मांडवली….

बातम्या पहाणे – या प्रकाराला तर ईंडीया टीव्ही आणि इतर चॅनल्सनी गमतीशीर बनवून  ठेवलंय, पण त्याच सोबत आता पेपर मधे  (आजची लोकसत्ता – पान ३)पण अशाच बातम्या वाचल्या की हसावं की रडावं तेच समजत नाही. मद्यार्क निर्मिती बद्दल चा शासनाचा निर्णय, नंतर त्याच विषयावरचा कोर्टाचा निर्णय, बघीतला की शासनाचे निर्णय कोण घेतो? आणि त्याची मानसिक आणि बौद्धिक पातळी योग्य आहे काय? याची चाचणी घेण्याची वेळ आलेली आहे असे वाटते.

कालच शासनाने एक निर्णय घेतला. काही वर्षांपासून निलंबित असलेल्या म्हाडाच्या अधिकाऱ्यांना पहिले सहा महिने अर्धा आणि नंतर  घरी बसून ३/४ पगार दिला जातो.  या सगळ्या निलंबित असलेल्या अधिकाऱ्यांना रंगे २००५ साली रंगे हाथ लाच घेतांना पकडले होते. असे असतांना पण आज पर्यंत त्यांच्यावरचा आरोप सिद्ध होऊन त्यांना एक तर शिक्षा तरी व्हायला हवी होती, किंवा निर्दोष तरी मुक्तता व्हायला हवी होती. पण कायद्यातल्या पळवाटा इतक्या आहेत की अजुन ही केस प्रलंबित आहे.

सरकारचे लक्ष या लोकांना घरी बसवून दिल्या जाणाऱ्या ३/४ पगारा कडे गेले आहे, आणि असा एक वटहुकूम काढलाय की अशा म्हाडाच्या अधिकाऱ्यांना पुन्हा कामावर घेण्यात यावे…. शासनाचा हा निर्णय वाचल्यावर सरळ लक्षात येतं की इथे मांडवली केली गेली आहे.

महाराष्ट्र शासनाचे असे निर्णय म्हणजे शासकीय सेवेतील अधिकाऱ्यांना एक मेसेज आहे… ” भ्रष्टाचार करा, पैसे खा, आणि जर पकडल्या गेलात तर सहा महिने घरी बसल्यावर आम्ही तुम्हाला पुन्हा परत बोलाऊ, पुन्हा पैसे खाण्याचा चान्स देउ…”  या निर्णयामुळे कोणाचा फायदा झालाय ते तर माहीत नाही, पण आता मात्र या निर्णयाने सामान्य जनतेला खूप दिलासा मिळेल. कारण आता पैसे खाणारे अधिकारी कोण आहेत, हे माहिती नव्हते ते आता सगळ्यांना माहिती होईल आणि आपापली कांम करुन घ्यायला कोणाकडे जायचं ते पण समजेल!!!!” जय हो!!!!

About महेंद्र

माझा ब्लॉग :- http://kayvatelte.com
This entry was posted in Uncategorized. Bookmark the permalink.

14 Responses to मांडवली….

 1. bhaanasa says:

  मी मारल्यासारखे करतो तू रडल्यासारखे कर अशातलीच गत आहे रे ही. बाकी शेवटच्या दोन ओळी पर्फेक्ट. जेव्हां लोकं त्यांच्याकडे येतील ना तेव्हां हेच निर्लज्जपणे वर म्हणतील पाहा तुमचा फालतू वेळ वाचला की नाही…. शीSSS….. परत कामावर घेणे तेही तसेच म्हणजे अगदी कमालच झाली म्हणायची.

  • मी पेपर वाचला आणी आश्चर्याच धक्काच बसला हे वाचुन.. त्यांची चौकशी पुर्ण न करणं म्हणजे शासनाचा नाकर्तेपणाच आहे हा..

 2. महेंद्रजी, शासनात त्यांचेच बाप बसलेत म्हणून हे चाललय. सतीश शेट्टींचा खुन झाला पण आबापासून बाबापर्यंत कुणी काही बोलतय का ते पहा. आता हायकोर्टाने दखल घेतलीय.

  • ह्या ब्युरोक्रसीने तर चक्क भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांना अभय दिलंय ह्या निर्णयाने… आता काही दिवसांनी हायकोर्टच देश चालवेल असे दिसते!!

 3. swapna says:

  shewatachi vakye patali nahit.bhrashta adhikari kon aahet he kalalyawar kaam karun ghyayala konakade jayache he tharawata yeil.yacha artha bhrashtacharala aapanach khat-pani ghalalto na.ya aiwaji kayadyachi madat gheun tyanach ulate padata yete na…RTI mule he kaam astach sop zalya aaj-kaal.RTI jar neet wachala aani waparala tar te lok hi kahi akru shakat nahit.aapalyala traas hoto he 100% khar aahe pan sudharnechi suruwat aapanach ka karu naye????dusar konitari karel ya peksha aapal baghun dusare kartil asa aapan ka mhanat nahi????
  aso waiyaktik mate vegalich asatat………….

  • ते कुचेष्टेने लिहिलंय हो.. ख्ररंच लोकांनी असं वागावं अशी अपेक्षा नाही माझी. मला ह्याचं वाईट वाटलं, की त्या लोकांवर कार्यवाही न होता ते उजळ माथ्याने पुन्हा नौकरीवर जॉइन झाले आहेत !! सरकारने स्पेशल बेंच ( कोर्ट) लाउन या लोकांवर कार्यवाही केली असती तर जास्त योग्य ठरलं असतं असं मला वाटतं.. आता असं झालंय, की तुम्ही भ्रष्टाचार करा, आणि मग सहा महिन्यांनी पुन्हा परत नोकरी वर जॉइन व्हा.. असे निर्णय सरकारच्या ब्युरोक्रसीने घेतले आहेत. आणि इल्लिगल ग्रॅटीफिकेशन झाल्याशिवाय कुठलाहि अधिकारी असे निर्णय घेणार नाही… !!

 4. Atul Deshmukh says:

  हे सगळे दुष्टचक्र बघून संतापाने एकच विचार मनात येतो …
  ‘सरकारचे डोके ठीकाणावर आहे का ?’
  नालायक सगळे…

 5. हे छान आहे. मारीन पण सोन्याच्या वहाणेने नि तु ती घरी पण घेऊन जायचीस!

 6. पवन says:

  हसावे कि रडावे कळेना .. पण हसूच जास्त येतंय कडवट हसू .. खरच राजकारण आणि भ्रष्टाचार दोन्ही एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत असच वाटतं!! …

  • ईतके मुर्खासारखे निर्णय का घेतले जातात हेच कळत नाही.. जनाची नाही तर कमीत कमी मनाची तरीलाज बाळगली पाहिजे नां… पण नाही… निर्लज्ज आहेत सगळे..

 7. Dinesh says:

  Mahendra sir,
  `Industrial Employment Act’ chya tartudi nusar kamgaranna misconduct kelyavar suspension pending enquiry chalu astanna 90 divasan paryant 50%; 180 divasan paryant 75% v 180 divsanantar 100% suspension allowance deta yeto. Pan ha kaayda Industry sathi aahe, v enauirycha nikal lavkar lagava v to paryant kaamgar upashi rahu naye ha tya magcha hetu aahe. MCR (Maharastra Civil Sevices Rules) madhye hi same tartudi aahet, pan asha prasangat tyacha gair vapar hotana disun yeto.

  • या तरतुदी या कामगारांचा मालका कडुन छळ केला जाउ नये म्हणुन आहेत. पण जर पाच वर्ष काहीच निर्णय घेतला नसेल तर दोष शासनालाच दिला जाइल. शासनाला जर खरंच काही निर्णया घ्यायची इच्छा असती तर त्यांनी या केस वर निर्णय घेतला असता.
   त्या अधिकाऱ्यांना पुन्हा कामावर घेणे म्हणजे एखादं जनावर कुरणात मोकळे सोडणॆ आहे. आणि अशा प्रतिक्रियेचा परिणाम इतरांवर ( जे इमानदार आहेत ) त्यांच्यावर काय होइल??

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s