व्हाईट इंडीयन हाउस वाईफ…

बरेचसे मराठी लोकं अमेरिकेला, ऑस्ट्रेलियाला आणि इतर देशात पोहोचले आहेत. कामाच्या निमित्याने नवऱ्याबरोबर डिपेंडंट व्हिसा ( जरी बायको सुशिक्षित असेल तरी पण) घेउन अमेरिकेत जाउन रहाणाऱ्याची संख्या पण खूप आहे. दूर कशाला, माझी बहीण पण बिई+ एमबीए फिनान्स करुन  तिथे हाउस वाइफ म्हणुन राहिली. भारता मधली कामाची सवय, आणि यु एस ला गेल्यावर भयाण रिकामपण… केवळ तिला अभ्यासाची आवड म्हणून कुठलातरी फिनान्स चा कोर्स केला होता तिने तिथल्या वास्तव्यात. पण जर असा काही इंटरेस्ट नसेल तर  बाहेर रहाणं अतिशय कंटाळवाणं होतं.

दुसरा देश, एकटं रहाणं दिवसभर.. काय करणार? दिवस काढणं कठीण होतं. इथून जातांना जास्त वजन नेता येत नाही म्हणून आवडीने घेतलेली बरीचशी पुस्तकं इथेच ठेऊन जावी लागतात.   सोशल साईट्स हा एक पर्याय असतो, पण ते तरी किती दिवस करायचं??

सोशल साईट वर विनाकारण टवाळक्या करायचा पण कंटाळा येतो. निरर्थक गप्पा, टप्पा.. किती मारायच्या?? त्याला पण लिमीट आहे की नाही.. नाही तर.. जाउ द्या…

कधी विचार केलाय की भारता मधे जर एखादी परदेशी तरुणी आली , आणि तिने इथेच रहाण्याचे ठरवलं तर तिचं आयु्ष्य कसं असेल??..एक ऑस्ट्रेलियन तरुणी शरील कुक मेलबॉर्न मधुन  सुटीवर भारतामधे फिरायला येते. व्यवसायाने अकाउंटंट.. इथे आल्यावर एका भारतीय तरुणाशी प्रेमात पडून लग्न करते आणि इथलीच होऊन जाते.. कल्चरल डिफरन्सेस इतके जास्त असतात की सरळ परत निघून यावंसं वाट्त, पण ती मात्र  भारताच्या प्रेमातच पडते .

तिचा एक ब्लॉग आहे… तिच्या ब्लॉग  मधे ती लिहिते -भारतीयाशी लग्नं केलं , इथे भारतामधे ती रहायला आली, आता इथेच रहायचं म्हणून इथल्या संस्कृतीशी जुळवून घेणं आलंच.. इथल्या संस्कृतीशी जुळवून घेण्याची तिची धडपड……. आणि   तिच्या नजरेतून भारत कसा दिसला  ?? यावर एक सुंदर ब्लॉग वाचायला मिळाला. डायरी ऑफ अ व्हाइट इंडीयन हाउस वाईफ.

त्या साईटवर मी कसा पोहोचलो?? गुगल रिडर मधे रेकमंडेड आयटम्स मधे तिचे पोस्ट एक रेकमंड केलं मला गुगल अंकलनी.. क्लिक केल, तो ब्लॉग उघडला, आणि ते पोस्ट तर वाचलंच पण त्याच सोबत इतरही बरेच पोस्ट वाचून काढले. आणि नंतर मग तिचा ब्लॉग सरळ गुगल रिडरवर घेउन ठेवला.

तिचे सगळे अनुभव तिने या ब्लॉग वर लिहुन ठेवले आहे. आणि प्रत्येक पोस्ट जे आहे ते अगदी शंभर टक्के   अगदी खरं खरं .. म्हणजे तिला जे वाटेल ते – एकदम ‘दिलसे’ लिहिलंय तीने.

तिचे भारतामधले अनुभव, हिंदी शिकणं,  हिंदी मधे कोणाशी बोलते , तेंव्हा त्यांना वाटणारे आश्चर्य… आणि असे अनेक पोस्ट्स.. आहेत या ब्लॉगवर ज्या मुळे हा ब्लॉग खूप इंटरेस्टींग झालाय.. मी स्वतः हा ब्लॉग नेहेमी वाचतो.

कुठे तरी तिच्या ब्लॉग वर वाचलंय की ती स्वतः लोकांच्या पाया पडणॆ ( नमस्कार करणे) एंजॉय करते- आता ह्यात काय आहे एंजॉय करते??कुणाला कुठल्या गोष्टीचं कौतुक वाटेल ते सांगता येत नाही…   असे अनेक लहान लहान प्रसंग आहेत तिच्या जीवनातले ती इथे शेअर करते.

लोकं आपलं घर स्वच्छ ठेवतात, पण खिडकी मधुन खाली कचरा का टाकतात?? याचं आश्चर्य वाट्त तिला,  आणि त्यावर पण ती एक पोस्ट लिहीते.. आता आपल्या दृष्टीने खिडकीतून कचरा फेकण नॉर्मल आहे.. पण .. तिच्या नजरेला ते बोचलं…!!! तिच्याच कॉम्प्लेक्स मधे एक नोटीस लागते, ती तिने ब्लॉग वर पोस्ट केलेली आहे.

भारतात गाय पवित्र का मानतात?? आणि तत्सम गोष्टीवर पण तिने  एक पोस्ट लिहिले आहे. बरं, नुसतं पोस्ट लिहिलं असं नाही, तर एके ठिकाणी चक्क उपनिषदावरची तिची टिप्पणी आहे की जी  वाचून आश्चर्य वाटल्या शिवाय रहाणार नाही. जेवढ्या सहजतेने ती हे लिहिते, तेवढ्याच सहजतेने डास मारायची बॅट ( अहो ती व्हिटी, किंवा चर्चगेटच्या जवळ मिळते ती) आणि तिची उपयोगिता यावर पण तेवढ्याच सहजतेने लिहिते. 🙂

भारतामधे घरात कामवाली बाई असतेच.. इथे कामवाली असणं म्हणजे लक्झुरी नाही तर नेसेसिटी आहे. जेंव्हा ती पहिल्यांदा घरात कामाला बाई ठेवते, तेंव्हा तिच्या बरोबरची ईंटरॅक्शन आणि कसं वागायचं तिच्याशी?? हा पडलेला प्रश्न म्हणजे तिचं एक पोस्ट, जेंव्हा वाचलं गुगल रिडरमधुन तिच्या ब्लॉग वर जाउन कॉमेंट टाकल्याशिवाय रहावलं नाही- उगिच तिचा कोणी गैरफायदा घेऊ नये म्हणून… 🙂    हो ना..  मोलकरणीला मिठ्यामारते ही  शरील….:)

कोणाकडे भेटायला जातांना अपॉइंट्मेंट न घेता जाणे हे  तर अगदी कॉमन आहे भारतामधे. कोणीतरी डोअर बेल वाजवत, अन दार उघडायला समोर जावं लागतं. घरात असतांना आपल्याला नाईटी घालुन कोणी पाहिल म्हणून आलेला अस्वस्थपणा, आणि नंतर इतर स्त्रियांना पण तसंच पाहिल्यावर – वागणुकीत येणारा सहजपणा अतिशय सुंदर व्यक्त केलाय .कधी तरी कोणाच्या तरी घरी गेल्यावर पुरुष मंडळी बाहेरच्या खोलीत बसल्यावर, घरच्या गृहिणीने तिला आपल्या सोबत किचन मधे गप्पा मारायला बोलावले, तेंव्हाचा तिला बिअर ऑफर केली जाते, आणि ती हवी असतांना पण केवळ वाईट दिसेल म्ह्णून नाही म्हणते, तेंव्हाच ती हे पण म्हणते, की माझी खरं तर इच्छा होती बिअर प्यायची, पण …..!! म्हणजे सच्चेपणा आहे तिच्या लिखाणात!

बरं मंडळी.. हे सगळं तर ्ठीक आहे.. पण तिची भारता बद्दलची क्वेस्ट इतक्यावरच थांबत नाही. ती  चेन्नाई ते मुंबई ऑटो रिक्शाने प्रवास करते.. स्वतः ड्राइव्ह करत.. खरंच .. तिने १३ दिवसात चैन्नाइहून निघाल्यावर ती व्हाया म्हैसुर, बंगलोर , मुरडेश्वर, महाबलेश्वर, गोवा वगैरे ठिकाणं कव्हर करित २००० किमी चा टप्पा तिने पार केलाय १३ दिवसात. यावर तिने एक पोस्ट लिहिलंय आणि काही फोटो पण टाकले आहेत फेसबुकवर. लिंक आहे तिच्या ब्लॉग वर.. आता मुंबईला आल्यावर रोज कुठे ऑटॊ चालवायला मिळणार?? पण एक दिवस   रात्री एका ऑटॊ  वाल्याने ऑटॊ चालवायला दिला, आणि दुसऱ्या दिवशी  तिने एक पोस्ट टाकले …

अजुन बरेच अनुभव आहेत तिचे.. जसे पायात जोडवी (टो रिंग)घालणं वगैरे पण एका पोस्टचा विषय आहे. लग्न झालं आणि ही बाई आधी मार्केटला जाउन जोडवी विकत आणून पायात घालते… !!! कल्चरल डिफरंन्सेस ची गॅप भरुन काढायला??

तिचा ब्लॉग म्हणजे अशा अनेक अतर्क्य घटनांची जंत्री आहे.. एकदा वाचणे सुरु कराल , तर नक्कीच किती वेळ घालवाल या ब्लॉग वर ते सांगता येत नाही. प्रत्येक पोस्ट वाचनीय आहे.. एकदा वाचाल, तर नक्कीच फॉलो कराल.

हे पोस्ट शेरिलला थॅंक्स म्हटल्या शिवाय पुर्ण होऊच शकत नाही.  तिला मेल पाठवला, तिने फोटो वापर म्हंटलं, पोस्ट लिहिण्याला पण काही आक्षेप घेतला नाही म्हणून हे पोस्ट लिहिता आलं.. तिला समजावं म्हणून खाली एक लहानशी टीप्पणी देतोय..

Hi Sharell,
Thank you very much for allowing me to use your pics on my blog in this post..
Mahendra

About महेंद्र

माझा ब्लॉग :- http://kayvatelte.com
This entry was posted in व्यक्ती आणि वल्ली and tagged , , , , , . Bookmark the permalink.

54 Responses to व्हाईट इंडीयन हाउस वाईफ…

 1. Suhas says:

  वाह खूपच मस्त आहे हा ब्लॉग आणि तिचे अनुभव पण खूप सुरेख पद्धतीने मांडले आहेत..अप्रतिम

 2. Rohan says:

  दादा … तुझी ही ‘व्हाईट इंडीयन हाउस वाईफ’ भारीच आहे … चेन्नई ते मुंबई ऑटो रिक्शाने प्रवास १३ दिवसात… जबऱ्याच. हेहे.. तिचा ब्लॉग वाचीनच लवकरच पण तू मस्त वर्णन केले आहेस तिच्या अनुभवांचे… 🙂

  • प्रत्येक गोष्ट जी लिहिली आहे तिची लिंक देता आली असती, पण मुद्दाम दिली नाही.. म्हंटलं शोधु देत सगळ्यांना.. कदाचीत अजुन काही खजिना सापडेल तिच्या ब्लॉग वर.

 3. bhaanasa says:

  वाचायलाच हवा तिचा ब्लॊग. बाकी भयाण रिकामपणाबद्दल न बोललेलेच बरे…:) तिचे कौतुक एकदम तिच्याच स्टाईलने….” दिल से ’ केले आहेस…मस्तच.

  • गेले बरेच दिवस हा ब्लॉग वाचतोय.. शेवटी तिला मेल केला , आणि तिला विचारलं, तिच्यावर लिहिलं तर चालेल कां? अगदी अजिबात खळखळ न करता तिने होकार दिला.. म्हणाली हवं तर फोटॊ पण पोस्ट करु शकतोस.. 🙂 म्हणुन हा ब्लॉग लिहिता आला. मला खरंच तिचा लाइव्हली नेस आवडला.

 4. gouri says:

  vaacaayalaach hava ha blog … khoopach interesting maahiti dilit tumhi.

 5. अरे वा, स्वत: रिक्षा चालवून चेन्नई-मुंबई प्रवास, गायीवरचा लेख, पायात जोडव्या.. जामच व्हर्सटाईल दिसत्ये ही गोरी मद्दम.. आजपासूनच तिचा ब्लॉग वाचायला सुरुवात करतो.

  • बऱ्याच गोष्टी इतक्या साध्या आहेत ना.. जसे डास मारायची बॅट!! मी पण बरेचदा पहिलंय त्या बॅटला.. पण कधी लिहावंसं वाटलं नव्हतं… प्रत्येक एक्स्प्रिमेंट करुन पहायची आवड!!

 6. मस्त माहितीपुर्ण ब्लॉग इन्फ़ोर्मेशन आहे..हा ब्लॉग वाचायला सुरुवात आता.

  • आनंद
   २००६ ला ब्लॉग सुरु केलाय तिने, मी पण अजुन पुर्ण वाचलेला नाही. जुने पोस्ट वाचत असतो अधुन मधुन..

 7. dada ajay here….!
  by da way again ur maezing….! no one can be like u…
  its my new bolg somethingheart.wordpress.com
  please do visit…..!
  DADA U ROCK….!

 8. वेळ काढुन वाचावा लागेल हा ब्लॉग…

 9. Aparna says:

  अरे सही आहे ही बाई…अहो खरं सांगायचं तर भारताचं आणि भारतीय संस्कृतीचं आकर्षण गोर्यांना अमळ जास्तच आहे.. त्यादिवशी माझ्या सखी शेजारीणीने मला वेदामधली एका ब्राम्हण आणि कसाई याची गोष्ट बोलता बोलता वानगी म्हणून सांगितली..तीच जिच्याबद्द्ल मी एकदा ब्लॉगवर लिहिलंय…(साशा) मी तर उडालेच… ही लोक जे करतात ते अगदी खोलवर माहिती काढून आणि सच्चाई त्यांच्यात आहेच…
  इतका चांगला ब्लॉग शोधल्याबद्द्ल आभार मानू का?? पण कमॉन आता आमच्यासाठी तुम्ही नाही करणार हे तर कोण?? (जसं खादाडी टाकून आम्हाला जळवता मग उतारा पण हवाच ना काहीतरी??) 🙂

  • अपर्णा
   आभार मानले नाही तरी चालेल, पण मी एकटाच हा ब्लॉग वाचतोय गेले सहा महिने- हे पोस्ट इतक्या उशिरा का लिहिलं म्हणुन शिव्या देउ नका म्हणजे झालं….
   खादाडीचे फोटो तर आपोआपच पोस्ट होतात.. ते काही मी करित नाही.. 🙂 सोमवारी जातोय भोपाल, ग्वालियरला… तेंव्हा पुन्हा गजक आणणार आहे ग्वालियरहुन, 🙂 फोटो पोस्ट करिनच!! 🙂 खास तुमच्यासाठी 🙂

   • ravindra says:

    अहो आम्हाला विसरू नका. परत येतांना नाशकात उतरलं तर बोलवा किंवा स्टेशन वर येतो पार्सल घ्यायला. 🙂 तोंडाला पाणी सुटलंय!!! कित्येक वर्ष झाली गजक खाऊन!

 10. mugdha says:

  छान माहीती दिलीत…नक्की जाऊन वाचते तिचा ब्लोग..
  भारत तसाही प्रत्येक गोष्टीने समृध्दच आहे,भारतातल्या वेगळ्या प्रांतातच राहुन खुप काही अनुभव आले तर तिच्यापाशी तर अनुभवाचे गाठोडेच असणार…

 11. कालपासुन तिचाच ब्लॉग वाचत्ये, खुपच हटके आहे. का एव्हढ्या उशिरा सांगितलेत आम्हाला या ब्लॉगबद्दल? – सोनाली

 12. आता मी पण फीड घेऊन टाकते. माहिती तुम्ही सुंदरच दिली आहे. नवीन टेम्पलेट छान आहे. सरप्राईझिंग. मी टाईप केलेला पत्ता चेक केला. मला वाटलं पोस्टसारखं तुमच्या ब्लॉगचं नावपण चोरलं तर नाही ना कुणी? शेरीलने काय लिहून ठेवलंय, ते आता वाचेनच. पण खरं सांगायचं तर, भारताबाहेरच्या लोकांना भारताची जी किंमत कळली आहे, तशी ती भारतातील लोकांना कळलेली नाही.

  • कांचन
   हे टेम्प्लेट आजच रिलिझ केलंय वर्ड प्रेस वर. म्हणुन चेंज करुन पाहिलं. इथे इतर डाउनलोड केलेले टेम्प्लेट्स चालत नाहीत.. त्या साठी . कॉम साईट बनवावी लागते..
   “भारताबाहेरच्या लोकांना भारताची जी किंमत कळली आहे, तशी ती भारतातील लोकांना कळलेली नाही” हे अगदी खरंय.. तिच्या प्रत्येक पोस्ट मधे एक सच्चे पणा आहे, म्हणुन ते मनाला भावते. असे तर अनेक ब्लॉग आहेत, पण हिचा ब्लॉग मला जास्त आवडतो.. 🙂

 13. vikram says:

  तिचा बॉल्ग तर वाचणारच आहे
  पण तुमची पोस्ट हि मस्त झाली आहे
  धन्यवाद माहित्बद्दल

 14. मस्त लिहीले आहे शरीलने तुमच्या बद्दल आणि ‘काय वाट्टेल ते’ बद्दल. नविन वर्ष जोरात आहे तुमचे महाराष्ट्रीयनच नाही तर foreigner fans – सोनाली

 15. akhiljoshi says:

  आपल्याला किमत नाही कळत आपल्या इथली……
  आणि आपण भीड बाळगतो स्पष्ट बोलण्याची…
  तिचे अंतर्मन इतके स्वच्छ आहे.. कि ती स्वच्छ निर्मल मानाने बोलते..
  आत एक नि बाहेर एक असे काही नाहीये तिच्या लिखाणातही…
  ब्लोग बघितला .. चालला.. आता वाचत जाईन …
  स्पर्शात राहा…

 16. mipunekar says:

  मस्त…
  धन्यवाद असा ब्लॉग शेअर केल्याबद्दल. नेहमी प्रमाणे पोस्ट एकदम मस्त आहे. शारेल चा ब्लॉग पण मस्त आहे.

  • वाचुन बघा, त्यात काही प्रसंग फारच इंट्रेस्टींग आहेत.. तिच्या नजरेतुन.. मी पण अजुन पुर्ण वाचलेला नाही. बरंच वाचणं बाकी आहे अजुन.

 17. Yes me sharrel chya blog la niyamit bhet dyayache. Khup chhan lihite ti. Paradeshi asun tichi bharatala apalasa karanyachi vrutti vakhananya sarakhi aahe. Tiche aani tichya sasuche initial prasang farch chhan lihile aahet.

  share kelyabaddal dhanyavaad!

  • शब्दांकित
   हो.. ते प्रसंग पण खुप सुंदर आहेत, खरं तर अजुनही बरंच कव्हर करता आलं असतं, पण पोस्ट खुप मोठं मोठं झालं होतं म्हणुन थांबवलं. अजुनही बऱ्याच घटना आहेत, ज्या वाचतांना छान वाटतं. 🙂

 18. Sharell says:

  Namaskar. Maza badal itke chan chan gostha lehana sati, kup dhanyawad. Vachun kup anand alla. 🙂

  • शरील
   इथे येउन मराठीत प्रतिक्रिया लिहिलीस, आणि मी जे काही लिहिलंय ते आवडलं, त्या बद्दल आभार.. लवकर मराठी पण शिका, आणि इथे येत रहा.. मराठीवाचायला.

 19. ravindra says:

  महेंद्र
  तुम्ही एक छान ब्लोग इंट्रोड्यूस केला आहे. इतके दिवस स्वतः वाचत राहिला कमीत कमी आम्हाला मेलने सांगितले असते. असो! छान आहे हि बाई. दिलखुलास.तिचा ब्लोग सुद्धा छान आहे.

  • रविंद्र
   गेले बरेच दिवस झाले यावर लिहिण्याचा विचार करित होतो, पण तिच्याशी संपर्क होऊन नंतर परमिशन घ्यायला इतका वेळ लागला.. 🙂

 20. saurabhda says:

  एका उत्तम ब्लॉगची ओळख करुन दिल्याबद्दल धन्यवाद.

  -सौरभदा

 21. रवि करंदीकर says:

  महेंद्रजी

  तुमचे मनापासून अभिनंदन. मी नेट वर असलो की तुमच्या ब्लॉग वर दृष्टी टाकल्यावाचुन पुढे जात नाही.

  पहिल्यांदा पाहिले तेव्हा ब्लॉगचे नावच खुप आवडले… आणि खरोखरच (नावाला जागून) तुम्ही (तुम्हाला) काय वाट्टेल तेच लिहित आलात ते सुद्धा अगदी त्रयस्थ भुमिकेतून ! ते पण आवडले.

  काही वेळा अगदी ‘पाट्या’ टकल्या सारखे पण वाटले – पण असे प्रसंग क्वचितच.

  सरासरीने पहाता तुमचे लिखाण उत्तम (उच्च नव्हे!) दर्जाचे आहे व त्यामुळेच आपलेपणा वाटतो. (कदाचित ‘उच्च’ लिखाण असते तर तितका आपलेपणा वाटला नसता)

  पुढील लेखन प्रवासा साठी खुप खुप शुभेच्छा !!

  असाच चांगला अभिप्राय पुढील वर्षी पण द्यावसा वाटेल असे साहित्य आपल्या लेखणीतून (का keyboard मधुन?) येवो ही अपेक्षा.

  आपला शुभ-चिंतक

  रवि करंदीकर

  २३ जानेवारी, २०१०

  • रवी
   अगदी प्रांजळ प्रतिक्रिया दिलीत .. बरं वाटलं..

   – बरेचदा आपल्याला काय वाटते ह्या पेक्षा इतरांना काय आवडेल हे लिहिण्याकडे कल असतो, त्यामुळे लिहिण्यावर मर्यादा पडतात.. ते यावर्षी बंद केलंय. पुन्हा अगदी ’काय वाटेल ते’ लिहायचं असं ठरवलंय…

 22. काका, वाचून खुपच आनंद झाला.. शरीलजींचा ब्लॉग वाचायलाच हवा.. बघतो काय-काय नविन शिकता येते ते… बाय द वे, एवढे कष्ट घेऊन तुम्ही ही पोस्ट तयार केल्याबद्दल खुप खुप आभार…
  विशल्या!

 23. शेरीलने आज तुमच्या नावानं पोस्ट लिहिली बरं का!

  • कांचन
   हो पाहिली मी. आजकाल कॉमेंट्स ऑटो अप्रुव्ह केल्यामुळे ह्या कॉमेंटला उत्तर द्यायचं राहुन गेलं. 🙂

 24. Pingback: खोटे फोटो सकाळमधे… « काय वाटेल ते……..

 25. MANISHA NARAL says:

  khupach chan lekh aahe. jya thikani apan jau tya thikanachi sanskruti japan he pharach thodya lokanna jamat.

  • मनिषा

   तिचा ब्लॉग एकदा गुगल मधे सापडला, आणि तेंव्हा पुर्ण वाचला. नंतर लक्षात आलं, इतक्या सहज पणे शेरिल भारतात समरस झालेली आहे, किंवा समरस होण्याची तिची भावना मनापर्यंत भिडली, म्हणून हे पोस्ट लिहीलं होतं तिच्यावर..
   ब्लॉग वर स्वागत, आणि आभार..

 26. ninad kulkarni says:

  आमच्या कुटुंबाला आवर्जून हा ब्लॉग वाचायला सांगेन अर्थात स्वतः ही वाचेन.

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s