काय वाटेल ते- पहिला वाढ दिवस…..

काय वाटेल ते चा वाढदिवस...

आज एक वर्ष होतंय ब्लॉग ला . जेंव्हा हा ब्लॉग सुरु केला होता तेंव्हा असं अजिबात वाटलं नव्हतं की आपण इतका वेळ इथे तग धरुन राहू शकु, आणि काही लिखाण ही करु शकू. पण कर्म धर्म संयोगाने आणि तुमच्या सगळ्यांच्या प्रोत्साहनपूर्ण प्रति क्रियांच्या मुळे काही ना काही लिहिण्याचा संकल्प पुर्ण करु शकलो.

माझा ह्या ब्लॉग विश्वातला प्रवास खूपच मनोरंजक झाला. इथे जेंव्हा ब्लॉगींग सुरु केलं तेंव्हा असं ठरवलं होतं की ह्या ब्लॉग वर एक वर्ष न चुकता लिखाण करायचं.. कमीत कमी दररोजची एक तरी पोस्ट या हिशोबाने वर्षभरात ३६५ पोस्ट्स लिहायच्या. ठरवताना जरी हे सोपं वाटलं तरी,  हे काही तितकंसं सोपं काम नाही .. की उचलला पेन अन खरडलं काहीतरी. पहिले काही दिवस तर ्खूपच त्रास झाला, काहीच विषय मिळत नव्हता लिहायला..तरी पण अट़्टाहासाने लिहिणे सुरू ठेवले.

आज इथे आता नमूद करतांना आनंद होतोय की मी ठरवल्या प्रमाणे ३६५ पोस्ट्स लिहू शकलो , गेल्या वर्षात. हे पोस्ट  या वर्षाचं शेवटचं पोस्ट आहे- आणि याचा  नंबर ३६५ !! मॅनेजमेंट्च्या पुस्तकात मधे जे शिकवल्या जातं , जे वाचलंय, त्याला निश्चितच काही तरी अर्थ आहे..जो पर्यंत कुठल्याही गोष्टीसाठी टार्गेट नसते, तो पर्यंत ती गोष्ट पुर्ण करण्यासाठी लागणारी कन्सिस्टन्सी टिकुन रहात नाही. इथे दररोज एक ह्या हिशोबाने लिहायचे टार्गेट होते.. म्ह्णूनच  शक्य झालं.

इथे एकदा स्थिरस्थावर झाल्यावर मग इतरांचे ब्लॉग्ज पाहिले, आणि मराठी ब्लॉग विश्व चा सिंबॉल प्रत्येकच ब्लॉग वर पाहिला. एकदा त्याला सहज क्लिक केलं आणि ती कसली वेब साईट आहे ते समजलं. तिथे रजिस्टर केलं, आणि नंतर मग बऱ्याच लोकांना समजलं की मी पण लिहितो, अन बरेच वाचक तिथुन पण येणं सुरु झालं आणि आपण लिहिलेलं वेडं वाकडं कोणी वाचतोय ते बघून तर लिहिण्याचा उत्साह द्विगुणीत झाला. म.ब्लॉ.वि. चे त्या साठी आभार.

नंतर काही दिवसातच या मधे इतका इन्व्हॉल्व्ह झालो, की एखादं पोस्ट टाकल्यावर त्यावर कोणी कॉमेंट्स दिल्या आहेत का? हे चेक करायला दिवसभर मेसेंजर लॉग इन करुन ठेवत होतो. सेल फोन वरुन कॉमेंट्स पास करित होतो, की वेळ झाला अप्रुव्ह करायला तर आभाळ कोसळेल असं वाटायचं. कॉमेंट्सला उत्तर दिल्याशिवाय चैन पडत नव्हतं- याचं कारण, मी जेंव्हा कुठे कॉमेंट देतो, तेंव्हा उत्तराची अपेक्षा असते माझी, म्हणून तो नियमच झाला माझा, की प्रत्येक कॉमेंटला उत्तर द्यायचंच!!!

कितीही कामात बिझी असलो , तरी ब्लॉग काही डोक्यातून जात नव्हता. कुठलाही प्रसंग असो.. त्यात आपल्याला ब्लॉग वर लिहायला काही सापडतं का??? याकडे लक्षं राहू लागलं.. आयुष्यच  बदललं होतं एकदम. हॉटेल मधे गेलं की कधी नव्हे ते ऍंबिअन्स कडे नजर जाू लागली होती. जेवायला बसलो, की आधी डीश चे फोटो क्लिक करणं सुरु झालं- लोकं आपल्याकडे विचित्र नजरेने पहाताहेत याची पर्वा न करता!!

ब्लॉग हिट्स.. ब्लॉग रॅंकींग ह्या सगळ्या नविन टर्म्स शिकलो. दररोज ब्लॉग हिट्स किती झाल्या इकडे जास्त लक्षं राहु लागलं. मग एखाद्या दिवशी जरा कमी लोकं आले तर त्यामुळे उगाच इन्सल्टींग वाटू लागलं. एखाद्या पोस्ट वर कॉमेंट आली नाही, की पण पुन्हा आपलं लिखाण अगदी टाकाऊ आहे.. असा साक्षात्कार व्हायला लागला.अनिकेत म्हणतो, तसं स्वतःचं लिखाण कधीच स्वतःला आवडत नाही. अगदी सुमार लिहितोय आपण असं वाटत असतं. अशा या चक्रामधे एकदा अडकलं की अभिमन्यु सारखी स्थिती होते. सारखं गुंतून बसतो यातच- बरं ब्लॉग सुरु करतो आपण मनातलं लिहायला, पण काही दिवसातच इतरांना काय आवडतं ते लिहिण्या कडे कल वाढतो .

आज ब्लॉगला एक वर्ष होतंय. लाखाच्या वर दहा  हजार हिट्स पुर्ण झाल्या आहेत आज. पण एक ठरवलंय, या पुढे लिहायचं ते स्वतःसाठीच!!सगळ्यात महत्वाची  दुसरी गोष्टं म्हणजे माझ्या ब्लॉग वरचे सगळे दागीने ( अलंकार)  – म्हणजे ब्लॉग रॅंकींग, व्हिजिटर्स नंबर काउंट, वगैरे आज काढून टाकलेत. या पुढे या सगळ्यांना अजिबात महत्व द्यायचं नाही असं ठरवलंय. कितीही पेज हिट्स असले तरीही त्यामधे गुंतून न पडता आपल्याला जे ’ काय वाटेल ते’ लिहायचं  हा संकल्प आहे नवीन वर्षा साठी. हे जे काही झालं, त्यासाठी…एका ब्लॉग वर वाचलेल्या  ह्या पोस्टचं कारण ठरलं, आणि त्या साठी जिवनिकाचे मनःपुर्वक आभार..

या वर्षी साठी दररोज एक पोस्ट हा ऑप्शन ठेवलेला नाही. तर जेंव्हा वाटेल तेंव्हा पोस्ट टाकायचं!! या वर्षाच्या अखेर पर्यंत ब्लॉग वर लिखाण जे झालं, ते तुम्हा सगळ्यांच्या कौतुकाच्या कॉमेंट्स मुळेच.. मी पण लिहितांना कधी तरी कोणाला दुखावलं असेल तर त्या बद्दल क्षमस्व!! माझा उद्देश कधीच कोणाला दुखवायचा नव्हता!!

या वर्षी एक नवीन रिसोल्युशन आहे.. एकदा पोस्ट लिहिलं की कॉमेंट्स अप्रुव्ह करायच्या फक्त दोन वेळेस.. एकदा सकाळी आणि एकदा रात्री.. बस्स! दिवस भर ऑन लाइन रहाण्यापेक्षा हे बरं..

एक इंट्रेस्टींग स्टॅटस्टीक.. माझ्या ब्लॉग वर आजपर्यंत जे १लाख दहा हजार हिट्स आहेत त्या पैकी लोकं कुठुन आलेत ते सहज चेक केलं.. आणि स्टॅटस्टीकल डाटा खालील प्रमाणे आहे..

सूचक सगळे दिवस अखेर 2010-01-17 (एकत्रित)

Summarize: 7 Days 30 Days Quarter Year All Time

सार्वकालिक

Referrer Views
marathiblogs.net 14,295
marathiblogs.net/recent_posts?page=1 2,524
marathiblogs.net/recent_posts?page=2 1,413
WordPress Dashboard 1,042
mr.wordpress.com 919
marathiblogs.net/recent_posts?page=3 757
google.com/reader/view 543
blogwani.com 519
marathiblogs.net/recent_posts?page=4 468
blogger.com/home 402
kayvatelte.co.cc 364
misalpav.com/node/6149 339
marathiblogs.net/recent_posts?page=5 320
marathiblogs.net/recent_posts 288
kanokani.maayboli.com/node/175 285
google.co.in/reader/view/?tab=my 269
misalpav.com/node/5974 260
indiblogger.in/blogger/9848 259
indiblogger.in/languagesearch.php?lan… 227
google.com/reader/view/?tab=my 211
misalpav.com/node/5785 206
marathiblogs.net/recent_posts?page=6 188
manogat.com/node/16406 185
sardesaies.blogspot.com 165
kanokani.maayboli.com/node/336 163
marathiblogs.net/recent_posts?page=7 161
bhunga.blogspot.com 157
twitter.com 155
misalpav.com/node/6033 153
marathiblogs.net/recent_posts?page=8 144
misalpav.com/node/6012 143
kanokani.maayboli.com/node/157 131
google.co.in/reader/view/?hl=en&t… 124
pdkashelkar.googlepages.com/marathi 124
misalpav.com/node/5935 122
mail.google.com/mail/?ui=2&view=b… 121
twitter.com/memahendra 103
en.wordpress.com/signup/?new=kayvatte… 101
kanokani.maayboli.com/node/338 90
blogger.com/home?pli=1 90

About महेंद्र

माझा ब्लॉग :- http://kayvatelte.com
This entry was posted in Uncategorized. Bookmark the permalink.

64 Responses to काय वाटेल ते- पहिला वाढ दिवस…..

 1. वाह..३६५ पोस्ट आणि १ लाख दहा हजार हिट्स..अप्रतिम महेन्द्रजी..सिंप्ली ग्रेट. माझ्या शुभेच्छा तुमच्या ब्लॉगच्या एक वर्ष पुर्तिसाठी आणि हो बर्थडे डान्स लय भारी 🙂

 2. ट्विटरवरुन दिल्याच आहेत, पण आता ब्लॉगवर प्रत्यक्ष देतोय
  वर्धापन दिनाच्या मनापासुन शुभेच्छा! 🙂

 3. वा वा काका.. जबरदस्त !! हार्दिक अभिनंदन आणि या वर्षासाठी मनापासून शुभेच्छा !! या वर्षी पोस्ट्स आणि लिंक्स दुपटीने वाढणार हे नक्की. आणि आता त्या अलंकारांविषयी. तशीही तुम्हाला त्यांची गरज नाहीये. कारण तुम्हाला तुमचा स्वतःचा वाचकवर्ग आहे. असंख्य लोकांच्या बुकमार्क्स, गुगल रीडर मध्ये तुमचा ब्लॉग आहे. (मी ही त्यातलाच एक.) .. पुन्हा एकदा अभिनंदन.

  • हेरंब
   त्या अलंकारात खुप अडकल्या सारखं व्हायचं, यापुढे मी स्वतः पण कधी किती व्हिजिटर्स झाले आहेत ते चेक न करण्याचं ठरवलंय.. दुसऱ्या वर्षी साठी किती पोस्ट्स चं टार्गेट करायचं ते फिक्स केलेलं नाही अजुन तरी..

 4. gouri says:

  vaadhadivasaachyaa shubhecchaa !!!

  “जो पर्यंत कुठल्याही गोष्टीसाठी टार्गेट नसते, तो पर्यंत ती गोष्ट पुर्ण करण्यासाठी लागणारी कन्सिस्टन्सी टिकुन रहात नाही. इथे दररोज एक ह्या हिशोबाने लिहायचे टार्गेट होते.. ”

  … that explains the difference. Majhe target asate mahinyala kimaan 2 post tari takalya gelya pahijet ase 😀

  sagale daagine kadhoon takoon svant sukhaay lihaayalaa laagalyaavar ajoon majaa yeil lihaayalaa …

  • गौरी
   आता यंदाचं टार्गेट कमित कमी दोन पोस्ट्स दर आठवड्याला ठेवायला हरकत नाही.. शुभेच्छा..

 5. आनंद पत्रे says:

  अभिनंदन महेंद्रजी. तुमच्या ब्लॉगमुळेच मला नियमित ब्लॉग्स वाचण्याची सवय लागली आणि यात गुंतुन पडलो.
  अतिशय नव-नविन विचार मिळाले, माझ्या कॉमेंट्सला तुमचे उत्तर पाहुन लिहिण्याची उमेद वाढली. खुप काही शिकलो यामुळे, खरंच धन्यवाद!

  • आनंद
   तुम्हा लोकांच्या अशाच प्रतिक्रिया बघुन तर लिहिण्याचा उत्साह वाढला आणि एक वर्ष भर लिहू शकलो.. धन्यवाद..

 6. Manju says:

  Mahendraji Abhinandan!!!
  365 posts..kharach kamaal aahe…
  punha navyane vachun kadhnar aahe.
  Asech lihit raha..abhinandan

 7. काका दिवसाला एक पोस्ट लिहण्याचा संकल्प केलात आणि तो पूर्ण केलात ह्याला मनापासून दाद देतो. मी देखील ब्लॉग सुरू केला तेंव्हा आधी आपण हे किती दिवस करू शकू ह्याची मलादेखील धाकधुक होतीच त्यामुळे मित्र मंडळी मध्ये कुणालाही ह्याची कल्पना दिली नाही. पण जसं जसं लिहीत गेलो तसं तसे इथेच मित्र बनतं गेले. तुम्ही म्हणालात तसेच ब्लॉग म्हणजे रोजचं रुटिन झालं. मराठी ब्लॉग विश्वला भेट दिल्याशिवाय चैन पडेनासी झाली. असो माझं पुराण राहू दे. लिहेन कधीतरी.

  तुम्हाला आणि “काय वाटेल ते”ला मनपुर्वक शुभेच्छा.

 8. Rohan says:

  अखेर तो दिवस आला आणि अखेर ती पोस्ट आली. १७ जानेवारी … नंबर ३६५ … 🙂

  मला खरच मनापासून आनंद वाटतोय की तू योग्य तो निर्णय योग्य पद्धतीने घेतलास. तुझा लिखाणाची वाट बघिनच. पण आता इकडे फारसा भेटणार नाहीस म्हणजे भेटून खादाडी करायलाच हवी…

  काय बोलतो … फेब्रुवारी मध्ये जमवुया एकदा … 😀

  • रोहन
   खुप विचार करुन घेतलाय निर्णय. आणि ब्लॉग वर लिखाण वगैरे कमी करणार नाही .. थोडं कमी होईल पण तरीही आता इतकी सवय झालेली आहे की मनातलं लिहिल्याशिवाय बरंच वाटणार नाही. फेब्रृवारीत जमवु नक्की.. 🙂

 9. महेंद्रजी,
  आज आपल्या ब्लॉगिंगच्या उपक्रमाला एक वर्ष पुर्ण झाले.. मनःपुर्वक अभिनंदन!

  या काळात आपल्याकडुन अनेक नवनविन विषयांवरती वाचायला मिळालं.. खुप काही समजलं, कळालं.
  येत्या काळात असंच लिखान होत राहो आणि आमचे वाचन वाढत राहो!

  अनेक शुभेच्छा!
  -दिपक

  • दिपक
   तुमच्या सारखे मित्र मिळाले म्हणुन इथे जीव रमला. बरं वाटायचं इथे काही तरी लिहायला. खुप छान दिवस गेलेत इथे ..खरं संगायचं तर फेस बुक किंवा ऑर्कुट पेक्षा इथे जास्त कम्फर्टेबल वाटतं..

 10. sahajach says:

  वाढदिवसाच्या अनेक अनेक शुभेच्छा!!!!!!!!!!!!

  जातीची सुंदरा अलंकाराशिवायही सुंदर दिसते…………ते ’काय वाटेल ते’ ला लागू पडते कारण तुमचे सहज सुंदर, चौफेर,आणि दिलखुलास लिखाण हेच मुळात या ब्लॉगचे सौंदर्यस्थळ आहे……….
  तेव्हा लिहीत रहा आम्ही वाचतोय!!!!!

  मी देखील हिट काउंटर काढून टाकलेय…..खुप शांत वाटतय आता. आता माझा ब्लॉग आणि माझे लिखाण हे खरे खुरे ’सहजच’ झालेय…………

  • अगदी योग्य केलं.. त्या दुष्टचक्रात एकदा अडकलं की मग बाहेर निघणं कठीण असतं. मला अनुभव आहे या गोष्टीचा. आपण ब्लॉग वर लिहितो ते मनःशांती साठि.. स्वान्त सुखाय म्हणतात तसं..आणि हे सगळे हिट काउंटर, रॅंकिंग काढुन टाकल्यावर कसं रिलॅक्स्ड वाट्तंय..
   लिहिणं सुरु राहिलंच, कारण जशी बेवड्याला दारु ची नशा असते, तशी मला लिखाणाची आहे.. 🙂

 11. bhaanasa says:

  महेंद्र खूप खूप अभिनंदन. चला संकल्प पुरा झाला. अतिशय कौतुकास्पद आहे हे. तुझ्यामुळेच मीही तुझ्याइतकी नसले तरी सातत्याने लिहीण्याचा प्रयत्न करते. अनेक लोकांना प्रेरणादायी काम केले आहेस. हे मला जास्त महत्वाचे व कौतुकाचे वाटते. वर्षभरात अनेक वेगवेगळे विषय चांगल्या रितीने हाताळलेस. माहितीपूर्ण, हलकेफुलके तर कधी गंभीर. प्रसंगी थोडे जहालही. आवडले. लिहायला गेले तर बरेच काही आहे पण ते तुला माहीतच असल्याने इथे पुन्हा एकवार अभिनंदन व पुढील लिखाणासाठी अनेक शुभेच्छा देऊन थांबते.:)

  • भाग्यश्री
   खरंच उगीच मोठेपणा देते आहेस मला.
   इथे आल्यावर एक लक्षात आलं , की लोकांना सिरियस नाही, तर हलकं फुलकं लिखाण जास्त भावतं.पण या पुढे मी मात्र मला ’काय वाटेल ते’ च लिहिण्याचं ठरवलंय..
   सातत्याने लिखाण झाले हे महत्वाचे.. कधी लिखाण कमी झालं, तर ते नंतर बॅकलॉग भरुन काढायचो.. असो..इथे तुझ्या सारखी चांगली मैत्रीण मिळाली … ही पण काही कमी समाधानाची बाब नाही.. 🙂

 12. Aparna says:

  माझ्या शुभेच्छा “काय वाटेल ते”च्या एक वर्ष पुर्तिसाठी आणि हो बर्थडे डान्स लय भारी [:)]…..

 13. ajayshripad says:

  “काय वाटेल ते” प्रथम वाढदिवसाच्या मनःपुर्वक शुभेच्छा…..!
  Keep it up dada God Bless You…!

 14. Prasad says:

  nice writing dear, I’m quite new to blogging. Sadhya fakt saglyanche blogs wachana chalu ahe maza. Tuze blogs wachun chan watale, ajun purna wachun vhaychet? Pan ek prashna nehami padto ki tu he sagala kasa lihu shaklas? ani tehi agadi sahaj lihilyasarakha wattay?

  Ani ajun ek marathit blog lihinyasathi kahi software ahe ka?

  • प्रसाद
   अगदी सोपं आहे.. लॅप टॉप उघडायचा, आणि नोट पॅड उघडुन जे काही मनात असेल ते टाइप करायचे.. झालं! एकदम सोपं आहे. सुरुवातीला थोडा त्रास होतो, पण लवकरच जमतं सगळं..
   मी स्वतः http://baraha.com ह्या साईटवरुन डाउनलोड केलेलं सॉफ्ट वेअर वापरतो.

 15. jivanika says:

  “काय वाटेल ते” ला वाढदिवसाच्या मनःपुर्वक शुभेच्छा

 16. Ajay says:

  वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा !! ब्लॉगचा खरा दागिना म्हणजे वाचकांच्या प्रतिक्रिया नाही का ? त्यात दररोजच्या वाचकांपेक्षा एखादा नवीन वाचक येऊन ‘तुमचा ब्लॉग आवडला’ असं म्हणतो तेव्हा उर्/छाती/मन/ह्र्दय भरून येतं 🙂

  -अजय

  • अजय
   खरंच.. अगदी लाख मोलाची गोष्ट बोललात.. 🙂 जेंव्हा एखादी नविन कॉमेंट असते तेंव्हा तर खरंच खुप छान वाटतं..

 17. मी says:

  अभिनंदन !
  तुमच्या नविन रिसोल्यूशन वाचून लिओ बबूटा आठवला, तो zen habbits नावाचा ब्लॉग लिहितो, लाख-दिड लाख दररोजचे वाचक् आहेत, त्याने असेच स्वत:साठी काही‌नियम बनवलेत .. पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा !

  • गुरु
   माझं नेहेमीच असं असतं, एखादी गोष्ट करायची आधी टार्गेट फिक्स करतो.. नंतर मग ते अचिव्ह करायला पुर्ण पाठपुरावा करतो!!
   लिओ बबुटाचा ब्लॉग वाचायला हवा.. 🙂 धन्यवाद..

 18. ब्लॉगच्या वाढदिवसाबद्दल हार्दिक शुभेच्छा !

 19. laxmi says:

  again congrats sir 🙂
  sakal paper madhye marathi sites baddal mahiti aali hoti.tyamadhe marathiblogs.net ya site vishayi mahiti hoti.kadachit tithunach tumacha blog vachayla survaat keli asen.
  so really thanks to marathiblogs.net
  tumhi asech lihit raha.

  • लक्ष्मी
   शुभेच्छांकरिता आभार.. लिहिणं सुरुच ठेवणार. पण थोडा कमी वेळ देता येइल इतर ब्लॉग चे वाचन वगैरे करायला.. याचं वाईट वाट्तंय.. असो.. पण काही ब्लॉग तर नक्कीच वाचणार,आवर्जुन.. 🙂

 20. Dinesh says:

  Mahendraji,
  Congrets & Happy birth day.. Hya sarva blog che ek pustak prakashit kara. mhanaje je lok net war wachu shakat naahit tyanna pustakachya swarupat he sagle lekh vachta yetil.

  • दिनेश
   शुभेच्छांकरिता आभार.. अहो आत्ता ही तर सुरुवात आहे. अजुन बरंच काम करायचंय.. नंतर पूढे बघु या.. नाही तर आपले मित्र आहेतच ते करतिल मदत इ बुक कढायला… 🙂

 21. Nikhil Sheth says:

  Congrats.

 22. ब्लॉगजगतात आलो ते ’काय वाटॆल ते’ मुळेच….
  माझ्या शुभेच्छा ’काय वाटेल ते’ ला एक वर्ष पुर्ण झाल्याबद्दल…बर्थडे डान्स भारी…

  • देवेंद्र
   पण इथे आल्यावर लगेच आपलं बस्तान बसवलंत तुम्ही स्वतः! तुमचं वाचन दांडगं असल्याने हा फायदा झालाय तुम्हाला, लिखाण पण छान जमतं त्यामुळे.. शुभेच्छांसाठी आभार.. 🙂

 23. Nikhil Sheth says:

  महेंद्र सर, मी एक ब्लॉग सुरु करत आहे. ३-४ पोस्ट टाकल्या आहेत. तुमच्याकडून जरा मार्गदर्शनाची अपेक्षा होती.
  http://disamajikahitari.wordpress.com/

  • निखिल,
   पहिली गोष्ट मी म्हणजे काही इतक मोठा नाही की कुणाला मार्गदर्शन वगैरे करु शकेल, एकच सांगतो, जे काही मनात येइल ते सच्च्या मनाने लिहित जा.. बस्स..
   ब्लॉग पाहिला, छान लेख आहे. उर्दुचा बराच अभ्यास दिसतोय.. 🙂

  • निखिल
   मी काही इतका मोठा नाही की काही मार्गदर्शन वगैरे करु शकेल. एकच सांगतो,. जे काही लिहायचं ते मनापासुन लिहित जा.. बस्स.. एवढंच.. तुमचा ब्लॉग पाहिला, उर्दू वर चांगली कमांड दिसते आहे.. 🙂

 24. anukshre says:

  अभिनंदन महेंद्र्जी,
  इथे खूप छान प्रतिक्रिया आहेत. माझे ही शब्द त्यामध्येच आहेत. तुमच्या लिखाण बद्धल, ब्लॉग बद्धल वेगळे काय लिहू? शब्द सापडत नाहीत. एव्हढेच सांगते तुमच्या पोस्ट पेक्षा तुम्ही स्वतः अनेकांच्या घरी मित्र म्हणून आहात, दादा म्हणून आहात, काका म्हणून आहात….ज्याला जसे नाते आपले वाटते तसे आपणाला संबोधतात. थोडक्यात सांगते नावात काय आहे, नाते महत्वाचे जे आपल्याशी प्रत्येकाने जुळवले. अर्थात टाळी एका हाताने वाजत नाही आपला स्वभाव सुद्धा सच्चा असल्याने आपण ही प्रत्येकाला आवर्जून भेटता. प्रत्येकाच्या मनात ‘काय वाट्टेल ते’ चे नाते आहे. महेंद्र शी नाते आहे. बाकी अलंकार देहाकरिता, मनाचा अलंकार मैत्री, सच्चेपणा, आपलेपणा जो वाचक व आपल्यात कायमच वृद्धिंगत होणार………

  • अनुजा
   तुमची कॉमेंट वाचली,आणि एकदम जाणिव झाली, की इथे ब्लॉगिंग सुरु करुन आपण काय मिळवलं ते!
   इतके दिवस ऑर्कुटवर होतो, फेसबुकवर होतो, पण इथे जी सगळ्यांशी ओळख झाली ती मात्र खुप जवळची ओळख झाल्या सारखी वाटते.
   ्लिखाण तर सुरु रहाणारच.. थोडा उद्या पुम्हा पोस्ट टाकतो, फक्त दिवस भर ~ऒन लाइन रहाणार नाही एवढंच…
   प्रतिक्रियेकरिता आभार..

 25. कौटिल्य says:

  महेंद्र,
  हार्दिक अभिनंदन! आपली लक्ष्य ठेवून ते सध्या करण्याची ईर्शा खरच खूप महत्वाची आहे. त्याशिवाय एवढा ब्लॉग प्रपंच होणे कठीण. सध्या रोज आपला ब्लॉग वाचण्याची जणू सवयच लागली आहे. असेच लिखाण आपल्या कडून कायम होवो हीच सदिच्छा !

  • कौटिल्य
   या वर्षी मी लिहायचं नाही असं ठरवलेलं नाही.. लिहायचं तर आहेच.. शकय होईल तेवढं..
   शुभेच्छांसाठी आभार..

 26. varsha says:

  मैं तो अकेलाही चला था जानिबे मंजिल मगर
  लोग मिलते गये और कारवाँ बनता गयाः

  महेंद्र,
  तुमच्या ब्लॉगची कहाणी ही वर लिहिलेल्या शेरसारखी वाटते.
  मात्र हे प्रत्येकालाच साधेल असेही नाही. कितीतरी जण असतील ज्यांनी ब्लॉग सुरू केले..वाढवले.
  मात्र त्यात सातत्त्य व त्याला प्रतिसाद हे दोन मुख्य घटक लाभलेले काही थोडेच.
  तुम्हीही त्यातले एक..
  कदाचित या ब्लॉगमुळे तुम्हाला अूपेक्षितपणे काही मिळालं असेल, जे तुम्हाला नंतरच्या काळात जाणवलं असेल..तसंच या ब्लॉगमुळे वाचकांनाही काही वेगळं मिळालं असेल…

  यापुढचं तुमचं लिखाण, जसं तुम्ही म्हटलं तसं केवळ स्वतःसाठी लिहिणार आहात. मग तर ते अधिक सखोल व आनंददायी ठरावं असं असेल.
  त्याची मनापासून प्रतिक्षा.

  तुमचे अभिनंदन व शुभेच्छा..

  व र्षा

  • वर्षा
   अगदी खरं आहे. सुरुवात तर केवळ गम्मत म्हणुन केली होती. कदाचित पुढे जास्त दिवस कंटिन्यु झालं पण नसतं. काही मित्रांनी फोर्स केला लिहायला, म्हणुन सुरु राहिलं. आता तर सवय झालेली आहे. काही तरी लिहिल्या शिवाय बरंच वाटत नाही..
   या ब्लॉग मुळे एक झालं, की लिहिण्याची एक स्टाइल डेव्हलप झाली. कुठल्याही विषयाला धरुन आपले विचार व्यक्त करण्याची हातोटी निर्माण झाली. आणि अगदी खरं सांगतो, याचा फायदा मला माझ्या दररोजच्या जिवनात म्हणजे ऑफिस्च्या कामात पण झाला. दुसरं म्हणजे माझा जिद्दी स्वभाव, त्याचा पण फायदा झालाच.. कुठलंही काम अगदी शेवटास नेई पर्यंत पाठपुरावा करण्याची सवय!!! असो..
   शुभेच्छांकरिता आभार..

 27. अमोल says:

  अभिनंदन. पुढील वाटचालीस शुभेच्छा!!

 28. Hello,
  Being a blogger i understand the hardwork and consistency required to achieve this level.

  Hearty congrats.

  Ashish Kulkarni

 29. Onkar Danke says:

  महेंद्र काका ब्लॉगर्स मेळाव्याला आम्ही तुम्हाला खूप मिस केले. असो. तुमच्या ब्लॉगला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. तुमचा ब्लॉग असाच बहरत जाओ… एका वर्षात 365 ब्लॉग लिहणे किती सातत्याचे आणि सचोटीचे काम आहे. हे मी समजू शकतो. मनापासून शुभेच्छा

  • ओंकार
   धन्यवाद.. माझी पण यायची खुप इच्छा होती पण सौ, ला कामानिमित्य बाहेर गावी जायचं होतं, म्हणुन मला घरी रहावं लागलं मुलींसोबत.. असो, पुढल्या वेळेस नक्कीच!!

 30. ब्लॉगच्या वाढदिवसाच्या मन:पूर्वक शुभेच्छा! ही पोस्ट अगदी मनाच्या गाभ्यापासून लिहिली आहे असं वाटलं. तुमचा ब्लॉग भुंगोबा मुळे कळला पण त्यानंतर जवळजवळ रोजच तुमचा ब्लॉग वाचते आहे. या वर्षी ’टार्गेट’ नसलं तरी लेखनात खंड पडू देऊ नका. ब्लॉगसाठी केलेलं नवीन वर्षाचं रिझोल्यूशन चांगलं आहे. तुम्हाला तर पेज रॅंक, हिट्स हे सगळं चेक करण्याची गरजच नाही. अहो, वाचकांनी तुम्हाला भरभरून प्रतिसाद दिला आहे आणि मला खात्री आहे, ते यपुढेही तसा प्रतिसाद देतील. बर्थ डे डान्स छान आहे.

 31. milind says:

  congrats.
  this is the most bautiful baby of 1 year old which is become or responsible for others happyness.this blog is a undivisable part of my life.
  kaka thank u very much and best wishes for future. i m waiting for more and more interesting, beautyful, wakening stories

 32. Pingback: हॅपी बर्थडे…………. « Sahajach’s Blog

Leave a Reply to ajayshripad Cancel reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s