ब्लॉग वर न लिहिण्याची कारणं…

आता एक वर्ष होत आलंय ब्लॉगींग सुरु करुन.. माझ्या प्रमाणेच बरेच लोकं रेग्युलर ब्लॉगिंग करताहेत – काही तर कित्येक वर्षापासून करताहेत ब्लॉगींग…. पण कधी तरी अशी   वेळ येते, की काहीच विषय सापडत नाही लिहायला 😦

मला स्वतःला आपला लेख लिहिलेला आवडतो. कुठला तरी   एखादा लेख सिझरीन करुन  डिलिव्हर केल्या सारखा काढायला काही मजा येत नाही. त्या पेक्षा न लिहिलेलेच बरे असे वाटते.

ब्लॉग वर दोन दिवस काही लिहिलं नाही तर लगेच मित्रांचे फोन येतात…. का रे बाबा काय झालं? लिहिलं नाहीस गेले दोन दिवस?? सगळं ठिक आहे ना??आता ब्लॉग वर का लिहिलं नाही  असं जेंव्हा कोणी विचारतं , तेंव्हा याची  ही अशी  ’काय वाटेल ते’ कारणं दिली जातात,   तेंव्हा मात्र त्यामधे काहीच अर्थ नसतो, हे तुम्ही पण जाणताच…
एकच उत्तर नेहेमी देउन चालत नाही, म्हणून  यावर प्रत्येक वेळेस वेगळं ऊत्तर शोधून द्यावं लागतं.. त्यातली काही उत्तरं. खाली दिलेली आहेत..

१)खुप  काम वाढलंय हल्ली, त्यामुळे अजिबात वेळ नसतो नेट वर यायला.. ( आता अमिताभ बच्चन , ज्याचा प्रत्येक सेकंद लाख रुपयांचा आहे तो पण वेळ काढतो नेट वर लिहायला, तेंव्हा हे कारण मान्य होऊ शकत नाही.. )

२)प्रमोशन झालंय, काम वाढलंय.. ( प्रमोशन झालं, म्हणजे सबॉर्डीनेट्स वाढले आहेत हाता खालचे, तेंव्हा आता काम वाढलंय म्हणण्यापेक्षा, रिस्पॉन्सीब्लिटी वाढली आहे, काम कमी झालंय असं म्हणणं जास्त योग्य ठरेल)

३)काही दिवसांसाठी टुर वर गेलो होतो म्हणून लिहिणं जमलं नाही. ( टुर वर तर दिवसा काम असतं, रात्री काय काम असतं ?? अरे बेवड्या जरा कमी पी अन एखादं पोस्ट टाक नां…  )

४)रस्त्यावर खोद काम सुरु आहे.. ब्रॉड बॅंड कनेक्शन मधे प्रॉब्लेम आलाय. ( १०० टक्के …खोटं बोलताय राव)

५) काय करणार लिहुन? कोणी वाचतंच नाही फारसं लिहिलेलं.. कशाला उगाच वेळ वाया घालवायचा.. ( सरळ सांगावं की सुचत नाही लिहायला म्हणून)

६)बायको करवादते घरी लॅप टॉप सुरु केला की.. ( हे बाकी खरं असु शकते बरं.. )

७) मुलांची परीक्षा आली आहे जवळ, त्यांचा अभ्यास  घ्यावा लागतो.. ( जरा सांभाळुन, कशाला उगीच  मुलांच्या अभ्यासात लक्षं घालता ??  आता ’तुम्ही’  अभ्यास घेतला तर मुलं नापास होतील  नां..)

८) बायको माहेरी गेली आहे , म्हणून काही लिहायचा मुड येत नाही- (हा बहाणा, जर नविन लग्न झालं असेल तर..आणि हो… मला तर हे खोटं वाटतंय.. नविन लग्न झालं असतांना….  बायको असतांना तुला लिहायचा मुड येतोच कसा म्हणतो मी??)

९) बायको माहेरी जात नाही…घरी खुप कामं करुन घेते राव… ( हे  जर लग्न होऊन बरेच दिवस झाले असतिल तर.. इतकं खरं बोलणं बरं नव्हे ईंटरनेटवर.. )

१०) कार खराब झाली, आमच्या कल्लु मिस्त्री कडे दिवसभर उभं रहावं लागलं, क्लच प्लेट बदलुन घेतली नां म्हणुन.. ( एकदम खोटं, कार तर कल्लू घरुन घेउन गेला होता.. होम डीलिव्हरी आहे हल्ली सगळी कडे… )

११)लग्नासाठी मुली पहातोय म्हणून ब्लॉगिंग ला वेळ मिळत नाही.( मुली पहायला किती वेळ लागतो?? आणि अशी मुली पहायची वेळ का यावी रे तुझ्यावर? चांगला हॅंडसम तर आहेस तु?? पटव की एखादी फक्कडशी मुलगी? तुम्ही आजकालची मुलं म्हणजे बस… आम्ही बघ बरं….  )

१२) लग्न जुळलंय म्हणून वेळ नाही.. ( हं .. हे कारण बाकी पटु शकतं )

१३)बायकोने ब्लॉग वाचला, म्हणून बंद केलंय लिहिणं… ( आता ब्लॉग वर असं काय आहे की बायको चिडली ?? हे सांगा ना राव….? )

१४) ऑफिस मधे ऑर्कुट, फेस बुक, ब्लॉगींग ब्लॉक केलंय.. अगदी मिरर साईटवर पण उघडत नाही. ( अरे लॅप टॉप सोबत डाटा कार्ड दिलंय ना, ते वापरायचं ऑफिस मधे.. )

१५)ऑफिस मधे बरेच लोकांनी ब्लॉगिंग सुरु केलंय म्हणून.. ( बरं मग ?? )

१६) अनिकेतच्या ब्लॉग ला पहिलं पारितोषक मिळालं,  भुंगाच्या ब्लॉग ला दुसरं.. स्टार माझाचं, म्हणुन बॉस ने ब्लॉगींग सुरु केलंय,आणि त्याला वाटतंय की त्याला पण बक्षीस मिळेल आता…  . ( आता जर मी ब्लॉगींग सुरु ठेवलं, आणि जर मला पहिलं पारितोषिक मिळालं तर.. के आर ए बोंबलला नां….. !!! मग नो इन्क्रिमेंट नो प्रमोशन.. बोंबला नुसतं… कशाला उगाच विषाची परिक्षा पहायची राव?? जाउ द्या .. )

१७)नवीन विषय नाही मिळत लिहायला म्हणून.. ( हे खरं असु शकते, अरे जुनेच विषय घे ना. नइन कशाला हवा??)

१८) इतके विषय आहेत, पण सगळेच त्याच त्या विषयांवर लिहितात म्हणुन मी नाही लिहिलं.. ( सरळ सांगावं, की हा विषय ( म्हणजे जो इतरांना सुचला  तो )  मला सुचलाच नाही म्हणून )

१९) ऑफिसात पिंक स्लिप्स वाटणं सुरु आहे , कशाला उगाच वेळ घालवायचा इकडे ब्लॉगींग मधे.. त्या पेक्षा काम करावं .. (फॉर अ चेंज..???  )

२०)रेसेशन आहे भाउ.. लै इशुज आहेत ( ऐकलंय की माझा पण नंबर आहे लिस्ट मधे म्हणून थोडं कामं करतोय सिरियसली)

२१)लै झालं.. आता थोडे दिवस सुट़्टी द्यावी म्हणतोय .. ( आता  विषय संपले म्हणुन.. )

२२) काही नाही.. फक्त एक महिना बंद करतोय, लवकरंच सुरु करीन.

२३) ब्लॉग वर लिहिल्याने काय फायदा? पैसा वगैरे तर मिळत नाही, वेळ मात्र जातो उगीच.. ( डॉट कॉम साईट सुरु करायची आहे. वर्ड प्रेस ला जाहिराती घेता येत नाहीत. )

२४)विषय सांगा लिहितो..

२५) नविन ब्लॉग सुरु करणार आहे इंग्लिश मधे, म्हणून या ब्लॉग वर आता जास्त लिहिणार नाही ( खरंच??? )

२६) लोकं शिव्या घालतात .. काहीच्या काही लिहितो म्हणून. ( किती दिवस शिव्या खायच्या??)

२७) बायकोने जर पुन्हा ब्लॉग लिहिला तर सोडुन देईन अशी धमकी दिलेली आहे .. ( अरे किती वेळ नेट वर असतोस??)

२८)मी म्हणजे पुलंच्या/वपुंच्या सारखा लेखक आहे, उगिच काही तरी खरडायला आवडत नाही मला …  ( कीती हसु येतंय असे बहाणे ऐकले की…)

२९) लोकांच्या सहनशक्तीचा अंत पहाणं बरं नाही, म्हणून..  ( म्हणजे स्वतःची लायकी समजली म्हणायची!! )

३०)कंटाळा आलाय..

३१) कॉमेंट्स नाहीत राव.. कशाला लिहायचं??

३२) आळशी पण आलय बस..

३३) दुसऱ्या ठिकाणी इंटर्व्ह्यु दिलेला आहे, तिथे जास्त काम आहे, म्हणुन प्रॅक्टीस करतोय … काम करायची ..

३४) लेख चोरी होतात राव.. कशाला लिहायचे??

३५) लोकांचा गैरसमज होतो माझ्या लिखाणामुळे.. म्हणून.. ( हे खरं असु शकतं.. )

तर मंडळी अशी अनेक कारणं सांगता येतील. जर काही सुटली असतील, तर तुमच्याकडून ऍड करा, म्हणजे लेख पुर्ण होईल..

About महेंद्र

माझा ब्लॉग :- http://kayvatelte.com
This entry was posted in कम्प्युटर रिलेटेड and tagged , , , , , . Bookmark the permalink.

54 Responses to ब्लॉग वर न लिहिण्याची कारणं…

 1. अरे बा…..परे… ३५ कारणं..! यातलंच एखादं सांगुन मी बर्‍याचदा वेळ मारुन नेली आहे…. चला मला सांगायला आणखी काही सापडली 🙂
  एक सांगु?… या कारणांवरही पोस्ट होऊ शकते, हे मात्र कधीच सुचलं नाही… !

  • खरंच आज अजिबात काही सुचत नव्हतं लिहायला, एका मित्राने फोन केला आणि ज्या गप्पा झाल्या त्याच इथे टाकल्या आहेत.. 🙂

 2. Manmaujee says:

  महेंद्रजी, क्या बात है!!! भन्नाट कारण आहेत सगळी!! आज अगदी चौफेर फटाकेबाजी झाली आहे!!

 3. Pingback: Tweets that mention ब्लॉग वर न लिहिण्याची कारणं… « काय वाटेल ते…….. -- Topsy.com

 4. gouri says:

  chala majhi changali soy kelit tumhi 😀

 5. बाप्पाsssरेsss….!!! एवढी कारणं आतापर्यंत वापरलीत काका तुम्ही…!!! मी तर फक्त मागे पेपर चालू होते म्हणून काही नाही लिहिलं… पण तुमची ही लिश्ट पाहून तर माझे बूबूळं बाहेर येणार होते…!!! 😉
  ते काही असो, पोस्ट मात्र इंटरेस्टिंग जमलियं काका…! 😀

  विशल्या!

 6. माझ्या कीबोर्डची शाई संपलीये.

 7. आनंद पत्रे says:

  “ब्लॉगवर लिहिणे म्हणजे पारंपारीक लिखाण पद्धतीचा अपमान आहे, लिहायची आहेत तर हस्तलिखिते लिहा, नाहितर सरळ पुस्तकं छापा” असं पुरानमतवादी म्हणतात. मला त्यांच्याबद्दल आदर म्हणुन मी लिहीने बंद केले आहे. 🙂

 8. vikram says:

  लग्न जुळलंय म्हणुन वेळ नाही.. ( हं .. हे कारण बाकी पटु शकतं )

  चला हे कारण पटू शकते न ?

  कारण मी हे कारण देऊ शकतो आता २५ ला engagement झालीय 🙂

 9. धमाका आहे. एक कारण तुम्ही सोडलंत, तर आम्ही लिहू ना! मला शक्य झालं असतं तर मी जमिनीवर गडाबडा लोळले असते. पण नको, खालच्या माळ्यावरची गुल आंटी वर येईल. तिला हे सांगितलं तर ती म्हणेल, “अख्खा डिवस तू ते डब्बाच्याशमोर बशते आनि काय लिवटे बी नाय. आनि डुसरा कुनी बिचारा नाय निवायचा रिझन देते, तर त्यालाबी हस्ते आनि स्वताच्याच घरात पडते.” :-))

  • अर्ध्याहुन जास्त मुद्दे माझ्या मित्राने दिले आहेत फोनवरुन.. कोण मित्र आहे लक्षात आलं असेलंच.. 🙂 अजुन बरेच आहेत. बाळ रडतं, आणि बाळाच्या आईला झोपु दिलं नाही तर उपाशी रहावं लागतं.. म्हणुन बाळाला सांभाळावं लागतं.. 🙂

 10. कांचन.. ते डायलॉग बेश्ट आहेत हं. हे बाकी एकदम बरोबर की हे महेंद्र काकानी काय बी लिवायचे शोडले नाय. कशावर बी लिवटे आणी वर परत नाय लिवायचे रिझन देते. अमी तर या काकावर फिडा हाय.

 11. Meenal says:

  ३६) घरचा Computer बंद पडलाय. (मग ऑफ़िसमधे जस कामच असत किनई..)
  ३७) कच्चं लिहुन ठेवलयं, पण टाईप करायचा कंटाळा येतो. (मग टंकलेखक पद आहे कशासाठी? पद भरा, बेकारी कमी करा)
  ३८) थंडीमुळे काही सुचत नाही हल्ली, सांधेदुखी वाढते ना! (खर असाव का हे कारण?)
  ३९) Year-ending आलय नां, पुढच्या वर्षी जोमात सुरु करणारे.. (मागच्या वर्षी शिमग्याला म्हणाला होतात की हो..)
  ४०) छोटा चिंटू मधेमधे येतो, बटन दाबतो, मग ’आयुष्याचे गणित अवघड असते’ ऎवजी ’ ईशाचे गणित बोजड असते’ अस काहीतरी टाईप होतं (हे खरे असेल हा..)
  काका आता कमेंट फारच वाढत चालली आहे, म्हणून थांबते.
  बाकी पोस्ट मस्त!

 12. Aparna says:

  हा हा हा महेन्द्रकाका या पोस्टला मला पुढच्या कुठल्या तरी विषयाचा वास येतोय…नक्की गप्पा मारल्या म्हणूनच लिहिलंय की बेस बनवताय….:P

  तुमच्यासारखे(फ़क्त) ब्लॉगर्स आणखी एक कारण देऊ शकता…बाकीच्या
  ब्लॉगर्सना लिहायला विषय सोडतोय….(सगळंच लिहलंन राव…)

  नवरा म्हणतो नोकरी शोधा त्यापेक्षा असंही एक कारण आहे….(आणि ते खरंय…:)) पण हे फ़क्त बायका देऊ शकतात…शक्यतो सगळे नवरे नोकरी/व्यवसाय करणारेच असतात ना??

  • खरंच त्यानेच सजेस्ट केलं म्हणुन हे पोस्ट, त्याला म्हणालो, की काही विषय नाही, तरत्याने कारणांची लिस्ट कर असं म्हंटलं.. आणि मग हे पोस्ट लिहिलंय..

 13. आल्हाद alias Alhad says:

  कंटाळा

  हे एक मोठ्ठं कारण!

 14. anukshre says:

  महेंद्र्जी,
  कशाला सवय लावलीत?? एक छान ब्लॉग वाचण्याची. रोज लिहिता. ही पण सवय आम्हाला लावून आता आम्ही रोज येतो न वाचायला. अशी मैत्री सोडता येती होय?? मला तुमची कारणे पटलेली नाहीत. ही कारणे माझ्या सारख्या चुकार ब्लॉगर्स साठी. आणि हो मी तुम्हाला व इतरांनी सुचवते आता ‘संभवामि युगे युगे’…. आले आहे. त्या बद्द्ल लिहा कि काहीतरी. मला
  कसे समजणार?? मी भारतात येईन तेंव्हा पावसाळा असतो. अशी भव्य रंगमंचाची बघणे होणार नाही. प्लीज लिहा कोणीतरी आणि महेंद्रजी तुम्हाला थोडासा आग्रह आहे. जमवा पाहून
  येण्यासाठी व व्हीडीओ पण द्या. मला कधीच शक्य नाही म्हणून हा विनंती पूर्व आग्रह. पण पोस्ट म्हणून मस्त पटलीत सर्व कारणे, तुमच्या करिता नॉट, नेव्हर ऐप्लीकेबल

  • सकाळ पासुन याला काय उत्तर द्यावं हा विचार करतोय. आणि सुचत नाही काय लिहावं ते..
   सविस्तर मेल पाठविन नंतर.. 🙂

 15. अनिकेत says:

  १. शब्द साठुन साठुन संगणक जड झालाय
  २. ब्लॉगची पानं संपली
  ३. लाईट बिल फार येते आहे ब्लॉगींग मुळे
  ४. कालच जिन्यात पडल्याने डोक्याला मार बसला आहे, मग काय झालं? अहो याददाश खोवली माझी
  ५. ट्रान्स्फर झाली दुसर्य़ा गावाला. माझा ब्लॉग पुण्यात होता ना!, पुण्याला गेलो की लिहीन परत, इकडे पुण्याला चालु केलेल्या ब्लॉगवर कसं लिहीता येईल?
  ६. नविन संगणक घेतला. जुना ब्लॉग अजुन कॉपी/ इंन्स्टाल करायचा आहे
  ७. ऑपरेटींग सिस्टीम बदलली, आधी विंडोज होती आता लिनक्स
  ८. आज दुधवाला आलाच नाही
  ९. चष्मा फुटल्याने काही दिसतच नव्हते
  १०. ब्लॉगच हरवला आहे, दिली आहे तक्रार पोलीसात, सापडला की सुरु करीन परत

  छान पोस्ट. आता लिहायचे काही नसल्याने तुमच्या आणि इतरांच्याही पोस्ट वाचायला वेळ मिळेल. हळु हळु सगळ्यांच्या सर्व पोस्ट वाचुन काढणार आहे.

  • अनिकेत
   १७जानेवारीला मी पण बंद करण्याचं ठरवलं होतं/ आहे. अगदी बंद नाही , पण पोस्ट्स ची वारंवारीता कमी होईल.. फार तर दोन तिन पोस्ट्स महिन्यात..

   • अनिकेत says:

    आत्ता नुकताच तुमचा ब्लॉग हिट काऊंटर पाहीला.. ९८k पोहोचला आहे की.. निदान १लाखाचा टप्पा तरी गाठाच. गॅप पडण्यापुर्वीची शेवटची पोस्ट मला वाटतं १ लाख वाचक संख्याची असावी.

    • एक लाख तर नक्कीच होईल असं वाटतं.. आणि मी बंद करणार नाही ब्लॉग.. अगदी खरं सांगतोय.. कारण नंबर २,… !!! 🙂
     एका कलिगने सोडली नोकरी म्हणुन त्याचा पोर्टफोलिओ पण मलाच दिलाय सांभाळायला. खरंच खुप लोड आहे कामाचं सध्या.. म्हणुन कमी करणार आहे बाकी काहीच नाही..
     माझी इच्छा आहे एक कथा लिहायची. ती पण लिहुन पहातो. पण मला वाटतं मी फक्त रोमॅंटीकच लिहू शकेन 🙂 स्वभावच तसा आहे नां म्हणुन… 🙂 ..

     • sahajach says:

      महेंद्रजी एक पोस्ट मेल करतेय..लिहा लिहा कथा लिहा पटकन…नविन वर्षाची सुरूवात कथेने होउ देत!!! 🙂
      आणि लाखाचा पल्ला आता दूर नाही…तेव्हा तो ही एक माईलस्टोन ठरू दे!!!:)

 16. sahajach says:

  महेंद्रजी मला वाटतय ब्लॉग सुरू करणे हा ही एक संसर्गजन्य छंद होता आणि बहूतेक आता तो बंद करून नवे काहितरी शोधणे हा ही एक तसाच…..मी कालच ब्लॉग बंद करताना काय पोस्ट टाकावी हा विचार करत होते!!!! अनिकेतने आधिच लिहून ठेवलेय…मला वाटतय कुठलीही गोष्ट केली की त्यात १००% झोकुन ते करणे हे एक साधर्म्य असावे आपल्या सगळ्यात आणि जेव्हा कुठेतरी स्वत:च्या मनाला असे वाटते की नाही बुवा कदाचित आपण कुठेतरी कमी पडतोय तेव्हा येणारी अस्वस्थता भयंकर त्रासदायक ठरते!!!!
  वर दिलेली अनेक कारणे (माझ्या अंदाजाने तुमच्या मावसभावाबरोबर डिस्कस केलेली आहेत) ही लटकी कारणे आहेत हे ती देताना आपल्याला पुरेपुर माहित असते…..मग ती दिल्यानंतर एक वेळ समोरचा फसेल पण मग आपल्या मनाचे काय!!! वो तो फसता नही है!!!!! मग सुरू पुन्हा पुन्हा आवर्तन……मला तर कधी कधी असली कारण देताना उगाच वाटतं की खरच कोणी मागतय का ही कारणं…..मग पुन्हा तो वेगळा त्रास……………….
  ही कमेंट मी काय लिहीतीये मलाही कळत नाहीये…..सुरू कुठे होतीये आणि भरकटतीये कुठेतेरी……कमेंट म्हणून लिहीतीये की स्वत:लाच सांगतेय राम जाणे….
  असो…..पण कारणं मात्र जबरी आहेत!!!!!!!

  • अगदी मनातलं लिहिलं.. खरं तर अनिकेतने नंबर लावला पहिला.. अनिकेतने / तुम्ही जे विचार मांडले , तेच लिहायचे होते मला पण.. असो..

  • अनिकेत says:

   काय? महेंद्र म्हणाले होते, पण तन्वी तु पण? अरे खरंच संसर्गजन्य रोगं पसरला आहे की काय ब्लॉग बंद करण्याचा?

   भाग्यश्री कुठे दिसत नाही आहे आजकाल? तो पण ब्लॉग नाही ना बंद झाला?

   असो, माझं कारणं (माझ्या मतानुसार तरी) जेन्युईन आहे नाही का हो महेंद्र? असो तन्वी तुला वेगळी मेल लिहीत आहे

   • अनिकेतचं कारण अगदी जेन्युइन आहे… म्हणुन तर स्माइली टाकला होता कॉमेंटच्या पुढे.. :)भाग्यश्री सध्या सुट्या एंजॉय करते आहे.. ७ तारखे पर्यंत.. नंतर येईलच ती पण.

 17. कुणी निंदा, कुणी वंदा… आमचा ब्लॉग लिहिण्याचा धंदा [’धंदा’चा शब्दशः अर्थ घेउ नये :-)]
  उलट सरत्या वर्षाचा समारोप करुन नवीन वर्षात जोमाने लिहिण्याचा मानस आहे. आपल्या सारख्या रसिकांकडून प्रेम मिळत राहीलच. जे मनात येईल ते लिहिणार. जे आवडेल ते वाचा.

 18. न लिहण्याचं सगळ्यांत सोप्प कारण “माज आलाय”

 19. Deep says:

  hehehhe AALAS / lihinyacha kantala he pan ek karn aahe 😛

 20. anukshre says:

  महेंद्रजी,
  तुमच्या पस्तीस कारणाकरिता ४२ प्रतिक्रिया आल्या. ह्यातच सगळ्यांचा हा ब्लॉग किती आवडता आहे हे लक्षात येते. तुमचे लिखाण काही तात्पुरत्या कारणाकरिता कमी होईल कदाचित हे मान्य. पण ब्लॉग च्या पुढे जावून ही मी म्हणेन की प्रत्येकाशी तुम्ही आवर्जून जिव्हाळ्याने जपलेले असे हे आगळे वेगळे नाते आहे. आज यंग जनरेशन ब्लॉगिंग करते. लिखाण कसे असावे, ह्या करिता पण अनेकांची प्रेरणा तुमचा ब्लॉग असेल. मी वाट पाहीन. सवड मिळाली की आपण लिहालच हा विश्वास आहे.

  • अनुजा
   धन्यवाद वगैरे म्हंटलं, तर फार फॉर्मल वाटेल, म्हणुन लिहित नाही. पण इथे ब्लॉग वर सगळ्यांच्या कॉमेंट्स वगैरे वाचल्या की बरं वाटतं. आता एक नविन प्रकार म्हणजे कथा पण ट्राय करतोय. अर्थात या विषयावर बऱ्याच लोकांनी लिहिलं आहे, तरी पण एक प्रयत्न.. असं व्हायला नको, की हा प्रकार आपण ट्राय केला नाही- म्हणुन एक कथा पण लिहुन पहायची आहे.. 🙂

 21. sanket says:

  अभ्यासाचा ताण आहे. 10.30- 5.30 college,classes, project work, GATE prepare करतोय.वेळच उरत नाही फारसा. म्हणून blog लिहिणे बंद आहे.
  हे कारण सुटलंच होतं की !

  • संकेत
   अभ्यासाचा ताण.. मग होऊन जाउ दे त्यावर एक आर्टिकल पोस्ट…. 🙂 मस्त कारण आहे.. :)कोणिच याला चॅलेंज करु शकत नाही..

 22. वा महेन्द्रजी मस्त कारण दिलीत… मी सुदधा गेला महिनाभर ब्लोगवर काही खरडलेल नाही पण त्याच कारण थोडस वेगळ आहे…

 23. महेंद्रजी कारण लिहल आहे दवबिंदुवर….

 24. मी says:

  I missed this post due to x-mas vacation, but I was really skipping it due to #34 for long time.

 25. tejali says:

  1 aatach dokyat aal karan..”maza laptop chorila gela”.. 😛

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s