चविन खाणार पुन्हा……

बिकाजी हॉटेल मालाड वेस्ट

काल संध्याकाळी मालाडला मुलींना चाट खायचं होतं म्हणुन इनॉर्बिट जवळचं बिकाजी नावाचं नविन उघडलेल्या रेस्टॉरंट मधे गेलो होतो. मुंबईला चाट म्हणजे फक्त भेळ चांगली मिळते, पण ज्याला मथुरा, किंवा दिल्ली, बिकानेरच्या टेस्टचं चाट खायचं आहे, त्याला मुंबई मधे या हॉटेल शिवाय काहिच पर्याय नाही.तसे कचोरी आणि पाणीपुरी हॉटेल एम एम मधे पण चांगली मिळते.

हॉटेल खुपच स्वच्छ असल्याने इथे खुप छान वाटतं. एकच प्रॉब्लेम आहे, तो म्हणजे सेल्फ सर्व्हिस आहे इथे. वरच्या मजल्यावर बसण्याची सुंदर व्यवस्था केलेली आहे. भिंतीवर मारिओ मिरांडा ची पेंटींग्ज काढलेली आहेत.. ( लिओपाल्ड मधे आहेत ना तशीच). आमचे सगळ्यांचे हॉटेलमधे गेल्यावर एकमत कधीच होत नाही. प्रत्येकाचे वेगळे काही तरी असते. आणि शेवटी काहीही कॉम्बीनेशन मागवलं जातं. आम्ही आधी पापडी चाट, राजकचोरी,दहिभल्ला, छोले भटुरे आणि महाराजा थाली मागवली.

दही भल्ला आणि पापडी चाट खातांना राजस्थानची आठवण झाली. अप्रतीम चव आहे. जर चांगलं अन स्वच्छ चाट खायचं असेल तर इथे एकदा तरी अवश्य यायलाच हवं. छोले भटुरे , काही फारसे आवडले नाही. कारण बिना कांद्यालसुण असलेले छोले म्हणजे — नाही जमत आपल्याला. थाळी मधे एक तंदुरी पराठा,नान, पनिर, दाल माखनी, स्विट वगैरे होते. एका थाली मधे दोन्ही मुलींचं झालं. अर्थात सोबत साईड डिश म्हणुन चाट वगैरे थोडं थोडं इतरच पण होतंच.. जेवण झाल्यावर ठरवलं की इथे पुन्हा एकदा यायचं – लवकरच. फक्त चाट खायला!!!

आज सकाळीच अरविंद आला पुण्याहून. हा अरविंद म्हणजे माझा फार जुना म्हणजे २५ वर्षांपासुनचा मित्र. मला पाच एक वर्ष सिनिअर.. संध्याकाळच्या फ्लाईटने बडोद्याला जायचं म्हणुन सकाळीच आला होता मुंबईला.

संध्याकाळपर्यंत ऑफिसमधे बसण्यापेक्षा कस्टमर व्हिजीट करुन येऊ, म्हणुन आम्ही दोघंही बेलापुरला निघालॊ. लंच टाइम झाला होताच.युजवली वाशी म्हंटलं की ते नवरंग, की नटराज .. त्या हॉटेलला जाणं होतं.

नुकतंच एका मित्राने हे नविन हॉटेल शोधुन काढलं होतं आणि ह्या बद्दल सांगितलं होतं, म्हणुन इथे त्याच नविन ठिकाणी ट्राय करायचे ठरवले.

हा अरविंद म्हणजे शुध्द शाकाहारी. तसा सारस्वत , पण नॉनव्हेज खात नाही.. अगदी मासे पण नाही!! आणि मी भट असुनही पक्का नॉनव्हेज वाला!! योगा योग म्हणजे काल पण बेलापुरला गेलो होतो, आणि एक नविन हॉटेल शोधलं. सानपाड्याला असं हॉटेल सापडणं म्हणजे कोळ्शाच्या खाणीत सापडलेला हिरा!!! जर तुम्ही व्हेज असाल, आणि जर वाशी च्या आसपास असाल तर थोडा त्रास घेउन इथे यायला काहीच हरकत नाही.

भगत ताराचंद सानपाडा ब्रांच..हॉटेलचं नांव आहे भगत ताराचंद. सानपाड्याला त्या मार्केट जवळ कोणालाही विचारलं तरीही सांगेल या हॉटेल बद्दल. मुंबई कडे येतांना सानपाड्याला उजव्या हाताला वळुन नंतर मग तिसरे डाविकडचे वळण घ्यायचे. हॉटेल समोरच दिसते. दोन विभाग आहेत, आम्ही एसी मधे शिरलो. ऍम्बिअन्स अगदी सो सो.. टिपिकल शेट़्टीच्या हॉटेल सारखा.

हॉटेलच्या बाहेर बोर्ड लागला होता.. सरसों का साग और मक्के की रोटी चा! आता असे अपिलींग कॉल मी तरी अजिबात नाकारु शकत नाही. सर्व्हीस – अप्रतिम.. अगदी बसल्याबरोबर वेटर आला, आणि ऑर्डर घेउन गेला. आम्ही सरसों का साग, सोबत मक्केकी रोटी, ज्वारी ची भाकरी, बाजरीची भाकरी मागवली. वेटरचं सजेशन होतं की आम्ही थाळी मागवावी. पण थाळी मधे चपाती होती, म्हणुन ह्या डिश वर सेटल केलं. मसाला पापड आणि ताक तर होतंच..

थोड्याच वेळात त्याने रोस्ट मसाला पापड आणुन समोर ठेवला. भाजलेल्या पापडावर ( अरे डायट चाललंय राव) कांदा, टोमॅटॊ, कोथिंबीर आणि शेव टाकुन तयार केलेला तो पापड दिसायला तर एकदम मस्त दिसत होता.असा प्रकारे मसाला पापड बनवाय्ची आयडीया एकदम मस्त वाटली.

तशीपण भुक लागली होतीच.. तेवढ्यात त्या वेटरने एक बिअरची बाटली (??) पण समोर आणुन ठेवली. त्या बाटली मधे घट़्ट ताक होतं. इतकं चांगलं ताक मुंबईच्या कुठल्याही हॉटेलमधे प्यायलेलॊ नाही. ( श्रीकृष्ण डेअरी गोरेगांव स्टेशन समोरची सोडुन) बाहेरुन उन्हातुन आल्यामुळे सरळ दोन दोन ग्लास ताक घशाखाली उतरवलं..

थोड्या गप्पा सुरु होत्या. आता हे इतकं ताक प्यायल्यावर तळीराम शांत झाला होता. भुक पण मंदावली होती. समोर आणुन ठेवलेल्या ताटामधे , सरसोंका साग , बैंगन भरता आणि कांदा , हिरवी मिरची आणि लोणचं. इतकं सगळं पाहिलं आणि जठराग्नी चेतवला गेला. जेवण सुरु केलं, आणि कधी संपवलं ते समजलंच नाही. अप्रतीम भाकरी होती- आता भाकरी मधे मक्याच्याभाकरी पे्क्षा आपली बाजरी ची भाकरी आणि ज्वारीची भाकरी मला जास्त आवडली.. तंदुरमधे भाजल्यामुळे मला आवडते तशी क्रिस्पी झाली होती. आणि साजुक तुपलाउन आणल्याने त्याला एक विषेश चव आली होती.

तृप्त होऊन निघालॊ अन सरळ एअर पोर्टला पोहोचलॊ. बडोद्याला पोहोचल्यावर इथे सकाळीच इतकं खाणं झालं होतं की आज तरी रात्री काही तरी लाईट खावं असे अरविंदचे म्हणणे पडले.

इथला लोकल मित्र अजय पण रुम वर आला होता. त्याने हॉटेल सकल्प म्हणुन इथे हॉटेल आहे, तिथे नेले. हे हॉटेल म्हणजे साउथ इंडियन स्नॅक्स साठी ग्रेट आहे एकदम. इडली सोबत हिरवी चटणी, ब्राउन चटणी, मिळगीपुडी चटणी, आणि नेहेमीची खोबरा चटणी.. इतकं होतं. सगळ्याच चटण्या एकदम चवदार . इथे बडोद्याला आल्यावर हे हॉटेल चुकवु नये असे एक आहे.

संकल्प हॉटेल बरोडा

खाणं झाल्यावर परत निघतांना सहज भिंती कडे लक्षं गेलं तर तिथे एक गिनिज बुकाचं सर्टीफिकेट दिसलं. वाटलं ह्या माणसाने हे का लावलं असावं म्हणुन मुद्दाम जवळ जाउन पाहिलं, तर जगातला सगळ्यात मोठा दोसा..२५ फुट लांबीचा तयार केल्याबद्दल चं हे सर्टीफिकेट ह्या हॉटेलच्या नावाने गिनिज बुकने दिलेले होते… एकदम ऑथंटीक साउथ इंडीयन खाण्याचं हॉटेल म्हणुन ह्या हॉटेलला बडोद्यला आलात की जरुर भेट द्या.

आजचा दिवस खाण्याची नुसाती चंगळ झाली…हे हॉटेल इतकं आवडलं, की इथे शेअर करण्यासाठी हे पोस्ट लिहिलंय..

About महेंद्र

माझा ब्लॉग :- http://kayvatelte.com
This entry was posted in खाद्ययात्रा and tagged , , , , . Bookmark the permalink.

47 Responses to चविन खाणार पुन्हा……

 1. Aparna says:

  आता सगळे खादाडी ब्लॉग्ज आणि तसले (?) फ़ोटो यावर बंदी आणणार आहे मी…नाहीतर कॉमेन्टतरी देणार नाही…नाही म्हणजे नाहीच…..
  आता आपकी सजा म्हणजे मुंबैत मी आणि माझी एक मैत्रीण (आणि तुमची पण अर्थात) मिळून तुम्हाला कापणार आहोत….(म्हणजे अशा खादाडगल्लीत तुमच्याच जीवावर चांगले हादडणार आहोत….)
  अलविदा…(खादाडी पोस्टांपुरता) 🙂

  • 🙂 खरंच एखादया दिवशी जिभेचे चोचले आपोआपच पुरवले जातात.. आणि दिवस मोठा मस्त जातो. कालचा दिवस त्यातलाच एक..
   :)तुम्ही येण्याची वाट पहातोय… मुंबईच्या खवय्येगिरी साठी खुप जागा आहेत.. 🙂

 2. अपर्णाशी सहमत. मी पण नाही देणार खादाडीच्या पोस्ट ला कमेंट.. 😦

  • इतर काही लिहायलाच सुचलं नाही.. ही खरी गोष्ट आहे, म्हणुन हे पोस्ट टाकलं. 🙂 आता तु पण परत आलास की जाउ या कुठेतरी. तो पर्यंत रोहन पण परत येइलच!!! सगळेच जाउ या खादाडी साठी .

 3. gouri says:

  hmm aish aahe … don divasat 3 ashi jevane 🙂
  yaach post madhye kuthe tari `diating’ asa shabd disala ka mala ? 😉

  • कां? खरं वाटत नाही??सौ. दररोज न चुकता भरपुर कोशींबिरी करुन खाउ घालते, जेवणात दररोजच स्प्राउट्स असतात… 😦 म्हणुन बाहेर जेवायचं काम पडलं की मग मी पण मसाला पापड (भाजलेला) किंवा बटर चिकन च्या ऐवजी नुसतं आपलं तंदुरी चिकन, फ्राइड फिश च्या ऐवजी फिश करी असं कॉम्प्रोमाइझ करतो झालं….
   😀

 4. Smit Gade says:

  Bhagat Tarachand Punyat pan ahe..Laxmi Roadla..
  Tithalya butter chapativar tar mi jaam fida ahe

 5. लक्ष्मी रोडला?? युजवली मी श्रेयस किंवा ते पेशवाई थाटला जातो. एकदा हे पुण्याचं ताराचंद पण बघायला हवं.

 6. गिनेस बुकचा चाँद-सितारा वघुन मनात खात्री पटली… कशाची ते ओळखा… म्हणजे अजून काहितरी खाल्ल्याची चव कळेल… 🙂

  अशे बरेच कुठे कुठे काय काय आहे ते बघणीय आहे बरं का…

 7. भगत ताराचंद च्या शेजारचा फोटो उलटा आहे 🙂

 8. एका दिवसात इतकी चंगळ ..का असे जळवता आम्हाला..
  (डॉक्टरांनी डायटिंग करायला सांगितलंय हे विसरलात का… 🙂 )

  • देवेंद्र
   रविवारची तुमची सोय केलेली आहे. आता या पैकी कुठे जायचं ते ठरवा… बस्स!!

 9. ही खादाडीवरची कविता पहा मस्त आहे.(आयुष्यावर बोलु काहीच विडंबन)
  http://magevalunpahtana.wordpress.com/2010/01/06

 10. sahajach says:

  मगाच पासून टाळत होते ही पोस्ट शेवटी राहवले नाही……..भगत ताराचंद मुंबईहून नासिक ला जातानाही आहे एक आणि एक आहे नासिकला विजय ममता (आताचे फेम )समोर…..आता भारतात आले की बाबांची कापाकापी आणि मुंबईत आले की तुम्हाला गाठते…….
  हे असले पोस्ट सतत टाकल्याची तुम्हाला शिक्षा…..कालची पोस्ट वाचूनही कमेंट टाकण्याआधी कुस्करा करायला घेतला वर दही, ताक, लोणच्याची फोड ..आहाहा…..ऑर्कूटवर फोटो टाकायलाही कोणी थांबले नाही……

  • मुंबई नासिक रोडवरच्या भगत ताराचंद पेक्षा मानस जास्त आवडतं म्हणुन आम्ही मानसलाच थांबतो. आत्त माझ्या ९४ किलो वजनाचं हेच आहे रहस्य!!! सगळं कमवावं लागतं.. 🙂
   आणि माझं असं आहे, की अगदी वारा खाउन जरी राहिलं तरी वजन वाढतं… मग काय करणार?? चालायचंच!!

 11. Suhas says:

  वाह वाह..खाने वालो को खाने का बहाना चाहिए..अप्रतिम पोस्ट

  • सुहास..
   एका वाक्यात सगळ्या पोस्टचा सारांश सांगितलास.. अगदी खरं आहे. अरे खाण्यावर प्रेम असलं की असं होतंच!!! जगात दोन प्रकारचे लोक आहेत – नुसतं खाणारे, आणि आमच्या सारखे प्रेमाने , चवीने खाणारे… 🙂

 12. कौटिल्य says:

  वाः तोंडाला अगदी पाणी सुटले आपले पोस्ट वाचून. भगत ताराचंद पुण्यात आणि मुंबईत काऴबा देवी ला पण आहे. बराय ह्या पोस्ट मुळे आठवण झाली. आता परवा नक्की भेट देणार पुण्याच्या भगत ताराचंदला.
  तसेच, पुण्यात छान South Indian खायचे असेल तर औंध मध्ये DAV school जवळ Simply Idelicious म्हणून हॉटेल आहे. तशी आहे टपरीच पण रस्सम, उत्तपा आणि वेग वेगळ्या प्रकारचे भात छान मिळतात. तसेच अस्सल दक्षिणात्य कॉफी पण मस्त मिळते. कधी पुण्यात आलात तर जरूर जा.

  • काळबादेवीचं मला माहिती नव्हतं. काय होतं त्या मुस्लिम वस्तीमधे गेलो की हमखास चिकन कबाब – रोटी वगैरे इराण्याकडे खातो. पण एखाद्या वेळेस जायला हरकत नाही.

 13. anukshre says:

  मी पण प्रतिक्रया द्यायला टाळत होते. जेवण झाल्यावर खादाडीच्या पोस्ट ना भेट देते. कसे होणार वजन कमी माझे कोणास ठाऊक? अशा पोस्ट वाचल्या की माझे तन्वी सारखे होते.

  • वजनाची काळजी ’तो’ (ईश्वर ) करेल.. आपण कशाला उगिच काळजी करायची. आणि नुकतीच एक पॉलिसी घेतली एलाअयसी ची . थोडी मोठी रक्कम होती, म्हणुन त्यांनी सगळं चेक केलं. अगदी कॅन्सर पासुन तर कोलेस्ट्रॉल , टिएमटि वगैरे.. लकीली सगळं अगदी वेल विद इन द लिमिट होतं. डॉक्टर म्हणे फक्त थोडं वजन कमी करा. कोलेस्ट्रॉल तर अगदी १६४ आहे. शुगर नाही.. बिपी नाही.. ( नेहेमी आनंदी असल्यामुळे असेल )
   म्हणुन खाणं पीणं कमी न करता, केवळ थोडं चालणं सुरु केलंय रोज …

 14. Sagar says:

  Kaka
  Ka taras deta asa…Khanyachi post takata…Mag Hostel var rahato he ajun prakashane janvat….. 😦

  • सागर
   अरे त्यात काय विशेष, मी पण होस्टेलवरच काढली आहेत चार वर्षं…

   बाहेर जाउन खाउन यायचं झालं. 🙂 ऍटलिस्ट शनिवार-रविवारी तरी..

 15. Rohan says:

  दादा तू टेंशन नको घेऊ रे .. मी आहे ना खादाडी पोस्ट ला १०० कमेंट टाकीन .. हाहा … अपर्णा , तन्वी कधी येणार आहेत मुंबईला ??? मोठा प्लान बनवावा लागेल .. हेहे …

  भगत ताराचंद … वा.. मस्तच होटेल आहे … खास करून ज्यांना वेज हवे त्यांना … 🙂 फेब्रुवारी मध्ये एक चक्कर नक्की आता… 😀

  • चला.. तु तरी आहेसच.. अरे आज पण मोठी मजा आली . बडोदा ते सुरत येतांना रस्त्यावर मस्त पैकी ज्वारीची कणसं भाजुन ( हुरडा बनवुन ) विकत होते. थांबलॊ आणि चांगला तासभर तिथे बसुन हुरडा खाल्ला. दुपारचं जेवण बार्बेक्यु नेशन ला झालं.. ते पण मस्त आहेरे. इंडीयन्स स्टाइल बार्बेक्यु अफलातुन असते अगदी. आता पोस्ट टाकत नाही खादाडीची.. पण मस्त जॉइंट आहे. मी लॉबस्टर्स ( कुठलाच शेल फिश) खात नाही, पण जवळपास ८ इंची टायगर प्रॉन्स पण होते इथे. आता रात्री फक्त गुज्जु खिचडी अन कढी.. बस्स!!!

   • rohan says:

    हा काय ….BBQ nation ला मला जायचय रे .. ठाण्यात सुरू झाले आहे ना… टाक ना रे पोस्ट बिनधास्त … बघू कोण किती निषेध करते te … हेहे … 😉

    • बार्बेक्यु -इथे मात्र अजुनही त्याकडे नॉव्हेल्टी म्हणुनच पाहिलं जातं. फोटॊ वगैरे काढले नाहीत .नाहीतर नक्कीच टाकलं असतं पोस्ट!!

 16. ravindra says:

  महेंद्रजी,
  दाने दाने पे लिखा होता है खाने वाले का नाम! आपलं कधी जाण होईल याची शक्यता नाही. तुम्ही खाल्ल काय आणि आम्ही खाल्ल काय!
  आणि हो हे आमच फिल्ड ही नाही 🙂

  • मला बाकी आहे खाण्यात इंटरेस्ट! वडिल नेहेमी म्हणतात, खाण्यातला इंटरेस्ट संपला की समजावं म्हातारपण आलं.. म्हातारं व्हायचं नाही या भितिने असेल, अजुनतरी इंटरेस्ट संपवलेला नाही खाण्यातला 🙂

 17. आल्हाद alias Alhad says:

  छ्या… अशा काही खाण्याच्या पोस्ट्स वाचायच्या आणि मग फोडणीची पोळी खायची…
  हा सरसोंदा साग आणि आईच्या हातच्या फो.पो. दोन्हीवरही अन्यायच!!!!!!

  • फोपो म्हणजे माझी फेवरेट बरं कां.. माझा स्वभाव आहे, मी कुठेही आनंद लुटायचा प्रयत्न करतो..
   मग तो जेवणाचा असला तरीही…

 18. गहिवरून आलं राव! फोटो नि पोस्ट दोन्ही खमंग.

 19. कुठलीही खादडी पोस्ट वाचली की त्रास होतोच. मला पण खादडी पोस्ट टाकायची आहे पण माझ्याकडे एक सुद्धा फोटो नाही. मोबाइल मध्ये कॅमरा नसल्याचा तोटा. पोस्टची ठिकाणं आणि मेनु ठरलेला आहे. बघू लवकरच निदान खादडीसाठी तरी नवा मोबाइल घेऊन एक मस्त नॉनव्हेज पोस्ट टाकायची आहे.

 20. असे वाटते आता उठावे आणि आत्ताच्या अत्ता ह्या ठिकाणी जावे खायला. भगत ताराचंद्चे मुळचे हॉटेल मुंबादेवीला आहे, आम्ही जातो कधीतरी. वाशीला व बिकाजीत मात्र जायचे राहिले आहे

  • ते खरंच छान हॉटेल आहे. सर्व्हिस पण खुप छान आहे.. अवश्य ट्राय करा एकदा. पण सानपाड्याला मुद्दाम जाणं शक्य होत नाही.. पण काही प्रसंगाने जावे लागले, तर अवश्य जा त्या हॉटेलला.

 21. सिध्दार्थ
  कॉमेरा लवकर घे… अरे त्याशिवाय ब्लॉगींग कसं करु शकता तुम्ही?? कॅमेरा हा नेहेमीच हाताशी असावा लागतो..
  “लवकरच निदान खादडीसाठी तरी नवा मोबाइल घेऊन एक मस्त (नॉनव्हेज???) पोस्ट टाकायची आहे.

 22. प्रसाद... says:

  kaka….kharach paap lagnar bagha tumhala…. Aaj ek tar aangarki aahe… sakal pasun kasa kasa… jibhe war ani potawar control thevlay majha mala mahitey… ani tyat tumhi asle apratim warnan aslele blogs lihita…. tehi evdhya tempting photos sahit… kharach paapa lagnar bagha tumhala… jevha pasun wachlaya tevha pasun jibhela sutlelya panyanech tahan bhagawatoy…!! farach chan apratim…blog.

  • प्रसाद
   खाणं.. खाणं आणि खाणं मला मनापासुन आवडतं.आणि म्हणुनच खाण्याच्या बाबतित लिहायचं म्हंटलं की लेखणी स्वैर फिरते… 🙂 आता पुढल्या आठवड्यात गोव्याला आणि अहमदाबाद, राजकोटला जायचंय.. तेंव्हा पु्न्हा खादाडी पोस्ट राहतिलच!!

 23. प्रसाद says:

  aaturtene…waat baghtoy…postchi…tasa govyach pravasvarnan dekhil waachayla awadel… bagha jamala tar…! nahi..!!! Tumhala jamelach…

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s