अनुभव म्हणजे ??

’अनुभव हीच खात्री’ असं लिहिलं असतं बरेचदा .. जाहिराती मधे.. पण जर प्रत्येक गोष्टीचा अनुभव घ्यायचा म्हंटलं तर मार्कंडेय ऋषींचं आयुष्य पण पुरणार नाही अशी एक म्हण आहे. अर्थात प्रत्येक गोष्टीचा अनुभव घेउन मग ठरवतो म्हंटलं तर ते कदापी शक्य नाही..काही ऐकीव कथांवर विश्वास ठेवावाच लागतो. पण   कोणाच्या अनुभवावर विश्वास ठेवावा??? हा एक मुलभूत प्रश्न आहे.

बरेचसे लोकं आपल्या अनुभवा बद्दल सारखं काहीतरी सांगून वैताग आणत असतात. केवळ एकच काम  आपण आयुष्यभर केलं म्हणून आपण  त्यात   एक्स्पर्ट झालो,  असं बऱ्याच लोकांना वाटतं, आणि मग ते अकलेचे तारे तोडणे सुरु करतात.

अहो गाढव पण आयुष्यभर ओझं वहात, म्हणून काय ते ट्रान्स्पोर्टर बनतं का?? नाही ना??   ते गाढव आयुष्यभर गाढवच रहातं – ओझं वहाणार….  तसंच आहे हे.. ट्रान्स्पोर्टर बनायचं तर सरदारंच व्हावं लागतं, … आता यातला विनोदाचा भाग जरी सोडून दिला तरी पण हे अगदी शतशः खरं आहे, म्हणून केवळ अनुभवावर विश्वास ठेवतांना पण आपण काळजी पूर्वक असलं पाहिजे- की कोणाचा अनुभव आपण ऐकतो आहे, आणि त्यावर विश्वास ठेवतोय ते..

नेव्ही मधे एकदा काम करित असतांना एक केस पांढरे झालेला, वय अंदाजे माझेच असावे , केस मेंदीने रंगवलेले, असा एक टेक्निशिअन सारखा कामात अडथळा आणत होता.आमचा सर्व्हिस इंजिनिअर  कुठलिही गोष्ट करायला गेला की याच्या कॉमेंट्स सुरु .. ये नै चलेंगा….मैने धुपमे बाल सफेद नहीं किये.. हे पालुपद सुरु व्हायचं…. ! बरं त्याला कोणी काही विचारलं म्हणून तो सांगतोय असं पण नाही.. त्याला कोणीही काहिही विचारलं नव्हतं तरीपण हा माणुस मात्र सारखा त्रास देत होता. तेंव्हा मी पण समोरच होतो उभा, त्याला म्हंटलं, की ठिक आहे, तुच इथे काम कर,  माझी माणसं मी इथून विथड्रॉ करतोय.. बस.. एवढंच म्हणायची देर, की   तो समोरून निघून गेला..!  ह्या लोकांना काम करता येत नाही, पण त्रास मात्र देता येतो..

मी कस्टमर सर्व्हिस फिल्ड मधे असल्यामुळे असे अनुभव नेहेमीच येत असतात. बरेचदा मारवाडी कंपनीत  ( स्मॉल स्केल- किंवा मिडियम स्केल) एक कोणीतरी ’कल्लु मिस्त्री’ असतो, जो सगळ्या फॅक्टरीचं मेंटेनन्स पहात असतो. सेठ्जी पण त्यावर पुर्ण अवलंबून असतात. आता मारवाडी कंपनीचा ऑर्गनायझेशन चार्ट असा असतो..मालक, त्याच्या खाली एक मुनिम, एक कल्लु मिस्त्री, एक फॅक्टरी इंचार्ज. या कंपन्यांमधे कामं करणाऱ्यांचा एक वेगळा क्लास असतो. हे सगळे बहुतेक वर्षानं वर्ष कामं करुन या लेव्हलला पोहोचलेले असतात. मालकाचा पुर्ण विश्वास असतो यांच्यावर, आणि त्याच्या जोरावर या लोकांचं एकछत्री राज्य असतं , आणि त्याच्या जोरावर हे लोकं एखाद्या क्वालिफाईड इंजिनिअरला पण त्रस्त करुन सोडतात..

असेच अनुभव आयटी मधल्या लोकांना पण येत असतात, केवळ बॉस आहे म्हणून चुकीच्या  गोष्टींना पण मान्य करावं लागतं. बॉस च्या म्हणण्याप्रमाणे  बरेचसे काम करावं लागतं.तुम्हाला माहिती असतं की हे काम बॉस ने सांगितलेल्या पद्धतीने  केल्यावर चुका होणार ,पण ते तसंच करावं लागतं- केवळ  बॉस म्हणाला म्हणून, त्याला अनुभव जास्त आहे म्हणून..

पण या गोष्टीवर  काहीच उपाय नाही. बरेचदा समोर काहीतरी वेड्यासारखं बरळतो, आणि आपण मात्र ते केवळ समोरचा माणुस सिनिअर आहे, किंवा बॉस आहे म्हणुन भक्ती भावाने ऐकावं लागतं..  आणि तसं (त्याने सांगितल्या प्रमाणे  चुकीचं)   काम करावं लागतं. केवळ सिनिअरिटिच्या जोरावर बरेच लोकं विनाकारण ……….असो….

केवळ अनुभव तुम्हाला काहीच शिकवु  शकत नाही. रिकामा अनुभव काय कामाचा?

तुम्ही अनुभव घेतला, पण   जर तुम्ही   तो अनुभव तुमच्या जीवनाशी जर तुम्ही कोरिलेट करु शकत नसाल, आणि – जो पर्यंत तुमच्या कडे  अनुभवातून शिकण्यासाठी   शिक्षणाचं बेसिक  फ्रेमवर्क नाही , तो पर्यंत  तुम्ही जो  ३० वर्षाचा अनुभव घेतलाय असं म्हणता .. तो म्हणजे ’एक वर्षाचा अनुभव’  ३० वेळा घेतला..  एवढीच त्याची किम्मत.

थोडक्यात तुम्ही एक वर्षाचा अनुभव तिस वेळा घेतलाय असा पण  अर्थ काढता येइल. अनुभव  या शब्दाची खूप मोठी व्याप्ती आहे, केवळ एकच काम, एकाच पद्धतीने  सारखं करित रिपीट करित रहाणं, आणि नंतर तेच योग्य आहे या शिवाय दुसरं काही होऊच शकत नाही.. असे समजणे… म्हणजे अनुभव मिळवणं नाही..
जास्त लिहित नाही..  थांबतो इथेच..

About महेंद्र

माझा ब्लॉग :- http://kayvatelte.com
This entry was posted in अनुभव and tagged , , . Bookmark the permalink.

20 Responses to अनुभव म्हणजे ??

 1. gouri says:

  “एक वर्षाचा अनुभव तिस वेळा” – perfect varnan keley tumhi.

 2. anukshre says:

  असे अनुभव नोकरीत तर कायम येतात. त्यालाच दुसऱ्याची चाकरी असे म्हणतात ना? मी पोस्ट मध्ये खूप वेळेला ‘माझा अनुभव’ असे लिहिते कारण, ते माझ्या आयुष्यात रिलेटेड आहेत. हाच फरक असतो आपल्या व बाहेरील जगात आव आणलेल्या दुसऱ्यांच्या पोकळ अनुभवाचा. छान मांडलेत नेहमीप्रमाणे……

  • अनुभव .. याचा गैर फायदा घेणारे बरेच लोकं आहेत. आपल्यावरच अवलंबुन असतं , कोणावर किती विश्वास ठेवायचा ते..

 3. हेरंब ओक says:

  Rule #1 : Boss is always right
  Rule #2 : If boss is wrong, refer rule #1.

 4. सचिन says:

  खर आहे काका. आय टी मध्ये तर काल आपण शिकलेल आज ते outdated झालेल असतय.तरीपण बाँस सांगतो म्हणुन आपण त्याच जुन्या रस्त्यावरुन चालायच.नवीन काहि प्रयन्त नाहि करायचा. जे काय असेल ते आपल आपण वाचुन शिकायच.
  शेवटि आय टि त तेच तेच काम करुन मी आता embedded मध्ये shift झालोय.

  म्हटल आता नवीन अनुभव घेऊन बघु.कारण आता परत पहिल्यापासुन सुरवात
  माहित नाहि हे मी बरोबर केल कि चुक ते?

  पण नवीन शिकायला मजा येतेय.(नव्याचे नऊ दिवस)

  • दररोज नविन डेव्हलपमेंट्स होत असतात.. आणि ज्या वेगाने या डेव्हलपमेंट्स होत असतात, जुन्या लोकांना त्या वेगाशी जुळवुन घेणं जमत नाही .. आणि मग नविन लोकांची मुस्कटदाबी सुरु होते. बायकोचा भाउ आहे आयटी मधेच.. बरेचदा सांगत असतो..
   माझं फिल्ड नाही ते.. पण ..एकदा निर्णय घेतला, की तो बरोबर आहे असंच समजायचं असतं..

 5. vikram says:

  केवळ एकच काम, एकाच पध्दतीने सारखं करित रिपिट करित रहाणं, आणि नंतर तेच योग्य आहे या शिवाय दुसरं काही होऊच शकत नाही.. असे समजणे… म्हणजे अनुभव मिळवणं नाही..

  अगदी मनातले लिहिले आहे बर का

  आणि तुम्ही म्हणताय तसे अनुभव प्रत्येकाला वेळोवेळी येत असतात.

  • विक्रम
   पण अशा अनुभवातुन आपण काय शिकतो ते महत्वाचं.. 🙂
   बरेचदा चुकिचे निर्णय माथी मारल्यावर झालेल्या चुकांची जबाबदारी जेंव्हा निर्णय घेणारे टाळतात तेंव्हा……….. असो..

 6. sahajach says:

  खरय़ं तुमचं अनुभव या शब्दाची व्याप्ती प्रचंड मोठी आहे……आणि केवळ एकच काम अनेक वर्ष करत राहिल्यानंतर झालेले मॅनेजर्स जेव्हा आपल्या मॅनेजरकीच्या फुशारक्या मारतात तेव्हा खरचं हसू येते!!!!!!खरं तर बऱ्याच ठिकाणी नवीन लोकांना वर येउ न देण्याचा या लोकांना जास्त ’अनुभव’ असतो….
  असो…..मला मात्र माझ्या बॉसचा असा ’अनुभव’ नाही……लिहीन त्यांच्याविषयी!!!!!!

  • नविन शिकायची इच्छा नसते, त्या मुळे असलेल्या ज्ञानावर फुशारक्या मारणे एवढंच येतं.. शेवटचं वाक्य पहा. एकच वर्षाचा अनुभव ३० वर्ष रिपिट केलेला..

 7. gouri says:

  Mahendra, I have tagged you. Maajhee aajachi post bagha.

 8. bhaanasa says:

  महेंद्र तुझे शेवटचे वाक्य एकदम पर्फेक्ट. अनुभव म्हणजे पुनरावॄत्ती नव्हे. नोकरीत हीच गल्लत नेहमीचीच ठरलेली आहे. बरे हे असे पांढरे बाल असले की त्यांना काही उलटून बोलताही येत नाही. सरकारी नोकरीत तर याचा अनुभव पदोपदी येई. वाद घालण्यापेक्षा सोड रे…तो असाच आहे, कुठे नादी लागता असे म्हणत लोकही मरू दे करतात. मग हे अनुभव महाशय अजूनच चढतात. पोस्टचा विषय व पोस्ट दोन्हीही मला खूप आवडले.

  • हल्ली माझे पण पांढरे बाल असल्यामुळे मी तो प्रिव्हिलेज घेतो, आणि असा कोणी केसांबद्दल म्हणायला लागला की गाढवाचं उदाहरण देतो 🙂 .. पण हा मुद्दा दररोजच्या अयुष्यात नेहेमीच आडवा येतो कुठल्या ना कुठल्या स्वरुपात….

 9. Aparna says:

  अनुभव म्हणजे पुनरावॄत्ती नव्हे आणि हेरंब याशी संपुर्ण सहमत…ही पोस्ट वाचायला उशीर झालाय पण आवडली म्हणून उशीराने का होईना कॉमेन्टतेय….:)

 10. सुरेश पेठे says:

  अनु ..चा एक अर्थ आहे पुनरावृत्ती म्हणजेच मागून ( इथे न मागता ! ) , नंतर, सारखा ( म्हणजे तुम्हाला येतो/आलाय तसाच ) ,बरोबर वगैरे वगैरे….. ( if I am not wrong !)

  आता अनुभव म्हणजे प्रचीती ( जी तुम्ही आणवून दिलीय ती ! ) ( एकदम perfect )

  तुमचे अनुभव विश्व खरेच प्रचंड आहे ह्यात शंका नाही !!

  • सुरेशजी
   नाही हो.. उगिच तोडकं मोडकं काहीतरी लिहायचा प्रयत्न करतो नेहेमी .. बस.. आणि अनुभव म्हणाल, तर इतक्या वर्षाच्या आयुष्यात जे काही बरं वाईट पाहिलं तेच इथे लिहितोय बस..

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s