टॅक्सेशन…..

 

 

इनकम टॅक्स म्हणजे आपल्या सगळ्या जिव्हाळ्याचा विषय.नेमेची येतो मार्च महिना प्रमाणे डिसेंबर सुरु झाला की  इनकम टॅक्स भरायचे वेध लागतात. फेब्रुवारी , मार्च मधे पगार मिळणार की नाही- की सगळा पगार टॅक्स मधे जाणार?? याचे टेन्शन सुरु होते..

टॅक्स वाचवण्याच्या नवीन  युक्त्या घेउन एल आय सी वाले, म्युचुअल फंड वाले तुमच्या मागे लागतात , आणि एकमेकांच्या प्रपोझलस मधल्या त्रुटी सांगतात..

आम्ही कामं करायची, पैसे कमवायचे आणि ते सरकारच्या बोडख्यावर घालायचे!!!! किती संताप येतो ना इनकम टॅक्स भरताना?? मला तरी येतो….. आणि पुन्हा आपल्या पैशाची  जी उधळपट़्टी ही सरकारी धेंडं करतात ती पाहिली की मग तर अजूनच चीड येते. आपल्या टॅक्सच्या पैशातून चालणारी त्यांची चैन.. जाउ द्या…..हा एक वेगळाच विषय होईल .

खोटी बिलं लावली मेडीकलची म्हणून काही खासदारांकडून पैसे वसुल करण्यात आल्याची एक लहानशी बातमी वाचली कुठेतरी- आणि तेंव्हाच जाणवलं की आपल्यासारखे मध्यमवर्गीयच फक्त या टॅक्स नावाच्या  ब्रम्हराक्षसाला घाबरतात, नेते मंडळी  , बिझिनेस मन वगैरे तर  सगळ्या पळवाटा वापरतात..

सगळ्यात जास्त इनकम टॅक्स पेअर्स मधे आहेत, बिन भांडवली धंदा करणारे.. म्हणजे सिनेमा स्टार्स.. क्रिकेट स्टार्स… इत्यादी. क्रिकेटर्स मधे अर्थात धोनी /तेंडुलकर  आणि सिनेमाच्या जगात असलेले अक्षय कुमार आणि शाहरुख खान यांची नांव प्रामुख्याने बातम्यात झळकत असतात.

आपल्या कडे मल्टिपल टॅक्सेशन आहे. तरी बरं सेल्स टॅक्स मधे  आजकाल व्हॅट सुरु झाल्यामुळे थोडं रेगुलरायझेशन आलंय या टॅक्सेशन मधे.पूर्वी प्रत्येक स्टेट ला वेगवेगळा टॅक्स स्ट्रक्चर होतं , ते सगळं एका रांगेत आणायला म्हणून घेतलेली ही स्टेप !!  काहीही झालं तरी लास्ट पॉइंटला जो कोणी असेल त्याला टॅक्स भरावाच लागतो, त्यापासून सुटका नाही.. आणि व्यापाऱ्यांना मल्टीलेव्हलला फक्त डिफरन्स टॅक्स भरुन मॉड्व्हेट घेता येतो. हे जे काही लिहिलंय ते एक्साइझ आणि सेल्स टॅक्स बद्दल आहे.

नविन कार घेतांना आयुष्यभरासाठी रोड टॅक्स घेतला जातो आपल्या कडुन. हा टॅक्स पुढली पंधरा वर्षं रस्त्यांच्या दुरुस्ती साठी वापरावा अशी अपेक्षा असते. तरी पण   नदीवर नवीन पुल बांधाला गेला की ,त्यासाठी टोल टॅक्सचा बुथ ताबडतोब उभा रहातो. याला पुन्हा एक सुंदर नाव आहे- ’बिओटी’… म्हणजे बिल्ड, ओन , आणि तुमचे पैसे वसुल झाले की ट्रान्सफर करा सरकारला.

आता जर बिओटी या तत्वावर जर  नवीन कामं होणार असतील तर आपण टॅक्स कसला भरतो?? बरं हे जाउ द्या.. पण समजा  एकदा एखाद्या कंपनीला कंत्राट दिलं की तुम्ही बिओटी तत्वावर रस्ता बनवा, की मग त्या कंपनीच्या मालकाच्या पुढच्या सात पिढ्या त्या बनवलेल्या रस्त्याचे पैसे वसूल करित रहाते.

त्या रस्त्याच्या डेव्हलपमेंटचे पैसे वसुल झाले की टोल बंद करावा अशी अपेक्षा असते.. पण तसं होत नाही…….!!!!! आणि हा जिझीया कर नेहेमी करता सुरु रहातो. पैसे वसूल झाले आणि  सरकारला  रस्ता  किंवा ब्रिज ट्रान्स्फर करण्याची वेळ आली की रस्ता पुन्हा खराब झालेला असतो… आणि मग पुन्हा बीओटी चं  नवीन टेंडर निघतं..  .असो.. विषयांतर होतंय…. हे पोस्ट मुख्यत्वे करुन इनकम टॅक्स वर आहे.

बरेचदा तर अशीही वेळ येते की वर्षा अखेर तुम्ही जेंव्हा इनकम  टॅक्स डिडक्टेड ऍट सोअर्स ची अमाउंट पहाता तेंव्हा खरं तर भोवळच येते. पण आपल्या सारख्या ्नोकरी पेशातल्या माणसांना इनकम सगळं व्हाईट असल्यामुळे लपवता येत नाही!!!!!आणि टॅक्स तरी किती प्रकारचे.. परचेस टॅक्स, सेल्स टॅक्स, एंट्री टॅक्स, ऑकट्रॉय, इंटरस्टेट सेल्स टॅक्स..  म्हणजे तुम्ही काहीही करा.. टॅक्स आहेच भरायचा…

इनकम टॅक्स भरण्यासाठी पुर्वी तो सरल फॉर्म होता , त्या पुर्वी चार पानांचा फॉर्म होता. तो समजून घ्यायलाच बराच वेळ लागायचा,पण दर वर्षी ह्या रिटर्न्स ची पध्दत बदलते..तुम्हाला थोडं फार समजू लागलं की लगेच नवीन फॉर्म येतो टॅक्सेशनचा. आता या वर्षी तर ऑन लाइन फॉर्म भरायचा पण ऑप्शन दिलेला आहे.

आपल्याला या वर्षी किती टॅक्स भरावा लागेल हे पण कॅल्क्युलेट करता येत नाही. वर्ष झालं की ५०० रुपये देऊन कोणाकडून तरी तो फॉर्म भरुन घ्यायचा – हेच आपण करतो..

इथे एक एक्सेल शिट आहे. ती शिट डाउन लोड करा, आणि त्यामधे सगळे आकडे भरा.. तुमची टॅक्स लायब्लिटी कॅल्क्युलेट केली जाऊ शकते…..अगदी कुठल्याही टॅक्स कन्सल्टंटची मदत न घेता…. अतिशय उपयोगी एक्सेल शिट आहे ही….बघा किती टॅक्स भरावा लागेल या वर्षी ते…… !!!!

About महेंद्र

माझा ब्लॉग :- http://kayvatelte.com
This entry was posted in कार्पोरेट वर्ल्ड. Bookmark the permalink.

14 Responses to टॅक्सेशन…..

 1. आनंद पत्रे says:

  एक्सेल शीट करिता धन्यवाद. मला एक गोष्ट नाही कळत, की मला पगार टॅक्स भरल्यानंतर पगार मिळतो, त्या पैश्यानी जर मी काही घेतले तर मला त्यावर सुद्धा का टॅक्स भरावा लागावा. चक्रवाढ टॅक्स… 😦
  छोट्या छोट्या शहरात तर रस्ता खराब असताना सुध्दा रोड टोल द्यावा लागतो…

  • आनंद
   हेच तर ते अवघड जागेवरचं दुखण आहे.. टॅक्स वर पुन्हा टॅक्स. ही सायकल चालतच रहाणार…या ’टॊळ’ वाल्यांना आवरलं पाहिजे आता. टोल नाही तर टॊळ टॅक्स म्हणतो मी त्याला.

 2. bhaanasa says:

  ह्म्म्म्म…..इथे तर हे टॆक्स प्रकरण फारच कठीण आहे. पळवाटांनाही फारशी जागा नाही…..:( बाकी मी टॆक्सेशनमध्येच नोकरी केल्याने उघड बोंबलता ही येईना आणि वैताग तर आहेच. शिवाय मेले किती आणि कुठले कुठले हे कर भरत राहायचे…वर हे कष्टाने कमवलेले पैसे कुठे व कसे गडप होतात याने जीव जातोय ते वेगळेच. खरे आहे आपण मध्यमवर्गीयच या सगळ्या बडग्यांना घाबरतो बाकी लोक बिनधास्त….. असो. दुखती रग हैं ……क्या करे. संताप करून घेत टेक्स भरायचा झालं.

  • ती एक्सेल शिट एक चार्टर्ड अकाउंटंट मित्राने पाठवली.. म्हणुन इथे पोस्ट करता आली. आमच्या सारख्यांना खुप डिफिक्ल्ट होतं टॅक्स कॅलक्युलेशन… ह्या शिट मधे फिगर्स भरल्या की टॅक्स कॅल्क्युलेट होतो..सगळे फॉर्मुले लोड केलेले आहेत…
   संताप करुन टॅक्स भरत बसायचं झालं…

 3. ravindra says:

  सरकार चालविण्यासाठी टेक्स भरणे अपरिहार्य असते. पण त्याचा उपयोग किती होतो हा एक विवादाचा विषय आहे. सरकारचे असे आहे की “सारी उंगली घी मे और सर कढाई मे”. असो. माझ्या मते इन्कम टेक्स भरल्यावर इतर इनडायरेक्ट टेक्स्ची गरज ती काय. कुठला तरी एक टेक्स भरून घेणे योग्य. इन्कम टेक्स किंवा इतर इनडायरेक्ट टेक्स. मला वाटते इन्कम टेक्स बंद करून फक्त इनडायरेक्ट टेक्स भरण्याची व्यवस्था योग्य होईल. तो ही एकच मात्र तो कंपल्सरी भरला गेला पाहिजे. अशी व्यवस्था केली तर सरकारला भरभरून इन्कम मिळेल. याने टेक्स चोरी थांबेल. लोकांना डोकेदुखी कमी होईल व पूर्ण पगार हातात येतो याचे समाधान ही होईल. वस्तू विकत घेतांना टेक्स भरावा लागतो याचे समाधान ही होईल. व्यवस्था संगणकीय असली पाहिजे. देशात कोणत्याही दुकानातून वस्तू विकली जातांना त्यावर टेक्स ऑनलाईन कट व्हायला पाहिजे. जेणेकरून चोरी होणार नाही. मी जपान मध्ये अशी व्यवस्था बघितली आहे. साधा पेन घेतला, सिगरेट घेतली तरी टेक्स कापला जायचा. असे केल्यास इतर बऱ्याच गोस्ठींना आळा बसेल ( ही माझी वैयक्तिक संकल्पना आहे. याने कोणाचे मन दुखावल्यास मी आधीच त्याची क्षमा मागूनघेतो.) 🙂

  • रविंद्र
   तुमचं मत अगदी रास्त आहे. सरकार चालवायचं, तर टॅक्स ही संकल्पना हवीच.. बऱ्याच प्रमाणात व्हॅट मुळे, आणि एक्साईज मुळे हे शक्य होतंय. एक्साइझ वर पण मॉडव्हॅट मिळतो. टॅक्स फक्त नोकरदरांनी भरायचा असं झालंय. धंदा वाले तर बऱ्याच मार्गाने टॅक्स ची चोरी करतात..
   फर्स्ट पॉंईंट्ला टॅक्स , नंतर व्हॅल्यु ऍडिशन टॅक्स.. असं करित गेलं तर पुढे शेवटल्या पॉईंट पर्यंत बरोबर टॅक्स भरला जाउ शकतो. चिदंबरम ने केलेलीनविन सिस्टीम खुप चांगली आहे असे वाटते मला ( व्हॅट ची)

 4. Abhijit says:

  माफ करा पण थोडं विनोदी झालं आहे. Excel शिट /शीट. 🙂

  • अभिजित
   खरंच , लिहितांना माझ्या लक्षात आलं होतं, पण पर्यायी शब्द आठवला नाही, म्हणुन तोच ठेवला… 🙂

 5. टॅक्स… डोक्यात तिडिक भरणारे जे विषय आहेत त्यामध्ये टॅक्स हा बर्‍यापैकी वरच्या क्रमांकावर आहे. कितीही अप्रिय, नकोसा असला तरी कडवट, वाकड्या तोंडाने का होईना भरावा लागतो. आणि त्याचा उपयोग काय? घंटा!!! टॅक्स मध्ये जितका पैसा सरकार दरबार जमा होतो तो देशाच्या आणि जनतेच्या किती कामी येतो हे सांगायलाच नको. टॅक्स भरायला ना नाही पण जेंव्हा ह्या पैश्यातून विकासकामा ऐवजी मंत्री संत्री लोकांचे भत्ते भरले जातात हा विचार मनात येतो तेंव्हा दिमाग खराब होतो. साला इथे नोकरी करून टॅक्समध्ये फुकट पैसा घालून पदरात काहीच सुविधा पडणार नसतील तर बाहेर च्या देशात काम करून तिकडे टॅक्स भरलेला बरा. निदान सामान्य माणसापर्यंत सुविधा तरी पोचतात. असो… ह्या वर वेगळी पोस्ट होईल. जाता जाता टॅक्स वर चुटका.

  I went to pay my tax with smile, but they accepts only cash!!!

  • सिध्दार्थ
   अगदी हेच माझं पण होतं, या मंत्र्यांचे परदेश दौरे.. कशाला, तर म्हणे तिकडे कशी सिस्टीम आहे हे पहायला..त्या मंत्री, ब्युरोक्रॅट्स बद्दल तर बोलायलाच नको. स्वातंत्र्यानंतर आज ६० वर्ष हओऊन गेले तरीही आजही कलेक्टर , डेप्युटी कलेक्टर्स ची लाइफ स्टाइल बघा… एखाद्या कंपनिचा एम डी पण झक मारतो त्यांच्या पुढे.. ब्रिटीशांनी मानेवर ठेवलेली “साहेबगिरीची “जोखडं कधी भिरकावणार कोण जाणे..

 6. sureshpethe says:

  ” पासष्ट होऊन गेलीत ना ? यंदा पासून तुमचा रिटर्न भरायचा नाही ! ” असे माझ्या टॅक्स कन्सलटंटने गेल्या वर्षी सांगीतल्यापासून मी हुश्श केलंय !

 7. हेरंब ओक says:

  हो ना. हे tax प्रकरण म्हणजे एक वैताग आहे. त्यापेक्षा गल्फ कंट्रीज मध्ये बरं आहे. tax बिक्स चि भानगड नाही. सगळाच्या सगळा पगार आपला 🙂

  • आता मार्च महिना जवळ आला की उगिच टेन्शन येतं.. आपल्या कडे ते फॉर्म्स पण इतके किचकट आहेत की भरतांना वैताग येतो. शेवटी कन्सलटंट कडुन भरुन घ्यावा लागतो.

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s