रश्मी तिन दिवसानंतर येणार होती, तिचा नवरा गेला की मग ती व्हिसा येई पर्यंत मुंबईलाच रहाणार होती. गेल्या दोन तिन दिवसांपासून मात्र रिया पण घरी आली नव्हती. रश्मीचा मात्र दर रोज फोन येत होता. तिनेच सांगितलं की रियाचं आणि तिचं बोलणं अगदी दररोज सुरु होतं.
रश्मीचा फोन आला होता, नेमका राहुलनी घेतला फोन.. काय गं? कशी आहेस? वगैरे बोलणं झालं, रश्मी म्हणाली, अरे दादू रियाचं पण लग्न ठरतंय रे.. ती आली होती का घरी? राहुल एकदम ओरडलाच.. म्हणे काय?? तिचं लग्न? कोण करतंय तिच्याशी लग्नं? त्या येडपट माणसाला एकदा बघायचंय.. चल रे उगीच काही तरी बोलू नकोस वात्रट सारखं, आईला दे फोन.. रश्मी म्हणाली.
राहुल नेहेमी प्रमाणे सोफ्यावर आडवी उशी लावून हा्तात पुस्तक घेउन बसला होता . पुस्तकाचं पान समोर उघडं होतं, पण राहुलला काही लक्षात येत नव्हतं काय वाचतोय ते…मन सैर भैर झालं होतं. असं का होतंय? तिचं लग्न ठरतंय तर मग मला का अस्वस्थ वाटतंय?? राहुल तसाच बसून राहिला. सारखं दाराकडे लक्ष जात होतं. रिया येईल आणि मग आपल्याकडे बघून हसत रश्मीच्या खोलीकडे चालत जाईल..असं सारखं वाटत होतं.
आई पण बराच वेळ बोलत होती रश्मीशी, पण काय बोलत होती तेच कळत नव्हतं. राहुल उठला आणि सरळ चप्पल पायात सरकवून बाहेर निघायला फिरायला. खूप वेळ अगदी कुठेही फिरत होता. शेवटी कॉफी हाउस मधे जाउन कडक फिल्टर कॉफी मागवली..आणि विचार करित बसला. कॉफी चा कप समोर आणून ठेवला होता वेटरने, आणि आता त्याला पण जवळपास दहा मिनिटं झाली होती. तिकडे पण त्याचं लक्षं नव्हतं. अगदी खरं सांगायचं तर कुठेच लक्ष लागत नव्हतं.. समोर वेटरने आणून ठेवलेल्या बडिशोपेच्या डिश मधे त्याने न घेतलेल्या कॉफी चे पैसे टाकले , आणि उठून चालायला लागला.
परत घरी येउन पोहोचला.. तास भर निर्हेतु भटकल्यावर.. अजूजुनही खूप लो वाटत होतं. असं का होतय?? घरी आला ,तर रिया समोर बसली होती. आईशी गप्पा मारत. आई तिच्या डोक्याव्रून हात फिरवत होती, राहुल ला जाणवलं, की आई रश्मी ला खूप मिस करते आहे म्हणून. आई म्हणाली, काय रे दादू , कॉफी घेणार? राहुल ला कॉफी हाउस मधला, न प्यायलेला कॉफीचा कप आठवला, म्हणाला.. हो. चालेल.
आता समोर रिया बसलेली होती. तिच्या समोरच्या खुर्चीवर बसला, आणि तिला म्हणाला… हं.. काय करतो गं मुलगा?? आणि रिया कडे पाहिलं. रियाच्या डोळ्यात खूप राग दिसला… तुला काय करायचंय? काय करतो म्हणे?? काहीही करित असेल….. ~! इतकं संतापायला काय झालं हेच समजल नाही राहुल ला. साधा प्रश्न विचारला .. आणि ही अशी रिऍक्शन.. गेलीस उडत.. असं म्हणून निघून जावं समोरून असं क्षणभर वाटलं..
राहुलला पण तिला चिडायला काय झालं हेच कळत नव्हतं.तिच्या चेहेऱ्यावर राग स्पष्ट दिसत होता.. काहीच बोलली नाही ती. चिडली तर चिडु दे म्हणून समोरून नेहेमी प्रमाणे निघून न जाता, तिला काय झालंय हे समजून घेणं जास्त महत्वाचे वाटु लागलं एकदम.. तिच्या समोर बसला, आणि तिच्या कडे पाहिलं..
तिचे बोलके ब्राउन डोळॆ अगदी काहीही न बोलता खूप बोलावून गेले..राहुलच्या डोक्यात एकदम प्रकाश पडला.. म्हणजे ………………??? हं…….!!!हे इतके दिवस का लक्षात आलं नाही? किती मुर्ख आहोत आपण?? राहुलने तिच्याकडे बघितलं,तिची नजर खाली जमिनीकडे होती. डोळ्यात दुखावल्या चे भाव दिसत होते. तसंही मुलींना आपल्याकडे कोणी पहात असलं की लवकर कळतं. रियाने नजर उचलली, आणि समोर राहुलकडे पाहिलं… आर्त नजर.. खूप काही सांगायचंय रे मुर्ख माणसा….. कधी समजणार तुला??? मला काय म्हणायचंय ते??
राहुलला अचानक जाणिव झाली की आपल्याला काय होतंय याची. अचानक रिया बद्दल खूप काळजी वाटली त्याला… एकदम आवडायला लागली ती! कित्येक वर्ष जिच्या शोधात होतो, ती हीच!!! हे पण लक्षात आलं.. राहुलने तिच्या नजरेत नकळत नजर गुंतवली अन लहानसं स्मित हास्य केलं. सगळं काही होतं त्या हास्यामधे.. प्रेम, जवळीक, काळजी , सगळं काही होतं . अगदी पुर्ण अशुअरन्स सहीत.. तिच्या पण डोळ्यात सगळं समजल्याची भावना दिसली. एकही शब्द न बोलता दोघांच्या मनात एकमेकांच्या भावना पोहोचल्या होत्या..
आयुष्यात पहिल्यांदा रिया बरोबर न चिडता बोलावंसं वाटत होतं, पण काय बोलावं ? कसं बोलावं? हेच समजत नव्हतं.संध्याकाळी नेहेमी प्रमाणे रिया ला सोडायला राहुल निघाला, तेंव्हा दोघंही एकही शब्द न बोलता चालत होते रस्त्यावरुन. रियाचं घर आलं, ती वर जायला लिफ्ट ची वाट पहात उभी होती. राहुल कडे थकलेल्या नजरेने पहात.. की आता तुच काही करु शकशील रे… नाहीतर कठीण आहे…राहुल काही न बोलता ती लिफ्ट मधे शीरे पर्यंत उभा राहिला, आणि लिफ्ट चं दार बंद झाल्यावर परत निघाला.
घरी आल्यावर पण त्याला सारखं रिया ला पहायला आलेल्या त्या न पाहिलेल्या मुलाचा चेहेरा डोळ्यापुढे सारखा येत होता. झोप येत नव्हती. आईने जेवायला बोलावलं, तरी पण ऐकू येत नव्हतं.. दुसऱ्या दिवशी रश्मी आली. खुप खुप बोलत होती आईसोबत.. आईशी मनसोक्त बोलणं झाल्यावर आई म्हणाली की आता थोडा सांजा करते..भूक लागली असेल ना?? रश्मी हो म्हणाली.. आणि आई आत गेली.
हं.. बोल दादू.. काय म्हणतोस?? असा चिंताग्रस्त का दिसतोस? काय झालं?? राहुलला कसं बोलावं हेच समजत नव्हतं. बरं आजपर्यंत रियाला पण सरळ विचारलं नव्हतंच नां.. किंवा तिला सांगितलं पण नव्हतं, की आय लव्ह यु म्ह्णून.. कसे काय लोकं सांगू शकतात असं? ह्या सगळ्या गोष्टी तर आपोआप होत असतात.हिंदी सिनेमात कसं सगळं मस्त दाखवतात, की हिरो हिरोइनला आय लव्ह यु म्हणतो.. नाही तर आपण.. नुसते मुख दुर्बळ.. कधीच सांगु शकणार नाही रियाला. बरं मी नाही, तर तिने तरी सांगायचं नां.. पण नाही.. ती पण काहीच बोलायला तयार नाही.
आता तर लग्नं पण ठरतंय तिचं, कालच येउन बघून गेला म्हणे मुलगा. तिला नकार तर येणार नाहीच.. इतकी सुंदर आहे ती.. स्वतःलाच शिव्या घालत होता राहुल, हा काय मुर्खपणा, इतके वर्षं तिला बघतो आहेस, पण कधी लक्षात आलं नाही गधड्या की ती आपल्याला आवडते म्हणून.
खरं खरं आयुष्य जर सिनेमातल्या सारखं असतं तर किती बरं झालं असतं नां?? मस्त पैकी आपण म्हंटलं असतं, आय लव्ह यु वगैरे.. मग तिने पण मान्य केलं असतं, आणि मग पुढचं सगळं…. रश्मी म्हणाली.. ओये…. दादू.. अरे कुठे हरवलास?? तसा एकदम बांध फुटला राहुलचा, डोळे भरुन आले, पण आता रश्मीला दिसू नये म्हणून तोंड फिरवलं, पण तिने पाहिलंच बहुतेक..
ती उठली , आणि हळूच राहुलच्या शेजारी जाउन उभी राहिली. त्याच्या केसातून बोटं फिरवत म्हणाली.. अरे तुला रिया आवडते नां?? झटक्याने राहुलने तिच्याकडे बघितलं, तर तिच्या नजरेत एक खोडकरपणा स्पष्ट दिसत होता.. म्हणाली, अरे मला ती वहिनी म्ह्णून आवडेल .. पण तु एक महामुर्ख, इतके दिवस झाले, कधी पाहिलंच नाही तिच्याकडे.ती पण तशीच. .. सगळ्या मनातल्या गोष्टी मनात ठेवायची.
पण माझं लग्नं ठरलं, तेंव्हा मात्र तिला विचारलंच मी एकदा.. आणि तिने मुक होकार दिला..तेंव्हाच ठरवलं, की या दगडाच्या मनात काय आहे हे पण बघु या, म्हणून मग सारखं तिला काही ना काही कारण काढून तुझ्या बरोबर बाहेर पाठवलं. मला असं वाटलं होतं की कदाचित तुझ्या लक्षात येईल, आणि सगळं आपोआप होऊन जाइल .. पण नाही… तु एक नंबरचा वेंधळा, अजिबात तुला काही समज नाही…
अगं पण तिचं लग्नं ठरतंय नां?? राहुल म्हणाला… रश्मी हसली, म्हणाली, अरे तुला तिच्या बरोबर इतक्या वेळा बाहेर एकत्र पाठवून पण तु तिला काही बोलू शकला नाहीस, तेंव्हाच माझ्या लक्षात आलं, की आता मलाच काहीतरी करावं लागेल, नाहीतर तिचं कुठेतरी लग्नं ठरेल, आणि तु बसशील हात चोळत. म्हणुन हा हुकुमाचा एक्का वापरला आम्ही..
मीच रियाला सांगितलं, की तुला सांग तिचं लग्नं ठरतंय म्हणून.. आणि तिने तुला सांगताच, तुला ही जाणिव झाली की रिया आता दुसऱ्या कोणाची तरी होणार, आणि तुला तिची किम्मत कळली. तशी पण तुला ती आवडत होतीच , पण या बातमी मुळे तुला समजलं की तुला आवडते… बस्स.. …
म्हणजे??????????? तिचं लग्नं वगैर काही ठरलं नाही??? आणि एकदम हसत सुटला. म्हणजे रिया पण सामिल आहे कां यात? अरे रियाच काय, आपली आई पण सामील आहे यात.. तिला पण सगळं माहिती आहे, तुच एकटा आहेस बुद्दु….
अरे आजी नेहेमी म्हणायची ना, एखादी गोष्ट तुमच्या समोरुन निघून गेली की मग तुम्हाला त्याची किंम्मत कळते. आणि नेमकं तेच झालं तुझ्या बाबतीत….
रश्मी आल्याचं रियाला पण कळलं होतंच.. हे सगळं बोलणं सुरु होतं तेवढ्यातच रिया पण आली.. म्हणाली काय गम्मत झाली गं ? कशाला हसताय? मला पण सांगा म्हणजे मला पण हसता येईल.. तिच्याकडे पाहिलं, अन म्हणाली… वहिनी .. बस इकडे!! असं म्हंटलं.. रियाच्या तिच्या गालावर गुलाब फुलले… आणि राहुल पण आता रश्मी समोर नसती तर आपण काय केलं असतं याचा विचार करु लागला.. 🙂
( आज ही पहिली कथा लिहिली आहे, आजपर्यंत आयुष्यात कधीच हा प्रयत्न केला नव्हता.. पण ब्लॉग वर लिखाण कमी करण्यापूर्वी एकदा हा प्रयोग करायची इच्छा होती, म्हणून हे पोस्ट!! ही कथा कशी वाटली ते अवश्य सांगा)
काका, एकदम मस्त जमलीये कथा.
सचिन
चला, बरं वाटलं, तुला आवडल्याचे ऐकुन.. 🙂 पहिलटकरणीला जसं पहिलं अपत्य होईपर्यंत वाटत असतं , तसंच फिलिंग होतं लिहितांना..
एकदम मस्त झाली आहे!! रिया अन् राहुल वर अजुन लिहायला हव होत अजुन मजा आली असती!! बाकी कथा अगदी सहजच आहे. खूप नैसर्गिक वाटते. . .कुठेही फिल्मी किंवा परीकथा वाटली नाही!!!
उद्देश तोच होता. सर्व सामान्यांच्या जिवनात जसं घडु शकतं तसंच लिहायचं होतं.. काल्पनिक नाही..
अतिशय छान … आपल्याला जबरदस्त आवडली.. !!! बरयाच दिवसानंतर कुठल्यातरी कथेच्या उरलेल्या भागांची वाट पहिली .. !! खूपच छान ..
– पवन
पवन
मनःपुर्वक आभार… 🙂 पहिल्याच कथेला इतका उत्कृष्ट प्रतिसाद मिळाल्याचं बघुन खुप छान वाटतंय…
>>> तसंही मुलींना आपल्याकडे कोणी पहात असलं की लवकर कळतं.
>>> एखादी गोष्ट तुमच्या समोरुन निघुन गेली की मग तुम्हाला त्याची किंम्मत कळते.
कथा एकदम फ्रेश वाटली आणि वरील वाक्य एकदम चपलख…
बढिया महेंद्रजी
अनुभवाचे बोल आहेत ते आनंद…. 🙂
मस्तच… अतिशय हळुवार, ह्रूदयाला भिडणारी…. छोटीसी प्रेमकथा – अतिशय आवडली!
आपणांस नविन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!
दिपक
तुमच्या सगळ्यांच्या वेळोवेळी मिळालेल्या कॉमेंट्स मुळेच हुरुप आला लिहायचा. पहिला भाग प्रसिध्द केल्यावर एकदा डिलिट करावासा वाटला होता.. पण इतक्या कॉमेंट्स आल्यामुळे दुसरा लिहायला घेतला.. नविन वर्षाच्या ग्रिटींग बद्दल आभार..
नविन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.
नविन वर्ष सुखाचे, समृध्दीचे आणि भरभराटीचे जावो…
सचिन,
नुतन वर्षाच्या शुभेच्छा.. तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबियांना पण… 🙂
khup aavaDalI….puDhchya kathes shubhechchaa!! and Happy New Year!
मुग्धा
धन्यवाद.. पुढच्य़ा कथेचा प्लॉट डोक्यात घॊळतोय.. लवकरच लिहिन.. नविन वर्षासाठी शुभेच्छा..
Lay bhari Mahendra Sir, katha mastch aahe…pudhil kathech apeksha karoo shakto ka….
गणेश
तुम्ही इतक्या भरभरुन प्रेमाने प्रतिक्रिया दिल्या आहेत,.तेंव्हा पुन्हा लिहायला घेइनच कथा .. मी पण खुप एंजॉय केलं कथा लेखन.. प्रत्येक पात्र स्वतःच्या मनाप्रमाणे वागायला सोडुन दिलं होतं.. 🙂
it is the best love story i have ever read. i wish ashi manas mazya ghari asti ter bar zal ast. best of luck 2 u for new stories and happy new year
मिलिंद
धन्यवाद.. असतील हो.. फक्त त्यांना लक्षात आलं पाहिजे काय आहे ते.. तुमच्या मनात… !!
kathecha ha shevatcha bhag vachla. chhan aahe. pan madhyech rahulchya aivaji rohit aani rohan hi nave aalee aahet tee chukun aali aahet ka?
सीमा
हॊ, ती चुक झाली होती लिहितांना. कथा लिहिण्याची सवय नसल्याने.. चुक दुरुस्त केली आहे.. 🙂 धन्यवाद..
छान झाली कथा. अगदी हळूवार. तुमच्या ‘तंबी फेम’ कथाप्रमाणे ही कथा देखील आवडली.
बाकी १ लाखाला फक्त ५० विज़िट्स बाकी आहेत. तुम्ही आजच लखपती होणार काका. अभिनंदन.
सिध्दार्थ
हं.. अगदी खरी खरी गोष्ट वाटते की नाही?? 🙂
एकमेकांच्या भावना जपणारी??
Chotisi kathaa khup avdali….shubhechchaa !!!
-Ajay
अजय
मेसेंजर वर तुम्ही सांगितलं , तेंव्हा खुप बरं वाटलं.. धन्यवाद..
ekdum mast katha lihili aahe……
pan rahul,rohit,rohan…..nakki kon? kharatar vachtana etka lakshyaat yet nahi…..
Ajun ashya katha liha…..and pls dont stop blogging
Wish u Happy New Year
लक्ष्मी
बरेच दिवसांनी आलात सॉरी आलीस ब्लॉग वर.. ती चुक झाली होती.. दुरुस्त केली आहे आता. धन्यवाद..
नवीन वर्षा साठी शुभेच्छा..
blog tar nehmich vachte fakt comment dyaycha kantala karte.. kadhi-kadhi 4-5 divas nahich vachle tari sarv post ekda vachun kadhtech.
so keep blogging. eka varshat don paper madhye tumachya blogchi post aaliy,on d eve of new year hit counter 1lakhachyavar gelay.
so congrats:)
हं… ते बाकी आहे. मी पण बरेच ब्लॉग वाचतो, पण कॉमेंट द्यायचा कंटाळा करतो. पण लिहिण्यात एक वेगळाच आनंद असतो.. आणि तो इतर कशातच मिळु शकत नाही..
महेंद्रजी, नवीन वर्षाच्या हार्दीक शुभेच्छा!
“लाख भेटी” करिता अभिनंदन…
धन्यवाद.. तुमच्या सगळ्यांच्या प्रेमामुळेच हे शक्य झालंय.. 🙂
महेंद्र काका हार्दिक अभिनंदन!!!!
धन्यवाद… मनःपुर्वक आभार..
>> पण ब्लॉग वर लिखाण कमी करण्यापुर्वी एकदा हा प्रयोग करायची इच्छा होती, म्हणुन हे पोस्ट!! ही कथा कशी वाटली ते अवश्य सांगा)
साहेब, कथा फारच छान, पण ब्लॉग वर लिखाण कमी करणार म्हणजे काय? आत्ता कुठे तुमच्या ब्लॉग ची सवय झाली होती! देव करो आणि आपणाकडून अजून बरेच लेखन घडो!
नूतन वर्षाच्या शुभेच्छा!
-कौटिल्य
शुभेच्छांकरिता आभार…
नविन वर्ष सुखा समाधानाचे जाओ हीच सदिच्छा… एस एम एस केला होता .. मिळाला असेलच..
काका, मस्तं झालीये कथा. खूप ओघवती आहे.
(या भागात तुमच्या नायकाचं नाव एकदा रोहीत, एकदा रोहन आणि बाकी वेळा राहुल असं आलं… ते जरा सुधारता का?)
आणि हो, नव वर्षाच्या शुभेच्छा!
-अनामिक
हो.. ती चुक झाली होती.. दुरुस्त केली आहे.. 🙂
नुतन वर्षाभिनंदन..
अप्रतिम झालीय कथा, खूप खूप आवडली….
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा…तुम्हाला हे वर्ष भरभराटीच, आनंदच आणि सुखाच जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
Congratulations…1 lac visitor..Simply exceptional..लिखाण कमी नका करू महेन्द्रजी, सवय झालीय रोज तुमच्या ब्लॉग वरच्या पोस्ट वाचायची 🙂
Kaka
Mi mhatl navat Jam baelch….Shevtcha bhag chan zalay…Pudhil kathechi vat pahato…An Happy New Year to you and your Family….
सुहास
माझी पण इच्छा आहेच जास्तित जास्त ऍक्टीव्ह रहायची. बघु या कसं जमतं ते..
Mahendraji,
Eakdam mast Katha ahe……..Khup Chan..
please write more
Nav Varshachya Hardik Shubecha……
समीर
धन्यवाद.. तुम्हाला पण नविन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा..
आता कसलं लेखन कमी करताय. हा नवा प्रयोग एकदम सक्सेसफुल झालाय. उलट आमच्या अपेक्षा वाढल्या.
कांचन
इच्छा तर आहेच काहीतरी लिहायची.. प्रयत्न करतो लिहिण्याचा.. 🙂
लीई झकास
राज
तुम्ही दिलेली दाद पोहोचली. धन्यवाद.. 🙂
मस्तच जमलीय….आता इतक्यात एक ब्लॉग किंवा चतुरंग मध्ये अशा आशयाचं काही वाचल्याचं आठवतंय त्यामुळे शेवट साधारण कळत होता…पण ते रंगवणं फ़ार सुरेख झालंय….एक लेखक म्हणून असं पात्रांना रंगवण्याचा आनंद तुम्ही लुटलाय असंही दिसतंय…लगे रहो आणखी काय सांगणार….मजा आली…नव्या वर्षाच्या आणि लखपती होण्याबद्दलच्या खूप खूप शुभेच्छा..
अपर्णा
जसं जसं मनात येत गेलं तसं लिहित गेलो. शेवट करतांना थोडा गोंधळ होता, पण जमलं शेवटी..
काका, कथा अप्रतिम झाली आहे…. हळूवार पने भावना उलगडत गेल्या आहेत.. हे नवीन वर्ष तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला सुखाचे आणि समाधानाचे जाओ आणि आम्हाला अश्या छान पोस्ट वाचायला मिलोत.
रघु
नविन वर्ष तुम्हाला पण सुखाचे जाओ हिच सदिच्छा..
Jabardast……
Pudhachi kenva?
(Mala Katha khup awadali aahe mtra manatale shabdat mandnyachi tuzyasarakhee khubi mazya kade nahi mhanun fakta “Jabardast” yewadhach lihala aahe….)
आदित्य
लवकरच.. अजुन तरी ठरलेलं नाही. पण तुला डॊळ्यापुढे ठेउनच लिहिन आता… पुढची कथा. उद्याचं पोस्ट आहे ते वाचशिल..
महेंद्रजी,
कथा खुपच सुरेख आहे. अगदी जशीच्या तशी डोळ्यांसमोर उभी राहाते. झी मराठीवर रेशीमगाठी नावाची एक मालिका होती. त्यातल्या गोष्टीसुद्धा अगदी अशाच असायच्या, हळु हळु फुलवत नेणार्या. खुपच मस्त लिहिलं आहे तुम्ही.
आणि हो, नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.
सौरभ
काहीतरी वेगळं लिहायची इच्छा होती, म्हणुन हे पोस्ट होतं. नविन वर्षाच्या तुम्हाला पण शुभेच्छा..
अभिनन्दन लक्षाधिश काका !! नविन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा !!
कथेचे पहिले २ भाग साधारणच वाटले.साधी-सरळ प्रेमकथा… तिसर्या भागात अगदी छान कलाटणी दिलीय.O’Henry देतो ना, अगदी तशीच. सही…. अशाच कथा लिहीत रहा.. मराठीचे O’Henry व्हाल…. पण एक सुचना… पुर्वाध खुलवता आला असता.
संकेत
एखाद्या वेळेस जमुन जाते.. म्हणतात नां, अंधेके हाथ मे बटेर.. तसंच असेल हे.. तरी पण पुन्हा एकदा लिहिण्याचा प्रयत्न करिन. फक्त प्लॉट सुचला पाहिजे. पुर्वार्ध खुलवता आला असता हे मला पण नंतर लक्षात आलं … अगदी खरं सांगतो पहिला भाग फक्त अर्ध्या तासात लिहिला होता, आणि नेहेमीप्रमाणे रिव्ह्यु न करता पोस्ट केलं होतं. पण हे नेहेमी प्रमाणे पोस्ट नव्हतं हे लक्षात आलं नाही, म्हणुन असं झालं..
छान झाली आहे ’छोटीसी कहानी’ ..सहज, हळुवार पण ’दिल को छु जानेवाली’..
देवेंद्र
धन्यवाद…बरेच दिवसानंतर ब्लॉग वर??
हो जवळ्पास महिन्यानंतर ..कारण ब्लोगवर पोस्ट्मध्ये लिहतो नंतर…गेल्या तास्भरापासुन तुमच्याच ब्लोगवर फ़िरत आहे.
स्वागत…
masta ahe katha!! maja ali vachtana… waiting for next one!
kaka kathe chya nadat tumhi likhan kami karnar aahet he visrunch gelo
plzz likhan kami karu naka karan tumchya mulech mala blog aavadayla lagala aahe
kaka plzzzzzzzzzzzz don’t think to reduce wrting
नविन कथा वगैरे नाही घेत इतक्या लवकर.. ते म्हणजे एक जस्ट फॉर अ चेंज होतं. अरे वयाच्या पन्नासाव्या वर्षी पण रोमॅंटीक लिहिता येतं की नाही ते चेक करित होतो.. जमलं एकदाचं.. !!!
सध्या थोडं काम वाढलंय.. म्हणुन लिहिणं कमी झालंय.. पण लवकरच कॅच अप करीन..
हा पहिला प्रयोग वाटत नाही दादा … एकदम मस्त जमलाय. विंगेत बरीच तयारी केलेली दिसते आहे … हाहा … बाय द वे … माझे आणि शमिकाचे असेच जमल आहे रे. आपसुक… एकमेकान्ना काहीही न बोलता. तेंव्हा श्टोरी भिडली एकदम … 😀
आणि काय रे … १७ तारखेपासून तू सुद्धा लिखाण कमी करणार आहेस असे दिसते आहे … ???
अरे खरंच पहिलाच प्रयत्न होता. पुन्हा कधी तरी लिहिन एखादी. सत्यकथेवरच बेतलेली आहे ही स्टोरी:)
Pahilyandaach blog mhanaje kaay he mahiti zalay.. tyanantar tumache blog vachayach vyasanach lagley.. katha khupach sahaj, sundar aani oghavati hoti..
दिनेश
प्रतिक्रिये करता आभार…
दिनेश
प्रतिक्रिये करता आभार… असेच येत रहा ब्लॉग वर..
Kupach chan zale Kavita .. me sagali ekach dumat vachali .,… ek dum touching ahe
Kupach chan zale .. me sagali ekach dumat vachali .,… ek dum touching ahe
प्रतिक्रियेकरता आभार!!! पहिलाच प्रयत्न होता .. आता पुन्हा एकदा ट्राय करणार आहे लवकरच! 🙂
kaka.. kurbaan yaar tumchya lekhaniwar…. shabdatun chitra ubha rahata dolyasamor… Characters che expressions… emotions….apratim ritya mandlayt shabdat… jara pahilach prayatna asa asel tar hardik swagat…. pudhlya goshtichi waat paahin… Love Story… with sum other note.. wachayla awadel.. punha ekda aabhar… liha ani lihit raha…
प्रसाद
धन्यवाद.. मनःपुर्वक आभार. पुन्हा एक लिहाय्ची आहे गोष्ट .. लवकरच लिहिन पुन्हा. फक्त तो स्पार्क येत नाही लिहायला.. तो आला की करतोच पोस्ट!!
अप्रतिम आहे गोष्ट. मला पहिला भाग वाचून झाल्यावर दुसरा भाग ओपन होईपर्यंत दम धरवत नव्हता.
पुढच्या कहाणीची वाट पाहत आहे.
Hi,
Khupch chan aahe…………………….
दिपाली
ब्लॉग वर स्वागत आणि प्रतिक्रियेसाठी मनःपुर्वक आभार..
कथा खुपच सुरेख आहे. अगदी जशीच्या तशी डोळ्यांसमोर उभी राहाते.
योगेश
धन्यवाद.
खूपच छान………..
धन्यवाद अमित.
किती सुंदर कथा होती मला तर राहुल आणि रिया फार आवडले………. पण मुलगे स्वताच्या भावना सांगायला एवढे घाबरतात का?
कठीण प्रश्न, सोपं उत्तर!
भिती वाटते, ” ती नाही म्हणाली तर??”
पण जर हो म्हणाली तर? चांगलच होत ना? मग आर या पार…. काहीतरी उत्तर मिळेल.
🙂
सर प्लीज अजून एक lovestory post करा. फारच छान वाटत वाचायला.
प्रणिता
मनात आली तरच लिहीता येते. पूर्णपणे काल्पनिक लिहीणं फार अवघड होतं मला. पण नक्कीच प्रयत्न करीन.धन्यवाद.