शिंडलर्स लिस्ट

 

शिंडलर्स लिस्ट

 

तिने स्वतःच्या बोटावर हलकेच सुईने टोचले , आणि टरारुन वर आलेल्या रक्ताच्या थेंबा कडे तिने पाहिले. डोळ्यात किंचित चिंता -डोळ्यातला पाण्याचा थेंब, सुकलेला चेहेरा, थकलेलं शरीर , आणि रक्ताचा ….तो थेंब तिने बोटावर घेतला आणि गालावर ( चिक बोन्स वर) चोळला.. कदाचित किंचित गुलाबी रंगामुळे आपण हेल्दी दिसू..आणि त्यामुळे कदाचित थोडं जास्त जगता येईल, असं  तिला वाटलं असावं… पण त्यांची तीक्ष्ण नजर…………..

स्त्रिया, म्हातारे लोकं वगैरे जे कामं करु शकत नाहीत त्यांना सरळ गॅस चेंबर मधे पाठवलं जायचं. सगळी कडे नुसता हाहाकार उडालेला होता . हिटलरचे गेस्टापो फुल्ल फॉर्म मधे होते.

१९३९चं वर्षं होतं ते.. पोलंडवर नुकताच विजय मिळवला होता हिटलरच्या सैन्याला. ज्यु लोकं जे आपल्याकडल्या गुजराथ्ई लोकां प्रमाणे हाडाचे व्यावसायिक होते, त्यांच्या विरुद्ध प्रचंड  जनमत तयार होत होतं. त्यांना हुसकावून लावण्यात  येत होतं. हजारो लाखो ज्यु लोकांना क्रॅकोव्ह नावाच्या गावाला शिफ्ट केलं गेलं होतं.. छळछावण्यांमधून..

नेमका ह्याच सुमारास एक जर्मन तरूण.. खूप हॅंडसम, महागडे कपडे घालणारा  अगदी उडाणटप्पु दिसणारा.. इथे येतो.  इथे त्याला धंदा करायचाय. आज पर्यंत याने आपल्या आयुष्यात  जे काही काम केलं असते त्या मधे हा पुर्णपणे अयशस्वी झालेला असतो, पण होप्स नेव्हर डाय.

ह्या गृहस्थाचे नाव शिंडलर्स. उंची कपडे, उच्च रहाणी, महागडी कार, मुळे नाझी लोकांशी पण अगदी कम्फर्टेबली वागणुकीची असते याची. आणि कदाचित याच  कारणामुळे किंवा त्याच्या ओव्हर कॉन्फिडन्स मुळे नाझी लोकांचा विश्वास  बसतो त्याच्यावर..

 

्शिंडलर्स लिस्ट

 

बरं आता करायचं काय? तर एका ज्यु माणसाच्या ऍल्युमिनियमच्या फॅक्टरी मधे काम करणाऱ्या  अकाउंटंट बेन किंग्जले-स्टर्न शी याची ओळख होते. शिंडलर्स  कडे इतका पैसा नसतो की हा स्वतःच्या जोरावर काही काम सुरु करु शकेल. वर्ष आहे १९३९ महायुद्ध आपल्या चरम सीमेवर पोहोचलेले नाही, पण ज्यु लोकांचा द्वेष जागोजागी दिसतोय.  शिंडलर्स हा  स्टर्न  ला विनंती करतो, की माझ्या प्रोजेक्ट साठी गुंतवणूकदार मिळवून दे म्हणून.. आणि मग स्टर्नच्याच मदतीने हा आपला प्रोजेक्ट सुरु करतो.

पैसा अरेंज झाला, आता पुढे काम करायला माणसं आणायची कुठुन?? सगळ्या ज्यु लोकांना पकडुन तर कॉन्सन्ट्रेशन कॅंप मधे पाठवणं सुरु असतं.. काय करायचं?? इथे नुसती कामं करणारे मजुरांत न घेता, डॉक्टर्स, इंजिनिअर्स, लेखक , चित्रकार असे लोकं त्याने कुशल कामगार म्हणून  घेतलेले असतात , आता इजिनिअर्स, डॉक्टर्स ना कुठलं काम येणार?  त्यांना काम येत नसतं , म्हणून  काम शिकवून तयार करतो सगळ्यांना .. त्यांचं आयुष्य वाचवायला…??? की पैसे कमवायला???

शिंडलर्सची साईक काही समजत नाही. उंची कपडे, गाड्या वगैरे मधे नुसता मश्गुल असतो हा.. युद्धाचे दिवस असतात, आणि शिंडलर्स याचा फायदा घेउन  भरपूर पैसा मिळवतो. ऑर्डर्स मिळवतो.. पैसा नुसता पायाशी लोळण घेत असतो. तेवढ्यात याची बायको याला सोडून जाते.

स्टर्न ( अकाउंटंट ) स्वतः ज्यु असल्यामुळे सगळ्या ज्यु लोकांना ( कामगारांना ) वाचवायचा प्रयत्न करतो हे तर साहजिक आहे, पण शिंडलर्स एक जर्मन असुनही हा   प्रयत्न का करतो हे समजत नाही .  माणसाची मानसिक अवस्था कधी आणि कशी बदलेल हे सांगता येत नाही.

नाझी  लोकं वृध्द , थकलेले तरुण , स्त्रिया या सगळ्यांना बर्फ उपसायचे  अंग मेहनतीच्या कामाला लावतात. बरेच लोकं जे काम करु शकत नाहीत त्यांना गोळ्या घालुन मारणं हे तर नेहेमीचंच झालेलं असतं. शिंडलर हे सगळं तटस्थ पणे पहातांना दिसतो.

 

शिंडलर्स लिस्ट

 

बरेचदा असंही वाटतं की  ह्या माणसाला म्हणजे शिंडलर्सला फक्त पैशाबद्दलच प्रेम आहे. पण मधेच असेही प्रसंग आहेत की ज्यात लक्षात येतं.. नाही. … तसं नाही.. ह्या माणसाच्या मनात ज्युंच्या बद्दल ओलावा आहे माणुसकीचा.ज्युंच्या वरचे अत्याचार तटस्थ पणे पहातांना हा जेंव्हा निर्विकार चेहेऱ्याने बसलेला दिसतो , तेंव्हा याची मानसिकता कळत नाही. पण तेच, एका  तहानेने व्याकुळ झालेल्या कैद्यांना घेउन जाणाऱ्या गाडी वर, स्टेशन वर उभी असतांना ,  कैद्यांवर  होज पाइप ने पाण्याचा मारा करतो, तेंव्हा गाडीतले लोकं ते उडणारं पाणी आसुसुन पिण्याचा प्रयत्न करतात… आणि तिथेच त्याच्या नाजुक मनाची एक जाणिव होते.. आणि जाणवतं , शिंडलर्स इज डिफरंट….

थोडे दिवस गेले आहेत, आता ज्युंचं शिरकाण उघडपणे सुरु आहे. गॅस चेंबर्सच्या कथा सांगितल्या जाताहेत. शिंडलर्सने भरपूर पैसा कमावलाय, त्याला कुठुन तरी कुणकुण लागते की आपल्या फॅक्टरीतल्या लोकांना पण आता कॅंपवर  पाठवणार, तेंव्हा मात्र हा थोडा नर्वस झालेला दिसतो. आपल्या कडे काम करणाऱ्यांना वाचवलं पाहिजे असं त्याला वाट्त,आणि एक नवीन आयडीया घेउन तो गोईथ या जर्मन अधिकाऱ्याला  भेटतो..

मला माझ्या जन्मगावी प्लांट सुरु करायचाय, आणि म्हणून मला ही माझी माणसं हवीत.जर्मन अधिकारी आधी तर सरळ नकार देतो, पण शिंडलर्स काही पिच्छा सोडत नाही, गोईथ ला म्हणतो की तुला अगदी हवे तितके पैसे देतो मी , पण माझी ही माणसं  मला कुठल्याही परिस्थितीत हवी. तेंव्हा मांडवली केली जाते.. प्रत्येक माणसासाठी शिंडलर्स हा  ठरावीक रक्कम गोईथ  ला देण्याचं मान्य करतो .  आणि नंतर मग गोइथ एक लिस्ट बनवायला सांगतो..

११०० ज्युज ची यादी.. शिंडलर्स लिस्ट बनवली जाते,  या लोकांना वाचवायला   आजपर्यंत जितका पैसा कमावला असतो  तितका सगळा तो खर्च करुन  टाकतो.  आणि शेवटी तो दिवस उजाडतो. दोन ट्रेन मधे स्त्रिया आणि पुरुषांना बसवलं जातं आणि त्या गावाला ( नांव विसरलोय) पाठवलं जातं. पुरुषांची ट्रेन तर सुखरुप पोहोचते, पण स्त्रियांची ट्रेन मात्र मधे एकदा थांबवली जाते ऑस्टरविज  स्टेशनला.

सगळ्यांचे कपडे, काढून केस कापले जातात, आणि त्या चेंबरमधे सगळ्यांना ढकललं जातं, पहातांना आपला थरकाप उडालेला असतो, आता या सगळ्यांना गॅसने मारणार, ह्याची जवळपास खात्रीच असते आपली. पण तेवढ्यात  वरच्या गॅसच्या पाइप्स मधुन गॅस ऐवजी चक्क पाण्याच्या धारा सुरु होतात.. शिंडलर्स्चे कॉंटॅक्ट्स इथे कामी आलेले दिसतात. आणि आपण हुश्श करतो..

शिंडलर्स आता जवळपास पुर्ण ब्रोक होण्याच्या मार्गावर असतो, ११०० लोकांचा खर्च.. असतोच ना…

अगदी शेवटचा सीन खूप हदय स्पर्शी आहे. १९४४ -४५ चं वर्ष .. आता सहा वर्ष झाले आहेत.  शिंडलर्स पुर्ण पणे गरीब झालेला आहे, सगळ्या कामगारांना एकत्र करतो, आणि त्याचं भाषण.. अप्रतीम.. म्हणतो, की आता तुम्ही स्वतंत्र आहात, युद्ध संपण्याच्या मार्गावर आहे. मित्र राष्ट्र जिंकतय, आता ही फॅक्टरी बंद करावी लागेल मला , आणि इथून निघून जावं लागेल.. सहा वर्ष मी तुम्हाला सांभाळलं, पण यापुढे तुम्ही स्वतंत्र आहात..

शिंडलर्स अगदी वेगळाच उभा केलाय. एक जर्मन ,सुरुवातीला केवळ या युध्दाकडे एक इष्टापत्ती म्हणुन पहाणारा, नंतर त्या ज्यु मधे  गुंतून पडणारा भावना प्रधान जर्मन, बायको सोडून गेल्यावर पण भावनाविवश न  होणारा, पण शेवटी सगळ्यांना सोडून जातांना भावुक होणारा… असा हा …

जेंव्हा शेवटल्या भाषणानंतर जायला निघतो , शेवटी एक वर्कर जेंव्हा सगळ्यांच्या वतीने दातात लपवलेली एक अंगठी काढून देतो तेंव्हा मात्र शिंडलर्स तुटतो… आणि रडायला लागतो.   जेंव्हा त्याला स्टर्न म्हणतो, की सर, तुम्ही आमचे आणि ११०० लोकांचे प्राण वाचवले , तर त्यावर शिंडलर्सचं उत्तर असतं.. अरे   मी नाही, तर स्टर्न ने तुमचे प्राण वाचवले.. मी तर  नुसतई मजा केली , पैसा उडवला.. जर मी हा जो ऐश आरामावर खर्च केलेला पैसा लोकं वाचवायला वापरला असता तर ….  कारच्या बदल्या १० लोकं तरी वाचवता आले असते , टाय पिन च्या बदल्यात आणखीच १०-२० तरी नक्कीच वाचले असते , आणि असेच अजुन काही इतर वस्तूंच्या बदल्यात…

आत्ता पर्यंत केवळ मौज मस्तीच्या  मधे गुंतलेल्या शिंडलर्स मधला माणुस अतिशय प्रभावी पणे उभा केलाय या सिनेमात.  आता आज मी हा इतका जुना सिनेमा.. आणि त्याच्यावर का लिहितोय? तर कालच  रात्री हा सिनेमा पाहण्यात आला , आणि जेंव्हा संपला तेंव्हा आपण काय पाहिलं??? ह्याचा विचार करुन् डोकं सुन्न झालं.. आणि आजचं हे पोस्ट लिहिल्या शिवाय रहावलं नाही.

मला माहिती आहे की हा सिनेमा तुम्ही सगळ्यांनीच  पाहिला असेल , तरी पण इथे हे लिहिलंय, जर माझ्या सारखाच तुमचा पण सुटला असेल पहायचा, तर नक्की पहा. एक अत्युत्कट भावना प्रधान चित्रपट पहिल्याचं समाधान मिळेल.

मी जेंव्हा शाळेत होतो, तेंव्हा मी कोणाला सिनेमाची स्टॊरी सांगायला लागलॊ, की मित्र थांबवायचे, म्हणायचे तु असंबध्द सांगतोस स्टोरी, अजिबात प्रयत्न करु नकोस.. .. तरी पण माझं हे पहिलं सिनेमाचं परिक्षण इथे पोस्ट करण्याची हिम्मत करतोय..आवडलं नाही, किंवा असंबध्द वाटलं तरी पण सांगा.. 🙂

About महेंद्र

माझा ब्लॉग :- http://kayvatelte.com
This entry was posted in Uncategorized and tagged , , . Bookmark the permalink.

44 Responses to शिंडलर्स लिस्ट

 1. Manmaujee says:

  महेंद्रजी, तुम्ही परीक्षण खूप छान केलय. आता हा सिनेमा पाहिलाच हवा!!!

 2. Ajay says:

  खुप सुंदर सिनेमा आहे. imdb.com वर याला ८.९ रेटींग आहे. ८.९ रेटींग वाले खुप कमी सिनेमे असतात. आणि हा तर १९९३ चा सिनेमा आहे. The Shawshank Re हा ही एक असाच आणि माझ्या मते एक सर्वोत्क्रूष्ट सिनेमा. बा़की सिनेमाच्या बाबतीतली पोस्ट आज तुम्ही टाकलीत म्हणजे मला असाच एखादा सिनेमा पकडुन सांगावस वाटायला लागल आहे. 🙂

  -अजय

  • असे फार कमी सिनेमे आहेत… युध्द पट तर खुप पाहिलेत, पण ह्याच्या सारखा हाच… अवश्य टाका पोस्ट ..

 3. आनंद पत्रे says:

  खुप सुंदर, महेंद्रजी.
  हा सिनेमा मी बर्याच दिवसापुर्वी पाहीला होता पण तुमच्या प्रत्येक वाक्यासरशी माझ्या डोळ्यासमोरुन एकापाठोपाठ सगळे सीन गेले.
  स्पीलबर्गच्या अनेक उत्तम सिनेमापैकी एक…

  • आनंद
   प्रत्येक सीन मी जसा अनुभवला तसाच लिहिलाय.. अतिशय हदयस्पर्शी चित्रपट.. खरं तर हा प्रांत नारायणीचा, पण मला रहावलंच नाही लिहिल्या शिवाय..इतका मी यात गुंतलॊ होतो काल.

 4. gouri says:

  khoop asvasth karanaaraa cinema …

  yogayogane ha cinema delhi madhye lagala temvha tya semister la aamhala 3rd reich abhyasala hote, aani itihaasachyaa pustakanbarobarach the white rose, anne frank, schindlers ark ashi sagali pustake suddha ekach veli vachali hoti … sampurn gosht mahit asatana cinema baghitala ani tarihi mahinabhar neet jhopu shakale navhate me 😦

  kadhitari schindlers list ani anne frank vishayi lihayache aahe … punha tyaa athavani jagya karayala manachi tayari hot nahiye.

  • अगदी खरं.. ह्या सिनेमातले बरेचसे प्रसंग मनावर कोरले गेले आहेत. पुन्हा कधी लागला तर पहावणार नाही मला तरी. जर टॅगिंगची पोस्ट आज असती , तर खुप खुप दिवसानंतर..काल डोळ्यात पाणी आलं असं लिहिलं असतं..

 5. Aparna says:

  महेन्र्दकाका पहिलं म्हणजे फ़ारच हृदयस्पर्शी झालंय…मला पुन्हा एकदा हा सिनेमा सोडावा लागेल मागे पण असंच पेपरमधलं का कुठलं वाचुन मी नव्हता पाहिला…खरं मी फ़ार रियलिस्टिकली पाहाते सिनेमे मग स्वतःलाच त्रास होतो…गोष्ट छोटीच अजुन डोक्यात थैमान घालतेय एकीकडे….खरंच सांगते मला झेपणार नाही…
  पण वाचता वाचता उगाच भाबडा आशावाद…आपल्याकडचा एखादा शिंडलर सहा सहा माळी टॉवर फ़क्त एका कुटुंबासाठी राहायला बांधायचा सोडून करू शकेल का असं काही…कशाला हवीत कर्ज आपल्याला पुढे जायला हे सगळे शिंडलर बनु शकतील आणि करू शकतील का असं काही की स्पिलबर्ग पण म्हणेल याचसाठी केला होता सारा…….जाऊदे..माहित नाही मला काय लिहायचं ते लिहु शकले का…
  आणि हो जाता जाता मी जे काही आजवर तुमच्याशी बोलले त्यात मलातरी कधी असं वाटलं नाही ते काळीज दगडाचं आहे..मला खूपदा त्यात दमलेला बाप, पत्नीवर मनापासुन जीव लावणारा सखा, मदतीचा हात असं बरंच बरंच काही दिसलंय….so take your words back……….
  comment chi post pahilyandach…

  • आधी सुरु झाला , तेंव्हा माहिती नव्हतं की इतका सुंदर सिनेमा आहे हा म्हणुन. पण जेंव्हा सुरु झाला , तेंव्हा मात्र संपुर्ण झाल्याशिवाय उठलो नाही. तसं मी मैन ाधी वाचलं होतं त्यामुले थोड्या फार प्रमाणात स्टोरीलाइन माहिती होती, पण हे प्रसंग मात्र खुप अवघड आहेत बघायला.. ब्लॅक ऍंड व्हाईट असल्यामळे , बरेच प्रसंग त्या काळात नेउन सोडतात.. मस्ट सी.. एकदा तरी…

 6. Suhas Zele says:

  खरच उत्तम चित्रपट होता हा..मी लास्ट यियर बघितला होता. एक न एक प्रसंग डोळ्यासमोर तसाच आहे. खूप छान लिहलय as always 🙂

  • लास्ट लिअर नाही बघितला अजुन.. सध्या तरी काही महिन्यांचा कोटा पुर्ण झालाय अशा सिनेमांचा.. 🙂

 7. vikram says:

  पाहिला नाही अजून परंतु आता नक्कीच पाहणार.

  बाकी तुम्ही परीक्षण खूप छान केलय.

 8. Amol says:

  हा चित्रपट खूप दिवसांपासून मनात आहे, पण बघायला जमलंच नाही. तुम्ही खूप छान लिहिलं आहे… आता मात्र लवकरात लवकर हा चित्रपट बघायला हवा.

 9. Amol says:

  तुम्ही नागपूरचे की यवतमाळचे? मलापण आपल्या विदर्भातला माणूस बघून लई आनंद होऊन राहिलाय!

  • जन्म, बाबा आमटेंचं वरोरा, लहानपण अमरावती पहिली काही वर्ष, मग नंतर यवतमाळला वडिल २२ वर्ष होते. मी सोडलं विदर्भ नोकरीच्या निमित्याने.. सध्या मुक्काम मुंबई.

 10. Anubandh says:

  This is not only a film. This is a real story. Survivors are called as Schindler Jews. They show the real ones during end credits. Must watch. But Liam Neeson could have done better job. You can say that after watching Taken.

  • हो पाहिलं मी.. पण पोस्ट खुप मोठं झालं होतं म्हणुन आवरतं घेतलं. शांतता असतांना पाहिल्यामुळे मनाला खुप भिडला माझ्या..

 11. हेरंब ओक says:

  अतिशय सुंदर चित्रपट आहे हा. खूप रडलो होतो मी. आणि एक्झाक्ली तुम्ही सुरुवात केलीयेत पोस्टची तो प्रसंग आणि अजून एक म्हणजे पूर्ण स्क्रीन वर काळोख, त्यात शहरातली घर दिसताहेत आणि एका वेळी एकच घर उजळून उठतं कारण त्या प्रत्येक घरात तेव्हा गोळीबार चालू असतो. हे २ प्रसंग अक्षरशः कोरले गेले. खर तर आवडलेले सिनेमे ३-४ द बघणार मी हा सिनेमा पुन्हा बघायचं धाडस नाही करू शकलो.

  अजयने सांगितलेला Shawshank Redemption सुद्धा सर्वोत्तम चित्रपटांपैकी एक. पण ९४ च ऑस्कर Forrest Gump ला मिळालं आणि Shawshank सारख्या सर्वोत्तम सिनेमाची संधी हुकली.

  • या सिनेमाला उत्कृष्ट सिनेमाचं पारितोषक मिळालं होतं. सध्या काही दिवस तरी कुठलाच चित्रपट पहाण्याची इच्छा नाही..

 12. bhaanasa says:

  अप्रतिम सिनेमा. असे काही मोजके सिनेमे मनावर कोरले गेलेत. तरीही हा सिनेमा पुन्हा पुन्हा पाहावासा वाटत नाही इतका त्रास होतो छळ पाहताना…. अतिशय हृदयस्पर्शी व स्पीलबर्गच्या अनेक उत्तम सिनेमापैकी एक. तसाच तो Saving Private Ryan (1998) स्पीलबर्गचाच….. तू सिनेमा किती एकरूप होऊन पाहत होतास हे परिक्षणावरून कळतेच आहे. 🙂 आणि हो अपर्णाला दुजोरा….. उगाच काहीही बोलतो आहेस …….

  • ते मी ह्या साठी लिहिलं , कारण सिनेमात कधीच डोळ्यात पाणी येत नाही, ते या सिनेमाने आणले.काही प्रसंग असे मनावर पक्के कोरले गेले आहेत. या मधे जे ज्युनिअर आर्टीस्ट्स आहेत , त्यांनी पण खुपच सुंदर कामं केली आहेत. कदाचित म्युझिकचा पण परिणाम असेल… की सिनेमा इतका जास्त मनाला ’लागुन गेला’ ते..

 13. Neeta says:

  महेंद्र काका,
  माझी हि कॉमेंट ची पहिली च वेळ आहे.. मी रोज तुमचा ब्लॉग वाचते..तुम्ही खूप सुंदर लिहिता..वाचताना असं वाटते कि एखाद्या लेखकाला पण इतके हृदयस्पर्शी लेख लिहिता येत नसतील जितके तुम्ही लिहिता..आज कॉमेंट टाकायची इच्छा झाली कारण तुमचे वाक्य “माझ्या सारख्या दगडाच्या काळजाला पण पहातांना घरं पडलीत” पटले नाही मला..अपर्णा म्हणाली ते एकदम बरोबर आहे.
  असो विषयाकडे वळते..मी हां सिनेमा अजून पहिला नाही पण तुमचा लेख वाचून बघायची जबरदस्त इच्छा झाली..netflix वर टाकला आहे..बघितल्यावर जरूर सांगेन कसा वाटला..!!
  काय असत ना ज्याच्याकडे खूप पैसा असतो ना त्याला फक्त त्याच्या भोवतालचे सगळे दिसते..अशी माणसे खूप स्वार्थी असतात स्वता:बद्दल…मध्ये शिल्पा शेट्टीचे लग्न झाले ती बातमी वाचली..काय तर म्हणे तिने ३ करोड ची “Engegment Ring ” घातली.. आता ह्या ३ करोड रुपयात किती मुले शिकली असती..??????? ह्या सगळ्यांना हा शिंडलर दाखवावा…
  जाऊ दे मन सुन्न होते अशा विचारांनी..

  निता

  • निता
   अवश्य पहा हा सिनेमा. शिल्पा शेट्टीच्या रिंग बद्दल काय बोलायचं.. अर्ध्या हळकुंडात पिवळी झालेली ती.. असो..

 14. तो says:

  excellent moview…

 15. sahajach says:

  मी नाही पाहिलेला अजून हा सिनेमा पण आता नक्की पाहीन…..तुम्ही परिक्षण खुप छान मांडलय……मला वाटतय हा ही एक टॅग लिहा आता……
  पुर्वी लोकसत्ता मधे बोजेवारांच परिक्षण वाचल्याशिवाय मी ठरवायचे नाही की हा सिनेमा पहायचा की नाही ते……आज पुन्हा तसेच वाटतेय तुम्ही लिहीलेले परिक्षण वाचताना…..:)

  • बघु या पुढे कधी असं मनापासुन लिहावंसं वाटलं तरंच लिहिन पुन्हा.. आणि सिनेमा हा नक्की पहा..

 16. swati says:

  post itaka chan zalay ki sagale drishya dolyasamor ubhe rahile…
  nakki baghen mi ha cinema !

 17. काका, मस्त लिहिलंय तुम्ही ! प्रसंग डोळ्यासमोर उभे राहतात.

  अवांतर – एक करेक्शन. मुख्य पात्राचं नाव “शिंडलर्स” असं नसुन “शिंडलर” असं आहे. म्हणुन त्याची लिस्ट … Schindler’s List !

  माझ्या काही आवडत्या चित्रपटांपैकी एक.

  तुम्ही The Shawshank Redemption पाहिलाय का? नसेल पाहिला तर नक्की पहा. अर्थात जसा वेळ मिळेल तसं !

  • नाही. मी फार कमी पहातो सिनेमा.. सध्याचा कोटा पुर्ण झालाय, नंतर पाहिन.. नक्की..मेंदु पार बधीर होतो असा सिनेमा पाहिला की..

 18. अतिशय छान अन विस्तृत वर्णन केलंय काका तुम्ही… पोस्ट वाचतांना पहिले पहिले तर धावता आढावा घेत खात्री पटली की इथे दुसरं महायुद्ध अन हिटलरसंबंधित घटनेवर तुम्ही लिहिलंय… पण जेव्हा पुढे वाचत गेलो तेव्हा मी अतिशय रोमांचित झालो होतो.. इतिहास तर माझा अंतराळानंतर सर्वात आवडता अन कायम जिज्ञासा असणारा विषय, तेव्हा एकन-एक गोष्ट मी मन लावून वाचत होतो… खरंच खुप छान लिहिलंय तुम्ही… मी आतापर्यंत हिटलर आणि दुसर्‍या महायुद्धासंबंधित भरपूर पुस्तके वाचलित, ज्यात “नाझी – भस्मासुराचा उदयास्त” हे वि.ग. कानिटकरांचे पुस्तक मला खुप आवडलेलं… पण त्यात या पात्राबद्दल वाचल्याचे मला आठवत नाही… त्याने दाखवलेल्या माणुसकीचे नेहमीच उदाहरण दिले जाईल. पण काका, जेविश(ज्यू) लोकं खरंच त्या लायकीचे नव्हते, असं माझं ठाम मत आहे, कारण त्या काळात नुसतं जर्मनीतंच नाही तर पूर्ण युरोपभर हा वंश पसरलेला होता. जेविश लोकं, ख्रिस्त, स्लॉव्ह आणि नॉर्डिक(आर्य) वंशियांच्या तरूणींचे- नग्न फोटोज काढणे, त्यांचे अश्लिल मासिके छापणे, कुट्टणखाने चालवणे, अशी अशुद्ध अन कोणत्याही सुसंस्कृत समाजाला पोषक नसलेली कामं करत असत… त्यामुळे ज्यू लोकांबद्दल सर्वच युरोपीय जनतेत असंतोष तर होताच. अन आपण नुसत्या हिटलरच्या कॉन्सन्ट्रेशन कॅम्प्स बद्दल बोलतो/ऐकतो, पण त्याकाळी इतर राष्ट्रांनी(त्यात दोस्त राष्ट्रेही होती!) ज्यूंच्या समूळ उच्चाटनासाठी चालवलेल्या मोहिमांचा उल्लेख दिसत नाही… शेवटी याला एकच कारण आहे, जो जिंकतो, तो जे सांगेल, तेच खरं, असं आतापर्यंतचा इतिहास सांगतो…
  >>>> काका, माफ करा, पण मला थांबता आलं नाही…
  >>>> इतिहासाशी रिलेटेड अजुन एकही पिच्चर मी बघितलेला नाहिये(आमच्याकडे केबलवर हिस्टरी चॅनेल किंवा फॉक्स हिस्टरी दिसत नाही, अन बाकीचे इंग्रजी चॅनेल्स घरच्यांसमोर पाहणं जरा ऑड वाटतं…), अन एखादा बघायला गेलो पण, तर तो माझ्या मनाच्या विरूद्ध निघतो…. तुम्ही सांगितल्या प्रमाणे हा पिच्चर तसा इंटरेस्टिंग आहे, नक्की पाहीन…

  विशल्या!

  • एक सांगतो….
   बघ आता दाउद इब्राहिम हा गुंड आहे म्हणुन त्याच्या मुलांना , बायकोला कॉन्सन्ट्रेशन कॅंप मधे पाठवणं कितपत योग्य आहे?? इथे अगदी १० वरषाच्या मुलांना पण मारलं होतं.. असो. तो एक पुर्ण वेगळा विषय आहे..
   पर्ल हार्बर मधे अमेरिकन्स हारले. ब्रिज टू फार पण तसाच.. असो..

   • >>> काका ते ठिक आहे, महिलांना अन लहान मुलांना अशी वागणूक देणं हे नेहमी माणुसकीला गालबोट लावणारं असतं आणि असायला पण हवंच… पण त्या जेविश लोकांनी केलेली कृत्ये ही माफीच्या लायकीची तर बिल्कुलच नव्हती, असो…
    >>> आत्ता आपल्याकडे असलेला कसाब, त्याच्या कृत्याची शिक्षा, त्याचे आई-वडील(त्याला दहशतवादी बनवण्यात त्यांचा सहभाग नसेल तरंच!) किंवा त्याचे इतर आप्तमंडळी (जे निरपराध असतील, ज्यांच्या कसाबच्या कृत्यात तिळभरही वाटा नसेल, असे), यांना शासन करणं कधीच योग्य ठरणार नाही, ते माणुसकीच्या तसेच सत्याच्या विरोधात होईल.
    >>> काका, तुमचं म्हणणं मला पटतंय, पण माझ्या मनात जेविश लोकं (या शिंडलरसोबत असणारे सोडून किंवा असेही काही असतात जे स्वतःच्या समाजातील बांधवांच्या विरूद्ध काम करतात, असे सज्जन लोकं सोडून), ज्यांनी नेहमी समाज दुषित करण्याचं अन समाजात (ज्यांच्यासमवेत ते राहत असत त्या समाजांत) घातक अशी ढवळाढवळ करण्याचं काम केलं, ती लोकं कधीच मानाचं स्थान मिळवू शकणार नाहीत.
    >>> पर्ल हार्बर या अमेरिकेच्या सत्ता असलेल्या बेटावर जपानी सेनेने ४५ साली केलेले हल्ले हे महायुद्धाच्या काळातील होते, शेवटी ते महायुद्ध होतं, अन तिथे सामान्य जनता राहत नव्हती तर अमेरिकेचे सुसज्ज असे आरमार होते, जपानच्या विरोधात वापरण्यासाठी बनवलेले! तेथे मेलेले लोकं हे फक्त सैनिकं (अमेरिकन) होते, ना की सामान्य जनता(अमेरिकेची)! लोकं(निरपराध) मेली ती ६ अन ९ एप्रिल १९४५ ला, जपानच्या हिरोशिमा अन नागासाकी या शहरांवर अमेरिकेने टाकलेल्या (माणुसकीला आतापर्यंतचे सर्वात मोठे गालबोट!) सलग दोन अणु-बॉम्बांमुळे… रेडिओऍक्टिव उत्सर्जनामुळे तेव्हाच्या अस्तित्वात असलेल्या ९९ टक्के सजीवांचे जीन्स चेन्ज झाले, काहींना हात येत नाहीत, काहींना डोळे…!!! तिथल्या पुढील १० पिढ्या (निरपराध!!!) अणुवांशिकतेच्या माध्यमातून फुकटची अन आपल्याला लाज वाटेल अशी शिक्षा भोगत आहे अन भोगेल, आपण ते टाळू शकतच नाही. अन या घटनेला सर्वस्वी जबाबदार असणारे लोकं अजुनही मानानं जगताहेत अन काही ८०-९० वर्षे वय पुर्ण करून आरामात गचकली…!!! महायुद्ध हरल्यानंतर मित्र राष्ट्रांनी (परा)जितांकडून अमाप मुल्य वसुलले, हा काय न्याय म्हणायचा! यावरून माझं असं मत (पक्कं) झालं आहे की जो जिंकतो, तो (अन फक्त तोच) जे म्हणेल ते सर्वांनी ऐकावं अन मान्य करावं… आजचे बहुतेक ७० टक्के साहित्य (माहिती) हे दोस्त राष्ट्रांनी ओरिजिनल मध्ये ढवळाढवळ करून (त्यांच्या हितासाठी!) जनतेसमोर (आपणच!) आणते…. त्यामुळे खरं काय नि खोटं काय, हे समजणं तसं मधातली/दुधातली भेसळ ओळखण्यासारखंच आहे….
    जे दोषी आहेत, ते आजही (सन)मानाने जगताहेत, त्यामुळे माझ्या मनात तीव्र असंतोष आहे, काका… आत्ताचेच लेटेस्ट उदाहरण: कोपनहेगेनमध्ये घडलं होतं, मी त्यासंबंधित इथं लिहिलं होतं…
    >>> पुन्हा एक वेळ माफ करा काका, मी दुसर्‍याच विषयाकडे भरकटलो…
    >>> प्रत्युत्तर अपेक्षित आहे…

    विशल्या!

    • कुठल्याही परिस्थितीत निष्पाप नागरीकांवरचे हल्ले समर्थनिय होऊ शकत नाहीत. ज्यु लोकं हे हाडाचे व्यावसायीक. जसे आज आपल्या कडे व्यावसाईक म्हंट्लं की गुजराथी , मारवाडी लोकांची नावं घेतली जातात, तशीच ज्युंची इतर देशात..
     अर्थात कुठल्याही युध्दाची कहाणी ही जो जिंकेल त्याच्याच बाजूने लिहिली जाते.
     अमेरिकेचा पण पराभव झाला होता, पर्ल हार्बरला एवढंच मला सांगायचं होतं.

 19. हा चित्रपट मला मिळूनही मी पाहिला नव्हता की त्याचं कुठेही परिक्षण वाचलं नव्हतं. आता पाहीन. दुस-या महायुद्धावर बेतलेले, हिटलरच्या छळछावण्यांची दृश्य असलेले चित्रपट पहाताना आत काहीतरी होत रहातं. हे सगळं होऊन गेलंय, जे सुरु आहे तो चित्रपट आहे, हे माहित असतानाही बघताना खूप त्रास होतो. ’द बॉय इन स्ट्राइप्ड पैजामाज’ हा चित्रपट मिळाला तर पहा. खूप छान आहे.

  • एकदा हा युध्दपट पाहिला की पुढचे काही महिने पुन्हा याच विषयावर सिनेमा पाहु शकत नाही मी !! खुप मनाला भिडतात हे सिनेमे..
   पण या ब्लॉग पोस्ट च्या निमित्ताने बरेच चांगले चित्रपट समजले.. आता पुन्हा पहायचे, तेंव्हा नावं हाताशी रहातील..

 20. पाहिला नाही हा सिनेमा पण तुमची पोस्ट वाचल्यावर पहावासा वाटतो आहे…

 21. मृदुला says:

  परीक्षण भावले.

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s