असंही असतं..

वाण्याकडून किराणा आणण्याचे दिवस कधीच संपले. लहानपणी  बरं होतं, वाण्याकडे यादी नेऊन टाकली की तो आपला पेपरच्या पुड्यांमधे सगळा किराणा बांधून द्यायचा. तेल , तुप साठी डबे न्यावे लागायचे. पण प्लास्टीक ,आणि ट्रेट्रपॅकने तर क्रांतीच केली… आजकाल तर वाण्याकडे जाउन किराणा आणणं बंदच झालंय…

आपण जेंव्हा डिमार्ट, बिग बझार वगैरे ठिकाणी किराणा सामान आणायला जातो, तेंव्हा फक्त समोरच्या शेल्फ वरचं सामान काढून ट्रॉली मधे भरतो. सामान घेतांना पण शक्यतो कुठल्या शॅंपुच्या बाटली सोबत टिक्सो टेपने दुसरी बाटली लावलेली आहे, किंवा केचप च्या मोठ्या बाटली बरोबर कुठली लहान बाटली सोबत आहे का इकडेच थोडं जास्त लक्ष असतं आपलं..  ( माझं तरी असतं बॉ…. )

ही अशी अट्रॅस्क्शन्स तर नेहेमीच आपल्याला खुणावत असतात. पण ह्या अशा वस्तु घेतांना आपण एक गोष्ट विसरतो, की जगामधे काहीच फुकट मिळत नाही, आणि जेंव्हा काही फुकट मिळतंय असं दिसलं, तर त्यामधे नक्कीच कांहीतरी काळं बेरं आहे असं समजायला हरकत नाही.

मागच्याच आठवड्यात आम्ही जेंव्हा डिमार्ट ला गेलो, तेंव्हा हेंझ च्या केचप वर एकावर एक बाटली फ्री होती. मला तर बारीक अक्षरं दिसत नाहीत, आणि चष्मा फक्त रिडींगचा असल्याने फक्त वाचतानाच लावतो. धाकट्या मुलीला मात्र प्रत्येक लेबल बघायची सवय आहे. (टिव्ही वर नेहेमी जाहिरात असते, म्हणून.. ) तिने सहज एक्स्पायरी डेट बघितली तर ती फक्त २२ दिवसा नंतरची होती.

आता दोन बॉटल्स आपण २२ दिवसात  संपवू शकतो का? नाही.. म्हणजे तुम्ही फुकट मिळते म्हणून ती बाटली घरी आणणार, आणि एक्स्पायरी डेट नंतर वापरणार… असं नेहेमीच होतं.  हाच प्रकार मला लेज, भुजिया पॅकेट्स, वगैरेच्या बाबतीत पण आढळला.

 

बोर्डींग पास वर १० डिसेंबर आणी टेट्रापॅक वर जुन ०६ दिसतंय.. म्हणजे जवळपास सहा महिने पुर्ण होताहेत.

 

आता रिसेंटली हैद्राबादेहून जेट एअर  ( फुल सर्व्हिस ) ने आलो. तेंव्हा फ्लाईट मधे सुरुवातीला मॅंगो जुस चं पॅकेट दिलं होतं. जुसची चव थोडी बिघडल्या सारखी वाटते म्हणून तक्रार केली, तर त्याने दुसरा जुस आणून दिला, पण त्याची पण चव खराब लागत होती. सहज डब्यावर एक्स्पायरी डेट पाहीली आणि लक्षात आलं की सहा महिने पुर्ण होऊन गेले आहेत.

आत  ताज सॅट ची सर्व्हिस म्हंटल्यावर तर कमीतकमी आपण अशी अपेक्षा ठेवतो की   अशा एक्स्पायरी डेट च्या जवळपासच्या वस्तु तिथे सर्व्ह केल्या जाणार नाहीत.. पण तसं नसतं.एक शिकलोय या अनुभवावरून की एक्स्पायरी डेट नक्कीच पहायची.. कुठेही..!!!

About महेंद्र

माझा ब्लॉग :- http://kayvatelte.com
This entry was posted in प्रवासात... and tagged , , , , . Bookmark the permalink.

19 Responses to असंही असतं..

 1. ग्राहकाला ‘गिर्‍हाईक’ बनवून सडलेला माल त्याच्या माथी मारायचा हे ठरलेलंच आहे. विदेशातून येणारे खाद्यपदार्थ असेच
  एक्स्पायरी डेट जवळ आलेले आसतात.

  • ब्रँडेड प्रॉडक्ट्स आपण केवळ ब्रँड पाहुन घेतो.. ते घेतांना तारीख पण पहाणं आवश्यक आहे. बहुतेक वेळेस असं दिसुन येतं की एक्पायरी डेट अगदी जवळ आलेली आहे त्या प्रॉड्कट्ची. उलट देशी प्रॉडक्ट्स घ्यावे ज्यावर काही स्किम नाही ते..

 2. sadanand says:

  ASAHI ASAT navhe ASACH ASAT

  He post takun nakalt thumhi jago grahk chi surwat keliy.

  ‘ABHINANDAN’

  • असंच असतं.. हो तुमचं बरोबर आहे, हेडींग जास्त संयुक्तीक झालं असतं हे.. पण आपण भारतिय एकावर एक फ्री या प्रलोभनापासुन कधी दुर होणार? मला फसवलं गेलं, ठिक आहे,पण इतरांना कमित कमी फसवलं जाउ नये ही इच्छा होती. तुम्ही म्हणता तसं. जागो ग्राहक ची सुरुवात पण म्हणता येइल. इथे काय मनात येइल ते शेअर करतो.. हा फोटो कधीचा काढुन ठेवला होता, त्याचं पोस्ट टाकायचं आज सुचलं..

 3. अनिकेत says:

  बापरे, कधी हा विचारच नाही केला. आम्ही तर नेहमी बिग-बझारमधुनच सामान आणतो आजकाल. बरं झालं सांगीतलेत, पुढच्या वेळेस बघुनच घेईन.

  • सगळ्यात चोर आहे बिग बझार. २० रुपयांच्या लेज वर एक पाकिट फ्री म्हणुन घेतलं, आणि उघडुन पहातो तर आतमधे फक्त १०-१२ चिप्स होत्या. म्हणजे पाकीट मोठं, आणि आत स्पेशली पॅक्ड लेस क्वांटीटी.. असंही असतं.. आपण सजग रहायला हवं बस..म्हणजे हे लोकं आपला फायदा घेउ शकणार नाहीत.

 4. आनंद पत्रे says:

  मी आत्ताच २० मिनिटापूर्वी ‘बिग बाजार’ मधून आलो, तुमचा लेख पाहिला आणि लगेच सर्व सामानाची एक्सपायरी डेट पाहिली, नशिबाने सगळे गेल्या महिन्याचे पॅकींग असलेले आहेत. 🙂
  आता प्रश्न पडला की एक्सपायरी डेट, पॅकींग डेट प्रिंटींग मध्ये तरी घोळ नसावा. 😦

  • मला तरी वाटत नाही की मॅन्युफॅक्चरींग डेट मधे काही घोळ असु शकतो. कारण प्रत्येक लॉट वर एक्साईझ ड्युटी भरावीच लागते. फक्त ज्या ठिकाणी एकावर एक फ्री आहे, त्यात जास्त काळजी पुर्वक शॉपिंग केले पाहिजे. डीमार्ट वाले तर नेहेमीच असा घॊळ करतात, पण आपण काळजीपुर्वक शॉपिंग केलं की झालं.

 5. एक्सपारेटरी डेट बघण्यात माझी बायको कधीही चुकत नाही… अगदी मी काही खरेदी करत असेल – शेविंग क्रीम पासुन मेडिसिन्सपर्यंत सार्‍यांची डेट ती अगदी तपासुनच घेते!

  बाकी जेट वाल्याकडुन अशी ‘करामत’ तरी अपेक्षित नव्हती!

  • दिपक
   ताज सॅट चं किचन असतं जेट ला. म्हणजे ते पण सामील आहेत यात असं समजायचं कां? युजवली सहा -सात महिने एक्स्पायरी असते जुसची, बरेचदा बॉर्डर लाइन वरच जुस खराब होतो, जर व्यवस्थित स्टोअर केला नाही तर….
   चांगली सवय आहे ही एक्स्पायरी डेट बघुन सामान विकत घ्यायची.

 6. हेरंब ओक says:

  हे जेटचं असच आहे. मला पण असाच अनुभव आलाय जेट मध्ये.. तो पण चांगला तीनदा

  • सातत्याने ४-५ वर्ष बेस्ट एअरलाइन्सचं अवॉर्ड मिळवणार्या एअर लाइनचं असं व्हावं याचं वाईट वाटतंय. किंग फिशर ( इव्हन रेड पण ) जास्त चांगली सर्विस देते.

 7. आमचीहि सगळी खरेदी बिग बझार मधूनच असते. बरं झाल तुम्ही सांगितलं, next time नक्कीच सर्व डेटस चेक करून घेईन

  – अमृता

 8. bhaanasa says:

  ही प्रलोभने उगाच ठेवलेली नसतातच. इथे तर सगळ्याच गोष्टींची एक्सपायरी बघूनच घ्यायची सवय लागलेली आहे. मात्र त्यामानाने फसवाफसवी कमी आहे. एकदा मी आणि आई बिग बझार मध्ये गेलो होतो, असेच बरेच सामान घेतले… त्यात कच्छी दाबेलीच्या मसाल्याचे पाकीट एकावर एक फ्री होते ते पण घेतले. मी मिशिगनला घेऊन आले. एक दिवस दाबेली करायला गेले तर काय… फ्री पाकीटात मोजून दोन चमचे दाबेली मसाला निघाला….. मी आणि नवरा खोखो हसत बसलो. ही फ्रुटी, ज्यूस ची कार्टने पाहूनच घ्यायला हवीत. अगदी आळ्याही सापडल्यात त्या.

  • एकदा आम्ही वेफर्स घेतले होते .. चांगले खुप मोठे पाकिटं होती ,पण फक्त १०-१२ वेफर्स होते त्यात.. बरं ब्रॅंड पण लेज होता..
   जुस तर आम्ही आणुन ठेवत नाही. मुली जास्त हेल्थ कॉन्शस आहेत आई प्रमाणे. त्यामुळे जुस कोल्ड ड्रिंक्स पेक्षा नारळं प्रिफर करतात.. 🙂

 9. Aparna says:

  इथे सेलवर खायचं काहीही आलं की मी पहिल्यांदा एक्स्पायरी पाहाते..मागे लहान मुलांचे फ़्लेवर दुधाचे सिंगल पॅक्स चक्क तारीख संपुन आठवडा झाला तरी तसेच होते…मग नवरा म्हणतो बडे बडे देस मे छोटी छोटी बाते….
  आपण जागरुक राहाण हेच महत्त्वाचं………….

  • अतिशय चांगली सवय आहे… आपण मोठा ब्रॅंड बघितला, की थोडं दुर्लक्ष करतो, पण नेमकं, तेच लोकं हे असे प्रकार करतात..

 10. viddya says:

  मी मागील महिन्यात डिमार्टमधुन ड्रेसपीस खरेदी केला काँटन प्रिंटेड . तर पहिल्याच धुलाईत कलर आणि प्रिंटेड डिझाईन गेली, इतर कपडे जसे टाँवेल, ट्रावझर, टॉप खरेदीच्या बाबतीतहि वाईट अनुभव आला आहे.

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s