कळ्या मुठभर..

हलव्याचे दागीने

आज संक्रातीची पूर्व संध्या.  संक्रांत म्हंटलं की तीळ गुळाची पोळी, वर तुपाचा घट़्ट गोळा  .. आणि हलवा तर नक्कीच आठवतो .या दोन्ही गोष्टींशी काही नाजूक आठवणी निगडित आहेत. आज जर कुणाला विचारलं की हलवा कसा तयार करतात, तर माझी खात्री आहे की ९० ट्क्के  १५ ते २५ वर्ष या वयोगटातील लोकांना माहिती नसेल. कारण आजकाल  हलवा सरळ दुकानातून विकत आणला जातो, पण पुर्वी मात्र हलवा घरीच केला जायचा, आणि तयार करायचं  काम जवळपास डिसेंबरपासूनच सुरु व्हायचं.  हलवा जमणं म्हणजे सु्ग्रणपणाचं लक्षण !

मराठी कुटूंबात संक्रांत म्हणजे एक मोठा सण. लग्नानंतरची संक्रांत म्हणजे प्रत्येक मुलीच्या जीवनात फक्त एकदा येणारा दिवस. या दिवसा साठी जर घरी माहेरवाशीण येणार असेल तर मग बहुतेक आयांच्या तर अगदी अंगात आल्या प्रमाणेच व्हायचं. कारण संक्रांतीला घरी आलेल्या मुलीला हलव्याचे दागिने घालुन तिचे फोटॊ काढणे, किंवा घरातल्या बाळाचे दागीने घालुन लुट करणे – हे एक मोठं काम असायचं.मग त्यासाठी लागणारा निरनिराळ्या आकाराचा हलवा बनवला  जायचा. मोठ्या आकाराचा हलवा हवा असेल तर मग तो बहुतेक साबुदाण्याचा बनवला जायचा ( लवकर मोठा व्हावा म्हणून)

मी लहान असतांना आमची जॉइंट फॅमीली होती. आई , वडील, आजी आणि काका लोकं .. आम्ही सगळे एकत्रच रहायचॊ. संक्रात आली की आईची तयारी सुरु व्हायची . सगळ्य़ाची जेवणं झाली की मग दुपारी दोन च्या सुमारास, सगळं आवरून  हलवा करायला बसायची. मला खरंच तिच्या उत्साहाचं खरंच कौतुक वाटतं आज. इतकी सगळी कामं करुन नंतर पुन्हा हे करायला उत्साह टीकून रहायचा तिचा!!

एका शेगडीत दोन तिन निखारे घेउन त्यावर एक परात ठेवायची . त्या परातीमधे दोन एक मूठ तीळ घेउन त्यावर एक एक थेंब पाकाचा टाकायचा, अन ते हलवत रहायचं. मला तर नेहेमीच आपणही थोडं हाताने ते तीळ हलवून बघावे असे वाटायचे.  पण थोडा जवळ गेलो की आई ओरडायची.. अरे गधड्य़ा हात भाजेल नं.. की पटकन आपला हात मागे ओढून घ्यायचॊ. तिळाचा हलवा होतांना पहाणं म्हणजे गम्मत असायची. बरं हे काम एकाच दिवसात होत नव्हतं. थोडा वेळ केला की मग आई सगळं आवरून ठेवायची. बरेचदा हलवा किंचित काळसर झाला, की मग आईचा वैताग असायचा. मग पुन्हा हात स्वच्छ धुउन त्यावर एक दोन पुटं चढवायची दोन दोन थेंब टाकुन.. मला तर नेहेमी वाटत रहायचं, की मला चटका बसेल म्हणते, मग तिला का बसत नाही? बोटाने ते तीळ हलवत रहायचं अन पाकाचा एक एक थेंब तिथे टाकत त्या तीळाचा हलवा होतांना पहाणं मला खुप आवडायचं.  बरं हे निखारे जे असायचे शेगडीतले ते पण फार तर दोन किंवा तीन.. जास्त पण असले तर हाताला चटके बसणार, अन कमी असले तर हलवा जमणार नाही  अशी भिती असायची.

आईने ते आवरून ठेवलं की त्यातले ह्ळूच दोन तीन दाणे तोंडात टाकले की … बस्स !! अगदी स्वर्गीय आनंद!! हलवा पुर्ण झाला की  तो अगदी ताटामधे मोगऱ्याच्या कळ्या ठेवल्या सारखा दिसायचा..त्याला किती काटा आला?? हे के मोठं प्रश्न चिन्ह असायचं. मग एखाद्या वेळेस काटा नीट आला नाही की आई खूप वैतागायची.. एखाद्या लहान मुलाची संक्रातीला लुट असली की त्याच्या साठी पण दागिने बनवले जायचे.   हल्ली हे सगळे दागिने कुठल्याही दुकानात मिळतात. खाउवाले पाटणकर पुण्याचे प्रसिद्ध आहेत या साठी. आजही  कोणी हातावर हलवा घातला, की  आधी आईची आठवण येते.. शेगडी जवळ बसलेली.. हाताने परातीत ले तीळ हलवत बसलेली… 🙂

एका संक्रांतीला आम्ही माझ्या धाकट्या बहिणीकडे गेलो होतो – तॆंव्हा ती औरंगाबादला होती.. आमचं लग्न जवळपास एकदमच झालं फार तर चार पाच महिन्यांच्या अंतराने.. माझी सौ. आणि धाकटी बहीण मैत्रीणी – अगदी लहानपणापासूनच्या. त्यामुळे दोघींचं पण खूपच सख्य होतं- आणि आजही आहेच. वेळ प्रसंगी दोघी एकाच साईडने होऊन माझ्याशी भांडतात… 🙂

तर काय दोघींनी मि्ळून तिळगुळाच्या पोळ्या करायचा घाट घातला. दोघींची ही पहिलीच वेळ . तीळ गुळ तयार केला, कणीक पण भिजवली. पण काही केल्या पॊळी नीट जमत नव्हती. एक तर आतलं तीळ गुळाचं सा्रण नीट पसरत नव्हतं.  खूप मोठे काठ रहात होते, काठापर्यंत तीळ गुळ पोहचत नव्हता. दोघी पण जाम वैतागल्या होत्या. मी गम्मत पहात होतो. शेवटी स्वतः स्वयंपाकघरात जाउन बघितल तर लक्षात आलं की तीळ गुळ खुप घट़्ट झाला होता, अन ती कणीक त्या मानाने खूपच सॉफ्ट. म्हंटलं, तिळगुळ थोडा पातळ कर, कणकी एवढा , दोन्ही सारखेच घट़्ट असले की ते काठापर्यंत बरोबर पोहोचेल…. अन जेंव्हा दोन्ही एकसारखेच सॉफ्ट केले तेंव्हा खरंच माझ्या एक्स्पर्ट ऍड्व्हाइसने पोळ्या जमलया एकदाच्या..

अगदी खरं खरं सांगतोय. आज जवळपास ३६० कीमी ड्राइव्ह करुन आलोय . वलसाडला गेलो होतो त्यामुळे खूप झोप येतेय. हे पोस्ट इथेच तुम्हा सगळ्यांना संक्रांतीच्या शुभेच्छा देऊन संपवतो…थोडं तुटक वाटत असेल पोस्ट, उद्या सकाळी व्यवस्थित करीन.. तीळ गुळ घ्या गोड गोड बोला..

About महेंद्र

माझा ब्लॉग :- http://kayvatelte.com
This entry was posted in सण and tagged , , , , , . Bookmark the permalink.

44 Responses to कळ्या मुठभर..

 1. सचिन says:

  काका, मकर संक्राती च्या हार्दिक शुभेच्छा.

  तिळगुळ घ्या गोड गोड बोला.

  बाकी आईच्या हातच्या तीळाच्या वडया miss करणार उद्या.

 2. वाह मस्तच..मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा 🙂

 3. mandar joshi says:

  मागच्या रविवारीच तिळाची पोळी खाल्ली..
  पण त्याचा फोटो घेता नाही आला..
  असो.. तुम्हाला पण तीळ गुळ घ्या.. गोड गोड बोला.. 🙂

  • तुला कशाला रे फोटो ची गरज? फोटो पाहुन समाधान करुन घ्यायचं वय आमचं.. ( वजन वाढतं म्हणुन) तु तर अगदी बिन्ध्दास्त खायला हवं.. 🙂

 4. anukshre says:

  संक्रांतीच्या शुभेश्च्या!! आताच गुळ पोळ्या करत आहे. भोगी ची भाजी, भाकरी खाऊन झाली.

 5. rohan says:

  आमची लग्नानंतरची पहिली संक्रांत… 😀 ‘शमिका’चे फोटो आहेत मस्त असे हलव्याचे दागिने घालून .. मज्जा आलेली मागच्या वर्षी… 🙂

  आई – आजी हलवा बनवायची घरी पण मला प्रक्रिया नव्हती माहिती. म्हणजे कधी इतक्या खोलात जाउन पाहिली नव्हती. 😀

  संक्रांतीच्या शुभेच्छा … !!!

  • पहिला सण .. प्रतेकच सण म्हणजे मजा असते नुसती. ते फोटॊ नंतर पाहिले की खुप हसु येतं.. जसे डोहाळजेवणाचे फोटॊ.. नुसते जोकर सारखे येतात रे. त्या फुलांच्या माळा, फुलांचे दागीने घातलेले…
   हलवा बनवतांना पहातांना खुप मजा यायची. अरे माझं वय तेंव्हा ६-७ असेल.. तेंव्हाची गोष्ट आहे ही. परातीतले तिळ हलव्यात कन्व्हर्ट होतांना बघायला आवडायचं. मग मी तासन तास बघत बसायचो आई समोर!

 6. rohini gore says:

  खूपच छान लिहिले आहे!! तुम्हालाही संक्रांतीच्या अनेक शुभेच्छा.

 7. तुम्हाला आणी तुमच्या कुटुंबाला मकरसंक्रांतीच्या शुभेच्छा…
  ‘तिळगुळ (वर्च्युअल) घ्या – गोड बोला’

 8. किंबहुना काही तिशी पार केलेलेही आहेत ज्यांना हलवा कसा करायचा हे माहित नसतं 😉 … तुम्हालाही संक्रांतीच्या मन:पूर्वक शुभेच्छा !!!

 9. मोगऱ्याच्या कळ्या… वा कुठून सुचतात हो अशा उपमा? आम्हांला पण शिकवा की जरा.

  काही तुटक वाटत नाहीये पोस्ट… खूप गोड-गोड तोंड झालं वाचूनच… (बिचारी कोंबडी जिवानिशी जाणार परवा)….!!!

  तिळगूळ घ्या, गोड-गोड बोला (लिहा).

  • कोंबडी कशाला? कारल्याची आंध्रा स्टाइलने केलेली चिंच गुळ घालुन केलेली भाजी खाल्ली, तरी पण चांगली चव येईल तोंडाला.. 🙂

 10. Aparna says:

  काका पोस्ट खूपच छान झालीये….हलव्यासारखी. मी कधी पाहिला नाहीये हलवा करताना कारण घरी आई फ़क्त तिळगूळ (लाडू) करायची..मस्त टणकवाले दाताने काटकन मोडतानाच त्याची चव कळायची..या वर्षी तो योग पुन्हा आहे…:)
  तुम्हा सर्वांना संक्रातीच्या शुभेच्छा..उद्या पतंगांवर लिहाल असं वाटतंय…

 11. ravindra says:

  आपल्याला व आपल्या कुटुंबियांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा

 12. bhaanasa says:

  महेंद्र खरेच रे… अगदी मोग~याच्या कळ्याच जणू.:) मी लहान असताना खूप लुडबुड करायची आजी हलवा करू लागली की. आणि आजीला भिती कारटी बोटे-हात भाजून घेईल म्हणून…हेहे. तुम्हा सगळ्यांना मकर संक्रातीच्या अनेक शुभेच्छा!

  • मला ते पहात रहायला खुप आवडायचं.. पण नंतर आईने बंद केलं हलवा वगैरे करणं.. मकर संक्रांतीच्या शुभेच्छा..

 13. आनंद पत्रे says:

  मकर संक्रांतीच्या शुभेच्छा..

 14. Girish says:

  MBK, tilgul kha god bola.. patang mention nahi tumchya sankranti madhye!! me ahmedabadla hoto teva it was only kite festival..

  • गिरिश
   संक्रांतीच्या शुभेच्छा. अरे सुरतला गेलो होतो , तेंव्हा अजय सोबत पतंगाच्या दुकानात गेलो होतो. त्यावर खरं तर लिहायचं होतं, पण काल खुप थकल्यामुळे कंटाळा आला होता.. आणि पुन्हा असंही वाटलं की सगळेच लोक त्यावर लिहितील, म्हणुन पण लिहिलं नाही> पण आज लिहिन बहुतेक!!

 15. Dinesh says:

  Makar Sankrantichya hardik shubhechhya..

 16. मकर संक्रांतीच्या तुम्हाला व सर्व कुटुंबियांना हार्दिक शुभेच्छा!

 17. आमच्या घरी कधी हलवा केल्याचं पाहण्यात नाही. हलवा बाहेरूनच आणतात. त्यामुळे हलवा कसा बनतो हे आजच कळलं. पण गुळपोळी, तीळ-गुळाचे मिश्रण आणि तिळाचे लाडू मात्र बनायचे. संक्रांत झाली की पुढचे काही दिवस शाळेत खायला तिळाचे लाडू दप्तरातून घेऊन जायचो. तुम्हा सर्वांना मकर संक्रांतीच्या शुभेच्छा.

  • पुढल्या वर्षी संक्रांतीला “वाणं” वाटायला कोणी तरी तुमच्या आयुष्यात येवो हीच सदिच्छा..

 18. laxmi says:

  Makar Sankrantichya Shubhechya.

 19. Ajay says:

  संक्रांतीच्या शुभेच्छा..

  -ajay

 20. sahajach says:

  मकर संक्रांतीच्या तुम्हाला व सर्व कुटुंबियांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा!
  आज तिळ गुळ, गुळाची पोळी जाम मिस करतेय , म्हणजे मी केलेले लाडू चावताना अमितही घरचे लाडू मिस करतोय 🙂

  भोगीची भाकरी, भाजी,आंघोळीच्या पाण्यातले तिळ….सगळं नजरेसमोर येत राहिलं तुमची पोस्ट वाचताना…..

  • तुम्हाला सगळ्यांना संक्रांतीच्या शुभेच्छा.. आज नेमकी सुटी नाही.. त्यामुळे पतंग उडवता आली नाही… 😦

 21. खूप छान झाली आहे पोस्ट. हलव्यासारखीच गोड. माझी लग्नानंतरची ही पहिलीच संक्रांत आहे पण नाही जाता आलं :-(. आईने तिळगूळ मात्र पाठवलाय, तोच तिचा आशिर्वाद :-). सासरी ही परंपराच नाही, त्यामुळे त्यांना काही विशेष वाटलं नाही पण मला थोडी हूरहूर लागून राहिली. हलवा कसा करतात ते माहित नव्हतं. खूप मेहनतीचं काम दिसतंय. पुढच्या संक्रांतीला पाहू, हलव्याचे दागिने अंगावर चढतायंत का?

  तुम्हाला आणि तुमच्या सर्व कुटुंबाला मकर संक्रांतीच्या गोड शुभेच्छा! तिळगूळ घ्या आणि गोड गोड बोला.

 22. gouri says:

  संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा 🙂 🙂

 23. shantisudha says:

  मस्तच महेंद्रजी, खूपच हलव्या (हळव्या) आठवणी आहेत नं. इतकं नाजूक काम आणि मेहनत यामुळेच “तिळाचा हलवा करणे” असा काही वाकप्रचार असावा की काय असे वाटते.
  हलव्याला जितके चांगले काटे तितके त्याचे दागिने सुंदर आणि टिकाऊ (त्यातल्यात्यात) बनतात.
  बाकी गृहीणीला घरातील सर्व स्वयंपाक करून स्वयंपाकघर आवरून झाल्यावर दुपारी उत्साहाने सणाची इतर तयारी (कोणत्याही मग तो दिवाळीचा फराळ, तीळगूळ, हलवा, गुळाच्यापोळ्या, किंवा इतर मधल्यावेळचे पदार्थ असतील) करण्याचा उत्साह फक्त तिचे तिच्या कुटुंबातील सदस्यांविषयीचे प्रेमच देत असे/असते. आता कदाचित वेळे अभावी किंवा गृहींईंचे बाहेरचे व्याप वाढलेले असतात म्हणून त्या नाईलाजास्तव गोष्टी बाहेरून विकत आणतात. मनाचा एक कोपरा म्हणत असतोच की मला जर हे घरी बनवणं शक्य असतं तर किती बरं झालं असतं. कारण प्रत्येकीला हे माहीती असतं की घरच्यांच्या र्‍हिदयात (मला शब्द नीट टंकता आला नाहीये) शिरायचा मार्ग पोटातून जातो. 🙂

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s