हे असं भलतं सलतं डिस्कस करणं तर दुरच, पण इथे आपल्या समाजात यावर बोलणं पण वाईट समजलं जातं, तरी पण आज यावर काहीतरी लिहिण्याची हिंम्मत करतोय. खरं तर हा विषय आपल्या समाजात अजूनही टॅबो या सदरातच मोडतो.
परवाचीच गोष्ट आहे, फोर्ट ला फाउंटन आय एन एस (आंग्रे) म्हणजे इंडियन नेव्ही मधे काही कामासाठी जाणं झालं. एशियाटीकच्या उजव्या बाजुच्या गल्लीत हे ऑफीस आहे. काम आटोपून बाहेर निघे पर्यंत ४ वाजले . आता ऑफीसला जाणं शक्य नव्हतं, म्हणून सहज टंगळ मंगळ करीत फाउंटनच्या शेजारी फिरत होतो. लहान लहान दुकानं रस्त्यावरची.. मला बघायला खूप आवडतात. इथे कधी काय मिळेल ते सांगता येत नाही.
नुकतंच हरेक्रिष्णजींच्या ब्लॉग वर त्यांना मिळालेल्या सुंदर लेखांच्या पुस्तका बद्दल त्यांनी लिहिल्या मुळे माझे पण पाय फुटपाथवरच्या जुन्या पुस्तकांच्या दुकाना कडे कधी वळले तेच समजले नाही, म्हंटलं की आपलं लक चांगलं असेल तर आपल्यालाही एखादं चांगलं पुस्तक मिळेल.. त्या पुस्तकाच्या दुकानाकडे जाणार, तेवढ्यात एकदम शेजारीच असलेल्या दुसऱ्या एका दुकानाकडे लक्षं गेलं.
रंगीबेरंगी चित्र पाहिली की आपसूकच पाय थांबत होते..त्यावर अतिशय आकर्षक पणे रचुन ठेवलेल्या रंगिबेरंगी बॉक्सेसकडे नजर गेली. मानवी स्वभावानुसार , पाउलं नकळतच त्या दुकानाशी थांबली.. नीट पाहिलं तर तिथे त्या बॉक्सेस वरचे रंगीबेरंगी फोटॊ सेक्स टॉइज चे होते.अतिशय आकर्षक!! पाहिले, आणि लक्षात आलं की आपण कुठे तरी भलत्याच ठिकाणी थांबलोय ते! आणि चपापून एकदम पुढे सरकलो. उगीच आजूबाजूला पाहिलं, कोणी ओळखीच्या माणसाने तर नाहीं ना पाहिले आपल्याला इथे ?? आणि जर पाहिलेलं असेल तर आपल्याबद्दल काय समज करुन घेतला असेल?? असा विचार आधी मनात आला. थोडं पुढे गेलो तर तो दुकानदार मागे मागे आला, आणि हळूच पुटपुटला , सब कुच मिलेंगा इधर, सिडी,xxxxके अलावा ‘डॉल’ भी मिलेंगी. त्याच्याकडे दुर्लक्ष करुन पुढे निघालो, पण मनात विचार आला , इतक्या सहजपणे हे सगळं असं उघड्यावर विकलं जातंय?ज्या सहजतेने तो माणुस मला अप्रोच झाला , ते बघून मी तर आवाकच झालो, आणि असं वाटलं , की ह्याच सहजतेने तो हेच प्रॉडक्ट्स १५-१६ वर्षाच्या मुलांना पण दाखवत/विकत असेल?? आणि नुसत्या कल्पनेनेच अंगावर काटा आला.. जग किती बदलतंय?
एक बातमी वाचली होती,२००७ मधली गोष्ट आहे ही.. एका मेडिकल कंपनीने व्हाय्ब्रो रिंग आणली होती मार्केट मधे आणि ती एक मेडीकल इन्स्टृमेंट म्हणून मध्य प्रदेशात भोपाळ मधे विकली जात होती.नंतर मग कोणीतरी त्या बद्दल कम्प्लेंट केल्यावर ती विक्री बंद झाली . भारता मधे सेक्स टॉइज विकणं हा कायद्याने गुन्हा आहे, आणि तरी पण इतक्या ओपनली कायद्याची पायमल्ली कशी केली जाउ शकते? आणि हे थांबवायला पंतप्रधानांना हस्तक्षेप करावा लागतो? एक मंत्री अशा कामात लिप्त असू शकतो?? असे कित्येक प्रश्न आहेत..कधी कधी तर विचार करून वेड लागायची पाळी येते. कठीण आहे..
कालच पुन्हा एक बातमी, याच विषयाच्या संदर्भात वाचली- टाइम्स ऑफ इंडीया मधे . लास व्हेगास येथे ऍडल्ट एंटरटेनमेंट एक्स्पो मधे एक रोबोट गर्ल विकण्यात आली – अगदी ऍस्ट्रोनॉमस किमतीला. ती फक्त व्हॅक्युम करु शकत नाही आणि स्वयंपाक करु शकत नाही.. बाकी सगळं(?) करु शकते अशी जाहिरात केली गेली या रोबोट गर्ल ची. कालच्या टाइम्स मधे तुम्ही पण यावर वाचलं असेलंच. ती संपुर्ण पणे प्रोग्रामेबल आहे. तुम्ही तुमच्या आवडी फिड केल्या, की ती पण त्याच आवडी निवडी ऍडॉप्ट करेल. तुम्हाला जे आवडेल तेच तिला पण आवडेल, आणि तुमच्याशी ती त्याच म्हणजे तुमच्या आवडीच्या विषयावर गप्पा मारु शकेल.इंटरनेटशी ती कनेक्टेड राहिल,ऍटोमॅटीक सॉफ्ट वेअर अपडेट साठी.. तसेच ती तुम्हाला इमेल पण पाठवू शकेल . माणसाची कल्पनाशक्ती कुठपर्यंत जाईल हेच सांगता येत नाही.
सेक्स टॉइजवर बंदी असावी की नाही हा पुर्णपणे वेगळा प्रश्न आहे. काही एक्सपर्ट्स चं असंही म्हणणं आहे, की अशा प्रकारचे टॉइज सहज उपलब्ध करून दिल्यास त्या अनुषंगाने होणारे क्राइम्स कमी होतील, एड्स वगैरे चे प्रमाण कमी होईल, तर काही एक्सपर्ट्स असंही म्हणतात, की हे असे प्रकार मानसिक आजाराला आमंत्रण देणारे पण ठरु शकतात, स्त्री ,पुरुष दोघेही मानसिक दृष्ट्य़ा एकलकोंडे बनु शकतात.
जरी फॉर द सेक ऑफ डिस्कशन आपण असं जरी समजलो की याचा खूप फायदा आहे, तरी पण आजच्या परिस्थितीत या गोष्टींची इतक्या सहजपणे उपलब्धता नसावी असे मला वाटते. पुढच्या पिढीला या अशा जोमाने फोफावणाऱ्या या काळसर्पाच्या तावडीतून कसे सुखरुप ठेवायचे हा पालकांच्या दृष्टीने एक मोठ्ठा प्रश्नंच आहे. मुलं अशा गोष्टींना अतिशय सहजपणे बळी पडू शकतात….म्हणून जास्त काळजी वाटते .
ऍव्हलीन टॉफलरच्या “फ्युचर शॉक” मधे यावर काहीच लिहिलें नाही… मला वाट्तं विसरला असावा तो… 🙂
महेंद्रजी आपलं म्हणणं पटतंय, जरी या सेक्स टोंयस चे चांगले (???) फायदे असण्याचा काही विचारवंत पुरस्कार करीत असले तरी ह्याचा दूरगामी वाईटच परिणाम होईल, आणि ते इतक्या खुल्या पद्धतीने विकले जातायत ते वाचून आश्चर्यच वाटतंय. माणसाचे डोके हे फारच सुपीक असल्या कारणाने अशे बरेच प्रकार बघायला मिळतील आणि मला पूर्ण खात्री आहे कि लवकरच भारतात लास-वेगास किंवा amsterdam तयार होण्यास वेळ लागणार नाही .. ह्या बाबतीत आपल्या निवडून दिलेल्या (मला खरच पटत नाही आपण निवडून देतो ते!!) प्रतिनिधींनी लक्ष घातले पाहिजे ..
हे पोस्ट मी कालच लिहुन ठेवलं होतं, पण पब्लिश करायचं की नाही हेच ठरत नव्हतं. शेवटी आता पब्लिश केलंय..
खरं बोलतो आहेस … असं भलतं सलतं डिस्कस करणं तर दुरच, पण आपल्या समाजात यावर बोलणं पण वाईट समजलं जातं.
आम्ही ‘टिन एजर्स’ होतो तेंव्हा हे असे काही ओपन्ली मिळत नव्हते. कधी फारसे ऐकले सुद्धा नव्हते ह्याबद्दल. मला तुझे म्हणणे पटते आहे. लहान मुलांना ह्या पासून दूर कसे ठेवायचे.. हा नजीकच्या भावी काळातला मोठा प्रश्न आहे..
मला पण खरं वाटलं नसतं कोणी सांगितलं असतं तर!!! पण खरंय हे . अगदी १०० ट्क्के!!
मी पण हे नोटीस केलाय..त्याहून म्हणेन की आमच्या जुन्या लोअर परेल च्या ऑफीसला असताना खूप तिथल्या इतर ऑफीसच्या फ्रेन्ड्सच्या हाइ-फंडू (?) अश्या शौकीबद्दल माहीत झाला, आणि हे इतक्या सहजतेने मिळत आहेत की काय सांगू..भावी पिढीला कशा कशा पासून दूर ठेवायचा हाच आता मोठा प्रश्न आहे.
तोच खरा मुद्दा आहे.. पण मुलांवर लहानपणापासुन केलेल केलेल संस्कार नक्कीच फायदेशिर ठरतिल. तसेच शाळांमधुन पण अवेअरनेस वाढवला गेला पाहिजे..
काकांच्या ब्लॉगवर पोस्टचे हे हेडिंग वाचून मीही काही काळ अवाक झालो थोडावेळ
पोस्ट पूर्ण वाचल्यावर काय म्हणायचे आहे ते लक्षात आले
अशा गोष्टी सहजा सहज मिळू लागल्यातर त्याचे दुष्परिणाम नक्की आहेत परंतु याला आळा घालण्यासाठी अशा वस्तू परवानगी नसताना विकणाऱ्या दुकानांबद्दल आपण तक्रार केली पाहिजे असे मलावाटते
सगळे डिपार्ट्मेंट्स यांच्या पे रोल वर असतात. काहीही ऍक्शन घेतली जात नाही. कार्पोरेशनच्या गाड्या आल्या की हे लोकं पळुन जातात, नंतर मग पुन्हा येउन बसतात.
एका ‘न बोलण्याच्या’ विषयाला तुम्ही हात घातलात.
ऍमस्टरडॅमच्या ‘रेड लाईट डिस्ट्रिक्ट’ची वॉकिंग टूर’ घेताना या विषयावर एक खूप वेगळं मत ऐकायला मिळालं. विचार करण्यासारखं नक्कीच आहे.
ऍमस्टरडॅममध्ये ही दुकानं कायदेशीररित्या, उघड उघड आहेत. तिथे वेश्याव्यवसाय अवैध नाही. यामागचं लॉजिक असं आहे, की व्यवसाय वैध आहे तोवर त्यामध्ये पिळवणूकीची शक्यता कमी आहे. हेच जर उद्या अवैध ठरवलं, थांबणार तर नाहीच, उलट तर चोरीछुपे चालेल – आरोग्याचे आणि कायद्याचे नवे प्रश्न उभे राहतील. दडपून टाकलेली लैंगिकता विकृत स्वरूपात बाहेर पाडते, आणि लोकांना दांभिक बनवते.
लहान मुलांना या सगळ्यापासून किती आणि कसं दूर ठेवायचं हा वेगळा प्रश्न. ए एस नील सारखे शिक्षणतज्ञ तर म्हणतात की मुलांना या सगळ्या गोष्टींची माहिती होऊ दे – अन्य गोष्टींमधल्या कुतुहलासारखंच हे ही कुतुहल शमेल आणि ती यामध्ये अडकून राहणार नाहीत.
(मला स्वतःला हे पचणं फार अवघड आहे, पण आपल्या समाजात दांभिकता फार मोठ्या प्रमाणावर आहे हे सत्य तर नाकारता येत नाही.)
मला पण नाही पटत.. जेंव्हा वेळ येते, तेंव्हा सगळं आपोआप येतं.. आतापासुन माहिती करुन द्यायची काहिच गरज नाही. आणि जर माहिती करुन द्यायचीच असेल तर ती तज्ञांमर्फत करुन द्यावी.. जसे मध्यंतरी शाळांमधुन सेक्स एज्युकेशन सुरु करावं कां? यावर चर्चा सुरु होती , पण काहीच ठरलं नाही पुढे..
अशा विषयाला हात घातला म्हणून अभिनंदन! ह्या गोष्टीवर सरसकट बंदी घालणे हा उपाय आहे असे मला तरी वाटत नाही. गुजरात मध्ये दारू बंदी आहे. पण म्हणून काय तेथे बीअर वगैरे मिळत नाही असे थोडीच आहे? बंदी आपण जरूर घालू हो, पण विकृत मनाचा कारखाना बंद पाडणे जास्ती महत्त्वाचे. बाकी लैंगिक शिक्षण शाळेत देण्याबाबत आमच्या मुलांच्या शाळेत चांगलीच प्रगती आहे. त्यांनी पाचवी पासूनच लैंगिक शिक्षण सुरु केले. आणि त्यामुळे आम्हाला सुद्धा जास्त बाऊ न करता ह्या विषयावर मुलांशी मोकळी चर्चा करता आली. माझे असे मत आहे कि जर मुलांना आपल्याकडूनच ह्या गोष्टींची माहिती दिली तर त्यांची वाह्यात उत्सुकता कमी होते. “ही गोष्ट तू करू नकोस” असे सांगण्या पेक्षा “अमुक अमुक गोष्ट केली तर अमुक अमुक फायदे आणि अमुक अमुक तोटे” होतात असे नि:पक्षपणे सांगितल्यावर जास्त फायदा होतो असे आम्ही पहिले.
माझ्या १० वर्षाच्या अमेरिकन वास्तव्यात असे पहिले की अमेरिकेमध्ये अशा गोष्टी सर्रास मिळतात पण तेथे नियम मात्र पाळले जातात. १८ वर्ष खालील मुलांना साधी सिगारेट सुध्धा घेता येत नाही. (तरीही काही दिवटे मिळवत असतीलच म्हणा) पण सामान्य सुसंस्कृत (अमेरिकन Standard ने ) मुले नाही अशा गोष्टींच्या आहारी जात.
खुप डिस्टर्ब झालो होतो मी. सुरुवातीला काही दिवस तर मुंबई मिररचं सेक्स प्रश्नांचं पान मी काढुन ठेवत असे. मुलींच्या हाती लागु नये म्हणुन.. पण हल्ली बंद केलंय..
मुलांना सांगण्याच्या विरोधात मी नाही.. फक्त टेक्निकली करेक्ट माहीतीच द्यावी. असे विअर्ड गेम्स ची माहीती देउन काय फायदा??
आश्चर्यकारक आहे हे, मला नव्हतं वाटलं की भारतात इतक्या खुलेआम मिळते म्हणुन…
अगदी फोर्टच्या फुटपाथवर.. ओपनली…. !!
वखवख वाढवाणारी कोणतीही गोष्ट वाईटच ..
खरंय तुमचं.. पण या रोगावर काय औषध??
लैंगिक ससे, लैंगिक बगळे, लैंगिक बोइंगविमान, लैंगिक आकाशपाळणे वगैरे sex toys असल्यास त्यांच्याविषयी आपल्याला कल्पना नाही. पण ज़र्मन महिलांमधलं लैंगिक अज्ञान दूर करायला एका बाईंनी १९५० च्या सुमारास जनजागरणाची मोहीम सुरू केली, आणि लैंगिक शिक्षण देणारी मासिके, उपकरणे वगैरे तयार करून आणि विकून खूप पैसा मिळवला. बाईचं नाव आठवत नाही. पण १५-१६ वर्षांपूर्वी तिला मृत्युनंतर बी बी सी आणि लंडन टाइम्समधे श्रद्धांजली देण्यात आली होती. तिचे समर्थक म्हणतात की त्या क्षेत्रात काम (no pun intended) आवश्यक होतं. तिचे टीकाकार म्हणतात की लैंगिक शिक्षणाच्या कार्याच्या नावावर बाईनी शिक्षण वगैरे न घडवता भरपूर पैसा कमावला.
जोसेफाइन बटलर नावाच्या स्त्रीनी १८८० च्या सुमारास बायकोपासून दूर असलेले ब्रिटिश सैनिक किती प्रमाणात वेश्यागमन करत आणि त्यांच्यात लैंगिक रोगांचा किती भयानक प्रसार होता, यावर अभ्यास केला. अधिकार्यांनी तिला याबाबत लोकांना सल्ला देण्यासाठी परवानगी दिली. Eminent Victorians या नावाच्या पुस्तकात श्री ए एन विल्सन यांनी या बाईवर छान प्रकरण लिहिलं आहे. ते सबंध पुस्तकच वाचनीय आहे. शार्लट ब्रॉण्टे आणि जॉन हेन्रि न्यूमन यांच्यावर त्या पुस्तकात सुंदर लेख आहेत. त्याच नावाचं लिटन स्ट्रॅचीचं (Lytton Strachey) खूप प्रसिद्ध पुस्तक आहे. पण तो भंपक होता आणि ते पुस्तक नको तितकं गाज़लं, असं माझं मत आहे. (http://www.enotes.com/eminent-victorians-n-wilson-salem/eminent-victorians)
– डी एन
प्रतिक्रियेकरता आभार. तुम्ही दिलेली लिंक पहातो. माझं वाचन फारसं नाही. मी फक्त नियतकालीकांच्याच फेऱ्या अडकलेलो आहे हल्ली.
ते एक्सपर्ट्सचं सेक्स टॉईज बद्दलचं समर्थन तद्दन भंपक आहे. पूर्वी वेश्याव्यसायाबद्दल असंच म्हटलं जायचं – ’त्या’ आहेत म्हणून समाजात इतर बायका सुरक्षित आहेत वगैरे वगैरे, पण आता ’त्या’ही आहेत अन् इतर बायकाच काय लहान मुली नि वृद्ध स्त्रियाही सुरक्षित नाहीत. एकूणच विज्ञानाची सेक्स टॉईजच्या दिशेने होणारी प्रगती, समाजासाठी अधोगती आणेल, असं वाटतंय.
’इतर’ गोष्टी जाऊ देत पण जर ही ’रोबोट गर्ल’ जर आवडेल असंच गुडी गुडी बोलणार असेल, बायको किंवा प्रेयसी सारखं कधीच भांडणार नसेल, रूसणार नसेल, तर पुरूष काही महिने तिला वापरतील पण नंतर त्यांना त्याच्या हाडामासाच्या पार्टनरची नक्कीच आठवण होईल. हं! अल्पवयीन मुलांसाठी मात्र हा ’खतरा’ आहे.
अशा गोष्टींची इतकी जाहिरात का केली जाते ? अट्रॅक्शन वाढवायला..
मी स्वत: मराठी विज्ञान परिषदेमधे सादर केलेल्या सी.डी.च्या हिंदी भाषांतरीत सी.डी. साठी आवाज दिला आहे. या छोट्याशा चित्रफितीमधे मुलगी वयात येताना आणि मुलगा वयात येताना यावर सुरेख प्रसंग बेतलेले होते. आजही या विषयांवर आई-वडील आणि मुलं मोकळेपणी चर्चा करताना दिसत नाहीत. ही चर्चा घडवून आणायची असेल, तर शाळेमधे मुलांना व मुलींना लैंगीक शिक्षणाची माहिती देताना त्यांच्या पालकांनाही बोलावलं जावं, असं मला वाटतं.
काही काही गोष्टींचा बाऊ केला जातो, त्यामुळे मुलांची उत्सुकता वाढीस लागते आणि नको ते नको त्या वयात करायला मुलं धजावतात. ’एक धाडस’ या पलिकडे ही भावना असत नाही पण एकदा आवडलं की पुन्हा ते करून पहाण्याची चटक लागते. परिणामी समाजमूल्यांचं आणि नैतिकतेचं अध:पतन.
सहमत आहे. मी एक्झॅक्टली हेच म्हणु इच्छीतो. मला तर वाटतं की यावरचा लेख तुम्ही जास्त छान लिहिला असता..
वेल, मुली, स्त्रिया या विषयावर उघडपणे चर्चा करताना दिसत नाहीयेत. पण तुम्ही म्हणता, ते खरं आहे. केवळ आकर्षण आणि उत्सुकता निर्माण व्हावी म्हणून या गोष्टींची जाहिरात केली जाते. केवळ गंमत किंवा तात्पुरता उपाय म्हणून ट्राय केलेली गोष्ट आपल्या आयुष्याचा सत्यानाश करू शकते आणि त्या वस्तूच्या वेष्टनावर वैधानिक इशारा इतक्या बारीक अक्षरांत लिहिलेला असतो की डोळ्यावरची धुंदी उतरल्यावरही वाचता न यावा.
स्त्री आणि पुरूष यांच्या परस्परांशी वागताना, बोलताना काय मर्यादा असाव्यात व नसाव्यात यावर एक लेख होऊन जाऊ दे नं!
यावर मी अजुन् बरंच वाचलंय लिहिण्यापुर्वी. पण कुठे थांबायचं याची मर्यादा असते, त्या मुळे लिहिलं नाही.. तो इशारा कोणी वाचु नये म्हणुनच असा लिहिलेला असतो. रेडिओवरच्या जाहिराती आठवतात?? शेअर्सच्या म्युच्युअल फंडस च्या.. शेवटचं वाक्य “प्रॉफिट्स आर सबजेक्ट टू मार्केट रिस्क” हे इतक्या फास्ट म्हंटलं जातं की तुम्हाला काहीच समजत नाही!
इथे अशी खेळणी विक्रिस आली आहेत,तर अमेरिकेत थोड्या थोड्या अंतरावर यांची राजरोस उद्याने आहेत आणि त्याची महाजालकावर जाहिरात करून सावजाना व्यवस्थित जाळ्यात ओढले जाते.
यावर उपाय काय? उत्तम अध्यात्मिक संस्कार हेच होय असे मला वाटते.मुलांना वस्तुस्थितीपासून अजिबात अंधारात ठेवू नये.आईवडिलानी आपल्या पौगंडावस्थेतील मुलांना विश्वासात घेऊन त्यांच्याबरोबर मनमोकळेपणाने संवाद साधणे आवश्यक आहे. तरच पुढची पिढी या वावटळात तरून जाईल अन्यथा——-?
अहो, आपल्या कडे नुसता तो शब्द जरी मोठ्यांसमोर उच्चारला तर गोमुत्राने दहावेळा चुळ भरुन मग यज्ञोपवीत बदलायचं मगच शुध्दीकरण होईल … संवाद कसा काय साधणार? ते तर फारच अवघड आहे.. शाळातुन अवेअरनेस क्रिएट व्हायला हवा.
“Amsterdam/Vegas/Mumbai.. Choose your destination” अशा जाहिराती लवकरच येणार वाटतं.
असं होऊ शकेल कदाचीत…. !!! 😦
आपल्याकडे हे असले विषय बोलणे म्हणजे अजूनही काहीतरी फार मोठं पाप समजलं जातं हे खरं आहे. मी देखील त्या रोबोट गर्लची बातमी वाचली. Innovation च्या नावाखाली लोकांची डोकी कुठे कुठे चालतील. बाकी हल्लीच्या तरुण पिढीकडे इंटरनेट सारखं साधन आहे, पण त्याचा वापर ते कसा करतात ह्यावर सगळं अवलंबुन आहे. इंटरनेट मुळे Generation Gap देखील वाढतं चालली आहे. १० वर्षापूर्वी विशीत असलेली आमची पिढी आणि आत्ताची विशीत असलेली पिढी ह्यात फार अंतर आहे.
जनरेशन गॅप रहाणारच.. यात काहीच संशय नाही. फक्त ती फार वाढु नये एवढीच इच्छा..
आम्ही लहान होतो तेव्हा परिस्थिती इतकी वाईट नव्हती, असं या विषयावर हमखास बोलल्या ज़ातं. पण इंग्लंडमधे सातव्या दशकात (सिक्स्टीज़) ज़ो स्वैराचार बोकाळला होता, त्यापेक्षा आज़ स्थिती सुधारली आहे, असं वाटतं.
अमेरिकेतली सध्या विशीत असलेली पिढीही घटस्फोटाचे दुष्परिणाम भोगल्यामुळे लग्न टिकवण्याविषयी जास्त काळजी घेते, असं म्हणतात. ते खरं असेल तर चांगलंच आहे.
– डी एन
सहमत आहे.. इंग्लंड मधला स्वैराचार – त्याबद्दल तर मी काही वाचलेलं नाही, पण नंतर ९० च्या दशकात अतिरेकामुळे लोकांचा हिप्पीइझम कडे वळलेला कल, अगदी परीसिमेला पोहोचला होता ते मात्र लक्षात आहे.
kaam sutra aani khajurahochya deshaamadhye sex toys la virodh kaa vhaavaa? vhyayala naahee pahije.
tase paahile tar brain is the primary sex organ. So to have to use sex toys implies something is wrong in the first place in the relationship world. So it is a better idea to work on the relationship.
My 2 cents…
विरोध हा या साठी की मुलांची मन नको त्या गोष्टी कडे डायव्हर्ट होतात. दुसरं म्हणजे कायद्याने त्यावर बंदी आहे. मागल्या वेळेस जेंव्हा रिंग्ज इम्पोर्ट केल्या गेल्या, तेंव्हा पंतप्रधानांनी स्वतः त्यावर बंदी घातली होती. आणखीन एक कारण म्हणजे, ज्या तऱ्हेने या गोष्टींचं बाजारीकरणं केलं जातंय , ते पाहिलं की जरा विचित्र वाटतं..
रस्त्यावर एखाद्या सोळा वर्षाच्या मुलाला कॊणी तरी असे खेळणे घ्यायला प्रवृत्त करतोय.. .. नुसता विचारच मनात आला तरी अनिझी होतं!!
samajanyajoge aahe. parantu samajatil bhrashtachaar, gundaraaj hedekheel bhayanak vishay aahet. aapalya mulanni konaalaa laach detaa ghetaanaa paahile tar aaapan sarvach jan itake aswasth hot naahee. jee gosht dusarya maanasaalaa ijaa karoo shakate (bhrashtachar aani gundaraj) tithe aapala samaaj “immune” zala aahe. Sex Toys bhale vikruti aahe pan tithe kon konaalaa kaay ijaa karanaar?
Aso … majhe mhanane baryach janana ruchanar naahee tyamule thambato. vishayabaddal dhanyavad.
नाही.. हो .. तसं काही नाही. अगदी पुर्ण कॉमेंट लिहा. एक नविन ऍंगल मिळेल वाचायला. सगळ्या कॉमेंट्स एक्साराख्याच असल्यातर कसं चालेल?
तुमचं म्हणणं अगदी मान्य आहे. भ्रष्टाचार तर अगदी समाजमान्य झालाय. आणि आपण त्याला इम्युन झालोय..
मी इंग्लंड मधे सहाच महिने होतो. आम्ही २-३ मित्र रोज़ सकाळी टाइम्स-गार्डियन वगैरे विकत घ्यायचो. एकदा एका मित्रानी ‘Soccer News’ की असंच काहीसं घेतलं. उघडून पाहतो तर काय, आत कमरेवर काहीही न घालणार्या बायकांचे फोटो. आणि बातम्याही अर्थशून्य होत्या. कॅण्टोनाच्या गर्लफ़्रेण्डशी बेकहमनी लफ़डं केलं, मॅकेन्रोच्या बायकोशी लेंडलनी भानगड केली, किंवा वॉर्नच्या बायकोशी तेंडुलकरनी भानगड केली. म्हणून तो दुसरा खेळाडू वचपा काढणार. असे काल्पनिक उद्गार कोणाच्या तोंडी घालणे, हा अक्षम्य प्रकार आहे. मग आम्ही त्या दुकानाच्या ‘त्या’ दिशेनी मोहरा वळवला. तर एका कोपर्यात मासिकांत सताड उघड्या बायांचे फोटो होते. यातले काही फोटो त्यांच्या नवर्यानी पाठवले, अशी माहिती होती. खरी की खोटी, कोण सांगणार. पण बायका छान कॅमेर्याकडे पाहून मस्त हसत होत्या. आणि ही मासिकं ७-८ वर्षाचा मुलगाही चाळू शकला असता, अशी ठेवलेली होती. नंतर काही महिन्यानी अमेरिकेत एक कुलुपबन्द कपाटात मासिक पाहिलं. ते म्हणे मुलांपासून मुद्दाम दूर ठेवलेलं नग्न स्त्रीदेहाचे फोटो असलेलं मासिक होतं. ते विकत घेतलं, तर तसले फोटो तर आम्ही लंडनमधे फुकट चाळले होते. अमेरिका युरोपपेक्षा बरी आहे, आणि काहीतरी लाज़ बाळगून आहे. आमच्या कॉलेजात एक मित्र बरेचदा प्रॅक्टिकल बुक घेऊन असे, आणि दुसरा मित्र मग हसत असे. दुसर्यानी नन्तर खुलासा केला, की चिरंजीव प्रॅक्टिकल बुकात मासिकं ठेवतात. एकदा त्याला ३-४ ज़णांनी बाज़ूला ओढलं, तर खरंच प्रॅक्टिकलच्या वहीतून गुप्तधन बाहेर पडलं. रोज़ लोक दारू का पितात याप्रमाणे रोज़ नागडे फोटो पाहण्यात पैसा का घालवतात, हा प्रश्नच आहे.
१९७५ च्या सुमारास महाराष्ट्रात वाचनालयात एक भडक मासिक मिळे. नाव बहुतेक ‘श्री’. पण त्यात फोटो नसत, नुसताच उत्तान मज़कूर असे. जयवंत दळवी, पु भा भावे (‘व्याध’ कादंबरी), विजया राजाध्यक्ष यांच्याही अनेक कथांत कलेचा भाग शून्य आणि विकृती ठासून भरलेली, असा प्रकार आहे. माझ्या एका मित्राचे वडील वाचनालयातून ‘डेबोनायर’ आणत, आणि ते इतर पुस्तकांप्रमाणे मोकळं ठेवलं असे. ‘तुम्ही मराठी पोरं बावळट आहात’, हे त्यांचं मत होतं. ते सतत किशोरी आमोणकरची रागदारी ऐकत, जी आवड आम्हालाही लागली. पण त्यांच्या घरी येणारे सगळ्यात लहान लोक म्हणजे आम्ही १५-१५ वर्षांची मुलं; मुलगा दहावी पास होईपर्यंत ते ‘डेबोनायर’ (निदान उघडपणे) आणत नसत. ते तत्त्वज्ञानाची पुस्तकंही वाचत. आम्ही Debonair चाळायचो तशी ती पुस्तकंही चाळली, पण ती फारच तात्विक चर्चा होती, जी मला आज़ही आवडत नाही. त्यापेक्षा डेबोनायर चांगलं.
गौरीबाईंनी अॅमस्टरडॅमचा उल्लेख केला आहे. मी दुर्गाबाई भागवतांच्या पुस्तकात पॅरिसच्या वेश्यागृहांबद्दल वाचलं होतं. (मी वेश्येच्या पोटी जन्मले असते तर मलाही तो धंदा करावा लागला असता, असं बाई म्हणत.) त्यांच्या आरोग्याची सरकार काळजी घेतं, वगैरे मज़कूर होता. युरोपातही सगळ्याच वेश्या नशीबवान नसतात, पण अशा काही चांगल्या गोष्टी युरोपात आहेत. तसं असूनही एकूण गोरा माणूस स्वातंत्र्य आणि स्वैराचार यांच्यातली सीमारेषा विसरलेला आहे, आणि भारतमातेचीही तिकडेच वाटचाल सुरू आहे. मराठी पाऊल तर यात एकदम पुढे आहे.
– डी एन
जयवंत दळवी तर नेहेमीच स्फोटक लिहिण्यात वाकबार होते. त्यांचं सावित्री हे खुप गाजलं होतं.. अजुनही आठवते, मोठी माणसं त्यावर चर्चा करायची.. शेवट चुकला त्या नाटकाचा की नाही यावर!! चंद्रकांत खोतांचं उभयान्वयी अव्यय पण तेंव्हा खुप गाजलं होतं. एक निराळा प्रयोग यशस्वी झाला होता ते पुस्तक मी चोरुन वाचल्याचं मला आठवतं. लायब्ररीवाल्या काकांना सांगितलं की बाबांना हवंय म्हणुन मिळालं होतं..:)
आपल्या सविस्तर प्रतिक्रियेकरता मनःपुर्वक आभार. मी आता बाहेर जातोय साईटला, म्हणजे पुन्हा बराच वेळ ऑन लाइन नसेन.. 🙂
देवा,
हे जग पुनरूत्पादनावर आपले अस्तीत्व टीकवून आहे…
त्याच्या प्राथमीक प्रक्रीये मधेच जीवनाचा आनंद माननारी मंड्ळीं साठी ही साधने आहेत….
उदा: वाहने ही आपल्याला स्थलांतरा साठी बनली आहेत…
का ही वीक्रूत लोक त्यांच्या शर्यती लावतात …
थोड्क्यात… साधन आणी साध्य ह्यात ला फ़रक कळायला पाहीजे
का रे भौ, कुठे होतास इतके दिवस? काही फोन नाही, मेल नाही…. काय चाललंय़??
प्रतिक्रिया देता येत नाही…
पण मानवाचा केंद्राबिंधू त्यांच्या इच्छानुसार इकडे तिकडे सरकत आहे
त्यामुळे स्थिरता, विश्वास, नितीमत्ता आणि शालीनता यांचा अभाव जाणवत आहे..
गोंधळाची स्थिती…
असे प्रकार असूच नयेत…
अखिल
धन्यवाद..
The children in the countries where sex educaion is part of curriculum tend to be most highly sexed and prone to the maimum number of teenage pregrancies and sexual diseases. Secondly, I have always been amazed that teachers talk to students for hours about ‘sex education’. What is there to teach?
Here is a great article from London Sunday Times making fun of sex education, which should indeed be immediately stopped. (If a teacher had come to my class in 8th standard and told me how babies are born, I would have laughed at him. ‘Moron, every 11-12 year old child already knows what you are telling them.’)
“Now, kiddies, a quick sex lesson” :
http://www.timesonline.co.uk/tol/comment/columnists/india_knight/article4187488.ece
– dn
तुम्ही दिलेली लिंक वाचली.मला वाटतं की मुलांच्या सेक्स्युअली इतक्या लवकर ऍक्टीव्ह होण्याचा दोष सेक्स एजुकेशनवर टाकुन मोकळं होण्याचा प्रयत्न दिसतोय लेखकाचा.
पण माझ्या मते, स्लिप ओव्हर, किंवा डेटींग मुळे मुला- मुलींना एकत्र रहाण्याचा आणि एकांतात रहाण्याचा जास्त चान्स मिळतो , त्यामुळे टिन प्रेग्नंन्सी चं प्रमाण वाढलंय.
दुसरं म्हणजे इंटरनेट, आजकाल पालक मुलांना अगदी १०-१२ वर्षाचा असतांनाच इंटरनेट वर इ मेल अकाउंट उघडुन देणे, फेस बुक वर, ऑर्कुटवर जाउ देणे, ह्या गोष्टी कुल समजतात. माझ्या मते मुलांना या पासुन कमीत कमी १२ वी पर्यंत तरी दुरंच ठेवलं पाहिजे. अजिबात डायव्हर्शन नसावं अभ्यासापासुन. इंटरनेटवर आधी उघडलेला अकाउंट , नंतर लागलेली सर्फिंगची सवय, चॅटींग ची सवय.. या सगळ्या गोष्टी मला अजिबात पसंत नाहीत. अर्थात , तुम्ही मला कदाचीत व्हिक्टोरिअन इरा मधला म्हणाल, पण मी माझ्या मुलींना अगदी १८ ची पुर्ण होई पर्यंत , आणि इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेई पर्यंत दुर ठेवलं होतं या पासुन. आणि त्यामुळे काहीच अडलं नाही त्यांचं…. इतक्या लवकर इंटरनेटला मुलं एक्स्पोझ झाले की मग बऱ्याच अनवॉंटेड गोष्टी नजरेला पडतात. अगदी किड्स साईट्स वर पण अशा जाहिराती असतात.. इथे बघा… लिंक देतोय…http://twitpic.com/v1jv7
दुसरी गोष्ट भारतामधे तरी अजुन सेक्स्युअली इतकी ऍक्टीव्ह झालेली नाहीत मुलं – अर्थात मेट्रो सिटीज मधे असतिल कदाचीत पण बी आणी सी ग्रेड शहरात तर नक्कीच नाहीत , पण हे सुखाचे दिवस ( पालकांच्या दृष्टीने) फार दिवस टिकतील असे वाटत नाही..
भारतात अशा गोष्टींचे निष्कारण स्तोम माजवले जात आहे , का युरोपियन-अमेरिकन माणसे नाहीत आणि आम्ही फक्त तेवढेच सोज्ज्वळ सात्त्विक देवभक्त आहोत?ती काय जनावरे आहेत काय?
परदेशातील जॉब्स /पैसा/लाईफ स्टाईल /तंत्रद्न्यान सगळे हवे .पण त्यांचा वैचारिक मोकळेपणा मात्र नको………….आम्ही कुडमुडे/बंदिस्त आणि गुलाम…………..आपल्याच फालतू संस्कारांचे?
हा दुटप्पीपणा /ढोंगीपणा आहे. भारतात वेदिक काळापासून गणिका-वेश्या होत्या आणि वैदिक लोक विलासी होते,,,उगाच धर्म आणि संस्कृतीचे फुटके ढोलक बडवीत बसू नका कुणी……………………….
‘मुलांच्या सेक्स्युअली इतक्या लवकर ऍक्टीव्ह होण्याचा दोष सेक्स एजुकेशनवर टाकुन मोकळं होण्याचा प्रयत्न दिसतोय लेखकाचा.’ मला पूर्ण लेख आठवत नाही. मला आठवणारा मुद्दा हा, की कोणी मास्तर दर आठवड्यात किंवा महिन्यात एकदा तास – दोन तास नक्की काय मुलामुलींना शिक्षण देणार? त्या विषयावर पाच मिनिटांवर देण्यासारखी काही माहिती नाही, आणि ते ज्ञान मुलांना मित्रांकडून मिळतंच.
एकूण इंडिया नाईटचा तो लेख इंग्लंडमधल्या परिस्थितीवर आहे, आणि सगळे मुद्दे कोणाला पटणारही नाहीत. पण ‘हे घ्या २ मिनिटांत आणि तीन वाक्यात सेक्स एज्युकेशन’ हा त्या बाईचा प्रयत्न मला गमतीदार आणि मार्मिक वाटला.
– डी एन
अगदी खरंय:)
Lekh khoopach sundar ani dhadasi..
Legal illegal var control havach..
Pan baki sagala itka vyaktigat bhaag ahe ki apan tyavar moral watch nahi thevu shakat..
Asalya personal level chya goshtini desh rasatalala jato ase vaatat nahi..tyapeksha jast haani non education, unemployment, tobacco and alcohol addiction, malnutrition,corruption yane hot asate ani chalooch ahe..gutka rastyaat milato..deshi daruchi dukane,with methanol, gallogalli ahet..licensed ahet..unlicensed ahet..
बरेच विषय आहेत असे.. कधी तरी लिहीन त्यावर पण. 🙂
And just to add..sex toys easily available mhanoon dhakka basala na? Aho tumhala ani sarvanach mahit ahe ki tyaach footpaths var akkha stree deh hee titkyaach sahaj available asato..agadi 16 varshachya mulala dekhil..aani 16 varshachi mule te vikat ghetat suddhaa..
ते सगळं रात्री चालतं, हे चक्क दुपारी ४-३० वाजता होतं. आणि तो व्यवसाय तर आधी पासुन आहेच – जगातला एक सगळ्यात जुना व्यवसाय म्हणुन…
In this regard I remembered an episode of talk show by oprah. In this talk show there was a mother of a boy, who gave comdom to her son, and told, having sex is not good, but if you still want to have then use this ???
The girls mother was in dillema.
When a psycologist asked to these kids who were staying together from last 6 months that ,”How long you want to stay together ?”
Answer came, “It’s a long term relation”
“Means how many days, months or year ?”
Boy :- “another 6 months or a year”.
The girl was schocked. She said, “I thought long term means for all the time…. I need to rethink about the relation then.”
Another question, “If she gets pregnant, then ……. ?”
Boy :- “It’s her choice, if she want to grow the baby or abort”.
The girl is stunned now. And might be repainting about her relation with the boy.
These kids were of just 12-14 yrs.
I must say, the psychologist’s questions were an eye-opener.
I don’t have link now but may be found on internet…
Thanks for sharing good topic, as usual 🙂
ऑपरा चा तर मी पण फॅन आहे.तिचे सगळेच प्रोग्राम्स खुप छान असतात.. तिचा ऑडीअन्स पण खुप लाइव्हली असतो! पण आमच्या कडे फार कमी दाखवले जातात तिचे प्रोग्राम्स..
Ek goshta vicharat ghyayala havi ki apla hya kade bagnyacha drushtikon vainyanik ahe ka? Dusra mhanje samaja madhe hya goshti baddal maturity ahe ka?
Cheers
Nilesh Joglekar
निलेश
यात कसला वैज्ञानिक दृष्टीकोन? हा एक विअर्ड स्टेट ऑफ माईंडचा खेळ आहे झालं.. नविन काही तरी करुन पहाण्याची मानवी प्रवृत्ती.. त्याचा फायदा घेतात असली मंडळी. मी हे सगळे प्रकार पाहिले आहेत शिपवर.. सेलर्स वाइफ् म्हणायचे या अशा बाहुल्यांना.. !! असो..
Sarva Manyavar,
Aapala Desh Sadhu santancha Desh aahe. Ithe Dharma samskar faar pragalbh aahet. Pan aapan sarvanich vichar karayala hawa ki aapan kharokhar Dharma pramane wagato ka? Aapalya kadun kontyahi vayat kontihi chuk zali nahi kay? Aapan vikrut mhanato, bandi aanato tyach goshti vishayi mulkana aakarshan wadhat jate. Aani ekhadi gosht karu nako mhanale ki ti karun pahavi asa manavi swabhav aahe.
Mal sex toys vishayi ek sakaratmak gosht watate ti mhanaje ashya toys cha wapar aapalya jodidara pasun dur asanarya vyektila hou shakato ka? Tyacha tya vyektichya sharir aani manavar kay parinam honar aahe? Jar ase toys waparalyane Aids sarakha rog talu shakalo tar kay hoil? Mulana sex education dene sathi ashya toys waparalya tar tyacha tyanche manavar kay parinam hoil?
Ya asha sarv babi var vichar karun aapalye mat dyave hech changale.
Aani ase toys ajun fakta Mumbai, Pune puratech uplabdh aahet. Mag tyachya pekshani bhayanak prakar aaj itar thikani hot aahe te ka?
Fakat vichar karanya karita mi sangitale aahe agraha kahich nahi.
दिपक
ह्या विचाराचे पण लोक आहेतच.. ते लिहिलंय मी पोस्ट मधे.. 🙂
प्रतिक्रियेकरता आभार.
sex toys is important for humanlife.becouse the attraction for male or fimale body is unik. and simply agrasive
भारतात अशा गोष्टींचे निष्कारण स्तोम माजवले जात आहे , का युरोपियन-अमेरिकन माणसे नाहीत आणि आम्ही फक्त तेवढेच सोज्ज्वळ सात्त्विक देवभक्त आहोत?ती काय जनावरे आहेत काय?
परदेशातील जॉब्स /पैसा/लाईफ स्टाईल /तंत्रद्न्यान सगळे हवे .पण त्यांचा वैचारिक मोकळेपणा मात्र नको………….आम्ही कुडमुडे/बंदिस्त आणि गुलाम…………..आपल्याच फालतू संस्कारांचे?
हा दुटप्पीपणा /ढोंगीपणा आहे. भारतात वेदिक काळापासून गणिका-वेश्या होत्या आणि वैदिक लोक विलासी होते,,,उगाच धर्म आणि संस्कृतीचे फुटके ढोलक बडवीत बसू नका कुणी……………………….
किती चर्चा…से़क्स म्हंटलं की लोकं चर्चा करायला का होईना…जमतातच…
😀 खरं आहे… 🙂
एक उत्तम लेख आणि त्यावर इतकी उत्तम चर्चा .
नितीन
मनःपूर्वक आभार.
नवा शोध हा गरजेतून पुढे येत असतो आणी त्यांची सार्वजनिक उपयुक्तता काही कालावधीनंतर सिद्ध होत असते.जसे शौचालयासाठी कमोड .खरे तर ज्यांना पायावर बसता येत नाही त्यांच्यासाठी कमोड पुढे आले मात्र तो बहुपयोगी सिद्ध झाला आणी मुख्य कार्य शौचाचे ते ही व्यवस्थित जमतंय.तरीही ते सर्वच स्वीकारतील असे नाही मात्र त्यांची हवा झाली नाही अगदी तसेच या सेक्स बाहुल्या बहुपयोगी सिद्ध होणार नाहीच कारण तो अशाच लोकांची सोय म्हणून पुढे आलेला गरजेतला प्रकार आहें आणी तो फक्त गरजवंतच वापरू शकतो शिवाय त्यांची गरज इतरत्र पूर्ण होऊ लागली की तोही त्याला महत्व देणार नाही फक्त उत्सुकतेपोटी त्याला क्वचित महत्व दिले जाऊ शकते अन्यथा तो काही कमोड नाही यापलीकडे त्याला हवा देण्यात येऊ नये असे वाटते
Mi tar ase dekhil news paper madhe vachle ahi ki, mumbai madhil girls college madhil toilet chamber madhe, gajar, mule, etc vastu sapdalya. tyancha vapar sex toys mhanunach kela jat hota. magil saha varsha purvichi gosht. he prakar aplyakade ya purvihi ghadat nastil kashvarun. kuthlihi gosht paripurn naste. tichyat sadgun va durgun he astatach.