान माझ्या तरी वाचण्यात नाही. दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या देशातल्या एका भागात अजूनही आदिवासी लोकं आणि ते देखील अशा अवस्थेत रहातात हे वाचून नुसतच वाईट नाही तर शरम देखील वाटली, आपल्या स्वतंत्र देशाची.

  • पॅकेज टूर म्हणुन जायला थोडं महाग पडतं. आता हेच बघा केवळ विमानाचेच तर कमित कमी २५ ते ३० ह्जार लागतात.. इतर खर्च आहेच. लोकं हा विचार करतात की सिंगापुरला पण तेवढ्या पैशात जाउन येणं होतं, आणि मग अंदमान मागे पडतं..

 10. अनिकेत says:

  Waa.. barech divas ya post chi waat pahat hoto.. mahiti baddal aani video baddal dhanyawad.

 11. जेलच्या रचनेवरुन “सायबाच्या” डोक्याची कल्पना येते. खरंच, स्वा. सावकरांचे स्पर्श झालेल्या भुमीला आपण भेट दिलीत आणि आमचीही भेट घडवलीत!

  काही [नाही, बर्‍याच ] वर्षांपुर्वी सादर होत असलेल्या सिद्धार्थ काक आणि रेणुका शहाणे यांचा “सुरभि” मालिकेत पोर्ट ब्लेअर बद्द्ल दाखवलेलं पाहिलं होतं! ते आदिवासी पाहुन आठवण झाली.

Leave a Reply to महेंद्र Cancel reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s