लक्षणं प्रेमात न पडलेल्यांची…

मागच्याच शनिवारी प्रेमात पडलेल्यांची लक्षणं यावर लिहलं होतं ,तेंव्हा सिध्दार्थ आणि इतर बऱ्याच लोकांचं म्हणणं पड्ल की प्रेमात न पडलेल्यांची लक्षणं, यावर पण एक लेख होऊ शकतो.. आणि कल्पना स्ट्राइक झाली.. !!! अरे हो.. खरंच होऊ शकतो.. म्हणून इथे आज इथे काही थोडी फार जी काही लक्षात येतील ती लक्षणं लिहितोय. जरी ही लोकं प्रेमात पडलेली नसली तरीही यांची प्रेमात पडण्याची मनापासून इच्छा असते.. अगदी शक्य तितक्या लवकर आपण कोणाच्या तरी , आणि कोणीतरी आपल्या प्रेमात पडावं असं सारखं वाटत असतं..

अजूनही सिल्व्हासलाच आहे, आणि आज थोडा कमी वेळ आहे, साईटला जायचंय म्हणून लवकर आटोपतो हे पोस्ट. इथे कॉमेंट्स मधे तुम्हाला ऍड करायला भरपूर स्कोप आहे, सुटलेले मुद्दे.

१) या लोकांना सुटीचा दिवस म्हणजे ट्रेकिंग चा दिवस असा समज असतो. (दुसरं काही करण्यासारखं नसल्यामुळे)
२)ट्रेकिंग ला जातांना   नेहेमी चांगल्या मुली असलेला ग्रुप जॉइन करण्याकडे  यांचा कल असतो, पण प्रत्येकच जण नशिबवान असतो असे नाही बरं कां.
३) नेहेमी सोबत ट्रेक ला येणारी ती एकमेव सुंदरी आपल्याकडे पाहिल आणि आपल्यावर प्रेम करायला लागेल असे याना सारखे वाटत असते.
४) ट्रेकर्स बद्दलचे एक पोस्ट वाचले होते कुठेतरी.. त्यावरचे सगळे मुद्दे यात घेतले तरीही चालती.
५) संध्याकाळी ऑफिसमधुन आल्यावर तयार होऊन लक्ष्मी रोडला किंवा झेड ब्रिज वर जाउन टाइम पास (मुलींकड पहाणं) करणे यांना आवडते.
६)कपड्य़ांच्या बाबतीत अती सेन्सेटीव्ह असतात हे लोकं. आपण व्यवस्थित राहिलं, खुप चांगले कपडे घातले की आपल्याकडे मुली बघतील अन आपल्यावर प्रेम करु लागतील असा यांचा उगाच ’ गैर समज ’असतो.
७)संभाजी पार्कातल्या झाडामागे बसलेल्या लोकांच्याकडे बघून एखादा बेंच वर एकटाच उसासे टाकत बसलेला ’बघ्या’ दिसला की समजावं की तो एकटाच आहे.. प्रेमात न पडलेला
८) ’बघे’ गिरी करायला यांना  खूप आवडतं. कुठेही एखादं प्रेमी युगुल दिसलं की त्यांच्या कडे पहात रहाणे हे एक लक्षण..
९)प्रत्येक गर्ल नेक्स्ट डोअर कडे पहात रहाणं.. ती कधीतरी आपल्याकडे पाहिल म्हणून एक अपेक्षेने हा यांचा सगळ्यात आवडता पास टाईम!
१०) काहीच काम नसेल तर , गर्ल्स कॉलेजच्या आसपास  नेहेमी भटकत रहाणारा एखादा दिसला, की त्याला प्रेमात पडण्यास इच्छुक समजायला हरकत नाही.
११) मुलींच्या समोरून बाइकवर खूप फास्ट निघून विनाकारण ऍक्सिलरेटरचा आवाज करित  जाणारा..
१२) बाईक वर व्हिली करणे.. स्पेशली सिग्नल ला उभं असतांना एखादी सुंदरी शेजारी उभी असेल तर , व्हिली करून पुढे निघून जाणारा दिसला .. की तो प्रेमात न पडलेला हे नक्की. (व्हिली म्हणजे मागच्या एका चाकावर बाइक चालवणे)  अशी सर्कस करुन मुलींचं आपल्या कडे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करणारा …
१३)एखाद्या घरासमोरच्या टपरीवर बाइक स्टॅंड वर न लावता,बाईक वरुन न उतरता  – हातात कटींग चा कप घेउन , समोरच्या घरातली मुलगी बाल्कनी कडे डोळ्यात प्राण आणून  ’ती” कधी बाहेर  येते   ह्याची वाट पहात  उभा असलेला..
१४)कॉलेज मधे बाइक खूप फास्ट चालवत फिरणारा.
१५) बस स्टॉप वर उभा असणारा, आणि समोरून ’रिकामी’ जरी गेली तरीही ती न पकडणारा, आणि भरलेली बस केंव्हा येते याची वाट पहात बसास्टॉप वर उभा असलेला (??)
१६) एखादी सुंदर मैत्रीण लग्न करून गेली, की तिच्या  नवऱ्यावर  मग बंदर हाथ मे अद्रक सारख्या कॉमेंट्स   पास करणारा

१७)समोरुन एखादी मुलगी आली की तिची उंची अन आपली उंची कम्पेअर करुन ती आपल्याला ’सुट’ (??) होते कां?? याचा विचार करित वेळ काढत असतात.
१८)मित्रांच्या बरोबर टिपी  करण्यात वेळ घालवणारा. ( यांचे मित्र पण प्रेमात वगैरे न पडलेलेच असतात :))

१९)ऑर्कुट , फेस बुक अशा ठिकाणी  कायम ’पडीक’ असणारे.
२०) ऑर्कुटवर कायम मैत्रीणी शोधात असलेले .  दिसला सुंदर मुलीचा   प्रोफाईल की तिला फ्रेंड्शिपची रिक्वेस्ट पाठवणारे.
२१)ऑर्कुटवर आपल्या ’जातीच्या’ कम्युनिटीज जॉइन करणारे.. जसे ब्राह्मण असेल तर देशस्थ ब्राह्मण, मराठा असेल तर ९६ कुळी मराठा, किंवा सारस्वत, कोकणस्थ असेल तर ती कम्युनिटी. कमीत कमी इथे तरी एखादी मुलगी भेटेल आणि आपल्यावर प्रेम करु लागेल अशा भाबड्या आशेने दिवस कंठणारे..
२२)मुलींचे फेसबुक प्रोफाइल्स ( मग ज्यावर अगदी ऐश्वर्या रायचा फोटॊ असलेला प्रोफाइल पण) चेक करणं, आणि मग त्यांना ओळख नसतांना पण  फ्रेंड्स रिक्वेस्ट टाकणारे .
२३)ऑफिसमधली सुंदर मुलगी दिसली की तिच्या अवती भोवती रुंजी घालत फिरणारे, तिची सगळी कामं आपण होऊन करणारे सुरु होतं, आणि आपणच कसे मोस्ट एलिजिबल बॅचलर आहोत हे ठसवण्याचा प्रयत्न करणारे.
२४) ऑफिस मधली प्रत्येकच सुंदर मुलगी इथे काम करायला नाही, तर आपल्या प्रेमात पडायला आलेली आहे असा समज करुन ’तसे’ प्रयत्न करत रहाणारे!  अर्थात मुलींना पण सगळं कळंत असतंच, त्यामुळे या मधे फारसा काही फायदा होत नाही, पण विक्रमादित्या प्रमाणे  कायम प्रयत्न करीत रहाणारे.

२५) यांचे मोबाइल कधीच एंगेज लागत नाही. कुठल्याही ट्रेकला येण्यासाठी हे कायम तयार असतात.

२६) शनीवार आला, की रवीवारच्या ट्रेकची तयारी  सुरु करणारे.

२७) एखाद्या मित्राचे लग्न वगैरे ठरले की मग त्यामधे हमखास जाऊन प्रत्येक सुंदर तरूणी कडे अपेक्षेने  पहात आपल्याला सुटेबल आहे का? हे   शोधत रहाणारे

२८)—पुढचं तुम्ही लिहा राव.. मला जायचंय साईटला. आता जास्त वेळ देता येत नाही या पोस्टला.. 🙂

About महेंद्र

माझा ब्लॉग :- http://kayvatelte.com
This entry was posted in Uncategorized. Bookmark the permalink.

42 Responses to लक्षणं प्रेमात न पडलेल्यांची…

 1. वाचक says:

  प्रेमात न पडलेले व पडू न इच्छिणारे यावर पण एक पोस्ट होईल.

  • एकाच विषयावर किती लिहायचं? बस झालं की आता..
   इतरांनी पण लिहावं .. नाही तर तोच तो पणा येतो पोस्ट मधे.

 2. मी तर म्हणेन “प्रेमात पडलेल्यांची लक्षणं” सोडून इतर सगळी 😉

 3. अनिकेत वैद्य says:

  मस्त झालय पोस्ट.

  मस्त लक्षण आहेत.


  अनिकेत वैद्य

 4. Agree to हेरंब, खुमासदार झालीय पोस्ट.. पण मला बाबा प्रेमात पडलेल्यांची लक्षणंच आवडली जास्त 🙂

 5. 26) ह्यांना सुट्टी दिवशी (किंवा इतर कधीही) कधी कुठेही बोलवा, हे तयार असतात. ट्रेकिंगची आवड असेल तर ह्यांच्या परवानगी शिवाय तुम्ही ह्यांना गृहीत धरू शकतात.
  27) हे कुठे ही टपरीवर चहा पिऊ किंवा वडापाव खाऊ शकतात. CCD सारख्या ठिकाणी ह्यांच फार येणं जाणं नसतं.
  28)ऑफीसमध्ये हे कितीही उशिरा पर्यंत काम करू शकतात. Comp OFF मिळणार असेल तर हे वीकेंडला देखील काम करायला तयार असतात. Long Term onsite साठी मॅनेजर लोक ह्यांना बिनदिक्कत पाठवू शकतात.
  29) मल्टीप्लेक्सचं हवे असा काही आग्रह नसतो. कुठल्याही चित्रपट गृहात जाऊन (शक्यतो स्वस्तात स्वस्त ), कुठलाही शो (शक्यतो लेट नाइट), कुठल्याही सीटवर (कॉर्नर वैगरे हवीच असे नाही) बसून बघू शकतात.
  30) लोकल असो किंवा लांब पल्ला, आपल्या बाजूला कुणीतरी सुंदर मुलगी असेल हे अपेक्षा ठेवून हे प्रवासाला निघतात.
  31) शॉपिंग मॉल मध्ये बरीचशी ठिकाणे (लेडीज शॉप्स) ह्यांना व्यर्ज असतात. कदाचित प्रेमात पडल्यावर किंवा लग्नानंतर हि कसर भरून निघत असेल म्हणा.
  32) हे लोक वीकेंडला फॉरेन लॅंग्वेज किंवा गिटार क्लास अश्या ठिकाणी जातात. त्यामध्ये निदान इथे तरी कुणी भेटेल ही अपेक्षा असतेच म्हणा.
  33) ह्यांना मोबाईलची कुठलीही बिलिंग स्कीम चालते. फ्री कॉलिंग रेट वैगरे गोष्टी बघत बसत नाहीत.
  34) ह्यांना घरामध्ये कमोड किंवा एखाद्या कोपर्‍यात मोबाईलची रेंज मिळाली नाही तरी चालते. (हसू नका बरे… हे आहे खरे!!!)
  35) ह्यांचे मोबाईल कधीतरीचं एन्गेज लागतात.
  36) SMS वैगरे टाइप करण्यात हे कमालीचे स्लो असतात.
  37) नोकरी सांभाळून पार्टटाइम MBAचा अभ्यास करू शकतात.
  38) जॉब स्विच करताना रिलोकेशनला ह्यांची फार ना नसते.
  39) नात्यातली किंवा मित्रांची लग्न, कम्युनिटीचे स्नेह संमेलन, युथ फेस्टिवल असे कार्यक्रम हे लोकं चूकवीत नाहीत.
  40) सार्वजनिक ठिकाणी कार्यकर्ता ह्या नावाखाली तुम्हाला हेच दिसतील. थोडक्यात “लष्कराच्या भाकर्‍या भाजणे” टाइप कामं आनंदाने करतात. (सच्च्या कार्यकर्त्यांनी हे लक्षण मनाला लावून घेऊ नये)

  ह्म्म एवढीचं आठवलीत आत्ता. बरीचशी तुम्ही कवर केली आहेत. बाकी हे लोकं तुम्ही वर म्हटल्याप्रमाणे “प्रेमात पडलेली लोकं” ह्या कॅटागरीमध्ये जाण्यास सदैव एका पायावर तयार असतात.

 6. सातारकर says:

  महेंद्र आणि सिद्धार्थ एक नंबर यादी

 7. Rohan says:

  मी काही ऍड नाही करत रे. ते ट्रेकचे मुद्दे भारी होते… मी मात्र पाहिल्या ट्रेक आधी पासूनच ‘गुंतलेलो’ असल्याने पुढचे मुद्दे लागु झाले नाही … हेहे … सध्या माझ्या पहिल्या ट्रेक वरतीच लिहितो आहे … 🙂

 8. एकदम कडक पोस्ट आहेत या दोन्ही…. सिद्धार्थची पुरवणी पण आवडली.

  बाकी ट्रेकर्सबद्दल लिहिलेली पोस्ट माझीच होती “ट्रेकर कसा ओळखावा”. पण गेली कित्येक वर्षे मी अभिमानाने दोन्ही आघाड्या सांभाळून आहे हं… 😀
  (पण साला CCD/Barista आपल्याला कधीच परवडले नाही).

  • ते पोस्ट तर खुपच मस्त होतं. मला एकदा इ मेल फॉर्वर्ड मधे पण आलं होतं. पण हा लेख लिहितांना, नेमका कुठे वाचला होता तेच आठवत नव्हतं, नाहीतर लिंक देता आलीअसती.

  • Rohan says:

   तो लेख तू लिहिला होतास ??? सही रे … मस्तच … 🙂

 9. bhaanasa says:

  हाहा…. सहीच आहेत सगळे मुद्दे. शिवाय सिध्दार्थ ची पुरवणीही मस्तच. तरिही मी म्हणेन प्रेमात पडायलाच हवे.:)

  • हो ना.. आणि लग्न झालं असेल तर स्वतःच्याच बायकोच्या प्रेमात पडायलाही हरकत नाही.. आणि बायकांनी आपल्याच नवऱ्याच्या!! 🙂

 10. तुम्ही आणी सिद्धार्थ नी मस्त सादर केली आहेत प्रेमात न पडलेल्यांची लक्षण…

 11. ngadre says:

  svath chya baykochya premaat..

  Arere.. Hmm. Barobar ahe.. Mhanataat na..

  Satwaai la navhata dadla ani mhasobala navhati baaiil..

  Aso..Mahendraji..fakkad lekh jamlaay buwa..

 12. ngadre says:

  P.S.

  lagn jhalelya purushanchi avastha me varchya comment madhe sangitali ahe..

  To be serious, you are so much right. Married people lose all their love in years.. They should try loving each other..

 13. अहो काय? तुमची मिठाची फॅक्टरी वगैरे आहे की काय?
  कश्याला उगाच जखमेवर मीठ चोळता…..

 14. nakul says:

  mast…

 15. Vivek Mone says:

  एक नंबर पोस्ट

 16. प्रसाद... says:

  Namaskar..kaka…Blogs farach chan aahet tumche..yogayogane link milali eka mitrachya mail madhun. Mi tasa comment waigare denya itka jankar nahi…pan aaj sahaj manat aale te share karto…kaka…tumchya Mrs. kontya blog war lihitat jara link post kara na….tyanchi side suddha janun ghyala Aawadel…!!!
  rply chi wat pahen…

  • प्रसाद
   ती कुठल्याच ब्लॉग वर लिहित नाही. ती मराठी एन्सायक्लोपेडीयाचं संपादन करते आहे सध्या..आता ब्लॉग माहिती झाला आहेच.. येत रहा..

 17. प्रसाद... says:

  nakki…!!!

 18. Hi,
  I read ur blog on प्रेमात पडलेल्यांच्या लक्षण as suggested by my friend. U were superb there. Here the intensity lacks but Siddharth has added valuable comments.
  Sorry, for not writing in Marathi. I can understand the language but writing is still beyond me.
  Good Job!

  • सुभाशिष
   प्रतिक्रियेकरता आभार. तुम्हाला मराठी निट येत नाही, तरी पण ब्लॉग वाचुन आवर्जुन कॉमेंट टाकलीत त्या बद्दल आभार.. धन्यवाद..

 19. Mandar says:

  ह्यांचे मोबाईल कधीतरीचं एन्गेज लागतात.
  SMS वैगरे टाइप करण्यात हे कमालीचे स्लो असतात
  Hech 2 faqet match hotat.
  Kai rao mi mazya baddal wachun hasaychy kalpanene kiti exite zalo hoto!!!
  soda hi sagli ichukanchi lakshne ahet.
  amchyasarkhynchi lakshne mi lihin kadhi teri.

  Baki maja ali !!!!

  • मंदार
   ब्लॉग वर स्वागत आणि प्रतिक्रियेसाठी आभार. 🙂 लिहा लवकर , आणि लिंक चिकटवा इथे..

 20. joshu says:

  are ky mast observation aahe mahendra are asch krtat yar he lok pan na! anyway changle point noted kelet tumhi , he mulinchya lakshyat aal tar bar hoil >>>>> by the way keep it up Mahendra

  • मुलींना सगळं माहीती असतं, आजकाल मुली पण तितक्याच हुशार झालेल्या आहेत. 🙂
   प्रतिक्रियेसाठी आभार..

 21. abhishek amberkar says:

  १९ जुळली 😀
  अजून एक लक्षण –

  “प्रेमात न पडलेल्यांची लक्षणे” सारख्या ब्लॉगवर “एवढी एवढी जुळली” अशा प्रतिक्रिया देऊन ब्लॉग वाचणाऱ्या मुलींचे लक्ष वेधून घेणे

  • अभिषेक
   पहीली प्रतिक्रिया म्हणून मॉडरेशन मधे गेली, या पुढे आपोआप अप्रुव्ह होईल प्रतिक्रिया..
   ब्लॉग वर स्वागत… आणि मनःपूर्वक आभार.

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s