१ लक्ष धन्यवाद…..

काल संध्याकाळी ट्विटरवर एक मेसेज पाहिला, भुंगा सिध्दार्थ , सुहास, पंकज, प्रभास गुप्ते ,सचिनने टाकलेला की माझ्या ब्लॉग च्या टॊटल हिट्स ची संख्या एक लक्ष पुर्ण झालेली आहे.क्षणभर माझा विश्वासच बसला नव्हता. कारण ऍव्हरेज दररोजच्या हिट्सच्या रेशो प्रमाणे, मला असे वाटत होते की ही संख्या पोहोचायला आजचा दिवस उजाडेल.

पण जेंव्हा हा एक लाखाचा आकडा स्वतः पाहिला तेंव्हा खूप आनंद झाला..ब्लॉग वर जेंव्हा कोणी ब्लॉगर लिहितो, तेंव्हा ते वाचल्या जावं अशी अपेक्षा असते. जेंव्हा लोकं वाचतात आणि प्रतिक्रिया देतात.. (चांगल्या आणि वाईट दोन्ही) तेंव्हा मात्र खूप बरं वाटतं.  मी जेंव्हा ब्लॉग वर लिहिणं सुरु केलं, तेंव्हा मित्र मंडळींना खरंच वाटत नव्हतं. कारण   माझ्या सारख्या आयुष्यभर  मशिनरीचं  मेंटेनन्स सांभाळणाऱ्या, आणि साहित्याशी अजिबात संबंध नसलेला  माणुस लिहू शकतो ह्यावर लोकांचा विश्वास बसत नव्हता. बरेच लोकं तर काय रे बायकोने लिहिलेले आपल्या नावावर खपवतो का? म्हणून कूचकट कॉमेंट्स पण करित होते. हळू हळू मात्र मित्रांचा पण विश्वास बसला की मी लिहू शकतो यावर..

ब्लॉग सुरु केला, पहिले दोन तिन दिवस काहीतरी लिहिलं. नंतर मात्र काहीच सुचत नव्हतं. माझा एक मित्र सचिन संघई काही लिहिलं नाही की फोन करायचा.. आजचा लेख कुठे आहे?  म्हणून  मग त्यानंतर मात्र सचिनला विचारायची वेळ येउ द्यायची नाही हा विचार पक्का केला, आणि दररोज काहीतरी पोस्ट करणे सुरु केले. तरी पण मधेच एखादा दोन दिवस पोस्ट करणे होत नव्हते . तेंव्हा या एक लाखापर्यंतच्या मजली मधे सचिनचे आभार मानल्या शिवाय मी पुढे जाऊच शकत नाही.

तुम्हाला असं वाटू देऊ नका की मी ही निर्वाणीची भाषा बोलतोय म्हणून. तसं नाही. हा एक मोठा माइलस्टोन असतो ब्लॉगर्सच्या आयुष्यातला.  हा ब्लॉग १७ जाने २००९ला सुरु केला. तेंव्हा असं वाटलं नव्हतं की आपण   वर्षभर इथे काही तरी   लिहू शकू म्हणून,  -असं वाटत होतं की फार तर दोन महिने उत्साह टिकेल… पण   जेंव्हा लिहिणं सुरु केलं तसे विषय सुचत गेले, लोकांनी वाचून कॉमेंट्स देणे सुरु केले. सगळ्या मिळून ४४५२ कॉमेंट्स झाल्या आहेत आजपर्यंत त्या पैकी निम्म्या म्हणजे माझे रिप्लाय असतील.जर इतक्या भरभरुन कॉमेंट्स मिळाल्या नसत्या तर कदाचित लिहिण्याचा उत्साह टिकला नसता, म्हणून म्हणतो की  इथे ब्लॉग वर आवर्जून कॉमेंट्स देणाऱ्यांचे पण फार मोठे योगदान आहे हा लाखाचा पल्ला गाठण्यासाठी.   कॉमेंट्समुळे  खूप हुरुप वाढतो, आणि नवीन लिखाणाची इच्छा पण होते.

ब्लॉग वर इथे या वर्षभरात खूप नवीन मित्र मिळाले- आवर्जून दाद देणारे,  चुकलं तर सांगणारे.. हे ब्लॉगिंग सुरु केल्यापासुनच सगळ्यात मोठं अचिव्हमेंट!!

या व्यतिरिक्त दोन लेख लोकमत आणि मटा मधे छा्पून आलेत. तुम्हा सगळ्या वाचकांचे या प्रसंगी मी मनापासून आभार मानू इच्छितो.आणि पुढे येणारे नवीन वर्ष तुम्हा सगळ्यांना सुख,समृध्दी , समाधान,  देणारे आणि आरोग्यदायी असो हीच सदिच्छा व्यक्त करुन हे पोस्ट संपवतो.

शतशः आभार…

About महेंद्र

माझा ब्लॉग :- http://kayvatelte.com
This entry was posted in अनुभव and tagged , , , , . Bookmark the permalink.

71 Responses to १ लक्ष धन्यवाद…..

 1. Pingback: Tweets that mention १ लक्ष धन्यवाद….. « काय वाटेल ते…….. -- Topsy.com

 2. महेंद्रजी,
  नविन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा !

  ब्लॉगच्या लक्ष’वेधी कामगिरीबद्दल अभिनंदन!
  मी या आधीही म्हटलं होतं की नविन वर्षाला तुमच्या ब्लॉगची ही लाखाची भेट असेल!

  तुमच्या ब्लॉगवर भरभरुन वाचायला मिळालं… अनेक अनुभव वाचायला मिळाले.. खरं सांगायचं तर तुमच्या संगतीत आम्हीही सुधारत गेलो!

  नविन वर्षातही तुमची लेखनी चालत राहो!
  पुन्हा एकदा अभिनंदन !

 3. सचिन says:

  काका, अभिनंदन. असंच तुमच लिखाण आम्हाला जगण दाखवत/शिकवत राहो.

  तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबियाना, तुमच्या ब्लागवर भरभरुन प्रेम करणार्या वाचकरसिकांना नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.

 4. काका नविन वर्षाची पहिलीच नोंद कशावर लिहायची यावर जास्त विचार करावा लागला नसेल ना?
  नूतन वर्षाभिनंदन आणि “काय वाटेल ते”च्या पुढील वाटचालीस शुभेच्छा.

 5. Sagar says:

  Kaka
  Abhinandan….

 6. सुरेश पेठे says:

  व्वा! व्वा! महेंद्रजी अभिनंदन ! ही एक मोठीच फलश्रुती आहे ! आमच्या पुढे ते दीपस्तंबा प्रमाणे रहाणार आहेत, त्यामुळे आमचाही हुरूप वाढणार आहे. नव्या वर्षाच्या पूर्व संध्येवरील ही सर्वात छान बातमी आहे.

  नव वर्षाच्या शुभेच्छा आणि पुन:श्च अभिनंदन !

 7. Manmaujee says:

  महेंद्र काका लक्ष’वेधी कामगिरीबद्दल अभिनंदन!!!!

  आपला ब्लॉग असाच बहरत राहो !!!

  नविन वर्षाच्या शुभेच्छा.

  • धन्यवाद.. तुमच्या सगळ्य़ांच्या मुळेच उत्साह टिकुन राहिला…

   • सुरेशजी
    मनापासुन आभार.. जेंव्हा ब्लॉग सुरु केला, तेंव्हा काहीच माहिती नव्हतं या फिल्ड मधलं.. पण शेवटी सरावाने जमलं सगळं..

 8. त्रिवार अभिनंदन! कोणताही विषय तुम्ही इतक्या सुंदर रितीने हाताळता की वाचकांची संख्या वाढती राहिली, तर नवल नाही. तुमच्या हातून उत्तरोत्तर सुंदर लेखन होवो आणि आम्हाला ते वाचायला मिळो ह्या शुभेच्छा!

  • कांचन..
   अहो नुसतं लिहिलं आणि कोणी वाचलं नाही तर लिहिण्यातला उत्साह कसा टिकुन राहिल? तुम्हा सगळ्यांच्या प्रतिक्रिया म्हणजे एक वेगळंच उत्साहवर्धक रसायन असतं .

 9. sahajach says:

  महेंद्रजी अभिनंदन……नव्या वर्षाची सुरूवात मस्त झालीये……

  नविन वर्षाच्या शुभेच्छा……नुसत्याच नाहीत तर ’लाखो’ शुभेच्छा……….

 10. jivanika says:

  अभिनंदन आणि नविन वर्षाच्या शुभेच्छा.

 11. काका, लखपती झाल्याबद्दल अभिनंदन आणि नविन वर्षाच्या शुभेच्छा !

  तुम्ही तर आता मराठी ब्लॉग विश्वातील भीष्माचार्य झाला आहात. असेच लेख लिहित रहा.

 12. Suhas Zele says:

  महेन्द्रजी, अभिनंदन. जेव्हा पासून मी रेग्युलर ब्लॉगिंग चालू केला तेव्हापासून तुमच्या ब्लॉगला भेट दिल्या शिवाय लॉग आउट करतच नाही….असेच काय वाट्टेल ते लिहत रहा. माझ्या शुभेच्छा

 13. YD says:

  1 Lakh, waa…abhinandan kaka

 14. खुप खुप शुभेच्छा काका, किती योगायोग बघा की ३१ डिसेंबरच्या च्या आत वर्षभरात तुम्हाला लक्षावधी लोकं भेटून गेली… शेवटी तुम्ही तुमच्यामधली शक्ती हेरलिय, अन तीचा योग्य वापर तुम्ही करता आहात. रोजच्या घडामोडींवर तुमची अचूक तीक्ष्ण नजर असते, आजपर्यंतच्या पोस्ट्स मधून तुमचे अन वाचकांचे प्रत्येक विषयावर नेमकं काय मत असतं, ते फक्त तुमच्या, अन दोन भुंग्यांच्या अनुदिनींवरून तसेच इतर मराठी ब्लॉगर्स, जे जीव ओतून लिहितात, त्यांच्या अनुदिनींवरून, खुप शिकायला मिळाले. शेवटी तुमच्या अनुदिनिच्या या लक्ष व्हिजिटर्संना कारणीभूत फक्त तुमचे लेखन अन त्यावर रंगत असलेली चर्चा याच गोष्टी कारणीभूत आहेत…(माझं मत…)

  बाकी, नविन वर्षाच्या पण हार्दिक तसेच माझ्याकडून सर्वांत जास्त शुभेच्छा… 😉

  विशल्या!

  • विशाल
   खरंच इतकी अपेक्षा नव्हती. पण भर भरुन प्रेम दिलं लोकांनी. इथे येउन न कंटाळता मी जे काही तोडकं मोडकं लिहिलं ते गोड करुन घेतलं. कुठल्या शब्दात आभार मानावेत तेच समजत नाही. असो..

 15. madhuri says:

  Congrats……..

  and HAppy New Year

 16. लाखाच्या गोष्टीबद्दल अभिनंदन.
  शेखर जोशी

 17. अनिकेत says:

  लाखमोलाच्या ह्या ब्लॉगला लाखभर वाचकांची भेट हे कौतुकास्पद आहे. आपले लेखन नविन वर्षातही असेच चालु राहो ही सदिच्छा!

 18. Amol says:

  Congratulations kaka. Waiting to read your upcoming writings.

  -Anaamik

 19. आनंद पत्रे says:

  महेंद्रजी,
  धन्यवाद तुम्हाला, तुमच्या ब्लॉगमुळेच मी ब्लॉग वाचणे नियमितपणे सुरु केले…
  चौफेर विषयावर तुम्ही लेख लिहीले आणि प्रत्येक कमेंट्ला स्वत:हुन रिप्लाय देता हे विशेष.
  अभिनंदन.

  • आनंद
   मला स्वतःला सगळ्यांशी संवाद साधायला आवडतो. प्रत्येक माणुस जेंव्हा कॉमेंट टाकतो तेंव्हा उत्तराची पण अपेक्षा करतोच.. तेंव्हा उत्तर हे द्यायला हवंच.. आणि ते पण इंडिव्हिज्युअली असे माझे मत आहे..

 20. vikram says:

  कॉमेंट्समुळे खुप हुरुप वाढतो, आणि नविन लिखाणाची इच्छा पण होते.
  हे अगदी खर आहे.

  तुम्हाला नववर्षाची एक चांगली गिफ्ट मिळाली आहे तुम्ही असेच लिहित रहा तुमचा ब्लॉग पाहून आम्हा नवीन लोकांना खूप स्फूर्ती मिळते. 🙂

  तुम्हाला पुन्हा एकदा नववर्षाच्या मनपूर्वक शुभेच्छा 🙂

  • विक्रम
   हो ना.. अपेक्षेपेक्षा जास्त मोठं गिफ्ट आहे हे २००९ सालचं.. ब्लॉग वर जर रेगुलर पोस्ट टाकल्या तर लोकांच्या भेटी वाढतात .. हे नक्की.

 21. gouri says:

  abhinandan … tumhi lakhapati jhalat 🙂

  naveen varshachya shubhecchaa!

 22. anukshre says:

  महेंद्र्जी,
  कोट्यान कोटी हिट्स होऊ देत. वर्ड प्रेस चे कॅप्टन आहात. २९ डिसें व १ जाने ह्या दोन्ही दिवसाच्या पोस्ट…. न लिहिण्याची कारणे…. ते… लक्ष वाचकांचे प्रेम. किती सकारात्मक आहे. असेच आमच्या बरोबर रहा. लक्ष वाटचालीत आपले व आपल्या परिवाराचे अभिनंदन!!!!!
  अनुजा धनंजय

  • शुभेच्छांची तर गरज आहेच..
   वाचकांचं प्रेम सकारात्मक आहेच..म्हणुनच तर इथे टीकुन आहे अजुनपर्यंत.. स्टार माझाने रिजेक्शन केलं तेंव्हा थोडी रागाची भावना होती, नंतर लक्षात आलं, की त्यांची लायकी नाही माझ्या ब्लॉगला इव्हॅल्युएट करायची.. (माकडाच्या हाती माणिक दिलं तर काय होईल??) अनिकेत, भुंगा आणि इतर दोन चार ब्लॉग सोडले तर… असो….. आणि अजुन जोमाने लिहीणं सुरु ठेवलं. असो..
   २००९ ने बरंच काही दिलं मला…वाचकांचं प्रेम आणि सदिच्छा…

 23. फारच मोठा पल्ला आहे हा. तुमचे खास अभिनंदन. भविष्यात आणखी पोस्टची संख्या वाढेल, अशी अपेक्षा आहे.

  • देविदास
   खरंच खुप मोठा पल्ला गाठला गेला. स्टार माझा च्या नंतर लिखाण बंदच करणार होतो.. पण शेवटी वर लिहिल्याप्रमाणे त्या रिजेक्शन मुळे जास्त जोमाने लिहु लागलो. माझा स्वभाव आहे, की मी सहसा हार मानत नाही.. आणि युध्द अगदी शेवटपर्यंत लढतो..असो..
   अभिप्राया करिता धन्यवाद.. आणि नुतन वर्षाभिनंदन!!!

 24. Aparna says:

  ब्लॉगच्या ‘लक्ष’वेधी कामगिरीबद्दल अभिनंदन!
  खूप आनंद होतोय….एक वर्ष पूर्ण व्हायच्या आत…मला वाटतं या वर्षाची सुरूवातीची सगळ्यात चांगली भेट आहे….आता या वर्षी लाखाचे दस लाख होऊन जाऊदेत….:)

  • अपर्णा
   धन्यवाद वगैरे म्हंटलं की फारच फॉर्मल वाटतं, पण आभार..
   शुभेच्छांची गरज आहेच .. नविन् वर्षासाठी.
   नविन वर्ष तुम्हा सर्वांना भरभराटीचे जाओ हिच इच्छा..

 25. अभिनंदन..!अभिनंदन..!अभिनंदन..!
  लाख मोलाचे लेख लिहल्यामुळेच असे ’लखपती’ झालात असेच लिहित रहा..ब्लोगच्या पुढील वाटचाली साठी शुभेच्छा….

 26. Nikhil says:

  When you wrote this post, total visitors were 1 lakh and since then in 3 days number has shot up by 1350 meaning 450 visitors every day…. I would specially congratulate for this.

 27. काका “लई भारी” कामगीरी आहे तुमच्या ब्लॉगची. तुमचा ब्लॉग आणि प्रत्येक पोस्ट आवडते बघा आपल्याला.

  खुप छान. असंच लिहत रहा काका.

  आमच्या बाळाने (नेटभेट) पण १ तारखेलाच १००००० पुर्ण करुन सलामी दीली नविन वर्षात !

 28. जरा कमेंट लिहायला उशीरच झाला. पण एक लक्ष भेट देणारे… यापेक्षा नववर्षाची काय भेट असू शकते? खरंच ब्लॉग कसा असाव असे मला कुणी विचारले की मी माझ्याआधी तुमचा आणि भुंगाची लिंक पुढे करतो. खरंच एवढे विविध विषयांवर (शुद्ध मराठीत डायव्हर्सिफाईड) लेखन आम्हांला पण नवीन स्फूर्ती देते पुढे लिहायला.

  • हे तर खरंच.. ही अगदी अनपेक्षीत भेट होती नव वर्षाची. मला तर असं वाटलं होतं की बहुतेक एक तारिख उजाडेल, पण ३१ला दुपारीच झाले एक लाख व्हिजीटर्स..

 29. Pravin Satav says:

  Hello Sir,

  Please keep up the good work. Currently, I m in Italy-Rome and I keep half an hour daily to read Marathi Blogs. Unfortunately, there is no Marathi speaking community here, so bloggers like you keep me in touch with Maharashtra.

  Looking forward to read lots of new things from you and wish you a very happy new year 🙂

  Ciao,
  Pravin

 30. Rohan says:

  खुप खुप अभिनंदन … आता काही दिवसात ‘उघडला ब्लॉग सव्वा लाखाचा’ असे महानता येइल … 😀 (ह्या पोस्टवरुन लक्ष्यात आले आहे की माझ्या सर्व ब्लोग्च्या हिट्स ची संख्या सुद्धा लाखावर गेली आहे बहुदा…)

  • अरे मग चेक कर नां.. तु काउंटर लावलेलं नाहीस कां? वर्ड प्रेस मधे इन बिल्ट आहे काउंटर..

   • rohan says:

    लावले रे .. पण टोटल ५ वेगवेगळे ब्लोग्स आहेत ना 😀 … एकुण मिळून किती असा विचार कराय होतो … 🙂 आता मोजुनच काढतो … बहुदा होतील लाखभर … 🙂

    • चांगलं आहे. पण पाच ब्लॉग कुठले रे? मला दोन माहिती आहेत..

     • rohan says:

      अरे असा काय …
      १. मराठा इतिहासाची दैनंदिनी
      २. खाण्यासाठी जन्म आपुला
      ३. माझी सह्यभ्रमंती
      ४. इतिहासाच्या साक्षीने आणि
      ५. माझे भारत भ्रमण.

      तसा अजून एक आहे पण तो सध्या बंद आहे. ‘Chatrapati Shivaji Maharaj’ म्हणुन इंग्रजी मधून आहे… लिंक आहेत बघ माझ्या प्रोफाएल वर…

      • २. खाण्यासाठी जन्म आपुला
       ३. माझी सह्यभ्रमंती
       हे दोन मला माहिती होते.. इतर बघतो आता..

 31. bhaanasa says:

  महेंद्र अभिनंदन!अभिनंदन!अभिनंदन! थोडया उशीरानेच करतेय तुझे अभिनंदन रागावू नकोस हो.:)

  • तुझीच वाट पहात होतो.. पण माहिती होतं की तु नेट वर अव्हेलेबल नाहीस म्हणुन.. 🙂 धन्यवाद..

 32. Parag says:

  mahendraji … ushira kaa hoina abhinandan!

  • पराग
   तुम्हा सगळ्यांच्या कौतुकानेच हे शक्य झाले. एका वर्षात ३६५ पोस्ट टाकायचा संकल्प होता. आता बघु या जमतं का ते..थोडा मागे पडलोय .. पण बहुतेक कॅच अप करीन.

 33. प्रज्ञाताई says:

  मनापासून अभिनंदन हो!

 34. Pingback: २ लक्ष आभार… | काय वाटेल ते……..

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s