घरोघरी..

नविनच लग्न झालय . जस्ट एक महिना. आत्ता एवढ्यतच   हनिमुन हुन परत आलो आम्ही. कालचीच गोष्ट बघा.. दुपारी त्याने ऑफिसमधुन फोन केला होता. म्हणाला, आज घरी काही करु नकोस.. बाहेरच जाउ जेवायला.. खुप आनंद झाला होता.. चला आज तरी त्या स्वयंपाक नावाच्या बोअरिंग कामापासुन सुटी मिळाली म्हणुन.

मला स्वयंपाकाचा मनापासुन कंटाळा.माझ्या आई कडे मी कध्दी कध्दी काहीच केलंं नाही.  आईने पण कध्दीच काही करु दिलं नाही,म्हणाली येईल तुला वेळ आली की आपोआप सगळं. पण आता कधी तरी पोळ्या जमत नाहित, किंवा भाजी कच्ची रहाते, मिठ जास्त होतं, काही तरी होतंच असतं. पण एक बाकी बरं, कसंही बनवलं तर तो बिचारा सगळं गोड मानुन घेतो, आणि कुरकुर न करता खातो.

परवाचीच गोष्टं, मसाला वांगी केली होती, त्यात मिठ जास्त झालं होतं, इतकं खारट की अगदी तोंडात पण धरवत नव्हती ( अर्थात मला हे तो गेल्यावर  मी जेंव्हा जेवायला बसले तेंव्हा कळलं ). त्याला ऑफिसला जातांना वाढली, तर त्याने त्यातच थोडं दही घालुन खाउन घेतली, म्हणाला, मला वांग्याच्या भाजीवर दही आवडतं..!!मी दुपारी जेंव्हा जेवायला बसले, तेंव्हा समजलं खरं कारण दही मिक्स करुन  भाजी खाण्याचं..इतकं कसं हा शांत राहू शकतो??शेवटी संध्याकाळी तो घरी आला तेंव्हा ,मीच रडायला लागले, आणि मग त्यानेच माझी समजुत काढली..कित्ती कित्ती चांगला आहे नां तो?? माझं नशिब चांगलं, म्हणुन इतका समजुतदार नवरा मिळाला मला.

लग्नापुर्वी तर अजिबात माहिती नव्हती ना.. की हा नॉन व्हेज खातो म्हणुन.. जर माहिती असतं तर मी लग्नाला हो म्हंटलं असतं कां??  कदाचित नाही … नाही.. छे.. नक्कीच हो म्हंटलं असतं.. नॉन व्हेज खातो हे माहिती असतं तरीही!!

मी स्वतः  व्हेज अन नवरा तर  पट़्टीचा नॉनव्हेज खाणारा. काय करावं?संध्याकाळी तो घरी आला आणि आम्ही जेवायला गेलो हॉटेलमधे. त्याने स्वतःसाठी ते तंगडी कबाब आणि माझ्या साठी हरा भरा कबाब मागवला. त्याला ते चिकनची तंगडी हातात धरुन दाताने ते मांस तोडून खातांना पहातांना कसंतरीच वाटत होतं. खुप कृर दिसत होता तो. अगदी आदी मानवा सारखा.. त्याला कसं सांगायचं हे??

नंतर त्याने फिश करी मागवायचं ठरवलं.. तेंव्हा बाकी त्याला म्हंटलं.. की तु फिश खाल्लीस की तुझा खुप वांस येतो रे फिशचा, आणि मग कसंसंच होतं. त्याने मोठ्या समजुतदार पणे व्हेज जेवण मागवलं , मी तर अगदी कसं बसं थोडंसं चिवडल्यासारखं केलं , कारण जेवणाची इच्छाच संपुन गेली होती..  आम्ही परत घरी आलो. येतांना मस्त पैकी आइस्क्रिम खाल्लं ! तेवढीच काय ती  मजा आली…पण एक आहे, त्याचा तो चिकन खातांनाचा चेहेरा मी कधीच विसरू शकणार नाही.

जॉर्ज बर्नॉड शॉ म्हणायचे की मी व्हेज खातो कारण  माझ पोट  म्हणजे कब्रस्तान नाही जनावरांचे… एकदा त्याला पण सांगितलं होतं हे गम्मत म्हणुन.. पण त्याच्या लक्षात आलेलं दिसत नाही की मला  त्याने माझ्या समोर नॉन व्हेज  खाल्लेलं नाही आवडत  ते…

—————————————————–
आता लग्न तर झालंय..   मला नॉनव्हेज  मनापासुन आवडतं. त्यातल्या त्यात फिश करी तर खुप आवडते.

आज सकाळीच नॉन व्हेज खाण्याची इच्छा झाली. म्हणुन तिला ऑफिसमधे गेल्यावर फोन करुन सांगितलं तयार रहा म्हणुन.संध्याकाळी जाउ जेवायला बाहेर म्हणुन. घरी पोहोचलॊ तर ती तयार होती बाहेर जायला. तिला पाहिलं अन वाटलं की आता   कॅन्सलच करुन टाकावं बाहेर जाणं. उगिच लिप्स्टीक खराब होईल.. दुर रहा असं ऐकायला लागलं की वैताग येतो. अरे तुम्ही हासगळा नट्टा पट्टा करता कोणासाठी??आमच्या साठीच नां?? मग हे   मेकप खराब  होईल वगैरे बहाणे कशाला?? जाउ द्या. या बायकांना समजुन घेणं इतकं सोपं नाही.

आता सकाळपासुनच ठरवलं होतं, म्हणुन हॉटेल मधे गेल्यावर  चिकन मागवलं.  मी चिकन खातांना तिचा चेहेरा बघितला, आणि लक्षात आलं की तिला अजिबात कम्फर्टेबल वाटत नाही म्हणुन. तिच्या डोळ्यामधली घृणा  ( की किळस?) स्पष्ट दिसत होती. तरी पण संपवलंच चिकन.

अर्थात  यात तिचा पण काही दोष नाही म्हणा, कारण लहानपणापासुन कधी पाहिलेलं पण नव्हतं चिकन वगैरे.. आणि आता एकदम कोणी   जर समोर बसुन खाणं सुरु केलं तर तिला अनिझी वाटणं सहाजिक आहे. मला पण एकदा म्हणाली होती, तुमच्या डॊळ्यापुढे तो प्राणि येत नाही कां खातांना?? आता म्हंटलं हो.. म्हणुनच तर खायची इच्छा होते..

फिश करी मागवली तर म्हणाली की नको मागवु फ़िश – वास येतो नंतर. म्हणुन कॅन्सल केली. नाहीतर उगिच रात्री वास येतो म्हणुन…………   !!!!! एक ठरलं, की या पुढे ती सोबत असतांना तरी कधीच नॉन व्हेज खायचं नाही. शेवटी लग्न केलंय ,तेंव्हा दोघांनी पण थोडं थोडं कॉम्प्रोमाइझ करायलाच हवं. आणि तिला नॉनव्हेज आवडत नाही, म्हणजे आता या पुढे कायम भेंडीची भाजी आणि आमटी भात खायची सवय करायलाच हवी.पण हिला नेमकी फिश करी आवडत नाही. अशाने आता कसं होणार पुढे कोण जाणे.

आता माझे काही मित्र पण आहेत की ज्यांनी बायकोला पण शिकवलं नॉनव्हेज खायला .. आता आम्ही कसं शिकवायचं ह्याचाच विचार करतोय .. नाही तर …. चलता है!!!घर मे राम , गली मे शाम… म्हणजे घरी  शाकाहारी आणि  बाहेर एकटं असलं की  नॉननव्हेज खायचं झालं..

———————————–
आता लग्नाला  बरिच वर्ष झालेली आहेत. आता बाहेर जेवायला जायचं म्हंटलं की कुठल्यातरी व्हेज हॉटेलमधेच जातो आम्ही दोघं. त्या दिवसा पासुन त्याने कधीच नॉनव्हेज खाल्लं नाही माझ्या सोबत असतांना. कधी तरी बाहेरुन खाउन येतो. मग तो घरी आला, की माझ्या लक्षात येतं. स्पेशली फिशचा वास.. पण मी दाखवत नाही मला समजलंय म्हणुन.

सुरुवातीचा त्याचा चांगुलपणा हल्ली कुठे गेला तेच कळ्त नाही. हल्ली कुठल्याही लहानशा गोष्टीवरुन चिडतो. अगदी टॉवेल जरी सापडला नाही आंघोळीला तरी पण त्याचा इतका संताप होतो की बस.. अशा तर अनेक गोष्टी आहेत की ज्यामधे याची चिडचीड होते – बरेचदा तर संशय पण येतो-  की हाच का तो??  एखादा माणुस इतका कसा बदलू शकतो??

शेवटी लग्न म्हणजे काय एक कॉम्प्रोमाइझच असतं नां? दुसरं काय??

About महेंद्र

माझा ब्लॉग :- http://kayvatelte.com
This entry was posted in Uncategorized. Bookmark the permalink.

58 Responses to घरोघरी..

 1. bhaanasa says:

  महेंद्र, शेवटचं वाक्य हेच काय ते सत्य आहे. संसार म्हणजे तडजोडच. मात्र ती प्रेमाने व एकमेकांप्रती-एकमेकांच्या मतांचा आदर ठेवून केली तर( आयुष्यभर तर…हा हा… खरी मेख इथेच तर आहे. )आनंद टिकून राहू शकतो.बाकी काळाबरोबर बरेच काही बदलत जातेच. पोस्ट आवडली.

 2. Smit Gade says:

  kaho kaka,
  sagalikade asach ghadate ka? kalate pan valat nahi????

  • असावं… असं मला तरी वाटते.. :)अशाच लहानलहान प्रसंगातुन एकमेकांच्या विषयीची मतं बनत जातात.. 🙂 लग्नं म्हणजे एक ऍडजस्टमेंट हे शेवटी शाश्वत सत्य आहे , बाकी सब झुट!!

 3. सचिन says:

  काका, अजुन तरी सिंगलच आहे त्यामुळे असल्याकाही गोष्टीचा अनुभव नाही.
  पण लेख अगदी मस्त झालाय. गुदगुदुल्या होत होता वाचताना.

  • सिंगलचं डबल व्हायला काही फार वेळ लागत नाही. अनपेक्षीत पणे केंव्हाही ते होऊ शकतं.. तयारीत रहा.. 🙂

 4. आनंद पत्रे says:

  >> शेवटी लग्न म्हणजे काय एक कॉम्प्रोमाइझच असतं नां? दुसरं काय??
  अवघड आहे!

  • कॉम्प्रोमाइझ करणं म्हणजे मॅनेजमेंटच्या भाषेत ’विन विन’ सिच्युएशन निर्माण करणं.. त्यात अवघड काहीच नाही. एकदम सोप्पंय ते..

   • >> कॉम्प्रोमाइझ करणं म्हणजे मॅनेजमेंटच्या भाषेत ’विन विन’ सिच्युएशन निर्माण करणं.

    मॅनेजर लोकांकडून ’विन विन’ सिच्युएशन वैगरे फंडे फार वेळा ऐकायला मिळतात. ही असली वाक्य डोक्यात जातात 😦

 5. Aparna says:

  शेवटी लग्न म्हणजे काय एक कॉम्प्रोमाइझच असतं नां? दुसरं काय??
  लव्हमॅरेजलाही हेच वाक्य applicable आहे का?? नाही सहजंच विचारतेय…अनुभव नाही ना??

 6. swati says:

  kaka khup chan aahe lekh maza pan ek varsha purvi lagna zalay ..lekh wachatana mala maze ya warshatale anubhav aathavle…
  doghe pan aap aaplya thikani barobar asatat ..tyamule ek mekani dusaryala tyachi space dena mahatvacha aahe
  asa mala watat

  • स्वाती
   म्हणुनच तर नांव दिलंय .. घरो घरि 🙂 खरंय अगदी .. एकमेकांच्या मतांचा आदर करणं हे महत्वाचं असतंच.. :).

 7. Nikhil says:

  ultimate

 8. Ajay says:

  लग्न म्हणजे ‘तडजोड’ की ‘तोडजोड’ की दोन्ही ? 🙂

  -अजय

 9. मला वाटते त्या ’कॉम्प्रोमाइझ’ मध्ये एक वेगळच समाधान आणी आनंद असतो…
  (लग्नाचा अनुभव तर नाही पण मित्रासोबत बरयाच वेळा ’कॉम्प्रोमाइझ’ केल्याचा अनुभव आहे)

  • निश्चितच.. कोणासाठी तरी काहीतरी सोडणं.. किंवा करणं यात एक वेगळा आनंद असतो.. दिल्याने वाढते ते प्रेम!!

 10. शेवटी लग्न म्हणजे काय एक कॉम्प्रोमाइझच असतं नां? …. खरंय… !

  ‘ती’ला नॉनवेजची खास आवड नाही… करी खाईल हवं तर.. पण मी मात्र पट्टीचा नॉनवेज..

  मग, मी ‘कॉम्प्रोमाइझ’ करतो – बाहेर खाऊन येतो…! कधी ती घरीही बनवते..आणि ‘कॉम्प्रोमाइझ’ करते..!!

 11. वाचक says:

  काका, मुलगी चांगली होती, मला म्हणाली नॉनव्हेज सोडशील का माझ्यासाठी, अवघड अट होती, आणि आपण कुणाला फसवत नाही. नाही म्हणून सांगितलं तिने डोळे मिटून घेतले. तिथेच स्पष्ट झाले की काही होणार नाही आपले.

  • हे सगळे मुद्दे नंतर गौण ठरतात. आणि हे तर एकच कारण झालं, या शिवाय इतरही बरिच कारणं असतात.. जास्त महत्वाची!! त्यांचा विचार आधी करायला हवा..

 12. Madhuri says:

  Tumhala aattach ek pdf file pathawali ahe ya sandarbhat. Jaroor bagha. Wiwahechho tarun-taruni sathi phar upayogi aahe.

 13. महेन्द्रजी, शब्द कमी पडतात तुमच्या पोस्टला कॉमेंट करताना 🙂 सुचतच नाही कसा अप्रीशियेट करू. खूप मस्त आणि वास्तववादी पोस्ट आहे हे. वास्तव माझ्यासाठी तरी नाही अजुन म्हणा, पण टाइम टाइम की बात है..लेट्स सी 🙂

  • सुहास..
   देण्यातला आनंद एक वेगळाच असतो.. आणि बहुतेक ठिकाणी असंच काहीतरी घडतं.. लोकमत मधे पुरुषांची डायरी म्हणुन एक कॉलम सुरु होतोय, त्या वरुन मला हे वाटलं की दोघांचीही डायरी एकत्र असली तर जास्त मजेदार होईल. म्हणुन हे पोस्ट ट्राय केलं!

   • अप्रतिम झालाय पोस्ट नेहमीसारख..मी पण एक पोस्ट टाकलीय तुमचे अभिप्राय कळवा आवडली तरी आणि नाही आवडली तरीसुद्धा 🙂

 14. वैभव says:

  खूप छान लिहिलेय महेंद्रजी…अजून अनुभव नाहीये पण बहुतेक घरोघरी हेच असावे

 15. SanK says:

  Nice post…rather awesome is a good word to describe this post…..
  You have nicely described the issues of any marriage, including love marriage…..
  And btw….”:) लग्नं म्हणजे एक ऍडजस्टमेंट हे शेवटी शाश्वत सत्य आहे , बाकी सब झुट!!” ….this line is totally true & I agree with you completely….

  मराठी मधे रिप्लाय न केल्या बद्दल क्षमस्व….

  • संकेत
   धन्यावाद.. प्रतिसाद दिल्याबद्दल!! आज दिवसभर नेट वर नव्हतो म्हणुन कॉमेंट लवकर अप्रुव्ह करु शकलो नाही..

 16. gouri says:

  He he he … anubhavaache bol … sahi lihiley mahendra ekadam. agadi kharech gharoghari hech asate. agadi kitihi mahiti karun ghetali, love marriage asale tari suddhaa ashe surprises asataatach!!!

  • हो नां.. बऱ्याच स्वतःबद्दलच्या चांगल्या गोष्टींच प्रकर्षाने पुढे करुन दाखवल्या जातात.. अशा गोष्टींवर शक्यतो बोलणं टाळलं जातं!!

 17. Atul Deshmukh says:

  लग्न हा सगल्यांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे…..तरुण,वृद्ध सगले लोक हा विषय अगदी चवीने खातात…ह्यावारिल लेखन,विचार आवर्जुन enjoy करतात..
  लग्न आणि त्या नंतर उदभवनार्या पति पत्नितिल संबंधांवर बर्याच लोकानी आपापले expert comments दिले आहेत..
  मला तर वाटते की कुठले ही नाते हे प्रत्येकाच्या सद्सदविवेकबुद्धि वर अवलंबून असते..
  प्रत्येक action var reaction देताना पाहिले आपल्या reaction च सम्बंधित व्यक्तीवर/व्यक्तिंवर के परिणाम होइल ह्याचा विचार करून react केले तर ती reaction कधीही चुकीची नसणार..Its applies to every relationship and marriage relationship is no exception..
  म्हणून तरुण पिढीने लग्नाचा जास्त बाऊ न करता…ह्याला आपल्या जीवनचक्रातिल एक वेगला experince म्हणून enjoy करा…

  • अतुल
   अगदी सहज एक लाईट रिडींग पोस्ट म्हणुन टाकलं होतं हे.. हा एक जिवनाचा अविभाज्य अंग आहे.. :)या बद्द्ल बाउ न करण कधीही योग्य!!

   • Atul Deshmukh says:

    Namaskar Mahendrajii,
    for da sake of anxiety i read many of ur posts last night..
    U really nicely put ur experinces into words..Keep it up..Looking fwd for diif kind of stuff from u.
    I also write on my blog atulsdeshmukh.wordpress.com
    Some of the stuff
    a story named चक्रव्युह,
    an imitation स्त्री’वाद’–एक ‘वादा’तीत विडंबन
    an article named आजोळ
    If u have time..Pls give ur opinion on it viz. writing..
    I decide to come up professionaly as a writer besides being s/w engg.
    It wld be helpful for me to move on.

    • अतुल
     तुमचा ब्लॉग वाचतोय.. लवकरच कॉमेंट टाकिन. जे काही मनात येइल ते लिहित जा, बस… जमेल आपोआप.. 🙂 शुभेच्छा.. पण समजायला फार अवघड गोष्टींपेक्षा ब्लॉग वर लोकांना लाइट रिडींग आवडतं असं माझ्या लक्षात आलंय.

 18. Rohan says:

  नुकताच चक्रव्युहात प्रवेश केलेला अभिमन्यु आहे मी .. हाहा … अनुभव घेतोय आणि साठवतोय … काही वर्षांनी मी पण टाकीन अशी एखादी पोष्ट … 😉 पण वेज – नॉन-वेज चा राडा आपल्याकडे नाही बरं का… आम्ही दोघे पण पट्टीचे हाणणारे.. खास करून फिश. 😀

  • रोहन
   मग तर ठिक आहे.
   पण हा मुद्दा बऱ्याच घरात असतो.. व्हेज की नॉन व्हेज .. यावर तर नेहेमीच दंगल असते सुरु..

 19. लेख छान! ये जीवन है….;-)

  • कांचन
   अगदी मान्य!! ह्या जिवनात देण्यातलं सुख अनुभवल्या शिवाय कळत नाही.. 🙂 घेण्यापेक्षा काही तरी आपण करतोय आपल्या पार्टनर साठी यात खुप आनंद असतो..

 20. माझ्या बघण्यात देखील अशी काही उदाहरणे आहेत. संसारात कराव्या लागणार्‍या इतर तडजोडींची कल्पना नाही पण व्हेज आणि नॉनव्हेज दोघं एका छताखाली सुखाने नांदणे म्हणजे फार मोठं कॉम्प्रोमाइझ आहे बुवा.

  मी स्वत: मांसाहारी असलो तरी मी कुणाला Beef खाताना पाहु शकत नाही त्यामुळे व्हेज माणसाच्या समोर नॉन व्हेज खाताना त्यांना काय वाटत असेल ह्याची थोडीफार कल्पना आहे. माझे बरेचसे मित्र नॉनव्हेज म्हणजे केवळ चिकन खातात. मासे आणि सी-फुड खाण्याच्या आनंदाला बरेचसे लोक केवळ वास आवडत नाही म्हणून मुकतात.

  बाकी “पोट म्हणजे जनावरांचे कब्रस्तान” हे आधी वाचनात न आल्याने हे वाक्य माझ्या टॅगमध्ये मी लिहु शकलो नाही. प. पू. जॉर्ज बर्नॉड शॉच्या आत्म्यास शांती लाभो.

  • सिध्दार्थ
   माझा एक मित्र होता तो तर सोड्याची चटणी (दाण्यासारखी सुखी) नेहेमी करुन आणायचा घरुन .. त्याचं जेवण होत नव्हतं त्या चटणी शिवाय.. लहानपणापासुनच्या सवयी मोडणं कठिण असतं..!!

 21. विनय says:

  शेवटी लग्न म्हणजे काय एक कॉम्प्रोमाइझच असतं नां? दुसरं काय??

  हे काही आपल्याला पटलं नाही. एकमेकांना समजून घेणे आणि फार त्रास होऊ न देणे, हे कॉम्प्रोमाइझपेक्षा खूप वेगळं आहे. कॉम्प्रोमाइझ स्वार्था साठी केला जातो. आता लग्न जर स्वार्थासाठी केलं असेल, तर मग काय बोलावे?

  • विनय
   कॉम्प्रोमाइझ स्वतःच्या स्वार्थासाठी केला जातो असं नाही. इथे दुसऱ्या साठी ्स्वतःच्या आवडी काही तरी कॉम्प्रोमाइझ केल्या जातात, आणि त्यात काही वाईट नाही. (सॅक्रिफाइस करणं हा शब्द कदाचित योग्य ठरेल)
   शब्दच्छल करित नाही, पण लग्न हे कशासाठी केलं जातं , याचं उत्तर अजुनतरी समजलेलं नाही.. असं म्हणतात, हा लाडु जो खाइल तो पस्तावेल ,आणि न खाइल तो पण पस्तावेल.. 🙂
   इतकं सिरियसली घेउ नका हो.. अगदी सहज मनात आलं ते लिहिलंय… अगदी पंधरा मिनिटात टाइपलं अन पोस्टलं इथे, आज जास्त काम होतं म्हणुन!!!

 22. काका, बहुतेक मी काल रात्री झोपायला गेल्यानंतर आलं तुमचं हे पोस्ट. आत्ता सकाळी बघितलं. तडजोडी तर कराव्याच लागतात पण सुरुवातीला “मीच का तडजोड करायची दर वेळी” असं दोघांनाही वाटतं त्यामुळे अजून थोडे वाद विवाद होतात.

  • मीच का पडतं घ्यायचं? हा प्रश्न तर नेहेमीच असतो, पण आपलं चुकलेलं नसतांना पण आपण स्वतःकडे कमिपणा घेतोच.. हेच शाश्वत सत्य!!

 23. savadhan says:

  सावधान! म्हणूनच सुरवातीपासून सावधान रहा असं रामदास स्वामी नी सांगून ठेवलय. आता इतकी वर्ष तड्जॊड क्ररत आनंदात गेली,येथून पुढची पण अशिच आनंदातच जातील. कशाला काळ्जी करताय?

  • छे हो.. काळजी कसली.. हे तर जनरल पोस्ट टाकलं होतं.. अगदी काय वाटेल ते कॅटॅगरीतलं..जुने दिवस आठवले होते बस्स..

 24. प्रसाद... says:

  kaka… Farach chan…. mastach… itka kasa kay janata manatla… Eng. la psychology pan subject hota ka…???

  • प्रसाद..
   अनुभवासाठी काही शिकावं लागत नाही.. सगळा माझा स्वतःचा अनुभव लिहिलाय इथे..

 25. nitinbhusari says:

  घर घर की कहानी !!!!

 26. पवन निकम says:

  छान. . . येत्या काही दिवसां मध्ये मी पण या चक्रव्युहात अडकणार आहे. त्यासाठी लग्नाबद्दल च्या अशाच काही गोष्टींची माहिती करून घेतोय . . . महेंद्र सर तुमच्या कडे पण जर विवाहेच्छुक तरुण तरूंनी साठी काही लेख असतील तर नक्की मला मला मेल करा .धन्यवाद . . . वाट पाहतोय .

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s