कान्ट यु सी? आय ऍम बिझी?

दिवसभर कॉम्प्यूटर च्या समोर बसून,   एस ए पी च्या त्याच त्या स्क्रिन्स बघून, कंटाळा येतो आपल्याला. बरं जरी एसएपी वर जास्त काम नसलं तरीही, रिपोर्ट्स  डाउन लोड करुन बघायचे, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे  पेमेंटस फॉलो अप करणं…सेल फिगर्स बघून शॉर्टफॉल असलेल्या भागातल्याल्या लोकांशी संपर्क साधायचा, वगैरे बरीच  कामं असतातच…

आणि ते काम झाल्यावर  आउटलुक मधे तर सारखे घागरीत नळाखाली धरल्यावर थेंब थेंब पाणी गळावे तसे एका पाठोपाठ एक इ मेल्स येतच असतात.

तुम्ही पण सचिन जसा   प्रत्येक बॉल लिलया सीमेपार धाडतो, त्या प्रमाणेच प्रत्येक इ मेल ला  दुसऱ्याच्या इन बॉक्स मधे टोलवत असता-बरेचदा एफ वाय एन ए ( फॉर युवर नेसेसरी (?) ऍक्शन)  म्हणून किंवा एफ.वाय. आय. प्लिज.. म्हणजे ( फॉर युवर इन्फो प्लिज) करुन.

पाचच मिनिटात तोच इ मेल पुन्हा तुमच्या इन बॉक्स मधे दिसतो… तुम्ही ज्याला पाठवला त्याने तो कुणाला तरी फॉर्वर्ड केलेला असतो.. प्लिझ रेफर ट्रेलिंग मेल फ्रॉम एक्स वाय झेड ऍंड प्लिज  ऍडव्हाइस द स्टेटस…. ( जे तुम्हाला कधीच मिळत नाही) असा हा इमेल-इमेल चा खेळ दिवसभर सुरु असतो.

बरेचदा लोकं ऑफिस मधे टी टी पण खेळतात. म्हणजे  एखादं काम आलं की ते काम टेबल टु टेबल ( टीटी ) टोलवत रहातात, निर्णय  घेणं टाळून हा खेळ चांगलाच रंगतो. मग मिटींग मधे मी ह्याला मेल दिला होता, हा म्हणतो त्याला मेल दिला होता आणि ब्लेम गेम सुरु होतो..

एखाद्या कामासाठी   मेल केला, की बॉक्स मधे आल्या आल्या तो अजुन चार पाच लोकांना फॉर्वर्ड करुन परत तुम्हाला पण कॉपी मार्क केलेली असते, हे सांगायला की मी ऍक्शन घेतली आहे  तुझ्या मेल वर..बरेचदा तर  मी तुझा मेल रिस्पॉन्सिबल लोकांना फॉर्वर्ड केलाय आता ते उत्तर  देत नाहीत तर मी काय करू?  बस, एक इ मेल केला .. माझं काम झालं.. अशी पण अटिट्युड दिसुन येते..

बरं लोकांना अजुन एक सवय असते, मेल केल्यावर लगेच फोन करतात विचारायला ’ मेल मिळाला का? मी म्हणतो, हो, मिळाला. ( मनातल्या मनात म्हणतो  की आता फिमेल पाठव!!!! हे आपलं उगाच गम्मत बरं का.. हा जोक फार फेमस होता १९९९ मधे)  ”  इ मेल पाठवला तर मिळेलच नां.. जाईल कुठे तो.. पण  नाही.. ताबडतोब फोन करुन  विचारायची गरज काय? लोकांचा अजुन इलेक्ट्रॉनिक मिडिया वरचा विश्वास बसलेला नाही  बहुतेक..  बरं मेल मिळाला म्हटल की पुन्हा पाच मिनिटात पुन्हा फोन करुन लोकं  विचारतात की   हं.. तुला काय वाटतं मग, ( त्याने जो  इ मेल पाठवला त्याबद्दल?).. अरे बाबा कुठे आग लागली आहे कां? इतकी काय घाई आहे??वाचु तर दे आधी मग सांगतो.. !!असो..

पण ही मेंटॅलिटी भारतामधे खूप आहे. जसं मुंबईचे बाइक वाले रस्त्यावरून जातांना – डाव्या लेन मधुन जात असताना   एकाएकी उजव्या साईडचा हात दाखवून दोन लेन्स कट करुन जसे अगदी हक्काने  उजवीकडे वळता.. आणि ही पण अपेक्षा ठेवतात की सगळ्यांनी थांबलंच पाहिजे -“अहो हात दाखवला होता नां.. मग?? “म्हणजे  त्याने नियम पाळला ना??  आणि जर तुम्ही ब्रेक मारला,आणि त्याला थोडा धक्का जरी लागला तर ताबडतोब बाईक उभी करुन भांडायला येइल आणि  तुम्हाला कायदे शिकवेल तो माणुस. .. हात दिखाया था नां.. दिखता नै क्या??

अगदी सेम टु सेम असतं , ऑफिस मधे. मेल पाठवला होता नां?? मग??  इ मेल ही कम्युनिकेशन  फॅसिलिटी म्हणून न वापरता ब्लेम गेम साठी जास्त वापरली जाते असे माझे तरी मत झालेले आहे.

बरेचदा अशा गमती जमती घडतात..एक अजुन गम्मत असते, काही सबॉर्डीनेट्स  मेल पाठवतात हे केवळ आपली जबाबदारी टाळायला. तुम्ही मॅनेजर आहात, मग तुम्हाला एखाद्या सबॉर्डीनेटने एखादा इशु रेझ केला  म्हणण्यापेक्षा काम कसं केलं जाऊ शकत नाही हे लिहिलं, आणि तुमचा सल्ला मागितला -(आता आयटी वाले प्रॉब्लेम्स ला इशू म्हणतात ना? म्हणून तो शब्द वापरलाय, तसं आम्ही मात्र प्रॉब्लेम ला प्रॉब्लेमच म्हणतो.) आणि समजा तुम्ही विसरलात त्याला उत्तर द्यायला, तर बी शुअर यु आर लाइकली टू बी कॉर्नर्ड व्हेन यु ट्राय टु टेक द स्टॉक ऑफ सिच्युएशन.. नंतर कधी तरी तुम्ही त्या  मधे अडकलात,  आणि   विचारलं, की काय रे बाबा, कामाचं काय झालं? तर उत्तर येतं.. मेल पाठवला होता सर तुम्हाला….. !!!

अशी परिस्थिती कशी हॅंडल करायची हे प्रत्येकाचं वेगळी पद्धत असते. बरेच लोकं.. अरे हो कां?? मी विसरुनच गेलो बघ .. असं म्हणतात तर काही लोकं  सरळ  ऑफेन्सिव्ह होतात .. मेल पाठवला म्हणजे झालं का? अरे फोन का नाही केलास? दिवसभरात इतके मेल्स येतात ,  मला तेवढंच काम आहे का? तुझं काम आहे, तेंव्हा तूच आठवण करुन द्यायची नाही कां??  हाउ कॅन यु बी सो  इर्रिस्पॉन्सिबल??   आय ऍम गोइंग टु रिमेंबर युवर  धिस काइंड ऑफ अटीट्य़ूड..

बरेचदा सबॉर्डीनेट   नुसता फोन करतो इ मेल करित नाही , तेंव्हा पण तुमच्याकडुन काम करायचं राहुन गेलं, तर मग अरे इ मेल का नाही पाठवलास? तु सांगितलं मला पण, इतकी कामं असतात, की लक्षात रहात नाही. यु मस्ट सेंड अ नोट , इमिडिअटली आफ्टर डिस्कशन्स.. असंही हॅंडल करतात .

येणाऱ्या इमेल्स मधे एखादा फॉर्वर्ड पाठवणाऱ्या मित्राचा इ मेल आधी पाहिला जातो उघडून.. असो.. खूपच भरकटलंय हे पोस्ट, मी खरं तर हे पोस्ट सुरु केलं होतं ते  या वेब साईट बद्दल सांगायला. की ज्या मधे असे गेम्स आहेत की तुम्ही खेळत असतांना बॉस जरी समोर आला तरीही त्याला कळणार नाही.  सगळे ऑन लाइन गेम आहेत.. अवश्य ट्राय करा…

About महेंद्र

माझा ब्लॉग :- http://kayvatelte.com
This entry was posted in कम्प्युटर रिलेटेड. Bookmark the permalink.

16 Responses to कान्ट यु सी? आय ऍम बिझी?

 1. madhuri says:

  खरे आहे तुम्ही म्हणता ते. आलेले मेल्स फटाफट सॉर्ट करणे हा एकच उपाय.
  फॉरवर्ड वाले आणि अजून १० लोकांना पाठवा वाले तर लगेच डिलिट करते मी.
  गेम्स चांगले आहेत. बॉस थोडे दिवस तरी फसेल.

  • मी स्वतः सेपरेट फोल्डर्स बनवुन ठेवले आहेत आउटलुक मधे. त्यामधे प्रायोरीटीवाइझ सगळे मेल चेक करतो. (बॉसचे आधी 🙂 )
   त्यामुळे बराच प्रॉब्लेम कमी होतो.
   आणि बॉस नक्कीचफसेल. थोडे काय भरपुर दिवस.. बेस्ट लक.. 🙂

 2. Aparna says:

  आउटलुक खूपच चांगलं आहे..मागे एका क्लायन्टकडे लोटस नोट्स होतं त्यामुळे मेल सॉर्टिंग जमायचंच नाही नीट…इतकं पेंडिंग इतकं पेडिंग की कलिगबरोबरची कामं सेम टाइमवरच करायचो…
  आणि मेल करून फ़ोन करायची खरंच काही लोकांना इतकी वाईट सवय आहे नं…फ़ॅक्स झाल्यावर पुन्हा फ़ोन केल्यासारखं..मुळात काम दिल/घेतलं की पुढचा विश्वास नावाची चीज आहे हे नाही ना…

  • कोणाचा फोन आला की मेल केलाय म्हणुन, तेंव्हा मला तर खुप राग येतो. किती फॉलोअप करायचा एखाद्या गोष्टीचा.. दुसरं म्हणजे कोणाला काम सांगितलं की मग विश्वासच नसतो..

 3. नविन “टेक्निकल” पोस्ट वाचायला मिळाली. अगदी खरं – एफ.वाय.आय. च्या ई-मेल्स आणि त्यांचं फोनवरुन कंफरमेशन !
  आणि हो – आय.टी. वाले प्रोब्लेम्सला इश्शु म्हणतात – अगदी मान्य… मी आय. टी. वाला आणि त्यातही आय्.टी. च्या “आय.टी.” डिपार्टमेंटला..!

  • दिपक
   या इ मेल मुळे ऑफिस पॉलिटिक्सला एक वेगळंच डायमेन्शन प्राप्त झालंय… टेक्नॉलॉजी चांगली असते, पण तिचा उपयोग किंवा दुरुपयोग करणं आपल्याच हातात असतं..

 4. आल्हाद alias Alhad says:

  व्वा!
  भन्नाट प्रकार आहे हा!!

 5. वॉव.. हे भन्नाट आहे एकदम. आत्ताच कॉस्ट-कटर आणि ब्रेक-डाउन खेळलो. मस्तच आहे..

 6. bhaanasa says:

  me sudhaa he forwardwale mail fatafat delete karun takate. Nsata vaitag. game check karate…:)

 7. ऑफीस होतं, तेव्हा या मेलींगचा खूप कंटाळा यायचा. आता जरा सुखावह अनुभव आहेत. ही साईट पहाते.

  • हे गेम्स फक्त ऑफिस मधे खेळायचे आहेत. गेम खेळाल, तरीही कोणी पाहिलं तर असं वाटेल की तुम्ही काम करित आहात.. 🙂

 8. Arun Joshi says:

  LOtus notes madhe, Sent Mails are not classified into folders. DOes anyone know how to do that?

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s