ओठातलं.. मनातलं…

 

तुझं माझं जमेना, तुझ्या वाचुन करमेना...

 

ऑक्सफर्ड डिक्शनरी एक नवीन डिक्शनरी काढण्याचा मार्गावर आहे. असं लक्षात आलंय की नवीन लग्न झालेल्या पुरुषांना ह्या स्त्रियांच्या शब्दांचे अर्थ निटसे कळत नाहीत त्यामुळे   पुरुषांचा  नेहेमीच गोंधळ होतो.. ह्या डिक्शनरीचा  वापर केल्याने स्त्रियांच्या उपयोगातल्या नेहेमीच्या शब्दांचा नीट अर्थ सगळ्या पुरुषांना समजेल, आणि गैरसमज ,तसेच नवीन दांपत्यांच्यामधली भांडणं दुर होतील   असे तज्ञांचे मत आहे.

यावर काही लोकांचं म्हणणं असंही होतं की काही एक फरक पडत नाही..समजलं काय किंवा न समजलं काय.. शेवटी पुरुषांना करावं तर स्त्रियांच्या   मना सारखच  ना?? तरी पण ऑक्सफर्ड डिक्शनरीच्या वतीने सगळ्यांना जर काही असे शब्द माहीती असतील, की ज्यांचा पुरुषाने वापरल्यास  ’लौकिक अर्थ’ असतो, पण स्त्रियांनी वापरल्यावर ’गर्भीत अर्थ’ असतो.. असे शब्द कृपया कॉमेंट्समधे लिहावेत, म्हणजे  ऑक्सफोर्डला फॉर्वर्ड करता येतील- गर्भित अर्थाच्या डिक्शनरी साठी. एक इ मेल आला होता, त्यावरुन सुचलं हे पोस्ट.

नीटसं कळलं नाही कां?? काय म्हणणं आहे माझं ते?  इथे एक लहानसा अनुभव लिहितो, म्हणजे लक्षात येईल. आम्ही ( मी , सौ. मुली) डिमार्टला किराणा सामान (म्हणजे आपली ग्रोसरी हो)  घ्यायला संध्याकाळी गेलॊ होतो. आता सगळं महिन्याभराच सामान घेउन , नंतर रांगेत उभं राहुन पैसे भरायला रात्रीचे ८-३० झाले म्हंटल, आपण आता हॉटेलमधेच जेवायला जायचं कां?? तर यावर उत्तर  होतं.. नको.. मी घरी गेल्यावर छान (?) गरम खिचडी लावते …आता जर तुम्हाला  खिचडी आवडत नाही हे माहिती आहे , म्हणजे याचा गर्भितार्थ  हो असा घ्यायचा आणी सरळ हॉटेलसमोर गाडी पार्क करायची. डिक्शनरीतर्ला पहिला शब्द:- नको = हो  आणि हो म्हणजे नाही

दुकानात गेल्यावर, अहो आपल्याला नवीन चादरी  घ्यायच्या आहेत  ना?? आता चादरी, नवीन काय , किंवा जुन्या काय, तुम्हाला काय फरक पडतो? पण  ‘आपल्याला’  हा शब्द पहा किती चपखल पणे वापरलेला आहे.. याचा अर्थ घ्यायचा असा… (आपल्याला = तिला ) म्हणजे तिला नवीन चादरी घ्यायच्या आहेत, आणि बेटर यु से येस.. ..हो ’ आपल्याला’ घ्यायच्याय  ..  🙂

एखाद्या विषयावर तुम्ही सगळ्या नातेवाईकां समोर/ किंवा मित्र मैत्रीणींमधे जर  काही  तरी बोललात,  की जे बोलायला नको होतं, आणि …. ’आपण एकदा यावर व्यवस्थित बोललं पाहिजे’.. असं तिने कधी म्हट्ल तर याचा अर्थ होतो की थोडा थांब, पाहुणे गेले की तू आहेस आणि मी आहे….माझ्या मनात बरंच काही खदखदतय.. आणि तु ज्वालामुखी फुटणार आहे याच्या तयारीत रहा..  खूप कम्प्लेंट्स आहेत माझ्या- य़ू बेटर बी प्रिपेअर्ड…  🙂

कधी भांडण झालं नेमकं, तुमचं बरोबर आहे, म्हणून तुम्ही अगदी तावातावाने भांडताय, आणि नंतर हत्यार टाकल्या प्रमाणे पण आवाजात जरब आणून जेंव्हा ती  “बरं…. मी सॉरी… आता सॉरी म्हंटलं नां… बस्स.. विषय संपला….. असं म्हणते तेंव्हा याचा अर्थ ’ बच्चमजी मला कोंडीत पकडतोस काय? यु विल बी सॉरी फॉर   धीस, आय विल सी दॅट यु विल रिपेंट धीस….   असा घ्यायचा असतो..

एखाद्या वेळेस दुकानात गेल्यावर तिने पसंत केलेली ती मातकट रंगाची साडी नाकारून तुम्ही दुसरी  एखादी सुंदर ( तुमच्या मते )  साडी ( कधी नव्हे ते.. ) पसंत करता.. आणि तुला ही छान दिसेल गं, घेउन टाकू या आपण ही.. असं मोठ्या प्रेमाने म्हणता, पण तेवढ्यात तिच्या चेहेऱ्यावरचे निर्विकार भाव पाहुन तुम्ही दुसरं काही म्हणण्यापूर्वी..  ’छान आहे..तुमची आवड ’ असं  म्हंटलं की मग समजायचं की तिला ही साडी बाईसाहेबांना आवडलेली नाही.. 🙂 आणि मुकाट्याने खाली टाकुन द्यायची…

बरेचदा तुम्ही तिच्या बॉडी लॅंग्वेज कडे दुर्लक्ष करुन,किंवा लक्षात न आल्यामुळे   ’साडी पॅक करो’ म्हणुन दुकानदाराला सांगता, तेंव्हा जर तीच पुटपुटणं ऐकू आलं की  हो….. ’घेउन टाका तुम्हाला आवडली असेल तर” ….. की सरळ दुकानदाराला रुको भैय्या, ये नई मंगताय… म्हणून सांगायचं.. कारण या घेउन टाका ्ना= चा अर्थ होतो की मला ही साडी नकोय.. आणि तुम्ही घेतली तरी मी  कधीच नेसणार नाही..  थोडक्यात गो अहेड , घेउन टाक/ करुन टाक = माझी इच्छा नाही तू हे करावंस अशी

दिवसभर काम करुन आल्यावर रात्री आंघोळ करायचा कंटाळा आला, आणि तिने रात्री पलंगावर पडल्या पडल्या कॉमेंट टाकली.. की तु कित्ती मॅनली आहेस रे.. म्हणजे याचा अर्थ.. असा की तुझ्या घामाचा खुप वास येतोय.. उठ, जा , आणि आंघोळ करुन ये. जमलंच तर दाढी पण करुन ये…   🙂

कधी कधी रात्री लाइट ऑफ कर रे.. बी रोमॅंटीक.. असं म्हंटलं, की समजायचं, की अरे मी कित्ती लठठ झाली आहे ना, मला अनिझी वाटतंय लाईट सुरु असला की .. .. म्हणून लाईट ऑफ कर..

जनरल घराबद्दल तर बरेचदा निरुपद्रवी वाटणाऱ्या कॉमेंट्स या खूप महत्वाच्या असतात.  जसे ह्या फ्लॅटला बाल्कनी हवी होती बेडरुमला, किंवा किचन थोडं कम्फर्टेबल वाटत नाही, किंवा हा फ्लॅट चांगला आहेच रे…. पण इथे कपडे वाळत घालायला जागा नाही व्यवस्थित… या सगळ्यांचा अर्थ  म्हणजे मला ह्या घराचा कंटाळा आलाय, आणि आता नवीन घर बघणं सुरु कर..घर बदलू या आपण आता.

रात्री तुम्ही मस्तपैकी गाढ झोपलेले आहात. मस्त पैकी घोरणं सुरु आहे. तेवढ्यात.. ” अहो.. मला कसला तरी आवाज ऐकू येतोय … जरा बघा नां दार उघडून … ” याचा अर्थ, मला अजिबात झोप येत नाही, आणि तु झोपला आहेस??  चल उठ आणि मग आपण गप्पा मारु या.. आणि हवं तर…………..

बरेचदा तुम्ही नुसते सहज बसलेले असता, तेवढ्यात ’तु खरंच सांग , तुला मी आवडते ना? किंवा तुझं माझ्यावर प्रेम आहे ना?? असं वाक्य कानावर पडलं, की आपलं पैशाचं पाकीट तपासून पहा.. किती आहेत शिल्लक ते.. आणि बॅंक बॅलन्स आठवण्याचा प्रयत्न करा. कारण याचा अर्थ होतो की मी तुला  खर्चात पाडण्याचा प्लॅन केलेला आहे, किंवा काहीतरी खूप महागाच विकत घेउन मागणार आहे.

प्रेमा बद्दल तर नेहेमीच बोलणं सुरु असतं.. मग एखाद्या वेळेस.. तुझं माझ्यावर किती प्रेम आहे??  ( वरच्या पॅरा मधे तुझं  माझ्यावर प्रेम आहे कां? हे वाक्य होतं- फरक लक्षात घ्या) असं क्वांटीटीव्ह वाक्य ऐकु आलं की समजावं तिने नक्कीच तुम्हाला न आवडणारी कुठली तरी गोष्ट केलेली आहे… 🙂 मानसिक तयारीत रहा, की आता ती काय बॉम्ब फोडते ते. ….  म्हणजे सासुरवाडीचे लोकं सह कुटूंब सह परिवार आणि इष्ट मित्रांसह तुमच्या एल टी सी च्या पिरियड मधे बोला्वून ठेवले आहेत,  आणि पुर्ण एल टी सी त्यांच्या बरोबर घालवायची आहे… असे काही तरी पण असू शकते.. 😛

तुम्ही एखाद्या गोष्टीवर डिस्कस करताय तिचा मुद्दा तुम्हाला अजिबात पटलेला नाही, म्हणून तुम्ही आपला मुद्दा पुन्हा जोर लावून मांडताय, तुम्हाला समजतंय की तुम्ही जिंकताय वाद विवादामधे… तेवढ्यात तिने जर तुम्ही नीट कम्युनिकेट करा हो, तुम्हाला काय म्हणायचंय ते.. असं म्हंटलं  म्हणजे  याचा अर्थ ” मी काय म्हणते ते नीट ऐका आणि सरळ सरळ वाद विवाद न करता मान्य करा:.. असा घ्यायचा असतो.

संध्याकाळची वेळ.. तुम्ही तयार होऊन सोफ्यावर तिच्या तयार होण्याची वाट पहाताय. तेवढ्यात… माझं एकाच मिनिटात होतंय बरं कां.. असं म्हणाली की समजा.. बहुत देर है और… लॅप टॉप सुरु करा आणि टायपा एखादं पोस्ट .. ब्लॉग साठी.. हा हा हा.. 🙂
चला, झाली ती तयार.. मी येतो आता… 🙂

(हे फक्त एक विनोदी पोस्ट म्हणून लिहिलंय , कोणाला दुखवण्याचा उद्देश नाही)

About महेंद्र

माझा ब्लॉग :- http://kayvatelte.com
This entry was posted in विनोदी and tagged , , , , , , . Bookmark the permalink.

39 Responses to ओठातलं.. मनातलं…

 1. आनंद पत्रे says:

  बापरे! प्रकरण भलतंच अवघड असतंय!
  आमच्यावर ही डिक्शनरी घेण्याची पाळी लवकरच येणारेय, बुकिंग करून ठेवतो.
  कसलं सही लिहिलंय…. 🙂

  लेख झक्कास जमलाय, चोरांपासून सावध असावे….

  • आनंद
   अवघड नाही फारसं.. फक्त जरा भाषा शिकुन घ्या त्यांची म्हणजे खरं काय म्हणणंआहे ते समजेल. डीक्शनरी तर मला पण लागेल. २० वर्ष होऊन पण समजत नाही बरेचदा….. 😀

 2. Sagar says:

  Kaka
  Solid zalay lekh…..An var mahtlyapramane Chorapsun savadh raha…..Baki lekh lai bhari zalay…..

 3. सचिन says:

  काका, शिकवणी चालु करा तुम्ही.
  आम्हाला नितांत गरज आहे या शिकवण्यांची. नाहितर छोट पुस्तक लिहा याविषयावर.

  • सचिन
   यात कॉमेंट्स मधे अजुनही काही शब्द अनुभवी लोकं ऍड करतिलच…
   आणि छोटं पुस्तक नाही , तर पुर्ण ग्रंथ होइल याच्यावर..

 4. अनिकेत वैद्य says:

  काका,
  नुकतेच लग्न झालय माझ. बर्याच शब्दांचा अनुभव घेतोय. शब्दांचे नवि्न aartha कळतायत.

  बरीच कसरत करावी लागते बरेच वेळा.

  i am facing some problems while typing with baraha. can’t type words with “h” in it. for single back space it is considering double back space.

  आपला,

  अनिकेत वैद्य.

  • अनिकेत
   अरे २० वर्ष झाले पण मला अजुनही बरेचदा गर्भितार्थ कळत नाही .. मला तर वाटतं की प्रत्येकाला आयुष्यभर शिकत रहावं लागणार आहे ही भाषा… 😀

 5. हा हा सही…

  नवरा बायको भांडणावरुन एक विनोद आठवला. एक लग्न झालेला माणूस आपल्या मित्राला सांगत असतो “आमच्यात कितीही शुल्लक किंवा कडाक्याचे भांडण झाले तरी शेवटचा शब्द माझा असतो आणि तो म्हणजे ‘तुला वाट्टेल ते कर'”!!!

  बाकी लेख नेहमीप्रमाणे मस्त, खुसखुशीत. पुढील आयुष्यात उपयोगी पडेल 🙂

  • मस्त आहे विनोद.. आधी माहिती असता तर पोस्ट मधे वापरला असता 🙂
   आज सौ. घरी नाही म्हणुन असं काही लिहिण्याचं सुचलं.. नाही तर माझी काय हिम्मत आहे असं काही लिहायची??? 🙂

 6. Suhas Zele says:

  ग्रंथ जरा लवकर लिहा प्लीज़…हम कतार मे है 😀
  खूप छान झालीय पोस्ट नेहमीप्रमाणेच..Exceptional

  • सुहार
   या प्रोजेक्टमधे (ग्रंथ लिहिण्याच्या) बऱ्याच लोकांची मदत लागेल. अनुभवी, आणि अननुभवी लोकांच्या कॉमेंट्सची.. आपोआपच इथे ग्रंथ तयार होईल.. 🙂

 7. anukshre says:

  सौ घरी नाही म्हणून असे लिहिले ह्यातच सुखी संसाराच्या ग्रंथाची शेवटची ओळ झाली. बाकी आमच्या वाहिनी हुशार आहेत हे मला कळले होतेच.
  कारण त्या तुमच्याशी संसार करीत आहेत….तुम्ही पुरुष ग्रंथच शोधत बसा…..संसाराला सुरवात होवून पन्नास वर्ष झाली तरी तुमचे शोध कार्य
  सुरूच राहणार कारण अनुभवाप्रमाणे अजून शब्दाची भर पडतच राहणार… बेस्ट ऑफ लक पुरुषांना!!!!!
  लग्नाला ५० पेक्षा जास्त वर्ष उलटून गेल्यामुळे माझ्या ओळखीच्या एक आज्जी नजरेत आजोबाना निरोप देतात…

  लेख फक्कड!!!!l

  • 🙂 अहो आज एकटाच सकाळी बसलो होतो, मग लिहायला सुरुवात केली आणि हे तयार झालं. शोध कार्य तर आयुष्यभर सुरु रहाणार. नविन शब्दांची त्यात भर पडणार…. मी इथे वाट पहातोय, इतर पुरुष कुठले शब्द, वाक्य ऍड करतात ते….
   मी तर अगदी ’नजरेच्या’ धाकातच आहे.. नजरे वरुनच बरंचसं कळतं हल्ली.. शब्दांची पण गरज पडत नाही.. 😀

 8. संजिव सिद्धुल says:

  काका, एकदम झक्कास!
  शेवट तर मस्तच!!
  आम्ही अनअनुभवी त्यामुळे ह्यात काही भर घालू शकणार नाही.
  पण सावध केल्या बद्दल धन्यवाद. 🙂

 9. आतापर्यंतच्या कमेंट्स पाहता, महिलांनी सामज्यास्यांनं घ्यावं – @अनुक्षरे! 🙂
  पुरुष मित्रांसाठी – अनुभव हीच खात्री!
  सगळया मुद्द्यांशी अगदी निर्विवाद सहमत!

 10. ravindra says:

  महेंद्र
  आजची पोस्ट एकदम भारी झाली आहे बर का! कस सुचत हो हे? हो लवकरच एक शिकवणी क्लास काढा म्हणजे तरुणांना उपयोगी पडेल. आजच्या पोस्ट वर बहुतेक तरुण मंडळींच्याच कोमेंत्स आहेत. आणि हो लक्ष असू द्या ह्या लेख कडे नाही तर पुनः …… असो बायका म्हटलं कि आनंदी आनंदच. डिक्शनरीच तुम्हालाच जमेल बा. 🙂

  • रविंद्र
   अहो असंच सहज काहीतरी लिहिलं झालं.. एकटा होतो घरी.. मग डॊकं असं तिरकंच चालणार नां? 🙂 डिक्शनरी काढायची तर तुमच्या सारख्या मातब्बर लोकांची मतं पण हवित नां… अहो टाका ना काही सुटलेले शब्दं इथे.. 🙂

 11. ravindra says:

  आणि हो बायकांपासून जरा सावध बर का नाही तर एखादा मोर्चा येईल………..

 12. Pravin says:

  अजुन काही
  १. स्वता:च्या अकलेने (म्हणजे तुमच्या आवडीचे) काही सर्प्राइज़ गिफ्ट देऊ नका. सर्प्राइज़ गिफ्ट द्यायचेच असेल तिने बर्‍याच दिवसांपूर्वी काही सांगितलेली गोष्ट (लक्षात ठेवून) आणून द्या.
  २. शॉपिंग ला गेल्यावर (विचारल तरच) ड्रेस, शूस बद्दल (चांगलेच) ओपीनियन द्या. लक्षात ठेवा की शॉपिंग ला तुमचा रोल ड्रायव्हर आणि ओझे वाहणारा बैल एवढाच आहे (गाढव फारच वाईट दिसते म्हणून वापरले नाही).
  ३. “मी पूर्वी पेक्षा जाड झाले का रे?” या प्रश्नाला (काळजावर दगड ठेवून) नाही असे उत्तर द्या.
  ४. कपाट तिच्या कपड्यांनी उतू चाललेले असले तरी पार्टी साठी वा कुठल्याही समारंभासाठी ड्रेस नाही म्हटल्यावर चुपचाप नवीन ड्रेस घेऊन द्या. मॅचिंग चपला वा तत्सम वस्तूंसाठी सुद्धा हा मुद्दा लागू. इतके कपडे असताना अजून नवीन ड्रेस काय करायचा आहे असे चुकूनही म्हणू नका.
  ५. आणि कृपा करून ह्या पोस्ट्ची लिंक माझ्या बायकोला फॉर्वर्ड करू नका 🙂

  • प्रविण
   धन्यवाद. खुप मोलाची भर घातली या प्रोजेक्ट मधे. तुम्हा सगळ्यांच्या सहकार्याशिवाय हे प्रोजेक्ट पुर्ण होणं शक्यच नाही.. तुमचे उपकार ऑक्सफर्ड वाले कधीच विसरणार नाहीत..

 13. bhaanasa says:

  महेंद्र तुझा नाताळ -३१ डिसेंबर एकदम धोक्यात आहेत बर का….. हा हाहा….. लेख मस्तच झालाय. बाकी Between the lines …… मुरडलेले नाक….. आणि अचानक भरलेले डोळे राहीले ना. 🙂

  • हो.. ते राहिलंच.. अचानक भरलेले डोळे म्हणजे हुकुमी एक्का !!! मुरडलेल्या नाकाकडे न पाहिल्यासारखं केलं जाउ शकतं…. 😛
   तशी खात्री आहेच की ती वाचणार नाही याची… म्हणुन तर हिम्मत करतो लिहीण्याची. ती कधी इ मेल पण चेक करित नाही.. बाकी तर दुर राहिलं, उगिच नावाला एक अकाउंट उघडुन ठेवलाय झालं… 😀

 14. sahajach says:

  महेंद्रजी सगळे मुद्दे पटले…….:) खरं मत हवं असेल तर अमितला कमेंट द्यायला सांगते…………………काल आरशासमोर उभे होते मी नुसते आणि तो गौरीने हाक मारली म्हणून निघाला…त्याला म्हटलं अरे थांब ना जरा तर म्हणे व्यवस्थित आहे तू अजुनही काहीही सुटलेली नाहीस…अजिबात वाटतं नाही दोन मुलं झालीयेत……………:D….

  मला वाटतय तो आणि तुम्ही माझ्या नकळत एकमेकांशी बोलता या विषयावर!!!!किंवा दोघेही ए़क्स्पर्ट………….हेहे……

  मस्त लिहीलय एकदम……..

  • घरॊ घरी मातीच्याच चुली.. 🙂
   चालायचंच.अमित आणि मी दोघं बोललो नाही तरी-
   सगळ्याचं पुरुषांचं एकमत होइल यावर…
   कारण प्रत्येकच जण यातुन गेलेला असतो कधी न कधी तरी… 😀 तसं या पोस्टमधलं बरंचसं काल्पनिक आहे. खरं म्हणजे आज अशोक चक्रधरच्या कविता वाचल्या त्याचा परिणाम आहे हा..

 15. Aparna says:

  हा हा हा….आजकाल “मला सांग मग यावर तू काय म्हणतेस?” असं उत्तर येत तेव्हा त्याचा अर्थ तू काय ठरवशील तेच होणार मी उगाच हो किंवा नाही करत कशाला वेळ घालवु असा होतो हे आमच्याही लक्षात येतं ….:)

  तुमची बायको पोस्ट वाचत नाही हे ओपन सिक्रेट आहे ना त्यामुळे फ़ावलंय नाहीतर नव्या वर्षाची धुलाई आधीच झाली असती…..:))

  • हो ना.. नाहीतर माझी काय बिशाद आहे इथे असं काही लिहायची..
   “हं, मग तुला काय वाटतं? असं वाक्य म्हणजे पुरुषांनी हत्यारं टाकल्याची निशाणी….. !!!

 16. १००% बरोबर. मस्त झालाय लेख. नव-याने ही डिक्शनरी तोंडपाठ केलीय, गेल्या सहा महिन्यात 🙂 त्यामुळे मी निश्चिंऽऽत आहे.

 17. sureshpethe says:

  (हे फक्त एक विनोदी पोस्ट म्हणुन लिहिलंय , कोणाला दुखवण्याचा उद्देश नाही)
  .
  .
  आलं लक्षात !!

  • 🙂 🙂 लहानसं हास्य..बस इतकंच..केवळ तेवढ्यासाठीच हे सगळं.. बस..वाचल्यावर एक लहानसं हास्य आलं ना चेहेऱ्यावर.. तेवढीच अपेक्षा होती..

 18. “डिक्शनरीतर्ला पहिला शब्द:- नको = हो आणि हो म्हणजे नाही”

  एकदम perfect. एवढं एकच तंत्र जरी लक्षात आलं ना पुरुषांच्या तरी निभावलं असं समजावं.
  लेख मस्त झालाय. Too Good.

  – अमृता

  • खुप कन्फ्युजन असत्तं. लौकर शिकलेलं बरं.. म्हणुन इथे हे पोस्ट टाकलंय.. २०+ वर्षांचा अनुभव, + मित्रांचे अनुभव… 🙂

 19. Piyu says:

  माझ्या लग्नाला तीनच महिने झालेत.. अजून हे सगळे इशारे मला माहितच नव्हते.. आता वापरायला हवेत… 🙂 🙂

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s