टॅग…

गौरी ने टॅगलं म्हणुन हे पोस्ट.

आधी तर टॅगलं म्हणजे काय तेच समजलं नाही.. पण नंतर जेंव्हा जी च्या ब्लॉग वर जाउन पाहिलं तेंव्हा ही भानगड लक्षात आली.. चला उत्तरं टाकू या…

***
1.Where is your cell phone?
दिसत नाही कुठे…बहुतेक कारमधे विसरलो…

2.Your hair?
५० टक्के शिल्लक नाहीत.
( काय करणार.. घरात तीन बायका अन फजिती ऐका झालंय.. 🙂 शिल्लक कसे रहातील केस?? )
3.Your mother?
एंजल

4.Your father?

हायपर ऍक्टीव्ह ऍट ८३ एज.
5.Your favorite food?

चिकन करी , निर डोसा,/किंवा फिश करी राईस./ पुरण पोळी/ श्रीखंड पुरी — अजुन किती सांगू.. जागा पुरणार नाही .. 🙂

6.Your dream last night?
माझी गाडी चुकली आणि मी स्टेशनवर एकटा राहिलो..

7.Your favorite drink?
सगळंच..  अगदी काय वाटेल ते..  बोर्नव्हिटा पासुन तर लाल बिल्ला, काळा  बिल्ला.. अगदी काहीही….

8.Your dream/goal?
मोठी इंजिनि अरींगला आहे म्हणून दुसऱ्या मुलीने मेडीकलला ऍडमिशन घ्यावी अशी इच्छा आहे.
9.What room are you in?
ड्रॉइंग रुम..

10.Your hobby?

खाणं….  खाण्यासाठी जन्म आपला..
11.Your fear?
बायको माहेरी गेली आणि स्वयंपाक मला करावा लागतोय.. 😦

12.Where do you want to be in 6 years?
डेफिनेटली स्वर्गात नाही..

13.Where were you last night?
अर्थात घरी ..

( मला तशा काही सवई नाहीत हो.. …. )

14.Something that you aren’t diplomatic?
मित्र
15.Muffins?
हे काय विचारणं झालं?? डा्र्क चॉकलेट सीसीडे चे..

16.Wish list item?
बी एम डब्लु  🙂
( नुसतं विश लिस्ट मधे ठेवायला काय जातंय??)

17.Where did you grow up?
अमरावती, नागपुर, यवतमाळ..

18.Last thing you did?

ड्राइव्ह करुन येतोय बेलापुरहुन मालाडपर्यंत.

19.What are you wearing?
बनियन+ शॉर्ट
( घरी आल्यावर घालायचे कपडे.. बायको ओरडते असं राहिलं की.. पण अजुन घरी आलेली नाही ती ऑफिस मधुन तो पर्यंत बसतो असाच, नतर  टी  शर्ट घालावाच लागेल.. )
20.Your TV?
(नेहेमीप्रमाणेच) बंद
मी टिव्ही पहात नाही..

21.Your pets?

बायको.. फक्त.
22.Friends

फार कमी..

23.Your life?
full of surprises
नो वे.. ऑल प्रेडीक्टेबल…
24.Your mood?
मस्त आहे एकदम.. नो ट्रॅफिक जॅम.. बेलापुर ते मालाड फक्त एक तास.. दहा मिनिटॆ.. 🙂

25.Missing someone?
नाही…
( इथे काय उत्तर अपेक्षीत आहे?? )
26.Vehicle?
आय टेन मॅग्ना..आत्ताच घेतली तिन महिन्यापुर्वी.

27.Something you’re not wearing?
रिस्ट वॉच..

28.Your favorite store?
कुठलाही बार ऍंड रेस्टॉरंट.. 🙂 जिथे नॉन व्हेज चांगलं मिळतं ते..

Your favorite color?
पांढरा.. ( कारण माझ्य  सावळ्या रंगावर उठून दिसतो. .. आता माझ्या सासु बाई मला म्हणतात उजळ आहे म्हणून , पण ते उगीच.. आपलं काहीतरी.. आणि आई म्हणते लहान असतांना मी अगदी  कणकेच्या गोळ्यासारखा रंग होता  माझा… )

29.When was the last time you laughed?
काल सकाळी सहा वाजता.. बायको रत्नागिरीहुन परत घरी आली, आणि तिच्यासाठी दार उघडलं तेंव्हा.

30.Last time you cried?
आठवत नाही.. खूप वर्षं झालीत त्याला..

31.Your best friend?
माझा लॅपटॉप

32.One place that you go to over and over?
किचन..  ्खाऊ चे डबे हुडकायला..

33.One person who emails me regularly?
माझा आते भाउ मिलींद ( यु एस ला आहे, गेली २५ वर्ष< दररोज ४- ते ५ नॉनव्हेज , जोक्स इ मेल्स पाठवतो  🙂 )

34.Favorite place to  eat?

बऱ्याच आहेत.. पण मुंबईला  ब्रिटानिया ( बेलार्ड पिअरचं -) मोस्ट फेवर्ड..

मी तन्वी, अ्पर्णा, भुंगा, अनिकेत,पंकज , रविंद्र ला टॅगतोय..

About महेंद्र

माझा ब्लॉग :- http://kayvatelte.com
This entry was posted in Uncategorized. Bookmark the permalink.

23 Responses to टॅग…

 1. gouri says:

  kaay he mahendra … tumhi tar maajhya peksha hi jast vela niyam modala ithe … eka shabdat aivaji eka vakyat uttare jhali ki … pan vachayala majaa ali.

  सावळ्या रंगावर उठुन दिसतो… 😀 😀
  “( मला तशा काही सवई नाहीत हो.. …. )” … yaala mhanataat chorachya manat chandane. mala asa arth disalahi navhata ya prashnace uttar lihitana 😉

  • एका शब्दात कसं शक्य आहे?? आता काय आवडतं म्हंटल्यावर तर मला काय लिहु अन काय नाही असं झालं होतं.. पण स्वतःच्या मनवर आवर घातला..आणि प्रत्येक उत्तरामागचे कारण सांगायलाच हवे नां??

 2. >> मला तशा काही सवई नाहीत हो..

  एकदम भारी.

  • खरंच सिध्दार्थ, मला खर्ंच तशा सवई नाहीत.. प्रश्नच असा होता नां की उत्तर काय लिहावं हेच समजत नव्हतं.. 🙂 म्हणुन मनात आलं ते लिहुन टाकलं.. ऍज युजवल काय वाट्टेल ते.. 🙂

 3. bhaanasa says:

  सहीच…. खाऊचे डबे हुडकायला…..हा हा…. आणि कलरचे स्पष्टीकरण अगदी माझ्या नवरोबाचेच आहे की…..आणि तुझ्या पेटबद्दल काय बोलावे….:)

  • माझा आवडता पास टाइम आहे तो..
   अगं खरंच सासूबाई म्हणतात उजळ आहे मी म्हणुन.. आणि मग मुली ’उजळ’ असं म्हणुन फिदी फिदी हसतात.. बाबा उजळ, तर आम्ही लख्ख गोऱ्या आहोत कां असं म्हणतात दो्घीही.. 🙂

 4. sahajach says:

  महेंद्रजी सही आहेत उत्तरे……..बाकि सगळ्याच सासूबाईंना जावई अगदी हॅंडसम वाटतो असे दिसतेय…:)

 5. Aparna says:

  “घरात तिन बायका अन फजीती ऐका” ….

  हा हा हा…तीन तीन बायकांमध्ये राहुन खरंच चांगली उत्तर दिलीत…बघा त्यांनी तेवढी शाबुत ठेवलीय…मला एक आणि अर्धा पुरुषांमध्ये राहुन आत्ताच डोकं भणाणलंय….आता टॅग मिळालाय तर पोस्टते लगेच….:)

 6. sureshpethe says:

  महेंद्रजी,
  चला तुमच्या लक्षात तरी आली भानगड, मी तर अजूनही “टांगलेलाच”आहे !

  पण तुमच्या बिनधास्त उत्तरांनी मजा आलीय !

 7. Aaditya says:

  are mala pan forward karit ja…
  (u know what i mean)

 8. Aparna says:

  महेन्द्रकाका, आपने बोला तो अपुनने ताबडतोब सुन्या..सुन्या और टॅगा भी….

 9. sonalw says:

  ha kaay prakar aahe konitari saanga re…dokyacha paar bhuga jhalay!

  • सोनल
   या मधे काही प्रशन आहेत, त्यांची उत्तरे लिहायची आहेत .. अगदी सद सद विवेक बुध्दीला स्मरुन.. बस्स्स.. एवढंच.. हे फक्त टु नो युवर फ्रेंड्स बेटर.. 🙂

 10. हा प्रकार थोडा थोडा कळलाय आता. मला वाटलं होतं टॅगचा अर्थ आपल्या सहीखाली मिपावाले वाक्य लिहितात तसं काही असतं की काय. ही कल्पना चांगली आहे. आवडली.

 11. anukshre says:

  भलताच झकास लिहिला कि tag महेंद्रजी, माझ्या कडे मी एकटी ते दोघे तुमच्या सारखेच!!!! काय करणार???? माझी भाची आली होती. काय पळापळ झाली. फार अवघड प्रकार झाला. टी शर्ट तर प्रकार तर सेम टू सेम. तुम्हाला धनंजय चा पूर्ण सपोर्ट आहे.

  • काहिही न लपवता जे मनात येत गेलं ते लिहित गेलो. 🙂 वस्स.. आज काही विषय सुचला नाही लिहायला.. जाउ द्या उद्या बघु या ..

 12. आनंद पत्रे says:

  ह्याचीही उत्तरे तुम्ही अगदी बिनधास्त दिलीत, अगदी काय वाटेल ते…. 🙂

 13. प्रसाद... says:

  Tumchya blogs samvet tumchya blogs chya comments hi bhannat astat… ani tyawar tumche reply…mhanje tar….
  Ata ata tar angawalni padlay….blogs wachlyawar comments wachana…

  • प्रसाद
   लोकं कॉमेंट्स लिहित्तात तेंव्हा त्यांना उत्तर दिले नाही तर तो त्यांचा अपमान होईल नां? मी स्वतः पण जेंव्हा कॉमेंट्स देतो ,तेंव्हा रिप्लाय दिलाय का लेखकाने ते जाउन चेक करतो नेहेमी.. आणी जशी मी अपेक्षा ठेवतो,तशिच, इतर् लोकंही ठेवतच असतिल.. 🙂

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s