लिंक एक्स्चेंज

खरं तर हे पोस्ट भुंगा , किंवा सलिलने  ( नेट भेट) लिहिलं असतं तर ते जास्त योग्य झालं असतं. तरी पण थोडी माहिती देण्याचा प्रयत्न करतोय. काल मला एक इ मेल आला, त्यात लिहिलं होतं की तुमचा ब्लॉग हा इंडीब्लॉगरच्या रॅंक लिस्ट मधे ८६व्या नंबरवर आहे.कधी तरी इंडीब्लॉगरला रजिस्टर केलं होतं. त्याचं विजेट पण ब्लॉग वर लावलं नव्हतं. इंडीब्लॉगरने सांगितलं की ८६ हा चांगला रॅंक आहे म्हणून ते विजेट लावलंय ब्लॉग वर..

नंतर एकदा भुंगाशी चॅट करतांना, त्याने सांगितले की गुगल रॅंक मधे पण ब्लॉग चं रॅंकिंग समजतं. म्हणून तिथे चेक केलं तर ते ५ निघालं. जास्त असलेले चांगले असे म्हणतात.५ रॅंक पण फारच चांगली असं म्हणतात.

हे रॅंकिंग म्हणजे काय- आणि वाढण्यासाठी काय करायचं???? म्हणून थोडा शोध घेतला. तुमच्या ब्लॉग वर तुम्ही इतरांच्या ब्लॉग्ज च्या लिंक्स ब्लॉग रोल मधे ठेवल्या की तुमचे आणि ज्यांचे रोल्स तुम्ही ठेवले आहेत त्यांचे पण रॅंकींग वाढते.   त्यात असंही दिलं होतं   की बॅनर एक्स्चेंज म्हणजे तुमच्या ब्लॉगचं बॅनर माझ्या ब्लॉग वर लावतो, तुम्ही माझ्या ब्लॉगचं लावा असं केलं तरीही  ब्लॉग रॅंकिंग वाढतं. ब्लॉग चं गुगल रॅंकिंग वाढलं की तो ब्लॉग गुगलच्या सर्च मधे वरच्या लेव्हलला पोहोचतो. म्हणून इतरांचे ब्लॉग आपल्या ब्लॉग रोल वर ठेवणे, किंवा ब्लॉग विजेट्स आपल्या ब्लॉग वर लावणे ह्याचा खूप फायदा होतो.

एका पानावर म्हणजे पहिल्याच पानावर  सगळे ब्लॉग विजेट्स लावता येत नाहीत, कारण  फार जास्त विझेट्स लावले तर त्यामुळे ब्लॉग चं पेज फार वाईट दिसतं. फार तर ५ -६ विजेट्स पहिल्या पानावर लावता येतात.  मग इतर जास्तीचे विझेट्स लावण्यासाठी    जर तुम्ही एक वेगळं पेज उघडलं,आणि त्यामधे इतरांच्या ब्लॉग चे विजेट्स लावले तरी पण रॅंकींग वाढतं… बस्स !!एवढं केलं की ब्लॉग गुगल  रॅंकींग वाढायला मदत मिळेल   आणि ज्यांचे विझेट्स तुम्ही लावाल त्यांचं ही रॅंकींग वाढेल..

ह्या व्यतिरिक्त पण बऱ्याच आयडीयाज आहेत.. ज्यावर लवकरच  भुंगा किंवा सलिल लिहितील अशी मी आशा करतो..

About महेंद्र

माझा ब्लॉग :- http://kayvatelte.com
This entry was posted in Uncategorized. Bookmark the permalink.

24 Responses to लिंक एक्स्चेंज

 1. Ho, pan aaplyala baki blogs che widgets kase lavayache? Can you mail me other blogger widget links? please..

 2. vikram says:

  what an Idea Sirji 🙂

  माझा ब्लॉग हा इंडीब्लॉगरच्या रॅंक लिस्ट मधे ७२ व्या नंबरवर हे चांगल आहे का माहिती नाही

  • चांगला आहे, पण अजुनही नियमीत लिखाण केलं तर तो वर जाउ शकतो. लेख लिहितांना इतरांच्या ब्लॉग च्या लिंक्स चा मुबलक वापर करावा. म्हणजे क्रॉस लिंकींग होतं आणि गुगल रॅंक वाढते. जसे आजच्या पोस्ट मधे मी भुंगा आणि सलिल ची लिंक वापरलेली आहे. या विषयावर भुंगा/सलिल जास्त चांगलं लिहु शकतिल. माझा प्रांत नाही हा..

   • vikram says:

    अरे हो ती लिंक कशी वापरायची किंवा कशी द्यायची हे जरा सांगू शकता का ?

 3. मागच्या वेळी ७९ क्रमांकावर होतो इंडीब्लॉगर मध्ये आता अनियमीत लिखाणामुळे ५६ व्या क्रमांकावर घसरण झाली आहे माझी… 😦

 4. वर्डप्रेसच्या डॅशबोर्ड मध्ये ’नुकतेच प्रदर्शित केलेले पोस्ट्स’ मध्ये तुमचे अपडेटस येत नाहियेत….

  • मला वाटतं की वर्ड प्रेसला ती सुविधा नाही. फक्त ब्लॉगर्स मधे ते अपडेट्स दिसतात..

   • वर्ड्प्रेसवर कोणीही नविन पोस्ट टाकली की आपल्या वर्डप्रेसच्या डॅशबोर्ड मध्ये सर्वात खाली ’नुकतेच प्रदर्शित केलेले पोस्ट्स’ म्हणून जे सदर आहे तिथे त्याची माहिती येते.तिथे काल-परवापर्यंत तुमचे अपडेटस येत होते पण
    # लिंक एक्स्चेंज
    # जोडलेली नाळ
    # लक्षणं प्रेमात न पडलेल्यांची… या तिन्ही पोस्ट बद्दल तिथे अपडेट्स आले नाहीत.

 5. काका मी खुप आधी तुमच्या ब्लॉगचं पेज रँक चेक केला होता. ५ पेजरँक भल्याभल्यांना देखील जमत नाही. तुम्ही तो मिळवलात. त्याबद्दल अभिनंदन.

  पेजरँक ही गुगलने त्यांचे सर्च रीझल्ट्स सुधारण्यासाठी सुरु केलेली पद्धत आहे. तुमच्या ब्लॉगचं विजेट तसे ब्लॉगची लिंक बर्‍याच मराठी ब्लॉगर्सनी आपापल्या ब्लॉगवर दाखवीली आहे. त्यामुळे तुमच्या ब्लॉगचा पेजरँक खुप वाढलाय. इतर वेबमास्टर्स तुमच्या ब्लॉगला लिंक करतात याचा अर्थ तुमचा ब्लॉग चांगला आहे असा गुगलचा निष्कर्ष असतो.

  पेजरँक वढवण्यासाठी आता बरेच लोक पैसे घेउन लिंक एक्स्चेंज करतात त्यामुळे SEO च्या नावाखाली हा एक व्यवसाय होउन गेला आहे.

  मला स्वतःला अशा प्रकारे पेजरँक वाढवीणे मान्य नाही आणि त्यामुळे अद्याप नेटभेटचे विजेट मी बनविले नव्हते. पण अखेरीस मोह अनावर झाला आणि गेल्याच आठवड्यात विजेटबनवुन टाकले. लवकरच गुगलने त्यांची पेजरँक सीस्टम पुर्णपणे बदलण्याचे जाहीर केले आहे. तेव्हा असेच अजुन नविन फंडे येतील तोपर्यंत लिंक एक्स्चेंज जिंदाबाद.

  Salil Chaudhary
  http;//www.netbhet.com

  • पेज रॅंक वाढल्याने काही पैसे वगैरे मिळवण्याचा उद्देश नाही. तर केवळ गुगल स्रर्च मधे आपला ब्लॉग दिसेल लोकांना एवढाच काय तो फायदा. अर्थात हे मला आत्ता पर्यंत माहिती नव्हतं, मी फक्त आवडतात म्हणुन ब्लॉग रोल ऍड केला होता. पण हे समजल्यावर मात्र एक वेगळं पेज बनवलंय.. ब्लॉगर मित्र मैत्रीणी म्हणुन..

 6. D D says:

  मला हे माहिती नव्हतं, की ब्लॉगचे बॅनर लावल्याने ब्लॉगचं रॅंकींग वाढतं. मला हे बॅनर्स आवडले म्हणून मी ते माझ्या पेजवर टाकले. आज ही नवीनच माहिती मला कळली.

  • हो.. भरपुर बॅनर्स लावा ब्लॉग वर, आणि आपल्या पोस्ट्स वर दुसऱ्या ब्लॉग्ज च्या लिंक्स वापरा. क्रॉस लिंकींग हेच एक सोल्युशन आहे , रऍंकींग वाढवायचं.. जितक्या जास्त क्रॉस लिंक्स तितकं जास्त रेटींग..मला पण परवाच कळलं, आत्ता पर्यंत मी पण केवळ ब्लॉग डेकोरेट करायला हे विजेट्स वापरित होतो .. हे परवा समजलं.. तुमचं विजेट लावलं मी.. 🙂

   • salilchaudhary says:

    तुमच्या ब्लॉगवर विजेट लावल्यामुळे ज्याचे विजेट आहे त्या ब्लॉगचे रँकींग वाढते, तुमच्या ब्लॉगचे नाही हे लक्षात घ्या.

    तुमचे विजेट जास्तीत जास्त ब्लॉग्जने लावले तर तुमच्या ब्लॉगचा पेजरँक वाढेल.

    • ओह .. असं आहे का ते.. म्हणुन हे लिंक एक्स्चेंज सुरु झालंय तर…. पण आपल्या मित्रांचे विझेट्स लावायला काहीच ह्र्रकत नाही.. 🙂

 7. D D says:

  तुमच्या पेजवर माझाही बॅनर समाविष्ट केल्याबद्दल धन्यवाद!

 8. ब्लॉगवर केवळ डेकोरेशनसाठी विजेट्स लावणं मला अवडत नाही. सुरूवातीला मी स्लाईडशो वगैरे प्रकार लावले होते पण ते काही कामाचं नाही. ब्लॉगच्या रोजच्या स्टॅटस काउंटरमुळे माझा ब्लॉग किती वाचला जातो हे कळतं. माझ्या ब्लॉगवरची एकही विजेट डेकोरेशन म्हणून लावलेली नाही. अत्यंत मोकळेपणे हे सांगावंसं वाटतं की ब्लॉगरोलमुळे एक्झीट लिंक्स वाढतात.

  काल परवा पर्यंत माझी गुगल पेज रॅंक एक होती. अचानक ती दोन झाली म्हणून मी स्टॅटस चेक केलं. मध्यंतरी अनियमित लेखनामुळे मी होते तिथेच अडकले होते. जसं लेखन नियमीत सुरू झालं, तशी ब्लॉगवरची पानं उलटण्याची संख्या वाढली. आपोआप पेजरॅंकही पुढे सरकली. मलाही इंडिब्लॉगरचं मेल येतं. त्यात माझी रॅंक ५० आहे असं कळलं. आता चेक केली तर ७६ आहेस. ब्लॉगटॉपलीस्ट मधे माझा ब्लॉग ४ आणि ५ या क्रमांकावर सतत असायचा. मात्र ही पेजरॅंक आपण कोणत्या प्रवर्गामधे ब्लॉग टाकला आहे, यावरही अवलंबून असते त्यामुळे जास्त न् कमी याचं काही वाटण्याचं कारण नाही. मुळात आपला ब्लॉग किती लोकं वाचतात आणि आपण वाचण्यासारखं त्यांना काही देतो का, हे महत्त्वाचं.

  क्रॉस लिंक्समुळे आपले आवडते ब्लॉग व ब्लॉगर मित्र-मैत्रीणी दाखवता येतात. पण केवळ आपली पेजरॅंक वाढवण्यासाठी तसं करायचं हा व्यावहारिक पणा झाला. जर व्यवहारच पहायचा असेल तर मी जाहीराती लावेन. निदान मला एका वर्षानंतर काही पैसे हातात पडतील.

  मीदेखील क्रॉस लिंक्सचा विचार करते आहे पण ते विजेट व्यवस्थित दिसेल असं लावायचंय. शिवाय माझ्या ब्लॉग्सचे वाचक माझा ब्लॉग वाचून मगच पुढे सरकतील, अशी काहीतरी योजना हवी आहे म्हणून शांतपणे विचार करून मग विजेट लावणार. बरेच मित्र-मैत्रीणी आहेत. तुमचा नंबर तर पहिला लागेल त्यात.

  • क्रॉस लिंक्स मुळे फक्त पेज सर्च इंजीन मधे वरच्या लेव्हलला पोहोचते/ मला खरंच आधी माहिती नव्हता हा प्रकार…. अगदी परवा परवाच समजला की हे पेज रॅंकींग काय भानगड आहे ते..तुमचं विजेट बनवा लवकर..

 9. savadhan says:

  हे समजुन घ्यायचा प्रयत्न करत आहे.
  धन्यवाद !

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s