कपड्यात काय आहे??

पवाचीच गोष्ट आहे, सकाळी ऑफिसला निघायचं म्हणुन तयार होऊन बुट घालत होतो. तर तेवढ्यात आमचं धाकटं कन्यारत्नाने ( वय वर्ष १५) एकदम हसणं सुरु केलं..

म्हंटलं काय झालं?

तर म्हणे की तुम्ही अगदी वॉचमन सारखे दिसताय आज.. अगदी तस्साच ड्रेस घातलाय तुम्ही.

मी एकदा स्वतःकडे , अन स्वतःच्या कपड्यांकडे पाहिलं.काळा रंग माझा आवडता -स्पेशली ट्राउझर साठी म्हणुन काळी ऍरोची ट्राउझर, स्काय ब्लू लाइअनिंगचा ऍरोचाच शर्ट, नेव्ही ब्लु कंपनी लोगो असलेला  टाय (कस्टमर सेमिनार होतं म्हणुन, नाही तर मी टाय वगैरे वापरत नाही , नेहेमी सेमी फॉर्मल म्हणजे फुल स्लिव्ह शर्ट ट्राउझर्स मधे असतो.) लावलेला होता. आरशा समोर जाउन उभा राहिलो.. आणी स्वतःच्या प्रतिबिंबाकडे पाहिलं.. तर समोर एक अर्धवट वयाचा पोट सुटलेला , ज्याने केवळ कंबरेला पट़्टा लावला आहे, म्हणुन पोट जागेवर आहे, नाहीतर कधीच खाली घरंगळलं असतं.. असा एक माणुस दिसला. पण  वॉचमन?? छे!!!

एकदम लक्षात आलं, की हल्ली वॉचमन लोकांचा पण असाच ड्रेस असतो. स्पेशिअली मल्टीप्लेक्स , मॉल्स मधे.. स्ट्राइप्स असलेला शर्ट, आणि काळी किंवा नेव्ही ब्लु ट्राउझर… ते  लक्षात आलं आणि एकदम हसु आलं. टाय काढुन टाकला, अन कपाटाशी गेलो, तिथे जाउन दुसरा शर्ट घालायचा म्हणुन  प्लेन आकाशी रंगाचा शर्ट काढला.

तर मागुन कॉमेंट ऐकु आली.. ’बाबा, कोरियर बॉय चा ड्रेस होतोय ’ हा शर्ट नका घालू..

तिच्याकडे जरा चिडुनच पाहिलं.. तुला काय करायचय? मी काही पण घालीन..

असं म्हंटलं खरं, पण एकदा तिने कॉमेंट टाकल्यावर मात्र तो शर्ट घालायची इच्छा झाली नाही. कपाटाशी उभा राहुन  बरेच कपडे उलथा पालथ करुन शेवटी एक पांढरा शर्ट, नविनच घेतलेला (सेल मधे .. लुई फिलीप वर सध्या ५० टक्के डिस्काउंट आहे ) तो घालायला म्हणुन बाहेर काढला, आणि कन्यारत्नाकडे ’आता काय म्हणशील?? ” अशा नजरेने पाहिलं.

ती काहीच बोलली नाही, फक्त थोडं हसली… मला बरं वाटलं… चला बरं झालं!

पण हे सुख फार काळ टिकणारं नव्हतं,   मला वाटतं की  मी शर्ट घालायची वाट पहात ती उभी होती . जेंव्हा शर्ट घालुन झाला, आणि जोव्हान वगैरे अंगावर उडवुन झाल्यावर टाय लावायला घेतला, तरीही ती काहीच बोलली नाही. मला खुप बरं वाटलं.. चला म्हणजे हाअ ड्रेस तरी चांगला आहे.. ना कोरियर बॉय , ना वॉचमन..

स्वतःशिच हासलो, अन  पायात सॉक्स घालणे सुरु केले. ओठ शिळ घालत होते, सगळं काही व्यवस्थित झालं की कसं बरं वाटतं नां? आज सकाळीच मस्त ब्रेकफास्ट झाला होता. फोडणीची पोळी अन दही ( शिळी पोळी कुस्करुन फोडणीला घातलेली ( कांदे पोह्या सारखी) मला वाटतं त्याला मुंबईला पोळीचा चिवडा म्हणतात) माझं फेवरेट आहे ते.. बायकोने  तिन वेळ चहा  पण करुन दिला होता कुरकुर न करता..

तिने न बोलताच तिच्या मनातले विचार मला समजतात , ती नक्कीच   मनातलया मनात म्हणाली असेल.. अरे किती चहा पितोस.. एका कपाला दिड चमचा साखर, म्हणजे दिवस भरात, तुझे १५ कप चहा गुणीले दिड चमचा म्हणजे जवळपास २२ चमचे साखर= २०० ग्राम साखर? इतकी साखर तुला आवश्यक नाही रे.. जरा चहा कमी कर… वगैरे वगैरे न एकावं लागल्यामुळे मी अगदी खुष होतो आज!

हं , तर काय सांगत होतो, तयार झाल्यावर मग घराबाहेर निघणार, तेवढ्यात मागुन हळुच आवाज ऐकु आला..

…….’ आई ,आपले (?) बाबा अगदी वेटर सारखे दिसतात की नाही आज  ह्या  ( काळी पॅंट +व्हाईट शर्ट + टाय) ड्रेस मधे??”

आणि नेमकं ते मला ऐकु आलं.. !!एवढा चांगला तयार होऊन घरून निघालो आणि ही अशी कॉमेंट!! आता काय करणार! तिच्याकडे पाहिलं, एक  टप्पल  द्यायला  मागे वळलो, तर ती  धावतच तिच्या बेडरुममधे गेली अन  दार लाउन घेतलं.. !! मी पण हसतंच घराबाहेर पडलो.. 🙂

थोड्या वर्षापुर्वी एक फॅशन होती. काय व्हायचं की पुर्वी लोकं सफारी घालायचे. म्हणजे ज्या कपड्याची पॅंट त्याच कपड्याचा शर्ट. त्याच्या खांद्यावर दोन पट़्ट्या किंवा समोर पॅच खिसा , असा काहीतरी ड्रेस होता तो. बरं फॅशन इतकी होती, की एखाद्या लग्नात वगैरे तर बरेचसे लोक असे सफारी घातलेले दिसायचे.बॅंड वाजवणारे पण असाच काहीतरी ड्रेस वापरायचे.  कधी कधी  या सफारीचा रंग पण अगदी बॅंडवाल्यासारखा   असायचा.   घालणाऱ्याची पर्सनॅलिटी अगदी छाडमाड असेल तर तर तो ड्रेस घालणारा आणि लग्नाच्या वरातीमधे बॅंड वाजवणारा, किंवा एखादा ऑफिस मधला चपराशी एकसारखेच दिसायचे.

या बाबतित स्त्रियांचं एकदम पक्कं असतं, की ठराविक साडी, मग यावर मॅचिंग असलेले इतर कपडे, मॅचींग बांगड्या.. इत्यादी.. त्या बाबतित त्या कधिच कॉम्प्रोमाइझ करित नाहीत. पुरुषांचं आपलं मिक्स ऍंड मॅच सुरु असतं नेहेमी.. काळी, राखाडी, किंवा नेव्ही ब्लु ट्राउझर आणि कुठलाही पाइन स्ट्रिप शर्ट.. बस.. चलता है. एक पेअर ब्लॅक शु आणि एखादा स्निकर असला की झालं.. और क्या चा्हीये?

एक गोष्ट आहे..अगदी लहानशा गोष्टींचा किती परीणाम होतो नां आपल्यावर? प्रत्येक ड्रेस हा कुठल्या ना कुठल्या तरी प्रोफेशनशी निगडीत केला जातो. मग तो ड्रेस इतरांनी वापरला तर लगेच त्या माणसाला त्या प्रोफेशनशी कोरिलेट केलं जातं.  सह्ज जाणवलं म्हणुन इथे पोस्ट करतोय.

About महेंद्र

माझा ब्लॉग :- http://kayvatelte.com
This entry was posted in विनोदी and tagged , , . Bookmark the permalink.

56 Responses to कपड्यात काय आहे??

 1. छान हलकं-फुलकं लिहिलय!
  हां, ती सफारीची फॅशन मात्र अगदी सही होती…. आमच्या कॉलेजच्या दिवसांत शक्यतो सारेच शिक्षक सफारी घालायचे.
  वेगवेगळ्या रंगाची जरी असली तरी स्टाईल एकच असल्याने “सगळे वराती” वाटायचे!

 2. आनंद पत्रे says:

  नेमक्या ह्याच कारणांसाठी मी माझा आवडता स्काय ब्लु लाइनिंग चा शर्ट अक्षरश: ठेवुन दिला आहे.
  आता मोस्टली शर्ट सोबत जिन्स वापरतो म्हणजे कुणाचा ड्रेस होत नाही. 🙂
  फोडणीची पोळी, दही… व्वा! तोंडाला पाणि सुटलं.. 🙂

  • खरंच काही गोष्टी लक्षात येत नाही. पण ही जिन्स बरोबर वापरायची आयडीया चांगली आहे. मी तर त्या दिवसापासुन हातच लावला नाही त्या शर्टला.. !!!

 3. अनिकेत वैद्य says:

  खरच कपड्यात काय आहे?
  आम्हाला ५वी ते १०वी खाकी चड्डी होती युनिफ़ोर्मला. त्याचा एव्हडा राग आहे की, मी अजूनही खाकी पॅंट घालत नाही.

 4. chunchun says:

  baap re! kaay pan title dilay post la! “kapadyat kaay aahe?” kiti arth hotat tyache!

 5. सचिन says:

  काका, एकदम हलका फुलका लेख झालाय आज.

  सफारी ची फँशन मस्तच होती. पण काहिहि म्हणा जरा तब्बेत असणार्या माणसाला सफारी एकदम मस्त दिसते. पण सफारी चा रंग त्याला सुट व्हायला हवा.

  • पण तेंव्हा इतकं स्तोम माजलं होतं, की जवळपास प्रत्येकच माणुस ( मग ती स्वतःला शोभली किंवा नाही तरी) सफारी वापरायचाच!!

 6. Sagar says:

  Kaka
  Mast zalay post…..Aavadla….Safari baddal bolayache tar maze Baba Safari shivay dusara dressch ghalat nahit……An tyana sut hota mhana karan 6 Ft height an bahutek 85 chya var vajan aahe tyanch…..Baki maz mat kapdyababatit nehmi vakad aahe…Mala Kahihi kalat nahi kapdyatal….Even Kashysobat kai changl disat he Dekhil…An lekhat lihilela prasang chan lihilay……
  Ajun ek ajun hi gavamadhe bahutek lok he Purnpane White ghaltat..Agadi roj…….Bicharya tyanchya Bayaka…. 🙂

 7. कधी विचारचं नाही केला की आपण घातलेला ड्रेस म्हणजे कुणाचा तरी यूनिफॉर्म असु शकतो. ती गोष्ट फक्त खाकी पॅंट घेताना लक्षात येते त्यामुळे खाकी रंगाच्या वाटेला जात नाही. आज निळ्या आणि सफेद रंगामागचा संभाव्य धोका देखील लक्षात आला. बाकी मला माझे कपडे स्वत धुवावे लागत असल्याने मी सफेद रंगाच्या वाटेला जात नाही.

 8. gouri says:

  mens formals mhanaje ek bore prakar asato … nila, grey, kala, pandhara yachya palikade kahi rangach nahit tyaat … tyaat barobar matching asel tar hamakhaas kuthalya tari uniform sarakhe disate, ani nahi tar total mismatch.

  ya babat muli sudaivi. kiti variety asate formals madhye suddha!

  ek varshabhar phakt western formals vaparalyavar mala bharataat parat yetana itake bare vatale hote, aata jara vegale rang vaparata yetil mhanoon 🙂

  • खरंय कपडे घेणं एकदम सोपं असतं, फार तर १५ मिनिटं.. फक्त कलर सिलेक्ट करायचा. साईझ माहिती असतोच!!मुलींच बरं असतं…मस्त पैकी नविन नविन डिझाइन्स चे कपडे. बांद्रा मार्केटला गेलं की १०० रुपये वाले टी शर्ट्स .. पर्स, चप्पल वगैरे बरंच काही आणता येतं..!!

 9. Sameer Manohar says:

  Chhan lihilai ekdam…. Balpanachi athvan zali.. Nili Pant ani pahdhara shirt… ajun mi nili trouser ghet nahi…. ajun tech khaki pant ani pandharashirt… ajun suddha te 2 rang dokyat jatat…

  • समीर
   धन्यवाद.. आमच्या कडे पण खाकी रंगाची हाफ पॅंट अन शर्ट असा युनिफॉर्म होता.. त्या रंगाचा खरंच कंटाळा बसलाय. पण पांढरा शर्ट अजुनही आवडतो 🙂

 10. madhuri says:

  Amchyakadehi he prakar chaltat. kashawar ay jate(chalte) to ek gahan vishay ahe. Aple kapde mule tyanchya drushtitun baghtat..mag he 60 che ahe te old ppl ahe kinwa barati ahe asha coents yetat. apan donhitla tol sambhalla tar uttam.

  • मी तसा थोडा निष्काळजी आहे कपड्यांबद्दल. म्हणजे आत्ता एवढ्यातच निष्काळजी झालो. मुली मोठ्या झाल्यापासुन.. 🙂
   आणि जे काही झालं , ते तर मीअगदी मनापासुन एंजॉय केलं!!

 11. अनिकेत says:

  :-), बरं आहे आमच्या कार्यालयात कपड्यांबद्दल कोणी कटकट करत नाही, फॉर्मल्स तर गेल्या कित्तेक वर्षात एखादा अपवाद वगळता घातलेलाच नाही. कार्यालयात आमच्या बर्म्युडा आणि थ्री-फोर्थ पण चालते त्यामुळे असेल बहुदा फार काळ टिकुन आहे इथे 🙂

  मी तर फारच विरुध्द आहे कपडे निटनिटके घालण्यात, जे सापडेल ते घालतो (पण शक्यतो त्यात काळा रंग असावा हा मात्र आग्रह असतो)

  बाकी पोस्ट चे टायटल वाचुन खलनायक मधल्या एका गाण्याची आठवण झाली. सांगु का कुठले? सांगु?

  • आधी पोस्ट लिहिलं, आणि नंतर मग हेडींग काय द्यावं हेच समजत नव्हतं.. शेवटी जे मनात आलं ते लिहिलं. लिहितांना अजिबात लक्षात आला नाही अन्वयार्थ.. 🙂
   आमच्या कडे मार्केटींग असल्यामुळे थोडं पर्टीक्युलर रहावं लागतं. कधीही कुठल्यातरी कस्टमर कडे जावं लागतं.. तुम्ही या बाबतित नशिबवान आहात !!

 12. बोंबला.. काय हे काका.. माझ्याकडे जास्तीत जास्त शर्ट्स पांढरे आणि निळेच आहेत. आता काय घालू मी उद्यापासून?? 😉

 13. anukshre says:

  यंग लूक दिसण्यासाठी शर्ट जरा लूज ठेवायचा इति अजिंक्य. ह्या पिढीला स्वतःच्या आवडी निवडीचे खूप भान आहे. अजिंक्य च्या चेहऱ्यावर अशी एक्ष्प्रेशन येतात की हे गोंधळून जातात, तरी बर धनंजय टापटीप राहणारा आहे. ही बॉयागिरी मी एन्जॉय करते.

  • त्याचं काय असतं, या वयात मुलांना आणि मुलींना थोडा जास्त सेन्स असतो कपड्य़ांच्या बाबतिल. आपलं काय ठरलेले पॅटर्न्स असतात. पिन स्ट्राइप्स अन डार्क पॅंट्स..
   आता यंग लुक म्हणाल, तर मी अगदीच निष्काळजी आहे त्या बाबतीत. केस पांढरे झाले आहेत, तर ते तसेच ठेवतो. मध्यंतरी मुलींच्या आग्रहामुळे काळे केले होते, पण नंतर पुन्हा जैसे थे म्हणजे ’सॉल्ट ऍंड पेपर’ आहेत.
   व्यवस्थित तर रहावं लागतंच कस्टमर ओरिएंटेड जॉब असल्याने.. कुठलीही डार्क ट्राउझर अन लाइट शर्ट चालतो मला. 🙂

 14. Aparna says:

  मी कॉलेजला असताना पिवळं आणि काळं हे कॉंबिनेशन असलं की टॅक्सीssssssssss………..म्हणून हमखास हाक असायची एखादीतरी त्याची आठवण झाली…आणि काका असं काही नाही की बायकाच फ़क्त असं याच्यावर हाच रंग करतात..माझा एका प्रोजेक्टवरचा (गोरा)बॉस त्याच्या सॉक्सच्या रंगाबाबतपण सॉलिड काळजी घ्यायचा आणि हे मला कळलं कारण कुणीतरी थोडं त्याच्या दृष्टीने विजोड कॉंबिनेशन करून आला होता तर तो गेल्यावर मला त्याने त्या विषयावर एक पंधरा मिन्टाचं सेमिनार दिलं…तेव्हापासून आम्ही कधीही समोरासमोर बसलो की मला त्याच्या सॉक्स आणि पॅन्टचा रंग हे कसं दिसतंय ते पाहायचा छंदच जडला…जाऊदे थांबते या साहेबाच्या आठवणी म्हणजे एक वेगळी पोस्ट होईल…:)

  • पॅंटच्या कलरचे सॉक्स मी कित्येक वर्ष वापरायचॊ. पण हल्ली सरळ काळे सॉक्स वापरतो. कुठलीही पॅंट असली तरिही.
   आणी ते टॅक्सी…. मस्त आहे एकदम.. आता मी पहिल्यांदाच ऐकली ही फ्रे्ज…

 15. पाषाणभेद says:

  महेंद्र, मस्त लिहीले आहे. झकास.

 16. छान आणी हलक-फ़ुलक एका वेटरने लिहल्यासारख 🙂 ….
  मला तर शर्ट जास्त आवडत नाही घालायला. बहुतांशी टी शर्ट-जीन्स प्रिफ़र करतो.
  पण ओफ़ीसमध्ये युनिफ़ोर्म असल्याने तो घालावाच लागतो.बाकी अनिकेतची मजा आहे बर्म्युडा काय थ्री-फोर्थ काय …

 17. rohan says:

  मला असे शर्ट आणि ट्राउझरची सवयच नाही आहे रे … नेहमी आपला जिन्स आणि टी-शर्ट. कधी तरीच आपला फोर्मल ड्रेस असतो. पण ठरवून हटके डार्क कपडे घालतो. बाकी दररोज तूला काही तरी हटके विषय मिळतोच … 😀

  • तु आणि अनिकेत,, नशिबवान आहात.. अशी नोकरी मिळायला नशिब लागतं. नाही तर आम्ही.. कायम डांगरी किंवा फॉर्मल्स… 🙂

 18. सही पोस्ट झालय… आजचा जमाना म्हणजे ‘लुक्स मे सब कुछ..’ लग्न झाल्या पासून कपड्यांची खरेदी बायको वर सोपवली आहे. तिची ही शॉपिंग ची हौस भागते आणि आपालही काम होत. ..आणि फोडणीची पोळी, साबूदाणा खिचडी माझी फेवरेट. मुद्दाम जास्ती पोळ्या करायला लावून फोडणीच्या पोळीची हौस भागवावी लागते.

  • गजानन.
   खाण्याच्या आवडीच्या बाब्तित् तुमचं आमचं जमलं>. अगदी सेम टू सेम.. मला पण खिचडी खुप आवडते, म्हणुन काही वर्ष मंगळवारचा उपवास करित होतो.. 🙂 आता काही नाही..

 19. काल वेटरचा युनिफ़ोर्म घातला होतात ना…आज कोण झाला आहात… 🙂

 20. milind says:

  tumacha shirt uniform sarkha disla mhanun tar gharatalyanch laksh tumchya kad gel

  • ते ही खरंच म्हणा, नाहीतर कोण बघतंय आपल्याकडे.. 🙂
   बरेचदा असं कोणीबघितलं नाही की बरं वाटतं….

 21. shilpa says:

  यावरून आठवलं ते आपलं गंमत म्हणून सांगते. नवर्याच्या शॉपिंगला तो प्रेमानं नेतो म्हणून जाते पण खरं सांगायचं तर आज इतक्या वर्षात मला त्याला घेतलेल्या इतक्या कपड्यातलं ओ का ठो कळत नाही. चंकी फ़ंकी शॉपिंग असेल तर जरा मजा तरी येते. म्हणजे टी शर्ट वगैरे पण फ़ॉर्मल्स म्हणजे वैताग असतो. त्यातून नवरा दोन चार ट्राऊजर समोर ेवून विचारीपणानं विचारतो यातली कोणती चांगली दिसतेय. खरम तर मला ते सगळे रंग सारखेच दिसत असतात आणि त्याच्या वॉर्डरोबमधल्या अर्धा डझन ट्राऊजर तरी अशाच रंगाच्या असल्याचा भास होत असतो पण असं म्हणून चालत नाही मग मी ही विचारात पडल्याची ऍक्टिंग करून मनातल्या मनात अडम तडम करून मनातच एका ट्राऊजरवर बोट ठेवते आणि प्रत्यक्शात त्याला ती किती मस्त दिसेल यावर मौलिक मत देते. 🙂

  • अच्छा!!!!अरे ! असं असत्ं कां… बरं झालं सांगुन टाकलं ते..
   मी आता विचारणंच बंद करणार..
   खरं तर मी फक्त शर्ट घेतांना पोटावर घट्ट झालाय कां? एवढंच विचारतो. आणि नाही म्हंटलं, की मग बिंगो!!!
   माझे ट्राउझर्स चे तर कलर्स पक्के ठरलेले आहेत, राखाडी, काळा, काळा, आणि एखादा ऑफ व्हाईट थोडा चेंज म्हणुन सुटीच्या दिवशी किंवा फ्रायडे ड्रेसिंग साठी…. त्यात फक्त बटन लावतांना पोट किती आत घ्यावं लागतं एवढंच पहातो.. फार त्रास होत नसेल तर मग झालं..
   टी शर्ट्स घेतांना मात्र फक्त आडवे स्ट्राइप्स घेउ नकोस एवढंच मौलीक मत असतं बायकोचं.. बाकी कुठलाही घे.. अगदी मद्रासी हिरवा किंवा पोपटी घेतल तरी ती काही म्हणत नाही.. 🙂
   पण मी आपले नेहेमीचे रंग घेतो ठरलेले..

 22. ravindra says:

  एकदम मस्त भन्नाट! मी माझ्या मनात गुंतलो असल्याने ही पोस्ट वाचायची राहिली होती.

 23. bhaanasa says:

  हाहा… तुम्हा पुरषांचे कपडे खरेच ठरावीक रंगापुढे फारसे जातच नाहीत रे. बाकी तुझे शिर्षक आणि फोडणीची पोळी सहीच…:D. इथे इतक्या मोजक्या पोळ्या मी करते की फोडणीची पोळी होतच नाही. मग चक्क एखादे दिवस नवरा सांगतो, अग आज जरा पोळ्या जास्त कर आणि उद्या सकाळी फोपो कर गं.

  • ते शिर्शक अगदी अनपेक्षीत पणे टाकलं गेलं. सगळ्यांचीच फेवरेट दिसते फोपो. तन्वीने पण आधी करुन नंतर मग कॉमेंटलं इथे..:)

 24. हल्ली कपडे मॅटर्स बाबा. कपड्यांचा परिणाम आपल्या वागण्याबोलण्यावरही दिसून येतो.

 25. Vikramaditya says:

  “Lenga-Pairan” is my favorite dress code…even I used that during my Agriculture graduation (2004-08)……….something offbeat………..
  I ll upload those photos soon……………..

  #Pairan – may be most of readers doesn’t know this type, in marathi “KHALI (jaint Indian wwf champ) sathi shivalela applecut shirt aapan ghatlyawar jasa disel to mhanje pairan….” simple…..

  (Kaka how to write Marathi, plz help me)

  • विक्रम
   एक साईट आहे http://baraha.com ह्या साईटवर सॉफ्ट्वेअर आहे फ्री डाउन लोड करायला. एकदा डाउन लोड केलं की वापरणं एकदम सोपं आहे. फोनेटिक -उच्चाराप्रमाणे इंग्लिश लिहिलं की मराठी मधे कन्व्हर्ट होतं ते..हे पैरण मला माहिती आहे. माझ्या एका जुन्या पोस्ट मधे माझ्या काकांच एक फोटो आहे पैरण – लेंगा घातलेला. 🙂 जुने फोटॊ नाव आहे पोस्ट चं.

 26. Rajendra k. Patil. says:

  Clothes makes our image is true. I remember, when I was in college, I have very few dresses. Now my wife and my doughters insist in my dresses. But I still like any type of clothes. My younger doughter is also about 15 and always comments on my dresses. I think we shall use any dress which likes ourself. Thank you.

 27. GAUTAM R. JADHAV says:

  KAPDYA BADDAL CHE VICHAR BARE WATLE PAHILYANDACH NET VAR KUNALAHI PRATIKRIYA NONDVAT AAHE

 28. nitinbhusari says:

  ही पोस्ट पण एकदम सही.

Leave a Reply to Rajendra k. Patil. Cancel reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s