पाण्यात विरघळणारं प्लास्टीक…

अगदी मनापासून सांगतो.. हे पोस्ट तुम्हाला ज्ञान बिड्या पाजायला लिहित नाही. आता ज्ञान बिड्या ( खरा शब्द आहे ग्यान बिड्या = विनाकारण एखादी गोष्ट पांडीत्याचा आव आणून शिकवणे ) हा शब्द लहानपणी खूप वापरायचो आम्ही. काल सहज आठवला, आणि आता लिहिण्याच्या भरात इथे पण उमटला.

प्लास्टीक चे दुष्परीणाम यावर काही तुम्हाला सांगायला जाणं म्हणजे काजव्याने सुर्याला प्रकाश दाखवण्यासारखं आहे. या विषयावर वर्षानू वर्ष लिखाण झालंय. लोक जागृती साठी मुंबईमधे २० मायक्रॉन पेक्षा कमी साइझ चे प्लॅस्टीक वापरणे यावर बंदी घातली आहे महापालिकेने .. आता महापालिकेचं कोण ऐकतं?? अस म्हणुन कसं चालेल?? ऐकायलाच पाहिजे नां, कारण नाही ऐकलं तर दंडाचं पण प्रावधान आहे कायद्यामधे.

 

फक्त शाई, आणि गम उरलाय पाण्यात..

 

२६ जुलै ची आठवण कधीच विसरल्या जाऊ शकत नाही.  प्लास्टीक वरचं डीपेंडन्स खूप वाढलंय आपलं हल्ली. सिगारेटच्या पाकिटावर पण प्लास्टीकचं कोटींग असतं, टेट्रा पॅक मधे मिळणारे फ्रुट जुस वगैरे आपण नेहेमी घेतो,पण त्या मधेपण प्लास्टीक, कागद, आणि अल्युमिनियमचा एक थर असतो.दुधाची पाकिटं, तेलाची पाकिटं, भाज्या आणतांना भाजी घालुन भैय्या हातात देतो ती  पातळ प्लास्टीकची पिशवी, फरसाणची पाकिटं, वेफर्स वगैरे, कचरा पेटी मधे पण टाकायची प्लास्टीकची पिशवी.. अशा अनेक ठिकाणी तर वापरलं जातंच, पण इव्हन गुटखा पाकीट पण प्लास्टीकचं असतं. आता इतका वापर जर प्लास्टीकचा केला तर या पृथ्वीचे काय होईल??

बऱ्याच गोष्टी ( ज्या मधे प्लास्टीक पण आहे) या  पर्यावरणाला इतकं नुकसान पोहचवतात की जर असाच अनिर्बंध वापर सुरु ठेवला प्लास्टीकचा तर कदाचित थोड्याच वर्षात वेळ निघून गेलेली असेल. भारतात तर डम्प यार्ड मधे प्लास्टीक, आणि इतर वस्तू वेगळ्या न करता सरळ रोडरोलरच्या खाली दाबून टाकल्या जातात, ज्या मुळे पावसाच्या पाण्याचा निचरा होऊ शकत नाही- आणि अर्थातच वॉटर टेबल वाढण्यास मदत मिळत नाही.

याचं मुख्य कारण म्हणजे एखादी प्लास्टीक बॅग वातावरणात सोडली तर मिलियन वर्ष लागतील तिला पुन्हा वातावरणात मिसळून जायला. पाण्यात, ऑइल मधे अजिबात न विरघळण्याची जी क्वॉलिटी आहे प्लास्टिकची, नेमकी तिच त्रासदायक ठरते आहे, आणि डिकम्पोझिंग न होऊ शकल्याने होणारे दुष्परिणाम पुढल्या पिढीला भोगावे लागणार आहेत.

प्रगत देशामधे , प्लास्टीकच्या ऐवजी कागदी पिशव्या वापरणं काही जागरुक दुकानदारांनी सुरु केलंय. आपल्या कडे तर अनिर्बंध वापर सुरु असतो प्लास्टीकचा.असो..कालच एक इ मेल आला होता, त्यामधे प्लास्टीक – जे पाण्यात विरघळतं, त्याचा शोध लागलाय, आणि ते  व्यापारी तत्वावर तयार केलं जातंय असंही समजलं.

एक सायबर पॅक नावाची कंपनी आहे त्या कंपनी मधे जवळपास एक वर्षापूर्वी इलेक्ट्रॉनिक काम्पोनंट्स वर संशोधन सुरु होते, तेंव्हा चुकून लागलेला हा शोध. या मधे असे प्लास्टीक शोधल्या गेले की जे पाण्यात विरघळते. पाण्यात टाकल्यावर पुर्ण डिझॉल्व्ह होऊन फ्ल्श पण करता येऊ शकते.

फक्त ज्या भागावर सिन्थेटीक गम आणि प्रिंटींग इंक वापरली आहे , तो भाग पाण्यात विरघळण्यासाठी जास्त वेळ घेतो. कमर्शिअल उत्पादन पण सुरु करण्यात आलेलं आहे अशा बॅग्ज चं. एक प्लॅंट ऑस्ट्रेलियात पण सुरु करण्यात आलेला आहे. या बॅग्ज चा व्हिडीओ इथे दिलाय.. बघा..

याच कंपनीचे बरेच इन्व्हायरोमेंट फ्रेंडली प्रॉडक्ट्स आहेत बरेच…

About महेंद्र

माझा ब्लॉग :- http://kayvatelte.com
This entry was posted in सामाजिक and tagged . Bookmark the permalink.

23 Responses to पाण्यात विरघळणारं प्लास्टीक…

 1. Suhas Zele says:

  अरे वा..खुप इनोवेटिव आणि अत्यावश्यक असा हा शोध असेल. भारतात तर हे मोठ्या प्रमाणावर प्रदूषण कमी करायला उपयोगी राहील…

  • अतिशय आवश्यक आहे अशा तर्हेचं प्लास्टीक बनवणं . एकाच कंपनीने स्वतःकडे मक्तेदारी ठेउ नये त्से वाटते.

 2. Ajay says:

  पुण्यात म्हणे प्लास्टिकवर बंदी घातली गेली आहे किंवा लवकरच घालणार आहे असं ए॑कीवात आहे. प्लास्टिकच्या पिशव्यांचा प्रश्न हा आजकाल भस्मासुराचं रुप धारण करत चालला आहे. शासन याबाबत नेहमीच उदासीन राहीलं आहे. नवीन माहिती दिल्याबद्दल आभार. मला ही गोष्ट याच्याअगोदर माहित नव्हती. समुद्राच्या पाण्यात प्लास्टिक विरघळुन प्लास्टिकपासुन सुटका करुन घेण शक्य आहे. आजकाल पाण्याचाच प्रश्न असल्यामुळे प्लास्टिक विरघळण्यासाठी पाणी कुठून आणावं हा ही एक प्रश्नच आहे म्हणा.

  -अजय

  • हे प्लास्टीक वरची बंदी सहज शक्य आहे. मला अजुनही जुने दिवस आठवतात. तेल आणायला तेलाची बरणी, तुपासाठी डबा, भाजी साठी कपड्याची पिशवी , दुधासाठी बाटली न्यावी लागायची.. आता सगळं काही पाकिटात!!

 3. madhuri says:

  The dishwasher soap(square tablets) jo me waparte to plastic bag madhye asto chotyasha ani te plastic pun garam panyat wirghalte. Its really cool. waprayla sope ani disolve honare pun.

  ashi plasticchi vilhewaat mothya pramanat karta ali tar khup fayda hoeel

  • ही टेक्नॉलॉजी फक्त एकाच कंपनी कडे आहे, म्हणजे जगभरातिल रिक्वायरमेंट हे लोकं पुर्ण करु शकत नाही. जसे जिवनावश्यक वस्तुंच्या निर्मीतीचे नियम आहेत, तसेच इथे पण लागु करायला हवे. उद्या पेनिसिलिन तयार करणाऱ्याने मी स्वतः सगळी कडे बनवुन विकतो म्हंटलं असतं, तर ते शक्य नव्हतं..
   गरम पाण्यात विरघळणारं प्लास्टीक अगदी सुरुवातीचा शोध आहे. सध्या जे प्लास्टीक तयार केलं जातंय ते ५ डिग्रीच्या पाण्यात पण विरघळतं.

   पेटंट करुन लवकर टेक्नॉलॉजी जगासाठी ओपन करुन दिली पाहिजे !!

 4. सहीच प्रोजेक्ट आहे हा. आपल्याकडे सुरु व्हायलाच हवा, ताबडतोब!

 5. gouri says:

  ek shanka … kacharyachya bags che kaale plastic khaas degradable asate na? Japan madhye super market madhye biodegradable items degradable carrybags madhye aani non- bio degradable sadhya carry bags madhye ase separate dyayache.

  • कचऱ्याच्या बॅग्ज रिसायकल्ड प्लास्टिक पासुन बनवलेल्या असतात, पण त्या बायो डिग्रेडेबल नसतात. बायोडिग्रेडेबल आयटम साठी बायोडिग्रेडेबल बॅग वापरणं हा एक चांगला उपाय आहे. आणि जपानी लोकं आहेत पण काटेकोर .. नियम पाळण्याच्या बाबतित!

 6. आल्हाद alias Alhad says:

  ह्म्म्म्म
  पण पाण्याच्या क्वालिटीवर याचा काय परीणाम होतो?
  या विरघळलेल्या प्लास्टिकपासून पाणी परत शुद्ध कसं करता येईल??

 7. ही बिडी मस्त आहे 🙂

  • प्रसाद,
   लहानपणचा शब्द आहे हा. काळाच्या ओघात अशा अनेक म्हणी विसरल्या गेल्या आहेत. कधी तरी आठवतं… बस!

 8. Sagar says:

  Sahich aahe ekdum…..Video kahi pahu shakat nahi youtube ban aahe hostel madhe…..Kaka to mail forward karal ka please…..?

 9. आनंद पत्रे says:

  छान शोध आहे…अतिशय उपयोगी.
  तुमचं खरयं, पेटंट केवळ एका कंपनीला न देता याचे उत्पादन वाढवले पाहीजे..

  • हे प्लास्टिक डेव्हलप होऊन पण आता एक वर्ष होत आलंय. जी ७७ च्या वेळेस हा मुद्दा का उचलला गेला नाही हेच कळत नाही.

 10. मस्तच! व्हिडीओ आवडला. हे आपल्याकडे सुरु व्हायला हवंच. मात्र, प्लास्टीकची मूलद्रव्यं पाण्यात मिसळल्याने हे पाणी इतर कशासाठी वापरता येईल का नाही, हेही पहायला हवं. शेवटी सगळं सांडपाणी नाल्यात, नाले नद्यांना, नद्या समुद्राला मिळतात. ज्ञानबिड्या हा शब्द कधीच ऐकला नव्हता. छान आहे. कधी तरी वापरेन.

 11. thanthanpal says:

  आश्या उत्पादनासाठी एक स्वतंत्र संशोधन विभाग लागतो . आणि आपल्या देशात संशोधन विभाग कायम
  दुर्लक्षिला गेलेला विभाग आहे. आपले उत्पादक फक्त तयार फार्मुला वापरून वस्तू तयार करतात. मग त्यात ही दुय्यम दर्जाची वस्तू
  तयार करून brand नेम च्या नावावर विकून नफा कमविण्याच्या मागे असतात. मग यामुळे बंदी सारखे
  उपाय जाहीर केले जातात

  • मला असं वाटतं की जसे एड्स वरचे व्हॅसिन, किंवा औषध हे जिवनावश्यक म्हणुन डिक्लिअर केलंय, तसंच या प्रॉडक्ट बद्दल पण व्हायलाच हवं. पृथ्वी च्या अस्तित्वाचा जर प्रश्न दिसतोय , तेंव्हा प्रॉफिटॅबिलिटी पहाणं योग्य नाही..

   इथे सगळ्या जगाचा प्रश्न आहे. तेंव्हा हे प्लास्टीक कम्पलसरी करावे आपल्याइथे.. आणि सगळ्या जगात. तसाही हा शोध चुकुनच लागलाआहे. यासाठी काही खाअस प्रयत्न केले गेले नाहित. तरी पण काही ठरावीक रॉयल्टी देउन फॉर्म्युला ओपन करावा.. असे माझे मत आहे. अर्थात जी ७७ ला हा मुद्दा घ्यायला हवा होता.. असो..

 12. विडियो बघून पहिला प्रश्न मनात “त्या प्लास्टिक विरघळलेल्या पाण्याबद्दलचा”आला होता. अर्थात्‌च सगळ्या प्रतिक्रिया वाचून ती शंका दूर झाली. अर्थातच चांगलं प्रॉडक्ट आहे.http://goo.gl/2E1f हे ही वाचा.

  • हाच लेख बहुतेक एका पेपरमधे येणार आहे. नक्की कधी ते माहिती नाही. तुम्ही दिलेली माहिती पण वाचली.. छान आहे. मी लोकसत्ता गेले कित्तेक वर्ष न चुकता वाचतोय, हा लेख कसा सुटला तेच समजत नाही . धन्यवाद.

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s