इन्फ्लेशन…

महागाईचा इंडेक्स ४.५ ला पोहोचला, म्हणुन माझा एक मित्र आनंद व्यक्त करित होता काल. म्हणाला की आता  हा इंडेक्स इतक्या वर जातोय तर आता मार्केट नक्कीच सुधारणार. या गोष्टीचं कारण मला कधीच समजलं नाही. काही दिवसां्पूर्वी हा इंडेक्स १-२ असतांना पण महागाई होतीच. बरं तसं म्हणाल तर, आज तुर डाळ ८० रुपये किलो आहे, गहू २७ रुपये, तांदुळ ३० ते ४० रुपये ,कुठलीही भाजी घेतली तरी ती कमीत कमी ८ ते १० रुपये पाव आहे. आणि हा भाव जेंव्हा महागाईचा इंडेक्स ९ होता तेंव्हा पेक्षा पण जास्त आहे – हे कसं??

म्हणजे हा इंडेक्स ज्या पद्धतीने काढला जातो ती पध्द्तच  मला चुकीची वाटते.  हा इंडेक्स रोजच्या वस्तुंच्या भावाशी निगडित असतो असे म्हणतात.. पण प्रत्यक्षात चित्र वेगळंच आहे.जर असं नसतं तर जेंव्हा इंडेक्स ९ च्या आसपास होता तेंव्हा धान्य आजच्या भावाच्या पेक्षा ३० ते ५० टक्के स्वस्त राहिले नसते.

खरं तर अर्थशास्त्र हा माझा प्रांत नाही   तरी पण हे पोस्ट लिहिण्याचं धाडस करतोय. पण असं म्हणतात की जर इतकी महागाई वाढते आहे, म्हणजेच मार्केट मधे पैसा आणि क्रय शक्ती पण वाढते आहे. लोकांच्या कडे पैसा आहे म्हणूनच भाववाढ होते आहे.जर कोणीच घेणारं नसेल तर भाववाढ होइल का? आता एक गोष्ट अशी पण आहे की भाजी ४० रुपये किलोने विकली जाते याचे कारण एक तर घेणाऱ्या लोकांची मजबुरी आहे, किंवा काही लोकांकडे पैसा पण आहे म्हणून, जर कोणी घेणारच नसेल तर भाव वाढणार नाहीत असं समजतात.

आता आरबीआय असं काही झालं ( म्हणजे इंडेक्स वाढला)  की सरळ इंट्रेस्ट रेट्स वाढवते -उद्देश असा की मार्केटमधला पैसा शोषून घेतला जावा सिस्टीममधे म्हणून.. एकदा इंट्रेस्ट रेट्स वाढले की मग फॉरिन इन्व्हेस्टर्स ला भारतिय मार्केटचा लालीपॉप खुणावु लागतो, आणि फॉरीन इन्व्हेस्टमेंट वाढते. हा आलेला सगळा पैसा शेअर मार्केटमधेच लावला जातो.

जस पतंग दिव्यावर झेप घेतो तसे ,तुमच्या आमच्या सारखे लोकं मग दररोज चढणारा हा इंडेक्स बघुन या कडे आकर्षित होतात, आणि जेंव्हा मार्केटमधे झेप घेतात तेंव्हा  शेअर उतरायची वेळ झालेली असते, आणि तुम्ही तोंड्घशी पडता ( मी पण त्यातलाच ).  टु बी ऑन सेफर साईड ,कांही लोकं एफ डी मधे वगैरे पण पैसा गुंतवतात.

अर्थ शास्त्रज्ञांचं काही समजत नाही काय आहे ते.. महागाई वाढण्याच काम अन्न धान्याची सटटेबाजी करण्यास सरकारने दिलेली  परवानगी तर नाही? सट़्टेबाज याच गोष्टींवर सट़्टा खेळतात आणि भाव वाढवून ठेवतात. या वाढलेल्या भावाचा शेतकऱ्यांना काहीच फायदा होत नाही. सगळा फायदा हे दलाल लोकंच घेतात. कित्येक टन इम्पोर्ट केलेलं आणि लेव्ही मधे जमा केलेलं  धान्य एफ सी आय च्या गोडाउन मधे सडत पडलंय, आणि त्याची कुणालाच शुध्द  नसते…

कंपन्या रेसेशनच्या नावाखाली कर्मचाऱ्यांना पगार वाढ देण्यास टाळतात. तसेच इतर बेनिफिट्स  पण टाळतात. असं असतांना मार्केटमधे पैसा वाढलाय हे कसे तेच मला समजत नाही. भारतामधे पॅरलल एकॉनॉमी ही काळ्या पैशात चालते असं म्हणतात कदाचित तेच कारण असेल . पण ज्या लोकांना काळ्या पैशाचं इनकम नाही , त्यांची मात्र परिस्थिती अतिशय वाईट आहे.

काल मेल मधे एक कार्टुन आलं होतं. ते पोस्ट करतोय. अतिशय सोप्या भाषेत इन्फ्लेशन म्हणजे काय ते सांगितलंय.. मी एकॉनॉमिस्ट नाही, तेंव्हा जे काही वर लिहिलंय ते ्चूक पण असु शकतं.. मला जे वाटलं ते लिहिलंय. पण जर तुम्हाला काही चुकिचं वाटंत असेल तर कृपया चूक कुठे झाली आहे हे सांगितल्यास बरे होईल..

 

रेसेशन ऍज एक्स्प्लेंड बाय सरदारजी

 

About महेंद्र

माझा ब्लॉग :- http://kayvatelte.com
This entry was posted in सामाजिक, Uncategorized and tagged , , , , . Bookmark the permalink.

23 Responses to इन्फ्लेशन…

 1. मागच्याच महिन्यात अच्युत गोडबोले सरांच “अर्थात” हे अतिशय सुंदर पुस्तक विकत घेतले..
  त्यात त्यांनी सर्व प्रथम मराठीत या सर्व कन्सेप्ट एकदम खोलात सांगितल्या आहेत..
  ते वाचून सुद्धा तुम्ही अर्थशास्त्राचे प्रोफेसर होऊ शकता..
  प्रत्येकाने वाचावे असे पुस्तक आहे.

  आणि कार्टून मध्ये जे सांगितलं आहे ते अगदी खर..
  एखाद्या वस्तूची किंमत वाढते त्या वस्तूच्या पुरवठ्यानुसार पण त्याचे मूल्य त्या वस्तूची ज्याला जास्त गरज आहे त्यानुसार असते..
  म्हणजे आपल्या कडे पैसा आहे आपण कितीपण महाग वस्तू घेऊ शकतो गरज नसतांना..
  पण
  ज्या लोकांना खरीच गरज आहे पण पैसा नाही मग तेव्हा कळते त्याचे मूल्य..

  • मंदार
   धन्यवाद.. आता हे पुस्तक वाचलंच पाहिजे एकदा.. पुरवठा आणि मुल्य यांचं कोष्टक इथे चालत नाही. कारण कम्युडीटी सेल्स… मार्केट मधे कम्युडीटीज डील केलं जातं. नसलेला माल नुसत्या डीमॅट अकाउंट मधे ्घेतला आणि विकलाजाउ शकतो. हे कारण असावं??

 2. मला तर हे गणित कधीच समजलं नाही!!
  साखरेचं उदाहरण घ्या… ३०+रु. किलो… ऊसाला मिळणारा भाव.. गोदामात सडणारी साखर… इंपोर्ट केली जात असणारी साखर – या सगळ्यात मरण होतं ते शेतकर्‍याचं आणि सामान्य नागरीकांचे.

  “कांही लोकं एफ डी मधे वगैरे पण पैसा गुंतवतात.” – आणि बँका आता त्याचे दरही कमी करताहेत! मग पैसा गुंतवावा कुठे?

  “कंपन्या रेसेशनच्या नावाखाली कर्मचाऱ्यांना पगार वाढ देण्यास टाळतात.” – आता प्रत्येकालाच कंपनी पॉलिसिज – कायदे माहित असतात असं नाही… पण सरकार बर्‍याच कंपन्यांना भरगोस सुटही देतं – एम्.एन्.सी’ज ना… पण कीती कंपन्या ते उघडपणे दाखवतात… प्रॉफिट – लॉसच्या चक्रामध्ये नेहमी नोकरदारच फसतात… वरुन रीसेशन – इंफ्लेशन अशा छोट्या पण बारदस्त टर्म्स वापरुन पगारवाढ रोखली जाते.

  सगळा “बट्ट्या बोळ” आहे…! कार्टुनमात्र “सेल्फ एक्सप्लेनेटरी” आहे 🙂

  • मला नेहेमीच कोड्यात टाकतात ह्या पॉलिसज. जितकं जास्त वाचावं तितकं जास्त कन्फुयुज व्हायला होतं.
   बॅंकांचे इंटरेस्ट रेट्स हे जेंव्हा इन्फ्लशन कमी होतं तेंव्हा ५ टअक्के होते..
   इन्फ्लेशन, आणि रेसएशन म्हंटलं की एम्प्ॉइज पण काहिच म्हणुशकत नाही. कारण निम्या पेक्षा जास्त लोकांना याचा अर्थंच माहिती नसतो.

   • ravindra says:

    पोलिसिज कधीच सामन्यांसाठी नसतात . त्याने फक्त भरडतच राहायचं असत जात्यातील गव्हासारख. 😦

    • रविंद्र
     “पोलिसिज कधीच सामन्यांसाठी नसतात . त्याने फक्त भरडतच राहायचं असत जात्यातील गव्हासारख.” हे अगदी खरं….

     पॉलिसिज या मोठ्या लोकांचे गुन्हे लपवण्यासाठी असतात..

 3. सुरेश पेठे says:

  मलाही हे काय प्रकरण आहे, कधी कळलेच नाही ! फक्त इन्फ़्लेशन वाढले की काही महीन्यांनी डी.ए. वाढायचा एव्हढेच आम्हास ठाऊक ! आणि गेल्या पाच सहा महीन्यात जो जादा खर्च झाला त्याची काही प्रमाणात भरपाई व्हायची ! ज्यांना महाघाई भत्ता मिळत नसे त्यांचाही विचार मनात येत असे पण उत्तर माहीत नसे

  • सुरेशजी
   अतिशय समर्पक कॉमेंट टाकलित, मला पण हेच म्हणायचंय, सामान्य माणसाला काही समजू नये म्ह्णणुनच ह्या अशा टर्म्स चा शोध लावला गेला असावा… 🙂

 4. Smit Gade says:

  I have read a bit bout inflation.so will try to put it here.I am not an expert and i too dont understand many concepts and many still confuse me..
  1)The inflation is weighted average.So the relative importance of various commodities decide the multiplication factor.So food items will have their multiplication factor assigned.so even though the price of food item increases the inflation was down in recent months due fall in prices in Real estate,fuels etc..The items that constituate the contributing factors in inflation are ‘Commodiy Basket’.There are about 1900 odd items there.So you can get the idea aout the variety considerd.The number we see in news paper is A wholesale price index ,but government has got separate index for food items ,real estate etc.they will show the actual condition in any specific sector .
  2)Another important thing to consider thar the inflation is year on year.So the prices are compared to the prices in same period last year.They are now planning to change it to monthlty basis.
  3)The RBI using interest rates to curb inflation.The important thing to consider is these are macro-economic factors.So u need to look them from broder prospective,then they make sense.Because they do not affect anyone personally directly but to country as a whole.Its cumulative effect.
  4)The thing about the sugar and cereals,imported and rotten are just an example of bad management,apathy and mosltly black market in India and add information assymetry to that.
  (P.S.I am in office so can not type in marathi..sorry for that)

 5. Smit Gade says:

  In office currently…will try for neat and well witten when at home

 6. sagar says:

  Aaplyala buva kahi kalat nahi……Fakat evdh mahit aahe 12vila astna 2 rs la Chaha hota to ata 4 rs zala,Mess cha mahina 750 rs hota aata to 1300 chya pudhe aahe…..

 7. Ajay says:

  मह्रेंद्: खरंच मी ही हा लेख वाचल्यावर मला ही तुमचा प्रश्न बरोबर वाटला की इडेक्स काढण्याची पद्धत चुकीची आहे. सॅलरी हाईक या वर्षी ही होईन अस दिसत नाही आणि म्हणताना म्हणतात की अजुन रिसेशन ओव्हर नाही. आपल्या सोयीप्रमाणे अर्थ लावतात. जेव्हा इनप्लेशन नाही तेव्हा कमी सॅलरी हाईक आणि जेव्हा इनप्लेशन आहे तेव्हा रिसेशन च कारण पुढे करुन नो सॅलरी हाईक.

  • अजय
   पुर्वी पगार वाढ ही कमी जरी असली, तरीही बहुतेक कंपन्या महागाई भत्ता नावाचा एक अलाउन्स द्यायच्या. जॊ डायरेक्टली या इंडेक्सशी निगडीत असायचा. अजुनही सरकारी नोकर्यात हिच पध्दत असते. पण प्रायव्हेट कंपनित सिटी कॉम्पेन्सेटरी अलाउन्स नावाने काही पैसे देतात- जे इंडेक्स शी रिलेटेड नसतात. यांची पध्दत तर नक्कीच चुकिची असावी असे वाटते..काय करणार? आलीया भोगासी…..

 8. काका बर झालं ह्या विषयावर लिहलात. निदान त्या कार्टून मुळे इन्फ्लेशन म्हणजे नक्की काय हे तरी कळलं. माझा पण मार्केट, शेअर्स, गुंतवणूक ह्या सर्व बाबींमध्ये गेम असतो. फारसं कळतं नाही आणि त्याकडे ओढ देखील नाही. 80C साठी गुंतवणूक करताना देखील मी प्रचंड कन्फ्यूज़ असतो. आज पर्यंत 80C साठी जी काही इनवेस्टमेंट केली त्यात देखील काही फार चांगले रिटर्न्स नाहीत. एफ डी सुरक्षित आहे पण आत्ता तर फक्त ६% व्याज. खरं तर शाळेत अर्थशास्त्र नावाचा विषय होता त्यात देशाच्या अर्थव्यवस्थेबद्दल जास्त घोकावे लागायचे. सामन्या माणसाच्या अर्थव्यवस्थेबद्दल अभ्यासक्रमामध्ये (निदान शालेय) काहीच नाही. अर्थात महाविद्यालयीन अभ्यासक्रमात असेलही पण मग त्या त्या शाखेनुसार असेल. पण गुंतवणूक, Cash flow ह्या आणि अश्या अनेक आर्थिक शिक्षणाबद्दल आपल्याकडे एकंदरीत जागरुकतेचा अभाव आहे हे नक्की. Rich Dad, Poor Dad ह्या पुस्तकात देखील सामान्य माणसाची आर्थिक विचारसरणी कशी असते ह्यावर छान टिपण्णी आहे.

  • ते पुस्तक वाचायचंय. नेट वरुन डाउनलोड करुन ठेवलंय..
   अर्थव्यवस्था आणि अर्थ तज्ञ नेहेमीच मला गोंधळात टाकतात. जितका जास्त प्रयत्न करतो , तितकं जास्त कन्फयुज होतं
   शेअर मार्केट पण न्युज ड्रिव्हन आहे आपलं, परफॉर्मन्स ड्रिव्हन असलं तर खरी डेव्हलपमेंट होईल आपली असं वाटतं…
   कॅश फ्लो, आणि पायरेटा चार्ट वापरुन एकॉनॉमिकल अनॅलिसिस करणे आपल्या सारख्या सामान्य विचाराच्या माणसांना शक्य नाही.. असो..

 9. bhaanasa says:

  मार्मिक आहे कार्टून. 🙂 एकीकडे महागाई आपल्यासारख्या सामान्य लोकांना पिळतेय. तिकडे रिसेशनच्या नावाखाली कंपनी सगळ्या बाजूने हात आखडता घेते आहे. आणि पाहावे तर मॊल ओसंडून वाहत आहेत. इतका प्रचंड विरोधाभास झालाय की काहीच समजत नाही. सोन्याचा भाव आता अजून किती वाढणार आहे? आणि इतके महागडे झालेले सोने लोक घेतच असतात…ते कसे? बॆंकानी व्याजाचे दर कमी केलेत….आता रिटायर्ड लोकांनी केलेले सगळे कॆलक्युलेशन कोसळले की. शेअर बाजार-फंड्स चा चढ उतार लोकांना फेस आणतोय. ५०० रूपये घेऊन बाजारात गेलो तर एक पिशवी भरून सामान येईना झालेय. कसे जगायचे सामान्य माणसाने?

  • आपली अर्थव्यवस्था ही काळ्यापैशावर अवलंबुन आहे हे दुर्दैवाने खरे आहे. आणि म्हणुनच इतके सगळे ऑड्स असतांना पण आपल्याकडे महागाई वाढते आहे. काही दिवसापुर्वी महागाईचा दर जवळपास शुन्या पर्यंत खाली घसरला होता. वर दिलेले स्मित चे उत्तर खरंच चांगले आहे. पुन्हा थोडा अभ्यास करायची इच्छा झाली आहे त्यामुळे..
   सोन्याबद्दल म्हणाल, तर ते आता कम्युडीटी मार्केट मधे मोडते. सोने आणि कच्चे तेल पायात पाय अडकवुन चालतात असं म्हणतात… 🙂 पण अशी अपेक्षा आहे की भाव नक्कीच २० च्या आसपास जाईल लवकरंच..

   रिसेशनच्या नावावर लोकं काढताहेत, तर मग रिलायन्सने १:१ बोनस कसा दिला??

 10. madhuri says:

  Cartoon bhari……well explains the concept

  • मला ते इ मेल मधे आलं होतं. आता नुसतं कार्टून इथे कसं पोस्ट करायचं म्हणुन हे पोस्ट लिहिलं..

 11. ajayshripad says:

  एक नंबर दादा…! यु आर द वन….! बेस्ट..

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s