स्वाभिमान की दुराभिमान??

 

नितिश राणे..

 

नारायण राणेचा मुलगा.. मला काल पर्यंत त्याचा चेहेरा काळा की गोरा ते माहिती नव्हतं. कारण कधीच कुठल्याही सामाजिक कार्यामधे त्याला बघितलं नव्हतं. पण काल सकाळी फिरायला गेलो होतो, तेंव्हा एक मोठा बोर्ड बघितला. त्यावर लिहिलं होतं की” स्वाभिमानच्या” आंदोलनामुळे तसेच नितेश राणे याच्या प्रयत्नाने  वैतरणा प्रोजेक्ट पुर्ण होई पर्यंत मुंबई मधल्या टॉवर्सला पाणी बंद”

आता हे वाक्य जे आहे, त्या मधे एकही स्वल्प विराम नाही,पुर्ण विराम नाही.. त्यामुळे   हेच वाक्य वाचतांना असं वाटतं की नितेश हा वैतरणा प्रकल्प पुर्ण  होण्यासाठी प्रयत्न करतोय…..आता लोकं इतके  मुर्ख आहेत असं नारायण किंवा नितेश राणे ला वाटते कां??

असंही म्हंटलं आहे त्यात की हक्काचं पाणी (कुणाच्या हक्काचं?? फुकट चोरी करणाऱ्या झोपडपट्टीवासियांच्या हक्काचं??) कुठेच ( म्हणजे पैसे घेउन , इमानदारीने टॅक्स भरणाऱ्या तुमच्या  आमच्या  सारख्या मुर्ख लोकांच्या  लोकांच्या घरात) जाणार नाही..  म्हणजेच काय तर पाणी कपात  .. आणि झोपडपट़्टीला फुकट ( अर्थात चोरीचे ) पाणी सुरु..

आत्ताच सोनलने कॉमेंट टाकली की आता  म्हणे   चो्रीच्य़ा नळजोडण्या  रेगुलराइझ करण्यासाठी महापालिकेला सांगितलंय…  वाह रे सरकार.. दिव्य आहे सगळे नेते…

मुंबईकरा.. म्हणजे इमाने इतबारे सरकारला टॅक्स भरुन पैसे द ऊन सगळ्या सुविधा घेणाऱ्या सुविद्य नागरीका…..
जागा हो.. तुझ्या सारखा मुर्ख  तूच.. अरे सगळ्या जगात इमानेइतबारे टॅक्स भरणाऱ्याना बेसिक सुविधा  देण्यासाठी सरकार बांधील असतं.. पण तुझं दुर्दैव.. की तु मुंबईला रहातोस..

इथे टॅक्स भरुन इमाने इतबारे लोन घेउन घर घेणाऱ्या लोकांच्या विरुद्ध असे जर महाराष्ट्र सरकारचे पाइक असतील तर मात्र सामान्यांचे जगणं काही सोपं राहिलेलं   नाही…. नितेश , नारायण सारखे नेते आहेत,  जे   आपल्या घाणेरड्या मतांच्या पॉलिटिक्स साठी टॅक्स पेअर्सच्या मुळाशी उठले आहेत, आणि वर पुन्हा  मोठ्या अभिमानाने त्याची असे फलक लाउन जाहिरात करताहेत.. आणि इतकं असतांना पण … मध्यमवर्गीय माणुस  निर्लज्ज पणे अशाच नेत्यांना निवडून देतोय….

जय हो…मुंबई करा.. अरे तु चोरीला गेलेल्या विजेचे पैसे भरतोसच .. आणि चोरीला गेलेल्या पाण्याचे पण.. आता फक्त दर महिन्याला आपल्या पगारातला झोपडपट़्टी वासियांच्या साठी पगारातले काही पैसे काढून द्या म्हणुन सरकारने वटहुकुम काढला तर आश्चर्य वाटून घेउ नकोस… तयारीत रहा…. जय हो……

About महेंद्र

माझा ब्लॉग :- http://kayvatelte.com
This entry was posted in Uncategorized. Bookmark the permalink.

30 Responses to स्वाभिमान की दुराभिमान??

 1. सुरेश पेठे says:

  आणि ह्या झोपडपट्ट्यातून रहाणारे असणार भय्ये वा बिहारी, ह्यांचेच नवे नवे मतदार्संघ होणार व उद्याचा मुख्यमंत्री बिहारी असला तर तोंडात बोटे घालू नका….तर मारून घ्या !!

  • खरंय… पण दहावी नापासाची बौद्धीक पातळी इथे बरोबर दिसुन आली.. असो.. परवाच विदर्भातले शेतकरी दारु मुळे आत्महत्या करतात अशी मुकताफळं उधळलीत नारबाने..
   तोंडात मारुन घेणंच बाकी आहे आता बस्स..

 2. छान लेख आहे. काहीही न करता नेत्यांची मुले “तरुण नेतृत्व” म्हणून मिरवतात आणि जमेल त्या निवडणुकीत भाग घेतात. नितेश राणे आता राजकारणात सक्रीय होवू लागले आहेत. मध्यंतरी स्वाभिमान संघटनेने महानगरपालिकेवर मोर्चा काढला होता तेंव्हा लाठीमारीत एका कार्यकर्त्याच्या मृत्यू झाला होता.

  आता झोपडपट्टीवासियांसाठी आरक्षण लागू केले नाही म्हणजे मिळवले.

  • त्याच्याच मृत्युचं राजकारण केलं गेलं.. बस..आरक्षण … सहज शक्य आहे.. आपले बौध्दिक पातळी नीचतम पोहोचलेले नेते काहीही करु शकतात. इथे या गोष्टीला अनुमोदन देणारे, भाजपा, मनसे, कॉंग्रेस सगळे होते.. निर्लज्ज पणाची कमाल आहे.

   तुमच्या आमच्या थोबाडीत खाडकन मारली , अन त्याचीच अशी जाहिरात करताहेत

 3. मलाही तो बोर्ड पाहिल्यावर खटकले होते. आदोंलने म्हणजे निव्वळ बनवाबनवी असते, नुसते पैसे खाण्याचे धंदे.

  आपण “झोपडपट्टीत रहाणारे बिहारी, भय्ये ” म्हणुन सहजच म्हणुन जातो, पण एक माणुस म्हणुन या नरकासमान असणाऱ्या वस्तींमधे माणुस कसा जगत असेल , आणि ही भावना आपल्य मनात आली कुठुन ? मद्रासींची जागा आता बिहारी, भय्यांनी घेतली आहे.

  खर म्हणजे ज्या समाजाबद्दल, ज्या समाजमुळे आज मुंबईमधील मराठी माणासे घरं विकत पार उपनगरापर्यंत पोचला आहे, केवळ ज्यांच्यासाठीच हे टॉवर बांधले जात आहेत, ज्यात मराठी माणासंना पैसा असुन सुद्धा घरं विकली जात नाहीत कारण ते मासांहरी आहेत करुन , त्यावरुन काहीही टिका केली जात नाही.

  आज काय पण पुर्वी पासुन मराठी समाजही साऱ्या भारतभरच नव्हे तर जगात पोचला आहे, स्थिरावला आहे.

  मराठ्यांचा इतिहास पाहिला तर कळेल की दसऱ्यानंतर पेशव्यांचे सरदार लुटालुट करायला, खंडण्या गोळा करायला बाहेर पडत. बंगालमधे कलकत्ताजवळ मराठ्यांना अटकाव करण्यासाठी चीन च्या भिंतीसारखी ” मराठा वॉल ” बांधली गेली होती.

  • घराच्या किमती इतक्या झालेल्या आहेत की आता मराठी माणुस शोधायचा तर पार विरारच्या पुढे जावे लागेल काही दिवसांनी..
   ’ त्यांच्या ’ बद्दल आकस नाही.. ते झोपडपट्टीत रहातात म्हणुन त्यांचा राग पण नाही. फक्त एवढंच म्हणावंसं वाट्तं की काटेकोरपणे नियमाचे पालन करणाऱयांना पाणि न देता , फुकट चोरुन वाट्ताहेत, म्हणुन संताप आला होता. बस..

   मला वाटतं जैन टॉवर्स बद्दल बोलताय.. पण असे अनेक टॉवर्स आहेत की ज्यांत बरेच मराठीलोकं पण आहेत. नुकताच निर्मल लाइफ स्टाइल च्या मुलूंड येथिल बिल्डींग मधे गेलो असता, एका बिल्डींगमधे ५० टक्क्यांच्या वर मराठी नावं दिसली.. बरं वाटलं..

 4. नारायनचं जरा सोडून देवु, नितेश रानेच्या रुपाने जर भविष्यातिल असले “राजकारनी” या लोकशाहिच्या भारतात पैदा होणार असतिल तर देश सुधारने महा कठिन आहे. हि पैदास जनतेनेच थांबवायला हवी, तर जनताच ह्यांना उब देते आहे हेही दुर्दैव नव्हे काय? स्वाभीमान याला म्हनतात काय? स्वाभीमान असा काय कुणा मैडम्च्या पायी वाहायचा असतो काय? स्वाभिमानाचा दणका कसला आणि कुनाला देता आहत भुरट्यांनो,.. राणेंच्या कबिल्याने हा स्वाभिमान स्वताच्या हदयात टेवला तर उपकार होतिल महाराष्टावर. .. नाहिअतर महाराष्टच दनका द्यायचा तुम्हाला..

  आप्ला

  साळसूद पाचोळा.

  • नुसता नारायण, किंवा नितेशला म्हणुन फायदा नाही < पण त्यांनी जेंव्हा हा मुद्दा उचलला, तेंव्हा सगळ्याच पक्षांनी सपोर्ट केलाय ह्याला…. ( कॉंग्रेस, मनसे, शिवसेना, भाजप ) सगळे एकाच थैलीचे चट्टेपट्टे…

 5. sonalw says:

  aaplyakade ‘garibancha kaiwar’ ghenyach song ghen khup sop jhalay. yanchyach aashirwadane hya andhikrut jhopadya wwadhlya. tya dhikrut kernyache prayatna chaluch aahet. pan tyancha kaiwar ghetana he saral saral wisartat ki hya shaharatala adhikrut naagrik nana prakare shiksha bhogtoy. pani wij yache paise, public transport warcha wadhlela boja, jhopdyanmule higways chi aani roads chi jhaleli durdasha, ya shahrala aalela bakal pana…he sosaych koni? tar tumachya aamchya saarkhya tax payers ni.

  tasehi jhopadpattiwale tax bhartat pan to sthanik gund-cum-raajkaarnyankade!

  Chid aananaari gisht aahe. yach konalach kahi kas watat nahi?

  • गरिबांचा कैवार घ्यायचा म्हणजे अनधीकृत झोपडपट़्ट्या अधिकृत करायच्या.. त्यांच्या साठी इतर स्थानिकांना वेठीस धरायचे.
   मला याचा संताप आला, की नितेशचा फोटो लाउन निर्लज्ज पणे जाहिरात केली जाते की आम्ही तुमच्या थोबाडीत मारली आहे.. करा काय करता ते…… याचा!!

   • sonalw says:

    aajchya papermadhe hi suddha baatmi aahe ki Ashok chavan tanni 2000 paryantchya nal-jodnya adhikrut karawya ashi palikela request keliye. jahlach ki mag…pahilyach paayriwar he. saglach adhikrut kel ki anadhikrut goshti sampwaaychi bhashach nako!

    mantryanche bangle aani kulabyachya imaratinna 24 tas paani milat. tyat ka nahi kapat karnaar? ek diwasa aad paani aaplyala. tyanna matr 24 tas? ka mhanun? aani jhopdyanche nal adhikrut?
    santap hoto aksharshah

    • असं होणार हे माहिती होतंच.. आपल्यासारखे लोकं जेंव्हा मतदानाला बाहेर निघतील तेंव्हाच आपली शक्ती वाढेल. पण व्होट बॅंक तीच आहे… आपण नाही जात बाहेर.. म्हणुनच आपल्याकडे पुर्ण दुर्लक्ष केलं जातं.. आणि हा आपला संताप होतो..

 6. sonalw says:

  BTW aajchya papermadhe baatmi aahe. paanyachi chori thambawanyasathi BMC – police ekatra dhadak mohim raabwnaar aahet. Undarala manjar saakshi! 🙂

  • सोनल,
   धन्यवाद… आजचा सगळ्यात सुंदर जोक … ती बातमी वाचली मी पण आणि पोट धरुन हासलो.. !!! 🙂

 7. sahajach says:

  महेंद्रजी आनंद आहे सगळा……..ह्या फलकांवरून आठवल गेल्या महिन्यात ईथल्या राजाचा वाढदिवस होता, ओमानी लोक तर स्वत:हुन साजरा करत होतेच पण ex-pats पण मनापासून राजाच्या आयूष्यासाठी शुभेच्छा देत होते!!!!
  सगळंच भव्य असलं तरीही विलक्षण साधेपणा होता, भपकेबाजी कुठेही नव्हती आपल्याकडे तर गल्लीबोळातल्या नेत्यांनाही श्री, रावजी, माननीय, साहेब वगैरे विशेषण लागतात ………………..्यावेळेस राजाने दुसऱ्या राज्यात वाढदिवस तिथल्या स्थानिक लोकांसमवेत साजरा केला याचा एकिकडे मस्कतच्या लोकांना आनंद होता आणि एकीकडे राजा आपल्याबरोबर नाही याचे मनापासून वाईटही वाटत होते……………सगळे स्वयंस्फुर्तीने…….याला म्हणतात आदर्श…….
  आपल्याकडे ’अभिमानच’ जास्त आहे अगदी गर्वापर्यंत…..

 8. bhaanasa says:

  धन्य ते नारायण व नितिश राणे. खरेच दहावी तरी पास आहेत का हा प्रश्न मला कधीचा सतावतोय. इतके मोठे मोठे फलक टांगून स्वत:ची डांबरासारखी असलेली लाल करून घेणे कधी बंद होणार आहे कोण जाणे. शेतक~यांबद्दल उधळलेली मुक्ताफळे म्हणजे अगदी कहरच आहे. लाज कशी वाटत नाही मी म्हणते? पण जी नाहीच आहे ती वाटणार कशी म्हणा…. कर भरा….. वर सगळ्या कपातींना तोंड द्या….. आणि मतदान न करून पुन्हा या चोरांच्याच हाती सत्ता सोपवण्यास हातभार लावा….

 9. सामन्या माणूस इनामे इतबारे टॅक्स भरून आयुष्यभर शिमग्याच्या बोंबा मारत बसणार. आपण ह्या हर्‍या नार्‍याचं काही उपटू शकत नाही. ते म्हणतील ती पूर्व दिशा.

 10. नितीश “नारायण” राणे लिहावं लागतंय यावरूनच कळतंय कि सगळं बापाच्या पुण्याईवरच चालू आहे. आणि तो बाप पण नारायण राणे सारखा. एक नंबरचा चोर. २४ तास प्यायल्यासारखाच वाटतो. आणि अशा लोकांच्या संघटना. संघटना या शब्दाचा अपमान .. दुर्दैव आपलं दुसरं काय !!

  • म्हणुनच मी नेहेमी म्हणतो, नेता हा वेल क्वालीफाईड असावा.. मग तो कुठल्याही पक्षाचा असू दे..

 11. Atul Deshmukh says:

  मित्रहो,
  नुसता संताप करून काही एक होणार नाही.ह्या राजकारण्य़ां कडून अपन समाजकारणाची अपेक्षया करने व्यर्थ आहे.त्याना vote bank प्रिय असते(slum area,जातपात एइत्यदि) मग तो कुठलाही पक्ष असो.
  काही महत्वाची निर्णय जे सरकारने फ़क्त vote bank साठी घेतले आहे त्याना आपण न्यायालयात जनहित याचिकेद्वारे आव्हान द्यायला हवे.. आपले प्रश्न अपनाच सोडवायला पाहिजे..
  काही सरकारी निर्णय जसे: 1: वर्ष २००० पर्यंतच्या illegal slum area ला नियमित करने.
  2: illegal विजजोड़नी,नलजोड़नी नियमित करने..
  illegal कामे नियमित करण्याचा अधिकार ह्या भ्रष्ट पक्षाना कोणी अधिकार दिला..सगळ्यांना माहित आहे की हे नियमाच्या विरुद्ध आहे..न्यायलयच ह्याना वठणिवर अनु शकते.आपल्यासारख्या सुज्ञ नागरिकांनीच initiative घ्यायला हवे..
  में delhi ला असतो कमानिमित्ताने. इकडे किरण बेदिची NGO नवज्योति म्हणून आहे ती जनतेचे प्रश्न न्यायालयात लढण्यासाठी मदत करते..
  I hope mumbai madhe pan ashi ekhadi NGO asel..
  We need to change the system to be in the system..
  आपले प्रश्न अपंच सोडवायला हवेत..नुसता संताप करून काही एक होणार नाही…आहे कोणी मुम्बैकर तयार….Suggestions are welcome..

  • अतिशय सुंदर कॉमेंट.. इथे मुंबईकर असा एखादा मुद्दा असला की फक्त राजकिय नेत्यांकडेच पहातो. राजकिय इच्छाशक्ती पाहिली तर वाटतं की इथे जंगल राज आहे, ज्याला जे वाटेल ते तो करतो. इथे कुठली एनजीओ आहे ते शोधतो आता..

 12. Ajay says:

  नारायण राणेपेक्षा त्याचा मुलगा जास्त नाटकी दिसतोय. ह्या संघटना चालवायला यांच्या़कडे पैसा येतो कोठून याचा पर्दा फाश केला पाहिजे. मागे नारायण एकदा म्हणाला होता की अतिरेकी हल्यामध्ये इथले राजकारणी लोक गुंतले आहेत. का नाही त्याला आत घेऊन पोलिसांनी त्याच्याकडुन माहित्या ( आबांच्या भाषेत !) काढुन घेतल्या. सारे एकमेकांना मिळलेले. अगदी विरोधी पक्ष सुद्धा. पतंग्याची क्लिप पाहिली का, साले कसले घाणेरडे लोक आहेत हे, रेड्याच्या कातडीचे.

  -अजय

 13. Atul Deshmukh says:

  I,Atul Deshmukh,working as s/w engg in NCR region Delhi put some of my 20 cents in reply to this blog. I’m extending it further.

  Please read the following article
  http://www.dnaindia.com/speakup/report_slumbai-vs-mumbai_1278834

  The organisation mentioned in this article doing some good things of Mumbaikars’ concerns e.g. they have filed a petition against Govt Of Mah. decision to regularise the slum area till 2000.
  I’m also dropping a mail to Navjyoti Delhi for their any kind of help on other govt decisions which have taken only to get political edge.
  I think we need to use RTI more efficiently to have check on govt authorities.
  I would like to mention I’m not any social worker but a common man and beleive to change the surrounding we have to move out of our home.
  Like minded ppl pls come forward and share if u have something to in u .

  • त्या पिटिशन बद्दल मी पण ऐकलंय.. डिएनए ची लिंक वाचायची आहे पण आता तिन वाजता मिटींग आहे, म्हणुन रात्री शांतपने वाचिन. आता घाईतच वाचकांना पण लिंक पहाता यावी म्हणुन ताबडतोब कॉमेंट अप्रुव्ह करतोय. प्रतिक्रिये करता आभार..

 14. ही लोकं कशाचं राजकारण करतील, सांगता येत नाही. एक मात्र खरं, यांच्या राजकारणाचा फटका बसतो, तो मध्यमवर्गीयांनाच.

Leave a Reply to sahajach Cancel reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s