जोडलेली नाळ

मुंबईची शेकॊटी..

मुंबईला मालाड ला टाइम्स ऑफ इंडीयाच्या समोरच  फ्लाय ओव्हरचं काम सुरु आहे. बहुतेक काम करणारे भैय्या लोकंच आहेत. रोज सकाळी फिरायला निघालो की   नेहेमी दिसणारे काही भैय्ये आता ओळखीचे वाटायला लागले आहेत.समोरच्या किराणा दुकानाच्या पडवित एका रांगेत झोपलेले ते ५  भैय्ये तर नेहेमीच दिसतात. त्यातला एखादा तोंडात दातुन दाबून बसलेला असतो. तर एखादा वर्तमान पत्र जाळून त्या वर तंबाखू जाळून मशेरी बनवत असतो. मुंबईला पण मशेरी लावणारे लोकं आहेत.. एक भैय्या प्रायमसच्या स्टॊव्ह ला पंप मारुन चहा वगैरे करण्याची तयारी करित असतो.

आज सकाळी फिरायला गेलो होतो तेंव्हा घरुन निघाल्यावर आधी नेहेमीचा तो सायकलला  सहा-सात दुधाच्या बरण्या लाऊन घेउन जाणारा भैय्या दिसला. माझ्या कडे पाहिलं आणि ओळखीचं हसला. समोरच्या चढावावर त्याला चढतांना सायकल ओढल्या जात नाही, म्हणून दररोज ( म्हणजे माझ्या फिरण्याच्या वेळेस तो तिथे असला तर) त्याच्या सायकलला मागून धक्का मारुन त्याला  थोडी मदत करतो. अहो पाच पाच कॅन लावलेली सायकल घेउन चढावावर सायकल ओढत न्यायची म्हणजे काय चेष्टा नाही. च्यायला कसले कसले लोकं ओळखीचे झाले आहेत हल्ली, नाही??

समोरच्या फ्लाय ओव्हर खालचा यु टर्न बंद केलेला आहे, पण नेहेमीप्रमाणेच नियमाला धाब्यावर बसवून, लावलेले अडथळॆ दुर करुन बाइकवाले तर नेहेमीच इथून यु टर्न घेतात. नुकतेच इथे ऑब्स्टकल्स लावलेले दिसले. या अशा लोकांना अडवायला, आणि तिथे असलेल्या सामानाची राखण करायला तीन चार  भैय्या वॉचमन असतात तिथे.

मुंबईला लोकांना सकाळी स्वेटर ,मफलर , कानटोपी घालुन फिरायला निघालेले बघितले की मला मोठी गम्मत वाटते, कारण मुंबईला थंडी अशी फारशी नसतेच. थोडा गारठा असतो हवेत झालं. पण तो गारठा एंजॉय करता येण्यासारखा असतो..  थंडी म्हणजे काय, हे समजायच्या आतच, इथे हिवाळा संपून जातो. मुंबईचा हिवाळा मला अगदी वसंत ऋतु प्रमाणे वाटतो. मस्त वातावरण असतं या दिवसात. कोणी म्हट्लं की  आज कितना चिल्ड है नां.. की मग हसु येतं..आज सकाळी तो फ्लायओव्हरच्या खालचा भैय्या फ्लायैओव्हर खाली चक्क शेकोटी पेट्वून हात शेकत बसलेला दिसला.म्हंटलं, क्युं भैय्या, बहुत ठंड लग रही है क्या?? थोडा वेळ  तिथे थांबलॊ, अन मी पण त्या शेकोटी जवळ थोडावेळ हात शेकून घेतले.  भैय्या म्हणाला, यहां ठंड तो नही.. ्ठंड तो हमार युपी मा होत है!! आणि म्हणाला, इथे असं शे्कोटी वगैरे पेटवली की मग  गाव गेल्या सारख वाटतं. आणि दातून तोंडात घालुन त्याने पुन्हा दात घासणं सुरु ठेवलं. इथे दातून जे विकले जातात, त्या पैकी ९० टक्के तरी भैय्या लोकंच घेत असतील विकत !! मी आजपर्यंत तरी एकही मराठी माणुस पाहिला नाही दातून विकत घेतांना.

ते मुंबईला राहुन छट पुजा करणारे बिहारी /युपी वाले असो, किंवा परदेशात राहुन गणपती बसवणारे असो.. दोन्ही मधे एक सारखेपणा आहे, तो म्हणजे  आपल्या जन्म गावाशी किंवा जागेशी जोडलेली नाळ तोडली जाऊ नये म्हणुन केला गेलेला हा एक प्रयत्न.. त्या भैय्याचं ते शेकोटी पेटवली की गावी गेल्यासारखं वाटतं हे वाक्य अगदी मनाला स्पर्शून गेलं..

शेवटी एक गोष्ट खरी आहे.. जननी जन्मभुमिश्च, स्वर्गादपी गरीयसी.. म्हणतात ते खोटं नाही.. म्हणून हे पोस्ट लिहितोय! जस्ट टु शो माय ग्रॅटीट्य़ुड टु दॅट भैय्या..

About महेंद्र

माझा ब्लॉग :- http://kayvatelte.com
This entry was posted in Uncategorized. Bookmark the permalink.

28 Responses to जोडलेली नाळ

 1. Sagar says:

  Kaka
  Post chan zalay….Kharach manus kuthahi gela tari aaplya gavachi nal kahi kelya tutat nahi….Mahnun tar Pardeshi rahun Maharashtratil ghadamodivar charcha karnare blogger kahi kami nahit…. An tya doodhvalya bhayyala madat…Bharich…..an Datun mhanje Kaduimbachya zadachi kadi na?Mi ekda try keli hoti dat ghasayla punha mhanun kadhi nav kadhl nahi tyane dat ghasayche mhanun…. 🙂

  • अरे ते तर अगदी सहज लिहिण्याच्या ओघात आलं म्हणुन लिहिलं… आमच्या कॉम्प्लेक्स मधे यायला एक चढाव आहे. त्यावरुन ती सायकल ओढत आणतो तो भैय्या. आणि मी एकटाच नाही, तर जो कोणि त्यावेळेस फिरायला निघाला असेल तो त्याला मदत करतो सायकल वर न्यायला.
   दातुन म्हणजे, कडुलिंब, किंवा, बाभळी, किंवा मेस्वाक वगैरेची काडी असते बहुतेक.. 🙂 नक्की माहिती नाही..

 2. खरय महेन्द्रजी, जननी जन्मभुमिश्च, स्वर्गादपी गरीयसी. म्हणजे तुम्ही रहेजाला राहता काय?
  Good Morning..happy winter season 🙂

  • अरे वा, तुम्ही तर इतक्या वर्णनावरुन बरोबर ओळखलं!!हो.. मी रहेजा कॉम्प्लेक्स लाच रहातो. 🙂

 3. Abhijit says:

  मशेरी लावणे म्हणजे काय हो? पहिल्यांदाच ऐकतोय. हो आम्ही सुद्धा देशाची आठवण येईल अशा गोष्टी करतो. म्हणजे घरात भारताचा झेंडा लावणे. झेंडाची गाणी मोठ्याने ऐकणे, भजी बनवणे, सकाळ संध्याकाळ वाह ताज चहा ढोसणे, मराठीचित्रपटांबद्दल चर्चा करणे. आणो हो आपल्या मराठीब्लॉगविश्वावर ५-५ मिनिटाला येणे !

  • मशेरी म्हणजे तंबाखु जाळुन त्याची पावडर करुन त्याने दात घासणे. यात तंबाखु पुर्ण जाळायचा नसतो.. अर्धवट जाळलेला असतो. आजही युपी बिहार मधे दात घासायला मशेरी वापरतात. लहान लहान गोष्टी बरेचदा मनाला स्पर्शुन जातात.. त्यातलीच ही एक गोष्टं.. दुर कशाला, अजुनही मला आपल्या जन्म गावचं वेड आहेच.. तिथला कोणी भेटला, की अगदी स्वर्गातुन देब भेटायला आलाय असं वाटतं… 🙂

 4. काका, ते गणपतीचं एकदम पटलं. आम्ही पण भारतात कधीच गणपती आणला नाही घरी. म्हणजे गावाला काकांकडे असतो म्हणून. ते चक्क आम्ही या वर्षी अमेरिकेत आणला गणपती. कुठल्या न कुठल्या प्रकारे स्वदेशाशी, स्वधर्माशी जोडलेलं राहण्याचा प्रयत्नच..

  • ते अगदी सहाजिकच आहे. अरे सौ. चा भाउ तर इथुन जातांना पार्लेजी ची बिस्किटं पण न्यायचा… म्हणायचा,चहात बुडवुन खायला हीच बिस्किटं हवीत.. कुठल्याना कुठल्या प्रकारे आपल्या जन्मभुमीशी जॊडलेलं रहाणं हाच उद्देश असतो या लहान लहान गोष्टींचा..

 5. हो काका खरं आहे. जन्मगाव, जिथे आपण लहानाचे मोठे झालो, त्या आठवणी परदेशातच नव्हे तर आपण आपल्या देशात असलो तरी देखील कधी कधी मन हळवे करून जातात.

  • म्हणुनच मराठीत एक म्हण आहे, जिथे आपली नाळ गाडली गेली असते , त्या जागेशी संबंध टिकुन रहावेत असं वाटतं!!

 6. bhaanasa says:

  महेंद्र झोपायला जातच होते तोच तुझी पोस्ट दिसली.मग वाचल्याशिवाय जाववेनाच. तू पण ना…. आता रात्रभर मायदेशाची, माझ्या घराची, गावची अन कुठली कुठली स्वप्ने पडत राहतील. आधीच सव्वावर्ष झालयं मला मायदेशात येऊन.मन तर उठसुट तिथेच पळत असते. खरेच आहे रे… मायदेशाशी, माझ्या मुंबईशी कुठल्या न कुठल्या मार्गाने जोडले राहण्याची धडपड सदैव असतेच.मी तर अगदी छोट्याछोटया गोष्टींनीही हळवी होते.पोस्ट छानच झालीये.:)

  • हळवं होणं सहाजिकच आहे. मला वाटतं प्रत्येकाच्याच मनात एक लहानसा कोपरा राखुन ठेवलेला असतो.. जन्मभुमी साठी!!

 7. vikram says:

  आपला गाव आणि आपला देश माणूस कधीच विसरत नाही अगदी खर

  आपण शेकोटीची आठवण करून दिली बर झाल आज रात्रीच शेकोटी करून शेकत बसतो तेवढ्याच लहानपणीच्या आठवणी

  लहान असताना शेकोटी करून आम्ही मित्र गप्पा मारत बसायचो आणि शेकोटीमध्ये जाळण्यासाठी जे काही आणलायला लागायचे त्याला ‘सासू जाळायला आन’ असे म्हणायचे
  असे का ते मला माहिती नाही पण गावाकडे असेच म्हणतात बुआ 😉

  • ‘सासू जाळायला आन’
   नविनच ऐकायला मिळालं. आमच्या घरी शेगडी पेटवुन त्या शेजारी सगळेजण बसायचे.. शेकोटी संध्याकाळी मित्रांसोबत असायची..

   • vikram says:

    बहुतेक हा सासूबद्दल राग व्यक्त करण्याचा एक प्रकार असावा हा हा

 8. अनुजा says:

  काका, हेरंबने सांगितल्यापासून नेहमी तुमचा ब्लॉग वाचते. खूप आवडतो. पण कधी कमेंट देता आली नाही. पण आजचा विषय खूप भावला. पण सहज मनात डोकावून गेलं कि आपण स्वदेशात राहिलोय त्यामुळे आपली ओढ तरी आहे तिकडे. पण आता पुढच्या पिढीला(थोडक्यात आमचा लेक) अशी ओढ वाटेल का? कशी वाटेल? किती वाटेल? कारण त्याला कळायला लागल्यापासून तो इकडेच आहे. त्यालाही आपल्या सारखीच ओढ वाटावी अशी इच्छा आहे पण कदाचित वाटणार नाही याची जाणीवही आहे. स्वीकारणं थोडं कठीण जाईल. पण इलाज नाही. जाऊ दे.. कन्फ्युज केलं ना तुम्हाला .. 😦

  • अनुजा,
   इतकं सोपा प्रश्न नाही हा. माझी एक मोठी मामेबहीण सिटीझन्शिप घेउन तिथेच सेटल झाली,जवळपास ३५ वर्षापासुन तिथेच आहे ती. सुटीमधे इथे येत असते अजुनही आपली मुळं शोधायला… पण तिच्या मुलांना मात्र इथे यायला अजिबात आवडत नाही. मग सुटी असली, की भारतात येण्या ऐवजी युरोप टूर करणे, किंवा दक्षिण अमेरिकेत फिरुन येणे जास्त पसंत करतात मुलं.
   अर्थात असंच होइल असं नाही, पण शक्यता मात्र अगदी ९० टक्के असतेच..

   दुसरी गोष्ट म्हणजे मला एक प्रश्न नेहेमी पडतो. जेंव्हा इराकशी युध्द सुरु होतं, तेंव्हा इराकी सोल्जर्स पण इराकी लोकांशी लढले होते….. !!!!! त्यांना कसं शक्य झालं स्वतःच्या भाई बंदावर गोळ्या चालवणं?? जर उद्या भारतावर हल्ल्ला केला गेला ,तर अमेरिकन इंडीयन्स जे आहेत ( सिटीझन शिप घेतलेले) त्यांचा हात कापेल का इथल्या लोकांवर गोळ्या झाडायला????जाउ द्या.. उगिच काहीतरी लिहितोय झालं..
   पण तुझा प्रश्न खरंच खुप विचार करायला लावणारा आहे… इतकं सोपं नाही त्याचं उत्तर!!!

 9. Nilesh Joglekar says:

  Bhas Bhes Bhus Bhui hya chaar goshti shiway maanus jagu shakat nahi.

  Cheers
  Nilesh Joglekar

  • भास , भेस, भुस ,भुई,??
   निटसं कळलं नाही हो.. फारच वरच्या लेव्हलचं मराठी होतंय हे. जरा आपल्या साध्या मराठीत सांगता कां?

 10. Nilesh Joglekar says:

  Bhas = Language
  Bhes = What you wear
  Bhus = What you eat
  Bhui = Land, Jamin

  Mansala aplya gavachi, deshachi odh tar astech, pan to bhasha, wesh, khane ani tethil bhumi hya karata pan zurat asto.

  Cheers
  Nilesh Joglekar

 11. फ़क्त जन्मभुमीच नाही तर इतरही काही गोष्टीत आपण आपल्या आठवणींची नाळ अशी जोडत असतो. माझ्यासाठी काही गाणी अशी आहेत की ती ऐकली कि मला विशिष्ट ठिकाणी असल्याच फ़िलींग येत..(त्या गाण्याचा त्या जागेशी काहीही संबध नसतांना)

  • खरंय.. बऱ्याच गोष्टी असतात.. जसे पाउस पडत असतांना ठराविक गाणी ऐकायचा मुड येतो आपला..

 12. sureshpethe says:

  खरंच आहे जी जोडते तिचेच नाव नळ( जोडलेली म्हणण म्हणजे पिवळं पितांबर !)….जन्मभूमी चे आकर्षण कायम असणारच…..तन्वी शी ओळख ती नाशिकची म्हणूनच आत्मियतेने झाली….. आणि त्यामुळेच ह्या ब्लॉग्जचीही !

  • सुरेशजी
   खरंय तुमचं..मराठी मधे असे अनेक शब्द वापरले जातात.. जे चुकीचे आहेत. पुढे लक्षात ठेवीन. दुरुस्ती करिता धन्यवाद.. पण पोस्टचं हेडींग काय ठेवावं आता?

   • sureshpethe says:

    अहो ! गम्मत केली, आणि तीही ( कंसात ). नका सिरीअस होउ इतके. पोस्ट मस्त आहे.

 13. मुंबईला लोकांना सकाळी स्वेटर ,मफलर , कानटोपी घालुन फिरायला निघालेले बघितले की मला मोठी गम्मत वाटते, कारण मुंबईला थंडी अशी फारशी नसतेच.

  सहमत! दोन वर्षांपूर्वी मुंबईत कडाक्याची थंडी पडली होती, तेव्हा खूप आश्चर्य वाटलं होतं.

  • मुंबईला येण्यापुर्वी मी नागपुरला होतो. नागपुरला थंडी, उन्हाळा आणि पाउस सगळंच खुप जास्त असायचं..म्हणुन त्या कम्पॅरिझन मधे इथली थंडी खुप आवडायची!!

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s