बरेचदा असं होतं, की लोकं प्रेमात पडलेले असतात, पण त्यांचं त्यांनाच समजत नाही की आपण खरंच प्रेमात पडलोय म्हणुन. तर अशा लोकांसाठी त्यांना समजावं की आपण प्रेमात पडलो आहोत म्हणुन मुद्दाम हे पोस्ट टाकतोय. प्रेमात पडलेल्यांची लक्षणं. तुम्ही स्वतःला या मधली किती लक्षणं लागु होतात ते पहा, आणि या प्रेम रोगावर ’योग्य’ रिपिट ’योग्य’ ते उपचार करुन घ्या..
१) जिच्यावर प्रेम आहे तिच्या व्यतिरिक्त जगातिल प्रत्येकच मुलगी दिसायला ’तिच्यपेक्षा डावी’ दिसु लागते. मग यामधे ऐश्वर्या रायचा फोटो जरी समोर ठेवला, तर ऐश्वर्याचं पण नाक वाकडं दिसु लागतं..
२) प्रत्येकच वस्तु मधे तिचा चेहेरा दिसु लागतो. जिथे पहावं तिथे ती आहे असा भास होतो.
३) फोनची रिंग वाजली की तुम्ही फोन कडे धावता, तिचाच फोन आला असावा असं वाट्तं रहातं सारख.
४) एकदा तिच्याशी फोन वर बोलणं सुरु झालं की ते कधी संपुच नये असं वाटतं. फोन ठेवतांना तिने फोन बंद केल्याशिवाय तुम्ही हॅंग करित नाही.
५) तिच्या प्रत्येक ’मिसकॉल’ची आतुरतेने तुम्ही वाट पहात असता. आणि मिसकॉल मिस होण्यापुर्वीच कॉल बॅक करता. आपल्या प्रिपेड कार्डच्या बॅलन्स ची केअर न करता…
६) मित्रांशी तुम्ही खोटं बोलणं सुरु करता.
७) स्टॅग पार्टीला जाउन मित्रांबरोबर मस्ती करण्यापेक्षा तिच्या बरोबर पेटीकोट,भाजी, ओढणी सारख्या फालतु गोष्टी शॉपिंगला जाणं तुम्हाला जास्त महत्वाचं वाटू लागतं.
८) तिच्या बरोबर अगदी रडूबाई सिनेमा पण तुम्ही आवडिने पहाण्यास तयार असता. प्रसंगी न कळणाऱ्या भाषेतिल चित्रपट जसे शंकराभरणम वगैरे पण तुम्ही ’आवडीने’ पहाता .
९)जगातली सगळ्यात सुंदर मुलगी म्हणजे ’ती’च हे अगदी पक्कं बसतं मनामधे.. आणि ते मत म्हणजे काळ्या दगडावरची रेघ असते.
१०) आईने / वडिलांनी हाक मारली तरी पण ऐकु येत नाही
११) सिध्दीविनायकाच्या ट्रिप्स वाढल्या असतात.
१२) क्लास मधे शिकवत असतांना लेक्चरर पेक्षा तिच्या कडे जास्त लक्ष जातं.
१३) कोरा कागद, आणि पेन सापडला, की त्यावर आपोआप तिचंच नाव लिहिलं जातं
१४) दुकानात नविन पेन विकत घ्यायला गेलात, तरी पण लिहुन पहातांना स्वतःच्या नावा ऐवजी तिचंच नांव लिहुन पेन चेक करता.
१५)बॉस ला फोन करायला म्हणुन रिसिव्हर उचलता, आणि तिचा नंबर डायल करता.
१६)कुठेही वर्तुळाकार वस्तु दिसली की त्या मधे तिचाच चेहेरा दिसणं सुरु होतं.
१७)शिर्डीच्या साईबाबाचा दोरा हाताला बांधला असतो. प्रत्येक मंदिरासमोर येता जाता हात जोडुन उभे राहिल्याशिवाय बरं वाटत नाही.
१८)ऑफिसचा रस्ता तिच्या घरासमोरुन जातो. आता ऑफिस पश्चिमेला आणि तिचं घर पुर्वेला असलं तरीही..
१९)तिच्या भावाशी मैत्री करण्यासाठी तुम्ही काहिही करण्यास तयार असता.
२०) तिचे मित्र मैत्रीणी आपले पण मित्र व्हावेत म्हणुन तुम्ही पदरचे पैसे खर्च करायला पण तयार होता. केवळ तिचा सहवास लाभावा म्हणुन..
२१)तिला आवडतं म्हणुन तुम्ही अगदी चाटवाल्या भैय्याच्या गाडिवर -(ज्याला तुम्ही नेहेमी शिव्या घालता, घाणेरडा म्हणुन )तिच्या सोबत उभे राहुन चाट आवडिने खाता..
२२) तिचे वडिल दिसले की तुम्ही अगदी शालिनपणाचा मुखवटा पांघरुन ( कारण तुम्ही शालिन नाही हे मला माहिती आहे ) त्यांना गुड मॉर्निंग , गुड इव्हिनिंग, किंवा हॅव अ नाइस डे अंकल करता तेंव्हा.. नक्कीच!!
२३)तिच्या भावाला बुलेटवर बसुन येतांना तुम्हाला साक्षात यमराज रेड्यावर बसुन आल्याचा भास होतो.
२४)तुम्ही बुक एक्झीबिशन मधे मुद्दाम जाता आणि शेर ओ शायरी, किंवा गझल्स ची पुस्तकं विकत आणता.
२५) रॅप, किंवा डीस्को ऐवजी तुम्हाला गझल ऐकत रहाणं आवडतं . तलत मेहमुद एकदम फेवरेट सिंगर बनतो. या जगात फक्त तलत चा आवाज शाश्वत आहे बस्स.. बाकी सब कुछ झुट है! असं वाटु लागतं.
२६)तिला आवडतो ,म्हणुन तुम्ही गुलाबी किंवा पर्पल कलर चा शर्ट विकत घेता आणि आवडिने घालता..
२७)एकटे बसले असला की दिवा स्वप्न पहाणं सुरु करता.त्या स्वप्नात केवळ तुम्ही आणि ती.. बस इतर कोणिच नसतं. लोकांना ब्लॅक ऍंड व्हाईट स्वप्न पडतात, तर तुम्हाला कलर!!
२८)झोपेचं पार खोबरं होतं. रात्री तासन तास तुम्ही तळमळत काढता तिच्या आठवणीत..
२९)तुमचे ऑफिस जरी १० वाजता असले, तरी तिच्या वेळेवर म्हणजे सकाळी ८ वाजता तुम्ही घरुन निघता, आणि तिच्याच बसने प्रवास करता.
३०) सिनेमाची हिरोइन पण तिच्या सारखीच दिसायला लागते, आणि हिरो तुमच्या सारखा.
३१)तिच्या नावाच्या स्पेलिंगचं प्रत्येक अक्षर सेक्सी दिसु लागतं.
३२) तिच्या कडे पाहिलं की ताजमहाल पाहिल्याचं समाधान मिळतं.
३३)तिच्या नावातले, आणि तुमच्या नावातले कॉमन अक्षरं तुम्ही शोधुन त्यांची न्युमरॉलॉजी ने व्हॅल्यु काढता..
३४) तुम्ही मेसेंजर वर नेहेमी अदृष्य रहाता, ती आल्यावर इतर मित्रांनी त्रास देउ नये म्हणुन.. आणि तुम्हाला फक्त तिच्याशीच चॅट करायला आवडतं . चॅटींग कमित कमी दोन तास.. एका बैठकीत..
३५)मित्रांनी बोलावलं, तर टाळुन तिच्या घरासमोर जाउन टाइम पास करणं तुम्हाला जास्त आवडतं.
३६) तिच्या कॉलेज समोरचा कॅंटीनवाला तुम्हाला उधार द्यायला पण तयार होईल इतके वेळा तुम्ही तिथे जाउन बसता.
३७)कपड्यांच्या बाबतीत तुम्ही खुप सेंटीमेंटल होता. आणि नेहेमी अगदी अप टु डेट रहाता.. काय सांगावं ती कधी भेटेल ते??
३८)जगातली सगळ्यात सुंदर भाषा म्हणजे उर्दू ( जरी येत नसली तरीही) वाटू लागते. मराठी एकदम डाउन मार्केट.
३९)अरुण दाते एकदम फेवरेट सिंगर होतो. मग दिवस तुझे हे फुलायचे ऐकलं, की तिचा चेहेरा डोळ्यापुढे येतो.
४०) नॅटकिंग कोल चे लव्हसॉंग्ज पण खुप आवडायला लागतात..
४१)गुलाम अलीचा मधाळ आवाज हदयाला घरं पाडतो, आणि शक्य होईल तेंव्हा तुम्ही ऐकत असता ही गाणी. बरेचदा बडे गुलाम अली खां पण ऐकायचा प्रयत्न करता तुम्ही.
४२)भुक वगैरे काही लागत नाही, उदर भरण नोहे जाणिजे यज्ञ कर्म या उक्ती प्रमाणे जे काही पानात पडेल ते तुम्ही न कुरकुरता खाता. अगदी शेपुची भाजी सुद्धा.आणि जर आईने आश्चर्याने पाहिलं तर शेपु कसा तब्येतिला चांगला, यावर पण बोलता..
४३) भांग व्यवस्थित मनासारखा जमल्याशिवाय आणि कपड्यांना कडक इस्त्री असल्याशिवाय घराबाहेर पाउल पडत नाही , ( काय सांगावं ती कधी भेटली तर कुठे??).
४४)ऑर्कुट स्क्रॅप या कम्युनिटीला जॉइन करुन रोज तिला नविन कुठला स्क्रॅप पाठवायचा याची काळजी करित बसता.
४५) तिच्या फ्रेंड लिस्ट मधे एखादा ’नको असलेला’ तर ऍड होत नाही, याची खात्री करुन घेण्यासाठी तिच्या फ्रेंड्स्च्या प्रोफाइलला रेग्युलरली मॉनिटर करता.
४६)लव्ह, प्रेम, प्यार शब्द असलेले एस एम एस शोधुन तिला पाठवता..
४७) तिला गुड मॉर्निंग म्हंटल्या शिवाय तुमचा दिवस सुरु होत नाही, आणि गुड नाईट म्हंटल्याशिवाय रात्र!!
४८)तिच्याशिवाय हे जीवन व्यर्थ आहे असे वाटु लागते.
४९)तिला पहायला कोणी आलं की तुमचा जीव कासाविस होतो, आणि तुमच्या मंदिराच्या फेऱ्या सुरु होतात.
५०)तुमचे संध्याकाळी पाच वाजता भेटायचे ठरले असतांना, तुम्ही मात्र चक्क एक तास भर आधी तिथे जाउन तिची वाट पहाता.. अजिबात कुरकुर न करता.वाट बघतांना एक एक सेकंद तुम्हाला एक एक युगा प्रमाणे वाटतो , आणि दर दोन मिनिटांनी तुम्ही घड्याळाकडे पहाता..
५१)समोर कागद – पेन असेल तर तुम्ही सौ. तिचं नाव+ तुमचं नाव+ तुमचं आडनाव लिहुन पहाता,आणि खुळ्यासारखे स्वतःशीच हसता.
५२)?????
अजुन बरेच काही असतिल पण इथे थांबतो आता. पुढची लक्षणं तुम्ही स्वतःचा लिहा खाली कॉमेंट्स मधे..
( आणि हो.. प्रेमात न पडलेल्यांची लक्षणं लवकरच.. पुढल्या शनिवारी पोस्ट करणार आहे.. )
५२. तिच्या वाढदिवसाला काय गिफ्ट द्यावं याचा विचार २ महिने आधीपासुनच करता.
५३. तिला “प्रपोज” कराण्यासाठी रोज उजळणी करता आणि कोणतं वाक्य बोलावं यावर रिसर्च सुरु होतो.
५४. तिच्यासमोर “मॆच्युअर” असल्याचा आव आणता, कितीही बावळट असलात तरीही.
५५. असा परफ्युम मारता जसं काही जगात पाण्याचा दुष्काळ पडला आहे.
५६. समजा ती हो म्हणालीच तर पुढची गणितं कशी जुळवायची आणि सगळ्यांना कसं पटवायचं याचे काल्पनिक प्रसंग मनाशी रचता.
५७. तिने सही केलेला कागद “लकी चार्म” म्हणुन पाकीटात ठेवता.
५८. तिला इन्कम टॆक्स आणि इंशुरन्स पॊलिसी किंवा डाळ तांदळाचे वाढील भाव वगैरे फालतु विषयांवर कधीतरी बोलता म्हणजे तुम्ही किती संसारिक आहात हे सिद्ध करता येतं.
५९. बसला ५ रुपये जिवावर आल्यासारखे देणारे तुम्ही बिनदिक्कतपणे रोज टॆक्सीला १०० रुपये खर्च करु लागता.
६०. तुम्हाला भीती वाटते की तुम्ही तिच्यासमोर “तुझा टकल्या बाप खडुस आहे” हे वाक्य चुकुन बोलुन जाल. हे हे हे.
सौरभ
मस्त झाले आहेत.. मंडळी १०१ पर्यंत न्या ही यादी… 🙂
वाह काका, खूपच रिसर्च केलेला दिसतोय 🙂
अप्रतिम पॉइण्ट्स आणि सौरभने सांगितलेले एक्सटेंडेड पॉइण्ट्स पण मस्त आहेत…
Have a great weekend..
६१) ती रोज नीट जेवते की नाही घरी असो किवा ऑफीस, मग रोज तिला विचारायाच काय जेवलीस, आणि जर तू नाही नीट नाही जेवलीस तर मी पण नाही जेवणार असा एमोशनल ब्लॅकमेल करण…
६२) तिला बर नसेल तर ती नीट औषध घेतेय ना याची काळजी करेल, भले स्वत: च्या तब्येतीचे तीन-तेरा वाजू देत..
६३) तिला काय खायला आवडत किवा काय आवडत नाही याची यादी तोंडपाठ एकदम…मग आपल्याला त्या पदार्थाची आवड असो नसो, हसत हसत ताव मारायचा तिच्या सोबत..
६४) ??? अजुन सुचले की नक्कीच सांगेन, तुम्ही ऑलमोस्ट सगळे कवर केलेत 😀
रिसर्चची गरज नाही. अनुभवाचे बोल आहेत हे.. 🙂
65)Ticha ek best friend aahe he kalayvarach zop udate..pan tas kahi nasel he swatah swatalach mahnun samadhan karun ghyaych.
66)Tichya gharakade vinakaran gadivar ferya marat basan
67)Aata ti jar dusarya college madhe asel tar tar tichya college madhe jaun tila bhetun var mahnaych ki maza mitr aahe ya collegemadhe..tyala bhetayla aalo hoto
68)Chukunhi bhikaryala bhik n denare ti sobat asel tar lagech paise kadhta..
69)Tila aavadat mhanun ti sobat astana rastyatlya Kutryna biscuit khau ghalata…
Kaka
Varil kahi anubhavache bol aahet…..:)
दुर्दैवाने आज ह्या लिस्टमध्ये माझ्याकडून काही add करू शकत नाही. 😦
पुढच्या शनिवार मात्र मी तयार राहीन कारण प्रेमात न पडलेल्यांची लक्षणं म्हणजे माझ्यासारख्या लोकांचा दिनक्रम म्हणायला हरकत नाही. 🙂
ठिक आहे.. पण कधी प्रेमात पडलाच तर समजेल तरी कमित कमी.. 🙂
हो ते बाकी खरं आहे. या रोगाची असतील नसतील तेव्हढी सगळी लक्षणं समजली. कधी प्रेमात पडलो तर आपण प्रेमात पडलो आहोत हे ताबडतोब कळून येईल.
तोच तर उद्देश होता या पोस्ट चा..
महेंद्र काका, लय भारी!!!
काही ऍड नाही केल्ं?? 😀
same as सिद्धार्थ
तो सिनेमा बघा अशोककुमार होता त्यामधे , आणि अमोल पालेकर, विद्या सिन्हा होती… आता नांव विसरलो बघा.. आठवलं की लिहितो इथे.
Choti si baat
छोटी सी बात
नितिन
तेच ते.. नांवच आठवत नव्हतं. त्या सिनेमामधे असरानी पण होता. मस्त होता तो सिनेमा..
*) तिच्याकडे फोन आहे का व असला तर नंबर काय असेल, याची माहिती काढण्यासाठी एखाद्या जेम्स बॉंडच्या पिच्चरमधील सीन प्रमाणे तुम्ही प्रयत्न चालू करता…
*) जर ती पहिल्यांदाच फोनवर बोलली तर तीला पुढच्या फोनसाठी तयार करण्याकरता तुम्ही काहीही, जे बोलता येईल ते बोलता, जसे की पहिले तर नाव, कॉलेज, ब्रांच वगैरे वगैरे… तिने यांचे उत्तरे दिल्यावर साहजिकच तीच हे प्रश्न रीपीट करते… त्यांनतर रात्री एखादा गोड असा मॅसेज पाठवता…
*) त्यानंतर दुसर्याच दिवसापासून जेवढे कॉल रेट कमी करणारे प्लॅन, मेसेज रेट कमी करणारे प्लॅन्स असतील, ते मिळेल तेवढ्या किमतींत ऍक्टिवेट करवून घेता. एखाद्यावेळी सिम-कार्डही चेन्ज करता…
*) दुसरी कोणी जवळ आली तर तीला टाळण्याचा प्रयत्न करता..(कोण जाणे, तीने हीच्यासोबत मला पाहू नये या विचाराने… ;))
*) अभ्यासात जरा जास्तच लक्ष लागलंय असं घरच्यांना वाटण्यासाठी पुस्तकं हातात घेता, पण मुळात मात्र एक ओळही वाचत नाही, तिचेच विचार चालू असतात…
*) कोणतीही दुसरी पाहिली की त्या दुसरीच्या ड्रेसमध्ये तीला फिट करून पाहता, जर छान दिसली तर तिच्या बाजूला आपणही आहोत असा भास करवून घेता… 😉
*) ……………………… (दुसर्यांनाही लिहायला जागा मिळायला हवी ना…!)
– विशल्या!
विशाल
सही… बरोबर आहे, इतरांना पण चान्स दिला पाहिजे नां.. 🙂
विशल्या गावलास लेका बरोबर. तू केलेले सगळे धंदे बरळून टाकलेस इथे. कंट्रोल बेटा कंट्रोल.
तरीच म्हंटलं, की ट्विटरवर सारखा पेपर बिघडला असं का म्हणत असतो हा नेहेमी…
७०.तिच्याशी जवळीक वाढवणारे मास्टर प्लेन करण्यात बराच मेंदु खर्ची घालणे
७१.बरयाच गोष्टी विसरायला लागता…
७२.घरचे एखादे काम सांगीतल्यावर नाक मुरडणारे तुम्ही तिच्या छोट्याश्या(फ़ालतु) कामासाठी जंग जंग पछाड्णे.
७३.तिला आवडणार प्रत्येक गाण/पुस्तक/सिनेमा आपोआप तुम्हालाही आवडु लागणे.
७४.आयुष्याबाबत उगाचच जास्त सिरियस होता..
७५.कधी कधी काही न बोलता तांसतास फ़क्त तिच्या चेहरयाकडे पाहत राहावस वाटणे.
७६.तिच्या मेलची/किंवा ती ओ.ऐल. आली आहे का हे पाहाण्यासाठी परत परत लोगिन किन्व पेज रिफ़्रेश करणे.
७७.सभोवताली बरेच लोक असुन सुदधा खुप ऐकट वाटणे.
७८.आरश्यासमोर उभ राहाण्याचा वेळ वाढणे.
७९.मन,ह्रुदय,वारा,पाउस,चन्द्र या शब्दांचे नवे नवे अर्थ उलगडु लागणे.
८०.काहीही करतांना ’हे तिला आवडेल का’ हा विचार मनात येणे.
देवेंद्र..
होतिल वाटतंय १०१ च्या वर… 🙂
फारच छान…एवढीच लक्षण प्रेमात न पडेलेल्या पोस्ट वर पण येतील का तोच विचार करतोय? वाचायला मज्जा येईल ती पोस्ट..लवकर लिहा 🙂
अजुन तरी डोक्यात काहीच नाही., एकदा लिहायला सुरुवात केली की मग समजेल
kaay jabari anubhav aahe ho tumhala 🙂
mastach, pudhchya lekhachi vaat pahin
तो लेख पुढच्या शनिवारी.. 🙂
काका, सॉरी गेले ३-४ दिवस घर मुव्ह करण्यात, पॅकिंग,अनपॅकिंग मध्ये जाम बिझी होतो. त्यामुळे नेटवर अजिबात नव्हतो. आणि बघतो तर तुमचे ऑलरेडी ५ पोस्ट्स आलेले. (अर्थात तुमचा स्पीड पाहता ते काही नवीन नाही म्हणा) तर सांगण्याचा उद्देश कि सगळ्यावर इथेच कमेंट देतो.
१. छोटीसी कहानी : एकदम मस्त जमलीये. अगदी २०-२२ वर्षाच्या यंगस्टरने आपल्या मनातलं लिहिल्यासारखं वाटलं.
२. १ लक्ष हिट्स बद्दल : हार्दिक अभिनंदन. असेच लिहीत रहा आणि लवकरात लवकर आम्हाला “१० लक्ष धन्यवाद” चे पोस्ट वाचायला मिळो ही सदिच्छा !!
३. प्रेमात पडलेल्यांची लक्षणे : एकदम टवटवीत झालंय हे पोस्ट. एकदम आवडल. स्वानुभवामुळे एकदम जवळचं पण वाटलं 😉 .. अजून काही add करता येईल का बघत होतो. पण सगळ्यांच्या कमेंट्स मध्ये सगळंच कव्हर झालंय 🙂 .. एकदम मस्त..
आणि हो नवीन वर्षाच्या शुभेच्छा !!!
धन्यवाद, आणि तुम्हा सगळ्यांना पण नविन वर्षाच्या शुभेच्छा..
अगदी सारीच लक्षणं कव्हर केलीत.. कदाचित प्रेमात पडलेल्यांना देखील याची जाणीव नसेल! 🙂
खरंय.. पण हे पोस्ट माझं मलाच खुप आवडलंय.. 🙂
प्रेमात पडणारा नवीन महेन्द्रजीच्या या पोस्ट वर येवून सर्व लक्षण तपासून पाहणार आहे, कन्फर्म करण्यासाठी कि तो नक्की प्रेमात पडला आहे का नाही 🙂
त्यांना वेळच कुठे असतो हे सगळं वाचत बसायला??
थोड्क्यात…
आर्शात डोकावले तर गाढवाचे प्रतीबिंब दीसते…
बरोब्बर…. 🙂
bharpur anubhav ghetlay vatat?
आता काय सांगु?? 🙂
agadi A to Z points cover kelet…..”YOGYA” to upachar karayacha ki nahi he pahanyas ha post upayogi aahe
घरात सांगितले असेल तर…
-> प्रत्येक महत्वाच्या कार्यक्रमात तिने यावे असे वाटू लागते, अगदी नवीन केरसुणी घ्यायची असेल तरी.
-> घरी कुणाची तब्येत बरी नसेल तर तिने फोन करुन विचारावे असे आपल्याला वाटते. आपणही तिच्या घरी फोन करुन तब्येतीची चौकशी करतो.
-> कुठल्याही ट्रेकला जाताना सांगून काळजी वाढवण्याऐवजी परत सुखरुप आल्यावर तिला सांगणे पसंत करता.
-> स्वतःची प्रत्येक खरेदी तिला आवडेल का, असा वि़चार करुन होते.
अजून काय काय लिहू… खूप आहे… (अनुभव हा सर्वांत मोठा गुरु आहे).
अरे वा.. भरपुर दिसतोय अनुभव.. 🙂
प्रतिक्रियेकरता आभार..
आयला … प्रेमात पडलो तेंव्हा इतका विचार नव्हता केला रे दादा … तू काऊंसीलिंग सुरू कर आता … हाहा … 😀
हरकत नाय.. जोड धंदा म्हणुन!!
#) Gtalk च्या List मध्ये सगळे Contact English मध्ये असले तरी तिचे नाव मराठीतच असते.
बाकी सगळंच कव्हर झालंय!!
मस्त झालियेत ही लक्षणे!!!!
वरुण
बरेच दिवसांनी आलास..
प्रतिक्रिये करता आभार..
काका मुली काय अनुभवत असतील ते पण अन्दाजे लिहा ना…
बघु काही जुळ्ले तर…
तशी शक्यता वाटत नाही सध्यातरी पण भविष्यात उपयोगी पडेल…
बरे , हे समोरच्यावर चाचपडायला उपयोगी पडेल…
आम्हाला सिक्स सेन्स असतो पण माझा जरासा वीक आहे…
काहीच कल्पना करु शकत नाही.. !! खरंच!!! एखाद्या मुलीनेच लिहावं यावर!
आणि तुझा सिक्स्थ सेन्स विक असणं शक्यच नाही.. कुठल्याच मुलीचा नसतो. फक्त स्वतःवर विश्वास ठेव झालं!!!
Bhava PhD sathi changala vishal aahe!
Aani tuzi tayari pan changali aahe karun taak!
कधी काळचे अनूभवाचे बोल आहेत हे.. आता पिएचडी नाही तरी पिएचडी एंट्रन्स तरी नक्किच पास होईन. 🙂
फार फार फार भारी टॉपिक आहे राव…
माझ्या आयुष्यात एखाद लेखन वाचून मी पहिल्यांदा इतक हसलो असेन …………
मला हा टॉपिक वाचून माझ्या एका जवळच्या मित्राची आठवण झाली आणि हि सगळी लक्षण मी त्याच्या खरडवहीत पोस्ट पण केली आता तो हसेल.
[:)][:)][:)][:)][:)][:)][:)][:)]
ekdum barobar…m still laughing…baryach diwasaani..all guys..kee it up…lolz:) i hv mailed the link to my many friends. its really nice.:)
very nice…!
हे सगळं मुलाला काय वाटत ते लिहिलय पन मुलीच्या मनात काय चालु असत ह्या बाबतित एक नविन पोस्ट् होउन जाउदे
काय म्हणता??????
I m new user
the story n da symtomps r truly amazing
dats y im thinking abt dat
nakkich:)
zinkalas rao zinkalas
http://mannmajhe.blogspot.com/2010/01/blog-post_19.html
Read this post at address above. You may be aware of it. Just for info.
Mala kahi wicharaych Aahe, Tumhi mala madad karal ka?
kaka dhanyawad mulinchya babat kai hot asel kiva manat kai asta te me lihu ka ?
ब्लॉग वर स्वागत.. अवश्य लिही. लिहिल्याने आपोआप विचारांना चालना मिळते. मी तर म्हणेन की ब्लॉग पण सुरु कर…
namaskar kaka
dhanyawad kaka…….!!!
pariksha atopli ki blog cha v4 akkich karen dec madhe exam ahe …….!!
baghuyat kai kai jamata…… anek chnglaya concept manat ahet tya ethe saglyansobat share karaychya ahet ………..!!
baki aaple ashiewad amchya pathishi asu dya hi vinanti…..!!
khup chhan anuhbav ahet tumche kaka
kharch ka mulanchya manat as chalu asat?
yachya peksha jast chalu asat mulanchya manat..
miss: komal
ho yachya peksha jast chalu asat mulanchya manat..
miss : komal
Ya vishayavar khoop abhyaas kelela distoy?
Pan khoop chaan lihile aahe, pratyek point barobar aahe.
Sharda
tase kahi nah.. but still……:D
me kharch premat padaloy as mala vatayala lagalay!! khup chan kaka keep it up
he sarva khre ahe
santosh
Santosh
Thanks!
kaka mla vattay me premat padat challoy …………kaka mala vachava……..
योगेश
ब्लॉग वर स्वागत.. यातून कोणीच वाचू शकलेले नाही- अगदी विश्वामित्र सुद्धा!!
kya baat sir…
18
20
34
45
57
66
vishal telange che kahi points
77
aggadi barrobbar… haha ha 😀 😀
🙂 धन्यवाद.
अती उत्तम
नितीन
आभार.