नॆटभेट मासिक

Mahendra Kulkarni, kayvatelte, kay vatel te

नेटभेट मासिक

नुकतंच ब्लॉगींग सुरु केलं होतं. थोडा फार स्थिरावलो होतो इथल्या या ब्लॉगींगच्या जगात. एक दिवस सलिल चौधरी आणि प्रणव जोशीचा मेल आला की नेट भेट नावाचं एक मासिक सुरु करायचं आहे! तुम्ही काय मदत करु शकाल?कोणी असं म्हट्लं की मला खरंच काय उत्तर द्यावं हे समजत नाही. काही स्पेसिफिक विचारलं तर उत्तर देता येतं .. पण अशा प्रश्नाला काय उत्तर द्यावं?

आता हे दोघं पण तसे परिचयाचे होतेच. इथे नियमित पणे नेट भेट या ब्लॉग वर टेक्निकल इश्यू साध्या आणि सोप्या पद्धतीने लिहुन प्रसिद्ध करतात.. इतके सोपे की नॉन आयटी लोकांना पण ते समजायला सोपे जावेत! विचार आला, की ब्लॉग लिहिता- लिहिता हे काय नवीन खुळ डोक्यात आलं यांच्या?? ..आणि पहिला प्रश्न – काय गरज आहे नेट मॅग्झिन्सची? नेट सॅव्ही लोकं तर वाचतातच नां ब्लॉग?? मग हे मॅगझिन कोण वाचणार??आणि हे बनवणं काय सोपं वाटलं का यांना??

बरेच लोकं ब्लॉगिंग करु लागले आहेत , गेल्या वर्षातच जवळपास ३०० च्या वर नवीन मराठी ब्लॉग नोंदले गेले , मराठी ब्लॉग.नेट वर. नेटीझन्स चा मराठी वापर वाढलेला दिसतोय. ऑर्कुट किंवा तत्सम वेब साईट्स पेक्षा लोकं ब्लॉगींग करणं जास्त पसंत करताहेत हल्ली!! मग या मॅगझिन ची गरज काय??

ब्लॉग वर लिहिले गेलेले बरेचसे चांगले लेख असतात की जे फार कमी लोकं वाचतात. माझे पण बरेचसे मराठी मित्र आहेत, जे ब्लॉग वगैरे वाचत नाहीत.पण इमेल मधे आलेले लेख वगैरे नक्कीच आवर्जून वाचतात.. हे नेट मॅगझिन म्हणजे अशा ब्लॉग न वाचणाऱ्या वाचकांसाठी लेख पोहोचवण्याचा एक उत्तम उपाय होऊ शकतो.. हे असे तयार केलेले निवडक लेखांचे मासिक म्हणजे वाचक आणि ब्लॉगर्स साठी विन विन सिच्युएशन क्रिएट करेल असे मला पण जाणवले.ब्लॉगर्सने लिहिलेले लेख जे नॉर्मली जास्तीत जास्त्१००० ते १५०० लोकं वाचतात तेच लेख जवळपास ६० ते ७० हजार लोकांपर्यंत नेट भेट तर्फे पोहोचवले जातील!!पटलं.. छान आहे उपक्रम!!

एखादी गोष्ट पटली की , सीड जर्मिनेट झालं की मग सगळ्या गोष्टी कशा राईट डायरेक्शनने जातात…आणि त्या दृष्टीने काम करणे पण सुरु होते.- म्हंटलं की मदत?? अरे काय वाटेल ती मदत करेन मी तुम्हाला..( हे बाकी एकदम सोप्पं..स्पेसिफिक न रहाता असं म्हंटलं की झालं… !! 🙂 पण   माझं हो  म्हणणं तसं नव्हतं.. अगदी मनापासून म्हट्ल होतं मी ते!!! )  म्हंटलं,   टु स्टार्ट विथ, जर काही मॅटर हवं असेल तर ते ’ काय वाटेल ते” वरचं घेउन पब्लिश करु शकता. दुसरी काय बरं मदत करु तुम्हाला??

पहिलाच अंक काढायचा होता. ब्लॉग वर लिहिणं वेगळं ,आणि मासिक काढणं वेगळं. ब्लॉग लिहिणारे लोकं माझ्यासारखे.. फार कमी ब्लॉगर्स ह्र्स्व दिर्घ बरोबर लिहितात..ब्लॉग हा पर्सनल असतो, त्यामुळे ह्रस्व दिर्घच्या चुका झाल्या तरी पण त्या इंडीव्हिज्युअलच्या असतात, त्यावर कोणी फारसा आक्षेप घेत नाही. पण जेंव्हा एखादं मासिक सुरु केलं जातं तेंव्हा मात्र शुध्दलेखनाच्या चुका असून चालत नाही. बरेच वाचक हे शुध्द लेखनाच्या चुकांच्या बाबतीत जागरूक असतात- (जसे माझी सौ.! तिला अशुद्ध लेखन अजिबात आवडत नाही.. कदाचित नेहेमी प्रुफं वाचून तसं झालं असेल. अहो , एखादी कादंबरी, पेपर, मासिक वाचतांना पण ” जरा ले आउट चुकलेला वाट्तोय” अशी हळू आवाजातली कॉमेंट असतेच!!!)

मग आता एडीटींग साठी कोण??? तर दोन नावं डोळ्यासमोर आली. भाग्यश्री आणि अनुजा. या दोघींच्या पण लिखाणात फार कमी चुका असतात ह्र्स्व दिर्घ, अन ग्रामरच्या- किंबहुना नसतात असे म्हंटले तरी हरकत नाही. तसेच इंग्रजी शब्द पण नसतो वापरलेला फारसा. अनुजाची नवीनच ओळख झालेली होती. अनुजाला मेल केला , आणि कॉपी सलिलला दिली. अनुजाने एडीटींग करुन देण्याचे मान्य केले.एक मोठा अडथळा दुर झाला पब्लिश करण्यातला.

आता मुद्दा होता, लेख गोळा करण्याचा.. मी नियमीत वाचक आहे बऱ्याच ब्लॉगचा. त्यामुळे जसे आठवतील तशी नावं सांगितली … म्हंटलं, मी हे सगळं वाचतो.. बघ त्यांना विचारुन त्यांचे लेख घेतले तर चालतील का म्हणून.. सलिल/प्रणव ने जितक्या लोकांशी संपर्क केला , तितक्या सगळ्यांनी अगदी विनाशर्त आणि आनंदाने आपले लेख छापु द्यायला मान्य केले. आणि होता होता सगळं व्यवस्थित जमून आलं, आणि नेट भेटचा पहिला अंक जन्मला.

मला खरंच कौतुक वाटलं, सलिल – प्रणव चं.. अजिबात कुठलाही अनुभव नसतांना एक “नेटभेट- ई मॅग्झिन” चा जन्म झाला.. बऱ्याच लोकांना हे पाठवलं गेलं मेल मधे . जवळपास ४० हजार लोकांना इ मेल ने हे मासिक पाठवलं गेले. बऱ्याच लोकांचे कौतुकाचे इ मेल्स वगैरे पण आले. की छान लिहिलंय म्हणून… तर बऱ्याच लोकांनी झालेल्या चुका पण दाखवून दिल्या. म्हणतात नां, चुका दुरुस्त करायच्या असतील तर त्या आधी माहिती झाल्या पाहिजे..

अगदी खरं खरं लिहितो, पहिला अंक जेंव्हा पाहिला तेंव्हा तो अगदी सामान्य झालाय असे वाटले.. पण पुढल्या महिन्यात दुसरा अंक जेंव्हा प्रसिद्ध झाला, तेंव्हा मात्र मी खरंच खूप खूष झालॊ. दुसऱ्या अंकात खुपच सुधारणा होत्या. जास्त व्यवस्थित झालं होतं ते मासिक- म्हणजे मासिक वगैरे वाटत होतं.पेजिंग , ले आउट व्यवस्थित केलेलं होतं.. आणि तिसरा अंक तर खुपच देखणा झाला होता , मी तर तेंव्हा सलिलला मेल पण पाठवला.. की आता या वेळेस एकदम “दिलसे” बनवलं आहेस या वेळचं नेट भेट ..!

हा अंक सफलतेने प्रसिद्ध होण्यासाठी बऱ्याच लोकांनी मदत केलेली आहे. प्रत्येकाने घरचं कार्य समजून समरसून मदत केल्यामुळेच हे नेट भेट सक्सेसफुली प्रसिध्द करता आलं.. .. सलिल आणि प्रणवची नेट भेट साईट सांभाळून हा उपक्रम राबवतात ते दोघे जण..

“नेट भेट” जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावे म्हणून प्रयत्न आहे. तुमच्या जिमेल अकाउंटमधले सगळे इ मेल ऍड्रेसेस जर सलिल ला सलिल ऍट नेटभेट डॉट कॉम वर पाठवावे ही विनंती. आता तुमचं ऍड्रेसबुक कसं कॉपी करायचं एक्सेल मधे हे मी सलिलला एक लेख लिहीण्याची विनंती करतो.. म्हणजे जरा सोपं होईल..

लेख संपवता संपवता, दोघांना पण पुढील वाटचाली करता शुभेच्छा देतो आणि हे पोस्ट संपवतो..

About महेंद्र

माझा ब्लॉग :- http://kayvatelte.com
This entry was posted in साहित्य... and tagged , , , . Bookmark the permalink.

20 Responses to नॆटभेट मासिक

 1. आनंद पत्रे says:

  नेटभेट च्या स्तुत्य प्रयत्नांसाठी सलील, प्रणव, अनुजा सर्वांचे अभिनंदन.
  या वेळेसचा अंक छान जमला आहे.

  एक सुचना: तुमच्या लेखात तुम्ही “..नेटेभेट मासिक..” असं हेडिंग दिलं आहे, त्यात दुरुस्ती हवी आहे, “नॆटभेट मासिक” असं हवं आहे.

  • अरे हो.. चुक झाली होती टाइप करतांना.. दुरुस्त केली आता.. या वेळेसचा अंक चांगला जमला आहे. :)आणि पुढल्या वेळचा अजुन जास्त चांगला होईल.

 2. Rohan says:

  खरय तुझे … नेत्भेत म्हणजे एकदम ‘मेगा स्केल प्रोजेक्ट’ आहे ब्लॉगपेक्षा. मस्तच.. सलिल आणि प्रणवचे खुपच कष्ट आहेत ह्यात. शिवाय पडदयामागचे हात देखील आहेतच…

  आजच जानेवारीचा अंक आला आहे. तो अजून वाचायचा आहे… 🙂

  • रोहन,
   खरंय अगदी… बराच वेळ जातो या कामात. मला अनुभव आहे, नुसता एक ब्लॉग लिहीतो म्हंटलं तरीही वेळ जातोच. हे दोघं तर मासिक पण काढताहेत. 🙂 या नेटभेट मुळे हे ब्लॉग वरचे लेख जवळपास ५०-६० हजार लोकांपर्यंत पोहोचतात,

 3. मस्त..मला ते मॅगझिन जेव्हा पब्लिश झाला तेव्हाच आला. खूपच स्तुत्या प्रयतना आहे आणि मी ते ऑलरेडी माझ्या ऑफीस आणि मराठी मित्रांमध्ये सर्क्युलेट केलाय 🙂

  • सही.. मी पण बऱ्याच लोकांना इ मेल ने फॉर्वर्ड करतो.. प्रत्येकानेच जर आपापल्या कॉंटॅक्ट्स ला फॉरवर्ड केलं तर बऱ्याच लोकांपर्यंत पोहोचेल.

 4. काका, नेटभेटला “काय वाटेल ते” मध्ये जागा दील्याबद्दल शतशः धन्यवाद. तुमचा आशीर्वाद, प्रेम आणि लोभ असाच आमच्यावर राहुद्यात. इंटरनेटच्या , मराठीच्या क्षेत्रात खुप काही करायचं आहे आम्हाला. मला खात्री आहे की तुमच्या आणि अगदी बिनशर्त मदत करणार्‍या अनुजा ताई, अनिकेत, पंकज, भानंस, दिपक, नरेंद्र प्रभुं आणि इतर सर्वच ब्लॉगर्सच्या सहाय्याने आणि आशीर्वादाने आम्ही ते करुन दाखवुच.

  हा लेख अजुन अगदी “सातवां आसमान” गाठल्यासारखं वाटतंय आम्हाला .

 5. काका नेटभेटच्या माहितीबद्दल धन्यवाद. खूप चांगला उपक्रम आहे. नेटभेट ४०००० लोकांपर्यंत पोहचलं हे वाचून आनंद झाला.

  • ४०हजारापेक्षा जास्तच असावेत. साईटवरुन पण डाउनलॊड केले जाताताच. सलिल अन प्रणवने ४० हजारांना पाठवले, पण पुन्हा पुढे ते फॉर्वर्ड कितीतरी जणांना केले जातात.. आपण मेल करतो तसे.. मलाच दोन दा फॉर्वर्ड मधे आलाय नेटभेट 🙂

 6. ravindra says:

  मला वाटते नेत भेट च्या तिन्ही अंकांमध्ये तुमचे लेख प्रसिद्ध झाले आहेत. सलील आणि प्रणव यांनी छान उपक्रम हाती घेतला आहे. त्यांचे व तुमचे ही अभिनंदन! या अंकात माझा एक लेख प्रसिद्धझाला आहे.

 7. आल्हाद alias Alhad says:

  मलाही नेटभेट हवंय.
  ईमेल आयडी कुठे रजिस्टर करू?

 8. anukshre says:

  धन्यवाद! पोस्ट करिता. इथे आवर्जून नमूद करावेसे वाटते की, आपण माझे नाव एडिटिंग करिता सलीलला सुचवले म्हणून मला हा अनुभव मिळाला. पहिल्या अंकाचे एडिटिंग ऐन दिवाळीत करून दिले. नंतर सलीलला हे मासिक स्वरुपात करू शकशील का असे मी विचारले व त्या पद्धतीने त्याने बनविले मी नेटभेट चे फक्त पहिले(दीपावलीचे) जे मासिक एडिटिंग करून दिले त्यात जवजवळ सर्व ह्रस्व व दीर्घ बरोबर करून दिले. प्रणव ह्या कामात लक्ष घालू लागला व सलील व प्रणव एकाच ऑफिस मध्ये असल्याने त्यांना काम करणे पण सहज सोपे आहे. पहिल्या मासिकापासून प्रणव संपादकीय लिहित आहे. उतरौत्तर यश वाढतच आहे. मी अल्प मदत केली फक्त पहिल्या अंकापुरती अर्थात एडिटिंग ची नंतरचे श्रेय प्रणव च्या एडिटिंग व संपादकीय ला आहे. आता तर पूर्णपणे प्रणव हे काम करतो. मी ह्या मुलांबरोबर आहेच, मला लेख आवडले ते पाठवायचे काम करते. बाकी यशाचे, प्रोत्साहनाच्या प्रतिक्रियेचे मानकरी सलील, प्रणव आहेत.

  • अनुजा
   आज इथे ज्या लोकांच्या कॉमेंट्स आहेत त्या बघुन जाणवतंय , की लोकांना अशा इ मासिकात खुप ऋची आहे. उत्तरोत्तर प्रगती होत राहिलच यात अजिबात काही शंका नाही..

 9. फारच छान लेख लिहला आहे .तुझा ब्लोग सुद्दा आवडला,खुप सुंदर सजावला आहे.

 10. bhaanasa says:

  नेटभेट मासिकाने आता चांगलेच बाळसे धरलेय. त्याचे रुपडे आता अधिकाधीक सुंदर होत चाललेय हे पाहून अतिशय आनंद होतोय. सलील व प्रणव यांची संपादकीय मेहनत व सगळ्यांचे लिखाणातले सातत्य तसेच अनुजाचे-संकलन-प्रुफे तपासणे-दुरूस्त्या करणे सगळ्यांचेच कौतुक. नेटभेट असेच दर्जेदार अंक भेटीस आणत राहील हे नक्की.

  • नेटभेटने ने एक नविन ट्रेंड आणलाय .. मला फोन आलेत काही लोकांचे, मेल पण आलेत की त्यांना नेट भेटशी असोसिएट व्हायला आवडेल.. मला वाटतं, हेच आहे नेट भेट चं यश!! सलिल, प्रणव ची मेहेनत आता ऍप्रिशिएट होते आहे हे बघुन बरं वाटलं… 🙂

Leave a Reply to महेंद्र Cancel reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s