निरर्थक तमाशा …

बऱ्याच ठिकाणी नेहेमी प्रमाणेच सर्कस चे समालोचन वाचले . जवळपास सगळेच पेपर यावर काहीना काही लिहित होते.

एक रींग मास्टर आणि ९७ जोकर्स.. सगळे एका मोठ्या  तंबुमधे एकत्र झाले आणि सगळ्या जगाला एक तमाशा दाखवला. त्यांना कदाचित वाटलं असेल की आपण जे काही सांगतोय ते लोकं सिरियसली घेतील , पण लोकांनी पण या तमाशाकडे फारसं लक्ष दिलं नाही- अगदी टाळ्या वाजवण्याचं पण सौजन्य दाखवलं नाही.   वृत्तवाहिन्या, वृत्त पत्र वगैरे यांनी मात्र या सर्कसची ही घटना खुप पब्लिसाईझ करण्याचा प्रयत्न केला, अर्धवट माहिती खुप  ठिकाणी वाचण्यात आली.

अर्थात या सगळ्या तमाशा बद्दल इतक्या बातम्या येउन सुध्दा लोकांना काही फारसं कळलं नाही. बस काही तरी पर्यावरणाबद्दल काहीतरी  आहे एवढंच लक्षात आलं लोकांच्या. एक ओबामा  आणि इतर  देशांचे प्रति्नीधी एकत्र जमा झाले होते, पृथ्वीच्या वाढणाऱ्या तापमानाची काळजी करण्या करता.. ( पंचतारांकीत हॉटेलमधे बसुन झोपडपट्टी निर्मुलनाच्या गप्पा मारण्यासारखं वाटतं मला हे…)

पण एक जागरुक नागरीक म्हणुन माझे या घटनेवरचे भाष्य (आता  ते ऐकतं कोण  म्हणा  , म्हणुन तर  ब्लॉग वर लिहितोय…थोडे फार लोकं तरी वाचतिलच नां..) लिहावेसे वाटले म्हणुन हा ब्लॉग. सगळ्याता आधी हा काय प्रकार आहे?? हे थोडं समजुन घेउ. अगदी थॊडक्यात एका एका पॅरिग्राफ मधे..

औद्योगिक प्रगती झाली की एकॉनॉमी पण वाढीस लागते. जेंव्हा एखादा उद्योग सुरु केला जातो तेंव्हा त्याचे पर्यावरणावर बरेच परिणाम होतात. हवेचे प्रदुषण, पाण्याचे प्रदुषण, हे सगळ्यात जास्त महत्वाचे. भारतामधे एक मानक संस्था आहे ’ इंडीयन पोल्युशन कंट्रोल बोर्ड’, ज्याच काम एवढंच की होणारे प्रदुषण हे लिमिट्स मधे आहे की नाही ह्याकडे लक्ष ठेवणे.अर्थात ही संस्था ( की  भारत सरकार का संस्थान??) आपलं  काम कितपत  इमाने इतबारे करते हे युनियन कार्बाईडच्या केस वरुन, किंवा गंगा नदीच्या खराब झालेल्या पात्रावरुन सरळ लक्षात येतं.

जेंव्हा उद्योग /कारखाना  सुरु होतो तेंव्हा बऱ्याच प्रमाणात कार्बन डाय ऑक्साईड आणि कार्बन मोनॉक्साईड पर्यावरणात सोडला जातो, ज्याची मात्रा वाढल्यास ओझोनचा थर कमी होऊन पृथ्वीचे तापमान वाढू शकते. ( मला तर एवढंच समजलंय.. तुम्हाला काही जास्त माहिती असेल तर कृपया कॉमेंट मधे लिहा ). हे मुख्यत्वे करुन धातु , किंवा फाउंड्री वगैरे ठिकाणी किंवा थर्मल पॉवर स्टेशन पासुन तर साधी मोटरसायकल चालवण्या मुळे पण वाढु शकतं.अगदी विजेचा बल्ब लावल्याने पण कार्बन एमिशन वाढतं.

तर, गेल्या वर्षी जेंव्हा हिलरी क्लिंटन भारतात आल्या होत्या, तेंव्हा त्यांना भारत २५ टक्के कार्बन उत्सर्जन कमी करु शकणार नाही ,हे ठणकाउन सांगणारे जयराम  रमेश या वेळी मात्र जेंव्हा खरंच या समिटला जायची वेळ आली तेंव्हा मात्र एकदम नांगी टाकुन असेंब्ली मधे  भारताने २५ टक्के उत्सर्जन कमी करणे कसे आवश्यक आहे यावर मोठया भावनावेगाने बोलले.मला हेच समजलं नाही की एक वर्षापुर्वी जे पोटतिडीकीने भारताच्या विकासाबद्दल बोलत होते, त्यांना एकदम काय झाले असावे??

रिंग मास्टर सगळ्या विकसनशिल राष्ट्रांना वेठीस धरुन  कार्बन उत्सर्जनात कपात करा म्हणुन आग्रह करित होते. हा दर जो आहे दोन टक्क्यांवर आणावा असे त्यांचे मत होते..जर हे मान्य केलं, तर याचा परिणाम?? विकासाचा दर एकदम कमी होईल, नविन उद्योग सुरु होणार नाहीत, बेकारीत वाढ होईल. पृथ्वीचे संवर्धन आवश्यक आहे, बट ऍट द कॉस्ट ऑफ इंडीय़ा?? नो वे!!!

थोडी इंटरेस्टींग माहिती देतोय खाली. ओबामा जे सारखं म्हणताहेत भारताला( या पुढे भारत आलं की त्याचा अर्थ भारत आणि इतर विकसनशिल देश असा घ्यावा)की कार्बन उत्सर्जन कमी करा, पण या कार्बन उत्सर्जनाचे स्टॅटस्टीक सापडलंय नेट वर.. ते इथे पोस्ट करतोय. ते बघा, आणि  तुम्हीच ठरवा कोण जबाबदार आहे या कार्बन उत्सर्जनाला.

ank ↓ Country ↓ Annual CO2 emissions[8][9]
(in thousands of metric tons) ↓
Percentage of global total ↓ Per Capita[10]
(metric ton) ↓
Reduction needed to reach world per capita average ↓
World 28,431,741 100.0 % 4.18 0 %
1 China 6,103,493

21.5 %

4.57

9 %

2 United States[11] 5,752,289

20.2 %

18.67

78 %

European Union[12] 3,914,359

13.8 %

7.84

47 %

3 Russia 1,564,669 5.5 % 11.03 62 %
4 India 1,510,351

5.3 %

1.29

-224 %

5 Japan 1,293,409 4.6 % 10.14 59 %
6 Germany 805,090 2.8 % 9.82 57 %
7 United Kingdom 568,520 2.0 % 9.26 55 %
8 Canada 544,680 1.9 % 16.08 74 %
9 South Korea 475,248 1.7 % 9.59 56 %
10 Italy[13] 474,148 1.7 % 7.90 47 %
11 Iran 466,976 1.6 % 7.03[14] 41 %
12 Mexico 436,150 1.6 % 3.92[15] -7 %
13 South Africa 414,649 1.5 % 8.45[16] 51 %
14 France[17] 383,148 1.4 % 5.98[18] 30 %
15 Saudi Arabia 381,564 1.3 % 13.30[19] 69 %
16 Australia 372,013 1.3 % 18.74 78 %
17 Brazil 352,524 1.2 % 1.83 -128 %
18 Spain 352,235 1.2 % 8.69[20] 52 %
19 Indonesia 333,483 1.2 % 1.39[21] -201 %
20 Ukraine 319,158 1.1 % 6.98[22] 40 %

भारताचे पर कॅपिटा उत्सर्जन अतिशय कमी आहे, वर्ल्ड कॅपीटा ऍव्हरेज प्रमाणे तर अगदीच नगण्य आहे. अमेरिकेने ७८ टक्के उत्सर्जन कमी करावे अशी अपेक्षा आहे. ते करणार नाहीत याची खात्री आहेच!!!

बरं या कामासाठी जे सगळे रथी महारथी इथे जमा झाले होते ते सगळे स्वतःच्या प्रायव्हेट जेट ने आले होते. ओबामा नेहेमी प्रमाणे एअरफोर्स वन ने गेले होते. तसेच त्यांची लिमो नेण्यासाठी एक वेगळं विमान   होतं. कल्पना करा, इतकी विमानं, इतक्या कार्स, पोलिस पेट्रोल कार्स, या सगळ्यांनी मिळुन जवळपास ४१ हजार टन कार्बनडाय ऑक्साईड हवेत सोडुन प्रदुषण वाढवले. ही च मिटींग जी आहे ती टेली कॉन्फरन्सिंग वर केली असती तर नक्कीच हे सगळं वाचलं असतं.

या पृथ्वीच्या तापमानात जर वाढ झाली तर त्याचा परिणाम सगळ्यात जास्त भारतासारख्या देशांवरच होणार. दादरची चौपाटी किती शिल्लक आहे आज? बरं चेरापुंजीसारख्या ठिकाणी पाण्याचं दुर्भिक्षं- आणि पावसाचं  शॉर्टेज? याच्या विरुध्द राजस्थानामधे जिथे पावसाची कायम चणचण, तिथे पुर?? हे सगळं   जे काही होतंय ते लक्षण आहे ग्लोबल वॉर्मींगचं.

मी हे इथे जे लिहितोय, त्याचा अर्थ हा नाही की ग्लोबल वॉर्मींग चा प्रॉ्ब्लेम मी डिस्कार्ड करतोय, फक्त भारता सारख्या देशांनाच जे जबाबदार धरलं जातंय त्याची ऍलर्जी आहे मला. या ग्लोबल वॉर्मींग साठी अमेरिकेने स्वतः काय करणार एमिशन कमी करायला ते सांगितलं असतं तर बरंझालं असतं. पण तसं झालं नाही….आणि नेहेमीप्रमाणेच ग्लोबल वॉर्मींग साठी विकसनशिल देशांना वेठीला धरण्याचं काम ओबामा करतोय. म्हणुन संताप होतोय !!!

थोडक्यात म्हणजे अमेरिकेला जी २०.२ टक्के एमिशनला जबाबदार आहे, तिचं म्हणणं आहे की आम्ही हवं ते करु.. जगाने कंट्रोल करावा सगळ्या गोष्टींच्या वापरावर.  जगात उत्सर्जीत होणाऱ्या कार्बन मधे भारताचं कॉंट्रीब्युशन आहे केवळ ५.५ टक्के..अमेरिकेच्या २०.२% च्या विरुध्द..

पर कॅपिटा तर अगदीच निग्लीजीबल आहे भारताचे… अमेरिकेच्या १८.७६ % च्या विरुध्द केवळ१.२ %!

या प्रॉब्लेमला असलेलं अजुन एक डायमेन्शन म्हणजे नॉक्स , पार्टिक्युलेट मॅटर्स, आणि  कार्बन मोनॉक्साईड एमिशन बद्दल पण कंट्रोलिंग  बद्दल विचार करायला हवा..मला खरंतर यावर अजुन बरंच काही लिहायचं होतं, पण पोस्ट फार मोठं होतंय म्हणुन थांबतो इथेच.

About महेंद्र

माझा ब्लॉग :- http://kayvatelte.com
This entry was posted in आंतरराष्ट्रिय पॉलिटिक्स and tagged . Bookmark the permalink.

16 Responses to निरर्थक तमाशा …

 1. मनोहर says:

  प्रगत देश बर्याच वेळा आपले हितसंबंध राखण्याकरिता पर्यावरणासारखा बागुलबुवा दाखवीत असतात.

  • अमेरिका, युरो्प आणि चायना मिळुन ५४.५ टक्के कार्बन डाय ऑक्साईड वातावरणात सोडत्तात. स्वतः अमेरिकेने काहीतरी करणं आवश्यक आहे…. रेड अलर्ट आहे हा…

 2. Sagar says:

  Kaka
  Post baddal thanks….Mala ha prakar kai aahe hech mahit navat…”पृथ्वीचे संवर्धन आवश्यक आहे, बट ऍट द कॉस्ट ऑफ इंडीय़ा?? नो वे!!!”An tumchya matashi sahmat…

  • सागर
   बरे्च दिवसापासुन ह्या विषयावर लिहायचं होतं, पण नविन वर्ष आलं म्हणुन राहुन गेलं.. (नविन वर्र्षा साठी जरा हलकं फुल्कं लिहिलं)

 3. अगदी योग्य शीर्षक आहे. खरोखर “निरर्थक तमाशा” होता तो. करणार काय. बळी तो कान पिळी 😦

  • हेरंब

   व्हिडीओ कॉन्फरन्सिंगन पण काम झालं असतं.. जगाच्या कार्बन डाय ऑक्साईडच्या जवळपास २५ टक्के उत्सर्जीत करणारा देश असे काही उपदेश देतो तेंव्हा खरंच हसु येतं.

 4. Aparna says:

  अरे अमेरिकेत नुसतं माणशी एक गाडी हा प्रकार बंद करायला सांगायला तरी केवढी तरी काळी (कार्बन) पावलं कमी होतील….पण त्याने इथली ऑटो इंडस्ट्रीवाले भडकतील ना….अमेरिकेचं म्हणजे आपण हसे लोकांना आणि शेंबुड आपल्या नाकाला प्रकार आहे…आपल्या राज्यकर्त्यांनी स्वतः बदल करताना अमेरिकेसारख्या सगळ्याच प्रगत देशांना खडसावलं पाहिजे की आधी आपलं तोंड पुसा म्हणून..नको तिथे अरेरावी काय खपवायची???

 5. ravindra says:

  महेंद्र,

  आज आपण एका वेगळ्या विषयाला हात घातला आहे. मला फार आनंद झाला. खरच कोपनहेगन चे संमेलन पोकळ ठरले.
  याशिवाय आपण सर्वात जास्त कार्बन डाय ओक्साइड उत्सर्जित करणारा देश म्हणून यु.एस.ए चे पितळ उघडे पाडले ते बरे केले. लोकांना माहिती झाले. माझ्या मते याला जवाबदार आहे थर्मल पावर स्टेशन व अपरिमित वाहनांचा वापर. जपान मी पाहिले आहे. तेथे जास्तीत जास्त सार्वजनिक वाहनांचा वापर केला जातो. उरलेली लोक टेक्शीचा वापर करतात. याच कारणासाठी तेथे बुलेट ट्रेन चे निर्माण केले गेले. एका दिवसात देशाच्या दुसऱ्या टोकाला जाऊन मनुष्य परत येऊ शकत असेल तर त्याला सार्वजनिक वाहन वापरायला काय हरकत आहे. त्यांनी एकाच लेवल वर ट्रेन रूट तयार केल्याने स्पीड मेंटेन करता आली. त्यासोबत त्यांनी निसर्गाला धक्का सुद्धा लागू दिला नाही हे सुद्धा मी अनुभवले व बघितले आहे. तेथील लहानात लहान बोगदा अर्धा किलोमीटरचा असावा व लांब बोगदा अंदाजे २५ ते ३० किलोमीटरचा होता. मी घड्याळ लावून व गाडीच्या गतीचा अंदाज घेऊन बघितले होते. त्याला म्हणतात देश प्रेम. म्हणूनच त्यांचे सीओ२ उत्सर्जन इतके कमी आहे.

  मी आपल्याला एक लिंक देत आहे त्यावर वाचन केल्यास एक युनिट वीज निर्मिती केल्याने किती सीओ२ उत्त्सर्जीत होते ते दिसून येईल.www.bibl.ita.br/xencita/Artigos/62.pdf

  असो आजचा लेख वाचून मन प्रफुल्लीत झाले. माझ्या विचार सरानीचे इतरही आहेत असे वाटायला लागले. माझ्या ब्लोगवरील बहुतेक लेख याच विषयावर (ग्लोबल वार्मिंग) आहेत.

  • जपानचे पण जे आकडे आहेत ते पण खुप जास्त आहेत. इतका लहान देश, पण पर कॅपीटा उत्सर्जन खुप जास्तआहे त्यांचं. जागतीक पर कॅपिटा ऍह्वरेज ला पोहोचण्यासाठी त्यांना उत्सर्जन ५९ टक्के कमी करणे आवष्यक आहे.
   अमेरिकेच्या ७८ टक्के रिडक्शनच्या अगदी जवळपासच आहे ते..

 6. काका कितीही कटू असलं तरी परिस्थिती हाताबाहेर गेली आहे हे सत्य आहे. आत्ता काळजी घेऊन आपण फार फार स्वतच्या मनाची समजूत करून घेऊ शकतो. कोपेनहेगनचं तर फ्लॉपेनहेगन झालं. आणि आपल्या देशाचे क्षेत्रफळ आणि लोकसंख्या इतरांपेक्षा जास्त असल्याने अश्या गोष्टींसाठी भारताला डोळे झाकून जबाबदार धरले जाते.

  • मला हेच म्हणायचे आहे.. जे काही करायचं आहे ते सगळ्यांनीच केलं पाहि्जे.. फक्त विकसन्िल देशांना धारेवर धरुन चालणार नाही.

 7. तो खरोखरच निरर्थक तमाशाच होता.आणी ही काही नविन बाब नाही तो रिंगमास्टर नेहमीच असा वागत आलेला आहे.तुम्ही दिलेले आकडॆ खुपच बोलके आहेत.ग्लोबल वार्मींग साठी भारत जबाबदार म्हणे.स्वत:अण्वस्त्र बाळगायची आणी दुसरया देशांवर त्याच गोष्टीसाठी आक्षेप घ्यायचा.केवढा दुटप्पीपणा आहे हा.मागे वाढत्या माहागाईलाही हया लोकांनी भारतिय लोक भरपुर खातात असे म्हणत भारतालाच कारणीभुत ठरवले होते.असो लेख माहितीपुर्ण झाला आहे.

  • देवेंद्र
   कमीत कमी लोक संख्या आणि जास्तित जास्त एमिशन..
   अजुन बरंच लिहायचं आहे यावर.. पण पुढच्या लेखात. युरो१,२,३,४ ची माहिती लिहाय्ची आहे.

 8. Abhijit Nileaonkar says:

  महेंद्रजी या गोष्टीचा वेगळाच एक अस्पेक्ट सांगतो. ग्लोबल वॉर्मिंग कॉन्स्पिरसी थेअरी नुसार ग्लोबल वॉर्मिंगचे हे थोतांड असून तापमानचे आकडे फुगवून सांगितले आहेत. हा खूप मोठा म्हण्जे २० वर्षांपासून शिजत असलेला डाव आहे. अमेरिकेत सर्वात जास्त ग्लोबल वॉर्मिंगचा प्रचार कोण करतो ठाउक आहे का? अल गोर. हा एक अध्यक्षीय उमेदवार होता. एक राजकारणी एका गोष्टीत ज्यात पैसा नाही तिकडे वेळ घालवणे अशक्यच. अल गोर ची आणि कित्येक पडद्या मागच्या लोकांच्या कार्बन मेजरिंग कंपन्यांमध्ये इन्वेस्ट्मेंट आहेत. त्यांनी अत्ता पर्यंत बिलिअन्स मिळवले आहेत. खरा पडद्या मागचा सूत्रधार यूएन मध्ये ३० वर्षे काम केलेला मूळाचा केनेडिअन मॉरि(स) स्ट्रॉंग समजला जातो. अधिक माहिती साठी http://en.wikipedia.org/wiki/Global_warming_conspiracy_theory वाचा. विश्वास ठेवणे अवघड आहे पण हे सत्य असू शकतं. आजच एक डॉक्यूमेंटरि पाहिली यावर.

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s