रेडीओ मिर्ची..

आता  हे हेडींग टाकलं पोस्टला याचा अर्थ हा नाही की मी फक्त हेच स्टेशन ऐकतो किंवा हे पोस्ट केवळ रेडीओ मिर्ची बद्दल आहे. हे पोस्ट मुंबईला असलेल्या सगळ्या रेडीओ स्टेशन्स बद्दल  आहे हे पोस्ट…अगदी इन्क्लुडींग   महिलाओंके लिये स्पेशल और भारत का एक मात्र रेडीओ स्टेशन  “म्यांउं  रेडीओ स्टेशन ” करता पण आहे. त्या  म्यांउं स्टेशनवर एक रेडीओ जॉकी आहे, त्याचं  हिंदी बोलणं ऐकलं की तो ’गे’लेला असावा का? असा  संशय येतो बरेचदा, जाउ द्या. आपल्याला काय करायचंय ??

असो, तर या पोस्ट चं कारण हे की  कुठल्याही मुंबईला  अस्तित्वात असलेल्या सात -आठ एफ एम चॅनल पैकी एक चॅनल चालु केलं तरीही कायम त्या रेडीओ जॉकी चं हिंदी मधे  बोलण सुरु असतं , आणि  हिंदी मधे गाणी !!चुकुनही मराठी गाणी लावली जात नाहीत- एखाद्या वेळेस तुम्हाला तामिळ गाणं पण ऐकवतात, पण मराठी नाही…..  इतके रेडीओ स्टेशन आहेत, पण सगळ्याच रेडीओ स्टेशनवर एकजात सगळे हिंदी मधे बोलणारे  जॉकी  का आहेत?  का म्हणून  एकही माईचा लाल मराठी बोलणारा जॉकी  नाही मुंबईच्या एफ एम वर?

अर्थात हे बोलतोय मी मुंबई बद्दल , पण इतरही शहरात असंच असावं असं मला वाटतं. असंही ऐकण्यात आलंय, की मुंबईच्या लोकल मुलांना रॆडीओ जॉकी च्या नोकऱ्या केवळ हिंदी फ्ल्युएंटली बोलता येत नाही म्हणून नाकारल्या गेल्या आहेत, आणि बिहार युपी मधल्या हिंदी भाषिकांना नोकऱ्या देण्यात आलेल्या आहेत, जे येता जाता मराठी भाषिकांची रेडीओवर खिल्ली उडवत असतात.. मुद्दाम चुकीचे मराठी बोलुन…आणि  फालतु कॉमेंट्स पास करुन..

आता मुंबईतला मराठी टक्का कमी झालाय, सगळे इथे हिंदी भाषिक आहेत, मुंबई कॉ्मोपॉलिटीयन सिटी आहे म्हणून म्हणे रेडीओ वर हिंदी मधे अनाउन्स केलं जातं !!!!असाही प्रचार काही विचारवंत करतील.. पण ……  एकच विचारावसं वाटतं…. की मराठी लोकं संपले कां सगळे मुंबईतले  म्हणुन मराठी गाणी लावत नाहीत हे?? हे भैय्ये रेडीओ जॉकी यांचा मराठी द्वेश तर बरेचदा यांच्या कॉमेंट्स वरुन दिसुन येतो, म्हणून हे मराठी गाणं लावतील अशी आशा करणेच चुकीचे आहे.

बरं एका गोष्टीचं अजुन वाईट वाटतं, की बरेचदा डायल  इन कार्यक्रमामधे मराठी  प्रेमी (?) मराठी भाषिक लोकं पण मोडक्या तोडक्या हिंदी मधेच त्या रेडीओ जॉकीशी बोलतात. त्यातल्या त्यात मराठी मुली तर अशा बोलतात की जर तो जॉकी समोर असता तर त्याच्या गळ्यात पून मटा मटा पापी घेतली असती त्याची या बयेने असं वाटतं ऐकतांना….. 🙂 अजुन पर्यंत एकही  मर्द मराठा दिसला नाही की जो रेडिओ जॉकीशी मराठीत बोलेले असा.  मी रेडीओ ऐकतॊ तो केवळ ड्रायव्हींग करतांना,   तेंव्हा  डायल इन मधे हे    तुटकं हिंदी बोलणारे मराठी लोकंच दिसून येतात. त्या मराठी मधे बोलणाऱ्या मर्द मराठ्याची मी वाट पहातोय…

काही दिवसांपुर्वी , कौशल इनामदारने व्होडाफोनची वाजवली होती. ह्या व्होडाफोनवाल्या कॉलसेंटरवाल्यांना सुचना दिलेल्या होत्या की फक्त इंग्रजी किंवा हिंदी मधेच ग्राहकांशी संवाद साधावा. काहीही झालं तरी मराठी मधे बोलू नये म्हणुन यांना स्पेशल इन्स्ट्रक्शन्स दिलेल्या होत्या. आता कौशलने थोडंफार ओरडा केला म्हणून पेपरला बातमी आली,आणि व्होडाफोनच्या लोकांनी पण डिक्लरेशन दिलं की मराठी मधे संवाद साधणे सुरु करण्यात आलेले आहे…

अर्थात हे अगदी शंभर टक्के खोटे आहे. मी पण आज   स्वतः व्होडाफोनला फोन केला असतांना त्यांनी माझ्याशी मराठीत बोलणे नाकारले.  मला वाटतं की ’त्या- मराठी प्रेमी’ राजकीय पक्षांना व्होडाफोनवाल्यांनी इलेक्षन फंडाला भरपूर पैसे दिले असावेत म्हणून गप्प बसले आहेत सगळे पक्ष. असो..  या पक्षांचं मराठी प्रेम असं बेगडींच असावं असं वाटतं हे पाहिलं की..

कौशलचं एका बाबतीत कौतुक करावंसं वाटतं , ’की एकलाच चालत जा’ या उक्ती प्रमाणे हा माणुस नेहेमी मराठी साठी काही ना काही करित असतो. कधी असं व्होडाफोनशी भांडण, तर कधी मराठी अस्मिता गीत रेकॉर्डींग. आणि हे सगळं कुठलंही वैय्यक्तीक स्वार्थ न बाळगता. म्हणून कौशल माझ्या फेस बुक फ्रेंड लिस्ट मधे आहे म्हणून सांगतांना बरं वाटतं..!!

हैद्राबादला गेलो असतांना एफ एम वर चक्क तेलगु गाणी आणि कोचिनला केरळी गाणी सुरु होती रेडीओवर.. मग आपल्या इथे का मराठी गाणी ऐकायला मिळत नाहीत आपल्याला?? या रेडिओ स्टेशन्स ची दादागिरी अशीच चालु रहाणार आहे का?? ह्या रेडीओ  वर मी तामिळ गाणं पण एकदा ऐकलंय, गुजराथी पण एखाद्या वेळेस लागते, पण मराठी गाणी कधीच लागत नाहीत.

पुण्याला असतांना रेडिओ जॉकीचं मराठी + हिंदी बोलणं ऐकलं. चला. अगदीच नसल्या पेक्षा थोडं तरी आहे म्हणून समाधान करुन घेतलं स्वतःचं.. मराठी गाणी पुण्याला एफ एम रेडीओ वर लागतात का? हे माहिती नाही .. फार पुर्वी म्हणजे एक दोन वर्षापूर्वी  एका कुठल्याशा रेडीओ स्टेशनवर मराठी गाणी अगदी सकाळी साडे पाचच्या सुमारास लागायची , हल्ली ती पण शंभर टक्के बंद करण्यात आलेली आहेत. याच स्पिडने मराठीचा दुःस्वास सुरु राहिला, तर थोड्याच दिवसात भोजपुरी बोलणारा भैय्या रेडीओ जॉकी म्हणुन सिलेक्ट केला जाईल इथे मुंबईला… !!!!

इथे महाराष्ट्रामधे मराठी च पुरस्कार करण्याच्या कामी आपणही थोडी फार मदत करायला पाहिजे. रेडिओ स्टेशन्स वर हे राजकीय पक्ष मोर्चा वगैरे नेणार तर नाहीच.. (कारण आर्थिक संबंध वगैरे किंवा जे काही असेल ते असो..) तेंव्हा कार्यकर्त्यांनीच काहीतरी ठोस कार्यक्रम हाती घेतला पाहिजे. नाही तर नुसतं आमची मराठी म्हणून बेंबीच्या देठापासुन बोंब मारा, आणि शेवटी मुंबई ही बम्बई झालेली बघा… इथे एक इ मेल फॉर्वर्ड  टाकतोय… बघा , वाचा, आणि विचार करा.. जय महाराष्ट्र..

About महेंद्र

माझा ब्लॉग :- http://kayvatelte.com
This entry was posted in मनोरंजन and tagged , , , , , , , , , , , , . Bookmark the permalink.

87 Responses to रेडीओ मिर्ची..

 1. Abhijit says:

  महेंद्रजी,

  छान पोस्ट आहे. पुण्यातले डीजे जे मराठी+इंग्रजी+हिंदी बोलतात ते ऐकायला कसंतरीच वाटतं. मुंबईत बोलतच नाहीत मराठी हे फार वाईट. आपली पण चूक आहे. आपल्याला पण फार उशीरा जाग आली आहे.

  व्होडाफोन चे हे वर्तन राज च्या कानी घातले पाहिजे व सर्व मराठी जनांनी व्होडाफोन वापरणे बंद केले पाहिजे.

  • अभिजित
   मला ही गोष्ट प्रकर्षाने जाणवली आठवड्यापुर्वी. माझीमराठी गाणं ऐकण्याची इच्छा झाली, आणि नेमकी कार सर्व्हिसिंगला देतांना ज्या सगळ्या सिडी काढुन ठेवल्या होत्या त्या घरीच राहिल्या होत्या. आणि तेंव्हा एकाही रेडिओ स्टेशन वर मरठी गाणं ऐकताआलं नाही.

  • त्याला पण आपणच कारणीभुत आहोत नाही कां??? राजला माहीती नाही हे शक्यच नाही, कारण मटा मधे बातमी आली होती कौशलच्या एकांगी लढ्याची. एकही पक्ष उभा राहिला नाही त्याच्या पाठी.

 2. ravindra says:

  राग राग राग 😦 😦 😦
  कौशल चे कौतुक करावेसे वाटते.
  असो नेहमी प्रमाणे पोस्ट मस्तच!!!

 3. bhaanasa says:

  ’बिहाराष्ट्र’ हे वाचलं आणि माझं तर डोकच आऊट झालं. तुला माहीत आहे हे लोक ठाकरे….न म्हणता ’ठोकरे” म्हणतात आणि वर कुछ दम नही रे….फोकट का तमाशा हैं….. ये मराठी लोग बडा बवाल खडा करेंगे फिर दुबक के बैठेंगे.
  हम्म्म्म……कोण म्हणतो की मराठी लोकांना हिंदी बोलता येत नाही. हे असले बिहारी-भोजपुरी हिंदी नाही बा आम्हांला बोलता येत. आणि ते आम्ही कधीच शिकणार नाही. मात्र मुळात आपण सगळ्यांनी स्वत:पासून सुरवात केली पाहिजे. बाकी खरेच कमाल आहे एकही मराठी बोलणारा जॊकी नाही म्हणजे….. महाराष्ट्रात-मुंबईत राहून आपलीच वाजवता आहेत की हे……

  • अगदी खरं आहे हे.. एकही नाही मराठी जॉकी. राज ठाकरे पण काय, नुसता बोलत असतो, हे इथे उघड दिसतंय व्होडाफोनचं वागणं, पण मनसे, शिवसेना गप्प आहेत. मटा मधे पण बातमी आलेली आहे तेंव्हा त्यांना माहिती नाही असंही म्हणता येत नाही. सरळ सरळ दुर्लक्ष करताहेत झालं.. राज ने एक आवाज दिला तर काय बिशाद आहे ? पण नाही………!!!!

 4. ajayshripad says:

  जय माहाराष्ट्र दादा….!
  आज सकाळी-सकाळी डोक्याला भरपुर खाद्य दिलत.. आता नसा-नसात रक्तं कसं दुप्पट वेगाने धावतेय…! मी तर नेहमीच म्हणत असतो आपण नेहमी नविन प्रेरणा देत असता….!
  अहो आता पुण्यातही या जॉकींनी हींदीचाच उच्छाद मांडलेला आहे…. कितीतरी दिवस झालेत मी मरठी गाणं नाही ऐकलं रेडीओ वर…! पण तुम्ही म्हणता ते बरोबर आहे, आपलेच लोक त्यांच्याशी हिंदीत बोलण्याचा खुळेपणा करतात…! अरे जरा म्हणा ना त्या भैय्याला, “मला हिंदी येत नाही, भाउ मराठीतुन बोल.. आणी हो गाण जर तुला लावायचं असेल तर ते मराठी लाव नाहीतर बंद करतो मी तुझा चॅनल..! बोल लावणार की नाही…?” मग बघु कसे नाही बोलत हे मरठीत…आणी कसं नाही लावत मराठी गाणं..?

  • थोडं राजकिय प्रेशर आणलं पाहिजे असं वाटतं..ज़र या लोकांवर राजकिय दबाव आणला, आणि जर हे केलं नाही तर आपलं काही तरी आर्थिक नुकसान होईल असं वाटणार नाही, तो पर्यंत हे शक्य होणार नाही….
   आसाम मधे माझा एक मारवाडी मित्र आहे, तो सांगतो , इथे म्हणे हे उल्फा वाले, एका मारवाड्याला मारुन टाकतात… काहीही कारण नसतांना, आणि मग दुसऱ्या दिवशी इतर मारवाड्यांना खंडणी साठी फोन करतात.. …. आणि इतर सगळे.. अगदी क्षणभरही विचार न करता आपापल्या पैशांच्या बॅगा रिकाम्या करतात त्यांच्या पुढे….

 5. sadanand says:

  Lavngi Kolhapuri chenal chalu kara.an hou dya daman…

  sadaindori.

  • चॅनल चालु करणं जरी आपल्या हाती नसलं, तरीही असलेल्या चॅनल्सला आपण मराठी गाणी लावण्यास भाग पाडु शकलो तरीही खुप झालं…

 6. Smit Gade says:

  i dont listen to Radio that often,but I think,in Pune, the anchors speak in Marathi much of the time.Have heard Marathi songs many times.

  • पण याचं परसेंटेज वाढवलं पाहिजे. धेडगुजरी मराठी,, म्हणजे मराठी+हिंदी+इंग्लिश सगळ्यांचं कडबोळं असलेली भाषा असल्यापेक्षा शुध्द मराठी ऐकायला बरी वाटते..

 7. Abhijit says:

  छान लेख आहे. पुण्यातील एफ एम रेडीओ बद्दल बोलायचे तर मुंबई च्या तुलनेत इकडे जास्त मराठी गाणी लागतात असे मला वाटते. “S” FM वर २५ % पेक्षा जास्त गाणी मराठी असतात. आणि सकाळी तास -२ तास पण पूर्ण वेळ मराठी गाणी असतात. बाकी सगळीकडे आनंदी आनंदच आहे.

  • अभिजीत
   ऐकुन बरं वाटलं.. की एक तरी चॅनल आहे असं. इथल्या एका चॅनलवर आधी मराठी गाणी ऐकता यायची हल्ली पुर्ण बंद झालंय…

   • अनिकेत says:

    हो पुण्यात लागता मराठी गाणी, आर.जे पण आहेत मराठीत बोलणारे. काही आहेत जे मराठी+हिंदी+इंग्रजी ही बोलतात पण मराठी आहे सगळ्या चॅनल्स वर

    • यावरुन एक लक्षात येते की लोकांना मराठी गाणी ऐकायला आवडतात, पण इथेमुंबईला मात्र सतत हिंदी गाण्यांचाच रतिब असतो. अर्थात रेनबो वर कधी कधी मराठी गाणी लागतात..पण आरजे सगळे भैय्या भाषीक.

     • Mayuresh says:

      अधिक माहिती: सकाळी ५ ते ८ वाजेपर्यंत FM Rainbow (107.1 MHz) वर मराठी गाण्यांचा कार्यक्रम असतो.

      सकाळी १०:१० ते दुपारी ३ वाजेपर्यंत FM Gold (100.7 MHz) वर खालील कार्यक्रम असतात.
      १०:१० ते १२:०० – सखी
      १२:०५ ते ०१:०० – मस्त- बिनधास्त
      ०१:१० ते २:०० – रंगत-संगत
      २:०० ते ३:००- आठवणींच्या हिंदोळ्यावर

      मात्र क्रिकेटची मॅच वगैरे असली की त्याच्या प्रसारणासाठी मराठी कार्यक्रमाचाच बळी दिला जातो, हे दुर्दैव.

      • मी जे लिहिलंय ते प्रायव्हेट चॅनल्स बद्द्ल. रेनबो आधी पासून आहेच. रेनबो वरची गाणी तर नेहेमीच ऐकतो, फक्त रेडीओ मिर्ची , ९४.५,९१ वगैरे सात चॅनल्स जे आहेत त्यांच्याबद्दल लिहीलंय इथे.
       प्रतिक्रियेकरता धन्यवाद.

  • tejali says:

   agreed..:). n ratri radio mirchi war pan marathi gani asatat..:)

   • ते आता इतक्यात सुरु झालंय. पण रात्री सगळे झोपले असतात तेंव्हा का? त्या पेक्षा सकाळी ५ ते ‘११ का नाही? हा प्रश्न आहेच..

 8. पुण्याच्या “रेडिओ मिर्चि” वर काही वर्षांपुर्वी दुर्मिळ मराठी बोलणं ऐकु यायचं! मला वाटतं आता तेही बंद झालय. आजकाल मात्र “बाबुराव आपटे” स्टाईलमध्ये मराठीची खिल्ली उडवण्याचे टेंडर त्यांना मिळालं आहे असं दिसतय.

  मराठीचाच आग्रह धरणे – हे मला प्राकार्षाने जाणवतय… जसं कस्टमर केअरचे फोन, बँका – स्टेशन या सर्व ठीकाणी आपणच मराठीत सुरुवात करावी. समोरच्याने कितीही “खडी” चा पाढा वाचला तरी आपण टस-की-मस न होता मराठी वरच अडुन रहावं, कसं?

  • मराठी लोकांची उडवणे हा तर त्यांचा जन्मसिध्द हक्क आहे. आणि आपले लोकं पण ते एंजॉय करतात…आपण मराठी बोलणं सुरु करावं ही युक्ती चांगली आहे.. 🙂

 9. anukshre says:

  इथे फक्त गाडीत दुबई वरचे चानेल ऐकू येते. हवा खराब असली तर काहीच नाही. मस्कत ने स्वीकारले नाही. त्या मुळे जे हिंदी च्यानल कधीमधी
  ऐकायला मिळते फक्त गाडीत. आता नवीन भागात आम्ही आलो त्यामुळे क़्वचित सिग्नल येतो त्यामुळे जरा आशा आहेत. बाकी भारतात जेंव्हा
  ऐकले तेंव्हा अशीच मराठी स्थिती होती. छान सुंदर मराठीतून पण शुद्ध बोलणे, शब्दांवर किती जोर देणे किंवा कसा अलगद सोडणे हे शास्त्र
  आहे उत्तम संभाषणाचे. पण अजूनही व्होईस कल्चर शाखा विकसित व्हायला पाहिजे म्हणजे मराठी जॉकी पण तयार होतील. मराठीतून सर्व च्यानल
  सांभाळण्या करिता……होप फॉर मराठी.

  • ईंटर्नेट रेडीओ वर पण हिंदी चॅनल्संच आहेत. मराठी नाहीत. पुर्वी भक्ती बर्वे, सारख्या निवेदिका टीव्ही, रेडिओ वर आल्या की त्यांचं बोलण ऐकत रहावंसं वाटायचं… संभाषण ही एक कला आहे . इथे हिंदी बोलणारेच जॉकी लागतात, याला माझा आक्षेप आहे.. मराठी मधे बरेच चांगले निवेदक मिळु शकतात…… त्यांना चान्स मिळायलाच हवा…

   • Aparna says:

    सगळ्यांनी बरंच म्हणून ठेवलंय आणि मी इतक्यात मुंबईतलं एफ़ एम ऐकलं नाही पण आपणचं फ़ोन करून मराठीचा आग्रह धरायचा हे बरोबर आहे..कौशलच्या प्रोजेक्टला मी पण सपोर्ट केलंय..आपण सर्वच मराठीचा आग्रह धरणार्यांनी केलं पाहिजे…
    आणि एक मला माहित असलेली माहिती..इंटरनेटवर अमेरिकेतून एक मराठी रेडिओ चालवला जातो.आम्ही नेहमी ऐकतो आणि इथल्या ‘आपली आवड’ला अगदी मुंबईपासुन दुबईपर्यंत सगळेच आपल्या आवडी कळवतात..आपणही ऐका..
    http://www.eprasaran.com/

    • धन्यवाद.. आता सेव्ह करुन ठेवतो.. पण मुळ मुद्दा अजुनही अनुत्तरीतच रहातो.. मुंबईला मराठी आरजे किंवा गाणी एफ एम वर का नाहीत .. ! असो..

 10. tanvi says:

  महेंद्रजी मराठी, महाराष्ट्र याविषयीचा या उत्तर भारतीयांचा राग जागतिक असावा कारण अनूजाताईने म्हटल्याप्रमाणे इथे जे UAE चे FM लागते त्यावरही राज ठाकरेंची वगैरे टर उडवली जाते…मुंबईला बॉंबे किंवा बंबई म्हणणारे NRI मराठी पाहिले की तर फार राग येतो!!!

  मराठी माणुस कधी जागा होणार आहे राम जाणे…कौशलसारख्यांना एकला चलो रे करावे लागते यासारखे दुर्दैव काय!!!!

  • राज ठाकरेंची टर उडवली की सगळ्या मराठी लोकांची टर उडवल्याचं समाधान मिळतं त्यांना.. आणि हेच कारण असावं.. राजकिय लाभाच्या पलिकडे जाउन जेंव्हा राजकिय पक्ष या भाषेसाठी काम करतिल तेंव्हाच काही तरी होण्याचे चान्सेस आहेत.. अन्यथा…. 😦

 11. रेडिओ मिरचीवर पूर्वी एकही मराठी गाणे लागायचे नाही. दक्षिणेतील सन समूहाच्या एस एफएमने पुण्यात पहिल्यांदा बहुतांशी मराठी गाणे लावण्याची पद्धत सुरू केली. त्यांना मिळालेल्या प्रतिसादानंतर आता सर्वच स्टेशन मराठी गाणे लावतात. राहता राहिला राज ठाकरेंचा मुद्दा. मराठीशी संबधित सर्व बाबींमध्ये त्यांनीच लक्ष घालावे हि अपेक्षा चुकीची आहे. दहा कोटींच्या महाराष्ट्रात अशा विषयांवर बोलणारे कोणीही नाही का?

  • प्रत्येक गोष्टीत नाही, पण मराठी संबंधीत प्रश्न जेंव्हा काहीही फायदा नसतांना कौशल सारखा माणुस उचलतो, तेंव्हा त्याला थोडं तरी सहाय्य केलं तरी झालं असतं. मराठी साठी बोलणं हे कालबाह्य झालंय, कोणिच बोलत नाही, – आणि राज बोलला, म्हणुन तर निवडुन दिलं जनतेने. आता राजने पण न बोलणं सुरु केलं तर कोणाकडे पहायचं अपेक्षेने??

 12. Amit says:

  महेन्द्र काका, मी तुमचा ब्लॉग पहिल्यापासून वाचतो आहे पण कधी कॉमेंट नाही टाकली.. चुकलेच माझे … पण आजची पोस्ट वाचली आणि म्हटले की मी पण काही तरी शेअर करू या….इकडे बेंगलोर मधे फक्त एकच चॅनेल आहे ंकी ज्यावर हिंदी गाणी लागतात पण रेडिओ जॉकी मात्रा कन्नड मधेच बोलतात, तसे म्हणायला गेले तर बॅंगलुर पण कॉ्मोपॉलिटीयन सिटी आहे पण तरी पण ते आपली भाषा सांभाळतात.. मग आपल्याकडेच का असे होते नेहमी…खूपच कडवे आहेत लोक इकडे भाषेबाबत…

  • अमित
   स्वागत.. पहिल्यांदाच कॉमेंट टाकलीत म्हणुन.. आज काल मी तर रेडिओ ऐकणं बंदच केलंय. आपल्या आवडीच्या सिडीज ठेवतो गाडीत, फक्त मुली बरोबर असल्या की हिंदी नविन गाणी ऐकण्याचा अत्याचार स्वतःवर करुन घेतो.. 🙂

 13. sayali says:

  Aaple mudde barobar aahet, except Raj Thakre..Kharokhar ch aaplyala watate ka ki tyala Marathi lokanchi/ bhashe chi kalaji aahe? Aho eka hi politician war vishwas thevnyat arth nahi..Sagle keval swatah cha swarth baghtat. Samanya manasane aaplya dainandin vyavharat Marathi la mahatva dene ha ch ek paryay aahe. ( Jase tumhi mhanta – Banks, FM walyanshi marathi madhye ch bolne..like south indians) Pan South indians chya tokachya bhumike mule tyanchehi nuksan anekda hote..e.g. they cant watch good hindi movies, dont understand good hindi songs, face problems when they go to North india where common people dnt understand English 🙂 Tashi wel hi Marathi manasane swatah war aanu naye..

 14. justtypeamruta says:

  खरच आहे, मी काही महिने मुंबईत होते, पण एकदाही एकाही चॅनलवर मराठी गाण ऐकल्याच आठवत नाही.
  पण पुण्यात तरी असा काही नाहीये अजूनतरी. इथे ९०% जॉकी मराठीतच बोलत असतात आणि काही जण तर अस्सखलित मराठी बोलतात.
  आजकाल मराठी तरुणाईसुद्धा मराठीचा अभिमान बाळगताना दिसून येते. आपलंच बघा ना, “मराठी” म्हणालं कि कितीतरी लोकांच्या आवाजात, डोळ्यात अभिमान भरभरून दिसून येतो. मराठी माणूस तर जागा झाला आहे, मग बाकीच्यांना सरळ करायला असा कितीसा वेळ लागेल?

  • अमृता
   मराठीचा अभिमान तर वाढतो आहेच , कॉलेज मधे जाणारी मुलं पण आजकाल मराठी बोलतात. माझी इंजिनिअरिंगला असलेली मुलगी पण मैत्रीणींशी मराठितच बोलते. शाळेत असतांना त्यांची मैत्रीणींशी बोलण्याची भाषा हिंदी किंवा इंग्रजी असायची. चांगला बदल होतोय..

 15. मला पण अगदी मनापासून असे वाटते कि मुंबई मध्ये FM वर किमान मराठी जॉकी तरी असावा. सारासार हिंदी भाषेचे वर्चस्व गाजवणे चुकीचे आहे. काही काही RJ (उदा. मलिष्का , जितुराज, मंत्रा (जो आज काल channel V वर पण येतोय) ) तुटक तुटक मराठी बोलण्याचा प्रयत्न करताना दिसतात. जणू काही त्यांना असे दाखवायचे असते कि आम्ही पण मराठी संस्कृतीशी जुळवून घेत आहोत. वाईट वाटते ऐकून.

  Character based promotion करायला काही हरकत नाही, म्हणजे सध्या जसे ‘बब्बर शेर ‘ , ‘हंसी के फुव्वारे विथ सुदर्शन’ असे अधूनमधून कार्यक्रम येत असतात तसेच मराठी पण येवू शकतात. जसे पुण्यात ‘खो खो पाटील’ येतो . मनस्वी आनंद होतो जेव्हा मी पुण्यात गेल्यावर हे ऐकतो ‘ मी आहे RJ shrikant’. विविध alerts , trafiic updates , क्रिकेट score हे सुद्धा मराठीत सांगू शकतील हे लोक.
  “मुंबईकरांची मागणी — radio जॉकी मराठी असलाच पाहिजे. “

  • प्रवीण
   सहमत आहे तुमच्याशी. जे काही मुद्दे लिहिले आहेत ते एकदम बरोबर आहेत. पण मराठीची वाट लावायचीच जर ठरवुन टाकलं असेल तर काय करणार आपण तरी? कमीत कमी आपल्या लोकांनी तरी मराठी मधे बोलावं, इतकीच माफक अपेक्षा आहे.मराठी गाणी, कथाकथन वगैरे कार्यक्रम तर व्हायला काहीच हरकत नाही.
   मराठी म्हण्जे केवळ कामवाली बाई किंवा नौकर – असे नाही, तेंव्हा त्याच त्या प्रकारचे मराठी लोकांचे चरित्र हनन करणारे जोक्स पण सहन केले जाउ नयेत.

   पुर्वी एक म्हण होती, संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याच्या वेळेस, मुंबई तुमची , पण भांडी घासा आमची.. तीच मेंटॅलिटी पुन्हा समोर येतांना दिसते आहे..

 16. Nilesh says:

  Again very good post. Political pressure asane jaruriche ahech, pan lokani pan marathi ani nantar engraji cha wapar karava.

  Mahendraji, post khoop awadli.

 17. Manmaujee says:

  शेवटी आपण ऐकतो म्हणून ते ऐकवतात. . .सगळ्यांनी विरोध केला तर काय चालणार आहे यांच?? आपण आहोत म्हणून ते आहेत!!आपण सगळ्यांनी ठरवल तर हे चित्र बदलायला खूप वेळ लागणार नाही. राजकीय पक्ष असो किंवा मिडीया असो यांची डोकी ठिकाणावर आणायला असा किती वेळ लागेल?? फक्त बोलून काही होणार नाही. आपणच आपली मराठी अस्मिता जगवली पाहिजे.

  • अगदी बरोबर आपण ऐकतो म्हणुन ते ऐकवतात. पण आपल्याला ऐकयचं असतं गाणं, आणि म्हणुन ही त्या आरजे ची फुकाची बडबड ऐकावी लागते. बरं, ती पण मराठीत असती तर जास्त बरं वाटलं असतं…

 18. संतोष says:

  महेन्द्र जी,
  मी तुमचा ब्लॉग नेहमी वाचतो पण मी ही कधी कॉमेंट टाकली नाही.
  पण तुमची ही पोस्ट वाचून मला कॉमेंट टाकल्या शिवाय राहवले नाहीं. विशेषतः बिहाराष्ट्रा हे नाव वाचून मांदूला झिंझिण्या आल्या.

  प्रत्येकाने आपापला वाटा उचलला पाहिजे. मी ईथे सिंगापुर मधे आहे आणि मी सुधा मला जेवढा जमेल तेवढा मराठी चा आग्रह धरतो. आजूबाजूला हिंदी भाषिकांच्या घोळक्यत असताणांही मी मुंबई च म्हणतो. राज ठाकरे चा जेवढा समर्थन करता येईल तेवढे करतो.
  आणि मला सांगायला आनंद होतो की ऑफीस मधे आमच्या एका मराठी मित्राने “जय महाराष्ट्रा” अशी एक चॅट रूम ओपन केली आहे. मराठी लोक “महाराष्ट्रा आणि मराठी” या मुद्द्यांवाराती संघटित होतायत हे ही नसे थोडके.

  तुमच्या ब्लॉग वरुन स्फूर्ती घेऊन मी सुद्धा मराठी ब्लॉग बनवला आहे. तेवढाच मराठी भाषेच्या सेवे साठी माzआ खारीचा वाटा.

  धन्यवाद,
  संतोष

  • संतोष
   तुमचे स्वागत आहे… कुठल्याही मराठी माणसाचं डॊकं फिरलंच पाहिजे ते वाचल्यावर.. तुम्ही आपल्याकडुन शक्य होईल तेवढं करताय हे वाचुन फार बरं वाटलं. मीपण ते मेल फॉर्वर्ड वाचलं, तेंव्हा माझी पण हीच अवस्था झाली होती. तुमच्या ब्लॉगची लिंक दिली असती तर भेट देता आली असती..

 19. बंगलोरला दररोज संध्याकाळी बहुतेक सर्व FM वर २ ते ४ तास फक्त कन्नड गाणी लावली जातात. शनिवारी सकाळी फक्त कन्नड. अमेरिकेत तर dedicated तेलगु FM होतं.

  • सिद्धार्थ
   तेलगु लोकांना भाषेबद्दल खुप प्रेम आहे, ते आपल्यात नाही. आपण कितीही चांगला असला तरीही मराठी सिनेमा हॉलमधे जाउन पहात नाही.. गाणी ऐकवायचा आग्रह करित नाही.. म्हणुन आहे असं..

 20. Akshay says:

  नमस्कार काका ,
  छान लेख. मंती गुंग झाली.काय बोलावे कळत नाही. त्यामुळे नागपुरचे उदाहरण सांगतॊ,(वर्धेला नागपुरचा signal येतो,तोच आम्ही एकतो).मागे IPL 2 सुरु असतांना मी FM एकत होतो.तेथे चमूसाठी गाणं dedicate करणं सुरु होतं.आश्चर्य म्हणजें Mumbai vs. Jaipur च्या खेळात सर्व जण jaipur लाच गाणे dedicate करत होते. व Jockey यथेच्य सचिनची टवाळकी करत होते.येथे ही मराठीची उडवली जाते.

 21. DR MILIND says:

  धन्यवाद, एक चांगला विषय मांडल्याबद्दल,
  apart from what politicians or other people do I would like2ask how many of marathi do following things?
  1. whnever start communication in local or train to unknown person talk atleast first few words in Marathi, I think everybody knowing Hindi must understand atleast 60% Marathi.

  2. In ATM, choose Marathi as language of choice?

  3. set Marathi as default language in Google n Gmail settings.

  4. Mozilla , chrome, IE N many software having Marathi versions do u use it?

  so many such minor things will make effect start from urself.
  If vodafone or other callcenter guy doesnt talk MARATHI, u talk in MARATHI HE WILL UNDERSTAND.

  plz reply,

  • तुम्ही लिहिलेले मुद्दे बरोबर आहेत. मराठीचा जास्तीत जास्त वापर केला तर नक्कीच फायदा होईल.लोकल ट्रेन मधे मराठी माणुस शक्यतो इंग्लिश एक मेकांशी मधे बोलतांना दिसतो . हातामधे नेहेमीच टाइम्स – इकोनोमिक्स, किंवा टीओआय असतो. फार कमी लोकं आहेत जे मराठी पेपर घेउन दिसतात ( ट्रेन फर्स्ट क्लास मधे बोलतोय मी)
   गुगल मधे तर मराठी भाषा डिफॉल्ट भाषा म्हणुन सेट करुन ठेवलेली आहे मी तरी.. आय ई कधीच वापरत नाही.. फक्त एस ए पी साठी तेवढं आय ई वापरलं जातं.
   व्होडाफोनला एकदा फोन करुन पहा.. ते सरळ म्हणतात, की हिंदी या अंग्रेजी मे बोलो.. असं म्हणायची त्यांची हिम्मत केरळ मधे किंवा तामिळनाडू मधे होईल???
   असो..

 22. Dilip says:

  FM रेडियो वाल्यानी चालवलेल्या उपेक्षे बद्दल तू लिहायला घेतलेस तय बद्दल धन्यवाद !!
  या संदर्भात माला काही वर्षापूर्वी पंजाबी सरदार लोकानी कोणत्या तरी करणावरून मुम्बईत धुडगूस घालायला सुरवात केली होती. त्यावेळी बाळासाहेबांनी दैनिक सामना मधून त्यांना असा सज्जड दम दिला होता की जर सर्व पंजाबी सरदार लोकानी हा धुडगूस लगेच थांबवला नाही तर महाराष्ट्रातील सर्व मराठी जनता पंजाबी सरदार लोकांच्या व्यवसायावर जाहिर बहिष्कार घालेल.

  त्याचा एवढा परिणाम झाला होता की मुंबई मधील सर्व दंगल करत्यांच्या नेत्यांनी माफी मागून सरदारांच्या व्यावासावर मराठी जनतेने बहिष्कार घालू नये अशी विनंती केली होती व त्यांचे तथाकथित आंदोलन लगेच मागे घेतले होते.

  त्या प्रमाणे सर्व मराठी जनतेने महाराष्ट्रात FM रेडियो वाल्यानी चालवलेल्या मराठी भाषेच्या उपेक्षे बद्दल FM रेडियो ऐकण्यावर जाहिर बहिष्कार घालायचे ठरविल्यास ते लोक सुद्धा वठणीवर यायला वेळ लागणार नाही .

  नाही का महेंद्र ? तुला काय वाटते ?

  पण असा बहिष्कार घातला जाणार आहे असे जाहीर करून त्यांना त्यांच्या कार्यक्रमात बदल घडून आणण्यासाठी थोडा वेळ ध्यावा लागेल

  • दिलीप
   मला पण ती सरदार लोकांची केस आठवते. बरेच सरदार लोकं हातामधे तलवारी घेउन रस्त्यावर उतरले होते . सर्व मराठी जनतेने महाराष्ट्रात एफ एम रेडीओ वर बहिष्कार घातला तर …..?? पण मला तरी असं वाटंत नाही की कुठला मराठी माणुस बहिष्कार घालेल म्हणुन.. कारण मराठी माणसांचं हिंदी गाणी ऐकण हा आवडता पास टाइम आहे. या साठी एखाद्या स्टेशनला जर धारेवर धरलं, मनसे, शिवसेना या पैकी कोणी तर नक्कीच काही तरी होईल अन्यथा नाही, असे मला वाटते.

   बहिष्काराने फारसा परिणाम होणार नाही. लोकल मधे, बस मधे, चालतांना सेल फोनच्या हेडफोनची कानात बुचं अडकवुन चालणार्यांना एफ एम म्हणजे बिन पैशाची करमणूक आहे. आणि फुक्ट मिळणारी गोष्ट कोणीच बंद करणार नाही.

 23. sanket says:

  नमस्कार काका, संताप आला लेख वाचून.मी FM फारसं ऎकत नाही. पण एवढे नक्की माहीत आहे की इथे नागपूरला My Fm मराठी गाणी वाजवतो आणि RJ जूही अगदी छान मराठी बोलते.पण Radio Mirchi वर मात्र कधी मराठी गाणी ऎकली नाहीत. ते हैदराबादला मात्र तेलुगु गाणी वाजवतात. It’s hot !! ऎवजी तिकडॆ “इदी चाला hot गुरू !!” अशी catchline वापरली जाते.बेंगलुरू आणि चेन्नईत सुद्धा कन्न्ड आणि तमिळ catchline वापरतात महाराष्ट्रात मात्र मराठी catchline का वापरली जात नाही, “Radio Mirchi, लई तिखट हो राव !! “असं म्हणू शकतात 🙂 .
  कदाचित गृहित धरलं जातं की इकडे सगळे हिंदी गाणीच ऎकतात.सध्या मराठीत हिंदीपेक्षाही चांगली मराठी गाणी येत आहेत पण इक़डे आम्हाला FMवर ती ऎकायला मिळत नाही.

 24. हेरंब ओक says:

  वा. नेहमीप्रमाणेच मस्त पोस्ट. खरंच वाईट वाटलं वाचून. मी पूर्वी मुंबईत असताना हे माझ्या पुरतं सुरु केलं होतं. प्रत्येकाशी मराठीत बोलायचो. दुकानदार, रिक्षावाला, पाणीपुरीवाला, भाजीवाला अगदी सगळ्या सगळ्यांशी. तुम्ही म्हणता त्याप्रमाणे प्रत्येकाने मराठीतच बोललं पाहिजे सगळ्यांशी. आपोआपच प्रेशर येईल. दुसरा मुद्दा राज विषयीचा. तो त्याच्या परीने करतोय असं मला तरी वाटतं. पण त्याने काहीही केलं तरी लोक आक्षेप घेतात. अजूनही लोक विचारतात कि २६-नोव्हे ला राज कुठे होता. आता काही संबंध आहे का त्याचा आणि याचा. असो..

  • हेरंब,
   राजवर पण एक पोस्ट लिहायचंय.. पण टाळतोय अजुन तरी… बघु या पुढे मागे कधी तरी..पण शेवटी माझं एक मत झालंय.. सगळे मणी एकाच माळेचे….

 25. Abhijit says:

  महेंद्र्जी,

  http://sarvottam-marathi-vinod.blogspot.com/2009/12/blog-post_18.html?utm_source=feedburner&utm_medium=feed&utm_campaign=Feed%3A+v

  ह्या लिंकवरचा एक संवाद : मराठीतच बोला ऐका. तम्हाला जर आवडला तर तुमच्या बॉलगवर तुम्ही प्रकाशित करु शकता. तुमचा वाचकवर्ग मोठा आहे. (मूळ ते संभषण कोणाचं व तो ब्लॉग कोणाचाअ याची कल्पना मला नाही)

 26. प्रिय महेंद्र,

  प्रतिक्रिया नोंदवण्यास उशीर झाला त्याबद्दल क्षमस्व! मराठी अभिमानगीताचं काम आता शेवटच्या टप्प्यात आलं आहे त्यामुळे इंटरनेटवर फार वेळ बसता येत नाही. पण तुमचा लेख वाचला आणि आनंद झाला… मनापासून आनंद झाला!

  रेडियोच्या मुद्द्यावर दोन उपाय सुचले आहेत ते सांगतो.

  १) शॉर्ट टर्म उपाय – आपण ३०० – ४०० लोक एकत्र येऊन महिनाभर रोज ठरवून रेडियो मिर्चीला प्रत्येकी एक असे रोज ४०० फोन करून एका मराठी गाण्यासाठी विनंती केली, तर महिन्याभरात त्यांना नमावं लागेल!!

  २) लाँग टर्म उपाय – मराठी लोकांच्या हातात माध्यमं नाहीत. वर वाचल्याप्रमाणे पुण्यातही दक्षिणेच्या एका उद्योग समूहाला मराठी रेडियोवाहिनी काढावीशी वाटली! आपल्या मराठी उद्योजकांना याचं महत्त्व का पटत नाही?!! तर त्यावर आपणच उपाय शोधावा हे उत्तम!

  तुम्ही माझा नामोल्लेख केलात याचा आनंद झाला. आणि आपण एक मोठी जबाबदारी खांद्यावर घेतली आहे याची जाणीवही यामुळे झाली! आपण सगळे एकत्र आलो तर बिहाराष्ट्र आपण अस्तित्वात येऊन देणार नाही, उलट पटण्यामध्येच मराठी रेडियो वाहिनी सुरू करू याची मला खात्री आहे!

  कौशल

  • प्रिय कौशल
   तुमच्या प्रत्येक प्रयत्नाचं नेहेमीच कौतुक वाटतं . कुठलाही स्वार्थ नसतांना आणि इतक्या जास्त प्रायर कमिटमेंट्स असतांना पण यासाठी वेळ काढणं इतकं सोपं नाही याची जाणिव आहे. त्यामुळे तुमच्या नमोल्लेखाशिवाय हे पोस्ट होणॆच शक्य नव्हते.

   दररोज ४०० लोकांनी इ मेल /फोन करुन रेडिओ मिर्चीला मराठी गाणी लावण्यास सांगायचे ही कल्पना खुप चांगली आहे. मला वाटतं की एखाद्या टिव्ही वरच्या मराठी कार्यक्रमात पण जर ही सुचना केली गेली, तर बऱ्याच लोकांपर्यंत पोहोचेल.

   याच बरोबर जे मराठी लोक रेडिओ ला फोन करतात त्यांनी पण मराठीतच बोललं तरी पण खुप फरक पडेल. नागपुरसारख्या ( जिथे हिंदी जास्त बोलली जाते ) ठिकाणी मराठी एफ एम आहे- पण मुंबई, ठाण्याला नाही…!!!

   पुर्वी उत्तरा मोने रोज सकाळी एका कुठल्याशा चॅनलवर यायची. पण आता ते पण बंद झालंय. ’राज’किय प्रेशर पण जर आणलं तर सहज शक्य आहे. मनसेला इ मेल करतोय, आणि सोबतच शिवसेनेला पण .. बघु या कोणी ऍक्शन घेतं का ते…

   अभिमान गीताचं नांव गिनिज बुक मधे येणार म्हणुन ऐकलं होतं. पण कुठल्या संदर्भात हे समजलं नाही. एखादं पोस्ट लिहा त्यावर… वाट बघतोय..

   • Mayuresh says:

    महेन्द्र काका,
    तुम्ही ‘कुठलाशा’ चॅनेलवर म्हणता आहात ते माझ्या आठवणीप्रमाणे ९४.३MHz होते. ‘Win’ असे काहीतरी त्याचे नाव होते. पहाटे ‘अस्मिता’ या नावाने मराठी गीतांचा कार्यक्रम त्यावरून प्रसारित होत असे. पण एप्रिल / मे २००४ मध्ये तो कार्यक्रम बंद झाला व नंतर ते चॅनेलच बंद झाले. आता तेथे चालू झाले आहे. असो. बाकी लेख उत्तमच आहे. तुम्हाला गुढीपाडव्यानिमित्त नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!
    आणखी एका गोष्टीकडे मी आपले लक्ष वेधून घेऊ इच्च्छितो. सांताक्रुझ येथील छत्रपति शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावरही केवळ नावाचा फलक मराठी, हिंदी व इंग्रजीत आहे. (तो ही आता बहुतेक दुरुस्तीसाठी काढला आहे.) उर्वरित विमानतळ परिसरातील सर्व दिशा-दर्शक फलक हिंदी व इंग्रजीतच आहेत. या विषयावरही एकदा लेखन करावे, ही अपेक्षा!

    • अगदी बरोबर..पहाटे अस्मिता मधे चांगली गाणी लागायची. पण एक दिवस सगळं बंद झालं. २१ तारखेला, नागपूरला जायचंय तेंव्हा बघीन 🙂

 27. मेरेकु लगता हय के इसके उप्पर दोन उपाय हय … एक तर हम लोक आइसी हिन्दी बोल के लोगो को ऐएसा त्रास देनेका की ज्याच नाव ते किंवा वो हमारे मे म्हणते हय ना .. टर उडाने का .. उनकी उनके ही श्टाईल मे.. किंवा सरळ कडक मराठी चा आग्रह धरावा .. तु तुझ्या भाषेत बोल .. मी माझ्या ..
  नाही तर इंग्रजीचे खून पाडून का होईना पण इंग्रजीत बोलु ..
  पन हिन्दी नकु रं बाबा ……..

  बास झालं !! :।

  • आयडीया भोत अच्छा हय.. अपुन वैसेच करनेका.
   खरंच हा एक मोठा प्रॉब्लेम आहे.. लवकर काही तरी करणं आवश्यक आहे..

 28. सौरभ पंची says:

  महेंद्रजी,
  तुमचा लेख वाचुन आनंद वाटला. या आणि यासारख्या अनेक विषयांवर वाचा फोडण्याची आवश्यकता आहे. कौशल यांचे कौतुक करावं तेवढं कमीच आहे. माझा प्रॉब्लेम असा झाला की राज ठाकरे काहीतरी करेल हा विश्वास अजुन पुर्ण संपलेला नाहीये. त्यांचा वैयक्तिक स्वार्थ असेल तो असेल पण महाराष्ट्राचं जर काही बरं होणार असेल तर भ्रष्ट नेतेसुद्धा परवडले या अपेक्षेने आणि आपल्या चळवळीला माझेदेखील लहानसे योगदान असावे या उद्देशाने मनसेच्या वेबसाईट वर मी राज ठाकरेंना पत्र पाठवले आहे. कोण जाणो कुठे काही फरक पडला तर ! गप्पागोष्टी या माझ्या ब्लॉगवर ते पोस्ट केलं आहे.
  जय महाराष्ट्र.

  • सौरभ
   तुमची कॉमेंट वाचुन फार बरं वाटलं. मी पण मेल पाठवला होता, अर्थात काहीच झालं नाही. असो, पण कदाचीत तुमच्या वेब साईटवर लिहिण्यामुळे एखादे वेळेस ऍक्शन घेतली जाउ शकेल.
   कौशल नेहेमीच काही तरी करण्यात बिझी असतो. मी पण पुन्हा एकदा वेब साईटवर लिहिण्याचा प्रयत्न करतो.. बघु या काय होतं ते..
   जय महाराष्ट्र.

 29. Pingback: राहुल गांधींची मुंबई भेट « काय वाटेल ते……..

 30. मला व्होडाफोन कंपनीशी बोलताना मराठी बोलणारं कुणीतरी भेटलं होतं त्यामुळे मी यावर काही बोलू शकत नाही पण मराठी माणूस म्हणजे घाटी, कामवाली, नोकर, पांडू असेच असतात, अशी ब-याच अमराठी लोकांची कल्पना आहे.

 31. DR MILIND says:

  When u call NOKIA CALL CENTER try to select MARATHI as one of my friend is working there says that there are total 4 marathi people working in that call center. If no of Marathi call increases definately they will have to appoint more no of Marathi people.

 32. SHARAD says:

  KALACH RAJNE MTNL LA PATRA LIHUN MARATHI PAHILI BHASHA DENYACHI MAGNI KELI AHE. ITHE UAE MADHYE HI ARABIC HICH PAHILI BHASHA MOBILE WAR AIKU YETE. MNS LA LAKH LAKH DHANYAWAD.
  MARATHIT BOLA, MARATHIT CHALA, MARATHIT GHALA SHIWYASHAP…

  • राजने एमटिएनएल ला लिहिलं, पण तुमच्या माहिती साठी सांगतो, एम टी एम एल ला ऑलरेडी मराठी ऑप्शन आहे. नविन काय केलं??
   दुसरं म्हणजे, व्होडाफोनबद्दल त्याला मी चार मेल पाठवले. माझ्या बऱ्याच मित्रांनी पण पाठवले. काहीच ऍक्शन नाही. जिभेवर नाचणाऱ्या सरस्वती चा धनी नुसता बोलबच्चन आहे तो. जर काही फायदा नसेल, तर काहीच करत नाही राज. माझा पुर्ण भ्रम निरास झालाय. डिव्हाइड ऍंड रुल किती दिवस चालणार??

   हिंदु मतं विभागली गेली आहेतच, आता या पुढे कॉंग्रेसचा मार्ग पक्का… उगिच संशय येतो की आर्थिक फायदा झाला असेल व्होडाफोन कडुन पार्टीला.

 33. SHARAD says:

  MARATHICHA OPTION HOTA PAN TO DUSARA HOTA. PAHILYANDA ENGRAJITCH SURUWAT KELI JATE. TYANE ATA TYANNA PAHILYANDA MARATHIT ANI MAG NANTAR ENGLISH ANI ITAR BHASHA ASE UTTAR DENYASATHI PATRA LIHILE AHE. MEE JE KAHI LIHIT AHE TE NEWS WAR AIKLELYA BATMYAMADHUN SANGAT AHE. AJUN TYA PATRACHI PRAT MEE WACHLELI NAHI. ASO. AANI MNS HI EKDAMCH SARWA GOSHTI SAMPAWUN TAKANAR NAHIT. SADHYATARI SAWKASH EK EK GOSHT KARIL YAT SHANKA NAHI.SHEWATI TYANNAHI MADHUN MADHUN LIMELIGHT MADHYE YAYALA MUDDE HAWETCH. RAHUL CHE HI TRAIN MADHUN FIRNE KINWA RAMABAI NAGAR MADHYE JAUN BABASAHEBANCHYA PUTLYALA FULE WAHNE YATHI RAJAKARANCH HOTE. PAN KAMIT KAMI MNS CHYA ANDOLANAMULE SAMANYA MANUS MARATHIWISHAYI APLYA BHASHEWISHAYI JAGRUT TARI ZALA. BAGHU KADHI MUHURTA BHETATO TYANNA VODAFONE SATHI.

 34. SHARAD says:

  KALACH MIDDAY (18-FEB, PAGE-6)LA BATMI WACHALI. VODAFONE ANI ITAR 3 COMPANYANNI MARATHIT SEWA DYAYACHE MANYA KELEY. TYANNA TASE MNS NE PATRA LIHILE HOTE. KRUPAYA NOND GHYAWI.

 35. ABHIJIT says:

  RAJ ANI UDDHAV KONIHI MARATHI MANASACHE BHALE KARNAR NAHI. SWATCHYA TUMBDYA BHARAYACHYAT YANNA… DYA NA MHANAWE MARATHI LOKANNA SWASTAT GHAR MUMBAIT. KASHAL JAIL TO MUMBAI SODUN? HYANCHE SWATCHE KITITARI BUILDER AAHET YA SHETRAT. KASHAL TYA BHAIYYANCHA RAGRAG KARTA? DENAR AHAT KA TUMHI MARATHI MANASALA AASRA? KASA RAHIL TO MUMBAIT? GHEU SHAKATO KA TO SWATCHE GHAR? 30000 PAGARHI KAMI PADTOY FLAT GHYAYALA MUMBAIT. NUSTE VODAFONEWAR MARATHI BOLUN KAY HONAR AHE? TYAPAEKSHA MARATHI MANASALA PARWADTIL ASHI GHARE DYA. BHARALYA POTI SWABHIMANACHYA GAPPA CHANGLYA WATTAT. PAN DOILA AASRA, POTALA JEWAN ANI HATALA KAM JOWAR DET NAHI TOWAR AGHADYA, YUTYA AANI HI NAVNIRMAN(?) SENA AMHALA SARAKHYACH… NUSTECH BATANCHE POPAT SAGLE… NALAYAK NETE DUSARE KAY?

  • अभिजित
   अगदी जीव तोडुन लिहिली आहे तुम्ही प्रतिक्रिया..
   माझा पण भ्रम निरास झालाय , आणि तुम्ही जे म्हणता ते पटतंय. कदाचित हिंदु व्होट फोडण्याचा प्रयत्न म्हणुन राज ला कॉंग्रेसने पाठब्ळ दिलं असावं असाही संशय येतो कधी कधी…

 36. Pingback: मराठी अभिमान गीत.. « काय वाटेल ते……..

 37. SHARAD says:

  kalpasun vodafone, aircel ani itar 4 phone companyanni marathit sewa denyas suruwat keli. This is raj effect. Marathichya muddyawar ladhnarya eka pakshala je 40 warshat jamle nahi te 3-4 warshachya pakshane karun dakhwile. ani Kaushal Inamdar mule kal ratri marathi geet ekach weli 7 FM channels ni aikwinyas suruwat keli. KAUSHAL CHE HARDIK ABHINANDAN ANI LAKH ABHAR.

  • खुप आनंद झाला. शेवटी राजकारणाबाहेर जाउन मराठीचा विचार केला त्यांनी म्हणुन. कमित कमी ५० तरी इ मेल पाठवले होते राज आणी उध्दवला. उध्दवने तर अगदी पुर्ण दुर्लक्ष केलं .. असो.. शेवटी काम तर झालं.
   आता शिल्लक आहे रेडीओ स्टेशन.. तिकडे कधी मराठी सुरु होईल ते बघायचं..

 38. DR MILIND says:

  नमस्कार मंडळी ,
  आता हे वाचा आजची लेटेस्ट बातमी
  एफएम चॅनेलनाही मनसेचा ‘आवाज’
  http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/5688071.cms

 39. Ashwini Pawar says:

  kaka, mi sadhya jya office madhe kam karte tithli paristhiti yapeksha vegli nahi. amche sir sikh ahet ani ithe staff members pan vegveglya jatiche ahet. mage ekda general meetng madhe mam ani sir ni fatva kadhla……office madhe hindi sodun baki kontihi bhasha bolaychi nahi. fqt counter chya staff cha apvad coz tithe diretly yetat na costomers. assa raag ala na khara tar teva pan kay karu kaka mi ithe navinch kamala lagli ahe ani ithe kam karnarya baki marathi lokannach marathichi kimmat nahi tithe mi ekti kay ladhnar. pn kharach……vr dilela bihari lekh khara hoil k kay ashi bhiti pn vattey!

  • अश्विनी
   हा प्रकार बऱ्याच ठिकाणी चालतो. कारण त्यांना भिती वाटत असते, की त्यांच्याबद्दल काही बोललं तर त्यांना समजणार नाही. त्यांच्या असुरक्षिततचेच्या भावनेतूनच हे घडतं.ब्लॉग वर स्वागत, आणि प्रतिक्रियेसाठी मनःपूर्वक आभार..

 40. Pingback: marathi radio | Marathi Search Results

 41. Pingback: रेडीओ मिर्ची | Marathi Search Results

 42. Pingback: मराठी रेडीओ | Marathi Search Results

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s