तमस…

ऍंटी हिंदु बायस असलेली ही  मालीका….

साहित्य  अकादमी अवॉर्ड विजेता .. १९७५ सालचा.. भिषम सहानी .. यांनी लिहिलेल्या कादंबरीवर एक सिरियल काढल्या गेली होती १९८७ मधे. कदाचित बऱ्याच लोकांना माहिती पण नसेल, पण ती सिरियल सुरू झाल्याबरोबर एक विचित्र लाट आली होती भारतामधे… बऱ्याच लोकांना ही सिरियल हिंदूना बदनाम करण्यासाठी  दाखवली गेली आहे.. कारण  खाकी अर्धी चड्डी घातलेले आणि काळी टोपी घालुन हातात दंड घातलेले लोकं यात दाखवले गेले आहेत.जे काही भांडणं मारामाऱ्या सुरु  झाल्या आहेत त्याचे कारण….. असो.. तुम्हीच बघा काय आहे ते आणि आपले मत बनवा..

१९४७ च्या पार्टीशनचा काळ , आणि त्या अनुषंगाने होणाऱ्या घटना.. यांचे चित्रीकरण केल्या गेले आहे या मालिकेमधे.गोविंद निहालानी ने ही सिरियल प्रोड्युस केली होती. ऍंटी हिंदू बायस असलेली ही  मालीका  बऱ्याच हिंदू लोकांना  ( इन्क्लुडींग मी )  खूप मानसिक त्रास देऊन गेली .

या सिरियल मधे हिंदूंना रक्तपिपासू दाखवलं गेलं आहे. मी इथे जास्त काही लिहित नाही, फक्त  ती सिरिअल इथे पोस्ट करतोय. संपुर्ण सिरियल  आहे, न पाहिली  असल्यास  पहा , बरीच मोठी  ( पाच तासाची – एक तासाचे पाच भाग आहेत) सिरियल आहे..

जर ही मालिका पाहिलेली नसेल तर अवश्य पहा…  सगळे भाग इथे  आहेत . एकानंतर दुसरा सुरु होतो.

About महेंद्र

माझा ब्लॉग :- http://kayvatelte.com
This entry was posted in मनोरंजन and tagged , , , , , . Bookmark the permalink.

23 Responses to तमस…

 1. Nikhil says:

  you are great… I have just seen ‘Garam Hawa’ and ‘Mammo’…and was in the same phase of thoughts… starting so see now. Would like to contact you later

  • निखिल
   ही मालिका एकदा नक्कीच पहायला हवी. तुमची या मालिकेवरची विस्तृत प्रतिक्रिया वाचायला आवडेल.. 🙂

 2. खूप लहान असताना बघितली आहे ही मालिका. काही आठवत नाही. पण तेव्हा बरेच वाद-विवाद झाले होते ते अंधुकसं आठवतंय..

  • तेंव्हा ही मालिका पाहिल्यावर खुप चिड यायची, पण मालिका अशी होती की पाहिल्या शिवाय रहावत पण नव्हतं. खुर्चीलाखिळवुन ठेवण्याचं सामर्थ्य आहे या मालिकेत.. मस्ट सी..

 3. Suhas Zele says:

  बाप रे..खूप भयानक आहे हे..बघून कसातरीच झाला. एवढे मोठे कलाकार आहेत ह्यात..त्यावेळी तर मोठा संताप उसळला असेल नाही का महेन्द्रजी?

  • सुहास
   तेंव्हा बऱ्याच प्रतिक्रिया उमटल्या होत्या. पहातांना राग यायचा पण पाहिल्या शिवाय रहावत पण नव्हतं.. सगळे भाग पाहिलेत कां? मला पण पुन्हा एकदा पहायची आहे.

   • Suhas Zele says:

    सगळे नाही बघितले काल..तीन पाहिले, आज बघेन बाकी..पण रात्री २ ला जेव्हा बघत होतो खुप अस्व्यस्थ वाटला पण बघितले न राहवून…

    • एकदा तरी पहायलाच हवे हे भाग. एकदा पहाणं सुरु केलं, की मग जरी एकांगी असलेलया या मालिकेचा पुढिल भाग खुणावत असत्तो….

     • Suhas Zele says:

      महेन्द्रजी…४ पार्ट्स बघून झाले आणि हे बघता बघता बाबानि बघितला मला आणि खरडपट्टी काढली माझी खूप..त्याना खूप राग आला 😦

      • अरे बाप रे.. कशा बद्दल ? पाहिला म्हणुन…??
       तमस ही मालिका खुप गाजली होती त्या काळी, अर्थात उच्च वर्गात. रात्री उशिरा दाखवली जायची. पाहिली की राग यायचा, आणि न पाहिली की अस्वस्थ.. अशी परिस्थिती होती.. काही मालिका उगिच मनात घर करुन रहातात, त्यातली ही एक…

       • Suhas Zele says:

        हो..मला सांगता येणार नाही की मला नक्की आवडली की नाही ही सीरियल पण बघायचा मोह सुटत नाही खूप चीड आली तरी…खुपच सीरीयस वाटताय काल रात्री पासून.. डोण्ट नो काय होतय

 4. anukshre says:

  हो महेंद्र्जी, मला आठवली मालिका. त्या वेळी आईने मला दम दिला होता. बाहेर कुठेही वचावच बोलू नकोस. मी कॉलेज ला असताना आली होती ही
  मालिका. बराच मनस्ताप निर्माण झाला होता. पण मालिका खिळवून ठेवणारी नक्की होती. तुम्हाला इतक्या वर्षानंतर कशी काय आठवली? बरे
  झाले म्हणा बऱ्याच वर्षांनी पुन्हा उजाळा मिळाला.

  • पुन्हा एकदा पहायला हरकत नाही. मला बरंच विसरल्यासारखं झालंय, म्हणुन पहातोय पुन्हा एकदा..

 5. अनिकेत says:

  हो आठवली ही मालीका, लहानपणी उशीरा रात्री लागायची तेंव्हा बघायचो. पण सगळी आठवत नाही. टायटल्स यायची ते चित्र अजुनही आहे डोळ्यासमोर.

  आता बघीन इथे सवडीने

 6. bhaanasa says:

  Mahendra, hi Malika mala changlich aathavate aahe. sampurna pahilihi aahe. atta ghari parat aale ki punha he sagale bhaag pahin. thode visarayala zaley pan aata punha pahile ki sagale aathavel. thanks a lot re tu he bhaag post keles.

 7. ही मालिका टि.व्ही.वर आली, तेव्हा मी लहान होते. काही कळलीच नव्हती. आता पाहिन.

 8. nileshwani says:

  i want to see this serial i want to buy the cds of this serial

  • निलेश
   सिडी आहेत की नाही ते माहिती नाही, पण इथे यु ट्युब वर सगळे सिरियल आहे अव्हेलेबल.. 🙂

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s