आजकाल तर असं झालंय की तुम्ही कुठेही गेलात तरी तुम्हाला हेच ऐकायला मिळतं, की इट्स मॅन्स वर्ल्ड.. माझा तर अजिबात विश्वास नाही यावर. नेहेमीच असे अनुभव येतात रोजच्या जीवनात. आता हेच बघा नां, सिटी बस मधे त्यांच्या साठी खास सिट्स रिझर्व्ड असतात.. कां ? तर इट्स मॅन्स वर्ल्ड, आणि फेअरर सेक्स मस्ट बी ऑनर्ड.. म्हणुन.. !! आता ह्या स्पेशल लेडीज सिट्स असतांना पण स्त्रिया मात्र कुठेही म्हणजे इतर सिट्स वर पण बसलेल्या असतात. एखाद्या वेळेस जर स्त्रियांसाठी राखीव असलेल्या सिट्स वर जर पुरुष बसला, आणि पुढल्या स्टॉप वर एखादी स्त्री आली आणि समजा तो ताबडतोब उभा राहिला नाही तर त्याला मॅनरलेस, दिसत नाही का ही लेडीज सीट आहे ते.. म्हणून ऐकावं लागतं !!! आणि नेमकं समजा स्त्री पुरुषांच्या सिट वर बसलेली असेल तर तिने उठून उभे न राहिलं तरीही चालतं.. कारण तो तिचा हक्कच आहे ना.. आणि म्हणे इट्स मॅन्स वर्ल्ड!!
कॉलेज च्या ऍडमिशन्स… मधे पण लेडीज कोटा राखीव असतोच.. तसाही या मुलींना अभ्यासाशिवाय काही काम नसतंच, त्यामुळे त्यांना चांगले मार्क्स हे मिळतातच.मुलांना बघा बरं किती कामं असतात, चौकात जाउन चकाट्या पिटणे, ट्रेकींगला जाणे, मित्रांच्या बरोबर सिनेमा पहाणं, कॉलेजला बुट़्टी मारुन सिनेमा पहाणं.. अशी कित्ती कित्ती कामं असतात.. मग तुम्हीच विचार करा.. कोणाला रिझर्वेशनची आवश्यकता आहे?? मुलींना की मुलांना?? मुलींचं काय हो.. त्यांना तर रिझर्व कोटा मधे ऍडमिशन मिळतेच , आणि त्याच सोबत पुन्हा जनरल कोटा मधे पण त्यांची कॉंपिटिशन असते. कसं करावं गरीब बिचाऱ्या पुरुषांनी?? अन म्हणे इट्स मॅन्स वर्ल्ड!!
रस्त्यावरुन जातांना जर एखाद्या सुंदर मुलीच्या स्कुटीने तुमच्या कारला / बाइकला किंवा तुम्ही पाय़ी चालत असतांना तुम्हाला मागून येउन ठोकले, तरी पण त्यात तिची चूक नसतेच.. जी काही चूक आहे ती तुमची.. अहो तुम्ही अशी आपली बाईक एकदम का उभी केलीत रस्त्यावर?? मग मागून येउन कोणी तरी ठोकणारच ना. आणि जर तुम्ही पायी चालत असाल , तर तुम्हाला एवढं पण समजत नाही का की रस्त्याच्या बाजुने चालावे म्हणून?? असं ऐकावं लागेल… सगळ्या स्त्रियांनी एकत्र येउन तुमच्यावर असे आरोप केले तर समजू शकतं, पण अशा वेळी रस्त्यावर उभे असलेले झाडून सगळे पुरुष त्या मुलीचीच बाजू घेतात आणि तुम्हाला ज्ञान शिकवतात की तुम्ही कसे चुकलात ते. जिथे एक पुरुष दुसऱ्या पुरुषाला साथ देत नाही.. त्या जगाला मॅन्स वर्ल्ड कसं म्हणता येईल हो?
एखाद्या सिनेमाला जायची टुम निघते . कॉलेजची सगळी मंडळी कुठल्यातरी एखाद्या मल्टीप्लेक्स वर भेटायचं ठरवतात. प्रत्येक गृप मधे एक सुंदरी असतेच- ( दोन सुंदर मुली एका गृप मधे कधीच पहायला मिळत नाही- कारण?? अहो एक म्यान मे दो तलवार कभी रह नही सकती..) तर सगळे जण वेळेवर येउन पोहोचतात, पण नेमकी ती सुंदरी मात्र अजूनही आलेली नसते. सिनेमाची वेळ झालेली , तिकिटं तुमच्याकडे असतात, पण ती आलेली नसते ना??… तेवढ्यात ती धापा टाकत येते, आणि तिने काही म्हणायच्या आतच, तुमच्यातलाच एक अगदी काळजी युक्त आणि भावनेने ओथंबलेल्या स्वरात म्हणतो, हल्ली बसच काही खरं नाही बरं.. खूप गर्दी असते आणि वर उशिरा पण येते बस हल्ली….. तेवढ्यात!!!! नेमकं तुम्हाला पण पोहोचायला उशीर होतो.. तुम्ही पण आपली बाईक लाऊन धावतच पोहोचता, तुम्ही येण्याच्या एकच मिनिट आधी ज्याने त्या मुलीची तारीफ केली असते तो – आणि तुमची सगळी मित्र मंडळी तुमच्यावर तुटून पडतात.. साल्या जरा लवकर निघायला काय होतं रे तुला?? आम्ही तर गेलो असतो आत्ता निघून आत, जर तूआला नसतास तर.. अन म्हणे हे मॅन्स वर्ल्ड….
एखादा भावस्पर्शी सिनेमा पहातांना तुमच्या डोळ्यात पाणी आलं तर म्हणे ते शोभत नाही तुम्हाला.. कारण तुम्ही पुरुष आहात, आणि तेच जर एखादी स्त्री अगदी येता जाता नळातुन पाणी गळल्याप्रमाणे पाणी काढू लागली तर म्हणे ती ओव्हर सेन्सेटीव्ह आहे..म्हणे इट्स मॅन्स वर्ल्ड..
मला एक तरी अशी गोष्ट दाखवा, की जिथे पुरुषांना जास्त प्रिफरन्स दिलेला आहे ?? नाही नां सापडत एकही जागा? मला पण नाही सापडली अशी एकही गोष्ट् ऑफिस मधे तुम्ही एखादं काम द्या , आणि संध्याकाळी तुमच्या टेबलवर आलं की त्यात पन्नास चुका दिसल्या. नेमके ५-३० झाले ..तुम्ही तिला सगळ्या चुका दुरुस्त करुन मग घरी जा म्हंटलं तर — शी , मेला किती बॉसिंग करतो ?? अशी तुमची इमेज संपुर्ण ऑफिस मधे होईल. आणि नेमकं- समजा तुमची बॉस जर स्त्री असेल आणि तिने तुम्हाला मुद्दाम साडेपाच नंतर थांबवले,असं काम दिलं की तुम्ही ते रात्री ९ पर्यंत पुर्ण करुच शकणार नाही- तर ती तुमच्या बेटरमेंट साठी करते आहे हे सगळं करते आहे.तुमचं प्रमोशन लवकर व्हावं म्हणून…. आणि म्हणे इट्स मॅन्स वर्ल्ड!
मुली अभ्यास खूप करतात.. तसेच काही मुलं पण खुप अभ्यास करतात. अर्थात ही गोष्ट सगळ्या स्त्रिया मान्य करणार नाहीत.. इतका अभ्यास केल्यावर मुलांना पण चांगले मार्क्स मिळू शकतातच ना? आता तुम्हाला ते मिळाले, तर म्हणतील ही इज अ लकी चॅप टु गेट सच अ गुड मार्क्स….. !!बॉस, असं कोणीच असं म्हणणार नाही की तुम्ही हुशार आहात म्हणुन, किंवा खुप अभ्यास केला म्हणून तुम्हाला चांगले मार्क्स मिळालेत ते!! आणि जर नेमक मुलींच्या बाबतीत घडलं तर?? मुली हूशारच असतात.. अन कष्टाळू पण!! असं ऐकायला मिळतं, अन तुम्हाला , जरा शिका तिच्या कडून कसा अभ्यास करायचा ते असंही ऐकावं लागतं.. अन म्हणे इट्स मॅन्स वर्ल्ड!!
सगळ्यात महत्वाचे.. मुलींनी क्रॉस ड्रेसिंग केलं ( ट्राउझर ,शर्ट्स ) तरी त्यावर कोणीच आक्षेप घेत नाहीत, म्हणतात इट्स बिझिनेस ड्रेस!!.. पण जर ते पुरुषाने केले तर ??? अन म्हणे इट्स मॅन्स वर्ल्ड!!!
वाह…खरच इट्स नॉट @ ऑल मॅन्स वर्ल्ड. मस्त झालीय पोस्ट आणि वास्तववादी 😀
आता ह्या पोस्ट वर वुमॅन्स कॉमेंट्स वाचायला आवडातील 🙂
अरे माझ्याच घरातले अनुभव लिहिले असते नां तरी पण एक मोठा ग्रंथ तयार झाला असता.. पण म्हंटलं..अगदी जनरल लिहु आज.. 🙂
ब्लॉगच्या प्रथम वाढदिवसाकरिता शुभेच्छा!
नेहेमीप्रमाणेच भन्नाट लिहिले आहे..
धन्यवाद.. ते वाढदिवसाचे पोस्ट दुपारी टाकतो आज.. 🙂
अरे वाह माहीतच नव्हता मला..अभिनंदन महेंद्रजी
शुभेच्छांसाठी आभार.. हो आजच होतंय एक वर्षं..
ब्लॉगच्या वाढ दिवासनिम्मित तूला अणि तुझ्या ब्लॉगला सुद्धा शुभेच्छा … 🙂
कुठेही ‘पुरुषांच्या सिट किंवा डबे’ राखीव नसतात. शेवटी त्या असतात ‘जनरल’. तेंव्हा All iz Well … इट्स मॅन्स वर्ल्ड!!! 😀
पुरुषांचे डबे.. चांगली कल्पना आहे .. ऑल इज वेल!!
असाच अजून एक लेख वाचनात आला होता… हा बघ … 🙂 http://ase-vatate-ki.blogspot.com/2009/03/blog-post_13.html
सही.. मस्त लिहिलाय ..
ब्लॉगच्या प्रथम वाढदिवसाकरिता शुभेच्छा!
अप्रतिम लिहीले आहेस रे!
विक्रम
धन्यवाद… एक वर्ष कसं गेलं ते समजलं पण नाही.. 🙂
Kaka
Tumchya blog cha aaj Happy Birthday…Ek varshatch ‘Kay vatel te’ changle bolu lagal…chalu lagal aahe….Keep it up..an many many happy returns of the day to Kay Vatel te….
Khar sangato kalch hya mens world cha vichar mazya dokyat aala hota…Tyavar ek SMS pan aahe chan sa…ek point aahe tyat..
*Jar Ek mulga college madhe sarv mulinshi swathun bolat asel tar to Aagau asto pan jar mulagi asel tar ti Moklya manachi,forward minded aahe ti….
हो.. मुलगा अगाउ अन मुलगी असेल तर फॉर्वर्ड… छान आहे..
महेंद्रजी
खरच पुरुश्यांच्या दु:खाला 🙂 वाचा फोडली आहे तुम्ही…
पुरुषांची होणारी घुसमट 🙂 छान मांडली आहे….
माला तरी वाटते Youth For Equality सारखीच एखादी चळवळ सुरु व्ह्यायला हवी ह्या ‘काली-युगा’ विरुध.
पण ह्या चलवलिचे यश फारच कठीण वाटतय कारण ह्यातील प्रत्येक कार्यकर्त्याला पहिला विरोध हा स्वतः;च्या घरातुनच असणार…:)
असो, माझ्या स्त्रीवाद ह्या विडम्बनातील स्त्रीयानी खेचून घेतलेले काही ‘आरक्षण-वजा स्वातंत्र्य’ जे तुमच्या पोस्ट ला समर्पक आहेत
विमान सेवा(एयर होस्टेस),अरोग्यसेवा(नर्सेस वगैरे) यात कमीत कमी ९०% आरक्षण.
सरकारी बसेस मध्ये ५०% आरक्षण.
बैंकतुन कर्ज घेताना आरक्षण.
नवरयाचा महिन्याचा पगार पहिल्या दिवशीच घेवून ती आपल्याच कष्टाची कमाई आहे असे समजुन मनसोक्त खर्च करण्याचे स्वातंत्र्य.
स्वतः काही एक नसताना डॉक्टर नवर्याच्या पुण्याईणे डॉक्टरिन बाई, किवा मास्तर नवर्याच्या पुण्याईणे मास्तारिन बाई असे बिरुद मिरवन्याचे स्वातंत्र्य.
स्वत: नौकरी करत नसताना matrimony site वर नौकरी करणाराच नवरा पाहिजे अशी अपेक्षा म्हणुन लिहिण्याचे स्वातंत्र्य.
नौकरीत कितीही चूका केल्यात तरी टीम मेनेजर कडून appreciate mail मिलविन्याचे स्वातंत्र्य .
आपले काम कधीही वेळेवर पूर्ण न करता मेनेजरला आपल्या घरच्या कामाच्या व्यापाचे कारण देऊन त्याला सेंटी(मेंटल) करण्याचे स्वातंत्र्य.
तेच उरलेले काम मग male collegue ला गोड स्माइल देवून त्याच्या माथी मारण्याचे स्वातंत्र्य.
रात्रि सुरक्षिततेचे कारण देवून ऑफिस मधून ६ वाजताच कलटी मारण्याचे स्वातंत्र्य .
..आणि इतर नमूद न करण्यासारखे बरेच काही….
अतुल
तुमच्या ह्या कॉमेंटने हे पोस्ट पुर्ण झाले… खुप मुद्दे ऍड केलेत तुम्ही..
अतुलच्या मुद्द्यांमध्ये मला एकच addition करायची आहे:
नवऱ्यानं बायकोच्या Shopping वर केलेला खर्च हा Income Tax साठी Investment म्हणुन मान्य करण्यात यावा आणि त्याला संपुर्णपणे टॅक्स-फ्री घोषीत करावं. 🙂
सहमत.. आणि ज्याची बायकॊ जास्त खर्चीक त्याला जास्त इनक्रिमेंट्स देण्यात यावे.. म्हणजे त्याला कमी त्रास होईल.
पुरुष मुक्ती संघटनांची गरज आहे? 😀
पंकज
अजुनतरी तशी वेळ आलेली दिसत नाही.. पण लवकरच येईल, तेंव्हा बघु या.. आपले सगळे ब्लॉगर्स नक्कीच येतील या संघटनेत 🙂
महेन्द्रजी आगे बढो हम आपके साथ है..:D
असं तर नाही नां, की तुम लडॊ, हम कपडे संभालताय!! 🙂
हे हे..बस काय. एकबार आजमाके देखो तो..फिल्मी आहे पण चालून जाईल इथे 😀
🙂 😀
अति उत्तम पोस्ट भाऊ… आता मराठी ब्लागवाणी मुळे मराठी ब्लॉग्स वाचायला सोपं झालयं आमच्या सारखे “हिन्दी वाले” लोकांना… शुभेच्छा…
तुमचे स्वागत.. पहिल्यांदा आलात ब्लॉग व वर म्हणुन.. !!ब्लॉग वाणी वर मराठी ब्लॉग रजिस्टर केले गेले आहेतच. पण सोबतच तुम्ही मराठी ब्लॉग http://marathiblogs.net/ इथे पण पाहु शकता…
सर्वप्रथम “काय वाटेल ते”च्या प्रथम वर्धापन दिनाच्या शुभेच्छा.
पोस्ट मधील सगळ्या मुद्द्यांना अनुमोदन. बाकी तुमच्या घरचे कुणीच तुमचा ब्लॉग वाचत नसणार ह्याची खात्री पटली. 😉
सिध्दार्थ
धन्यवाद… 🙂 चला कोणाची तरी तर खात्री पटली.. 🙂
mahendra kaka, ha lekh ekada jara ghari ekate nasatana mothyane vachoon bagha bare 😉 😀
“घरी एकटं असतांना” हा कळीचा मुद्दा आहे. नाहीतर घरातुन सरळ बाहेर काढलं जाईल.. मी इथे मायनॉरिटी मधे आहे घरी 🙂
mi ghari ekate NASATANA mhataley ithe 🙂
माझ्या डिक्शनरीत ’न’ नाही नां, म्हणुन असल्याचंच दिसतंय ते..मला 🙂
ब्लॉगच्या प्रथम वाढदिवसाकरिता शुभेच्छा! महेश
महेश
धन्यवाद… प्रतिक्रियेकरता, आणि शुभेच्छांसाठी आभार..
काका,
क्रुपया शुद्धलेखनाकडे थोडे लक्ष द्या.
“तुम्ही पाई चालत असाल” च्या ऐवजी तुम्ही पायी चालत असाल. असे लिहावे.
अरे ते वाय उमटला नाही बहुतेक टाइप करतांना. आणि घाईत असल्याने टाइपल्यावर चेक न करता पोस्ट केले.. म्हणुन असे झाले.. असो.. दुरुस्त करतोय.
happy birthdayyyyyyyyyyyyyyyyyyyyyyyyyyyyyyyyyyyyyyyyyy
एक गोष्ट
लग्नासाठी
बाई house wife chalate
पण नवरा house husband नाही चालत
सुरेश चिपळूणकर यांची प्रतिक्रिया वाचली
त्यांची प्रतिक्रिया इथे वाचून आनंद झाला
हिंदी मधले नावाजलेले ब्लॉगर आहेत
मी त्यांच्या प्रत्येक पोस्ट वाचलेल्या आहेत best blog …………….
प्रतिक्रियेकरता आभार..
मला माहिती नव्हतं. मी त्यांना इ मेल पण पाठवलाय , मराठी ब्लॉग . नेट च्या लिंक चा.. मी पण आता वाचुन काढतो पोस्ट्स.. 🙂
पुरुषावर हाउस-हसबंड होणे बंधनकारक नसते… मग स्त्रीवरच का? एखादी स्त्री नवर्यापेक्षा जास्त कमवत असली आणि प्रोफेशनल करिअरमध्ये कितीही यशस्वी असली तरी घराची आणि घरकामाची संपूर्ण जबाबदारी तिचीच असते असे सगळे मानतात… धुणी भांडी करायला बाई ठेवायला तिला परवानगी मिळते फार तर..
पुरुष घरकामाला अगदी सहज नकार देऊ शकतो.. पण बाई?? (हे मी सर्वसामान्य लोकांबद्दल बोलतेय…कृपया कोणीही उत्तर देतांना प्रतिभाताई पाटील किंवा सोनिया गांधी असली उदाहरणे देऊ नयेत..)
दोघंही कमावणारे असले की एकेमेकांना मदत हे करतातच.बरेच्दा बाहेर लोकलाजेमुळे लोकं सांगत नाहीत, पण भाजीचिरणे, ताट – पाणी घेणे वगैरे काम पुरुष करतात हल्ली. कदाचित मागच्या पिढी मधे हे नसेल, पण आता मात्र बऱ्यापैकी इम्प्रुव्हमेंट आहे.
एकत्र कुटुंबात अजूनही नाही होत हो असे… सासू सासरे सोबत असले तर नवर्याने ताट-वाटी पाणी इतकेच कश्याला.. स्वत:च्या स्वत:: ताट वाढून घेतले तरी भुवया उंचावतात…
office मधे आल्या नंतर सर्वात प्रथम गूगल चालू करून suresh chip टाइप केल्यावर त्यांचे पूर्ण नाव येत मग I am feeling lucky वर click करण एक वर्षापासून चा
दिनक्रम झाला आहे
सर्व ब्लॉग्स मधे सर्वात जास्त उत्सुकता त्यांच्या पोस्ट बद्दल असते
मी आत्ताच तो ब्लॉग पाहिला. आणि फिड घेतलाय गुगल रिडरवर !! ब्लॉग खरंच छान आहे..
आणखीन एक ब्लॉग आहे चांगला time pass आहे काही कोडी असतात त्याची उत्तर द्यायची प्रतिक्रिया पण गमतीशीर असतात बघा ब्लॉग URL http://www.taauji.com/2010/01/52.html
धन्यवाद.. चेक करतो.. तसे हिंदी ब्लॉग्ज वाचलेले नाहीत फारसे.. आता सुरु करतो..
हिंदी ब्लॉग वाचण्यासाठी marathiblog.net प्रमाणेच एक साइट आहे URL
http://www.blogvani.com/ त्या मधे भाषा निवडीचे पर्याय आहेत त्या भाषेतील ब्लॉग वाचू शकता
थॅंक्स..