हुरडा पार्टी

बरोड्यहुन परत निघालो सुरतला . बाय रोडच प्रवास केला. हल्ली गुजराथचे रस्ते खूपच छान झालेले आहेत. जे अंतर पार करायला पुर्वी ४ ते ५ तास लागायचे , हल्ली तेच अंतर अडीच तासात कव्हर होतं.मेन हायवे वर पण नर्मदेवर एक ब्रिज आहे. हा नर्मदेवरचा ब्रिज थोडा लहान असल्यामुळे मुख्य हायवे वर ट्राफिक जॅम असतो, म्हणून एक वळण घेतलं आणि जुन्या रस्त्याला लागलो.जुन्या रस्त्यावर एक फार जुना   हिस्टॉरिकल इम्पॉर्टन्स असलेला ब्रिज ( जो सध्या वर्ल्ड हेरिटेज मधे मोडतो तो )तो आहे.  त्या ब्रिज वरुन प्रवास करतांना एक वेगळंच थ्रिल  जाणवतं.  हा ब्रिज लक्षात रहाण्याचं कारण म्हणजे ह्या ब्रिजवरुन जातांना हा ब्रिज खूप हलतो, बरेचदा तर भिती वाटते की हा ब्रिज कोसळतो की काय म्हणून.  पण १२० वर्षाच्या तरुणासारखा दिमाखात उभा आहे अजूनही

नर्मदेवरचा ब्रिज

७ डिसेंबर १८७७ साली या ब्रिजचं बांधकाम सुरु झालं आणि हे काम पुर्ण व्हायला फक्त ४ वर्षात म्हणजे १८८१ साली पुर्ण झाला.नर्मदा नदीचे पात्र पुर्वी च्या काळी पार करणं खूप कठीण असावं, म्हणून हा ब्रिज बांधला गेला. अजूनही हा ब्रिज अतिशय सुस्थितीत आहे. भारतात जुन्या गोष्टींची म्हणजे हेरिटेज ची फारशी कदर नाही, त्यामुळे ह्या ब्रिज चं मार्केटींग नीट केलं गेलेलं नाही.  ब्रिटीश लोकांनी जी काही लोकोपयोगी कामं करुन ठेवली आहेत त्यापैकी एक हे..

याच संदर्भात एक गोष्ट सहज आठवली, आपण स्वातंत्र्योत्तर काळात बांधलेला मांडवी नदीवरचा ब्रिज कोसळला होता, आणि नंतर पुढील बरीच वर्षं फेरी ने पणजी ते वास्कॊ जाण्यासाठी प्रवास करावा लागायचा.

मार्केटींग.. असलेल्या गोष्टींचं मार्केटींग करता येणं खूप महत्वाचं आहे. हाच ब्रिज जर इतर कुठल्याही देशात असता, तर  याच ब्रिज शेजारी  गार्डन वगैरे करुन छान टुरिस्ट स्पॉट बनवला असता. आता ह्या ब्रिजचा उपयोग बंद करण्यात यावा असे एक्सपर्ट्स सांगतात, पण आपलं सरकार तरी अजुन ऐकायला तयार नाही.  एक दिवस हा हिस्टॉरिकल इम्पॉर्टन्स चा हा ब्रिज कोसळला नाही म्हणजे मिळवली.

हुरडा पार्टी

ब्रिज क्रॉस करुन पुढे आलो तर रस्त्याच्या शेजारी बरेच गामडीया लोक ( शेतकरी ) हुरडा बनवत बसले होते. कोळशाच्या निखाऱ्यात ज्वारीची कोवळी कणसं टाकुन हुरडा भाजणं सुरु होतं . हे पाहिलं अन रहावलं नाही. बाजुलाच एक चहाची टपरी होती . आता खाण्याची वस्तु दिसली अन मी थांबणार नाही?? हे कसं शक्य आहे?? इथे त्या चहावाल्याच्या दुकानाशेजारीच एक पेरु वाला बसला होता. त्याच्याकडून पेरु घेतले विकत आणि सरळ त्या हुरडा वाल्याकडे जाउन उभा राहिलो. त्या माणसाने चांगला मुठभर हुरडा हातावर घातला. त्या कोळशावर भाजलेल्या कणसाची चव मला लहान पणात घेउन गेली. लहानपणीचे सगळे उद्योग आठवले..का ते माहिती नाही पण डॊळ्यात पाणी  तरळले.. असो.. धुराने असेल अशी मनाची समजूत करुन घेतली.. 🙂

हुरडा भाजायला माणसं लावली होती. भाजलेले कणीस त्या कॅन्ह्वासच्या बॅग मधे  घालुन त्याला चांगले बडवणे सुरु होते. असं केल्याने त्याचे दाणे निघून येतात. असं बराच वेळ केल्यावर हे दाणे सुपात घेउन त्यांना पाखडून त्यातल्या कचरा साफ केला जातो. हे पण खूप मेहेनतीचं काम आहे. कदाचित म्हणूनच असेल की हुरड्याचा भाव २०० रुपये किलॊ होता. अर्धा किलो हुरडा त्याच्याकडून पॅक करुन घेतला अन गाडीत बसलो. त्या बद्दल जास्त काही लिहित नाही, फक्त सिक्वेन्समधे फोटॊ पोस्ट करतोय.

त्या हुरडा वाल्याच्या शेजारी एक वडे वाला बसला होता. भाजलेला हुरडा पाटा वरवंट्याने वाटत चार पाच बायका बसल्या होत्या. त्या वाटणामधे आलं, लसुण, मिरची वगैरे घालुन त्याचे वडे तळणं सुरु होतं . डायटींग विसरलो, अन मस्त पैकी वडे खाउन सुरतला निघालो. सुरतला पोहोचे पर्यंत सगळा हुरडा संपला होता. म्हणून सुरतला पण नदीशेजारी हुरडा मिळतो असे समजले म्हणून तिथे जाउन घरी न्यायला म्हणून हुरडा पॅक करुन घेतला.

सुरत, आणि जानेवारी महिना म्हंटल्यावर पतंग ही आलीच. त्यावर एक वेगळं पोस्ट लिहीन.. कारण हे फारच मोठं होतंय..


About महेंद्र

माझा ब्लॉग :- http://kayvatelte.com
This entry was posted in प्रवासात.... Bookmark the permalink.

25 Responses to हुरडा पार्टी

 1. वाह, खाण्याचे शौकिन असलेले आपण. कुठल्याही नवीन जागी भेट दिली की इथे काय खायला स्पेशल मिळता असाच विचारणार आधी 🙂 जानेवारीत गुजरात म्हणजे काइट फेस्टिवल..Vibrant Gujarat ..Have fun

  • सुहास
   खाण्याची आवड तर अगदी ’दिलसे” आहे. म्हणुनच कुठेही गेलं तरी काही तरी नविन शोधायची इच्छा असते..

 2. हुरडा पार्टीबद्दल खूप वाचलं आहे, ऐकलं आहे पण अजुन हुरडा पार्टीचा योग नाही आला. प्लॅन करायला हवा त्या शिवाय नाही होणार. पाहु कधी जमतयं.

  • हुरडा पार्टी हा कन्सेप्ट विदर्भात आहे. गुजराथ मधे चक्क बाजारीकरण करुन ठेवलंय. अर्थात गुजराथ्यांचं धंदा विषयक ज्ञान पहाता, ते कशातुनही बिझिनेस निर्माण करु शकतिल यामधे काहीच संशय नाही.

 3. आनंद पत्रे says:

  नाव खुप ऐकलयं पण आज पर्यंत हुरडा नाही चाखला 😦
  एकदा बघायलाचं हवा…

  • विदर्भात गेलात तर जास्त बरं.. चंद्रपुर साईडला अजुनही जुन्याच पध्दती टिकुन आहेत बऱ्याच ठिकाणी..

 4. tejas says:

  Kharay aahe mahendraji, mi sadhya Surat madhyech aahe. Aani bajarikaran huradyache khupach zale aahe. ( Ithe tyala Pokh mhanataat, aani to khayala Mumabi aani purn Gujarat varun lok yetat.)

  • तेजस
   आमच्या लहानपणी शेतावर जाउन हुरडा खाणं म्हणजे एक फॅमिली फंक्शन असायचं. घरातले सगळे जण शेतावर बैलगाडीतुन जायचे. साधारण ५ किमी दुर होतं सगळ्यात जवळचं शेत. बैलगाडीत गवत, त्यावर चादर अंथरुन जरी बसलो तरी “बुड” दुखायचं शेतावर पोहोचे पर्यंत. तिथे गेल्यावर तिन दगडाची चुल मांडून भाकरी, भरित इतयादी करणे व्हायचे.. ईट वॉज फन… 🙂 सोबतच हुरडा, हरबरा, शेंगा वगैरे पण भाजुन खायचा… मजा यायची..

   हल्ली शेतावर जाउन दारु प्यायची, अन सोबत चखना म्हणुन हुर्डा खायचा अशी पध्दत झाली आहे. जुन्या कन्सेप्ट एकदम बदलल्या आहेत हल्ली.. वाईट वाटतं.. पुर्वी प्रमाणे हा फॅमिली इव्हेंट राहिलेला नाही आजकाल 😦

   • Namdeo Mali says:

    ” कृषी”चं “पर्यटन ” झाल्यावर दुसरं काय होणार

 5. Rohan says:

  लहानपणी बोर्डी बाजुला जायचो तेंव्हा हुरडा मिळायचा. आता बरीच वर्षे झाली खाऊन. पार्टी करायला तुझ्याकडेच येतो काय… घेउन आला आहेस ना थोड़ा.. हेहे …

  बाकी तो ब्रिज मस्त आहे रे. खरे आहे तुझे म्हणणे. वाहतुकीसाठी बंद करून तो हेरीटेज म्हणुन मस्त साईट बनवली पाहिजे.

  • अरे ये ना मग.. पण तुला यायला तर बराच वेळ असेल नां? आल्यावर आपण जाउ हवं तर सुरतला. उबाळू आणि हुरडा खायला..

   • rohan says:

    होय नक्कीच जाउया.. ऑन द वे ‘वापी’ला एक ‘डेरील्यांड रेसोर्ट महाराजा लस्सी’ म्हणुन जबरी लस्सीवाला आहे तिकडे लस्सी मारुया… 😀 हेहे ..

 6. “लहानपणीचे सगळे उद्योग आठवले..का ते माहिती नाही पण डॊळ्यात पाणि तरळले.. असो.. धुराने असेल अशी मनाची समजुत करुन घेतली.” हे अगदी समजू शकतो. माझे डोळेतर वाचूनच पाणावले. (आणि मीही ते थंडीने पाणावले असतील अशी समजूत घालतोय माझी)

  • असं होतं बरेचदा.. एकदम सेंटी होऊन जातो मी. माझ्या स्बभावातला हा एक विक पॉइंट आहे. 🙂

 7. madhuri says:

  Jan madhye Indiat aslo ki Awarjuj jato hurada khayla shetat…ti maja nyarich
  pun wade nahi khat hurada, chatni, gul peru asach faral asto

  • माधुरी
   आजकाल इथे असुनही कुठे जाणं होत नाही. मुलींच्या परिक्षा- क्लासेस मुळे गेल्या तिन वर्षात कुठेच जाउ शकलो नाही.

 8. Dinesh says:

  Tumachi hurdyachi aathavan aikun company tlya eka maitrainine tichya shetat dileli hurda party aathavali. Ticya Aaine sarvansathi gharun dhapate, chatani, gul, pulav aane gulab jamun swatachya hatane karun aanle hote. Ti aathavan jagi houn khup senti zaloy… (hurda parila mi, mazi bayko v 4 varshanchi mulgi sarv jan hoto).

  • दिनेश
   बऱ्याच गोष्टी ह्या अगदी मनाच्या खुप जवळ असतात, पण फक्त आपल्याला माहिती नसतं.. कधी तरी त्याची जाणिव होते.. अशाच एखाद्या प्रसंगातुन! 🙂

 9. Dinesh says:

  Aajcha blog lihla naahi ka ajun? Chaan lihata tyamule vaat baghat asto.

 10. bhaanasa says:

  तू पण ना खूप लकी आहेस बघ. सहीच रे! मला हुरडा खाऊन किती वर्षे लोटली तेही आता आठवत नाही. आणि हे वडे तर कसले जबरी लागतील ना……तोंडाला पाणी सुटले. पण इथे कसे बरे करावे आत्ता?:(

  • खरंच अप्रतीम चव असते. किंचीत कोळशाची भाजलेली, धुरकट चव.. मस्त लागते एकदम.. वांग्याचं भरीत केल्यावर त्या मधे एक नि्खारा ठेवुन त्यावर थोडं तुप घालुन झाकुन ठेवलं की कशी मस्त चव लागते नां.. अगदी तश्शीच…
   हिवाळ्यात तुला यावं लागेल इकडे.. फक्त १५ दिवस असतो सिझन असं म्हणतात..

 11. हर्षित says:

  ” लहानपणीचे सगळे उद्योग आठवले..का ते माहिती नाही पण डॊळ्यात पाणी तरळले.. असो.. धुराने असेल अशी मनाची समजूत करुन घेतली.. ”
  महेंद्र , तुमचा ब्लॉग मी खूप दिवसांपासून वाचतो आहे….पण काही कुठल्याच पोष्ट वर प्रतिक्रिया दिली नाही…पण वरच वाक्य एकदम काळजाला भिडले …कदाचीत माझ्या हि डोळ्यात पाणी तरळले आहे…..

  • हर्षित,
   ब्लॉग वर ्स्वागत. आवर्जून दिलेल्या अभिप्रायासाठी मनःपूर्वक आभार.
   आम्ही वरोड्याला ( चंद्रपूर जवळचं ) गेलो की शेतावर हुरडा खाण्यासाठी हमखास जायचो. तो पण एक खास कार्यक्रम असायचं. आमचं शेत गावापासून फक्त पाच किमी अंतरावर होतं. तिथे जायला बैलगाडीने प्रवास करावा लागायचा. हाडं खिळखीळी व्हायची, पण मजा असायची. आमच्याकडे रेंगी नावाची एक गाडी असते, त्या मधे खाली बसायला खाली गवत घालून वर चादर घालून बसायला जागा केली असायची. पण बैलगाडीच्या जू वर ( म्हणजे समोरच्याभागात, जिथे गाडीचालवणारा बसतो तिथे बसून जायलाच खूप मजा यायची. 🙂 असो,तुझ्या या प्रतिक्रियेमुळे आज पुन्हा हाच लेख वाचला आणि बालपणात डोकावून आलो. धन्यवाद.

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s